Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ऑनलाइन ‘७/१२’ साठी करावी लागणार प्रतीक्षा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इ-गव्हर्नन्स अंतर्गत संगणकीकृत ऑनलाइन ७/१२ देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असली तरी अपेक्षित अद्ययावतीकरणा अभावी संगणकीकृत ७/१२ आणि हस्तलिखीत ७/१२ यांची जुळवणी केल्यानंतरच ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करा, असे आदेश जमा बंदी आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे ऑनलाइन ७/१२ उतारे मिळविण्यासाठी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

७/१२ च्या नोंदी घेण्यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे प्रकार घडतात. अशा गैरप्रकारांना आळा बसावा आणि या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारच्या वतीने थेट ऑनलाइन सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करून जानेवारी २०१६ पासून सर्व तालुक्यांमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार होती. मात्र, सोलापूर तालुक्यात संगणकीकृत आणि हस्त लिखित ७/१२ नोंदींमध्ये तफावत आढळली. या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आली. हायकोर्टाने त्याची दखल घेऊन या नोंदी योग्य पध्दतीने घ्याव्यात तसेच त्यांची पडताळणी झाल्याशिवाय त्या ऑनलाइन प्रसिध्द करू नयेत असे आदेश सरकारला दिले आहेत. त्यानुसार जमा बंदी आयुक्तांनी जेथे संगणकीकृत ७/१२ उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे तसेच जेथे ही प्रक्रिया सुरू आहे, अशा सर्वच ठिकाणी ७/१२ पडताळणीची आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार दोन्ही ७/१२ तंतोतंत जुळल्याची खात्री करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गावोगावी चावडीवर ७/१२ उताऱ्यांचे वाचन केले जाणार आहे. तेथे येणाऱ्या सूचना व तक्रारींची दखल घेण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, देवळा, दिंडोरीत ऑनलाइन उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शासकीय योजनांसाठी युवकांनी योगदान द्यावे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात युवकांचे योगदन महत्त्वाचे असून, युवकांनी सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी पुढे यावे. सामाजिक जाणिवेने कार्य करताना शासनाच्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

मालेगाव येथे नेहरू येवा केंद्र, नाशिक आणि जनकल्याणकारी सेवाभावी संस्था, मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलन व युवा कृती कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई, मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशनचे निरीक्षक राम भालसिंग, नगरसेवक राजेश गांगवणे, दिलीप पवार, मनोज पवार, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे रामसिंग, नितीन पोपळे आदी उपस्थित होते.

ना. भुसे पुढे म्हणाले की, आपला देश हा युवकांचा देश आहे. युवकांनी निश्चय केल्यास ते देशासाठी महाने कार्य करू शकतात. समाज प्रबोधनातही युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. गवई यांनी युवा मंडळातर्फे गावपातळीवर शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार असल्याची आणि आपत्तीच्या वेळी युवकांची मदत घेण्यासाठी युवा मंडळांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांनाही लष्करी शिक्षण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या सुरक्षेसाठी मिलिटरी शिक्षणाची गरज असून आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिलिटरीचे शिक्षण आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही हे शिक्षण घेण्याची पात्रता असते. मात्र योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्यांना या शिक्षणापासून मुकावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी लष्करी शिक्षणसंस्थांमध्ये जागा राखीव ठेवण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले.

सेंट्रल हिंदू भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. भोसला शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी कार्यक्रम झाला. डॉ. बा. शि. मुंजे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सावरा म्हणाले, की आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही उत्तम बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता असते. त्याचा विकास करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले तर तेही राष्ट्रभक्तीच्या भावनेतून कार्य करतील. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रामध्येही आपल्या गुणांच्या आधारावर आदिवासी खेळाडूंनी देशाला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. तसेच मिलिटरी शिक्षणात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्थेचे सेक्रेटरी दिलीप बेलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भोसला मिलिटरी स्कूलमधील अभ्यासक्रमासह मुलींनाही मिलिटरी शिक्षणासाठी स्वतंत्र कॅम्पस सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर मिलिटरीचे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींनी प्रात्याक्षिके सादर केली. मल्लखांब, संचलन, फायरिंग, बॉक्सिंग, योगा, लेझिम, जिम्नॅस्टिक यांची प्रात्याक्षिके त्यांनी यावेळी करून दाखविली. मन आणि शरीर यांचा उत्तम समन्वय साधून अवाक् करणारी प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये मुलींचा सहभागही उल्लेखनीय होता. संस्थेचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी, कमांडंट चंद्रसेन कुलथे आदी उपस्थित होते. अॅल्ड्रिक फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६१ रुपये ऊसपेमेंट कादवाकडून अदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची प्रती टन ६१ रुपयांप्रमाणे ऊस पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.

गेल्या वर्षाचे उसाची एफआरपी २११७ आहे. यापूर्वी १९९५ रुपये अदा केले होते. आता ६१ रुपये असे एकूण २०५६ रक्कम अदा झाली आहे. अद्याप ६१ रुपये प्रती टन एफआरपी देणे बाकी आहे. या वर्षाचा सन २०१५-१६ चा गळीत हंगाम चालू आहे. ५४ दिवसात कारखान्याने ८४,९८६ मे.टन ऊस गाळप केले असून, साखर उतारा ११.०६ टक्के आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.

हंगामात कारखान्याकडे पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी मजूर असून, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीला प्राधान्य दिले आहे. कार्यक्षेत्रातून दररोज १४५० मे. टन ऊस गाळपास येतो. गेटकेन ४०० मे.टनापर्यंत ऊसपुरवठा होतो. ऊसतोडणी कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन असून, सर्व सभासदांचे उसाची वेळेवर ऊस तोडणी होईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेहरेत मिळणार एटीएमव्दारे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रांगेत तासनतास उभे राहून पैसे काढण्याचा मनस्ताप कमी व्हावा म्हणून बँकांनी आज जवळपास सर्वच शहरांमध्ये एटीएमचे जाळे विस्तारीत केले आहे. पण, गावातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या प्रामाणिक हेतूने गावातच पाण्याचे एटीएम उभे करण्याचा अनोखा प्रयोग मालेगाव तालुक्यातील टेहरेच्या ग्रामपंचायतीने केला आहे. या अनोख्या पाण्याच्या एटीएमचे लोकार्पण सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

वाचताना कोणालाही वेगळे वाटेल पण, असे पाण्याचे एटीएम तालुक्यातील टेहरे ग्रामपंचायत प्रशासनाने शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू केले आहे. ग्रामस्थांना अवघ्या पाच रुपयात २० लिटर पिण्याचे शुध्द पाणी मिळणार आहे. टेहरे गावास १२ गाव योजनेंतर्गत १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, गत अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना शुध्द व निर्मळ

पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांनी नेमका याच प्रश्नाला हात घातला. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुध्द पाणीपुरवठ्याला महत्त्व दिले पाहिजे, या भावनेतून आर.ओ. वॉटर एटीएमची संकल्पना साकार झाली. त्यासाठी सरपंच विमल शेवाळे, राजेंद्र शेवाळे, प्रभाकर शेवाळे, संदीप शेवाळे, गोकुळ शेवाळे, संदीप शेवाळे, राजेंद्र गोरे, सुशांत अहिरे आदींसह सामाजिक कार्यकर्ते राजेश धर्मराज शेवाळे यांनी काही जलशुध्दीकरण केंद्र व आर.ओ. वॉटर प्रकल्पांची पाहणी केली. परंतु, नवीन प्रकल्प उभारणी अतिशय खर्चिक असल्याचे लक्षात आल्याने गावाजवळील संजय रामकिशोर यांचा बंद पडलेला आर. ओ. प्रकल्प कराराने घेण्याचे निश्चित केले. हा प्रकल्प कार्यान्वित करून ग्रामस्थांना ना नफा ना तोटा तत्वावर शुध्द पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यात जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण करीत तेथून गावापर्यंत शुध्द पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली. ग्रा. पं. जुन्या कार्यालयाजवळ पाच हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बसविण्यात येऊन त्यास पाऊण इंची नळ व एटीएम मशीन जोडण्यात आले. या एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर एका वेळी २० लिटर पाणी संबंधित ग्रामस्थास मिळणार आहे.

या योजनेद्वारे ग्रामस्थांची अल्पदरात शुध्द पाण्याची गरज भागणार असतानाच प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या अशुध्द पाण्याचाही पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठीही गावापर्यंत वेगळी जलवाहिनी टाकण्यात आली असून, हे अशुध्द पाणी गावातील सहा चौकात बसविलेल्या एक हजार लिटर क्षमतेच्या टाक्यामध्ये साठविले जाणार आहे. टाक्यांना नळ बसविण्यात आले असून, त्याद्वारे ग्रामस्थांना दैनंदिन वापरासाठी मोफत पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

टेहरे ग्रामस्थांचा हा पाणी एटीएम पॅटर्न भविष्यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विमल शेवाळे तर प्रमुख अतिथी म्हणून बंडू बच्छाव, पंचायत समिती सभापती भरत पवार, प्रांत अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले, शिवसेना गटप्रमुख मनोहर बच्छाव, जि. प. सदस्य संदीप पाटील, माजी रोटरी गव्हर्नर राजेंद्र भामरे, रोटरी प्रांतपाल मिलिंद पोफळे, मामको संचालक सतीष कलंत्री, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा शेवाळे, सोसायटी चेअरमन कारभारी शेवाळे, सोमा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर चिन्नीकृष्णा आदी उपस्थित होते.

असे आहे पाण्याचे एटीएम

शुध्द पाण्यासाठी प्रत्येक कुटुंबास १५० रुपयांचे प्रीपेड एटीएम कार्ड दिले आणार असून, १२ तासातून एकदा एटीएम पाणी वितरण प्रणालीतून २० लिटर पाणी काढता येणार आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी कार्डातील शिल्लक रकमेतून पाच रुपये कमी होणार आहेत. ग्रामस्थांना गरजेनुसार १५० रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला आगीत दीड लाखाचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नवीन वर्षाचे स्वागत आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करताना पेटलेला फटाका पडल्याने एका दुकानातील माल आणि टपरी पेटल्याची घटना मनमाड येथील आठवडे बाजार परिसरात घडली. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार सुनील शर्मा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ डिसेंबरचा जल्लोष करताना अज्ञात लोकांनी फटाके फोडले. मात्र, एक पेटलेला फटका दुकानात घुसल्याने दुकानातील माल जळून खाक झाला. त्यात १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनांसाठी टीव्हींची मदत

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी योजनांची मिळणार माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी योजनांच्या माहितीसाठी सामान्य नागरिकांना अनेकदा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सहजगत्या विविध विभागांच्या सरकारी योजनांची माहिती आता टीव्ही संचाद्वारे मिळू शकणार आहे. अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी थांबून राहणाऱ्या नागरिकांना या फावल्या वेळेत योजनांची माहिती घेता येणार असल्याने वेळेचाही सदुपयोग होणार आहे.

सरकारकडून जनहिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश नागरिकांना त्याची माहिती नसते. ते सरकारी कर्मचाऱ्यांकडून अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तेथेही हेळसांड वाट्याला येण्याची शक्यता अधिक असते. सरकारच्या विविध योजना, त्यासाठीचे निकष याबाबतची माहिती नागरिकांना या नवीन वर्षात सहजगत्या मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी त्यासाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये दोन टीव्ही संच बसविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या दालनाबाहेर हे टीव्ही बसविण्यात आले आहेत. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रलंबित प्रकरणांच्या सुनावण्या सुरू असतात. काहीवेळा अधिकारी बैठकीत व्यस्त असतात. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी लोक थांबून राहतात. अशावेळी लोकही कंटाळून जातात. याच वेळेचा सदुपयोग व्हावा आणि नागरिकांनाही सरकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी या टीव्हींची मदत घेण्यात येणार आहे.

यशदाच्या वतीनेही विविध सरकारी विभागांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जात असल्याने त्यांच्याकडेही योजनांचा बराचसा डाटा आहे. त्यामुळे या उपक्रमात मदत मिळावी म्हणून त्यांच्याशी देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

नवीन वर्षात जिल्हा प्रशासनाने हे चांगले पाऊल उचलल्याने लोक योजनांच्या बाबतीत साक्षर होण्यास मदत होणार आहे. सिंहस्थ काळात नियंत्रण कक्षांमध्ये टीव्ही बसविण्यात आले होते. याच टीव्हींची मदत घेण्यात आली आहे.

सर्वच सरकारी कार्यालयांची माहिती

केवळ महसूलच नव्हे तर कृषी, समाजकल्याण, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, सरकारी बँका, टपाल कार्यालय आणि तत्सम सर्वच सरकारी कार्यालयांशी निगडीत योजनांची माहिती फीड केली जाणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्येष्ठांचे कार्य आदर्शवत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

चैतन्य व स्फूर्तीची कमतरता नसणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात झोकून देणे हे आजच्या तरूण पिढीला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संयज चव्हाण यांनी केले.

बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशनतर्फे निवृत्त एकात्मता दिन व पेन्शनर्स डे निमित्त मेळाव्याप्रंसगी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण होत्या. यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख ज्ञानेदेव धोंडगे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम या सामाजिक संस्थेस पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली. असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष माधवराव भणगे, सनपा गटनेते काका रौंदळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, साहित्यानचे अध्यक्ष प्रा. शंकर कापडणीस, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नगरपालिकेने तालुका पेन्शनर्स असोशिएशनच्या सभागृहासाठी भूखंड उपलब्ध करून दिला. या भूखंडावर उभारल्या जाणाऱ्या सभागृह व बागेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले. तालुकाध्यक्ष एम. एन. बच्छाव म्हणाले की, या सभागृहात विद्यार्थी संस्कार केंद्र, अभ्यासिका, वाचनालय, प्रबोधन शिबिर, जेष्ठांसाठी सर्वरोगनिदान शिबिर, विरूंगळा केंद्र असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मेळाव्यास नगरसेवक भारत खैरनार, साहेबराव सोनवणे, दीपक रौंदळ, साहेबराव सांवत, बी. जी. पगार, ए. पी. पगार, प्रकाश बधान, शंकुतला येवला आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेट टॉप बॉक्स नसतानाही प्रक्षेपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेट बॉक्सचा अभाव, ते पुरविण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी केबल व्यावसायिकांनी केलेली मागणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी फेज तीनमधील प्रक्षेपण बंद केले तरी फेज चारमधील सेट टॉपबॉक्स धारकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे जिल्ह्यातील २६ नागरी वसाहतींमधील प्रक्षेपण शुक्रवारी बंद होऊ शकले नाही. सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी नागरिकांना मुदतवाढ मिळावी, असे विनंती पत्र जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

केबल कराची चोरी रोखण्यासाठी सरकारने डिजिटलायझेशनचा निर्णय घेतला. मेट्रोसिटीज, महानगरात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नगरपरिषदांच्या हद्दीत आता ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत संपली आहे. अशा नगरपालिका व तत्सम वसाहतींमध्ये सेट टॉप बॉक्स न बसविणाऱ्यांचे केबल प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश प्रसारण मंत्रालयाचे दिले आहेत. मात्र सेटटॉप बॉक्सच उपलब्ध नसणे, ते चांगल्या दर्जाचे नसणे यांसारख्या कारणांमुळे अजूनही अनेक ठिकाणी ते बसवेले नाहीत. यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केबल व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार मार्च २०१६ पर्यंत सेट टॉप बसविण्यास मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे तूर्तास प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्याभिरुची संपन्न करण्यासाठी...

$
0
0



प्रा. डॉ. विवेक खरे

मराठी नाटक आणि नाशिकचा घनिष्ट संबंध आहे. मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणारे दोन नाटककार आपल्या या नाशिक शहरामधीलच होते. तात्यासाहेब शिरवाडकर आणि प्रा. वसंत कानेटकर या दोन दिग्गज नाटककरांच्या नाशिकमध्ये नाटकाच्या क्षेत्रात आज नक्की काय चाललंय, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर 'बरेच काही नवीन चालू आहे' असे द्यावे लागेल. खरोखरच नाशिकच्या नाट्यक्षेत्रात आज बरेच काही नवीन घडते आहे.

१९९० नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. शहरांचा विकास झपाट्याने झाला. मोठ्या शहरांपाठोपाठ छोटी शहरेही विकसित होवू लागली. कला, साहित्य, संगीत, चित्रपट या सर्वच क्षेत्रात आता या शहरांमध्ये नवीन काहीतरी घडते आहे. मुंबई, पुणे इथेच कला, साहित्य यांची निर्मिती होते, इथेच रसिकता आहे असे म्हणणे आजतरी तितके खरे राहिले नाही. आज नाशिक या सर्वच कलानिर्मितीच्या केंद्रभागी येऊ पाहत आहे, किंबहुना आलेच आहे. सर्वच साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणारी जुनी पिढी जशी नाशकात होती तशीच नवी पिढीही तितक्याच जोमाने लिहित आहे. साहित्य, संगीत आणि इतरही विविध कलाप्रकारांमध्ये नवीन नवीन प्रयोग करीत आहे. या सर्व प्रयोगांमधून वेगवेगळ्या कलांशी संबंधित कलावंतांबरोबर रसिकही अभिरुची संपन्न होत चालले आहेत.

नाटकाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर आज नाट्यलेखनाबरोबरच, नाट्यदिग्दर्शन, संगीत, अभिनय, नेपथ्यरचना अशा सर्वच अंगाने नाशिकमधील नवीन पिढी तयार होत आहे. अशा या नवीन काही करू पाहणाऱ्या नाट्यकलावंतांसाठी आणि नाट्यरसिकांसाठी सातत्याने काहीतरी करावे अशा भूमिकेतून मागील वर्षभरात एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला गेला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नाट्यविभागाने 'रंगालय' च्या माध्यमातून वर्षभर नाटक आणि नाटकाशी संबंधित एक चांगला प्रयोग नाट्यरसिक आणि नाट्यनिर्मितीशी संबंधित कलाकारांसाठी केला. रसिकांना स्थानिक नाटककारांच्या, कलाकारांच्या नाटकांबरोबरच मुंबई, पुणे येथील काही आगळीवेगळी नाटकेही दाखविली. या नाटकांमध्ये अभिनय करणारे कलावंत तसेच लेखक, दिग्दर्शक यांच्याशी संवाद घडवून आणण्यात आला. नाटकाच्या क्षेत्रात नाव कमाविलेले अभिनेते, दिग्दर्शक, अभ्यासक यांच्याशी संवाद साधण्याची तसेच त्याच्या मार्गदर्शनाची संधी तरुण कलावंत आणि नाटकात काहीतरी करू पाहणाऱ्यांना यानिमित्ताने मिळाली. आशुतोष पोतदार, अतुल पेठे, अभिजित झुंजारराव, सुनील शानबाग, अजित भगत, किशोर कदम असे नावाजलेले नाट्यदिग्दर्शक, कलाकार यांचा या उपक्रमात सहभाग होता. रंगालयचे सभासद झालेल्या नाशिकच्या नाट्यरसिकांसाठी वर्षभर नाटकांचे

जे प्रयोग दाखविण्यात आले, त्या वेगवेगळ्या प्रवाहातील, वेगवेगळ्या विषयांवरची नाटके बघतांना रसिकांची अभिरुची संपन्न करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या उपक्रमात 'रंगालय' काही अंशी तरी यशस्वी झाले असे म्हणता येईल. याशिवाय या उपक्रमाला जोडूनच नाट्य अभ्यास वर्गातून नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, अभिनेत्याची पूर्वतयारी अशा विषयांवरील चर्चांमधून नवीन नाटककार तसेच नाट्य कलावंत घडविण्याचा प्रयत्नही केला. रंगालयद्वारा वर्षभरात सादर झालेल्या ११ नाटकांनी रसिकांना एक चांगली नाट्यमेजवानी जशी मिळाली तसेच नाशिकच्या नाटककारांना आणि कलावंताना नवीन काही बघण्यास आणि शिकण्यासही मिळाले.

एफ वन -१०५, बिनकामाचे संवाद, कृष्णविवर, इन्शाअल्लाह, राजनीती और विवाह, ओ फ्रिदा, कर्वे बाय द वे, उणे पुरे शहर एक, पुरावाच काय अमेरिकेला? ही नाटकांची नावे जरी पाहिली तरी याची खात्री नक्की पटेल. आशय आणि विषय तसेच सादरीकरणातील वैविध्य यामुळे ही सर्वच नाटके रसिकांच्या कायम लक्षात राहतील. प्रवीण काळोखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमासाठी अपार मेहनत घेतली. चांगले नाटक रसिकांपर्यंत पोहोचविणे आज गरजेचे आहे तसेच चांगले रसिक तयार होणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या गरजेतूनच असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात होणे गरजेचे आहे. यातून काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे नाटक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपण नेमके कुठे आहोत ते समजते, आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये कोणत्या प्रकारचे नाटक सादर होते आहे ते समजते. त्यातील नवीन प्रयोग समजून घेता येतात. रसिकांचीही अभिरुची वृद्धिंगत होण्यास मदत होते.

नाशिकच्या रंगभूमीने आज कात टाकली आहे. मागील काही वर्षांपासून विवेक गरुड, दत्ता पाटील, भगवान हिरे, श्रीपाद देशपांडे, सुधीर कुलकर्णी, सचिन शिंदे, प्रशांत हिरे अशी कितीतरी नावे सांगता येतील, ही सर्व नाटककार मंडळी नाशिकच्या रंगभूमीची वेगळी ओळख निर्माण करण्यात आज अग्रस्थानी आहेत. त्याशिवाय, नाशिकमधील विविध नाट्यसंस्था आज नाटकाला संजीवनी देण्यात पुढाकार घेत आहेत. वेगवेगळ्या राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये आज नाशिकचे नाटककार आणि त्यांची नाटके पुरस्कार मिळवित आहेत. नाटकाबद्दलचे एक भारावलेले वातावरण आज नाशिकमध्ये बघायला मिळते आहे. हे वातावरण असेच राहिले अन् त्यातून काही चांगल्या नाटकांची निर्मिती झाली तर भविष्यात पुन्हा एकदा ज्ञानपीठ पुरस्कार नाशिकच्या वाट्याला आल्यास अजिबात नवल वाटायला नको.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा अधिकाऱ्यांना एसीपीपदी पदोन्नती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव चौधरी आणि बबन जोशी या दोघांना सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नती मिळाली. राज्यभरातील १०८ अधिकाऱ्यांना बढती मिळाली असून, नाशिक शहर पोलिस दलातील या दोघांचा त्यात समावेश आहे.

शहर पोलिस दलातील पोलिस कल्याण विभागात चौधरी काही वर्षांपासून कार्यरत आहेत. सन १९७९ मध्ये चंद्रपूर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झालेल्या चौधरी यांनी १९८५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर, त्यांनी वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ इत्यादी ठिकाणी कामे केली. पाच वर्षांपासून चौधरी नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. अडीच वर्षे इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये काम पाहिल्यानंतर त्यांच्याकडे कल्याण विभागाचे काम सोपवले बबन जोशी हे दुसरे अधिकारी असून, ते सध्या पोलिस आयुक्तालयातील तक्रार निवारण केंद्रात कार्यरत आहेत. दोघा अधिकाऱ्यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स हिसकावणारे तिघे अल्पवयीन ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी चालणाऱ्या महिलांकडील बॅग आणि मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या तिघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गंगापूर आणि आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ३१ डिसेंबरला तीन महिलांच्या पर्स आणि मोबाइल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास सुरू असतानाच हे संशयित गळाला लागल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील पर्स ओढून नेण्याच्या घटना महात्मानगरसह शहरातील काही भागात जोरात सुरू आहेत. ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महात्मानगर येथे राहणाऱ्या डॉ. उज्वला मोहन निकम घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी डॉ. निकम यांच्याकडील पर्स ओढून धूम ठोकली. या पर्समध्ये १० हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाइल होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास पारिजात नगर परिसरात घरासमोर थांबलेल्या भाग्यश्री आदित्य आहिरे यांचा मोबाइल हिकावून नेण्यात आला. या दोन्ही घटनांबाबत गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात राहणाऱ्या सरस्वती प्रशांत पाटील या आडगाव शिवारात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरील तिघांनी पाटील यांच्याकडील पर्स ओरबाडून चोरून नेल्याची आणखी एक घटना ३१ डिसेंबरच्या पोलिस बंदोबस्तादरम्यान घडली. या पर्समध्ये ६५० रुपये होते.

या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. तीनही घटना सलग घडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. सातत्याने होणाऱ्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असताना त्यांना तीन अल्पवयीन संशयित आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, त्यांची झडती घेतली असता चोरीचे मोबाइल आढळून आले. तिघेही संशयित उपनगर परिसरातील असून ते पंचवटी, गंगापूर, आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत महिलांकडील पर्स आणि मोबाइल ओरबाडून दुचाकीवरून पळ काढत असत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांकडून चोरीचे काही मोबाइल जप्त करण्यात आले असून, आणि संध्याकाळी उशिरापर्यंत तीन गुन्हे उघडकीस आले. या त्रिकुटाने शहरात २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला प्रवाशाकडील दागिने लंपास

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिक्षाने प्रवास करीत असताना सहप्रवाशाने महिलेच्या पर्समधील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. द्वारका ते गोविंदनगर दरम्यान २८ डिसेंबररोजी सायंकाळी ही घटना घडली. ठाणे येथे राहणाऱ्या लता रवींद्र विसपुते (वय ५८) या त्यांच्या पतीसोबत गोविंदनगरकडे रिक्षाने जात होत्या. मात्र, प्रवासादरम्यान रिक्षात सहप्रवासी म्हणून बसलेले दोन संशयितांनी विसपुते यांचे लक्ष विचलीत करून पर्समधील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी विसपुते यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

वायर चोरीला

द्वारका येथे पार्क केलेल्या ट्रकमधून २० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक वायर चोरट्याने चोरून नेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी लातूर येथे राहणारे वाहनचालक प्रकाश नामदेव मन्हाळे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. एमएच ३९, ६८७८ या क्रमाकांच्या मालट्रकमध्ये मन्हाळे झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकच्या पाठीमागील बाजूस लाकडी चौकटीत ठेवण्यात आलेल्या वायर चोरट्यांनी लंपास केली.

वृद्धाचा मृत्यू

रिक्षाने धडक दिल्याने सातपूर परिसरातील ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. नारायण दंडगव्हाळ असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे राहणाऱ्या दंडगव्हाळ यांना अज्ञात रिक्षाचालकाने धडक दिल्याने गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम तोडणाऱ्यांना आठ लाखांचा दंड

$
0
0

रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. रेल्वे क्रॉसिंग, अनधिकृत विक्रेते, चालत्या गाडीतील साखळी ओढणे, महिलांच्या डब्यात प्रवास करणे, तिकाटांचा काळा बाजार याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांनी कारवाई करत हे गुन्हे दाखल केले आहेत. रेल्वे कोर्टाने या संशयितांना ११ महिन्यांच्या काळात एकूण ७ लाख ८० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

तिकिटांचा काळाबाजार रेल्वे तिकीटांचा काळाबाजार हा नेहमीच चिंतेचा विषय आहे. आरक्षित असो वा अनारक्षित तिकिटे, प्रवाशी प्रदीर्घ काळ रांगेत उभे असतात. मात्र, एजंटांना लवकर तिकीट मिळते. तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या १४३ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आद्यं मे चौर्यम’ला द्वितीय पारितोषिक

$
0
0

संस्कृत नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

५५ व्या महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या 'अक्षगानम्' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे 'आद्यं मे चौर्यम' या नाटकाला द्वितीय, तर पनवेलच्या डी. ए. व्ही.पब्लिक स्कूल संस्थेच्या बालदपि या नाटकासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.

दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक 'सुधाखण्डा: केचित' या नाटकासाठी दिगंबर आचार्य यांना तर द्वितीय पारितोषिक 'बालदपि' नाटकासाठी उल्हास रेवडेकर यांना जाहीर झाले. नाट्यलेखनाचे पहिले पारितोषिक प्रभाकर भातखंडे लिखित 'अक्षगानम' नाटकाला तर द्वितीय पारितोषिक विभा क्षीरसागर लिखित सिकतासु तैलम नाटकाला जाहीर झाले. प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक दिनेश म्हैसकर (कथा वार्धकस्य इयम), द्वितीय पारितोषिक जयदीप आपटे (नदीसुक्तम्), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक आदित्य समेळ (आद्यं मे चौर्यम) तर द्वितीय दिगंबर आचार्य (सुधाखण्डा: केचित), रंगभूषा प्रथम पारितोषिक माणिक कानडे (इन्द्रध्वज) तर द्वितीय सुभाष बिरजे (नदीसुक्तम्) यांना जाहीर झाले.

अभिनयाचे रौप्यपदक प्रीतम जोशी (कथा वार्धकस्य इयम), जिग्नेश किल्लेदार (सुधाखण्डा: केचित), बागेश्री निंबाळकर (एककसंघ:), स्वराली पाटील (सुधाखण्ड: केचित) तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र रेणुका मोगरकर (मनोगहरे), रूपश्री जोशी (आद्यं मे चौर्यम), चारूता करंदीकर (पादत्राणहीन:), योगिता पवार (विंशतिचक्रयोग:), अद्वैत गिरप (बालदपि), राकेश पवार (मुक्ता), अभिजित केळकर (एककसंघ:), सुहास संत (वक्रतुंड) यांना जाहीर झाले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जल्लोषात ही स्पर्धा झाली.
लोकहितवादी मंडळाचा दुसरा सन्मान

५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये लोकहितवादी मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या 'या ही वळणावर' या नाटकाने विभागीय फेरीत प्रथम क्रमांक पटकावला. तर, यंदाच्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत मंडळाने सादर केलेले 'आद्य मे चौर्यम' नाटक अंतिममध्ये द्वितीय आले. त्यामुळे लोकहितवादी मंडळाला यंदा राज्य नाट्यमध्ये हा दुसरा सन्मान मिळाला आहे. 'आद्य मे चौर्यम' या नाटकाचे मराठी रुपांतरण मुकूंद कुलकर्णी यांनी केले होते तर संस्कृत भाषांतर तेजश्री वेदविख्यात यांचे होते. दिग्दर्शन अमित बुवा यांनी केले होते. या नाटकात सागर संत, रुपश्री जोशी, तनिष्का देशपांडे, अनिकेत कुलकर्णी, प्रिन्स गौड, महेंद्र चौधरी, सुजय कुलकर्णी, अनिल जडे, स्वाती शेळके यांनी भूमिका साकारल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ जानेवारीपासून मविप्र करंडक

$
0
0

स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे : 'उत्तम शेती-मध्यम व्यापार-कनिष्ठ नोकरी', 'भारतीय उच्चशिक्षण व जागतिक संदर्भ', 'स्मार्ट सीटीज् - वास्तव की आभास', 'वापसी पुरस्कारांची : कसोटी योग्य, अयोग्यातेची', 'गरज आहे महाविद्यालयीन निवडणुकांची' आणि 'व्हावे लहानाहुनी लहान' असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. सहभागी स्पर्धकास ८ मिनिटे वेळ दिला जाईल. सहभागासाठी २५ वर्ष वयोमर्यादा आहे. प्रत्येक कॉलेजला दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठविता येईल. अधिक माहितीसाठी www.karandak.mvp.edu.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. विजेत्यांना करंडकासह प्रथम - २५ हजार रुपय, द्वितीय १५ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये व उत्तेजनार्थ ५ हजारांची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत गोडावूनला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील मशिदीसमोर असणाऱ्या जुन्या गोडावूनला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. सायंकाळच्या सुमारास धुराचे लोट आकाशात दिसताच नागरिकांनी गर्दी केली. आगीचे रूप पाहत स्थानिकांनी तत्काळ कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क साधत अग्निशमन दलास पाचारण केले. आग लगेचंच आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाचे जवान भाऊसाहेब सानप, संजय सकट, दिलीप बोराडे, जितेंद्र कराडे, जयवंत गोडसे यांसह स्थानिक नागरिक मनोज गायकवाड, रोहिदास शेंडगे, संजय गिते, गिरीश मोरे आदींसह नागरिकांनी सहकार्य केले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. नगरसेविका प्रभावती धिवरे, भगवान कटारिया यांनी घटनास्‍थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री अन् अधिकारी त्र्यंबकराजाच्या दरबारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नववर्षाचे स्वागत प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो. मात्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाच्या दर्शनाबरोबरच अभिषेक केला. यामुळे दिवसभर त्र्यंबकेश्वरला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले होते. मात्र, मंत्री ‌आणि अधिकाऱ्यांमुळे इतर भाविकांना दर्शनरांगेत तासनतास उभे रहावे लागले. आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण येणार आहेत.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी नूतन वर्षारंभी भगवान त्र्यंबकराजास पूजाभिषेक करून पुरोहितांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत पत्नी विना सिंह, पुत्र खासदार अभिषेक सिंह, सून ऐश्वर्या सिंह असे कुटुंबीय होते. त्र्यंबक येथे नववर्षानिमित्त दर्शनासाठी आलेल्या आमदार निर्मला गावित यांनीही त्यांची भेट घेतली.

अधिकाऱ्यांकडूनही सहकुटुंब पूजा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी भगवान त्र्यंबकराजाची पूजा केली. त्यानंतर सायंकाळी आणखी काही अधिकाऱ्यांनी सहकुटुंब पूजा आणि दर्शनाचा योग साधला. नववर्षाच्या शुभारंभी दर्शनासाठी भाविकांचीही गर्दी झाली आहे. देणगी दर्शन आणि पूर्वदरवाजा रांग अशा दोन्ही बाजूस रांगा लागल्या आहेत. मंत्र्यांच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांनी सर्वसामान्य भाविकांचा मात्र दर्शन रांगेत प्रतीक्षेचा कालावधी वाढला आहे.


३७ तास प्रतीक्षा

छत्तीसगढचे मुख्यमंत्री येणार म्हणून दोन दिवस येथे प्रतीक्षा सुरू होती. यामुळे शहारात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिस वाहनांच्या ताफ्यांनी येथे सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेतली. येथून जवळच असलेल्या अंजनेरी येथील ब्रह्माव्हॅली शैक्षणिक संकुल येथे हेलिपॅड तयार करण्यात आले होते. या परिसरास लष्करी छावणीचे स्वरूप आले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिधावाटपावर संपाचा परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन धान्य दुकानदारांनी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील गोदामांमधून धान्याची उचल होऊ शकली नाही. शनिवारपासून शहरातही धान्य वितरण देखील बंद करण्यात येणार असल्याने या संपाचा सार्वजनिक वितरण प्रणालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

सरकारने रेशन धान्य दुकानदारांना त्यांच्या उदरनिर्वाहापुरते कमिशन द्यावे, थेट दुकानापर्यंत माल पोहोच मिळावा, स्टेशनरी खर्च, वीजबिल काटा, नोंदणी शुल्क व इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य केल्या जाव्यात, यासाठी रेशन धान्य दुकानदारांच्या संघटनेने राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. शहरातही उद्यापासून उचल बंद करण्यात येणार आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धान्य व केरोसिनचा कोटा उचलला तसेच वितरीत केला जाणार नसल्याने वितरण व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. संपाच्या पहिल्या दिवशी धान्य उचलले गेले नाही. त्यामुळे धान्याचे ट्रक गोदामाबाहेर उभे होते. राज्य सरकारने यावर तोडगा न काढल्यास सार्वजनिक वितरण प्रणाली ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बजेट शंभर टक्के खर्च करणार’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विभागाकडून बजेट धिम्या गतीने खर्ची होत असल्याची कबुली देत आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी मार्चपर्यंत शंभर टक्के निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च करू, असा दावा केला आहे. आदिवासी विभागाचे बजेट आठ महिन्यांत फक्त २५ टक्केच खर्च झाल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध केले होते.

ई-टेंडरिंगमुळे काटेकोरपणा आला असून, ठेकेदारांच्या भ्रष्टाचारालाही ई-टेंडरिगमुळे ठेकेदारांची मनमानी कमी झाल्याने काही कामांना प्रतिसाद मिळत नसल्याने सुद्धा खर्च प्रलंबित आहे. मार्च अखेरपर्यंत निधी खर्चाचे उद्दिष्टे पूर्ण करून विभागाचा एक रूपयासुद्धा परत जावू देणार नाही, असा विश्वास सावरा यांनी व्यक्त केला आहे. `आदिवासींच्या पदरी उपेक्षाच` या `मटा`च्या वृत्ताची गंभीर दखल नाशिक दौऱ्यावर असलेल्या सावरा यांनी घेत तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करीत निधी खर्चाचा वेग वाढविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या वेळी `मटा`शी बोलतांना सावरा यांनी निधी अपेक्षेपेक्षा कमी खर्च झाल्याचे मान्य केले.

शिल्लक निधी परत जावू नये म्हणून २०६ आश्रमशाळांचे बांधकाम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बांधकामांवर शंभर टक्के निधी खर्च होईल, असेही सावरा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images