Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिओ ऑलिंपिकमध्ये आणखी एक नाशिककरांची एंट्री

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावरपाडा एक्सप्रेस धावपटू कविता राऊत हिच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील दत्तू बबन भोकनळ या आणखी एका क्रीडापटूने रोईंग या क्रीडा प्रकारात ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. यामुळे नाशिकचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा वाढणार असून, धावपटूंचे शहर आता इतरही खेळांमध्ये अग्रेसर होत असल्याने नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळणार आहे.

दत्तू भोकनळ हा नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहे येथील रहिवासी असून, त्याचे शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे झाले आहे. दत्तू याने रोईंग खेळाच्या पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात पात्रता फेरीत यश मिळविले आहे. साऊथ कोरियाच्या चुन जु येथील तेगेऊन तलाव या ठिकाणी स्पर्धा सुरु आहेत.

दत्तू हा लष्करातील जवान असून तो पुण्यातील बॉम्बे इंजिनीअरींग ग्रुप येथे नियुक्तीवर आहे. त्याने यापूर्वी आशियाई रोईंग चॅपिंयनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. भारताच्या ओम प्रकाश आणि दत्तू भोकनळ यांनी या आधी पुरुषांच्या दुहेरी स्कल्स रोईंग प्रकारात आशियाई स्पर्धेत पाच फेऱ्यांमध्ये यश मिळविले होते. सैन्य दलाने पुण्यातील नाशिक फाटापरिसरात असलेल्या तलावात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तू सराव करीत आहे. दत्तूने या खेळात अत्यंत कमी कालावधीत यश संपादन केले असून, अवघ्या तीन ते चार वर्षाच्या कारकिर्दीत त्याने यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे तळेगाव रोहे येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दत्तू लहान असताना त्याच्या वड‌िलांचे निधन झाल्याने आईने कष्ट करुन त्याचे शालेय शिक्षण तळेगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात पूर्ण केले. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी दत्तूने बारावीनंतर सैन्यदलात प्रवेश केला. तेव्हापासून तो पुण्यात आहे.

पात्रता फेरीत विजय मिळेल अशी खात्री होती. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चांगला सराव करत होतो. त्या प्रयत्नांना यश आले आहे. ऑलिंपिकमध्ये निश्चित चांगली कामगिरी करु अशी खात्री आहे.

दत्तू भोकनळ, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावे २१८; खर्च २७२ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या असह्य झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांचा जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येतून तालुक्याला मुक्ती देण्यासाठी या योजनेची मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील एकूण २१८ गावे या योजनेसाठी निवडण्यात आली असून, तेथील कामांवर २७२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

निसर्गाच्या प्रकोपापासून पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. पाण्याअभावी पिकांनी मान टाकू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच या योजनेंतर्गत पाणी अडविण्याचे आणि ते जिरविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात २२९ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये एकूण पाच हजार ६०७ कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्यात नाशिक तालुका वगळता अन्य १४ तालुक्यांमधील २१८ गावांची निवड करण्यात आली आहे. तेथे ८ हजार २४३ कामे करण्यात येणार आहेत. या कामांवर २७१ कोटी ५६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सरकारी यंत्रणांबरोबरच अशासकीय संस्थाचीही मदत घेण्यात येणार आहे. निवडलेल्या २१८ गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे, कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, साखळी सिमेंट नालाबांधाचे खोलीकरण आणि रुंदीकरण, मध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन, पाझर तलाव, तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, छोटे ओढे, नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तसेच पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण, कालवा दुरुस्ती सारख्या उपाययोजना लोकसहभागातून करण्यात येणार आहेत.

चार हजार ८२८ कामे पूर्ण भूजल पातळी दोन मीटरपेक्षा खाली गेलेल्या राज्यातील १८८ तालुक्यांमधील दोन हजार २३४ गावे तसेच सरकारने टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली २२ जिल्ह्यांमधील १९ हजार ५९ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना प्रामुख्याने राबविण्यात येत आहे. सिंचनाची क्षमता वाढविणे आणि पाण्याच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण करणे या योजनेची उद्दिष्ठे आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२९ गामध्ये ५६०७ कामे सुरू हाती घेण्यात आली.

जलयुक्तच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तालुकानिहाय गावांची संख्या तालुका गावांची संख्या बागलाण २४, पेठ २२, सिन्नर २१, कळवण २१, मालेगाव २०, सुरगाणा २०, दिंडोरी १८, चांदवड १५, येवला १५, नांदगाव १३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाचा उतरला पारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गत पाच दिवसांपूर्वी ४१ अंशांवर गेलेला तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. रविवारी नाशकात गेल्या महिनाभरातील सर्वात कमी म्हणजेच ३४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानही १९.५ अंश सेल्सियस नोंदविले गेल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

नाशिक शहरात आणि जिल्ह्यात तापमानातील चढ उतार सुरूच आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३५ अंशांवरून ३८.५ अंशांपर्यंत पोहोचले होते. तापमानाचा पारा वाढत असला तरी ढगाळ हवामानामुळे त्यावेळी उन्हाचा तितकासा चटका जाणवला नाही. हेच तापमान दुसऱ्या आठवड्यात कमालीचे वाढले. मालेगावसारख्या ठिकाणी पारा ४४.२ अंशांवर गेला. अंगाची काहीली करणाऱ्या तप्त झळांनी नाशिककर पोळून निघाले. त्यानंतर पुन्हा हे तापमान काहीसे कमी होऊन ३८ अंशांवर स्थिरावले होते. मात्र, त्यामध्ये १९ एप्रिलला पुन्हा वाढ झाली. नाशिक शहरात खऱ्या अर्थाने तापमानाने चाळीशी ओलांडली. ४१.० अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविले गेले. मात्र, त्यानंतर रविवार (दि. २४) पर्यंत तापमानाचा पारा सातत्याने उतरता राहिला. २० एप्रिलला ४०.४, २१ ला ३८.५, २२ एप्रिलला ३५.४ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविले गेले. रविवारी तापमानाचा पारा अधिकच खाली उतरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दरात वाढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईची झळ बसल्याने भाजीपाल्याचा दर्जा घसरला असला तरी दर मात्र कडाडले आहेत. आवक मर्यादीत होत असल्याने कारले, गिलके, दोडके, गवार, मिरची यांचे दर ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. पालेभाज्यांचेही दर तीस ते चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्याने सांगितले.

सध्या सर्च जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहेत. डाळींचे दर वाढल्याने सर्वसामान्य हवाल‌दिल झाले असताना आता भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरानेही बजेट कोलमडले आहे. यामुळे अर्धा किलोवरून पावशेर भाज्या घेण्याची सर्वसामान्यांवर वेळ आली आहे. टोमॅटो व कांदे सोडले तर सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत. आणखी दीड ते दोन म‌हिने तरी दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. प्यायलाच पाणी नसल्याने भाजीपाल्याची नवीन लागवडही होऊ शकलेली नाही. यामुळे लागवडच नाही तर विक्रीला येणार कुठून, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भाजीपाल्याचे दर किलोमध्ये कोबी - १०, फ्लॉवर - २५, कारले - ७० ते ८०, गिलके - ७० ते ८०, दोडके - ७० ते ८०, गवार - ६० ते ७०, कांदे - १० ते १५, बटाटे - १५ ते २०, भेंडी - ४०, वांगे - ४०, मिरची - ८०, काकडी - २५ ते ३०, टोमॅटो - १० ते १५, शेवगा - ४०, कोथिंबीर - २० ते ४० रु. जुडी, मेथी - २५ ते ३०, शेपू - १५ ते २५, पालक - ८, कांदापात - १२ ते १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बरांचे नशीब मतपेटीत बंद

$
0
0

लासलगाव 'कृउबा'साठी ९८.८४ टक्के मतदान

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी दिवसभर पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. एकूण २०७८ पैकी २०५४ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.८४ टक्के मतदान झाले. आज (दि. २५) सकाळी आठ वाजेपासून निफाड येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रावर पॅनलचे नेते व उमेदवार तसेच समर्थकांनी गर्दी केली होती. सर्व मातब्बरांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे. शेतकरी विकास व आपला बळीराजा या दोन पॅरनलमध्ये सरळ लढत होत आहे. विद्यमान सभापती नानासाहेब पाटील हे नवख्या उमेदवारांना सोबत निवडणूक लढवत आहेत. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुपारपर्यत साठ टक्के मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे हे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप आहेर हे काम पहात आहेत. निफाडचे पोलिस उपअधीक्षक दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळराव उंबरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

केंद्रनिहाय मतदान लासलगाव येथील मतदान केंद्रावर सोसायटी मतदार गटात १७७ पैकी १७७, ग्रामपंचायत गटात १४२ पैकी १४२, व्यापारी गटात २६९ पैकी २५७ व हमाल-मापारी गटात ३४१ पैकी ३४९ तदारांनी मतदान केले.

विंचूर केंद्र सोसायटी गटात १२४ पैकी १२४, तर ग्रामपंचायत गटात १०० पैकी १०० मतदारांनी मतदान केले.

देवगाव केंद्र सोसायटी गटात १३८ पैकी १३६, तर ग्रामपंचायत गटात ८८ पैकी ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नांदूरमधमेश्वर केंद्र सोसायटी गटात ९८ पैकी ९८ मतदारांनी, तर ग्रामपंचायत गटात ६२ पैकी ६२ मतदारांनी मतदान केले.

निफाड केंद्र सोसायटी गटात २१५ पैकी २१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन मतदार मयत आहेत. ग्रामपंचायत गटात १५४ पैकी १५४ तर व्यापारी गटात १२१ पैकी ११५ तर हमाल-मापारी गटात ४९ पैकी ४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये टँकर्सला १२०० रुपये भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरातील दत्त मंदिररोड, ५२ नंबर, गायकवाड चौक परिसरासह मुख्य बाजारपेठ भागात जवळपास महिना उलटून गेला तरी ही नळाला पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे नागर‌िकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याच्या टँकरला जोरदार मागणी असून, टँकरवाल्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. टँकरचा दर १२०० ते १४०० रुपये असा आहे.

मनमाडला पालखेड धरणाचे आवर्तन मिळाले आणि पाणी ही धरणात आले. मात्र, शहरातील सर्वच भागात अद्याप पाणी पोहोचलेले नाही. दत्तमंदिर मार्ग, ५२ नंबर, गायकवाड चौक या भागात अजूनही पाणीपुरवठा झालेला नाही. तब्बल महिना उलटूनही पाणी नसल्याने पाणी विकत घेण्याशिवाय नागरिकांसमोर पर्यायच उरलेला नाही. काही सेवाभावी व्यक्ती तसेच नगरसेवक विनामूल्य पाणी देताना दिसत असले, तरी सर्वांचीच तहान भागवणे आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना शक्य नसल्याचे दिसून येत आहे. बोअरवेल आटल्यामुळे पाणीटंचाई अधिकच जाणवत असून, पाणी शोध मोहीम सुरूच असल्याची स्थिती आहे.

जारलाही वाढती मागणी पाण्याच्या जारलाही वाढती मागणी असून, ६० ते ८० रुपयापर्यंत भाव असल्याचे सांगितले जात आहे.

तुमच्याकडे पाणी आले का? सर्वत्र पाणीप्रश्न हाच चर्चेचा विषय असून, शाळा व महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयात तुमच्याकडे पाणी आले का? हाच प्रश्न हमखास विचारला जात आहे.

टँकरकडे लागल्या नजरा पाणी नसल्याने हैराण मनमाडकरांना आता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीने टँकर मिळत असल्याची ओरड होत असून, विकतचे पाणी देखील गोड मानून घेत घेत आहेत.

पैसे देऊनही मिळेना श्वाश्वती शहरात टँकरला सर्वदूर मागणी आहे. सुमारे १२०० ते १४०० रुपये टँकरला भाव आहे. काही टँकरवाले ३०० रुपयाला १००० लिटर या भावाने पाणी देत आहेत. काही ठिकाणी पिण्याचे पाणी ४०० रुपयाला एक हजार लिटर या भावाने विकले जात आहे. पैसे देऊन ही टँकर लगेच उपलब्ध होईल, याची शाश्वती नसल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चणकापूर धरणात २८७ दलघफू गाळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साठवण क्षमता वाढविण्यासाठी चणकापूर प्रकल्पातून गाळ काढण्यासाठी शासन, जलसंपदा, महसूल विभाग यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.

कसमादे भागाला वरदान ठरलेल्या कळवण तालुक्यातील चणकापूर प्रकल्पात सन २०१२-१३ च्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार गाळाचे प्रमाण २८७ दशलक्ष घनफूट इतके आहे. आज प्रकल्पात २४२७ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा होत असल्याने त्यानुसार चणकापूरच्या पाण्याचे नियोजन शासन करते. याबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, विभागीय महसूल आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन पाठविले आहे.

सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना याबाबत कळवण तालुका दौऱ्यावर निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेची चणकापूर धरणातून गाळ काढण्याबाबत बैठक आयोजित करून धोरणात्मक व सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नामदार भुसे यांनी दिली आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी व टिकविण्यासाठी चणकापूरसह तालुक्यातील मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पातून गाळ काढण्यासाठी सामाजिक संस्था, ट्रस्ट यांना सहभागी करून घेण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करावे, अशी विनंती जयश्री पवार व नितीन पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव या शहरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गिरणा उजव्या व डाव्या कालव्यांना पाणीपुरवठा करून बागायत क्षेत्र वाढविणे, कसमादेतील पाणीपुरवठा योजना आदीचा महत्त्वाचा पाणीप्रश्न मार्गी लागतो. सन १९११ मध्ये चणकापूर तलाव बांधला असून, त्यावेळी पाण्याचा साठा १५४२ दशलक्ष घनफूट इतकी होती. चणकापूर प्रकल्पात ५० वर्षांत गाळ साचल्यामुळे सन १९७३ मध्ये चणकापूर तलावाची उंची वाढवून व मजबुतीकरण करण्यात आले. साठवण क्षमता वाढविण्यात येऊन २८२४ दशलक्ष घनफूट इतकी करण्यात आली होती. सन २०१२ व २०१३ मध्ये उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांनी चणकापूर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बाष्पीभवन व्यय वापर याचे निरीक्षण करून प्रकल्पातील गाळाचे प्रमाण निश्‍चित केल्याने चणकापूर प्रकल्पात गाळाचे प्रमाण २८७ दशलक्ष घनफूट एवढा आढळला असून, शासनस्तरावर त्याला मान्यता देण्यात आली आहे. आज चणकापूर प्रकल्पात २४२७ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होत असून, त्यानुसार या प्रकल्पातील पाणी नियोजन शासनस्तरावरून करण्यात येते.

चणकापूर धरण

बांधकाम सन १९११ साठवण क्षमता १५४२ दलघफू उंची वाढवली सन १९७३ साठवण क्षमता २८२४ दलघफू गाळाचे मोजमाप २०१२ व २०१३ गाळाचे प्रमाण २८७ दलघफू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांमध्ये टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या कडक उन्हाळ्यात दिलासा मिळावा, यासाठी येवला शहरातील बसस्थानकासह पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्थाच नसल्याने प्रवाशांचा घसा कोरडाठाक पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याचा गाडा हाकणाऱ्या तहसील कार्यालयासह प्रांत कार्यालय तसेच, इतरही काही शासकीय कार्यालयातदेखील यापेक्षा वेगळे चित्र नाही.

येवला तहसील कार्यालयातील पाण्यासाठी ठेवलेले माठ तर पाण्याविना केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. दोन तालुक्यांचा कारभार चालणाऱ्या प्रांत कार्यालयात तर पाण्यासाठी काहीच केलं गेल्याचं दिसत नाही. पाण्याचा पत्ताच नसल्यानं रणरणत्या उन्हात अगदी दूरवरून पायपीट करीत शासकीय कामासाठी आलेल्या जनतेला घोटभर पाणी मिळणे देखील मुश्किल झाले आहे.

येवला बसस्थानकात दररोज शेकडो बस धावतात. प्रवाशांची मोठी रेलचेल अन् गर्दी असते. असे असतानाही येथे पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नाही. मात्र एका व्यावसायिकाने सामाजिक भान ठेवत उन्हाळ्यात उभारलेली एक पाणपोई प्रवाशांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. येवला बसस्थानकाच्या आवारात काही वर्षांपूर्वी येथील स्वर्गिय सुभाषचंद पारख यांच्या स्मरणार्थ पारख पतसंस्थेने देखणी व अद्ययावत सिमेंट बांधकाम असलेली पाणपोई उभारून एसटीच्या स्वाधीन केली होती. मात्र, नळकनेक्शनअभावी पाणी नसल्याने ही पाणपोई धूळखात पडली आहे. पूर्वी जोडले गेलेले नळकनेक्शन देखील एसटीने काही वर्षापूर्वी बंद करून टाकल्याने आज ही पाणपोई निव्वळ देखावा ठरली आहे.

पंचायत समिती व नगरपालिका कार्यालयाचा अपवाद सोडला, तर इतर सर्वच कार्यालयातील नागरिकांसाठीच्या पिण्याच्या पाण्याची कुठलीही प्रभावी व्यवस्था नाही. तहसिल कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तर दुय्यम निबंधक व भूमी अभिलेख आदी कार्यालये देखील आहेत. असे असतानाही या ठिकाणी नसलेली पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. तहसील इमारतीत पाण्यासाठी माठ ठेवले असले तरी पाणी नसते.प्रांत कार्यालयात नागरिकांसाठी तर कुठलीच पिण्याच्या पाण्यासाठीची व्यवस्था नाही. कृषी कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची टाकी अथवा इतर व्यवस्था नाही.

खासगी पाणपोई देतेय दिलासा एकीकडे 'एसटी' प्रशासनाच्या वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षामुळे येवला बसस्थानकातील प्रवाशांच्या जीवाला पाण्याअभावी चिंतेत टाकले असताना दुसरीकडे स्थानिक व्यापारी हाजी अब्दुल मजीद फ्रूटवाले यांनी सामाजिक भान ठेवत स्थानकात उभारलेली मोफत पाणपोई प्रवाशांना दिलासा देण्याचे काम करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये टँकर्सचा धंदा जोरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या दक्षिण गंगा गोदावरीच्या उगमस्थानी पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे. योग्य नियोजनाआभावी नागरिकांना अनेक वर्षांपासून कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. येथे टँकरची कमाई बक्कळ होत असून, जून-जुलै ते ऑक्टोबर-नोव्हेंबर असा चारसहा महिन्यांचा कालावधी वगळल्यास वर्षभर येथे टँकरचा राबता सुरू असतो. सध्यस्थितीत सुमारे ३०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत टँकर उपलब्ध होत आहे.

शहरास यावर्षी दोन धरणातून पाणीपुरवठा योजना असून, दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. दररोज केवळ अर्धा तास आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याने सुबत्ता असलेल्या ग्रामस्थ आणि लॉजिंग बोर्डिंग, हॉटेल व्यावसायिक यांनी अनेक वर्षांपासून टँकरचा पर्याय स्वीकारला आहे. अनेकांचा हा कायमचा व्यवसाय झाला आहे. टँकरने आणलेले पाणी नेमके कुठून भरतात आणि त्याच्या शुध्दतेचे काय याबाबत कोणी उघड बोलत नाही. विशेष म्हणजे आईस्क्रिम, गारेगार कुल्फी तयार करणारे कारखाने हेच पाणी विकत घेत असतात.

जार ६० रुपयांना त्र्यंबक येथे ५० ते ६० रुपयांपर्यंत २० लिटर पाण्याचे जार विकण्याचा धंदा जोमाने सुरू आहे. दिवसेंदिवस असे थंड पाणी विकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नगरपालिकेच्या नळास नियमित पाणी येईलच, याची शाश्वती नसल्याने बहुतांश दुकानदार, कार्यालयांमध्ये हे २० लिटरचे जार विकत घेतले जातात. परिसरात याचे कारखाने निघाले असून, दिवसभर वाहतूक सुरू असते.

मिनरल वॉटर चढ्या दराने त्र्यंबक येथे मिनरल वॉटरची एक बॉटल २० रुपयांना विकली जाते. यामध्ये व्यावसायिक बिसलेरीसारखे नामवंत ब्रँड जास्त ठेवत नसून, लोकल ब्रँड वा नामवंत ब्रँडचे सारखेच लोगो आणि रंगीत लेबल असलेल्या बाटल्या खपवण्याकडे कल दिसून येतो. यामागे कमी खर्चात अधिक नफा असे व्यावसायिक गणित असल्याचे समजते.

बसस्थानकावर टंचाई बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल व्यावसायिक जॉनी अग्रवाल यांनी मोफत कूलर यंत्र दिले आहे. या पाणपोईचा उपयोग प्रवाशी भाविकांना होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत प्रतीक्षा थ्री जी सेवेची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी येथे महिनाभरात थ्री जी सेवा देण्याच्या आश्वासनाचा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. सहा महिने उलटले तरी थ्री जी सेवा सुरू न झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्वरित थ्री जी सेवा सुरू करावी, अशी मागणी दिंडोरी शहर कृती समितीने केली आहे.

दिंडोरी येथील बीएसएनएलच्या सुमार सेवेने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासाठी थ्री जी सेवेची मागणी करण्यात येत होती. याबाबत दिंडोरी कृती समिती व आमदार नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नव्याने एक मनोरा बसविण्यात आला. हा मनोरा थ्री जी सेवेचा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात हा टू जी सेवेचा असल्याचे कळताच कृती समितीने सदर मनोरा सुरू न करता थ्री जी सेवा द्यावी, अशी मागणी केली होती. या मनोऱ्याचे उद्घाटनही करण्यात आले होते. यावेळी कृती समितीतर्फे निवेदन देण्यात येवून थ्री जी सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी प्रजापती यांनी थ्री जी सेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यास आता सहा महिने उलटले तरी थ्री जी सेवा सुरू न झाल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दिंडोरी शहरात अनेक खासगी कंपन्या थ्री जी, फोर जी सेवा देत असताना बीएसएनएल सदर सेवा का देत नाही, हे कळत नसून बीएसएनएलचे इंटरनेट अत्यंत कमी गतिने चालत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. सहा महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेले थ्री जी सेवा सुरू करण्याचे आश्वासन पाळावे व सेवा सुरू करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल. - सचिन देशमुख, उपनगराध्यक्ष, दिंडोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यापुढे स्वबळावरच लढणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्तेत वाटा किती मिळाला यापेक्षा हिंदुत्व तुटू नये या मुद्यावर आतापर्यंत शिवसेना- भाजपची युती होती. मात्र, आता हिंदुत्व बाजूला पडले असून, केवळ व्यावहारिक तडजोड सुरू आहे. युती एकतर्फी नसते असे सांगून भाजप शिवसेनेला मित्र मानत नसल्याने युतीच्या मानसिकतेतून दोन्ही पक्ष आता बाहेर पडल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

भविष्यातील निवडणुकांमध्ये युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिल्याने नाशिकसह आगामी महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे सांगून, राज्य सरकारवर टीका करण्याचा आपल्याला अधिकार असून, माझे सरकारला आरसा दाखवण्याचे काम मी जरूर करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोध करून मित्रपक्षाला सावध करण्याचे आम्ही काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिरासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नाशिकमध्ये आले होते. या वेळी पत्रकार परिषदेसह शिबिरात बोलताना, ठाकरेंनी भाजपसह राज्य सरकार व नरेंद्र मोदींवर तोफ डागली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना- भाजपची युती होती. सत्तेत वाटा किती मिळाला यापेक्षा हिंदुत्व तुटू नये म्हणून ही युती होती. आता हिंदुत्व बाजूला पडले असून, व्यावहारिक तडजोड सुरू आहे. युती एकतर्फी नसते असे सांगत, त्यांनी दोन्ही पक्ष आता युतीच्या मानसिकतेतून बाहेर पडल्याचे सांगून भाजपसोबत पुढे युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत ठाकरेंनी दिले आहेत. उद्या काय होईल हे आताच सांगता येणार नसल्याचे सांगून त्यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसह सर्वच निवडणुकांमध्ये 'एकला चलो रे'च्या शिवसेनेच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. सरकारविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. मात्र, मित्र म्हणून मित्राला सावध करणे आमचे काम असून, आम्ही ते करीत आहोत. माझे सरकार असल्याने सरकारला आरसा दाखवण्याचे काम जरूर करीन, असा दावा त्यांनी केला आहे. १९९४ मध्ये नाशिकमध्ये शिबिर झाल्यावर १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये मेळावा घेतला. यानंतर संपूर्ण राज्यात मेळावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणुसकीने कसे वागणार?

मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्याकडे थकबाकी आहे. मात्र, दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. मात्र, मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पाणी मिळते कसे, असा सवाल करत, आता माणुसकीने कसे वागणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करा अशी मागणी आम्ही केली होती. तीच मागणी आता कोर्टाने केली आहे.

भगवे झेंडे म्हणजे हिंदुत्व नाही!

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष भाजपला खडे बोल सुनावले. देशाला जो मातृभूमी मानतो तो आणि संकटात धावून जातो तो हिंदू असल्याचे सांगत, भगवे झेंडे फडकवणे म्हणजे हिंदुत्व नाही, असा टोला त्यांनी लगावला. सरकारे बदलतात; मात्र पाकिस्तानबाबतची भूमिका बदलत नाही, असा टोला लावत मोदींच्या भाजपप्रेमावर त्यांनी टीका केली.

दुष्काळाचे राजकारण थांबवा

तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची, असा सवाल करत, दुष्काळाचे राजकारण थांबवा असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळ निवारणासाठी सरकार पावले उचलत असले तरी ते कमीच आहेत. त्यामुळे दुष्काळाचे राजकारण थांबवून सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व पक्ष एकत्र आल्यास या नैसर्गिक संकटातून बाहेर येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हाजी अलीला राजकीय रंग नको

शिवसेना उपनेता हाजी अराफत यांनी तृप्ती देसाईंसंदर्भात केलेल्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे सांगून या प्रकरणाला राजकीय व जातीय रंग देऊ नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मंदिरातील गाभारा प्रवेशाच्या आड शिवसेना आली नाही असे सांगत, कायदा सर्वांना समान हवा असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र कायदा असू नये असे सांगत, महिलांना मंदिर प्रवेशाचे त्यांनी समर्थन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तूच्या कामगिरीवर ना‌शिककरांची नजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या अवघ्या अडीच ते तीन हजार वस्तीच्या गावातला अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील दत्तू भोकनळ हा जिगरबाज तरूण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आज सातासमुद्रापार जाऊन दक्षिण कोरियात सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग या खेळात भारताचे नेतृत्व करतोय. ही बाब तळेगाव रोहीकर ग्रामस्थांसाठी भूषणावह ठरली आहे.

खरं तर आजवरचं सारं आयुष्य कष्टात आणि गरिबीत घालवणाऱ्या दत्तू भोकनळ या तरुणाची चित्तरकथा हृदयाला पीळ पाडणारी आहे. तळेगाव रोही या गावात सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील दत्तूची परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झाली. जेमतेम शेती त्यात उत्पन्नाचे वांदे होते तीन भावंडात दत्तू थोरला. त्यामुळे लहानपणापासून कष्ट, मेहनत त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. दहावीला असताना वडिलांचे छत्र हरपल्याने परिस्थितीपायी

दत्तूला शाळा सोडावी लागली. दुःख झेलत आणि भविष्याच स्वप्न पहात त्याच्या माऊलीने अपार कष्टातून तिन्ही लेकरांना वाढवलं. दत्तुने ही कुठे फायर ट्रॅक्टरवर काम करीत, कुठे विहिरीचे प्रचंड मेहनतीचे काम अंगावर घेत तर कधी पेट्रोलपंपावर नोकरी करून कुटुंबाला हातभार लावीत गरिबीतून सावरण्याचा प्रयत्न केला. नंतर पुन्हा दहावी बोर्डाची त्याने परीक्षा देऊन फाटक्या घरात सोनियाचे दिन आणण्याचे स्वप्न पाहिले. मिलिटरीत जाण्याचे ध्येय त्याला खुणावत होते. व्यायाम, रनिंग, मानसिक कणखरता या बळावर मिलिटरी भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या कष्टाचे चीज झाले. त्याचे भाऊ, तसेच चुलते यांचे सहकार्य त्याला लाभले. गेल्या वर्षी सुवर्णपदक हुकले आता तो अजिंक्य होऊन भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारच असे त्याचे चुलते बाळासाहेब भोकनळ तसेच ग्रामस्थ मधुकर वाघचौरे यांच्यासह साऱ्या गावाला वाटतंय.

आई दवाखान्यात अॅडमिट दत्तू देशासाठी थेट दक्षिण कोरियात पोहचलाय मात्र, त्याची आई पुण्यात मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढते आहे. देशाला सुवर्ण मिळवून देऊन आईचे देशाचे स्वप्न त्याला साकार करायचे आहे.

दत्तू एक आदर्श मुलगा आणि लढवय्या खेळाडू आहे. त्याची कहाणी सर्वांना प्रेरणादायी आहे. आमच्या गावाचे तो भूषण आहे. त्याला गावाकडून शुभेच्छा - मधुकर वाघचौरे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहीर खोदण्यास बंदी!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

पाण्यासाठी माणूस जम‌िनीच्या पोटात ढवळाढवळ करत आल्याने भूजल पातळी खालावली. माणसाच्या या अधाशीपणामुळे व लहरी निसर्गामुळे नाशिक विभागातील एकूण तीनशे पाणलोट क्षेत्रांपैकी दोन पाणलोट क्षेत्र भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून क्रिट‌िकल झोन तर ३९ सेमी क्रिट‌िकल व ३४ ओव्हर एक्सप्लोईटेड झोन म्हणून घोष‌ित करण्यात आले आहेत. या झोनमध्ये यापुढे आता बोअरवेल अथवा विहीर खोदण्यास बंदी असणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील तापी, गोदावरी, सीना, पुर्णा-तापी व भीमा या नद्यांच्या खोऱ्यातील ३०० पाणलोट क्षेत्रांपैकी तब्बल ७५ पाणलोट क्षेत्रांचा घसा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थ‌िती अशीच राहिली तर, या भागाचे येत्या काही वर्षांत वाळवंटात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सरकारने २०० फुटांवरील बोअरवेल करण्यास बंदी असलेल्या अधिनियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील भूजल पातळी खालावली आहे. भूजल पातळीच्या निकषावर नाशिक विभागात एकूण ३०० पाणलोट क्षेत्र आहेत. त्यापैकी केवळ २२५ पाणलोट क्षेत्र सुरक्षित पाणलोत क्षेत्र राहिलेले आहेत. तर उर्वरीत ७५ पाणलोट क्षेत्रांतील भूजल पातळी घटल्याने अशा पाणलोट क्षेत्रात आता विह‌िरी व बोअरवेल घेण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अॅक्ट २००९ (सुधारीत आवृत्ती २०१३) नुसार बंदी घातली आहे.

या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांस आता आर्थिक दंड, तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे .नाशिक विभागातील नंदुरबार हा असा एकमेव जिल्हा आहे के जेथे सर्व पाणलोट क्षेत्रे अजून सेफ झोनमध्ये मोडतात. भूजलपातळी खालावण्यास विहिरींची बेसुमार वाढलेली संख्याही कारणीभूत असते. तापी नदीच्या खोऱ्यातील दोन पाणलोट क्षेत्र तर क्रिट‌िकल झोन म्हणून घोष‌ित झालेले आहेत. भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेच्या आकडेवारीनुसार तापी व गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळी खालावण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिन्नर तालुक्याला चारा, पाणी द्या’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील दुष्काळी रहिवाशांना माणसी १० ते १५ लिटर पाणी अधिक द्यावे, वावी आणि दोडी उपबाजार समित्यांमध्ये तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात यांसह विविध मागण्या सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या दोन-तीन दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही कोकाटे यांनी दिला आहे.

सोमवारी सिन्नर तालुक्यातील ६० ते ७० शेतकऱ्यांनी कोकाटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेतली. सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त रहिवाशांचे गाऱ्हाणे कुशवाह यांच्याकडे मांडण्यात आले. सध्या तालुकावासियांना प्रतिमाणसी २० लिटर पाणी मिळते. तेवढ्या पाण्यात स्वयंपाक, अंघोळ या दैनंदिन गरजा रहिवाशांनी कशा भागवायच्या, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. ४०हून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केल्याने काही काळ येथे तणावाची परिस्थिती होती. सिन्नर तालुक्यातील शेतकरी, जनावरांच्या प्रश्नांवर तब्बल २० मिनिटे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

तालुक्यात पाण्याची अत्यंत कमतरता आहे. आठ आठ दिवस रहिवाशांना अंघोळीला पाणी मिळत नाही, याकडे कुशवाह यांचे लक्ष वेधण्यात आले. दरमाणसी १० ते १५ लिटर अधिक पाणी देण्याबाबत तातडीने तहसीलदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही कुशवाह यांनी कोकाटे यांना दिली.

अनेक रहिवाशांचे संसार दूध दुभत्या जनावरांवर अवलंबून आहेत. मात्र, या जनावरांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यांना पुरेसा चारा नसल्याची व्यथाही जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. चारा पाण्याअभावी जनावरे कशी जगवायची असा सवाल उपस्थित करण्यात आला. आज सायंकाळपासूनच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही कुशवाह यांनी दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. दोडी व वावी येथील उपबाजार समित्यांमध्ये तत्काळ चारा छावण्या सुरू करा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर हा निर्णय घेणे शक्य नाही. वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.

तालुक्यात अनेक टँकर नादुरूस्त आहेत. त्यामुळे अनेक वाड्यांवर तीन ते चार दिवस पाणी मिळत नाही. काही गावांत बाराही महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तहसीलदार आणि तत्सम अधिकाऱ्यांनी तालुक्यातील या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी आमची अपेक्षा आहे. हलगर्जीपणा न करता सुविधा पुरवाव्यात.

-माणिकराव कोकाटे, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपाटीलपदाच्या परीक्षेत गैरप्रकार?

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागांसाठी झालेल्या लेखी परीक्षेत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप करत नवे निरपूर येथील सहा महिला परीक्षार्थी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

रविवारी येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा सुरू असतांना एका अज्ञात इसमाने ब्लॉक नं. ९ मध्ये येऊन निरपूर येथील एका महिला परीक्षार्थीला प्रश्नांची उत्तरे सांगण्यास मदत केली. संबंधित उपषोणकर्त्या परीक्षार्थिंनी याबाबत पर्यवेक्षकांकडे तक्रार केल्यावर त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. तसेच परीक्षेचे चित्रण करणाऱ्या कॅमेरामननेही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. परीक्षा संपल्यावर तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यांनीही आमचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे संपूर्ण परीक्षा नव्याने घेण्यात यावी तसेच संबंधित पर्यवेक्षकाला निलंबित करून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तीस अपात्र ठरविण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर रत्नाबाई सूर्यवंशी, प्रतिभा सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, सोनाली सूर्यवंशी या सहा परीक्षार्थी आपल्या पतीसह उपोषणास बसल्या आहेत.

याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एका वर्ग खोलीत २४ परीक्षार्थी असतांना एकाच गावातील सहा उमेदवारांकडून तक्रार येणे हे विशेष आहे.

- अश्विनीकुमार पोतदार, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नासाका’ सुरू करण्यासाठी कामगार-सभासद आक्रमक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

कारखाना कार्यक्षेत्रात तब्बल दोन लाख मेट्र‌िक टन ऊस उपलब्ध असूनही केवळ संचालक मंडळाच्या दूरदृष्टीहीन कामकाजामुळे कारखाना १०० कोटींच्या कर्जात बुडाला आहे. यापुढील हंगामात कारखाना सुरू करण्यासाठी कामगार कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचा एकमुखी ठराव नासाकाच्या कार्यस्थळावर झालेल्या कामगार व सभासदांच्या मेळाव्यात करण्यात आला.

नासाका कार्यस्थळावर कामगार नेते कॉ. विष्णुपंत गायखे यांच्या उपस्थितीत कामगार व सभासदांचा मेळावा झाला. यावेळी विष्णुपंत गायखे यांनी कारखान्याची सद्यस्थिती व यापुढे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने निश्चित धोरणाबाबत माहिती दिली. तीन हंगांमापासून नासाका बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व कारखान्यावर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत याचे भीषण वास्त्व कामगार व सभासदांपुढे मांडले. यापुढील काळात जर कारखाना सुरू करावयाचा असेल तर शासनदरबारी आपली भूम‌िका मांडणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित सर्व कामगारांनी एकमुखी पाठिंबा दिला. कारखान्याच्या सेवेतून निवृत्त झालेल्या २३ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास कामगार युनियनचे पदाधिकारी, शेतकरी व सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी विकास’चा झेंडा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार अनिल कदम, माजी सभापती जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी विकास पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत अकरा जागांवर विजय पटक‌ाविला. विरोधी विद्यमान सभापती नानासाहेब पाटील, सुरेशबाबा पाटील, राजाराम पानगव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखालील आपलं बळीराजा पॅनलला अवघ्या सात जागांवरच समाधान मानावे लागले.

लासलगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. एकूण २०७८ पैकी २०५४ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.८४ टक्के इतके मतदान झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता निफाड येथील बाजार समिती सभागृहात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

फेरमोजणीमुळे तणाव

या निवडणुकीत पंचायत समिती सभापती सुभाष कराड १६ मते मिळून विजयी झाल्यानंतर प्रतिस्पर्धी बबन सानप यांनी फेरमोजणीची मागणी केली. फेरमोजणीनंतर कराड यांना दोन मते अधिक मिळाली. तर, सोसायटी गटात शेतकरी पॅनलचे विजय सदाफळ ६ मतांनी पराभूत झाल्यानंतर त्यांनीही फेरमतमोजणीची मागणी केली. यावेळी मतमोजणी कक्षात चांगलीच बाचबाची झाली. अखेर बळीराजा पॅनलचे मोतीराम मोगलच निवडून आले.

वैकुंठ पाटील विजयी

या निवडणुकीत जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, नानासाहेब पाटिल,राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, भास्करराव पानगव्हाणे यांचा पुन्हा प्रवेश झाला आहे. तर, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे युवा नेतृत्त्व वैकुंठ पाटील यांच्या विजयाने विनायकदादा व सुरेशबाबा पाटील यांच्या परिवाराला यश मिळाले आहे. सोमवारी दिवसभर लासलगाव शहरात सोशल मीडियावर या निकालाविषयी चर्चा सुरू होती



हमाल-मापारी गट

रमेश पालवे २३७ (शेतकरी विकास, २३७)

संजय वाघचौरे (अपक्ष, ९४)


व्यापारी मतदारसंघ

सचिन ब्रह्मेचा (शेतकरी विकास, २२५, विजयी)

नंदुकुमार डागा (आपला बळीराजा २०३, विजयी)

न्यानेश्वर गांगुर्डे (शेतकरी विकास, १५८, पराभूत)

शिवाजी कदम (आपला बळीराजा, १५१, पराभूत)


अनुसूचीत जाती जमात

अनिता सोनवणे (आपला बळीराजा, ३७१)

सचिन पवार (शेतकरी विकास, १५३)

सर्वसाधारण गट

नानासाहेब पाटील (आपला बळीराजा, ३८४ विजयी)

वैकुंठ पाटील (आपला बळीराजा ३५५ विजयी)

साहेबराव पानगव्हाणे (शेतकरी विकास २०७)

मंगल चिताळकर (शेतकरी ९८)

विमुक्त जाती भटक्या जमाती(रा)

सुभाष कराड (शेतकरी विकास ३६२)

बबनराव सानप (आपलं बळीराजा ३४६)


आर्थिक दुर्बल गट

संदीप दरेकर (शेतकरी विकास २७२)

शिवाजी जाधव (आपलं बळीराजा, २६०)

सोसायटी मतदार (इमाव)

अशोक गवळी (शेतकरी विकास ३८२)

राजेंद्र दरेकर (आपलं बळीराजा ३५१)


सोसायटी महिला राखीव गट

सुवर्णा जगताप (आपलं बळीराजा ४३६, विजयी)

प्रीती बोरगुडे (शेतकरी विकास ३७०, विजयी)

पूजा गाजरे (शेतकरी विकास ३०६)

शोभा शिंदे (आपलं बळीराजा ३०१)


सोसायटी सर्वसाधारण
जयदत्त होळकर (शेतकरी विकास ४१६)

बाळासाहेब क्षीरसागर (शेतकरी विकास ४०७)

शिवनाथ जाधव (शेतकरी विकास ४०३)

पंढरीनाथ थोरे (शेतकरी विकास ४०२)

राजेंद्र डोखळे (शेतकरी विकास ३९१)

भास्करराव पानगव्हाणे (आपलं बळीराजा ३४४)

मोतीराम मोगल (आपलं बळीराजा ३२५, सर्व विजयी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीप्रकरणी चौकशीसाठी सचिव देवरा उद्या नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

आदिवासी विकास महामंडळात झालेल्या नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीसासाठी आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा हे बुधवारी नाशिकमध्ये येत आहेत. दरम्यान, या भरतीप्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार एका उमेदवाराने सटाणा पोल‌िसात दाखल केली आहे. या भरतीप्रकरणी आक्षेप असणाऱ्यांनी बुधवारी देवरा यांची भेट घ्यावी, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले आहे.

आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास व वित्त महामंडळात ३६१ जणांची नोकरभरती करतांना तीनशे कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांना दिले आहेत. त्यामुळे देवरा बुधवारी चौकशीसाठी नाशिकमध्ये येत आहे. आपला नियम‌ित दौरा असल्याचा दावा दौरा यांनी केला असला तरी, चौकशीसाठीचे ते नाशिकमध्ये येत आहे. सचिव देवरा मंगळवारी आदिवासी मंत्री विष्णू देवरा यांची भेट घेणार आहेत. बुधवारी महामंडळातील अधिकाऱ्यांची झाडाझडती करणार आहेत. दरम्यान, या भरती प्रकरणातील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता पोल‌िसात पोहोचले आहे. या भरतीप्रकरणात पैसे मागितल्याची तक्रार एका उमेदवाराने सटाणा पोल‌िसात दिली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले त्यांच्या नावानीशी त्यांनी तक्रार केली असून या विभागातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम संघटनांकडून निर्णयाचे स्वागत

$
0
0

बडा कब्रस्तान बॉम्बस्फोट प्रकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरातील बडा कब्रस्थान येथे ८ सप्टेंबर २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आठ संशयितांची मुंबईच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ही बातमी सोमवारी मालेगावी पोहचतात विविध राजकीय पक्ष, मुस्लिम संघटना, धर्मगुरूंकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

सन २००६ साली येथील बडा कब्रस्तान येथे शबे-ए-बरात उत्सवाच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यात २५ जण ठार, तर १०२ जण जखमी झाले होते. या प्रकरणी नुरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद या नऊ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

निहाल अहमद यांनी या तरुणाच्या मुक्ततेसाठी मालेगाव निधर्मी राजकीय विचार संघटना देखील स्थापन केली होती. सन २००६ पासून या संघटनेच्या माध्यमातून या नऊ मुस्लिम तरुणांची सुटका व्हावी यासाठी विविध आंदोलन, धरणे, उपोषण करण्यात आले होते. या प्रकरणातील मुस्लिम तरुणांची निर्दोष मुक्तता झाल्याचा निकाल येताच येथील जनता दल पक्ष कार्यालय आवारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला. तसेच मिठाई वाटली. सायंकाळी शहरातील सर्व प्रमुख मशिदीतून मुस्लिम धर्मगुरूंनी या निर्णयाची माहिती दिली.

२९ तारखेला आभारसभा या प्रकरणात सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येत्या २९ तारखेला बॉम्बस्फोट झालेल्या बडा कब्रस्थान या ठिकाणीच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती जनता दल नगरसेवक बुलंद इकबाल यांनी 'मटा' शी बोलतांना दिली.

निर्दोष असलेल्या मुस्लिम तरुणांना बॉम्ब स्फोट प्रकरणी न्याय मिळवा, यासाठी निहाल अहमद यांनी संघर्ष सुरू केला होता. तपास यंत्रणांनी याबाबत निष्पक्ष राहावे, अशी भूमिका सातत्याने घेतली गेली. न्यायालयाच्या निर्णयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. दहशतवादाला राजकीय, धार्मिक रंग देऊ नये. या प्रकरणात दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी. -बुलंद इक्बाल, जनता दल नगरसेवक

या प्रकरणामुळे तरुणांचे आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान झाले आहे. या तरुणांना बॉम्ब स्फोट प्रकरणात गोवणाऱ्यांना कारवाई व्हावी. मुस्लिम तरुणांना ५० लाखांची मदत करावी. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. - आसिफ शेख, आमदार, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार शेतकऱ्यांना दिली जगण्याची उमेद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी, गारपीट, नापिकी आणि कर्जाचा डोंगर यांसारख्या संकटांमुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या साडे तीन महिन्यात आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. ही संख्या यंदा २१ पर्यंत पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १५०० शेतकऱ्यांचे समुपदेशन केले आहे.

शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जात असले तरी हजारो शेतकरी कुटुंब दरिद्री अवस्थेत जीवन कंठत आहेत. अवकाळी, गारपीटीसारखी आसमानी संकटे, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढासळतो आहे. त्यातूनच ते आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ लागले आहेत. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. निफाडसारख्या बागायती तालुक्यात सर्वाधिक ६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सिन्नरमध्ये (४), कळवण, बागलाण, नांदगावात प्रत्येकी दोन, चांदवड, मालेगाव, देवळा, दिंडोरी, येवला या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग अवलंब‌िला आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक १० आत्महत्या झाल्या आहेत. फेब्रुवारीत पाच तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये प्रत्येकी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

समुपदेशनातून मनोबल वाढेल

शेतकऱ्यांचे मनोबल उंचाव‌िण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी जिल्हाप्रशासनाने शेतकरी समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. देवळा, बागलाण, मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये शिबिर घेण्यात आली असून तब्बल दीड हजार शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. सरकार खंबीरपणे शेतकरी कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिब‌िरांमधून दिला जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध सरकारी योजनांची माहिती दिली जात आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिव सरकारच्या विविध योजना शेतकरी, ग्रामस्थांपर्यंत पोहोचवित आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांशी इतरांनी संवाद वाढवून त्याला धीर देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. संवादातून संत साहित्यातील विचारांचे आदान-प्रदान वाढल्यास अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images