Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासी कन्यांचेही ता थैइ थैइ तत्!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : कोणतीही कला ही खेड्यात जास्त बहरते, असे म्हणतात आणि याच कलेला शास्त्राची जोड मिळाली तर तो कलाकार निश्च‌ितच नावारुपाला येतो. आदिवासी भागातील मुली आपल्या पारंपरिक लोकनृत्याची जपणूक करीत कथकचे धडे गिरवू लागल्या आहेत. आदिवासी कन्या कविता राऊतने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात नाव कमावल्यानंतर आता नृत्याच्या क्षेत्रातही आदिवासी कन्या नाव कमावण्यासाठी सज्ज होत आहेत. आदिवासींमध्ये कलेचे भांडार आहे. त्यंच्याकडे असलेली वारली चित्रशैली, तारपा नृत्य याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. याच पारंपरिकतेची जपणूक करीत आदिवासी महिला आता जव्हार, मोखाडा, खोडाळा या सारख्या भागात कथकचे धडे गिरवू लागल्या आहेत. सामान्य खेळाडूंपेक्षा आदिवासी खेळाडू जास्त काटक असल्याने कविता राऊतसारख्या खेळाडूने मिळवलेले यश सर्वश्रुत आहे. याच शारीरिक क्षमतेचा फायदा कथकसारख्या नृत्य प्रकारात झाला तर तीदेखील बहरेल या हेतूने नाशिकच्या कीर्ती कलामंद‌िराच्या नृत्यगुरू रेखा नाडगौडा यांनी जव्हार मोखाडा, त्र्यंबक इत्यादी परिसरातील ३५ मुली शोधून त्यांना कथकचे धडे देण्यास सुरुवात केली. यापैकी काही मुलींनी थोड्याच कालावधीत लक्षणीय प्रगती केली असून, शहरातल्या मुली सलग चार तास नृत्य असतील तर या मुली न थकता सलग आठ तास नृत्य करीत आहेत.

जव्हारमध्ये फक्त मुलीच नाही तर तेथील सुनादेखील हा नृत्य प्रकार काय आहे, हे जाणून घेण्यासाठी क्लासला येत आहेत. जव्हार मोखाडासारख्या भागात गांधर्व महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र नसल्याने त्यांना नाशिकला येऊन परीक्षा द्यावी लागत आहे.

शहरातील मुलींच्या तोडीस तोड या मुली नृत्याचे धडे गिरवीत आहेत. येत्या काही दिवसांत जव्हारसारख्या ठिकाणाहून अनेक मुली विशारद झालेल्या दिसतील.

रेखा नाडगौडा, नृत्यगुरू

चित्रपटात कथक पाहिले होते. त्यामुळे याबाबत जाणून घ्यावे, अशी इच्छा होती. सुरूवातीला थोडे अवघड गेले, मात्र नंतर नृत्य जमू लागल्यावर आवड निर्माण झाली.

साक्षी भगत, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वस्त सोने पडले असते महागात!

$
0
0

इगतपुरीतील दोन तरुणांना डांबले तिघांनी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

कोणताही मोह कसा संकटात नेतो याचा अनुभव इगतपुरी तालुक्यातील घोटी व माणिकखांब येथील दोन युवकांना आला. स्वस्त सोने खरेदीच्या मोहापायी पंजाबला जातो, असे सांगून गेलेल्या युवकांना उत्तर प्रदेशात अज्ञात आरोपींनी डांबून ठेवले होते. दरम्यान, सोने खरेदीसाठी पैसे नसल्याने ते दोघे युवक संकटात सापडले. संशयित आरोपींनी त्या दोघा युवकांच्या घरी फोन करून खात्यावर रक्कम टाकली तरच तुमच्या मुलांची सुटका होईल असे सांगितले होते. पोलिसांनी सतर्कता बाळगत तपासाची चक्रे गतीने फिरवत खात्यात रक्कम टाकली. ही रक्कम एटीएममधून काढून घेण्याच्या प्रयात्नात उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने एक संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला, मात्र दोघे मात्र फरार झाले. त्याच दरम्यान संशयितांच्या ताब्यात असलेल्या त्या दोघा युवकांनी गनिमी काव्याने पळ काढून थेट घोटी गाठली.

माणिकखांब येथील संतोष पांडूरंग आडोळे (वय ३२) व घोटी येथील सखाराम देविदास शिंदे (वय ३८) या दोन युवकांना महिनाभरापूर्वी उत्तरप्रदेश येथून अज्ञात आरोपींचा फोन आला की, आमचे जुने घर बांधकामात आम्हाला घराखाली सोने सापडले असून, ते सोने आम्हास स्वस्तात विकायचे आहे. तरी आपणास ते विकत घ्यावयाचे असेल तर तुम्ही येथे या व सोने विकत घ्या. यावरून हे दोघे युवक मथुरा उत्तरप्रदेश येथे जाऊन सोन्याची खातरजमा केली होती. त्यातील एका वृद्धाने सोन्याचा छोटासा तुकडा या युवकांना देवून खात्री करण्यास सांगितले होते. या दोघांनी घोटीत येऊन तो सोन्याचा तुकडा दोन हजार रुपये किमतीस विकला. यावरून सदर सोने खरे असल्याची खात्री पटली होती.

या घटनेत संतोष व सखाराम जेथे डांबून ठेवले होते तेथून मोठ्या शिताफीने निसटले व २८ एप्रिल रात्री रेल्वेने इगतपुरी स्टेशन गाठले. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस दोघा युवकांना विश्वासात घेत या प्रकरणाचा उलगडा केला. गुन्ह्याच्या तपासासाठी घोटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गणेश शेळके व हवालदार संदीप शिंदे हे उत्तरप्रदेश मथुरा येथे रवाना झाले. त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या सहाय्याने एका आरोपीस त्याब्यात घेतले असून, दोन आरोपी फरार आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर अधीक्षक प्रशांत मोहिते, उपअधीक्षक डी. एस. घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर नवले, घोटीचे निरीक्षक प्रभाकर पाटील, यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे व घोटी पोलिसांचे पथक यांनी संयुक्तरित्या तपासाची गतिमान चक्रे फिरवत उत्तरप्रदेश पोलिसांचे सहकार्य घेत या अपहरण प्रकरणाचा छडा लावला.

असा घडला प्रकार सोने स्वस्तात घ्यावयाचे असेल तर लवकर या असा फोन येताच संतोष व सखाराम हे दोघे युवक स्वस्त सोने व कमी भावाच्या मोहापायी पंजाब येथे फिरावयास जातो असे सांगून, २५ एप्रिल रोजी घरातून निघून गेले. परंतु, दोघे उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आरोपीच्या गावी सोने विकत घेण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर सोने पाहिले, परंतु आम्ही रोख रक्कम आणली नाही, असे सांगितले. त्यामुळे हे दोघे युवक काहीतरी वाईट हेतूने येथे आले असल्याची शंका त्या अज्ञात आरोपींना झाली. त्यांनी संतोष आडोळे व सखाराम शिंदे यांना डांबून ठेवले. त्यांच्या पालकाकडे रोख रक्कमेची मागणी केली. चार लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यामध्ये भरावयास सांगितले. यामुळे या तरुणाच्या पालकांनी पोलिसाशी संपर्क साधला. पोलिसांनी मोबाइल नंबरचा धागा पकडून त्या आरोपींचे कॉल कोठून आले याचा तपास लावला. उत्तरप्रदेश पोलिसांच्या सहकार्याने व आरोपीच्या बँक खाते नंबरच्या सहाय्याने एटीएममधून रक्कम काढत असताना एका संशयिताला सापळा रचून अडकवले. इतर दोघे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार परत घेऊन पैसे द्या

$
0
0

टाटा मोटर्सला न्यायालयाचा दणका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिका कार वारंवार रिपेअरिंगला देऊनही ती दुरुस्त होत नसल्याने ही कार परत घेऊन ग्राहकाला पैसे द्या, असे आदेश ग्राहक न्यायालयाने टाटा मोटर्सला दिले आहेत. वाहन घेतल्यापासून घसाऱ्याची रक्कम वजा करून सात टक्के व्याज, मानसिक व आर्थिक त्रासापोटी पाच हजार रुपये आणि कोर्ट फीचे तीन हजार रुपयेही ग्राहकाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काही गाड्यांबाबत मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो. त्यामुळे अनेक ग्राहक कंपनीकडे त्याबाबत तक्रार करता काहींना दिलासा मिळतो, तर काहींची निराशा होते. इंडिका कार विकत घेणाऱ्या पचंवटीतील विनोद दौलतराव शिंदे यांनीही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टचा फटका बसला. त्यांनी पाच सप्टेंबर २०१४ रोजी टाटा कंपनीची इंडिका इव्ही -२ एलएक्स या मॉडेलची सीआर ४ असलेली गाडी विकत घेतली. ही गाडी घेतल्यानंतर सहा महिन्यात चौथी फ्री सर्विस संपताच गाडीत विविध समस्या समोर आल्या. त्यात झटके मारणे, पिकअप न घेणे, इंजिन लाईट लागणे, अशा समस्या वारंवार होऊ लागल्या. ही गाडी दुरुस्तीला देऊनही गाडी रिपेअर होत नव्हती. त्यामुळे शिंदे यांनी २२ मे २०१५ रोजी ग्राहक न्यायालयात तक्रार केली. त्यानंतर ११ महिन्यानंतर न्यायमंचाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून जिल्हा न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी, सदस्य कारभारी जाधव यांनी हा निकाल दिला. शिंदे यांच्या बाजूने अॅड. तानाजी संपतराव थेटे यांनी युक्तीवाद मांडला.

ग्राहक न्यायालयाने मला न्याय दिला आहे. या निकालाचा इतरांनाही फायदा होईल. ग्राहकांनी अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागायलाच हवी. - विनोद शिंदे, तक्रारदार ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत पॅनकार्ड क्लबवर दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील पॅनकार्ड शाखेवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सहा लाखांची रोकड लुटून नेली. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर बुधवारी भरदिवसा हा प्रकार घडला. दरोडेखोरांनी पोलिसांनी आव्हान दिले असून, पोलिस दरोडेखोरांचा समाचार घेणार का याकडे नाशि‌ककरांचे लक्ष लागले आहे.

विक्रम विजय अरिंगळे (वय ३६, रा. नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. निमाणी समोरील सूर्या आर्केडमधील दोन गाळ्यांमध्ये पॅनकार्ड क्लब शाखेचे कार्यालय आहे. बुधवारी सकाळी अकरा ते पावणेबारा या कालावधीत पाच संशयित हत्यारांसह या कार्यालयात आले. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून त्यांनी कार्यालयाच्या काऊंटरवरील कॅशिअरच्या केबिनच्या काचा फोडल्या. कार्यालयामध्ये दहशत पसरवून ते विशिष्ट क्रमांकाच्या खात्यावरील पैशांची मागणी करू लागले. त्यानंतर त्यांनी कॅशिअर जवळील तसेच कार्यालयातील तिजोरीतील सहा लाख आठ हजार १०० रुपयांची रोकड बळजबरीने लुटून नेली. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. घडलेला प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. हे फुटेज तपासून एवढी मोठी रक्कम लुटून नेल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिस दलात खांदेपालट

$
0
0

जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले असून, तब्बल २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर निघाली आहे. पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, लवकरच पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होतील, असे संकेत पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांनी दिले आहेत.

एप्रिल आणि मे महिन्याच्या हंगामात सर्वसाधारपणे बदल्यांच्या ऑर्डर निघतात. ग्रामीण पोलिस दलातही यंदा मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. काही बदल्या पोलिस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही बदल्या पोलिस अधिकाऱ्यांचा संबंधीत पोलिस स्टेशनमधील कार्यकाळ संपल्यामुळे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रामीण पोलिस दलातील नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनचे कारभारी म्हणून बक्षिसी मिळाली आहे. यामध्ये मुकुंद देशमुख यांना त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये, तर इंद्रजित विश्वकर्मा यांना मालेगाव छावणी पोलिस स्टेशनचे निरीक्षक म्हणून रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. मालेगावमधील काही विद्यमान पोलिस निरीक्षकांना जिल्ह्यात अन्यत्र न हलविता मालेगावातीलच अन्य पोलिस स्टेशनमध्ये रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नांदगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची मालेगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पेठ येथील निरीक्षक विठ्ठल ससे यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. वाडीवऱ्हे येथील विद्यमान पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांची ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेत, तर वडनेरभैरव येथील सहायक निरीक्षक चंदन इमले यांची मनमाड उपविभागाच्या वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे. वाडीवऱ्हे येथील सहायक निरीक्षक सुहास राऊत यांना ग्रामीण पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकात रूजू होण्यास सांगण्यात आले आहे.

अधिकाऱ्याचे नाव नियुक्तीचे ‌ठिकाण

मधुकर गावित- दिंडोरी पोलिस स्टेशन, संजय शुक्ला इगतपुरी पोलिस स्टेशन, भागवत सोनवणे - मालेगाव छावणी पोलिस स्टेशन, सुधाकर कसबे - विशेष शाखा, मालेगाव, अंकुश इंगळे - मालेगाव किल्ला पोलिस स्टेशन, बाबासाहेब ठोंबे - नियंत्रण कक्ष मालेगाव, संदीप कोळेकर - आर्थिक गुन्हे शाखा, विठ्ठल ससे - पोलिस अधीक्षक कार्यालय, हरिभाऊ कोल्हे - एम.आय.डी.सी. सिन्नर, सुजय घाटगे - कळवण पोलिस स्टेशन, अरुण निकम - नांदगाव पोलिस स्टेशन, पुंडलीक सपकाळे - मनमाड पोलिस स्टेशन, मनोहर पाटील - विशेष शाखा, मुकुंद देशमुख - त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन, इंद्रजित विश्वकर्मा - मालेगाव छावणी पोलिस स्टेशन, चंदन ईमले - वाचक, मनमाड उपविभाग, गजेंद्र पाटील - मनमाड पोलिस स्टेशन, सुरेश मनोरे - वाडीवऱ्हे पोलिस स्टेशन, सुहास राऊत - दंगल नियंत्रण पथक, नितीन पाटील - वडनेर भैरव पोलिस स्टेशन, रंगनाथ सानप - वाचक निफाड उपविभाग, जनार्दन सोनवणे - लासलगाव पोलिस स्टेशन

दरवर्षीप्रमाणेच यंदा एप्रिल मे महिन्यात झालेल्या या साधारण बदल्या आहेत. काही अधिकाऱ्यांचा संबं‌धित पोलिस स्टेशनमधील कार्यकाळ पूर्ण होणे बाकी होते, तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. उपनिरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांच्याही बदल्यांच्या ऑर्डर निघतील परंतु, भरती प्रक्रियेमुळे त्यास थोडा वेळ लागेल. - संजय मोहिते, पोलिस अधीक्षक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

$
0
0

बागलाण तालुक्यात टँकर सुरू करण्याची वाढती मागणी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी सुमारे दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे या परिसरात तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

बागलाण तालुक्यातील १७९ गावांपैकी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची स्थिती जेमतेम असली तरीही आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यासह मोसम खोरे, काटवन परिसरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गत दोन महिन्याच्या काळात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे थोड्याशा प्रमाणात पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले असले तरीही आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून या म्हणीनुसार आदिवासी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

तालुक्यातील भवाडे येथे काही वर्षांपूवी भारत निर्माण योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आठ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी काही टक्केच रक्कम विकासावर खर्च झाली असून, विहिरीचे काम अपूर्ण ठेवल्याने कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साल्हेर, मुल्हेर, गोळवाड, वाघंबा, पिसोळ, भाटांबे परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोघा धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून, या दोघा धरणातील दोन आर्वतने शेती व पिण्यासाठी देण्यात आलेले आहेत. सटाणा शहरासाठी गत पंधरवाड्यातच चणकापूरचे एक आर्वतन दिल्याने एक दिवसाआड पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्रात देखील थोडेच पाणी शिल्लक असल्याने सटाणा शहरात येत्या आठवड्याभरात दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरणबारी धरणामुळे मोसम खोऱ्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत नसली तरी नामपूरसह काटवन परिसरात अनेक गावांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तळवाडे, देवळाणे, सुराणे, अजमीर सौंदणे या ठिकाणी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याने मोठ्या प्रमाणात टँकरची ओरड होऊ लागली असली तरीही एक टँकरद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.

पिण्याचे पाण्याचे १६ टँकर सुरू

तालुक्यात सद्यस्थितीत १६ पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू असून, तिसऱ्या टप्प्यात सहा टँकर सुरू करण्यात येणार आहेत. एकूण २२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. टँकरसाठी आणखी प्रस्ताव दाखल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाचे पहिले एटीएम मालेगावकरांच्या सेवेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारतीय डाक विभागातर्फे मालेगाव प्रधान डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या एटीएम सेवेमुळे ग्राहकांना बचत खात्यावरील पैसे काढण्याबरोबरच खात्यातील शिल्लकेचा तपशील, पिन नं. बदलणे इत्यादी सुविधांचा लाभ मिळणार आहे.

भारतीय डाक विभागातर्फे मालेगाव प्रधान डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या एटीएम सेवेचा लोकार्पण सोहळा डाकघरचे अधीक्षक ल. ई. सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला. यावेळी मालेगाव डाकविभागातील सर्व डाक निरीक्षक, पोस्टमास्तर, प्रतिष्ठित नागरीक, ग्राहक, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आदी उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले की, ग्राहकांसाठी कोर बँकिंग प्रणाली अंतर्गत एटीएम सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. डाक सहाय्यक एम. व्ही. दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहाय्यक अधीक्षक बी. ए. पगार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या सुविधा मिळणार
खात्यातून पैसे काढणे, पीन बदलणे, खात्याची शिल्लक तपासणे, स्टेटमेंट, ट्रान्सफर, दिवसाला किमान २५ हजार रुपये काढता येणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडेवाडीतील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

पाचशे ते सहाशे लोकवस्तीच्या मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांनी शाळेला देणगीरूपाने केलेली आर्थिक मदत इतरांनाही प्रेरणादायी आहे. शाळेतील शिक्षकांनी उल्लेखनीय शाळा सुधार जमा करून प्राप्त परिस्थितीत कौतुकास्पद कामकाज केले आहे, असे गौरवोद्गार जोपूळ बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एन. निकम यांनी घोडेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या डिजिटल वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

डिजिटल वर्गाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती भास्करराव भगरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, आंबेवणी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचीत सदस्य तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास मातेरे, माजी उपसरपंच अशोक वडजे, जोपूळ केंद्राचे केंदप्रमुख एस. एन. देवरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कडाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांचे व शिक्षकांचे कौतुक करून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्करराव भगरे यांनी दिले.

उपशिक्षक विलास जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक आनंदराव गांगोडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका शोभा पाटील, पुंडलिक घोडे, अजय घोडे, खंडू भांगले, सचिन जाधव, प्रतिक घोडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदींनी केले सावरपाडा एक्स्प्रेसचे कौतुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सावरपाडा एक्स्प्रेस अर्थात कविता राऊत हिच्या पाठीवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाची थाप पडली आहे. प्रथमच ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या कविताने खासदार डॉ. हिना गावित यांच्यासमवेत नवी दिल्लीमध्ये पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी कविताचे तोंड भरून कौतुक करतानाच पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छाही दिल्या.

शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमदार हिना गावित आणि कविता राऊत यांनी मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी कविता राऊत यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती जाणून घेतली.

गोहत्ती येथे बाराव्या साऊथ एशियन गेम्समध्ये महिलांच्या ४२ किमी मॅरेथॉन प्रकारात कविताने प्रथम क्रमांक मिळवला होता. तिच्या या यशाबरोबरच तिचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभागही निश्चित झाला होता. कविताने ४२ किलोमीटर अंतर २ तास ३८ मिनिटे ३८ सेकंदात पूर्ण करून यशाला गवसणी घातली.`सावरपाडा एक्स्प्रेस`च्या या यशामुळे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाल्याची भावना नाशिकमधील खेळाडूंनी व्यक्त केली होती. कविताला अनेक दिवसांपासून हुलकावण्या देणारे यश पदरात पडल्याने नाशिकच्या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला होता. खुद्द पंतप्रधानांनी कविताची भेट घेतल्याने नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला. नुकत्याच झालेल्या `मन की बात` या कार्यक्रमात खेळाला प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला. ठरलेल्या वेळेपेक्षा त्यांनी खूप वेळ देत माहिती जाणून घेतली. त्यांच्या भेटीमुळे निश्चित बळ मिळाले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये निश्चित चांगली कामगिरी करून दाखवेल. - कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: एसआरपीएफ कमांडरची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

धुळ्यातील राज्य राखीव पोलिस दलातील प्लाटून कमांडर उत्तम मारूती धनवटे यांनी पोलिस अकादमीतील राहत्या खोलीत रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. धनवटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

एसआरपीएफची एक तुकडी १६ एप्रिलपासून नाशिकमध्ये अकादमीच्या बंदोबस्तासाठी तैनात आहे. धनवटे एसआरपीएफच्या तुकडी क्रमांक सहाचे प्रमुख होते. शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांनी अकादमीतील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

धनवटे यांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानके होणार चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उन्हाळी सुटीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असली तरी तेथील अस्वच्छता पाहून प्रवाशांची निराशा होते. म्हणूनच राज्यातील सर्व बसस्थानके, तेथील स्वच्छतागृहे, बसेस यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी १ मे पासून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या आदेशांमुळे नाशिक विभागही या अभियानासाठी सज्ज झाला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे बिरुद घेऊन राज्यभर फिरणाऱ्या एसटीला मोठा प्रवाशी वर्ग लाभला आहे. मात्र महामंडळाची आगारे, बसस्थानके अस्वच्छ असल्याचा प्रवाशांचा सार्वत्रिक अनुभव आहे. यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रवाशी देखील जबाबदार आहेत. याची जाणीव सर्वांनाच करून देण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. स्वच्छतेअभावी प्रवाशी एसटीपासून दूर जाण्याची शक्यता गृहीत धरून हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी स्वच्छ व सुंदर बसस्थानके निर्माण करण्याचे अभिवचन या अभियानाद्वारे देण्याचा महामंडळाचा मानस आहे. राज्यातील २५० आगार आणि ५६८ बसस्थानकांसह तेथील प्रसाधनगृहे, चालक वाहकांची विश्रांतीगृहे स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेला या अभियानात विशेष महत्व देण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश बसस्थानकांवरील प्रसाधन गृहांच्या स्वच्छतेचे काम परवानाधारक खासगी संस्थांकडे सोपविण्यात आले आहे. ज्या संस्थांकडून समाधानकारक काम होत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बसस्थानकाबाहेरील उपहारगृहे, फळांची दुकाने स्वच्छ ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा तालुक्यात शिरपूर पॅटर्नसाठी सर्वेक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वाजगाव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी लोकसहभाग व 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या सहकार्यातून सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी उभारलेला 'शिरपूर पॅटर्न' प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून अशाप्रकारचे प्रकल्प तालुक्यातील नदी-नाल्यांवर राबविण्याबाबत सर्वेक्षण सुरू असून जनतेने यात सर्वतोपरी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर यांनी केले.

वाजगाव येथील खाटकी नाल्यावर ग्रामस्थांनी लोकसहभाग व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नालाबांध बंधाऱ्याचे कामे हाती घेतले आहेत. त्याची जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून कसमादे परिसरात अत्यंत कमी पाऊस झाल्याने सिंचनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. देवळा तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेवून मागील काळात तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शिरपूरचा दौरा करून तेथील नालाबांध, साठवण बंधाऱ्यांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाजगावची निवड करण्यात आली आहे. तेथील ग्रामस्थांनी दाखविलेल्या सहकार्यामुळेच आज सदरचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रोत्साहनातून वाजगाव येथील कोलती शिवारातील नाल्याचे ८०० मीटर खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाले आहे. मातीने बुजलेल्या जुन्या बंधाऱ्याचे १५ फूट खोलीकरण करून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे.

देवळा तालुक्यातील विविध ठिकाणी नालाबांध घेण्याबाबत सर्वेक्षण सुरू असून जनतेने सरकारच्या योजनांवर विसंबून न राहता लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केदा आहेर यांनी केले. यावेळी देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक अतुल पवार, मनोज आहेर, दीपक आहेर, दोधा देवरे आदींसह वाजगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. वाजगाव येथील नालाबांधचे काम पूर्णत्त्वासाठी विकास सोसायटीचे संचालक दीपक उर्फ बापू देवरे, अमोल देवरे, मुन्ना देवरे, जगन देवरे, अशोक गाढे, ज्ञानेश्वर देवरे आदी प्रयत्नशील आहेत.

सध्या खाटकी नाल्यावर काम सुरू असून वाजगाव, मटाणे परिसरातील शेतीला फायदा होणार आहे. सदर कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने मोफत पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले आहे. डिझेलसाठी रामेश्वरचे विजय पगार यांनी मदत केली आहे.

-डॉ . प्रशांत देवरे, अध्यक्ष देवळा मेरेथॉन असोशिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ कांद्याने दिला दगा

$
0
0

दुष्काळात उत्पन्नाची आशा मावळली; प्रतिक्विंटल ६५० रुपयांवर भाव

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेली तीनचार वर्षे अस्मानी संकटाशी झुंजताना दुष्काळाच्या दाहकतेची झळ बसलेल्या शेतकऱ्यांसमोरचे संकट यंदाही कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही. दुष्काळाची धग सोसताना संपूर्ण 'शेतीचक्र' अन् त्यातून 'अर्थचक्र' कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना आता कसाबसा पिकविलेल्या उन्हाळ कांदा बाजारभावाने चिंतेत टाकले आहे. मोठ्या उमेदीने घेतलेल्या इतर पिकांची यंदा पाण्याअभावी वाट लागतानाच अनेक संकटे झेलत काढलेल्या उन्हाळ कांद्याचे बाजारभाव देखील दिवसागणिक कोलमडत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे उरलेसुरले पाणी देखील पळाले आहे. शेतकऱ्यांच्या पुढ्यात गेल्या काही वर्षातील या ना त्या कारणांमुळे वाढून ठेवलेली संकटाची मालिका यंदाही कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही. मोठ्या पाणीसाठ्याअभावी कधीच शेतीचे नंदनवन न झालेल्या येवला तालुक्यातील बळीराजाची हीच कथा अन् व्यथा. गेल्या काही वर्षातील सलगच्या दुष्काळामुळे तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तर सगळंच गणित बिघडले आहे. यंदाच्या भीषण दुष्काळाची मोठी धग सोसताना तर तालुक्यातील शेतकरी अगदीच मेटाकुटीला आलेला आहे. पुरेश्या पाण्याअभावी यावर्षी गावोगावच्या विहिरींनी तळ गाठला. नैसर्गिक जलस्रोत आटले. अशा भीषण दुष्काळाचे वास्तव अनुभवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची याही वर्षी वाट लागली गेली. यंदाच्या हंगामात 'उन्हाळ' कांद्याला प्राधान्य दिले. पाणी नसताना कुणी हजारो रुपये खर्च करत इकडून तिकडून टँकरने पाणी आणून कांदा जगव‌िला. कुणी आपल्या शेतात पाणी नाही म्हणून सग्या सोयऱ्यांच्या वावरात निम्म्या वाट्याने हे उन्हाळ कांदा पीक घेतले. सगळेच गणित बिघडताना निघणारा उन्हाळ कांदा तरी घामाचे दोन पैसे हाती टेकवेल व त्यातून बिघडलेले 'शेतीचक्र' अन् संसाराचं रहाटगा चालवणारे 'अर्थचक्र' सावरेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र हाच उन्हाळ कांद्याला बाजारसमितीत सध्या कांदा बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.

येवला तालुक्यात जवळपास ५० टक्क्यांच्या वर उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटले आहे. एकरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने निदान जो काही कांदा निघाला आहे त्याला बऱ्यापैकी बाजारभाव मिळेल, त्यातून सावरलं जाऊ, अशी आशा बाळगलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे चिंता वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसात मिळणारे बाजारभाव बघता शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवारी येवल्यात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ८३२ (सरासरी ६५०) असा बाजारभाव मिळाला. मागील वर्षी एप्रिल अखेरीस येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान १३०० (सरासरी १ हजार) असा बाजारभाव मिळाला होता. आताचा बाजारभाव बघता गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ५०० रुपयांनी घट झाली आहे. एकंदरीत यंदा उन्हाळ कांदा बाजारभावाचा आलेख वर सरकत नसल्याने अगोदरच बिघडलेलं गणित कसं सावरणार याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.

दुष्काळात एकमेव उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याला प्राधान्य दिले. समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. कधी निर्यातबंदी तर कधी निर्यात शुल्क वाढवणे या केंद्र शासनाच्या प्रकारांचा हा एकंदरीत परिणाम आहे.

-संतू पा. झांबरे, शेतकरी संघटना नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटीफाईड रिव्हरची अट शिथिल करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यासाठी गिरणा नदीवर साठवण बंधारा बांधणे हाच एकमेव पर्याय असून यासाठी चणकापूर ते निंबोळ्यापर्यंत असलेली नोटीफाईड रिव्हरची अट शिथिल करावी लागणार असून संबंधित विभागाने लवकरात लवकर याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना आमदार डॉ. राहुल आहेर केली. शनिवारी देवळा विश्रामगृहावर झालेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

तालुक्यातील विविध प्रलंबित कामांबाबत आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. रामेश्वर धरणातील गाळ काढण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशीही सूचना आमदार डॉ. आहेर यांनी संबंधितांना दिली. खाटकी नाल्याचे पुनरुज्जीवन, काळवट धरणात आवर्तनाचे पाणी टाकून त्वरित भरून देण्यात यावे, भऊर गावाला पुन्हा आदिवासी उपयोजनेत समावेश करण्यात यावा, वीजवितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात असून संबंधितांना ताकीद देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

तसेच पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली . याबाबत पंचायत समितीला पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले असून गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप उपस्थित शिक्षकांनी केला. पाटबंधारे विभागाचे मालेगाव येथील कार्यकारी अभियंता आर. जे. गुप्ता, ऊर्ध्व गोदावरीचे कार्यकारी अभियंता ए. एस. मोरे, अभियंता योगेश मराठे हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलत योजनेकडे फिरवली पाठ!

$
0
0

प्रसिद्धी न केल्याचा पालिकेला फटका; साडेतीन कोटींची घट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी मालमत्ताधारकासांठी महापालिकेने एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या पाच टक्के सवलत योजनेला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चालू वर्षात महापालिका या योजनेची प्रसिद्धी करण्यात अपयशी ठरल्याने नाशिककरांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात पाच टक्के सवलतीचा लाभ ५३ हजार मालमत्ताधारकांनी घेतला असून, पालिकेच्या तिजोरीत ७ कोटी १५ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यात ऑनलाइन स्वरुपात पालिकेच्या तिजोरीत एक कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सवलत योजनेंतर्गत तब्बल १० कोटी ८९ लाख जमा झाले होते. परंतु, चालू वर्षात करसंकलन विभागाच्या निष्क्रियतेमुळे तब्बल तीन कोटींची घट झाली आहे.

मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने गेल्या वर्षापासून एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के, तर जून महिन्यात दोन टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली होती.

आगाऊ मालमत्ता कर भरण्यासाठी मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने ही योजना सुरू करीत जोरदार प्रसिद्धी केली होती. गेल्या वर्षी तीन महिन्यात पालिकेच्या तिजोरीत ३५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे या वर्षी या योजनेला प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु, पालिकेने या योजनेची प्रसिद्धी केली नसल्याने त्याचा फटका उत्पन्नावर बसला आहे. ३० एप्रिलपर्यंत शहरातील ५३ हजार ३९१ मिळकतधारकांनी ७ कोटी १५ लाख ११ हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. त्यात गेल्या वर्षापेक्षा तब्बल साडेतीन कोटींची घट झाली आहे. सवलतीपोटी पालिकेला नागरिकांना तब्बल २३ लाखाचे रिबिट द्यावे लागले आहे. या योजनेला आणखी दोन महिन्याची मुदत असल्याने महापालिकेला चांगलाच आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

२३ लाखांचे रिबिट महापालिकेन सुरू केलेल्या या योजनेला अजून दोन महिन्यांची मुदत आहे. यात मे महिन्यात तीन टक्के आणि जूनमध्ये दोन टक्के सूट दिली जाणार आहे. एप्रिल महिन्यात सात कोटी रुपये जमा झाले असले तरी महापालिकेला २२ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी वसुली वाढल्याने ३५ लाखांचे रिबिट द्यावे लागले होते.

ऑनलाइनचा घोळ महापालिकेने आपल्या विभागीय कार्यालयांसोबत बँकांशी टाय करून ऑनलाइन सवलत योजना सुरू केली होती. ऑनलाइन स्वरूपात एप्रिल महिन्यात एक कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा चालू वर्षात ऑनलाइनचा टक्का वाढला आहे. ऑनलाइन स्वरूपात घरपट्टी भरल्यास एक टक्का अतिरिक्त सूट दिली जाणार होती. परंतु, ही सूट कागदावरच असून अशी कोणतीही सूट दिली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

चालू वर्षात प्रसिद्धी करण्यात आम्ही कमी पडलो आहोत. परंतु, अजून दोन महिने शिल्लक असून, त्यात जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना आकर्षित केले जाईल. एप्रिल महिन्यातील चुका टाळल्या जातील. तसेच ऑनलाइनचा घोळही मिटवला जाईल. - रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त, मनपा

विभाग लाभार्थी वसुली सिडको - १६ हजार ३०९ १ कोटी ३१ लाख रू, नाशिक पूर्व - १० हजार ५९० १ कोटी ६२ लाख रू, नाशिकरोड - ९ हजार ६५१ १ कोटी ३४ लाख रू. नाशिक पश्चिम - ५ हजार ६३६ १ कोटी ३९ लाख रू, सातपूर - ५ हजार ६३६ ३ कोटी ३८ लाख रू, पंचवटी - ५ हजार ३२५ १ कोटी १० लाख रू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट नाशिक अॅपचा बोजवारा

$
0
0

सात महिन्यात ९ हजार ४०४ तक्रारी
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या स्मार्ट नाशिक अॅपचा सात महिन्यातच बोजवारा उडाला आहे. गेल्या सात महिन्यात स्मार्ट नाशिक अॅपवर ९ हजार ४०४ तक्रारी आल्या असून, सर्वाधिक तीन हजार तक्रारी या विद्युत विभागाच्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आरोग्य विभाग असून, या विभागाच्या २ हजार २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागाकडे तक्रारींचा आकडा मोठा असला तरी, किती तक्रारी सोडविल्या गेल्यात, याचा आकडा मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे स्मार्ट नाशिक अॅप हे शोभेचे बाहुले बनले की काय अशी शंका तक्रारदारांमध्ये आहे. पालिकेकडून परस्पर तक्रारी बंद केल्या जात आहेत.

कार्यक्षम आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम नाशिकला स्मार्ट नाशिकच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑनलाइन तक्रारींसाठी स्मार्ट नाशिक अॅपचे लॉन्चिंग केले होते. शहरातील विविध विभागाशी संबंधित तक्रारी थेट मोबाइलवरून ऑनलाइन करता येण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले. लॉन्चिंगनंतर दोन ते तीन महिने या अॅपच्या तक्रारींचा निपटारा व्यवस्थितपणे होत होता. परंतु, कालांतराने अॅपचे कामकाज ढेपाळले असून, आता तक्रारींना प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. सप्टेंबर ते एप्रिल २०१६ या साडेसात महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेकडे ऑनलाइन स्वरूपात तब्बल ९ हजार ४०४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरातील जवळपास ३० हजाराच्या वर नागरिकांनी हे मोबाइल अॅप डाऊनलोड केले होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्या तरी, त्यातील किती तक्रारी सोडविल्या गेल्या,या चा आकडाच महापालिकेकडे नाही. त्यामुळे या अॅपच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

२३ लाखांचे रिबिट पालिकेचे कार्यक्षम आयुक्त म्हणून डॉ. गेडाम यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी किमतीत तयार केलेल्या अॅपचा यंत्रणेने गंभीर दखल घेऊन येणाऱ्या तक्रारींची सोडवणूक केली जाणे अपेक्षित होते. या अॅपचा आता बोजवारा उडाल्याने आयुक्तांच्या कार्यक्षमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसून, त्या परस्पर बंद केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकही या अॅपपासून दुरावले आहेत.

अॅपलवरही येणार अॅप एकीकडे स्मार्ट नाशिक अॅप हे तक्रारींच्या निपटाऱ्याअभावी शेवटची घटका मोजत असतानाच, दुसरीकडे मात्र तांत्रिक विभागाने हा अॅप अॅपलच्या मोबाइलवर येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत अॅन्ड्रॉईड मोबाइलवरच हे अॅप डाऊनलोड करता येत होते. परंतु, आता अॅपल मोबाइलवरही अॅप डाऊनलोड करता यावे, यासाठी पालिकेकडून चाचणी केली जात आहे.

प्राप्त झालेल्या तक्रारी विद्युत विभाग - २, ९६४, आरोग्य विभाग - २०२०, पाणीपुरवठा - ११८१, सार्वजनिक बांधकाम - १०४०, ड्रेनेज- ८२५, टेलिफोनद्वारे - ५१ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंग थांबता थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय कारभार पाहणाऱ्या नाशिक विभागीय महसूल कार्यालयाच्या रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य असते. रात्रीचा गैरफायदा घेऊन सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहेत. येथे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार महिलावर्गाने केली आहे.

नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या मागील बाजूने विभागीय महसूल कार्यालयाचा रस्ता सुरू होतो. तो जिमखानामार्गे गोरेवाडीला तसेच प्रेसगेटसमोरून सिंधी कॉलनीजवळ जेलरोडला मिळतो. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नव्हती. कारण हा रस्ता सरकारी हद्दीच्या वादात अडकलेला आहे. आता रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. येथे महसुलाबरोबरच, शिक्षण उपसंचालक, कृषी, नगररचना, वजनमापे, पोलिसांची गुन्हे शाखा, माहिती कार्यालय, फॅमिली कोर्ट आदी शासकीय कार्यालये मोठ्या प्रमाणावर आहेत.

सोनसाखळी चोरांचा जाच वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. महिला वर्गानेही बाहेर फिरायला जाताना सोन्याचे दागिने घालू नये. - नितीन धानापुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘एसटी’ प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जमातीच्या जात पडताळणीची प्रमाणपत्र घेण्यासाठी आदिवासी मुलांना आता जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली असून, आदिवासी विभागातर्फे या ऑनलाइन पडताळणीच्या 'आदी प्रमाण प्रणाली'चे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आदिवासी मुलांची ससेहोलपट थांबणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विभागीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी विभागातर्फे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या www.etribevalidity.mahaonline.gov.in या ऑनलाइन प्रणालीवर जाऊन प्रमाणपत्रासाठीची सर्व प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे. यासाठी आदिवासी विभागातर्फे या ऑनलाइन पडताळणीसाठी 'आदी प्रमाण प्रणाली' नावाचे स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. 'आदी प्रमाण प्रणाली'मुळे बोगस आदिवासी जात प्रमाणपत्रांना आळा बसण्यास मदत होऊन जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम पारदर्शक होण्यास मदत होईल. या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे वेळेची बचत होऊन कार्यक्षमता व पारदर्शकता वाढेल. तसेच प्रमाणपत्रावरील अर्जदाराचा फोटो व बार कोडिंग व्यवस्थेमुळे बोगसगिरीलाही आळा बसण्यास मदत होईल. या प्रणालीच्या कर्मचाऱ्यासाठी अनुसूचित जमात प्रमाणपत्र तपासणी समितीला आवश्यक असलेले संगणक सामग्री उपलब्ध करुन प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्याच्या आत्महत्येने हळहळले पोलिस दल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये कार्यरत एसआरपीएफच्या प्लाटून कमांडरने (उपनिरीक्षक) राहत्या खोलीत पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबीक कलहातून व्यथीत झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज गंगापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम मारूती धनवटे (वय ५६, रा. धुळे, मूळ रा. मनमाड) असे आत्महत्या करणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते एसआरपीएफच्या धुळे येथील तुकडी क्रमांक सहाचे प्रमुख होते. महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या बंदोबस्तासाठी ५८ जवानांची तुकडी १६ एप्रिलपासून ३५ दिवसांसाठी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या तुकडीचे नेतृत्त्व धनवटे करीत होते. शनिवारी दुपारी ते क्यूआरटी बॅरेकच्या खोलीत आराम करीत होते. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या पिस्तूलातून उजव्या कानाच्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून आसपासचे कर्मचारी धनवटे यांच्या खोलीकडे धावत गेले. धनवटे यांचे लेखनिक हवालदार रोहीत पवार यांनी तत्काळ याबाबत तेथील वरिष्ठांना आणि गंगापूर पोलिसांना माहिती दिली. अकादमीचे संचालक नवल बजाज, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ,

निरीक्षक शंकर काळे यांनी घटनेची माहिती घेतली.

धनवटे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सायंकाळपर्यंत त्यांचे मनमाड येथील कुटंबीय तसेच धुळे येथील अधिकारी व सहकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या घटनेमूळे एमपीए तसेच हॉस्पिटल परिसरात शोककळा पसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावर कार आदळून एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ झाडावर कार आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. माधवराव बाबुराव पिंगळे (वय ५४ रा. मातोरी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २९) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. ते स्विफ्ट डिझायर कारने राऊ हॉटेल चौफुलीकडून आरटीओ कार्यालयाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी पेठरोडवरील एसटी वर्कशॉप डेपोसमोर एका झाडावर त्यांची कार आदळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. म्हसरूळ पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

पंचवटीत टॅब चोरीस पंचवटीतील वज्रेश्‍वर झोपडपट्टी परिसरातून शुक्रवारी (दि. २९) मोटरसायकलच्या डिक्कीतून टॅब चोरीला गेला. उदय सदू वसावे व राकेश अशोक साबळे हे महापालिकेत नोकरीस आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते वज्रेश्‍वरी झोपडपट्टी परिसरात गेले होते. त्यांच्या मोटरसायकलच्या डिकीतील आठ हजार रुपये किमतीचा टॅब चोरट्याने लांबविला. पंचवटी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तडीपार गुंड ताब्यात तडीपारीची कारवाई केली असतानाही एक सराईत गुंड धारदार शस्त्रासह वडाळा नाका परिसरात वावरत असल्याचे आढळून आले. इंदिरानगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. इंद्र्या ऊर्फ विशाल वसंत बंदरे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, वडाळानाका) असे त्याचे नाव आहे. बंदरे यास ७ मार्च २०१५ पासून दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो पोलिसांची परवानगी न घेता शहरात वावरत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाहनाच्या धडकेत एक ठार द्वारका परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तो भिकारी असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शुक्रवारी (दि. २९) सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. मुंबई नाका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तरूण ठार पंचवटीतील मखमलाबाद रोडवर मोटरसायकल घसरून मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. विवेक प्रकाश सूर्यवंशी (वय २४, रा. गामणे मळा, मखमलाबाद रोड) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रविवारी (दि. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास महादेव वाडी कॅनॉल ब्रीजजवळून चालला होता. त्यावेळी मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images