Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शालेय पोषण आहारासह मुख्याध्यापकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी सापळा रचून रंगेहाथ पकडत मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथे घडली. या प्रकरणी सरपंचांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, मुख्याध्यापकांना अटक केली आहे. किशोर दत्तात्रय ततार असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी ३२०० रुपये किमतीची ४० किलो चवळी जप्त केली आहे.

मनमाडजवळील पानेवाडी येथील सरपंच राजू वाल्मिक सांगळे यांनी मनमाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पानेवाडी जिल्हा प्राथमिक प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर ततार हे शाळेतील शालेय पोषण आहाराचे तांदूळ तूरडाळ, तेल, चवळी, मठ आदी धान्य शाळेतून घरी नेतात. त्यामुळे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही, अशा तक्रारी असल्याने आम्ही शुक्रवारी दुपारी शरद आहिरे, मोतीराम कातकडे, अंकुश कातकडे, वाल्मीक सांगळे आदी ग्रामस्थांसह सर्वांनी पाळत ठेवली असता ततार चवळीचे पोते मोटरसायकलला लावून आपल्या घरी मनमाडके जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना हाका मारल्या तर तिथे न थांबता ते पळाले. पाठलाग करून त्यांना निमोण चौफुली येथे ग्रामस्थांनी पकडून मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक ततार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकाराने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामागे राजकारण असून, आपल्याला गोवले जात असल्याचे सदर मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानेवाडी येथे मुख्याध्यापकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी सापळा रचून रंगेहाथ पकडत मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथे घडली. या प्रकरणी सरपंचांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर दत्तात्रय ततार असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी ३२०० रुपये किमतीची ४० किलो चवळी जप्त केली आहे. पानेवाडीचे सरपंच राजू सांगळे यांनी मनमाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, पानेवाडी जिल्हा प्राथमिक प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर ततार हे शाळेतील शालेय पोषण आहाराचे तांदूळ तूरडाळ, तेल, चवळी, मठ आदी धान्य घरी नेतात, अशा तक्रारी असल्याने आम्ही शुक्रवारी दुपारी शरद आहिरे, मोतीराम कातकडे, अंकुश कातकडे, वाल्मीक सांगळे आदी ग्रामस्थांसह सर्वांनी पाळत ठेवली. पाठलाग करून त्यांना निमोण चौफुली येथे ग्रामस्थांनी पकडून मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात दिले. या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक ततार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यामागे राजकारण असून, आपल्याला गोवले जात असल्याचे सदर मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांना ऑनलाइन गंडा

$
0
0

एका लष्करी कर्मचाऱ्याचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एटीएम कार्डचे पासवर्ड मिळवत भामट्यांनी ​शहरातील तिघा व्यक्तींना गंडा घातल्याच्या घटना घडल्या आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये एका लष्करी जवानांचा समावेश असून, ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या संशयितांना शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गेल्या काही वर्षात ऑनलाइन बँकिंग तसेच डेबीट वा क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच फायदा घेत समाजकंटक ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार करीत आहेत. एटीएम, फोन बँकिंग तसेच ऑनलाइन बँकिंगसाठीचे पासवर्ड अथवा सीव्हीव्ही नंबर इतरांना सांगणे धोकादायक असल्याचे बँकातर्फे वारंवार सांगण्यात येते. दुर्दैवाने हे पासवर्ड अथवा नंबर भामट्यांपर्यंत पोहचले तर खात्यातील बॅलन्स शुन्य होण्यास वेळ लागत नाही. फसवणुकीचा हा फंडा वापरत चोरट्यांनी बुधवारी गिरीश नवनीतलाल गुजराथी (वय ६०) यांना ३८ हजार ९७० रुपयांना गंडा घातला. जनरल वैद्यनगर येथील शुंभारंभ बि‌ल्डिंगमध्ये राहणाऱ्या गुजराथी यांना मंगळवारी एका भामट्याने फोन केला. एसीबीआय बँकेतून बोलत असून, तुम्ही खाते बंद करण्यासाठी अर्ज दिला होता. परंतु, यात खाते क्रमांक, एटीएम क्रमांक तसेच कार्डवरील सीव्हीव्ही क्रमांक दिला नसल्याचे सांगत भामट्याने सर्व मा​हिती संकलित केली. यानंतर, थोड्याच वेळात गुजराथी यांच्या खात्यातील ३८ हजार ९७० रुपये काढून घेण्यात आले. यानंतर, असाच प्रकार आर्टीलरी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या विजय महेंद्रपाल सिंह यांच्या समवेत घडली. मूळचे फिरोदाबाद येथील रहिवाशी असलेले सिंह लष्करी सेवेत असून, ६ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांच्या मोबाइलवर ९९५९१४२६५१ आणि ७२३२९४५०९३ या क्रमांकावरून फोन कॉल्स आले. एसबीआयच्या मुंबई ब्रँचमधून ओमप्रकाश वर्मा बोलत असून, आपले एटीएम ब्लॉक झाले असून, ते सुरू करण्यासाठी त्याने सिंह यांच्याकडील एटीएम कार्डबाबत सर्व माहिती संकलित केली. तसेच, या माहितीच्या आधारे १ लाख रुपये काढून घेतले. या ऑनलाइन फसवणुकीपाठोपाठ एटीएम स्क्रीन खराब असल्याचे सांगत विवेकानंदनगर येथील उमादर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सलीम सुलेमान शेख (वय ४७) यांना एका भामट्याने लुटले. गत मंगळवारी शेख भद्रकाली येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या चोरट्याने या एटीएमचे स्क्रीन खराब असल्याचे सांगत तुम्हाला दुसऱ्या एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगत त्यांच्याकडून एटीएम पीन मिळवला. यानंतर, त्या भामट्याने आपल्याकडील एटीएम कार्ड त्यांच्या हातात सोपवत त्यांना दुसऱ्या एटीएमवर जाण्यास सांगितले. यावेळेत चोरट्याने शेख यांच्या खात्यातील ३९ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांच्या कातडीसह २६ लाखांचा ऐवज जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनने विनापरवाना जनावरांची कातडी व ट्रक असा २६ लाखांचा ऐवज जप्त करून सात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूतून ही कातडी नाशिकला आणली होती.

सेंट झेव्हियर्स शाळेजवळ दुर्गंधी येत असलेल्या ट्रकच्या (टीएन ५२ एफ १५०७) चालकाला थांबवले. त्याच्याकडे वाहनाचा परवाना आणि वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. बैल आणि म्हशीचे कातडे यांचे २४ हजार किलो व ट्रकचे ११ हजार किलो वजन भरले. ट्रकचालक जयराम वीरप्पन (४५, परमती, तमीळनाडू), मांस विक्री एजंट सैय्यद मोहम्मद इदायत तुल्ला उर्फ अबू तायर, मांस व्यापारी जुबेर बिसमिल्ला खान (बागवनपुरा, नाशिक), अब्दुल बारी अब्दुल कयूम (वडाळानाका), रफिक कुरेशी (नागजी हॉस्पिटलजवळ), सईद अजीज खान (सारडा सर्कल) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावर दरोडा; पावणे २ लाखाची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील नाळेगाव शिवारातील राधाकृष्ण पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकत सुमारे एक लाख ८५ हजाराची रोकड लुटून नेली.

राधाकृष्ण पेट्रोल पंपचे कर्मचारी हे पहाटे चार वाजेच्या सुमारास कार्यालयामध्ये बसलेले असताना डिझेल भरण्यासाठी एक बोलेरो गाडी आली. त्या गाडीतील चारही अनोळखी व्यक्तींनी पंपावर कामास असलेल्या विजय नामदेव हाडस यांना मारहाण करीत चोरट्यांनी कॅबिनमध्ये प्रवेश केला. रोकड ताब्यात घेताच पेट्रोल पंपावरील कर्मचारी संतोषकुमार केशवनाथ पांडे, इंद्रजीत नामदेव भोये, राम सिरोमड तिवारी व छबिलदास गोपाळा भोये यांना मारहाण करीत पोबारा केला. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे, असून पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चणकापूरच्या वाढीव आवर्तनास विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

चणकापूरच्या पाणी आरक्षणात वाढ करण्याची मागणी मालेगावचे महापौर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत करणार आहेत. मात्र, असे केल्यास शेतसिंचनासाठी आवर्तन मिळणे कठीण होऊन शेतकरी देशोधडीला लागतील. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी हंगामात आवर्तनावरच भिस्त आहे. यामुळे चणकापूरच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ केल्यास त्यास विरोध करण्याबरोबरच आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी दिला आहे.

यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतसिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मालेगावच्या पाणीप्रश्नी येत्या १९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात चणकापूरसह जिल्ह्यातील धरणातील पाणी आरक्षणाबाबत बैठक होत आहे. यावेळी मालेगाव शहरासाठी चणकापूर धरणातील आवर्तने वाढविण्याचा प्रस्ताव मालेगावचे महापौर हाजी मो. इब्राहीम हे मांडणार आहेत. या प्रस्तावाला चणकापूर धरण क्षेत्रातील तमाम शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या पाणीटंचाईचे संकट पाहता मालेगावला वाढीव आवर्तन देऊ नये, अशा मागणी डॉ. जयंत पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. मालेगाव शहराला गिरणा धरणातून पाणी घ्यावे किंवा महापालिकेने शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी हळद बरडा या स्वतंत्र धरण निर्मितीचा विचार करणे गरजेचे आहे. चणकापूर धरणावर शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकरी व जनावरे जगविण्यासाठी या जलस्त्रोताचा उपयोग होतो, असे डॉ. पवार यांनी नमूद केले आहे.

अन्यथा शेतकरी 'रस्त्यावर'!

गेल्या वर्षी चार आवर्तनात १३५० दलघफू पाणी घेऊन मालेगावने शेतकरी व शेतीला उजाड केले. आता कमी जलसाठ्यातूनही जादा आवर्तन उचलणे म्हणजे शेतकऱ्यांचे मरणच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव आवर्तनाचा प्रस्ताव मान्य करू नये. अन्यथा, शेतकऱ्यांचा संयम सुटून ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा डॉ. पवार यांच्यासह गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी एकास १४ दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील चौगाव परिसरातील कऱ्हे शिवारातील विवाहितेवर बलात्कर करून फरारी झालेल्या रामदास मांडवडे (वय ४०) यास सटाणा पोलिसांनी अटक करून सटाणा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

चौागाव येथील कऱ्हे शिवारात विवाहीत महिलेच्या घरात रामदास रतन मांडवडे (रा.चौगाव) याने १४ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रवेश केला. विवाहितेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरड केली असता तिचा गळा दाबून ठार करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची वाच्यता केल्यास ठार करण्याची धमकीही दिली.

या प्रकारानंतर आरोपी रामदास मांडवडे पळून गेला. महिलेने सटाणा पोलिसात तक्रार दिल्यानंतर येथील पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयासमोर उभे केला असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफियांचा हल्ला

$
0
0

सिन्नर तालुक्यात तलाठी, सर्कलला मारहाण; दुचाकीची तोडफोड

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

देवपूर येथील तलाठी व सर्कल वाहनांची तपासणी करीत असताना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पांढऱ्या कारमधून येणाऱ्या वाळू तस्करांनी आपण येथे काय करता, अशी विचारणा करीत दोन्ही तलाठी व सर्कल यांना गजाने बेदम मारहाण करीत त्यांच्या मोटरसायकलींची तोडफोड केली. येथे पुन्हा थांबाल तर जीवे मारू, अशी धमकी देत कारचालक फरार झाले. यामधील एक तलाठी गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर व पांचाळे यामधील वडांगळी फाट्यावर ही घटना घडली. देवपूरचे तलाठी संतोष सोनवणे, सर्कल शरद देशमुख, तसेच तलाठी पी. के. गोळेसर हे रात्री दहा वाजेच्या सुमारास वडांगळी फाट्याजवळ वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एका पांढऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी आपण येथे काय करता, अशी विचारणा करीत दोन्ही तलाठी व सर्कल यांना गजाने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या मोटरसायकलींची तोडफोड केली. येथे पुन्हा थांबाल तर जीवे मारू, अशी धमकी देत कारचालक फरार झाले. या कारवर नंबरही नसल्याने अंधाराचा फायदा घेत त्यांनी पोबारा केला. रात्री या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. नंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुसळगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तलाठी संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले असून, अशी कारवाई करताना पोलिस बंदोबस्त व शासकीय वाहन द्यावे, अशी मागणी केली आहे.

- संजय गाडे, अध्यक्ष, तलाठी संघटना

सिन्नर महसूल विभागाने एप्रिल महिन्यापासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत सुमारे ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाळू माफियांनी याचा राग धरत आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून पोलिस बंदोबस्त घेऊन अधिक कडक कारवाई केली जाईल. तसेच आरटीओ यांनाही बिगर नंबरच्या वाहनांवर कारवाईबाबत निवेदन दिले जाणार आहे.

- मनोजकुमार खैरनार, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यावसायिकाच्या मुलाचे वीस लाखांसाठी अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय युवकाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी ११ वाजेपासून तो युवक गोळे कॉलनी येथून बेपत्ता आहे. मालेगाव शहरातील जुना आग्रारोडवरील मोती बाग परिसरातील कलेक्टर पट्टा येथे राहणाऱ्या व्यावसायिकाचा मुलगा शिक्षणासाठी नाशिक शहरात राहतो. काही दिवसांपासून त्याच्या आणि त्याच्या वडिलांच्या मोबाइल क्रमाकांवर अज्ञात व्यक्तीने कॉल करून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. याबरोबर, पैसे मिळाले नाही तर मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून घरच्यांशी संपर्क तुटला. यानंतर त्याच्या वडिलांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. रात्री गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, संबंधित युवकाचे नेमके अपहरण कोणी केले, का केले? याबाबत संदिग्धता असून, याविषयी आता काहीही सांगणे शक्य होणार नाही. प्रत्यक्षात मुलगा किंवा संशयित पोलिसांना मिळाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान वेतनाबाबत ठेकेदाराचे हात वर

$
0
0

कामगार उपायुक्तांना विचारणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याच्या महापालिकेची सूचना घंटागाडी ठेकेदारांनी फेटाळून लावली. शासनाचा आदेश आम्हाला लागू नसल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने या संदर्भात कामगार उपायुक्तांना विचारणा केली असून, त्यावर तत्काळ अभिप्राय मागवला आहे. त्यामुळे घंटागाडी ठेकेदारांचे वाढीव वेतन हे आता कामगार उपायुक्तांच्या हातात आहे.

शासनाच्या किमान वेतन धोरणानुसार घंटागाडी कामगारांना वेतन मिळावे, अशी मागणी कामगारांची आहे. त्यासंदर्भात आरोग्य विभागाने ठेकेदारांना पत्रकही दिले आहे. त्यावर वादविवाद सुरू आहेत. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची कामगारांनी भेट घेतली. त्यावेळी ठेकेदारांनी हा नियम शासकीय सेवांना लागू असून, खासगी सेवांना लागू नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जीवन सोनवणे यांनी कामगार उपायुक्तांकडे या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात अभिप्राय मागवला आहे. कामगार उपायुक्तांनी ठेकेदारांना हा कायदा लागू असल्याचे स्पष्टीकरण दिल्यास ठेकेदारांना वेतन द्यावे लागणार आहे. महापालिकेने तातडीने याबाबत खुलासा करावा, अशा सूचना कामगार उपायुक्तांना केल्या आहेत. त्यामुळे शनिवारीच याबाबत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घंटागाडी कामगारांच्या नजरा आता कामगार उपायुक्तांच्या अहवालाकडे लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीचा विनयभंग

$
0
0

नाशिक : राजीवनगर येथील एका डेन्टल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय युवतीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमोयोला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. युवतीच्या छेडछाडीची घटना गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती. संशयित राहुल नरेश पाल (२०) याने मुलीला चिट्टी देत तिच्या मोबाइल नंबरची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिचा हात पकडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताकेंद्रालाच ‘पाणी’चटके

$
0
0

एकवेळ पाणीपुरवठ्याने पंचवटीवासीय भडकले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एकवेळ पाणीपुरवठा झाल्यापासून कमी दाबामुळे अनेक भागात पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच आता महापालिकेचे सत्ताकेंद्र असलेल्या पंचवटीतल्या बड्या नेत्यांच्या प्रभागात कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या झळा बसत आहेत. महापौर, उपमहापौरासह, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात पाणीकपातीमुळे भडका उडाला आहे. काही भागात तर पाणीच पोहचत नसल्याने नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे.

शहरात एकवेळ पाणीपुरवठा झाल्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. २० टक्के पाणीकपातीने अनेक भागात कमी दाबामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. सिडको, सातपूर पाठोपाठ आता पंचवटी व द्वारका परिसरातही अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कमी दाबामुळे काही सोसायट्यांमध्ये तर पाणीच येत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी हे पंचवटीतूनच येतात. महापौर, उपमहापौर, मनसेचे शहरप्रमुख, यांच्यासह काँग्रेसचेही दिग्गज पदाधिकारी या भागातून येतात. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचे थेट चटके या बड्या नेत्यांनाच बसत आहे. पाणी पुरवठाच होत नसल्याने नागरिक या पदाधिकाऱ्यांनाच जाब विचारत आहेत. त्यामुळे हे पदाधिकारीही वैतागले आहेत. त्यामुळे शुक्रवारी या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनाच जाब विचारला. पाणीपुरवठा सुरळीत होईल याची काळजी करत पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्याचे फर्मान सोडले आहे.

अन्य भागातील नागरिकांचे काय?

थेट पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात पाण्याचा त्रास असल्याने यंत्रणाही तातडीने हालली आहे. जास्तीचे पाणी सोडण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. सत्ताकेंद्र असल्याने कदाचित पंचवटीकरांचा त्रासही सुटेल पण नाशिकमधील इतर भागात राहणाऱ्या नागरिकांचे काय, असा सवालही विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाणे वाजविण्यावरून पंचवटीमध्ये राडा

$
0
0

नाशिक : दांडिया खेळताना गाणे वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. ही घटना गुरूवारी रात्री पंचवटीतील निलगिरी बाग वसाहतीत घडली. दोन्ही बाजूने काठ्या दगडांचा वापर झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले. शुक्रवारी देखील तिथे तणावपूर्ण शांतता होती.

याबाबत आडगाव पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली. संजय उर्फ भिष्मा उत्तम सदावर्ते (२८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक रघुनाथ वळवी व त्याच्या १० ते १५ साथिदारांनी मरिमाता मंदिराजवळ आयोजित दांडियामध्ये वाद घातला. या वादाची कुरापत काढून संशयितांनी वळवीवर हल्ला चढवला. तसेच बिल्डींग क्रमांक पाचवर दगडफेक केली. तर, दिपक वळवी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित संजय सदावर्ते आणि दत्तुचंद सोनवणे व त्याच्या साथिदारांनी मारहाण करीत इमारतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना अटक केली असून येथे शुक्रवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. या परिसरात दक्षता म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेबाबत आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या २६६ कोटीच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेचा शनिवारच्या (दि. १७) महासभेत फैसला होणार आहे. सत्ताधारी मनसेने हा प्रस्ताव पारीत करण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. तर या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदार बाळासाहेब सानप व देवयानी फरांदे यांच्या सभागृहातील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आमदार सीमा हिरे प्रस्तावाला समर्थन करणार आहेत तर शिवसेना या प्रकल्पाची फेरनिविदा काढण्याची मागणी करणार आहे.

सहा वर्षांपासून रखडलेल्या मुकणे पाणीपुरवठा योजनेचा विषय महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महासभेत ठेवण्यात आला आहे. या योजनेसाठी जेएनयूआरएम अंतर्गत केंद्र सरकारने २३० कोटी रुपये मंजूर केले आहे. महापालिकेला ३६ कोटी रुपये उभे करायचे आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या १८ किलोमीटरच्या पाणीपुरवठा योजनेला सानप व फरांदे यांच्या विरोधामुळे स्थगिती मिळाली होती. निविदा प्रक्रियेत एल अॅण्ड टी कंपनीला मिळाले असून त्यात त्रुटी असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कंपनीला कार्यारंभ आदेश देता आला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यावरील स्थगिती उठविण्यात आली होती. यासाठी राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले होते. त्यामुळे मनसेसाठी हा प्रकल्प महत्वाकांक्षी असून त्यांनी तो प्रतिष्ठेचा केला आहे. शिवसेना या प्रकल्पात पारदर्शीपणा आणण्याचा आग्रह केला असून त्याची फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे. नगरसेवकांची शुक्रवारी बैठक घेवून पक्षाने सभागृहात प्रकल्पाला विरोध न करता फेरनिविदा काढा, अशी मागणी केली आहे. तर महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष या योजनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसने अद्याप आपली भूमिकाच स्पष्ट केलेली आहे. तर मनसे कोणत्याही स्थितीत हा विषय मंजूर करून घेणार आहे.

परस्पर विरोधामुळे भाजपची अडचण

मुकणे योजनेच्या प्रक्रियेवर भाजपचे आमदार बाळासाहेब सानप व देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेत त्याला स्थगिती मिळवली होती. तर आमदार सीमा हिरे यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी पत्र दिले होते. राज ठाकरे यांनी मध्यस्ती केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या बाजूने निर्णय दिला. भाजपचे हे तीन आमदार नगरसेवकही आहेत. त्यामुळे आजच्या महासभेत हे आमदार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. हिरेंनी या प्रकल्पाच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर फरांदे व सानप यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे गटनेत्यांसह नगरसेवकांची गोची झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफियांचा तलाठी, सर्कलवर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

देवपूर येथील तलाठी व सर्कल वाहनांची तपासणी करीत असताना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पांढऱ्या कारमधून येणाऱ्या वाळू तस्करांनी आपण येथे काय करता, अशी विचारणा करीत दोन्ही तलाठी व सर्कल यांना गजाने बेदम मारहाण करीत त्यांच्या मोटरसायकलींची तोडफोड केली. येथे पुन्हा थांबाल तर जीवे मारू, अशी धमकी देत कारचालक फरार झाले. यामधील एक तलाठी गंभीर जखमी असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर व पांचाळे यामधील वडांगळी फाट्यावर ही घटना घडली. देवपूरचे तलाठी संतोष सोनवणे, सर्कल देशमुख, तसेच तलाठी पी. के. गोळेसर हे रात्री दहा वाजेच्या सुमारास वडांगळी फाट्याजवळ वाहनांची तपासणी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणीसाठी विद्यार्थ्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या मोहितेश बाविस्कर (१७) या विद्यार्थ्याचा अपहरणकर्त्यांनी निर्घृण खून केल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

मालेगावमधील मोतीबाग परिसरातील कलेक्टर पट्टा येथे राहणारे प्रलिन बाविस्कर यांचा मुलगा मोहितेश आयआयटी क्लासेससाठी शहरात आला होता. मित्रांसमवेत त्याने गोळे कॉलनीत एक रूम भाड्याने घेतली होती. बुधवारी सकाळी तो काही कामानिमित्त भद्रकाली परिसरात पोहचला. तेथूनच त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर, अपहरणकर्त्यांनी प्रलिन यांच्या मोबाईलवर संपर्क साधत २० लाख रूपये खंडणी देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी तत्काळ शहरातील त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यादरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर दूर असलेल्या गणपतबारी परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळून आला.

खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या मोहितेश प्रलिन बाविस्कर (१७) या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी पोलिस अद्यापपर्यंत आरोपींचा माग काढण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. साधारणतः १५ ते १८ वयोगटातील मुलाचा निर्घृण पध्दतीने खून केल्याचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समोर आले होते. मात्र, यानंतर ग्रामीण पोलिस दल आणि शहर पोलिस दलात कोणताही समन्वय झालाच नाही. तब्बल २४ तास शहर पोलिस वेगळ्याच दिशेने तपास करीत राहिले. या असमन्वयचा फायदा घेत आरोपी फरार झाले असून पोलिस त्याच्यापर्यंत केव्हा पोहचणार असा प्रश्न आहे.

व्यावसायिक कारणांचाही संशय

मोहितेशच्या अपहरण आणि खून प्रकरणामागे खंडणीचे कारण सांगितले जात असले तरी यामागे व्यावसायिक कारण असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मोहितेशचे वडील मालेगाव शहरात ठेकेदार असून याच व्यावसायिक स्पर्धेतून मोहितेशचा बळी गेला असावा, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

मोहितेशचे अपहरणानंतर पोलिस यंत्रणा आरोपींच्या मागावर आहे. काही संशयित आमच्या रडारवर असून त्यांना अटक केल्यानंतर अपहरणाच्या कारणांचा सुगावा लागेल.
- एन. अंबिका, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपींसह तिघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्याप्रकरणी जळगावचे पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह सागर चौधरी या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला. सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून येथील पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे चौकशीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी दिले आहेत.

सादरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंचवटी परिसरातील ओमनगर भागातील राहत्या घरात गळफास आत्महत्या केली होती. महिनाभरापासून पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आल्याने ते डिप्रेशनमध्ये होते. मृत्युपूर्वी सादरे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. जळगाव पोलिस दलातील भ्रष्टाचाराचा त्यांनी उल्लेख केला होता. एसपी सुपेकर व पीआय रायते सतत पैशांची मागणी करून प्रभारी अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देतात, असेही त्यांनी म्हटले होते.

सादरे कुटुंबीयांचा ठिय्या

सादरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी त्यांचे कुंटुंबीय आग्रही होते. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शनिवारी रात्री यावर काहीच तोडगा निघाला नाही. म्हणून सादरे यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने सकाळी सात वाजेपासून पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. सकाळी सुरू झालेल्या चर्चेनुसार दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले. माधुरी सादरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर सादरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजींकडून चौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणाची गंभीर दखल राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी घेतली असून, आत्महत्या प्रकरणाची व सादरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सादरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीच्या आधारे चौकशी केली जाईल, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी दिली.

एफआयआरसाठी चालढकल

मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी वेळकाढू धोरण राबवले. पोलिसांवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा थेट आरोप माधुरी सादरे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईक आपली मागणी रेटत असताना पोलिस मात्र सबुरीचे धोरण ठेवून काम करीत असल्याचे दिसून आले. असे का झाले याकडे अथवा असे करण्यामागे वरिष्ठांचे काही आदेेश होते याबाबतही चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.

कोणाचाच विश्वास बसेना

ओमनगर येथे राहणाऱ्या सादरे यांना ओमकार आणि पुनम ही दोन अपत्ये. गेली अनेक वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या सादरे यांचा कॉलनीतच नव्हे तर परिसरात धाक होता. अत्यंत हुशार आणि मनमिळावु अशी प्रतिमा असलेले सादरे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचले कसे, असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने व्यक्त केल्या.

गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर मानसिक दबाव होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महसूल मंत्र्यांचा यात हस्तक्षेत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दोषींवर कारवाई व्हावी, ही अपेक्षा. - माधुरी सादरे, अशोक सादरे यांची पत्नी

पोलिस अधिकारी आणि वाळू माफीयांनी सादरे यांचा बळी घेतला. ते काही दिवस अहमदनगर येथे आले होते. मात्र, ते प्रचंड दबावाखाली होते. सर्वांशी त्यांचे बोलणे कमी झाले होते. सर्व व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास उडाल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. त्यामुळे दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
- प्रमोद काळभोर, नातेवाईक

कॉलनीतच नव्हे तर परिसरात त्यांची ख्याती होती. मनमिळावू आणि मार्गदर्शक म्हणून ते काम करीत. अनेकदा परिसरातील तरूणांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते असे काही करतील, याची शक्यता नव्हती. - अनंत वालझडे, स्थानिक नागरिक

त्यांनी आत्महत्या केली, त्यावेळी घरात कोणीच नव्हते. मुलगा ओमकार व त्यांची पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर आम्ही तिथे पोहचलो. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सर्व संपले होते. - विलास शेळके, स्थानिक नागरिक

सादरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचा स्वभाव चांगला होता. त्याची प्रचिती सर्वांनी घेतली असून त्यामुळेच परिसरातील नागरिक रात्रीपासून सिव्हील हॉस्पिटल आणि आता पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींना शासन करावे. - निखील गालफडे, स्थानिक नागरिक

सादरे कुटुंबीयांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप तथ्थहीन असून, वाळूमाफिया सागर चौधरी भाजपचा कार्यकर्ता नाही, त्याचबरोबर सादरे कुटुंबीयांनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. मी गेल्या दोन वर्षांत सादरे यांना किंवा त्यांच्या परिवाराला कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझे कधीही बोलणे झालेले नाही. खंडणी प्रकरणात सादरे यांच्याविरुद्ध सागर चौधरी याने दाखल केलेला गुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आलेला आहे. त्यामुळे मी दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न उरत नाही. सादरे यांची कारकीर्द नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. - एकनाथ खडसे, महसूलमंत्री

अशोक सादरे यांना रामानंदनगर पोलिस ठाण्यात मीच माझ्या कार्यकाळात पोस्टिं ग दिले होते. मी फक्त त्यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र पोलिस महानिरीक्षकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सादरे किंवा त्यांच्या कुटुंबीियांकडून जे आरोप माझ्याविरुद्ध केले गेले आहेत, ते चुकीचे आहेत. - जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक, जळगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेला महासभेचा हिरवा कंदील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या २६६ कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेला महासभेत सहा तासांच्या वादळी चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. शिवसेना व भाजपने उपस्थित केलेल्या तात्रिंक मुद्दे व निधीला प्रशासनाने चोख उत्तर दिल्याने युतीचा विरोध निष्प्रभ ठरला. विशेष म्हणजे भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी उघड पाठिंबा दिला तर, आमदार देवयानी फरांदे यांनी तांत्रिक मुद्द्यांवर आपली आडकाठी असल्याचे सांगितले. या योजनेसाठी आपल्या निधीला कात्री लागू नये, अशी भितीही नगरसेवकांनी व्यक्त केली. अखेरीस महापौरांनी शहराच्या हिताच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असल्याने तो मंजूर केला.

गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुकणे पाणीयोजनेच्या फैसल्यासाठी शनिवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षांनी या योजनेला समर्थन केल्याने हा प्रस्ताव मंजूर होणार होता. २६६ कोटींच्या १८ किलोमीटरच्या पाइपलाइनचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला होता. राज्य सरकारने मध्यंतरी या योजनेच्या निविदा प्रक्रियेवर स्थगिती दिली होती. निविदा प्रक्रिया सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्याचे फर्मान सोडले होते. या योजनेला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. भाजपच्या तीन आमदारांनी योजनेबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळे सभागृहात या विषयावर वादळी चर्चा झाली. शिवसेनेच्या सुधारकर बडगुजर व अजय बोरस्ते, आमदार देवयांनी फरांदे यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित महापौरासह आयुक्तांना जाब विचारला. अतिरिक्त ३६ कोटींच्या निधीसह तांत्रिक मुद्दे आयुक्तांनी खोडून काढत सीव्हीसीच्या गाईडलाइनप्रमाणे निविदा प्रक्रिया पार पडल्याची भूमिका मांडली. जवळपास सहा तास या विषयावर वादळी चर्चा झाली. सीमा हिरे यांनी योजनेच्या बाजूने उघड भूमिका घेतली. आमदार देवयानी फरांदे यांनी योजनेतील आक्षेप उघड करीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. योजनेला विरोध नाही मात्र वेगवेगळ्या निधीमुळे संशयकल्लोळ माजल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस महापौरांनी योजनेला मंजुरी दिल्याचे जाहीर केले.

नगरसेवकांचा पाणीप्रश्न

मुकणे पाणीपुरवठ्याचा विषय असला तरी, नगरसेवकांच्या भावना मात्र पाणीकपातीवरच होत्या. प्रत्येक नगरसेवक पाणीकपात आणि निर्माण झालेले प्रश्न यावरच पोटतिडकीने बोलत होते. त्यात सत्ताधारी व विरोधकांचा समावेश आहे. नगरसेवक बापू सोनवणे यांनी तर पाण्यावर बोलू दिले नाही म्हणून सभागृहाचा संतापात त्याग केला. उषा शेळके यांनी जलकुंभापर्यंत नवनिर्माण पोहचू द्या असे सुनावले. मनसेच्या नगरसेविका अर्चना थोरात यांनी तर पाणी या विषय हा किती दिवस करायचा असा सवाल केला. गळती असूनही लक्ष दिले जात नाही. जलकुंभ मंजूर असूनही काम केले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांना हा एकच विषय लावून धरावा लागत असल्याचे दुर्दैव असल्याचे सांगून आपण आजारी असूनही पाण्याच्या विषयावर े खडे बोल त्यांनी महापौरांना सुनावले व संतापात सभागृह सोडले.

राजकीय स्थगिती

मुकणे योजनेला शासनाने दिलेली स्थगिती ही राजकीय स्थगिती असल्याचा आरोप उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी केला. कोणतेही कारण नसल्याने स्थगिती अखेरीस सरकारलाच उठवावी लागला. विशेष म्हणजे सरकारने उठवतांना तक्रारदारांनाही बोलवले नाही, असा दावा केला. त्यावरून सुधाकर बडगुजर यांनी त्यावर आक्षेप घेतला. राजकीय स्थगिती या विषयावरून या दोघांमध्ये सभागृहातच जुगलबंदी रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आरक्षणाबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगरपंचायतीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी अजूनही नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. परिणामी जातपडताळणीलाही विलंब होण्याची शक्यता असून, जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी नगराध्यक्ष पदापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना असा उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

राज्यात अनेक ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये झाले असून, तेथे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक जिल्ह्याचा ‌विचार करता येथेही कळवण, चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, देवळा या नगरपंचायतींमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, सोमवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.

समाज कल्याण विभागाकडून केवळ विजयी उमेदवारांचीच जात पडताळणी केली जात असल्याने नियमानुसार हे काम निवडणूक निकालानंतरच सुरू होणार आहे. खरेतर नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जात पडताळणी अर्ज असल्याशिवाय उमेदवारी अर्ज वैध होत नाही. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही मागास प्रवर्ग, अनुसूचित जातीमधील उमेदवार सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवितात.

किमान नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करून संबंधितांच्या उमेदवारी जात पडताळणीसाठी योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी मागणी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर अनेक उमेदवारांना केवळ जात पडताळणी नाही म्हणून पदापासून वंचित राहू शकतात. कायदेशीर अडचणी वाढून उमेदवारांना न्यायालयीन लढाई लढावी लागण्याची शक्यता आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून राज्य निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी जि. प. सदस्य राजाराम शेलार यांनी केली आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी अद्याप आरक्षण जाहीर नाही. मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज भरताना जात पडताळणीसाठी अर्ज सादर केल्याची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडली तरी अर्ज ग्राह्य धरला जातो. निकालानंतर विजयी उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची कालावधी मिळेल. हा कालावधी पुरेसा आहे. - नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी

विजयी उमेदवारांनाच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची धोरण अवलंबले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते अवलंबिण्यात आले. आता नगरपंचायत निवडणुकीतही तेच धोरण असून, डिसेंबर २०१७ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी हेच धोरण असणार आहे. - शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाजकल्याण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images