Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाळासोडून मुख्याध्यापक स्वागताला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रमुख असलेल्या मुख्याध्यापकांनी नाशकातील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मोठी गर्दी केली. निमित्त होते नवीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदभार स्विकारण्याचे. याचवेळी नूतन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांच्यावर मुख्यध्यापकांनी अक्षरशः बुकेंचा वर्षाव केला. त्यामुळे येत्या काळात अहिरे हे या मुख्याध्यापकांना सांभाळून घेणार की, याच मुख्याध्यापकांद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांची औरंगाबाद येथे तर नाशिकच्या शिक्षणाधिकारीपदी प्रविण अहिरे यांची नियुक्ती झाली. त्यानुसार अहिरे यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास पदभार स्विकारला. याचवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मोठ्या प्रमाणात अभ्यागतांची गर्दी झाल्याने ही बाब चर्चेची बनली. प्रत्येक व्यक्तीकडे फुलांचे पुष्पगुच्छ, महागडे बुके आदी दिसत असल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. हे सारे नूतन शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सुरु असल्याचे दिसून आले. स्वागत परेडमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जिल्ह्याच्या विविध भागातून हजर झाले होते. शिक्षणाधिकाऱ्यांशी आपली वैयक्तिक ओळख रहावी, या हेतूनेच अहिरे यांच्यावर पुष्पगुच्छ आणि बुके यांचा वर्षाव होत होता. दरम्यान, स्वागत सोहळ्यानंतर अहिरे यांनी प्राथमिक शाळांच्या कामकाजाची माहिती घेतली.

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे आव्हान

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळती रोखणे, कॉपीमुक्त परिक्षा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा अशी अनेक आव्हाने सध्या शिक्षणाधिकाऱ्यांपुढे आहे. त्यामुळे ही आव्हाने स्वीकारुन जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देऊन याच शिक्षकांना कामाला लावणार की त्यांना पाठीशी घालणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक होईल आयटी डेस्टीनेशन

$
0
0

संतोष मंडलेचा
एकविसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेट, मोबाइल, व्हॉटस् अॅप अशी अनेक संवादाची साधने आज आपणास दिसत आहेत. काही क्षणात आपण हजारो मैलावरील माणसांशी संवाद साधू शकतो तर ई-मेल पाठवून पत्रव्यवहार करु शकतो. हे सर्व शक्य झाले आहे ते माहिती आणि तंत्रज्ञानामुळे.

माहिती आणि तंत्रज्ञानामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले गेले आहे असेच नाही तर या तंत्रज्ञानामुळे जगच छोटे झाल्यासारखे वाटते. अनेक कामे अत्यंत सहजपणे आपण आपल्या कार्यालयात किंवा घरी बसून करु शकतो. वेळ, पैसा याची मोठी बचत यामुळे झाली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. साहजिकच तरुणाईचा ओढा या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

गेल्या दशकात आयटी हा विषय अभ्यासक्रमातील एक विषय इतकाच मर्यादित होता. अद्यावत प्रयोगशाळा आणि यंत्रणा उपलब्ध नव्हत्या परंतु आता हे चित्र पूर्ण बदलले आहे. माध्यमिक शाळांपासून ते थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच अभ्यासक्रमात आयटीवर जास्त भर दिला जात आहे आणि आज सर्वच महाविद्यालयात अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा व संदर्भ ग्रंथालये उपलब्ध असल्याने विद्यार्थी अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान घेऊनच बाहेर पडत आहेत. नाशिकचाच विचार केला तर आज नाशिकमध्ये असलेल्या आयटी इंजीनिअरिंग, डिप्लोमा अशा ३३ कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी दरवर्षी या क्षेत्रात तयार होऊन बाहेर पडतात. याशिवाय सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अॅनिमेशन अशा अनेक विषयात ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे जाळे मोठ्या प्रमाणात आयटी इंजीनिअर्स आणि व्यावसायिक घडवत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी निर्माण होणारे कुशल मनुष्यबळ असतांना नाशिकमध्ये कोठेही आयटी इंडस्ट्री फोफावताना दिसत नाहीत. त्यामुळे हजारो तरुण हे पुणे, हैदराबाद या ठिकाणी जात आहेत.

मुंबई-पुणे-नाशिक आणि औरंगाबाद अशा सुवर्ण चौकोनाचा एक महत्त्वाचा भाग नाशिक आहे. परंतु मुंबई, पुणे येथे झालेला आयटी क्षेत्राचा विकास बघता नाशिक हे त्याच्या जवळपासही पोहोचू शकले नाही. नाशिकमध्ये आयटी उद्योगाला सर्वार्थाने पोषक असे वातावरण असतांनाही आयटी कंपन्यांनी नाशिककडे पाठ फिरवलेली दिसते आहे. आज अंबडमध्ये उभ्या असलेल्या आयटी पार्कमध्ये कंपन्यांसाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-हैदराबाद या शहरांप्रमाणे नाशिकला आयटी डेस्टीनेशन ही ओळख कधी होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज बोटावर मोजता येतील अशा कंपन्या नाशिकमध्ये आहेत. परंतु या कंपन्यादेखील त्यांचा विस्तार हा ते इतरत्र करीत आहेत. यावरून नाशिकमधील आयटी पार्कबाबतची उदासिनता दिसून येते.

इंटरनेटमुळे डाटा आऊटसोर्सिंग, वेब साईट डिझायनिंग अशी कामे करण्यासाठी हैदराबाद, पुणे किंवा युएसला जावे लागत नाही, तर घरी बसून किंवा ऑफिसमधूनच नाशिकमध्ये ही कामे होत आहेत. अशा प्रकारची कामे करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.

काही वर्षांपूर्वी इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांनी नाशिककडे आपला मोर्चा वळविला होता परंतु त्यांना योग्य प्रतिसाद शासनाकडून न मिळाल्याने या कंपन्या परत गेल्या. आज या कंपन्या नाशिकमध्ये आल्या असत्या तर नाशिकचे स्वरुपच पालटून गेले असते. नाशिककडे आयटी कंपन्यांनी पाठ फिरविण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर जलद दळणवळणची कोणतीही सुविधा नाही. नाशिकला एअर कनेक्टीव्हिटी नसल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या येथे येण्यास नाखूश दिसतात. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ नाशिकला झाले परंतु विमान कंपन्यांची उदासिनता किंवा न मिळणारा प्रतिसाद बघता विमान वाहतुकीसाठी मुहूर्त मिळालेला नाही.

नुकतीच एक बातमी वाचावयास मिळाली की, ईएसडीएस येत्या काही दिवसात नवी मुंबई, बंगळूरु व नाशिक येथे ७३५ कोटीची गुंतवणूक करून डाटा सेंटर उभारणार आहे. सातपूर एमआयडीसी प्रकल्पाचा विस्तार करुन हे डाटा सेंटर सुरू करीत आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांनी नाशिकला उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे. नाशिकहून जर जगभर एअर कनेक्टीव्हिटी मिळाली तर नाशिक भविष्यात आयटी डेस्टीनेशन होईल यात शंका नाही.

(लेखक हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌श‌िकचे पखवाजवादक जाणार आळंदीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्री क्षेत्र आळंदी देहु परिसर विकास समिती यांच्यावतीने भारतातील समस्त पखावज व मृदंग वादकांचे जगातील पहिलेच अखिल भारतीय पखावज-मृदंग संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार (७ फेब्रुवारी) रोजी दुपारी ४.३० वाजता विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी नाशिकहून पखावजवादक व भजनीमंडळे जाणार आहेत. अशाप्रकारे होणारे हे पहिलेच संमेलन असल्याने पखावजवादकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

या संमेलनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार नादब्रह्मऋषी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर असतील आणि मारूती महाराज कुऱ्हेकर, स्वामी परिपूर्णानंद व कर्नाटक येथील मृदंगमचे बादशहा पद्मश्री पालघट मणी राघू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथील विकास कामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी गरीब व होतकरू पखावज वादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्व शांती केंद्राच्या वतीने ७५ पखावज भेट म्हणून देण्यात येणार आहेत. अखिल भारतीय पखावज-मृदंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ७ हजार पखावज-मृदंग वादक एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर करणार आहेत.

नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल. वारकरी संप्रदायामध्ये पखावज, मृदंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथे होणारे पहिल्या अखिल भारतीय पखावज-मृदंग वादक संमेलनात एकाच वेळी ७ हजार मृदंग वादक एका तालात आणि लयीत वाजविणार आहेत. प्रथमच अशाप्रकारचे संमेलन भारतात भरविले जात आहे. त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे. या मृदंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदंगाचार्यांना संस्थेच्यावतीने माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

'आळंदीला, ज्ञानेश्वर माऊलींच्या पूण्यभूमीत हे पखावज संमेलन होणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन आमची सेवा आम्ही रूजू करणार आहोत. पखावज हे वाद्य अनेकदा दुर्लक्षितच असते परंतु अशानिमित्ताने त्याला सन्मान मिळत आहे ही चांगली बाब आहे.'

-विजय जाधव, पखावजवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवेक ओपन २०१६’ क्रीडा महोत्सवाची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज वेल्फेअर सेंटर (निवेक) नाशिक यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवाची सांगता निवेक क्लब येथे झाली. यावेळी विविध खेळांत नैपुण्य दाखवलेल्या खेळाडूंना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, लॉन टेनिस, बुद्धिबळ, क्रिकेट, चेस, बिलियर्ड्‍स आणि स्नूकर या खेळांच्या विविध वयोगटांतील स्पर्धा घेण्यात आल्या. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ अॅटलास कॉप्कोचे ऑपरेशन मॅनेजर सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुधीर देशमुख यांनी निवेक करीत असेलेल्या क्रीडा व सामाजिक कार्याविषयी कौतुक केले आणि भविष्यात नाशिकचे कॉर्पोरेट व औद्योगिक क्षेत्र निवेकच्या पाठीशी उभे राहील, याची ग्वाही दिली. निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार यांनी निवेकमध्ये सुरू होणाऱ्या बुद्धिबळ, क्रिकेट, स्केटिंगच्या प्रशिक्षणवर्गाविषयी माहिती दिली.

या कार्यक्रम प्रसंगी सिएटचे व्हाइस प्रेसिडेंट आर. के. दास, नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष विनोद शहा, निवेकचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, मुनीश नारंग, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, जनरल सेक्रेटरी मंगेश पाटणकर हजर होते. क्रीडा महोत्सवाचे सचिव रणजित सिंग यांनी स्पर्धेविषयी अहवाल सादर केला. स्पर्धेसाठी १ हजार १५० प्रवेशिका आल्याचे त्यांनी सांगितले. निवेकचे जनरल सेक्रेटरी संदीप गोयल यांनी निवेकचा क्रीडा क्षेत्रातील उंचावत असलेल्या आलेखाविषयी बोलताना क्रीडा प्रशिक्षकांविषयी गौरवोद्‍गार काढले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या जीताशा शास्त्री, कोमल नागरे, विक्रांत मेहता, अभिषेक शुक्ल, सिद्धार्थ साबळे, व प्रशिक्षक राकेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच उदयोन्मुख लॉन टेनिसपटू तेजल कुलकर्णी हिस नायलेक्स कंपनीचे संचालक लक्ष्मण पाचकवडे यांच्यातर्फे ५ हजारचा धनादेश देण्यात आला तर कै. विजय राठी यांचा स्मरणार्थ टेबल टेनिसपटू सौमित देशपांडेला गौरवण्यात आले. स्वीमिंगमधील नैपुण्याबद्दल अद्वैत आगाशे, ईशान बिरार, प्रतिक बंग, वैभव देसाई, नील राणे, लुब्ध खिवंसरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर निवेकचे माजी अध्यक्ष समीर भूतानी, कोषाध्यक्ष जनक सारडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली बॉइजने पटकाविला विजय भोर चषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प ​

योगेश महाले व मुन्ना शेखच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर देवळाली बॉईजने राजधानी संघावर ३० धावांनी मत करत १९व्या विजय भोर चषक स्पर्धेचा मानकरी होण्याबरोबरच रोख रक्कम रु.५१ हजार पारितोषिकही पटकावले. उपविजेत्या राजधानी संघाला रोख रु.३१ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

मास्टर स्पोर्ट‍्स क्लब आयोजित विजय भोर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत फेरीत देवळाली बॉईजने साई शिर्डी संघाचा तर राजधानीने वालदेवी संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात षटकार व चौकारांची बरसात बघावयास मिळाली.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज संतोष कावळे (राजधानी), गोलंदाज नंदू चिंचवडकर (कल्याण), क्षेत्ररक्षक अतिक पठाण (शिर्डी), सामनावीर योगेश महाले तर मालिकावीर मुन्ना शेख (देवळाली बॉईज)यांना गौरविण्यात आले. सामन्यात पंच म्हणून रतन खडताळे, राजू पवार, संजय धुर्जड, तारा खान यांनी तर गुणलेखक म्हणून शशिकांत पगारे, उमेश कटारे यांनी काम पाहिले. धावते समालोचन मुन्ना शहा, भाऊसाहेब गायकवाड यांनी केले.

पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सलग १९ वर्षे ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याबद्दल कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनीही स्पर्धा आयोजकांचे गौरव करीत कॅन्टोन्मेन्टच्या वतीने या मैदानासाठी विविध सुविधा देण्याचे मान्य केले. यावेळी व्यासपीठावर महाराज बिरमानी, आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर, सूत्रसंचालन सुधाकर गोडसे तर आभार अनिल दिवाने यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानाचा परवाना रद्द

$
0
0

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळा आणि घोरपडे बंधूंनी केलेल्या कोट्यवधींच्या रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशिक जिल्हा पुरवठा विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली. रेशन वितरण प्रणालीत सुधारणा करतानाच धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

पवननगर येथे श्रमिक महिला औद्यागिक सहकारी संस्थेला स्वस्त धान्य दुकान चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दिलीप तुपे हे या संस्थेचे अधिकृत सेल्समन आहेत. या दुकानातून सुमारे वर्षभरापासून धान्य मिळत नसल्याच्या नारायण घरटे, सुशिला मंडलिक, अरुण कोळी यांच्यासह अनेक शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभाग आणि धान्य वितरण विभागाला प्राप्त झाल्या. याखेरीज दुय्यम ‌शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या २६ शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचा लाभ देणे बंद करण्यात आले होते.

धान्य वितरण अधिकाऱ्यांनी पवननगर येथील या दुकानाची तपासणी केली. त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. परवाना संस्थेच्या नावे असताना तेथे वैभव दिलीप तुपे ही त्रयस्थ व्यक्ती दुकान चालवित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे सरकारी दुकानात खुल्या बाजारातील गहू, तांदुळ, डाळी विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. तपासणी दरम्यान १४.७७ क्विंटल गहू कमी तर ३५.१७ क्विंटल तांदूळ अधिक आढळला. शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य वाटप न केल्याच्या नोंदीही आढळल्या. पात्र लाभार्थ्यांना शिधावस्तूंपासून दूर ठेऊन हा धान्यसाठा काळ्या बाजारात विक्री केला जात असल्याची शक्यता गृहीत धरून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संस्थेच्या मंदा लांडे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी खुलासा सादर केला. सरकारी दुकानातून खासगी माल विक्री करणार नाही, अशी ग्वाही दिली. वैभव यास पोत्यांच्या थप्प्या व्यवस्थित न मोजता आल्याने गहू, तांदळाच्या साठ्यात तफावत आढळल्याचा दावा खुलाशात करण्यात आला.

तपशीलामध्ये विसंगती तपासणी पथकाच्या प्रत्येक आक्षेपावर परवानाधारकाने बाजू मांडली. मात्र, ती मोघम स्वरुपाची असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासणीतील कागदपत्रे व खुलाशातील तपशील यामध्ये विसंगती आढळली. परवानाधारकाने दोषारोप मान्य केले. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने या दुकानाचा परवाना रद्द केल्याची तसेच अनामत रक्कमही जप्त केल्याची माहिती राजेंद्र नानकर यांनी मागविलेल्या माहितीच्या अधिकारातून पुढे आली.



शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमच्या पथकाने स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२१ ची तपासणी केली. त्यावेळी तेथे अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या. धान्य वितरणाच्या नोंदींमध्ये तफावत होती. दुकानात खासगी मालही विक्रीसाठी ठेवला होता. त्यामुळे संबंधित दुकानाचा परवाना रद्द केला असून १०० टक्के अनामत रक्कमही जप्त केली आहे. - गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरीकरणाचा २० वर्षानंतर मुहूर्त

$
0
0

नगरसेविका प्रभावती धिवरे यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक दिवसापासूनच प्रलंबित असलेली आणि गंभीर बनत असलेली समस्या मार्गी लागल्याचे मत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बहुजनांच्या वस्तीत प्रथमच विकासकामे होत असल्याची भावना रहिवाशांनी मांडली आहे. नगरसेविका प्रभावती धिवरे, माजी सनदी अधिकारी भाऊसाहेब धिवरे यांनी येथील अरुंद गल्ल्या व येण्याजाण्यासाठीच्या रस्त्यांवर डांबरीकरणाच्या कामाला प्राधान्य देत कामाला प्रारंभ केला आहे. येत्या मार्च महिन्यानंतर उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईसाठी माझे ग्रंथालय योजना

$
0
0

खास बालवाचकांसाठी गरागरा गरागरा, अजब गोष्टी गजब गोष्टी, अगडहत्ती तगडबंब, एरिक लोमँक्सचा दीर्घ प्रवास, चल खाऊ पाणीपूरी अशी अनेक पुस्तके लिहिणारे अनंत भावे वाचकांच्या भेटीला येत असल्याने विशेषत: बच्चे कंपनीमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

गेल्या वर्षभरात माझे ग्रंथालय बालविभागाची वाटचाल यशस्वीपणे झाली. अनेक यशस्वी कार्यशाळा, बालग्रंथालय नाशिकरोड विभागाचा तसेच अंधांसाठी बोलकी पुस्तके या अभिनव संकल्पनेचा प्रारंभ झाला. तरुणाईला देखील वाचन संस्कृतीकडे वळवायला हवे ही मागणी समाजाच्या विविध स्तरांतून वाढत गेल्याने माझे ग्रंथालय योजनेचे संकल्पक व कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे

विश्वस्त विनायक रानडे यांनी कल्पना डून तरुणाईसाठीची नवी योजना, 'माझे ग्रंथालय- तरुणाई' साकारली आहे.

बालग्रंथालय वर्षपूर्ती व माझे ग्रंथालय-तरुणाईच्या प्रारंभ सोहळ्यात तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान माझे ग्रंथालय बालविभाग व तरुणाई या योजनेत अधिकाधिक बालगोपाळांनी, तरुणांनी व त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बालग्रंथालय मुख्य समन्वयक स्वाती गोरवाडकर, नाशिकरोड समन्वयक तन्वी अमित तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांनी केले आहे.

अशी असणार योजना 'माझे ग्रंथालय- तरुणाई' योजना १३ ते २५ या वयोगटातील वाचकांसाठी आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी माझे ग्रंथालय या योजनेचे हे पुढचे पाऊल आहे. या योजनेमध्ये १५ इंग्रजी व १० मराठी अशा एकूण २५ दर्जेदार पुस्तकांचा फिरता खजिना उपलब्ध होऊ शकणार आहे. तरुणांना देणगी मूल्य दिल्यावर या योजनेचे सभासदत्व घेता येणार आहे. दर दोन महिन्यांनी सभासदांच्या ग्रंथपेट्या आपापसात बदलण्यात येतील. तरुणांमध्ये वाचनाची गोडी वाढावी तसेच आदानप्रदान वाढावे, असा या योजनेमागील उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मखमलाबादचा सिग्नल सुरू करण्याची मागणी

$
0
0

गेल्या अनेक दिवसांपासून सिग्नल बंद असल्याने मुख्य चौकामध्ये अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या चौकातून जातांना वाहनचालक आणि पादचारी कायमच दडपणाखाली असतात. त्यामुळे हा सिग्नल तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मुख्य चौकाजवळच अनेक शाळा आणि मंगलकार्यालये आहेत. त्यामुळे तेथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर उपाय शोधत सिग्नल बसविण्यात आले. मात्र, ते कधी सुरू केले जाणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक टाकण्यात यावेत, अशीही मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योती स्टोअर्सचा पुस्तक महोत्सव सुरू

$
0
0

पुस्तक महोत्सवात विविध प्रकारची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशकांची प्रकाशने रसिकांना ३० टक्के सवलतीने खरेदी करता येणार आहेत. या ग्रंथप्रदर्शनाच्या बरोबरच नाशिकमधील लेखक वाचक प्रसारमाध्यमांचे संपादक प्रतिनिधी, तसेच ग्रंथालयाशी निगडीत असलेल्या ग्रंथप्रेमींची स्नेहमेळावाही रोज होणार आहे. त्यात नाशिकमधील साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर रोजच बोलाविण्यात आले असून त्यांची विविध विषयांवर चर्चा घडणार आहे.

स्नेहमेळाव्यात आज पुस्तक महोत्सवात बुधवारी (दि. ३) डॉ. राम कुलकर्णी, डॉ. पी. एस. पवार, चंदुलाल शहा, रामचंद्र काकड, राजाभाऊ मोगल, डॉ. निशिगंधा मोगल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रीय ग्रुप’च्या ऑफिसवर हल्लाबोल

$
0
0

गुंतवणूकदार आक्रमक; कंपनीवर कारवाईची पोलिसांकडे मागणी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ५० ते ६० गुंतवणुकदारांनी मंगळवारी दुपारी होलाराम कॉलनीतील मैत्रीय ग्रुपच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला टाळे लावून धूम ठोकल्याने चिडलेल्या गुंतवणुकदारांनी कंपनीच्या फलकांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा करीत गुंतवणुकदारांनी कारवाईची मागणी केली.

बांधकामासहीत अन्य काही क्षेत्रांत काम करणाऱ्या मैत्रीय ग्रुपच्या कंपन्यांवर सेबीने निर्बंध टाकल्यापासून गुंतवणुकदारांचे पैसे परत करताना कंपनीसमोर अडचणी निर्माण होत आहेत. दर महिन्याला गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन त्या मोबादल्यात ज्यादा परतावा देणाऱ्या मैत्रीय ग्रुपच्या दोन कंपन्याचे कामकाज होलाराम कॉलनी येथील सुमंगल बिल्डर हाऊस येथून होते. यात मैत्री रिअॅल्टर अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा. लि. आणि मैत्री सुवर्णसिध्दी प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे. गुंतवलेल्या पैशांचा परतावा मिळत नसून कंपनीकडून दिलेले चेकही वठले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करूनही हाती काहीच पडत नसल्याने संतप्त झालेले गुंतवणुकदार मंगळवारी होलाराम कॉलनीतील कार्यालयाजवळ जमा झाले. गुंतवणुकदारांची आक्रमकता पाहून कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद करून पळ काढला. यानंतर गुंतवणुकदारांनी कार्यालयाच्या फलकांची मोडतोड केली. याप्रकरणी गुंतवणुकदारांचे एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना भेटले. कंपनीकडून पैशांचा परतावा होत नसल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी कारवाईची मागणी केली.

मंदीचा फटका

संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की सेबीने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे गुंतवणुकदारांना पैसे करण्यात अडचणी येत आहेत. त्यातच ​रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून खरेदी विक्रीच्या व्यवहारातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कंपनीची स्थावर व जंगम मालमत्ता गुंतवणुकीपेक्षा अधिक असून फेब्रुवारीअखेरपर्यंत ही परिस्थिती बदलेल, असा दावा संबंधित कर्मचाऱ्याने केला.

काही गुंतवणुकदारांशी आपण बोललो. तक्रारदारांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले असून प्राथमिक चौकशीत समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

- एस. जगन्नाथन,

पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामाच्या सर्वेक्षणाचे निघाले आदेश

$
0
0

बिल्डरांना आयुक्तांचा दणका, सकाळच्या सत्रात होणार बांधकामांच्या तपासण्या

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील अनधिकृत बांधकामांच्या सर्व्हेक्षणाचे आदेश महापालिका आयुक्तांसह सहाय्यक नगररचना विभागाने काढले आहेत. स्थायी समितीचा संदर्भ घेत, आयुक्तांसह नगररचना विभागाने मंगळवारी स्वतंत्र आदेश काढल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना चाप बसणार आहे. नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी दहा ते दोन या वेळेत शहरातील अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्याचे काम देण्यात आले असून मोठ्या रुंदीच्या रस्त्यांपासून त्याची सुरुवात होणार आहे.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील अनधिकृत बांधकामे व मोबाइल टॉवर्सच्या परवानग्यांवर आक्षेप घेतला होता. बिल्डरांनी बेकायदा पद्धतीने केलेल्या या बांधकामाची आयुक्तांनी गंभीर दखल घेत, अशी बांधकामे शोधण्याचे आदेश स्थायी समितीला बैठकीतच दिले होते. त्यामुळे त्यावर पुढे अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष लागून होते. अखेर सोमवारी आयुक्तांनी शहरात अशा प्रकारे झालेल्या अनधिकृत बांधकामाच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. नगररचना विभागानेही स्वतंत्र आदेश काढत शहरातील अनधिकृत बांधकाम तपासणीची मोहीम सुरू केली आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांपासून ही तपासणी होणार आहे. महापालिकेत दाखल नकाशा आणि प्रत्यक्ष केलेल्या कामाची मोजणी केली जाणार असून, नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता दररोज सकाळी दहा ते दोन वेळेत काम करणार आहेत. त्यामुळे बिल्डरांचे धाबे दणाणले आहे.

व्हीडीओ शुटींग होणार

शहरात अनधिकृत बांधकामाची तपासणी करताना सकृतदर्शनी अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसल्यास त्याचे थेट व्हीडीओ चित्रीकरण करण्यासह फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साईड मार्जिन, अधिकचे मजले, पार्किंगच्या खोल्या आदी जादा कामे दिसल्यास त्याचे फोटो व व्हीडीओ चित्रीकरण तयार करावे व अशा बांधकामांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे बिल्डरांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यांवर छापे, अनधिकृत व्यवसायांवर कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

पोलिस आयुक्तालयाकडून सिडको व सातपूर भागात टवाळखोर, जुगार अड्डे व गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. परंतु यामध्ये जुगार अड्ड्यांवर छापे टाकत असताना अनधिकृत व्यवसायांवर पोलिस कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मगंळवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक अमृत पाटील यांनी श्रमिकनगरला जुगार अड्ड्यावर धाड टाकत ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

सिडको, सातपूर भागातील टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती व जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये इंदिरानगर पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. तसेच नाशिकरोड, देवळाली, सिडको व सातपूरच्या अनेक भागांत जुगार अड्डयांवर छापे टाकत काही जणांना ताब्यातही घेतले होते. मंगळवारी सातपूरच्या श्रमिकनगर भागात एका घरात पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मुद्देमालासह दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. यात जुगार अड्डा चालविणारे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले असल्याने जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकीकडे जुगार अड्ड्यांवर पोलिस कारवाई करत असताना दुसरीकडे मात्र, अनधिकृत व्यवसाय मात्र जोमात आहेत. पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे टाकताना अनधिकृत व्यवसायदेखील बंद करण्याची मागणी सिडको व सातपूरवासियांनी केली आहे. सिडकोतील राणेनगर, पार्थडी गाव शिवार, शांतीनगर झोपडपट्टी आदी ठिकाणी चालत असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केली पाहिजे. तसेच सातपूर एमआयडीसीतील प्रबुद्ध नगर झोपडपट्टी, महिंद्रा मटेरियल गेटसमोरील अनधिकृत देशी अड्डा, सातपूर मळे परिसरातील जुगार अड्डा आदी ठिकाणीदेखील पोलिस कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनतेची कामे वेळेत करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आपले काम वेळेवर केल्यास त्याचा आनंद कामातून मिळेल, असे प्रतिपादन महापालिकेच्या सातपूर विभागाच्या नूतन विभागीय अधिकारी चेतना केरुरे यांनी केले.

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सातपूरच्या सभापती उषा शेळके यांनी केरुरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रशासनात काम करतांना सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. परंतु, कर्मचारी व अधिकारी यांनी कामाची जबाबदारी वेळेवर पाळल्यास कुणालाही कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे केरुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांबावर दुचाकी आदळून दोन ठार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

वेगात असललेली दुचाकी रस्त्यातील विजेच्या खांबावर आदळून जेलरोड येथे दोन युवकांचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी - एकलहरा परिसरातील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील रमेश पंडित बागूल (२७) आणि त्याचा मित्र योगेश बन्सीलाल काकळीज (३४) हे सोमवारी (दि. १) दुपारी दुचाकीवरून (एम. एच. १५ डीटी ८८७२) चालले होते. जेलरोडच्या सैलानी बाबा चौकातून पवारवाडीकडे राजराजेश्वरी मार्गावरून जात असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या व‌िजेच्या खांबावर त्यांची दुचाकी जोरात आदळली. अपघातानंतर दोघेही बाजूला फेकले गेले. नागरिकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बसचालकाला मारहाण

एकलहरा येथे रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी बसचालकाला मारहाण केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बसचालक अशोक निवृत्ती कागदे (पाथरी आगार, सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा - रविवारी सायंकाळी कागदे हे एसटी बसमध्ये प्रवासी घेऊन नाशिकरोडहून एकलहरामार्गे जात असताना एकलहरा कॉलनी गेटजवळ संशयीत रिक्षाचालक (एम. एच. १५, वाय ०५८९) भास्कर कचरू भंडारे व त्याच्या दोन साथीदारांनी बस थांबवली. तुम्ही रोज आमच्या रिक्षाला पाहून बस जोरात चालवतात, अशी कुरापत काढून कागदे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.



युवतीचे अपहरण

अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमीष दाखवून अपहरण केल्याची घटना जेलरोड येथे घडली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड येथील युवतीच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सूरज रणजीत गांगुर्डे याने त्यांच्या नातीला लग्नाचे आमीष दाखवून अपहरण केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम केदार तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेळेत वसुली एलबीटीच्या मुळावर

$
0
0

सरकारचे दरमहा पाच कोटींचे अनुदान बंद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट जानेवारीत पूर्ण केले असले तरी, वसुलीचे चांगले कामच आता महापालिकेच्या मुळावर आले आहे. पालिकेने जानेवारीत ७५१ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने महापालिकेने आता दरमहा मिळणारे पाच कोटींचे अनुदानही बंद केले आहे. त्यामुळे सरकारकडून आता पुढील दोन महिने दमडीही मिळणार नाही. उलट वाढीव दिलेले अनुदान कपातीची शक्यता आहे. सरकारकडून एप्रिलमध्ये मिळणाऱ्या अनुदानातही कपातीचा धोका असल्याने पालिकेला पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने महापालिकेला एलबीटीचे ७५१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. महापालिकेने हे उद्दिष्ट जानेवारीतच पूर्ण केले आहे. महापालिकेला एप्र‌िल ते जुलै २०१५ दरम्यान एलबीटीचे २५८ कोटी रुपये मिळाले आहेत. ऑगस्टमध्ये एलबीटीच्या धोरणात बदल झाला. त्यात सरकारने ५० कोटींच्या आतील उत्पन्नावरील एलबीटी माफ केले.व्यापा-यांच्या या अनुदानाची भरपाई म्हणून सरकारने दरमहा ४५ कोटी ८६ लाखांचे अनुदान दिले. डिसेंबरपर्यंत या अनुदानापोटी महापालिकेला २३४ कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण करणार असल्याची शक्यता गृहीत धरून सरकारने दरमहा अनुदान ४५ कोटी ८६ लाखांवरून पाच कोटींवर आणले होते. ५० कोटींवरील एलबीटी वसुली २२८ कोटींवर गेली आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत एलबीटी वसुली ही ७५२ कोटींवर गेली आहे.

सरकारने ठरवून दिलेले उद्दिष्ट जानेवारीतच पूर्ण झाले आहे. त्यामुळे जानेवारीपासून सुरू असलेले दरमहा पाच कोटींचे अनुदान आता बंद झाले आहे. त्यामुळे पालिकेला आता सरकारकडून एक दमडीही मिळणार नाही. याउलट फेब्रुवारी व मार्चमध्ये होणारी ८० ते ९० कोटींची जादाची वसुली सरकार पुन्हा महापालिकेकडे मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका पुन्हा आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. आता दोन महिने एलबीटी अनुदान बंद झाल्याने पालिकेच्या विकासकामांवर त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.



एप्रिलपासून कपातीची शक्यता?

फेब्रुवारी व मार्चमध्ये एलबीटीपोटी पालिकेची जास्त झालेली वसुली ही राज्यसरकार परत मागू शकते. ही वसुली पालिकेकडे न मागता थेट एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या अनुदानातून कपात होवू शकते. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षापासून पालिकेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्याचा थेट फटका विकास कामांवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोईंग व्हॅनची आवारातच ‘पूजा’

$
0
0


कर्मचाऱ्यांअभावी बेशिस्त वाहने उचलणे रखडले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने हटवण्यासाठी पोलिस विभागाने नियुक्त केलेल्या तीन टोईंग व्हॅनवर कर्मचारी नसल्याने आज, मंगळवारपासून वाहने हटवण्याच्या कारवाईला सुरुवात होऊ शकली नाही. दुसरीकडे पुरेशा प्रमाणात पार्किंगसाठी जागा उपलब्ध असायला हवी, असे मत वाहनचालक व्यक्त करीत असून टोईंग व्हॅनची कारवाई कितपत यशस्वी ठरेल, याविषयी शंका उपस्थित केली जाते आहे.

रस्त्यावर अथवा पार्किंग क्षेत्र सोडून पार्क करण्यात आलेली वाहने हटवण्यासाठी शहर वाहतूक विभागाने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली मंगळवारपासून हे काम सुरू होणार होते. प्रत्यक्षात वाहनांवर कामे करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहनांची पूजा करून ती कार्यालयाच्या आवारातच उभी ठेवण्यात आली. बुधवारी ही समस्या दूर होणार असून त्यानंतर लागलीच काम सुरू होईल, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले. टोईंग व्हॅनवर वाहतूक पोलिस तसेच एजन्सीचे कर्मचारी तैनात राहणार असून, मोटार वाहन कायद्यानुसार पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून १०० रुपये, तर वाहनाच्या आकारमानानुसार वाहन उचलण्याचे वेगळे शुल्क आकरण्यात येणार आहे.

असे असेल शुल्क

दुचाकीसाठी १७०, तीनचाकी वाहने (सर्व प्रकारची) ३०० रुपये, हलकी वाहने (कार/जीप) यांच्यासाठी ३५० रुपये, तर मध्यम वाहनांसाठी (टेम्पो/मॅटेडोअर) हे शुल्क ४५० रुपये इतके आहे.

पार्किंगला जागा द्या

दरम्यान, शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच, पार्किंगच्या जागांवर झालेले अतिक्रमण आणि महापालिकेकडून त्यांना मिळणारे अभय, यामुळे पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याचा आरोप वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेने आधी पार्किंगसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतर वाहने उचलण्याची कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.



शहरात झपाट्याने बांधकामे वाढत आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमुळे पार्किंग करता येत नाही. महापालिकेने काही जागा या फक्त पार्किंगसाठी राखून ठेवाव्यात. महापालिकेने रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण कमी करण्यावर भर द्यावा. तसेच पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

- अभिषेक टोपे, वाहनचालक



शहरात अनेक ठिकाणी वाहने चुकीच्या ठिकाणी पार्क होतात. त्यामुळे सर्वांनाच त्रास होतो. ज्या प्रमुख रस्त्यांवर वाहने पार्क केली जातात, त्या रस्त्यालगत असलेल्या काही छोट्या लिंकरोडवर पार्किंगसाठी जागा घोषीत करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे शहरात गर्दीच्या ठिकाणी पार्किंगसाठी स्लॉट बनविण्यात यावे.

- रूपेश घोलप, वाहनचालक



वाढती लोकसंख्या, वाढते कन्स्ट्रक्शन बघता आता रस्तेदेखील अपुरे पडत आहेत. नाशिक महानगरपालिकेने गर्दी होत असलेल्या ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखी सम-विषम पार्किंग पद्धती लागू करावी. ही पद्धत नाशिककरांनी पाळणेही महत्वाचे आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करावे, तसेच रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवावे.

- मनोज बिरारी, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पापक्षालनासाठी विधवेला अग्न‌िपरीक्षेचा जाच

$
0
0

कंजारभाट जातपंचायतीचा खळबळजनक फतवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीच्या मृत्यूनंतर विधवेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार सासर असलेल्या कंजारभाट समाजातील ही महिला सध्या ओझर येथे माहेरी राहत असून, तेथेही तिला जातपंचायत समिती रात्री-अपरात्री त्रास देत असल्याने तिने मदतीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात महिलेने म्हटले आहे की, २१ जून २०१३ रोजी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती नंदुरबारमध्येच पतीचे छोटेसे किराणा दुकान चालवून आपल्या दोन मुलांचे पालनपोषण करू लागली. यावेळी तिच्या विवाहीत मावस दिराने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लग्नाची मागणीही घातली. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर त्याने तिच्या सासू आणि दिराकडे तिच्या चारित्र्याविषयी खोटे आरोप केले. या महिलेच्या मोठ्या दिराने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर मावस दिराने तिच्याशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. तिने याबाबत नंदुरबारमधील पोलिस स्टेशनमध्ये मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दिली. घडला प्रकार तिने माहेरकडील मंडळीना कळविला. ते नंदुरबारमध्ये पोहोचले. मात्र तेथील जात पंचायतीने हे प्रकरण पोलिसांऐवजी जात पंचायतीत सोडविण्याचा निर्णय घेतला. या विधवा महिलेचे बाजूच्याच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप सासरकडील मंडळींनी या जातपंचायतींमध्ये केला. या महिलेने आणि त्या तरुणानेही हा आरोप खोटा असल्याचे सांगितले. दोन ते तीनवेळा जातपंचायत बसवूनही या महिलेला येथे न्याय मिळत नव्हता. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला नंदुरबारमध्येच राहू देण्याची विनंती सासरकडील लोकांना केली. मात्र ती कलंकीत असल्याने तिला घरात ठेवण्यास सासू आणि दिराने नकार दिला. यावरून पुन्हा वाद झाल्याने तिने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनीही तिला पोलिस स्टेशनमधून बाहेर काढले. ती माहेरी आली. सिडकोतील महिला मंडळाकडे केस दाखल केली. मंडळाने सासरकडील मंडळींना बोलावून तिला पुन्हा सासरी घेऊन जाण्यास सांगितले. सासरी तिला पुन्हा मारहाण होऊ लागली. तिच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली जाऊ लागल्याने ती पुन्हा मुलांसमवेत माहेरी आली.

ही महिला आता ओझर येथे आई-वडिलांसमवेत राहते. तेथेही जातपंचायतीचे लोक येऊन तिला त्रास देत आहेत. संबंध‌ित तरुणाने गुन्हा मान्य केला असून, त्याने जातपंचायतीकडे दंड भरला आहे. तू कलंकीत असल्याचे सिध्द झाले असून, शिक्षा भोगण्यास तयार रहा, अन्यथा तुला आणि तुझ्या आई-वडिलांना समाजातून बहिष्कृत करू. तुझा सासरकडील घर आणि दुकानावर काहीही अधिकार राहू देणार नाही, असे धमकावले जात आहे. नंदुरबार पोलिसांनी जातपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांकडून केवळ प्रतिज्ञापत्रे घेतली आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने ओझर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

चिमुकल्यांनाही अघोरी शिक्षा!

संबंध‌ित महिला दोषी आहे किंवा नाही, हे ठरविण्यासाठी तिच्या मुलाला अग्निपरीक्षा द्यावी लागेल, असे जातपंचायत समितीने तिला सांगितले आहे. शेणाच्या तीनशे गौऱ्यांमध्ये तीन किलोची कुऱ्हाड लाल होईपर्यंत सात दिवस तापविली जाते. सकाळी सातच्या सुमारास मुलाच्या हातावर पाच रूईची पाने ठेवून ती कच्च्या दोऱ्याने बांधली जातात. त्यावर ती कुऱ्हाड ठेवून त्याला सात पाऊले चालण्यास सांगितले जाते. मुलाचे हात भाजले तर संबंध‌ित महिलेवर लावण्यात आलेले आरोप खरे असल्याचे सिध्द होते. हाताला फोड आले नाहीत अथवा ते भाजले नाहीत तर आरोप खोटा असल्याचे सिध्द झाल्याचे मानले जाते. ही महिला दोषी आढळली तर तिला पूर्ण नग्न केले जाते. त्यानंतर तिच्या शरीरावर सव्वा मीटर अत्यंत पातळ आणि पारदर्शक कपडा टाकला जातो. एकाबाजूला गव्हाच्या पिठाचे अर्धा-अर्धा किलोचे नऊ गोळे, तर दुसरीकडे रूईच्या झाडाचे लाकूडही आगीत तापवितात. संबंधित महिलेला एकशे सात पावलांत सात चक्कर मारण्यास सांगितले जाते. सोबत दोन महिला असतात. त्यापैकी एक तिला रूईच्या लाकडाने मारते. तर दुसरी गरम पिठाचे गोळे मारून फेकते. अशा पध्दतीने पापक्षालन होत असल्याचा जातपंचायतीचा समज आहे.

...कोट...

जात पंचायत कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरात लवकर त्यावर कायदा तयार होणे गरजेचे आहे. जातपंचायतीबाबत ठोस कायदा नसला, तरी पैसे मागितल्यास खंडणीचा, अघोरी शिक्षेबाबत काळ्या जादूबाबतच्या कायद्याचा आधार घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.

-कृष्णा चांदगुडे, कार्याध्यक्ष अंधश्रध्दा निर्मूलन समिती, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानेच

$
0
0

रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण, वीज सवलतीसंदर्भात निर्णय अद्याप नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळांवरील कारवाईशी भाजपचा आणि राज्यसरकारचा कोणताही संबंध नाही. हायकोर्टाच्या आदेशानेच सध्याची कारवाई सुरू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने नाही. भुजबळ कुटुंबिय तपासात सहकार्य करत नसल्यानेच अटकेची कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला. राज्यसकार विषयी नाशिककरांच्या मनात असंतोष असून नाशिककरांवर कोणताही अन्याय होवू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्याला वीजदरात सवलत देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले.

नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून भाजपच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी भुजबळ कुटुंबियांवर राज्यसरकार सूडबुद्धीने कारवाई करत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. भाजप विरोधी पक्षात असतानाच भुजबळांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. भुजबळ, अज‌ित पवार, सुनील तटकरे यांच्या विरोधात तक्रारी आहेत. खासदार किरीट सोमय्या यांनीही लेखी तक्रारी केल्या आहेत. काही संघटना हायकोर्टात गेल्या आहेत. त्यानुसारच ही चौकशीची कारवाई सुरू आहे. सहकार्य करत नसतील कारवाई करा, असे आदेश हायकोर्टानेच दिले आहेत. त्यानुसार ईडीची कारवाई सुरू असून, त्याच्याशी भाजप अथवा सरकारचा संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.

समीर भुजबळ चौकशीत सहकार्य करीत नसल्यानेच त्यांना अटक झाल्याचे सांगत, तपास करणारी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगून हात झटकले आहेत. मराठवाडा आणि विदर्भाला वीजदरांत सवलत देण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले. काहींच्या पोटात भितीचा गोळा उठल्याने याविषयी अफवा पसरविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. आदिवासी विभागात काही गोंधळ असेल, तर त्याची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यात महापालिकेची ताकद वाढली असून, पुढील वर्षभरात राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष होणार असल्याचा दावा त्यांनी केला.



नाशिकवर अन्याय नाही

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनासंदर्भात अजून शेवटचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगून तसा सरकारचा विचारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठापाठोपाठ वनसंरक्षक कार्यालय, नाशिकचे पाणी पळविल्याने नाशिककरांमध्ये सरकार विषयी असंतोष असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. परंतु संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून काही चुकीचे झाले असेल, तर त्याची चौकशी करू असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिकसंदर्भातील प्रकरणांमध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून, नाशिकवर अन्याय होवू देणार नाही, असा दिलासाही त्यांनी दिला.

आमदारांना नियम लागू नाही

आमदारांना शहराध्यक्षपद देण्याच्या निर्णयावर बोलताना, दानवे यांनी भाजपातील 'एक व्यक्ती-एक पद' ही पध्दत आमदारांना लागू नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. मंत्री असला तरच राजीनामा द्यावा लागतो, असे सांगत 'एक व्यक्ती-दोन पदांचे' त्यांनी समर्थन केले आहे. भाजपने अनेक ठिकाणी स्थानिक आमदारांनाच शहराध्यक्षपद दिले आहे. संबंध‌ित ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी एकमत केल्यानंतर शहराध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सायकललाही वेटिंग लिस्ट !

$
0
0

Fanindra.Mandlik@timesgroup.com
नाशिक : नाशिकमध्ये सायकल चळवळीने जोर धरला असून, अनेक सायकल विक्रेत्यांकडे ठराविक ब्रँडच्या सायकल खरेदीसाठी वेटिंग लिस्ट आहे. सायकलला मागणी वाढल्याने व उत्पादन कमी होत असल्याने सर्वच ठिकाणी सायकल खरेदीची अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

पूर्वी प्रत्येकाच्या घरात एक तरी सायकल असायची. क्वचितच एखाद्याच्या घरात गाडी असणे म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानले जायचे. ठराविक पैसे आगाऊ भरल्यानंतर विक्रेत्याकडे गाडीसाठी नंबर लागायचा. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गाडी मिळायची. त्यातल्या त्यात बुलेट वगैरे गांड्यांना तर सहा सहा महिने वेटींग असे. घरात गाडी आली की संपूर्ण गल्लीतील लोकांना पेढे वाटले जायचे. काळ बदलला तशी काळाची चक्रेही उलटी फिरु लागली. ज्या घरात सायकल गर‌बिीचं लक्षण मानले जायचे. त्याच घरात आज सायकल श्रीमंतीचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.

पर्यावरणाचे रक्षण व्हावे व शारीरिक तंदुरुस्ती रहावी, यासाठी घरटी एक माणूस सायकलचा वापर करू लागला आहे. त्यामुळे सायकलींना सुगीचे दिवस आले आहेत. त्या तुलनेत सायकलची दुकाने देखील वाढत आहेत. सामान्य सायकल सोडून जायंन्ट कंपनींच्या सायकलचा सध्या तुटवडा आहे. या सायकलच्या खरेदीसाठी नंबर लावावे लागत आहेत. तसेच स्कॉट कंपनीच्या सायकलबाबतही तशीच परिस्थ‌तिी आहे. रोम टु डी एक्स, रोम-१, रोम -३ या सायकल्सला सध्या चांगली मागणी आहे. २१ गियरच्या फॉन्टमलाही आगाऊ रक्कम भरून नंबर लावावा लागत आहे. जे सायकलिस्ट नियम‌ति सायकलचा सराव करतात, त्याच्यांमध्ये या सायकल खरेदी करण्याचा कल वाढतो आहे. नाशिकमध्ये २५ हजारापासून ते साडेअकरा लाखापर्यंत सायकली उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त किंमतीच्या सायकल खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

अनेक कंपन्यांच्या सायकलसाठी ग्राहकांची मागणी वाढत आहे; मात्र कंपन्यामध्ये उत्पादन पुरेसे नसल्याने वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे.

किशोर काळे, सायकल विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images