Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरातील घरफोडीचे सत्र थांबता थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे या तीनही घरफोड्या भरदिवसा करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

पहिल्या घटनेत राजेश रामकृष्ण ढमाळे (रा. म्हसरुळ टेक, भद्रकाली) यांच्या बंद घराची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मंगळवारी (दि.१५) दुपारी दोन ते रात्री दहाच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ८३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ आणि शर्ट असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शेख यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत हनुमान रतन देशमाणे (रा. चक्रधर स्वामीनगर, पंचवटी) यांच्या घरी सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी ३९ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

वृध्देचा अपघाती मृत्यू

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला मोटरसायकलने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. नाशिकरोड येथील जेतवन नगर परिसरात हा अपघात झाला. वेणूबाई विठ्ठल पगारे (वय ७०, रा. जेतवन नगर) असे तिचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेत वेणूबाई यांचा मृत्यू झाला. उपनगर पोलिसांनी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

बसवर दगडफेक

रिक्षाला साईड का दिली नाही अशी कुरापत काढून एका रिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ करीत बसची काच फोडली. नाशिकरोड परिसरात हा प्रकार घडला. राजेंद्र हरिश्चंद्र शिंदे हे शहर बस चालवत असताना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमएच १५ ईएन ७१७१ क्रमांकावरील रिक्षाचालकाने त्याची रिक्षा बससमोर आडवी लावली. तसेच रिक्षाला ओव्हरटेक करण्यासाठी जागा का नाही दिली, अशी कुरापत काढून रिक्षाचालकासह त्याच्या दोन साथीदारांना शिवीगाळ केली. रिक्षाचालकाने बसवर दगड मारून काचेचे नुकसान केले. त्यामुळे शिंदे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात सरकारी कामात अडथला आणल्याची फिर्याद दाखल केली आहे.

दागिने लांबविले

रिक्षातून प्रवास करताना सहप्रवाशाने महिलेकडील दागिने आणि रोकड चोरून नेली. इंदिरानगर परिसरात हा प्रकार घडला. सुरेखा सुनील खलानेकर (रा. इंदिरानगर) मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत होत्या. इंदिरानगर ते इंदिरानगर सिग्नल दरम्यान संशयित रिक्षाचालक व सहप्रवाशाने खलानेकर यांचे लक्ष नसताना दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजारांची रोकड चोरली. खलानेकर यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

सचिन गांगुर्डे याच्या पोलिस कोठडीत वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील टकलेनगर परिसरातील शिक्षिकेच्ये खून प्रकरणातील संशयिताच्या कोठडीत कोर्टाने वाढ केली आहे. त्याला शनिवार (दि.१९) पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या खून प्रकरणातील रोकड हस्तगत करण्यात आली असली तरी दागिणे हस्तगत करणे बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.

सचिन रामदास गांगुर्डे (रा.गणेशवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. भारती पाटील या शिक्षिकेचा गुरुवारी (दि. १०) रात्री खून केल्यानंतर मोलकरणीचा जावई गांगुर्डे याला अटक करण्यात आली होती. त्याने सुमारे साडेचार लाख रुपयांची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली.

२४ मोटरसायकलींसह चोरट्याला अटक

म. टा. प्रतिनिधी, सिडको

शहरातील मोटरसायकली चोरणा-या अट्टल चोरास अंबड पोलिसांनी पार्थडी फाटा येथून ताब्यात घेतले आहे. यात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत चोरट्याकडून २४ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांध धिवरे यांनी सांगितले. या चोरट्याने नाशिकरोड, सातपूर, अंबड, गंगापूर तसेच ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरल्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.

अंबड पोलिसांच्या गुन्हे शाखेला पार्थडी फाटा शिवारात गोडसे या मोटरसायकल चोरट्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले व रवींद्र सहारे यांच्या टिमने कारवाई करीत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २४ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. स्पलेंडर, सिबिझेड, होंडा शाईन, पल्सर व अॅक्टिवा या कंपनीची वाहने ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त धिवरे यांनी सांगितले. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या टिमने या कारवाईत सहभाग होता.

कारची चोरी

पंचवटी :हिरावाडी परिसरातील विधाते नगरातील उमा दर्शन अपार्टमेंटमधील रहिवाशी हरिषकुमार बाबुभाई पटेल यांचर ह्युंदाई कंपनीची आय ट्वेंटी (एम.एच.१५,सी.टी.-१५१५) गाडी चोरीला गेली आहे. अजून तपास लागला नाही. पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्नी पालिका आक्रमक

$
0
0

शहरात १७८ मोटारी जप्त, दीड लाख दंड वसूल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीबाणीच्या स्थितीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका आक्रमक झाली असून, नागरिकांच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करण्यासह दंडात्मक कारवाईला वेग दिला आहे. महापालिकेने सहा विभागात आतापर्यंत १७८ मोटारी जप्त केआल्या असून, २९४ नागरिकांकडून एक लाख ५० हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिडको विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने पाणीपट्टी वसुलीवरही भर दिला असून, थकबाकीदारांना ४८ तासांच्या नोटिसा दिल्या आहेत.

शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, काही जणांकडून मोटारी लावून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. तसेच, पाण्याची नासाडीही केली जात आहे. त्यामुळे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरात विभागीय अधिकाऱ्यांनी जवळपास १७८ मोटारी जप्त केल्या आहेत. तर, २९४ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या नागरिकांकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला असून, सिडकोत सर्वाधिक ६३ मोटारी जप्त करण्यासह ८५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नाशिक पश्चिम विभाग कारवाईत सर्वात मागे आहे.

पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टी वसुलीवरही पालिकेने जोर दिला असून, पाणीपट्टी थकबाकीदारांना आता ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. थकबाकीदारांना ४८ तासांच्या आत पैसे भरा अशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. पैसे भरले नाहीत, तर पाणीकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४१ कोटींची पाणीपट्टी वसूल केली होती. चालूवर्षी केवळ ३७ कोटींची वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत हे वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेने धावपळ सुरू केली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ असोसिएशनचा मूक मोर्चा

$
0
0

धुळ्यात व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारने लादलेल्या एक्साईज ड्युटी हटावसाठी १७ मार्चला दिल्लीत रामलीला मैदानावर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धुळे जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे गुरूवारी शहरातून मुक मोर्चा काढण्यात आला.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सराफांच्या बंदला अजूनही सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. जिल्ह्यातील सराफा दुकाने गेली १७ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्यासोबत व्यावसायिकांवरही पडलेला आहे. त्यात सुवर्णकारांना रोजगार मिळत नाही आहे. तसेच ऐन लग्नाच्या मोसमात बंद आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने सोन्यावर लादलेला जाचक ठरणारा एक्साइज ड्युटी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सराफ, सुवर्णकारांचा गेल्या सतरा दिवसांपासून बंद सुरू आहे. हा कायदा सरकार परत घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे वेळावेळी सराफा असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी धुळे जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे गुरूवारी हा मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्च्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चा सराफ बाजारातून निघत महात्मा गांधी पुतळामार्गे, पारोळारोड, मनपामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी अध्यक्ष विक्रम राठोड, जितेंद्र चौवटीया, अजय नाशिककर, दिलीप कुचरिया यांच्यासह शहर व जिल्ह्यातील सराफ, सुवर्णकार, कारागीर सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी ‘थाळीनाद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन थकले आहे. त्यांना विविध भत्त्यांना मुकावे लागत आहे. तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नवापूर चौफुलीपासून थाळीनाद मोर्चा काढला. याविषयी प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचे राज्य संघटनेचे युवराज बैसाणे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रलंबित मागण्यासाठी गुरूवारी सकाळी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नवापूर चौफुलीपासून हा थाळीनाद मोर्चा काढला.



यात अमृत आहार योजना सुरू करण्याबाबत सक्ती थांबविण्यात यावी, अंगणवाडी कर्मचारी यांचे जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मानधन तत्काळ अदा करावे, दोन वर्षांचा थकीत प्रवास भत्ता, बिले देण्यात यावीत यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. तसेच योजनेच्या कामासाठी लागणारे साहित्य, रजिस्टर, अहवाल, शेरेपुस्तक, हजेरीपत्रक विनाविलंब पुरविण्यात यावे. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे एक रकमी पेन्शन योजनेचे प्रस्ताव सरकारकडे तत्काळ पाठविण्यात यावे यांचीही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवैसीचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एमआयएमचे खासदार असदूद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे गुरूवारी त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला नाही. ओवैसी यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन देशबांधवांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे देशात वाद निर्माण होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला गेला.
काही दिवसांपूर्वी खासदार ओवैसी यांनी 'माझ्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरीही आपण 'भारत माता की जय' ही घोषणा देणार नाही', असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावरून हा सर्व वाद उफाळून आला आहे. त्याच्या विरोधात धुळ्यात भारतीय जनता पार्टीतर्फे रईस हिंदुस्थानी यांच्या नेतृत्वाखाली जमनालाल बजाज रोडलगत शहर पोलिस चौकीजवळ असदूद्दीन ओवैसी यांचा पुतळा दहन करण्यात येणार होता.
मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करुन प्रतिकात्मक पुतळा जप्त केला. तरीही कार्यकर्त्यांनी यावेळी ओवैसी यांच्या विरोधात जोदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी हाजी मुनाफ, मतीन खाटीक, मोहमंद हुसेन, निसार अहमद, आरीफ अहमद, शेख शाहबाज, जमील अहमद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपन्यांविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत मोबाइल टॉवर उभारून पालिकेला कर देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधात महापालिकेने आता थेट सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाच्या आदेशाला मोबाइल कंपन्यांनी मिळवलेल्या स्थगितीला आव्हान महापालिकेने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. महापालिकेचे रस्ते वापरता, सर्व सोयी-सुविधा घेता, मग कर का नको असा सवाल महापालिकेने मोबाइल कंपन्यांबाबत सुप्रिम कोर्टात उपस्थित केला आहे.

महापालिकेच्या हद्दीतील ४५० मोबाइल टॉवरपैकी सुमारे तीनशे टॉवर अनधिकृत आहेत. या कंपन्यांनी महापालिकेला कर भरण्यास नकार देत, हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत, संबंधित कंपन्यांना कर भरण्यास सांगितले होते. त्यावर जीटीएल टॉवर कंपनीने सुप्रिम कोर्टात आव्हान देत हाय कोर्टाच्या निर्णयाला एकतर्फी स्थगिती मिळवली होती. टाटा, ट्वेन्टी फोर सेंच्युरी, रिलायन्स या कंपन्यांनी सुप्रिम कोर्टात एकत्र येवून पालिकेचा कर भरण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, आयडीया व व्होडाफोन या कंपन्या नियमित कर भरत आहेत.

उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने या कंपन्यांकडून कर वसुलीला प्राधान्य देताना न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. हायकोर्टाने आदेशाला दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी महापालिकेने केली आहे. उपायुक्त रोहिदास बहिरम, कर निरीक्षक नितीन संगमनेरे यांनी पालिकेच्यावतीने बुधवारी

सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. संबंधित कंपन्या पालिकेच्या सोयी सुविधा घेत असल्याने त्यांना कर लागू होत असल्याचा दावा केला आहे. महापालिका प्रांतिक अधिनियम ४०६ नुसार या कंपन्यांना कर भरणे आवश्यक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सुप्रिम कोर्टाने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतले असून, त्यावर लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.

सात महापालिका सुप्रीम कोर्टात

मोबाइल कंपन्यांकडून कर वसुलीसाठी नाशिकप्रमाणेच, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, अमरावती या महापालिकांसह पाच नगरपालिका व तीन ग्रामपंचायतींनी सुप्रिमकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे या सर्व याचिका एकत्रित करून सुप्रीम कोर्टाकडून एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. निकाल बाजूने लागल्यास पालिकांच्या उत्पन्नात भर पडण्याची शक्यता आहे.

कोट्यवधींच्या करांवर पाणी

महापालिकेची परवानगी न घेता शहरात जवळपास तीनशे टॉवर अनधिकृतपणे उभे आहेत. पालिकेने नोटीस दिल्यानंतर या कंपन्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. गेल्या तीन वर्षांपासून कराचा वाद सुरू आहे. त्यामुळे तीन वर्षात या कंपन्यांकडून पालिकेला एक दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा कर बुडत आहे. तीन वर्षातील ही थकबाकी आता कोट्यवधींवर गेली आहे. पालिकेचे रस्ते, सुविधा वापरूनही कर न भरण्याची मुजोरी या कंपन्यांकडून दाखवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळाला आत्म‘विश्वास’

$
0
0

धनंजय गोवर्धने

पंचवटीतल्या क्रमांक बारा शाळेत शिकत असतांना पाचवी किंवा सहावीच्या वर्गात असेल, तेव्हा आमच्या वर्गात जोशी नावाचा मुलगा होता. एका बाजूला चापून भांग पाडलेला, तरतरीत नाक, मोठे डोळे, बारीक ओठ, नाकाजवळ एक काळा मस, बाजरीच्या दण्याइतका मोठा. हार्फ शर्ट आणि हाफ पॅन्ट. तो आणि त्याचा मोठा भाऊ शिकायला म्हणून खोली भाड्याने घेऊन राहात होते. त्यांची शेती होती. द्राक्षांचा बाग होता. दर आठ दिवसांनी बुधवारी बाजाराला त्याचे वडील यायचे. त्यांच्यासारखेच होते दिसायला. धोतर, सदरा, डोक्यावर टोपी, हातात एक जाड स्टीलचा पट्टा असलेलं घड्याळ, पायात जाड वाहणा, करकर वाजणाऱ्या, चिखलानं माखलेल्या, त्याच्यासोबत शेतीचा वास वावरत असे. एका हातात एक पिशवी, त्या काळातल्या फॅशननुसार शंकरपाळ्याच्या आकाराचं भरतकाम केलेली आणि लाल गुलाबी रिबनची झालर लावलेली पिशवी. सदऱ्याच्या वरच्या खिश्यात एक पेन, जाड डायरी, चष्मा आदी माणसाचा हिशेबी स्वभाव दर्शवणारं.

वडील आले की विश्वास थोडा दबके. तो वडिलांना घाबरत होता. वडील शेतीत कष्ट करुन आपल्याला बाहेरगावी ठेवून शिकवतात याची कळकळ तळमळ त्याच्या बोलण्यात असे. तो खेळायचा कमी पण अभ्यासात जास्त असे. त्याचं इंग्रजी, गणित उत्तम होत. इंग्रजी पाचवीपासून सुरू झालं होतं पण त्यातही त्याला उत्तम गती होती. आणि आमचं घोडं इथचं पेंड खात होतं. 'काळ, काम, वेगाची' गणितं तो मला गणित कळायच्या आत सोडवे. एक इंची पाण्याच्या तांब्याने दहा लिटरची बादली भरण्यात किती वेळ‍ लागेल असली किचकट गणितं सोडवतांना मी विचाराने बादली भरेपर्यंत उत्तराने त्याची बादली भरली असायची.

आम्हाला सहावीत बैरागी सर इंग्रजी शिकवायला होते. 'राम इज बॉय,' 'सिता इज गर्ल' यापुढे आमचं इंग्रजी गेलंच नाही. सहावीत तेच आणि सातवीलाही तसंच काहीतरी. आठवीत पेठे हायस्कूलला आल्यावर इंग्रजीतल्या काळाचं भान आले. 'आय एम रायटिंग लेटर' या काळाचा तक्ता पाठ असल्याने हरवल्यासारखं झालं. त्यानंतर व्याकरणाचं काही पुस्तक आहे याचा शोध आम्हाला अकरावीला लागला. त्यामुळे आमच्या इंग्रजीचे बारा वाजले.

विश्वास जोशी हुशार म्हणून मी त्याला विनंती करुन त्याच्या सोयीनुसार त्याच्याकडे अभ्यासाला जायचो. त्याच्या गणित सोडवण्याच्या पद्धतीचा मला फायदा झाला. तो कमी बोलायचा, पण नेमकं. त्याचं तिरकस, कुचळ बोलणं मला कळायचं नाही. एकदा मला तो म्हणाला, 'साने गुरूजी कथामाला असते रविवारी, येशील का?' आपण जाऊ. मी घरी विचारलं आणि चार आणे फी भरली. आम्ही गेलो तिथं एक बिल्ला आणि पिन मिळाली. तो बिल्ला खिशाला लावून जातांना आपणाला एखादा पुरस्कार मिळाला आहे अशा थाटात तो मिरवत जात असू. अशावेळी कोणीतरी ओळखीचं भेटावं असं मनातून वाटत राही. कथामालेत कथा ऐकायला मि‍‍ळायच्या. वेगवेगळी मोठी माणसे बघायला, ऐकायला मिळायची. छान वाटायचं. कथामालेच्या स्पर्धा होत्या. त्यात विश्वासला भाग घ्यायचा होता पण स्पर्धेत जोडीने सहभागी व्हायचं होतं. त्याला जोडीदार हवा होता म्हणून त्याने मला तयार केले. मी भीतभीत त्याच्यासोबत नगरपालिकेच्या सभागृहात गेलो. भव्य हॉल, भव्य स्टेज, एका माईक, खाली सर्व मुलं मांडी घालून सतरंजीवर बसलेली. आमचं नाव पुकारलं. आम्ही दोघेही स्टेजवर गेलो. खाली केलेला माईक. एक हात छातीवर ठेवून एका हाताने हातवारे करत, 'शौर्याची तव परंपरा महाराष्ट्र वळूनि बघ जरा' असं कसंतरी गाणं आम्ही म्हटलं. घशाला कोरड पडली होती. विश्वासच्या घरी जेवढी प्रॅक्टिस केली त्याच्या जोरावर थरथरत्या पायानं एकदाचं गाणं संपवल.

एकदा संध्याकाळी विश्वास भेटला म्हणाला 'चल वाचनालयात येतोस का?' मी म्हणालो, 'तिथं काय असतं.' तर तो म्हणाला, 'तिथं पुस्तकं वाचायला मिळतात आणि तुम्ही पुस्तक वाचून संपवलं की तुमच्या टेबलावरती दहा पैसे आणून ठेवतात. ते घ्यायचे आणि यायचं.' 'अरे वा, चला मग' असे म्हणून तो मला सरकारवाड्याच्या वरच्या मजल्यावरील बालवाचनालयात घेऊन आला. पायाचा आवाज होऊ न देण्याची दक्षता घेत सावकाश मी त्याच्यामागे गेलो. त्याने त्या रजिस्टरवर नाव लिहिलं, सही केली आणि एक खूर्ची तो जाऊन बसला. मी त्याचं अनुकरण केलं, गठ्ठ्यातून एक पुस्तक उचललं आणि खूर्चीत जाऊन बसलो. मी पुस्तक वाचत होतो. चोरट्या नजरेने आजूबाजूला पाहात होतो. पहिले पुस्तक संपले. मी पुन्हा दुसरे पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक संपवून उठलो. पण पैसे काही टेबलावर ठेवलेले नव्हते. मी इकडे तिकडे बघितलं विश्वास दिसत नव्हता. तो केव्हाच पसार झाला होता. माझ्या नंतर आलेली मुलेही जाऊ लागली, आपल्याला त्याने फसवलं हे माझ्या लक्षात आलं. पण इथं फुकट आपणाला पाहिजे ते पुस्तक निवडून घेऊन वाचता येतं याचा फार आनंद झाला. तेव्हा शालेय पुस्तकाशिवाय वेगळं काही वाचायला, ऐकायला, पाहायला मिळणंही अवघड होतं. त्या काळात मला हा ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचनालयात जाऊन वाचू लागलो. चित्र पाहू लागलो. वर्तमानपत्र वाचू लागलो. शाळेत रोज एका मुलाने त्या दिवसाची महत्त्वाची एखादी बातमी वाचून दाखवायची पद्धत होती. तिथं मला बातमी वाचून दाखवता आली.

विश्वासला गाणं म्हणायला जोडीदार हवा होता म्हणून त्याने मला नेलं. माझी फजिती होईल असं त्याला वाटलं पण मला धाडस आलं, स्टेज डेअरिंग आली. विश्वासने मला वाचनालयात मूर्ख बनवलं पण मला ज्ञान मिळालं. प्रत्येक गोष्टीतून चांगलं शिकण्याची मला संधी मिळाली. पुढे उघड्या डोळ्यांनी पाहात आलो. परिस्थितीला सामोर गेलो. मित्रांनी केलेल्या वाईट गोष्टी, फजितीतून नवीन शहाणपण शिकत आलो. सातवीनंतर मी परत कधी मला भेटला नाही. आता कुढे आहे माहित नाही. पण मला त्याचे आभार मानायचे आहेत थँक यू विश्वास तू मला आत्मविश्वास दिलास.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची भूमिका न्याय मिळवून देण्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित व्यक्तीस लवकरात लवकर न्याय मिळून त्यास भरपाई मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले. सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी पेठ विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे, विशेष सरकारी वकिली अशोक कोतवाल, सहाय्यक आयुक्त वंदना कोचुरे, विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की, दर महिन्याला दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा बैठक घेतली जाते. बैठकीत पीडित व्यक्तीचे जातीचे प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांअभावी मदतीला विलंब होत असल्याचे निर्देशनास आले आहे. अत्याचार पिडितांच्या मदतीला विलंब होत असेल तर आरोपीस पीडित व्यक्तीवर दबाव आणण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून प्रशासनाने याबाबत अत्याचार पीडित व्यक्तीस त्वरित न्याय मिळेल याची दक्षता घ्यावी, असा स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

अॅट्रॉसिटी कायद्यातील विविध तरतूदींविषयी अशोक कोतवाल यांनी मार्गदर्शन केले. तसेच अत्याचार पिडितांना जलद न्याय मिळण्याच्या दृष्टीने सरकारमार्फत राज्यात विशेष न्यायालये सुरू करण्यात येणार असल्याचे गवळे यांनी सांगितले. या कार्यशाळेस पोलिस अधिक्षक ग्रामीण विभागाचे पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन मधुकर डावरे, सुरेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक वंदना कोचुरे यांनी व सूत्रसंचालन निलीमा साठे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनीतील एका शाळेत गुरूवारी दुपारी नववीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विद्यार्थ्यांनी एकमेकांवरील रागाने मारहाण केली. शिवाय त्यातील एकाने शाळेबाहेरून काही टवाळखोर मुले आणून शाळेतच धिंगाणा घातला, अशी चर्चा यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये रंगली होती.

विद्यार्थ्यांच्या अशा आक्रमकपणामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांकडून शाळेने त्यांच्या पालकांच्या समक्ष हमीपत्र लिहून घेतले आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा सुरू असल्याने शाळेत पोलिस बंदोबस्त होता. शाळेत मारामारी झाल्यामुळेच पोलिस तेथे आले असल्याचा तर्कही यावेळी लढविला जात होता.

शाळेने मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी मात्र या घटनेच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल्सवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्सनी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आपल्या परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याचे समोर आले आहे. शहरातील जवळपास २५० हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्सनी चालू वर्षाचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे या हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्सवर ३१ मार्चच्या आत नूतनीकरण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय विभागाने दिला आहे.

मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ अन्वये नाशिक महानगरपालिका कार्यक्षत्रातील हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्सने पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहेत. शहरात ८७२ हॉस्पिटल्स व ८२८ क्लिनिक आहे. क्लिनिकला नूतनीकरण बंधनकारक नाही. मात्र हॉस्पिटल व नर्सिंग होम्सना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत नूतनीकरण न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वैद्यकीय विभागाने दिला आहे. यामध्ये त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड व प्रतिदिन ५० रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांडवलेणीची वनसंपदा धोक्यात

$
0
0

पांडवलेणी परिसरात अनेक दिवसांपासून वृक्षतोड सुरू आहे. सुमारे पावणे दोनशेहून अधिक वृक्ष तोडण्याचा प्रयत्न सुरू असून आतापर्यंत सुमारे ४६ वृक्ष तोडण्यात आले आहेत. तसेच पांडवलेणीच्या मागील बाजूस असलेल्या उद्यानाच्या दिशेने जेसीबी सारखे काही अवजड साहित्यांचा वापर करून मोठा रस्ता बनविला जात आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या समजल्या जाणाऱ्या या पांडवलेणीवर असे काय काम करावयाचे आहे? त्यासाठी शेकडो वृक्षांची का कत्तल केली जात आहे, असा प्रश्न नागरिकांवह पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या उद्यानाच्या दिशेने डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता तयार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी वृक्षतोडीसह अन्य कामासाठी परवानगी घेतली आहे काय अशी संबंधित ठेकेदारांला विचारणा केली. मात्र, अशी कोणतीही परवानगी मिळाली नसल्याचे आढळून आल्याने काम कसे काय सुरू केले जात असल्याचा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे.

अन्यथा न्यायालयीन लढा शहराच्या विकासात भर टाकणारे व अतिप्राचीन पांडवलेणी डोंगरावर वृक्षतोडीसह रस्त्याचे काम कसे काय सुरू केले गेले, याबाबत प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. संबंधित विनापरवाना सुरू असलेले काम तातडीने थांबविण्यात यावे, अन्यथा यापुढे न्यायालयाची लढाईचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जसबीरसिंग, नितीन शुक्ला, गणेश अवस्थी, निशिकांत पगारे, निनाद रुपवते, हरेश माहेश्वरी, गौरव क्षत्रिय आदींसह मानव उत्थान मंच, निर्मल गोदा अभियान, आवास आणि मी नाशिककर सोशल मीडिया ग्रुपच्या सदस्यांच्या सह्या आहेत.
पांडवलेणी परिसरात वृक्षतोड करुन सायकल ट्रॅक तयार केला जात असल्याचे समजते. मात्र, यासाठी संबंधित ठेकेदारांने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत ४६ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तेथील काम तातडीने थांबविण्यात यावे, यासाठी लढा सुरु केला आहे. - जसबिरसिंग, सामाजिक कार्यकर्ते

पांडवलेणी येथे खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच याठिकाणी पथक पाठवून त्याची चौकशी केली जाईल. संबंधित खोदकाम हे अवैध आहे की वैध याची शहानिशा करण्याचे आदेश दिले आहेत. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीची ‘ती’ वाहने गेली कुठे?

$
0
0

पाच वर्षात २ हजार ८०० चोरीच्या वाहनांपैकी अवघी ७०८ गवसली

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : कटप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाने संबंध देशातील दर्शकांना हैराण केले. अर्थात या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या कथाकाराला माहीत आहे. मात्र, काही प्रश्न कटप्पा आणि बाहुबलीच्या कथेपेक्षा रहस्यमय असतात अशीच ‌स्थिती शहरातील वाहनचोरीबाबत निर्माण झाली आहे. चोरट्याने वाहन चोरी केलेच कसे? चोरीला गेलेल्या वाहनाचे नेमके झाले काय? चोरीला गेलेले वाहन परत केव्हा मिळेल? असे एका ना अनेक प्रश्न यात आहे. आजमितीस शहरात २ हजार ८०० पेक्षा जास्त वाहनधारक या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर शोधताना दिसतात.

शहरात २००८ पासून वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. २०११ मध्ये वाहनचोरट्यांनी कळस केला. तब्बल १ हजार ७९ वाहने चोरण्याचा विक्रम या वर्षात झाला. यानंतर, प्रतीवर्षी दिवसाला दोन या सरासरीने वाहने चोरीला जात आहेत. २०११ ते २०१५ या पाच वर्षाच्या काळात चोरट्यांनी ३ हजार ५०२ वाहने शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरी झाली. यातील अवघी ७०२ वाहने परत मिळाली आहेत. गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे २० टक्के असून, उर्वरीत ८० टक्के वाहनांचे काय झाले, असा यक्ष प्रश्न समोर येतो. सातत्याने बदलणाऱ्या चोरट्यांच्या मोडस ऑपरेडींमुळे पोलिस सुध्दा हतबल झाले आहेत. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन म्हणाले,'वाहनचोरीच्या घटनांनंतर त्यांची नंबर प्लेट व कलर बदलणे, वाहनांचे स्पेअरपार्ट खुले करून विकणे असे मार्ग चोरटे अवलंबतात. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करताना अडचणी येतात. पोलिस काही तरी क्लुवर काम करतात. तो मिळाला तर चोरटे सापडतात. इंदिरानगर येथील एका चोरट्याकडून २३ वाहने मिळाली. भद्रकाली पोलिसांनी गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. क्राईम ब्रँचमार्फत सातत्याने कारवाई होत असते. २० टक्के गुन्ह्यांची उकल होणे ही सुध्दा मोठी बाब असल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. वाहनचोरीच्या व्यावसायात अगदी शिकलेल्या मुलांचा सहभाग आढळून येतो. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने एका विद्यार्थ्यास अटक केली होती. हा मुलगा कॉलेजला जाण्याचा बहाणा करून शहरातच वाहने चोरी करायचा, असे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान, चोरी जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून, वाहनधारकाने सर्तकता बाळगून व्हिल लॉक किंवा त्या पध्दतीची यंत्रणा वापरणे गरजेचे झाले असल्याचे मत पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी व्यक्त केले.

वर्ष-वाहनचोरी-परत मिळालेली वाहने

२०११- १ हजार ७९ - २०२

२०१२- ६१५ -१४०

२०१३- ४८९ -११९

२०१४- ६८५ -१४१

२०१५- ६३४ -१००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटील यांचा बोलविता धनी कोण?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरेसविका लता पाटील यांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. तर दिनकर पाटलांच्या आंदोलनाला प्रशासनानेही जशास तसे उत्तर देत, त्यांच्या प्रभागात तीन वर्षात ३३ कोटीची कामे केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शहरात चुटकीसरशी सुटू न शकणाऱ्या समस्यांना जादूची कांडी वापरून सोडविण्याच्या हट्ट करणाऱ्या पाटील यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. पाटलांच्या आंदोलनाचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असल्याची चर्चा महापालिकेत असून पाटील यांच्या आड आयुक्तांवर निशाणा साधला जात असल्याची चर्चा आहे.

घंटागाडी, उद्याने, रस्ते, पाणीपुरवठा अशा विविध मागण्या सोडविण्यासाठी दिनकर पाटील यांनी सपत्नीक आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा गुरूवारी तिसरा दिवस होता. पाटील यांनी केलेल्या मागण्यांचे आयुक्तांनी दोन दिवस खुलासा करण्यासाठी घालवले आहेत. आयुक्तांनी लेखी पत्र देऊन मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु पाटील यांनी पत्र घेण्यास नकार देत, आंदोलन व पत्रप्रपंच सुरू ठेवला आहे. त्यामुळे आयुक्तांसह सत्ताधारी कोंडीत सापडले आहेत. तर दुसरीकडे पाटील यांच्या मागण्या संयुक्तिक नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.

गेल्या तीन वर्षात पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये ३३ कोटी ७ लाखाची कामे झाली आहेत. तरीही पाटील यांच्याकडून कामे झाले नसल्याचा खोटा दावा केला जात आहे. तर घंटागाडी, उद्यानांचा प्रश्न कायदेशीर गोष्टीमुळे प्रलंबित आहे. ते तात्काळ सोडविणे शक्य नाही. तरीही पाटील यांनी आंदोलनाचा हट्ट कायम धरला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलना आडून कोणीतरी आयुक्त व सत्ताधारी मनसेवर निशाना साधत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.



एका दगडात दोन पक्षी...

दिनकर पाटील यांनी केलेल्या काही मागण्या या धोरणात्मक आहेत. त्यामुळे त्या तात्काळ सोडविल्या जाऊ शकत नाही. तरीही त्या सोडवाच असा हट्ट धरून मनसे व आयुक्तांना कोंडीत पकडले जात आहे. सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असून पाटील यांच्या या आंदोलनाचा वापर हत्यार म्हणून केल्याची रणनीती एका पक्षाकडून आखली जात आहे. त्याला आमदार, नगरसेवकांसह काही पक्षांचाही पाठ‌िंबा आहे. आंदोलनाचा आयुक्तांवर शस्र म्हणून वापरायचे आणि त्यांची बदली करायची असा पण काहींनी केल्याची चर्चा आहे. तर पाण्याचे राजकारण करणाऱ्या मनसेलाही उघडे पाडण्याचा डाव या आंदोलनातून खेळला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरातून बुकी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टी-२० वर्ल्डकप २०१६ साठी घमासान सुरू झाले आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच मॅचपासून रोमांचकारी सामन्यांचे रिझल्ट पाहण्यास मिळत आहेत. वर्ल्डकप फिव्हरचा फायदा उचलण्यासाठी बुकीही सरसावले असून, याच प्रकरणात क्राईम ब्रँचच्या कर्मचाऱ्यांनी उपनगर परिसरातून एकास अटक केली.

याबाबत युनिट तीनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले की, उपनगर परिसरातील आर्टीलरी सेंटररोडवरील खोलेमळा येथील तुळशी पुजा अपार्टमेंट बेटींग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, युनिटच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचून येथे राहणाऱ्या भूषण सावळे या व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक कॉमेंट्री ऐकण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र, चार मोबाइल, टीव्ही सेट, सेटअपबॉक्स तसेच सात हजार रूपये रोकड असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या मते मॅचमध्ये प्रत्येक चेंडूनंतर निर्माण होणारी परिस्थिती सावळे आपल्या ग्राहकाला देत होता. यानंतर बेटींगचा व्यवहार पार पडत असे.

वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश त्र्यंबक निकम यास नाशिक लाचलुचपत विभाग पथकाने ४ हजारची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले.

तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रारदार यांची पत्नीस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तक्रारदार यांनी यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश त्र्यंबक निकम यांची भेट घेऊन पत्नीवर ययोग्य ते उपचार व्हावे, अशी विनंती केली मात्र डॉ. निकम यांनी त्यांचेकडे ४ हजाराची लाच मागितली. दरम्यान, याबाबत तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारीवरुन एससीबीने बुधवारी सापळा रचून दुपारी १ वाजता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

दुचाकीस्वार ठार

औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार अनिल साहेबराव पवार याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टाकळी गाव येथे घडली.

मंगळसूत्राची चोरी

घराच्या गच्चीच्या उघड्या दरवाजातून आत शिरलेल्या चोरट्याने ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना बुधवारी सकाळी आठ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास कोणार्कनगर येथील मातोश्री अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी शिवाजी छबु कदम आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

लाकडी पलंग चोरला

भद्रकालीतील काजीपुरा परिसरात राहणाऱ्या राजीया ए. बागवान (८०) यांचे काजीपुरा परिसरातील कमोद रोडवर घर आहे. या घरात चोरी झाल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील जुने सामान, कपाट आणि पलंग असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीफ म्हणजे कला-संस्कृतीचा कुंभ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके आणि कव‌िश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या भूमीत माझा 'आठवण' आणि 'साठवण' या लघुपटांचे प्रदर्शन होत आहे हे मी माझे भाग्य समजते. नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‌िव्हल (नीफ) हा कला आणि संस्कृतीचा कुंभ आहे. कुणाचे ही पाठबळ नसताना गेली आठ वर्ष सातत्याने याचे आयोजन केले जाते ही अभिमानास्पद बाब आहे.' असे प्रतिपादन अभिनेत्री आणि निर्माती रेणुका शहाणे यांनी केले.

आठव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‌िव्हलच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विश्वास लॉन्स येथे या फेस्ट‌िव्हलचे आयोजन करण्यात आले असून, १७ ते २० मार्च या कालावधीत देश विदेशातील चित्रपट पहाण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. फेस्ट‌िव्हलचे उद्धाटन रेणुका शहाणे, खा. हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, माजी मंत्री प्रशांत हिरे, विजय पाटकर, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या हस्ते द‌‌‌ीपप्रज्वलन करुन करण्यात आले. खासदार गोडसे म्हणाले,'नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी हे सगळ्या कलावंतांचे स्वप्न आहे. त्याकरता मुंढेगाव येथे १२० एकर जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला देण्यात आला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल अशी आशा आहे.' माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले,'मुकेश कणेरी गेल्या आठ वर्षापासून सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करीत असून त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळत नसताना हे कार्य उल्लेखनीय आहे. नाशिक महापालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन या फिल्म फेस्ट‌िव्हलला मदत करावी असे ते म्हणाले.

मुकेश कणेरी म्हणाले की, स्मार्ट सिटीचे ब्र्रॅण्ड‌िंग करण्यासाठी फिल्मसीटीचे ब्रॅण्ड‌िंग करणे आवश्यक आहे. उपमहापौर गुरुमीत बग्गा म्हणाले, नाशिकमध्ये दादासाहेब पाळके पुरस्काराचे आयोजन केल्यास येथील कलाकारानं खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळेल व येथील चित्रसृष्टी उदयास येईल त्या करता दादासाहेब फाळके पुरस्कार समारंभाचे आयोजन नाशिकमध्ये व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी फिल्म फेस्ट‌िव्हलच्या आठ वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा चित्रफितीद्वारे दाखवण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमीन व्यवहारात फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम‌िनीच्या व्यवहारात खरेदीदाराकडून १८ कोटी ४९ लाख रुपये घेऊन जमीन नावावर न करता परस्पर दुसऱ्यास विक्री केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ११ जणांविरोधत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये टिळकवाडी येथील नऊ तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

गंगापूररोडवरील पंपींग स्टेशन परिसरात राहणाऱ्या गोविंदराव यादवराव साबळे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. साबळे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे राहणाऱ्या नक्षत्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे संचालक संतोष शांतीलाल मुथा आणि विनोद कंचन सुराणा यांच्याशी जमीन व्यवहार केला होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील बिगरशेती मिळकत असलेल्या दोन हेक्टर जम‌िनीचा व्यवहार ३५ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये ठरला होता. या व्यवहारापोटी साबळे यांनी वरील संशयितासह शहरातील टिळकवाडी परिसरात राहणाऱ्या भाविक उपेंद्र शाह, प्रियंक एस. शाह, भैरव एस. शाह, हितीश एस. शाह, हेमल पिंकेश शाह, सौरव अजीत शाह, सुनीता अजीत शाह, शारदाबेन शांतीलाल शाह यांच्याकडे २४ ऑक्टोबर २०१० ते २० ऑगस्ट २०१४ या कालावधीत नाशिक कोर्टाच्या आवारात वेळोवेळी १८ कोटी ४९ लाख रुपये दिले. मात्र, संशयितांनी जमीन साबळे यांच्या नावावर केली नव्हती.

दरम्यान, मिळकत दावा प्रलंबित असताना दोघा संशयितांनी गौतम हिरण या तिसऱ्या व्यक्त‌ीशी खरेदी व्यवहार केला. ही बाब समोर येताच साबळे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला. घटनेचा अधिक तपास एपीआय निमसे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोन ठार

$
0
0

मनमाड : नांदगाव-येवला मार्गावरील बेलदारवाडीजवळ दोन दुचाकी आणि टँकर यांच्या तिहेरी अपघातात दोन जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथून शिर्डीकडे दुचाकीवर जात असलेले राजेंद्र अजय राजपूत (३०) आणि सचिन बारकू पाटील (३५) यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या सोपान काळे व सुमनबाई सरोदे (६५) यांच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात चौघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून आलेला टँकर त्यांच्या अंगावरून गेला. टँकरच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडीतील जुगार, दारूअड्डे उद्धवस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील वाघाडी परिसरात सुरू असलेले अवैध धंद्यांची मक्तेदारी मोडून काढणे पोलिसांना सहज नाही. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे अवैध व्यवसायांना लपण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र, गुरूवारी पोलिस उपायुक्त एन. अंबिका व त्यांच्या पथकाने वाघाडीची तटबंदी मोडून काढीत सर्व परिसर पिंजून काढला. पोलिसांनी या ठिकाणाहून ३० जणांपेक्षा जास्त व्यक्त‌िंना अटक करून जुगाराचे साहित्य, पैसे तसेच गावठी दारू असा मुद्देमाल जप्त केला.

वाघाडीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत अनेक वर्षांपासून तक्रार केली जाते. मात्र, पोलिस कारवाई करताना सातत्याने चालढकल करीत असल्याचे दिसते. शहरात सर्वत्र अवैध व्यावासायिकांवर कारवाई होत असताना वाघाडीत मात्र खुलेआम जुगार अड्डे सुरू होते. यापार्श्वभूमीवर टिकेचे धनी होत असलेल्या शहर पोलिसांनी गुरूवारी सांयकाळी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास वाघाडीवर छापा मारला. पोलिस आयुक्त एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी हजर होता. वाघाडीतून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात होता. वाघाडीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी २२ जणांना अटक केली. जुगार अड्ड्यातून जप्त केलेल्या २५ हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कमेची रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. गावठी दारूसाठी कुप्रसिध्द असलेला वाघाडीतील अड्डाही पोलिसांनी उद्धवस्त केला. सुमारे ६०० लिटर्स गावठी दारूचा साठा जप्त करीत सहा जणांना अटक केली. वाघाडीतील आजच्या कारवाईमुळे पंचवटीत खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकप्रकरणी राजकीय स्टंटबाजी नको

$
0
0

दत्ता गायकवाड यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बँकेची एकही शाखा तोट्यात नसून बॅँकेची आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे. विरोधकांनी रिझर्व बँकेकडे किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेकडे दाद मागावी; परंतु बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय स्टंटबाजी करून बँकेची बदनामी करू नये. स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार असल्यामुळेच बॅँकेला ११ पुरस्कार मिळाले, असे प्रतिपादन नाशिकरोड व्यापारी बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केले.

विरोधी गटातील संचालकांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत नुकतीच शंका उपस्थित केली होती. त्याला गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिले. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर जाधव, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, डॉ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, डॉ. दत्तात्रय पेखळे, मनोहर कोरडे, शाम चाफळकर, सीईओ एकनाथ कदम आदी उपस्थित होते. दत्ता गायकवाड म्हणाले की, बँकेच्या १९ पैकी दोनच शाखा नफ्यात असल्याचे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे. उलट एकही शाखा तोट्यात नाही. रिझर्व्ह बँकेचे निकष पूर्ण केल्यानेच आठ नवीन शाखांना परवानगी मिळाली आहे. शाखा उघडल्याशिवाय बँकेची प्रगती होणार नाही. त्यामुळे शाखा उघडणारच. सन २००४ साली बँकेचा ढोबळ एनपीए ४९ टक्के होता. तेव्हा एक कोटी २० लाखाचा तोटा झाला होता. आज ढोबळ एनपीए ८३ टक्क्याने घटला आहे. बँकेच्या ठेवी ४१० कोटी आणि व्यवसाय ७०३ कोटीचा झाला आहे. विशेष म्हणजे कर्मचारी संख्या २२४ वरून २१३ घटली असतानाही ही प्रगती झाली आहे. व्यवस्थापन खर्च २.२२ वरून १.८५ टक्क्यांवर आला आहे. सहा वर्षात बँकेने अद्यावत डाटा सेंटर उभारला असून कोअर बॅँकींग, एटीएम सेंटर सुरू केले आहेत, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज खंडित करून रोखणार पाणी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदापात्रातील पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत वीजजोडणी घेऊन चोरी होते, तेथील वीजपुरवठा खंडित करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गोदापात्रालगत राहणारे नागरिक गोदावरी नदीतील पाण्याचा अनधिकृतपणे उपसा करीत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. अनधिकृतरित्या वीजजोडणी घेऊन आणि मोटारी लावून पाणी चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे सहजासहजी हा चोरीचा प्रकार कुणाच्या नजरेत येणार नाही, याचीही नागरिकांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. गंगापूर धरणातील पाणीपातळी खाली जात असल्याने महापालिकेने पाणी कपातीला सुरुवात केली आहे. पाणी जपून वापरा, असे आवाहन केले जात असताना, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगाही प्रशासनाकडून उगारला जात आहे. अशा सर्व स्तरावर प्रशासनाकडून काळजी घेतली जात असताना पाणी चोरीकडे मात्र जिल्हा प्रशासनाची डोळेझाक होत आहे. गंगापूर गाव, आनंदवली, आसाराम बापू पूल परिसर, तपोवन, दसक पंचक, टाकळी परिसर अशा अनेक ठिकाणी मोटारी लावून पाण्याचा बेकायदा उपसा होऊ लागला आहे. पाणीटंचाईची समस्या येत्या काळात अधिकच जटील होण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाने पाणी चोरी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. शेतीसाठी पाणी चोरले जात असेल तर जलसिंचनने त्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. मात्र, त्यांनीही अशा चोरीकडे डोळेझाक केली आहे.

गंगापूर धरण किंवा जेथे अनधिकृत वीजजोडणीद्वारे पाणी चोरी होते त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करा, अशा आशयाचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images