Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक सायकलिस्टतर्फे वूमन्स सायकल रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक सिटी पोलिस, ग्रॅव्हिटी जीम आणि एस. एस. के सॉलिटेअर यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने' 'सेलिब्रेटिंग वूमन' या थीम अंतर्गत महिलांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नाशिकच्या महिला पोलिसांसोबतच समाजातील सर्व स्तरांवरील डॉक्टर्स, वकील, विद्यार्थिनी अशा दोनशेहून अधिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

महिलांप्रती आदरभाव व्यक्त करणे आणि महिला दिवस शहरातील सर्व महिलांसोबत अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे या वूमन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात गोल्फ क्लब मैदानातून महिला पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सायकलपटू डॉ. महाजन बंधू यांच्या मातोश्री देविका महाजन, ऑलम्पिक शुटिंग कोच मोनाली गोऱ्हे, नॅशनल शुटर श्रद्धा नलामवर, मिस इंटरनॅशनल नमिता कोहक यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. गोल्फ क्लब ग्राउंड मार्गे टिळकवाडी, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, सायकल सर्कल, त्र्यंबकरोड, मायको सर्कल मार्गे, चांडक सर्कल, एस. एस. के सॉलिटेअर (तिडके कॉलनी) पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी, एस. एस. के सॉलिटेअरचे शैलेश कुटे, ग्रॅव्हिटी जीमचे प्रमोद परशराम पुरिया, गोपाल जाधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी, योगेश शिंदे, श्रीकांत जोशी, सोफिया कपाडिया, मनीषा रौंदळ, मनीषा भामरे, नीता नारंग, स्नेहल देव, अनघा जोशी, मनीषा इंगळे, प्रतिभा आहेर यांसह आदी नाशिक सायकलिस्टचे सदस्य उपस्थित होते.

थिरकण्याचा लुटला आनंद रॅलीनंतर एस. एस. के सॉलिटेअर येथे महिलांनी डी. जे च्या तालावर थिरकण्याचा आनंद लुटला. तसेच, महिला दिनानिमित्त सायकलवर महिलांप्रती संदेश देणाऱ्या फ्लायकार्डची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम प्रतिभा चौधरी, द्वितीय डॉ.श्वेता भिडे, तृतीय राखी पारेख यांना ग्रॅव्हिटी जीमतर्फे बक्षिसे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महिलांच्या सुरक्षेसाठी कटीबध्द’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला तसेच मुलींना टवाळखोरांचा उपद्रव सहन करावा लागत असेल, तर त्यांनी निसंकोचपणे त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. महिलांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असून, टवाळखोर आणि रोडरोमियोंची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सोमवारी दिली.

सावतानगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवशंकर चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बर्डेकर यांच्या हस्ते दुपारी ओंकारेश्वराची आरती झाली. उपद्रवी प्रवृत्तींची माहिती तत्काळ पोलिसांना द्या, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी पहाटे साडेपाचला रूद्राक्ष पूजा झाली. नऊला नगरसेवक सुधारक बडगुजर यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी सामाजिक कार्यकर्ते दप्तरे यांच्या हस्ते ओंकारेश्वराला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर भाविकांना खिचडीचे वाटप केले.

महादेवाची गायली म‌हिमा सायंकाळी विविध भक्तिगीतांमधून महादेवाची महिमा गाण्यात आल्याने वातावरण भारावून गेले. परिसरातील स्वानंदी महिला भजनी मंडळाच्या पुष्पा धोंडगे, त्रिशाला चवळे, यशोदा चवळे, गीता सोनवणे, मीरा इंगळे, प्रतिभा साळुंके, मंदाकिनी केल्ले आदींनी सुमधूर गीते सादर केली. भोळा महादेव माझा, बेल डवना, रास रचो है, कैलास के निवासी, परण्या सोड अवघे, शिवजी भोला यांसारख्या गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर अंडरपास खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला इंदिरानगर अंडरपास सुरू करण्याचा निर्णय अखेर पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. हा अंडरपास बंद असल्याचा सर्वच स्तरातून निषेध सुरू होता. वाढत्या जनरेट्यापुढे अखेर पोलिस प्रशासन नमले असून, मंगळवारी (दि. ८) मार्च रोजी रात्री दहापासून हा अंडरपास खुला होणार आहे.

मुंबई नाक्याहून राणेनगरकडे जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर गोविंदनगर जवळ अंडरपास आहे. सिटी सेंटर मॉल, तिडके कॉलनीतून इंदिरानगर, वडाळागाव, नाशिकरोडकडे तर नाशिकरोडहून सिडको, सातपूर, त्र्यंबकेश्वरकडे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा रस्ता जवळचा मार्ग ठरत होता. मात्र, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि लहान मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. १२ जुलै २०१५ पासून येथे एकतर्फी वाहतुक सुरू होती. परिणामी नागरिकांना तब्बल एक किलोमीटरचा वळसा घालून जाणे भाग पडू लागले. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सर्वपक्षीय आंदोलने झाली. आमदार देवयानी फरांदे, आम आदमी पक्ष, मनसे आणि अन्य पक्षांकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आला. तरीही अंडरपास बंदच ठेवण्याच्या निर्णयावर पोलिस प्रशासन ठाम राहिले. अंडरपासची रूंदी वाढविल्यानंतरच तो सुरू करता येईल, अशी भूमिका पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, हा तोडगा खर्चिक आणि व्यवहार्यतेच्या कसोटीवर टिकला नाही.अखेर राजकीय पक्षांचा दबाव आणि जनरेट्याचा सन्मान करून पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी अंडरपास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक स्तरावर १५ दिवसांसाठी हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.


आढावा घेऊन घेणार कायमचा निर्णय

मंगळवार (दि. ८ मार्च) महिला दिनी रात्री दहापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १५ दिवसांत येथील वाहतुकीच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा निर्णय कायम करायचा की नाही याबाबतची सुधारीत अधिसूचना काढण्यात येईल, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले आहे. या बदलाबाबत कुणाच्या हरकती, सूचना असतील तर त्या पोलिसांकडे लेखी किंवा इमेलद्वारे करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमने वाचविले दोघांचे प्राण

$
0
0

निफाडमधील टाकळी परिसरात बिबट्याचा तिघांवर प्राणघातक हल्ला

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगावपासून जवळच असणाऱ्या टाकळी (विंचूर) परिसरात द्राक्षबागेत धबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. वस्तीवरील शेतकऱ्याच्या मुलाने धाडस दाखवत बिकट प्रसंगाला सामोरे जात बिबट्यावर प्रतिहल्ला करून पिता आणि पुतण्याला वाचवले. बिबट्याला घरात कोंडले. या दरम्यान बिबट्याने तीन लोकांना जखमी केले. पाच तासाच्या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

मंगळवारी सकाळी ही घटना घडली. बाळू सुरासे हे आपल्या द्राक्षबागेत काम करीत होते. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघांची झटापट झाली. बिबट्याने बाळू यांच्या पोटावर पंजाने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जवळच असलेल्या शांताराम सुरासे यांच्या वस्तीवर लपण्यासाठी घराच्या पाठीमागील भागाने दाखल झाला. घराबाहेर बसलेले पुंजाबा सुरासे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर देवीदास सुरासे यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. शेजारी राहणारा मुलगा विक्रम ही घटना पाहून धावून आला. त्याने वडील व पुतण्याला घरात ओढून नेत असतानाच बिबट्यानेही घरात प्रवेश केला. विक्रमची त्यावेळी तारांबळ उडाली. त्याने जवळ पडलेली बादली हातात घेऊन बिबट्याला मारले. बिबट्याला मारताच तो मागे सरकला. विक्रमने जखमी वडील व पुतण्याला घराबाहेर काढण्यात यश मिळवून घराचे दार बंद केले. यामुळे बिबट्या घरात जेरबंद झाला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बंद खोलीच्या दरवाजाबाहेर पिंजरा लावला. पण, हा बिबट्या जेरबंद होण्यासाठी तब्बल पाच तास लागले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या बिबट्याला बेशुध्द करण्याचा प्रयोगही केला. मात्र, अडगळीमुळे तो अयशस्वी झाला. फटाकेही वाजवून पाहिले. मिरचीचा धूर करून प्रयत्न केला. मात्र, तोही अयशस्वी झाला. शेवटी पाठीमागील बाजूने भिंतीला खड्डे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी झालेल्या आवाजामुळे या बिबट्या पळाल्याने पिंजऱ्यात अडकला. यासाठी चार तासाहून अधिक कसरत करावी लागली. बिबट्याला पकडल्यानंतर नाशिकला रवाना करण्यात आले.

विक्रमच्या धाडसाचे कौतुक

समोर बिबट्या चवताळलेला असतानाही विक्रमने अतिशय धाडसाने त्याला घरात कोंडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत निफाड तालुक्यात तीन बिबट्याना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सातत्याने या भागात बिबट्यांचा संचार दिसून येत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर राष्ट्रवादीचे १७ नवे उपाध्यक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसापांसून रखडलेली नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जम्बो शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी मंगळवारी जाहीर केली. जम्बो कार्यकारिणीत ६८ जणांचा समावेश करण्यात आला असून, तब्बल १७ उपाध्यक्ष, ७ सरचिटणीसपदांचा समावेश आहे. छबु नागरे यांचे कार्याध्यक्षपदावर समाधान करण्यात आले असून, माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांना कायम निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.

पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसमवेत नवीन व जुन्या चेहऱ्यांना तसेच महिलांना संधी देण्यात आली आहे. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काही कार्यक्षम कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समवेश करण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच नवनिर्वाचित सदस्यांनी जोमाने कामास लागून पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले. नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी व प्रदेश प्रतिनिधी यांचा कायम नियंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणी कार्याध्यक्ष - छबू दगडूजी नागरे

उपाध्यक्ष - निवृत्ती विठोबा अरिंगळे, अनिल रखमाजी चौघुले, अशोक मोगल पाटील, रामू किसन जाधव, पद्माकर पाटील, मधुकर विठ्ठल मौले, बाळासाहेब आनंदराव पाटील, वसंतराव खंडेराव मुळाणे, यादवराव गुलाबराव पाटील, शब्बीर भाई मर्चंट, भगवान सुकदेव दोंदे, सुरेश गायकवाड, शाम चाफळकर, मधुबाला भोरे, संजय डी. चव्हाण, विनोद उल्हास देशमुख, शेख जाहिद अल्लाव्द्दिन, संजय नंदू खैरनार

खजिनदार - दिलीप जगन्नाथ खैरे

सरचिटणीस - शेख रशीद चांद, मनोहर यशवंत बोराडे, महेश देवबा भामरे, संजय माधवराव पाटील, विनायक अशोकराव गोवर्धने, शंकरराव निवृत्ती पिंगळे,

चिटणीस - मधुकर जाधव, चित्रा जगन्नाथ तांदळे, ज्ञानेश्वर पवार, सतीश आमले, संदिप शिंदे, दिपा अमोल कमोद, मकरंद यशवंत सोमवंशी, देवेंद्र किशोर काळे, योगेश वसंत दिवे, अॅड. संजय मुरलीधर वझरे, प्रकाश पवार.

संघटक - संतोष हरिभाऊ कमोद, बाळासाहेब ज्ञानेश्वर गिते, शंकरराव कोंडाजी मोकळ, अनिल परदेशी, शेख नदीम फकीर मोहम्मद, रंजना गांगुर्डे, योगेश कपिले, कुंदा सहाणे,

कायम निमंत्रित सदस्य : नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, प्रकाश मते, मुख्तार शेख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहासाठी लपवला पहिला विवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणानिमित्त कॅनडा येथे गेलेल्या तरुणाने तिकडेच विवाह केला. भारतात परतल्यानंतर या विवाहाची माहिती दडवून ठेवत सदर मुलाने भारतीय मुलीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली अंजने या विवाहितेने तक्रार दिली आहे. गंगापूररोड भागातच माहेर असलेल्या रूपालीचा प्रेमविवाह १३ एप्रिल २०१४ रोजी गंगापूररोडवरीलच स्वामी समर्थ केंद्राजवळील उदयनगर येथे राहणाऱ्या दीपक अंजने या युवकाशी झाला. उच्च शिक्षित असलेल्या दीपक अंजनेने लग्नानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या रूपालीने काही व्यवसाय सुरू करून घरखर्चास मदत केली. काही महिने संसार सुखात सुरू असताना नोव्हेंबर २०१५ मध्ये रूपालीच्या हाती एक फाईल सापडली. कॅनडातील स्थानिक कोर्टामार्फत एका वकिलाने ही नोटीस पाठवली होती. नोटिसीतील माहिती वाचून रूपालीला धक्काच बसला. त्यात, दीपकचा कॅनडातील जेना लिंडसे एलिझाबेथ ब्रॅडली या महिलेशी विवाह झाला असून, तिला निहारीका नावाची मुलगीही असल्याचे समजले. आजमितीस ही निहारीका सात वर्षाची आहे. सन २००५ मध्ये शिक्षणासाठी कॅनडा येथे पोहचलेला दीपक जेनाकडेच राहिला. तिथे विवाह झाल्यानंतर त्यांना अपत्य झाले. मात्र, यानतंर दीपक २००८ मध्ये भारतात निघून आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. रूपालीशी प्रेमविवाह करणाऱ्या दीपकने ही नोटीस तिच्या हातात पडेपर्यंत याबाबत काहीच सांगितले नाही. रूपालीने याबाबत दीपककडे जाब मागितल्यानंतर त्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. सासरे मंगलदास अंजने आणि सासू सरला, दीर विवेक, मधुसुधन आणि चुलत सासू प्रभावती यांनी देखील दीपकला साथ दिल्याचे रूपालीने तक्रारीत नमूद केले आहे. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत टवाळखोरांची महिलेला शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी कारंजावरील पिंपळगाव मर्चंट बँकेच्या महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून वाहनाचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी बँकेच्या महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्या. त्यांनी आपली दुचाकी बँकेसमोर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केली. थोड्यावेळाने तेथीलच एका टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या काही टवाळखोर मुलांनी महिलेच्या वाहनावर ठाण मांडले. दुचाकीच्या आरशाशी खेळत असलेल्या मुलांना हटकले असता त्या मुलांनी अश्लील शिवीगाळ केली. त्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेहाचे केले तुकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील हिवरगाव शिवारात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेहाचे शीर धडावेगळे केलेल्या अवस्थेत, तर पायाचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलेले आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हिवरगाव-सायखेडा मार्गावरील मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ‌स्त्रिच्या (वय अंदाजे २५) मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिला असल्याची माहिती हिवरगावचे पोलिस पाटील पोमनर यांनी दिली. मृतदेहाजवळ ओळख म्हणून कुठलीही वस्तू न सापडल्याने ही महिला कोण आहे याचा तपास करणे पोल‌िसांपुढे मोठे आव्हान आहे.

या घटनेच्या तपासासाठी घटनास्थळी श्वानपथक बोलाविण्यात आले होते. तसेच फॉरेन्सिक लॅब, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, तसेच सीआयडी पथकाला माहिती देण्यात आली असून, ओळख पटव‌िण्यासाठी मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले. श्वान पथकाला माग काढण्यात यश आले नाही. मृतदेह कोणाचा आहे, त्याची ओळख पटविणेही मुश्किल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये साध्वीचा पुन्हा राडा

$
0
0

साध्वीला रोखण्यासाठी महिलांचे कडे

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी साध्वी हरसिध्दगिरी यांनी दुसऱ्या दिवशीही अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी मंदिरासमोरील पेंडालमध्ये उपोषण करण्याचा साध्वीचा प्रयत्नही महिलांनी उधळून लावला. अखेर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या मध्यस्‍थीने साध्वीला गाभाऱ्याच्या दरवाजापासून दर्शन घेण्यास सांगून तसेच, उसाचा रस देऊन साध्वीला उपोषण मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.

भूमाता ब्रिगेडचे आंदोलन महिला दिनास होणार म्हणून येथे पहाटेपासून गावच्या रणरागिणी सज्ज होत्या. साध्वी हरसिध्दगिरी यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी हट्ट धरला. साध्वी हरसिध्दगिरी यांनी मंदिरासमोरील पेंडालमध्ये बस्तान बसविले. आपण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, महिलांनी तेथे बसण्यास मज्जाव केला. तसेच, पोलिसांनीही विनंती केली. मात्र, या साध्वीने नकार दिला. स्थानिक महिलांचा रूद्रावतार पाहून पोलिसांनी या साध्वीस रिक्षात बसवून पोलिस ठाण्यात आणले. तेथे समजावण्याचा प्रयत्न केला. साध्वी ऐकण्यास तयार नव्हती. तेव्हा आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी साध्वीस समजावून सांगितले. तसेच, या साध्वीस मंदिरात नेऊन नेहमी प्रमाणे महिला दर्शन घेतात तसे गाभाऱ्याच्या दरवाजापासून दर्शन घडविले. त्यानंतर उसाचा रस घेवून या साध्वीने उपोषण सोडले.

महिलांचा पहारा

पोलिस यंत्रणा सतर्क होती. काही हातघाईचा प्रसंग नको म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला. सकाळी आठ वाजेच्या दरम्यान काही तासानंतर भूमाता ब्रिगेडला ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरले आणि शहरातील महिला पुन्हा घरोघरी परतल्या. अर्थात केव्हाही प्रवेश होऊ शकतो म्हणून शहरातील काही महिला येथे पहाऱ्यास थांबल्या आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम हेच प्रमाण होऊ शकते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नेता होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माची गरज नसते. कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर लागत नाही. प्रामाणिकपणे केलेले काम हेच प्रमाण आहे. हे कामच तुम्हाला नेता बनवते. त्यामुळे सामान्य माणसाचे ऐका, त्याचे गुलाम बनून रहा, त्याला तुमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्या तुम्हाला काही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केले.

माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कडू बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, पोथी-पुराणांमध्ये फार पैसा खर्च होत आहे. या पैशातील २५ टक्के पैसा अंध-अपंगांसाठी वापरला तर त्यांचे भले होईल व देशात दारिद्र्य राहणार नाही. आपण ज्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांच्या गावांना जा, त्यांचे दर्शन घ्या त्यातून सद्‍बुध्दी मिळेल. अच्छे दिन 'वरून' येत नाहीत, ते खालच्या माणसांनाच आणता आले पाहिजे. असेही आमदार कडू म्हणाले.

यावेळी विनायकदादा पाटील म्हणाले की, माणसे गढूळ होत चालली आहेत, नितळ माणसेच राहिलेली नाही. महाराष्ट्राची कुस भाग्यवान आहे की आमदार बच्च कडू यांच्यासारखी माणसे येथे आहेत. त्यांच्यासारख्या माणसांमुळे समाजात बॅलन्स टिकून आहे.

किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्षम आमदार निवडीमागची भूमिका मिलिंद जहागिरदार यांनी व्यक्त केली. परिचय जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. आर्चिस नेर्लिकर यांनी माधवराव लिमये यांच्याविषयी माहिती दिली. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवर होणार गाडी आपोआप बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिग्नलवर सुरु असलेली गाडी अवघ्या १० सेकंदात अचानक बंद होते आणि केवळ क्लचवर पाय ठेवला तर ती तत्काळ सुरुही होते. महिन्याकाठी कित्येक लिटर आणि शेकडो रुपये वाचविणारी ही संकल्पना आणि उपकरणाची निर्मिती केली आहे नाशिकच्या विराज रानडे या इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याने.

दररोज शहरातील अनेक सिग्नलवर शेकडो वाहने सुरुच राहतात. केवळ सिग्नलच नाही तर अनेकदा किरकोळ कामेही वाहन सुरु ठेवूनच केली जातात. यातून इंधनांचा मोठा अपव्यय होतो. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रदूषणही हाोते. ही बाब देशाच्या अर्थकारणावरही दूरगामी परिणाम करणारी आहे. हे लक्षात घेऊन विराज रानडे या इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याने अनोखी शक्कल लढवीत सिग्नलवर आपोआप गाडी बंद व्हावी असे उपकरण तयार केले आहे. एखाद्या ठिकाणी वाहन १० सेकंद उभे राहिले तर ते वाहन आपोआप बंद होणे आणि केवळ क्लच दाबताच वाहन पुन्हा सुरु होणे या उपकरणामुळे शक्य होत आहे. 'इंटलिजंट अॅडलिंग सिस्टीम' असे या उपकरणाचे नाव असून गेल्या चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांमधून हे उपकरण तयार करण्यात त्यास यश आले आहे. विशेष म्हणजे विराज हा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन (इ अँड टीसी) शाखेचा विद्यार्थी आहे. तरीही त्याने ऑटोमोबाइल आणि इ अँड टीसी या दोन्ही शाखांचा अभ्यास करीत साकारले आहे. यासाठी त्याने काही गॅरेज आणि शोरुम्समध्ये जाऊन अभ्यास केला आहे. अवघ्या ८ ते १० हजार रुपयात हे उपकरण तयार होऊ शकते. हे उपकरण वाहनात लावल्याने वर्षाकाठी देशातील हजारो लिटर इंधन आणि पैसे वाचण्याबरोबरच वायू प्रदूषणालाही यामुळे आळा बसणार आहे. मुबलक प्रमाणावर हे उपकरण तयार केले तर अवघ्या काही हजार रुपयात ते उपलब्ध होऊ शकते, असे विराज सांगतो. मुंबई किंवा पुण्यातील ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या वाहनांना हे उपकरण फायदेशीर आहे. तसेच, १० सेकंदांऐवजी २० किंवा ठराविक सेकंदांचे सेटिंगही या उपकरणात करणे शक्य आहे.

इंधनांचा अपव्यय हा देशाच्या अर्थ आणि पर्यावरणावरही परिणाम करणारा आहे. त्यामुळेच 'इंटलिजंट अॅडलिंग सिस्टीम' हे उपकरण तयार करण्यात मला यश आले आहे. वेगनार या कारमधील चाचणी यशस्वी झाली असून, प्रत्येक वाहनात हे उपकरण बसविणे शक्य आहे.

- विराज रानडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, गाडी चालणार हवेच्या इंजिनावर!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : पृथ्वीला प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून, येणाऱ्या पिढीला तो घातक ठरणार आहे. जगाच्या पाठीवर इंधन साठा अवघा ४० टक्के शिल्लक असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. म्हणुनच काळाची गरज ओळखून नाशिकच्या शैलेश महाजन या तरुणाने हवेवर चालणारे इंजिन तयार करण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे.

फॉसिल इंधनाच्या वापरामुळे हवेत कार्बनडाय ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, नायट्रोजन ऑक्साईड अशा प्रकारचे विषारी वायू मिसळतात. त्यामुळे प्रदूषण होते. याला आळा बसावा म्हणून हवेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावल्याचे शैलेश महाजन यांचे म्हणणे आहे. शैलेशने तयार केलेल्या इंजिनमुळे शून्य टक्के प्रदूषण होणार आहे. पाच वर्षांपूर्वी हवेवर मशिन चालू शकते, असे वाचनात आले होते. त्यानंतर त्याने या संशोधनाला सुरुवात केली. शैलेशने तयार केलेल्या इंजिनात कॉम्प्रेस एअरचा वापर करून एनर्जी प्रॉडक्शन तयार होते.

असे इंजिन अनेक माध्यमांमध्ये वापरू शकतो, याचा वापर गाड्यासाठी होऊ शकतो अथवा ज्या ज्या ठिकाणी इंजिनचा वापर आहे तेथे तेथे कमी अधिक क्षमतेचे इंजिन तयार करता येते. कोणतेही इंजिन सुरू करण्यासाठी बाहेरील एनर्जीचा वापर करावा लागतो. मात्र, शैलेशने बनवलेल्या इंजिनासाठी अशा एनर्जीची गरज नाही. हे इंजिन फोर स्ट्रोकचे असून, दोन स्ट्रोक हे एअर कॉम्प्रेसरचे काम करतील, तर उर्वरित दोन स्ट्रोक इंजिन म्हणून काम करतील.



पेटंटसाठी सरकारकडे अर्ज

इंधन वापरातून सरकारला महसूल मिळतो जर हवेवर चालणारे इंजीन तयार झाले तर सरकारला हजारो कोटींच्या महसुलाला मुकावे लागेल. त्यामुळे हे मशीन सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर एक अॅप तयार करण्यात आले असून, ते रिचार्ज केल्यावरच इंजिन सुरू करता येणार आहे. त्यातून आपोआपच सरकारला महसूल मिळेल. त्यासाठी पीएलसी सिस्टीम (programing logical control) बसवण्यात आली आहे. एअर टँकमध्ये एअर कंट्रोल ठरावीक पातळीपर्यंत स्थिर रहाण्यासाठी टाकीला मीटर असून, हवेची क्षमता जास्त झाल्यास हवा सेफ्टीवॉलद्वारे बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इंजिनाच्या पेटंटसाठी शैलेशने भारत सरकाच्या पेटंट विभागाकडे अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांझरासाठी २५२ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य नदी संवर्धन योजनेतर्गंत पांझरा नदी सुशोभिकरणाच्या २५२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळाला आहे. या प्रस्तावाला नुकतीच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेनेचे नगररसेवक तथा गटनेते संजय गुजराथी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. याअंतर्गत पांझरा नदीवर नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, उद्याने तसेच इतरही सोयी सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी केंद्राकडून ९० तर महापालिकेकडून १० टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहितीही गुजराथी यांनी यावेळी दिली.


राज्य नदी संवर्धन योजनेतंर्गत धुळे महापालिकेतर्फे पांझरा नदी सुधारण्यासाठी निसर्ग कन्सलटन्सी यांच्यामार्फत हा सुशोभिकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यामध्ये धुळे शहराची हद्दवाढ लक्षात घेवून एकूण २५२ कोटी ५७ लाख ७५ हजार २४३ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. याबाबत महापालिकेने सतत पाठपुरावा केल्याने अखेर राज्य सरकारकडून याला मंजुरी मिळाली आहे.


अनुदानातील वाटा


यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी केंद्र शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळणार आहे. तर १० टक्के वाटा हा धुळे मनपाला टाकावा लागणार आहे. या प्रस्तावातंर्गत पांझरा नदीचे १३ किलोमीटरपर्यंत सौंदर्य खुलविण्यात
येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.


याठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी डंपींग ग्राऊंडवर कचऱ्याची प्रक्रिया करून गॅसनिर्मिती यंत्रणा प्रस्तावित आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती गुजराथी यांनी दिली. यावेळी सेनेचे सहसंपर्क नेते रवींद्र मिर्लेकर जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


या सोयी-सुविधा
नदीपात्रात दोन्ही बाजूस जॉगिंग ट्रॅक
दुतर्फा वृक्षलागवड
ट्रॅकवर आकर्षक एलइडी पथदिवे
मुलांसाठी खेळणी, बांबु हाऊस
एमपी थिएटर डॉल्बी सांऊडसह
सुसज्ज जीम गार्डन
खाद्य पदार्थांचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक हरवले, कामे रखडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील वॉर्ड क्रमांक २६ मध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक शेलार हे निवडून आलेत. परंतु त्यांनी उमेदवारीच्यावेळी नागरिकांना दिलेले आश्वासन पाळले नाहीत. उलट आमचे नगरसेवक दीपक शेलार हे हरवले आहेत? असे वॉर्डातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वॉर्डातील विकासकामे रखडली आहेत, असे निवेदन येथील नागरिकांनी धुळे उपायुक्तांना दिले.

धुळ्यातील वॉर्ड क्र. २६ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक शेलार हे गेल्या काही दिवसांपासून वॉर्डात दिसेनासे झाले आहेत. यावरून येथील नागरिकांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ते मीसिंग झाले आहेत. त्यांच्यामुळे वॉर्डातील विकासकामेही रखडली आहेत, असा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेत नुकतेच अनोखे आंदोलन केले. यावेळी वॉर्डातील नागरिकांनी आमचे नगरसेवक दीपक शेलार हरवले आहेत असे सांगून त्यामुळे विकासकामेही रखडली आहेत, अशा घोषणा दिल्यात. याबाबतचे निवेदन त्यांनी धुळे उपायुक्त एच. पी. कौठळकर यांना दिले. या आंदोलनामुळे धुळे महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीची गोची झाली आहे.

यावेळी नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी मनपाच्या निवडणूकीत दीपक शेलार राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात होते. प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत त्यांनी वाॅर्डाच्या विकासाचा मुद्दा हाती घेतला. तसेच परिसरातील मतदारांना विकासाचे आमिष दाखूवन निवडून आलेत. याबाबत वार्डातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन असे आश्वासनही त्याच्याकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात शेलार यांना निवडून दोन वर्ष झाले आहेत. परंतु वॉर्डात कुठल्याही विकासकामांची सुरुवात झालेली नाही असे निवेदनात म्हटले आहे. वॉर्डात लहान मुलांसाठी बगीचा, गटारी, पथदिवे यासह अन्य सुविधा देण्याचे कबूल करून‌ही विजयी झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी देखील विकास झालेला नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही नगरसेवक शेलार तयार नाहीत, असेही यात सांगितले आहे.

आजच्या स्थितीत वॉर्डात ठिकठिकाणी दुरवस्था झालेली आहे. पथदिव्यांची व्यवस्था नाही. डेंग्यूची साथ पसरत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अशावेळी नगरसेवक वॉर्डात लक्ष घालत नाहीच शिवाय ते परिसरातही दिसून येत नाहीत. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने ही पूर्णपणे फोल ठरली आहेत. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी आता मनपा प्रशासनाकडे नगरसेवकांविरूध्द निवेदन दिले आहे. त्यांचा नगरसेवक हरविल्याचा आरोपही त्यांनी यात केला आहे. निवेदन देतांना वॉर्डातील तुषार जैन, राहुल मराठे, स्वप्नील मासाळ, कल्पेश जगताप, मनोज शिंदे, भूषण चौधरी, आनंद शेलार राजेंद्र पाटील उपस्थित होते.



'आमचे नगरसेवक दिसले का?'

या आंदोलनावेळी वॉर्डातील नागरिकांनी व गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आवारात नगरसेवक शेलार यांचे फोटो हातात धरून 'आमचे नगरसेवक कोठे दिसले का?' असा सवाल केला. त्यामुळे आवारातील उपस्थितांची या अनोख्या आंदोलनामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात युवतीच्या हत्येची करा चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनी सायखेडा रोड परिसरात एका अज्ञात युवतीची अमानुषपणे हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील हिवरगाव परिसरात एका युवतीची अमानुषपणे हत्या करून तिच्या शरीराचे विविध अवयव एका पिशवीत भरून रस्त्यालगत टाकण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफा बाजार बेमुदत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पॅनसक्ती व उत्पादन शुल्क विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी आता बेमुदत बंदचा पवित्रा घेतल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सराफा बाजाराचे व्यवहार पूर्णतः थंडावले आहेत. यामुळे या व्यवसायाशी निगडीत असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या आंदोलनात देशभरातील सहा लाखांहून अधिक सराफा विक्रेते, सुवर्णकार सहभागी झाले आहेत. दोन लाख रुपयांवरील दागिने खरेदी-विक्रीकरिता जानेवारीपासून करण्यात आलेली पॅनची सक्ती तसेच अर्थसंकल्पात सूचविण्यात आलेली एक टक्का उत्पादन शुल्काची तरतूद या दोन्ही बाबी मागे घेईपर्यंत, आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० मार्च रोजी पुणे येथे राज्यातील दीड लाख सराफ व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने नव्याने अबकारी करासह इतर जाचक कर व अटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

सोन्यावरील अबकारी करविरोधात सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद बुधवारी सलग आठव्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प आहेत. आंदोलन तीव्र करण्यासाठी गुरुवारी (१० मार्च) पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ४६० सराफा व्यापारी आणि सुमारे ३२५ कारागीर याशिवाय ७० ठोक व्यापारी सहभागी होणार आहेत.

सराफा व सुवर्णकारांच्या बेमुदत बंदचा फटका लगीनगाठ बांधणाऱ्यांना बसू लागला असून, सोन्याने नव्हे तर बेन्टेक्सच्या दागिन्याने नवरी सजविण्याची पाळी आली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सराफा व्यापाऱ्यांचे हे आंदोलन सूरू झाल्याने वर-वधूंच्या पित्यांची मोठी पंचाईत होवू लागली आहे.

२०१२ मध्ये २१ दिवसांचा बंद पाळण्याची पाळी सराफा व सुवर्णकार संघटनेवर आली होती. या बंदमुळे कारागिरांवर उपासमारीची वेळी आली आहे.

- विष्णू सारडा, माजी अध्यक्ष, सराफा व सुवर्णकार संघटना, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरगावमधून टँकरने पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बॅरेजमधून लातूर शहरासाठी टँकरने पाणी भरण्यास बुधवारपासून सुरू करण्यात आले. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थितीत होते. यावेळी कोणाचा विरोध झाला नाही. यावेळी दक्षता म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डोंगरगाव बॅरेजमधील पाणी लातूर शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषीत केले होते. बॅरेजेसच्या निर्मितीच्या वेळी सुद्धा अत्यंत अडचणीच्या काळात लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बॅरेजेस बांधले जात असल्याचे म्हटले आहे. तरी सुध्दा या परिसरातील अकरा गावांना त्यामध्ये पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यांचे आरक्षण कायम ठेऊन लातूर शहराला पाणी पुरवठा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला काही नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी लातूरच्या पाण्याला विरोध करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर बुधवारी स्वत: जिल्हधिकारीच फौजफाट्यासह बॅरेजवर पोहचले आणि टँकर भरून लातूरकडे पाठवणे सुरू केले आहे.
या बाबत महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे म्हणाले, 'दुपारपर्यंत दहा ते बारा टँकर भरुन लातूरकडे रवाना केले आहेत. २२ ते २८ लीटर क्षमतेचे टँकर आहेत. त्यामुळे मुख्य टाकीत हे पाणी साठवले जाईल. पुरेसा साठा झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
बॅरेजवर निलंग्याचे उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, शिरुर अनंतपाळच्या तहसीलदार, पोलिस अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

रेणापूरात रस्ता रोको
भंडारवाडी धरणातून लातूरला पाणीपुरवठा करू नये या मागणीसाठी रेणापूरातील राजकीय सामाजिक संघटनाच्या २२ कार्यकर्त्यांनी पिंपळफाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर केले. भंडारवाडी धरणावर अवलंबून असलेल्या खेड्यांना भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये याची व्यवस्था करुनच पाणी लातूरसाठी द्यावे असे या निवेदनात म्हटले आहे.


डोंगरगावचा पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी आम्ही त्या ठिकाणी सर्व दक्षता घेत आहोत. गावकऱ्यांशी बोलणे झालेले आहे. त्यांचे आरक्षीत पाणी कायम राहणार असल्यामुळे आज कोणी अडवणूक केलेली नाही. रेणापूरच्या शिष्टमंडळानेही भेट घेतली आहे. त्यांच्या हक्काचे पाणी कमी होऊ नये याची काळजी घेण्याची त्यांची मागणी आहे. या बाबत लक्ष घातले आहे.
पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी सात जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
युवतीचे राजस्थानमधील एका युवकाशी लग्न करून दिल्यानंतर तिला राजस्थानला नेण्यापूर्वी तिच्यावर नांदेडमध्ये बलात्कार करणाऱ्या युवकासह सात जणांना नांदेड येथील जिल्हा न्यायाधीश जी. ओ. अग्रवाल यांनी १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सोमवारी (७ मार्च) रोजी पहाटे चारच्या सुमारास शेख गफूर शेख हाफीज (वय २४ रा. आंबेडकरनगर, नांदेड) याने अत्याचार केल्याची माहिती पिडीत युवतीने वसमतनगर रेल्वेस्थानकावर पोलिसांना दिली. त्या पिडीत युवतीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर वसमत पोलिसांनी हे प्रकरण नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले असल्याने त्यांच्याकडे पाठवून दिले. त्यानंतर काल दिवसभर त्या पिडीत युवतीची माहिती जाणून घेतल्यानंतर मंगळवारी रात्री पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नाजिया उर्फ नादीराबी शेख सिद्दीकी (वय २५ रा. बिकानेर ह.मु.विष्णूनगर), लालचंद दिरदुराम जाजरीया ( वय ३६, रा. जुनजूनु), रामनिवास नवरंगराम तोतासरा (वय २३ रा. सिकर), जावेद बाबु सिका (वय ३३, रा. आंबेडकरनगर नांदेड), शेख गफूर शेख हाफीज (वय २४ रा.आंबेडकरनगर नांदेड), गणपत धोंडीबा हैबतकर (वय ५० रा. गोरठा), सुनंदा शिवाजी वाघमारे (वय ४७ रा. उमरी) अशा पाच जणांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी तपास सहायक पोलिस अधीक्षक रोहित मताने यांच्याकडे होता. बुधवारी दुपारी रोहित मताने, आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खारडे, चंद्रकांत पवार, पोलीस कर्मचारी एकनाथ गंगातिरे, मोहन हाके, राठोड, महिला पोलीस बनसोडे आणि गंदेवार यांनी आरोपींना अटक केली.
त्यांना न्यायाधीश अग्रवाल यांच्या समक्ष हजर केले. न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर सहायक पोलीस अधीक्षक मोहित मताने आणि सहायक सरकारी वकील अॅड. लाठकर यांनी पोलिस कोठडी देण्यासाठी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तालुका शिवसेनेचा उपक्रम

$
0
0

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कर्जबाजारीपणातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत गेल्या अकरा वर्षांपासून धुळे तालुका शिवसेना भाऊबीज साजरा करीत आहे. यंदाही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांना दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर २०१४ ते २०१५ या वर्षात तालुक्यातील आत्महत्या केलेल्या २७ शेतकरी कुटूंबातील सदस्यांना भेटी घेवून साडी-चोळीचा आहेर देण्यात आला.

शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश शेतकत्यांनी विषारी औषध प्राशन करून व गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपीटमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही आणि सावकारी व बँकाचे कर्ज फेडणे शक्य नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या कुटूंबियांच्या मनात आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न शिवसेना करीत असल्याचे माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. यामध्ये जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन पाटील, धीरज पाटील, संजय गुजराथी, युवासेनेचे पंकज गोरे, कैलास पाटील, आधार हाके, मनिष जोशी, कमलेश भामरे, राजेंद्र कोतेकर, दिनेश पाटील, शंकर खलाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपक्रमात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्य ात आदिवासींचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एकलव्य आदिवासी युवा संघटना, आदिवासी एकता परिषद व आदिवासी विकास मंचतर्फे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी, मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिंदखेडा ते धुळे या मार्गे मोटारसायकलने काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी ९ वाजता शिंदखेडाहून निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिंदखेडा ते धुळे मार्गातील ठिकठिकाणच्या गावातील आदिवासी बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चेकरांनी दिलेल्या निवेदनात, २१ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासींना संरक्षण दिले असून त्यास विरोध आहे. एकीकडे आदिवासी भुकबळी व कुपोषित असून दुसरीकडे बोगस आदिवासींना योजनेचा लाभ दिला जात आहे. बिगर आदिवासींमार्फत शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी दफनभूमी असायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच शबरी महामंडळापासून धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वंचित ठेवले जात आहे, त्यांना सरकारकडून मदत मिळावी. शंभर रूपये रोजंदारीने मजुरी करणाऱ्या आदिवासींना वीज बिल भरावयास सांगण्यात येते. त्याला आळा बसला पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे. धुळे शहरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची ४० एकर जागा आहे तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी १० एकर जागा मिळत नाही. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही यात केला गेला आहे. या अन्यायाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी संघटनेचे दीपक अहिरे, रोशन गावित, संजय मालचे, गुलाब सोनवणे, श्रीराम मोरे, किशोर ठाकरे तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images