म. टा. प्रतिनिधी, नाशिक शिक्षण आणि समाजाच्या प्रवाहापासून तुटलेल्या मनुष्यबळातील हुन्नर शोधून ते कसब विकसित करण्यारी एमजीआयआर ही संस्था नाशिकच्या कैद्यांसाठी पुढाकार घेणार आहे. संस्थेचे संचालक पी. बी. काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे आयोजित 'स्मार्ट व्हीलेज' कार्यशाळेत काळे यांनी सहभाग घेत ग्रामविकासाविषयी मंथन केले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. काळे म्हणाले, अनेक वर्षांपासून वर्ध्याच्या एमजीआयआर (महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था, वर्धा) या संस्थेचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात बिकट परिस्थितीशी झगडणाऱ्या अतिसामान्य ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्या लोकांच्या प्रशिक्षणासोबतच त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ या संस्थेच्या माध्यमातू देण्यात येते. सामान्यत: रोज हाता तोंडाशी गाठ पडेल इतके उत्पन्न असणाऱ्या नागरिकांचा जीवनस्तर उंचाविण्यात ही संस्था यशस्वी ठरते आहे. मात्र देशात छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासारखी राज्य या संस्थेच्या उपक्रमांचा विशेष फायदा घेत असले तरीही महाराष्ट्रच या बाबतीत उदासीन असल्याची खंतही यावेळी काळे यांनी केली.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून उपयुक्त प्रशिक्षण देऊन उत्पादकता आणि त्यांचे वैयक्तीक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी काळे यांनी दिली. देशभरात
संस्थेच्या विविध प्रयोगांबद्दलही त्यांनी माहिती दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट