Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सुत्रसंचालकाची 'पत्रकारिता'

$
0
0
शहरातील एका सांस्कृतीक कार्यक्रमात दोन दिग्गज पत्रकार एका व्यासपीठावर आले होते. यामुळे सहाजिकच सभागृहात चर्चा रंगणार ती पत्रकारितेचीच. अशावेळी उपस्थितांची दोन्ही दिग्गज पत्रकारांना ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

मिलिंदनगरमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास

$
0
0
तिडके कॉलनीनजीकच्या मिलिंदनगर येथून जाणाऱ्या पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व रहिवाशांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. या परिसरात स्पीडब्रेकर्स उभारण्याची गरज वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

घरफोड्यांत दोन लाखांची चोरी

$
0
0
शहरातील घरफोडीच्या वेगवेगळ्या तीन घटनांत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यातील एका घराची दारे उघडी असताना, घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने लॅपटॉप व मोबाइल लंपास केला.

लाचखोर इंजिनीअर सिव्हिलमध्ये

$
0
0
ठेकेदाराकडून टक्केवारीपोटी लाच घेताना पकडलेल्या 'पीडब्ल्यूडी'च्या दोघा इंजिनीअरनी रक्तदाबाचे कारण सांगितल्याने, त्यांना मंगळवारी मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलात दाखल करण्यात आले.

कोर्टाबाहेरची कोंडी 'जैसे थे'

$
0
0
कोर्टाची सुरक्षितता व प्रवेशद्वारावरील कोंडी दूर करण्यासाठी हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी केलेल्या सूचनेनंतर कोर्टालगतचा बसथांबा हलविण्यात आला असला तरीही मूळ प्रश्न काही सुटलेला नाही.

निखिल खडसेंची आत्महत्या

$
0
0
विधानसभेतील विरोधी पक्षनेते, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा एकूलता एक मुलगा निखिल खडसे यांनी आज, बुधवारी दुपारी रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली. अत्यवस्थ अवस्थेतील निखिल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सर्वच विद्यार्थी झाले पास !

$
0
0
महिनाभराच्या सुटीचा मनसोक्त उपभोग घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मंगळवारी तसेच बुधवारी परीक्षांचे निकाल हाती मिळाले आहेत. त्यामुळे जवळपास महिनाभर शांत असलेला शाळेचा परिसर विद्यार्थी आणि पालकांनी गजबजून गेला होता.

तुझी आठवण येतेय आई!

$
0
0
'आई, तुझी खूप आठवण येतेय... मला आपल्या घरी घेऊन जा... लवकर ये आई' पाच वर्षांचा चंदन साश्रू नयनांनी आईला बोलवतोय. पण त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहचतच नाही.

द्वारका ते बिटको लवकरच सुसाट!

$
0
0
नाशिकच्या कनेक्टिव्हिटीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारा द्वारका ते बिटको चौक (नाशिकरोड) हा मार्ग तब्बल सहापदरी होणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे काम सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर वर्षभरात या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण केले जाणार आहे.

'महिंद्रा'तील करार चिघळला

$
0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या सातपूर येथील प्लाण्टमधील वेतनवाढ कराराचा प्रश्न चिघळला आहे. कामगार उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात एकमत न झाले नाही.

सजग रहिवाशांमुळे चोर जेरबंद

$
0
0
घरात शिरून मुद्देमालाची लूट करणाऱ्या चोराला एका महिलेने बुधवारी सकाळी आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने पकडले. गंगापूर रोडवरील पम्पिंग स्टेशन परिसरात पकडण्यात आलेला हा चोर मूकबधीर असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

७१४ प्राध्यापक आंदोलनाबाहेर

$
0
0
राज्यभरातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी एमफुक्टोने पुकारलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनातून नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ७१४ प्राध्यापकांनी बुधवारी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ६० शिक्षक आंदोलनाबाहेर पडले.

धुळे-मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करा

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने धुळे ते मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी केली. केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची भेट घेत सोनवणे यांनी धुळे-मुंबई एक्स्प्रेससह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

एकनाथ खडसेंच्या पुत्राची आत्महत्या

$
0
0
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे एकुलते एक चिरंजीव निखिल खडसे यांनी बुधवारी दुपारी चार वाजता येथील मुक्ताई तालुक्यातील कोथळी येथे आपल्या निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. निखिल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, असे सांगण्यात येते.

ठेकेदारांचा विळखा

$
0
0
गोदावरीच्या प्रदुषणात भर घालणाऱ्या पानवेलींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र, यंदाचा मुद्दा वाढलेल्या पानवेलींचा नसून नसलेल्या पानवेली काढण्याच्या ठेक्याबद्दल असेल. नसलेल्या पानवेली काढण्यासाठी आज स्थायीसमोर नऊ लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

शहरी मतदारांकडे ओळखपत्राची वानवा

$
0
0
निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात येणारे ओळखपत्र असण्याचे प्रमाण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे असताना नाशिक शहरात मात्र हे प्रमाण अल्प असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोहिम सुरु करण्यात आली असून आगामी तीन महिन्यात हे ओळखपत्र दिले जाणार आहेत.

दहावीची पुस्तके झाली महाग

$
0
0
दहावीच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाची बदललेली सर्व क्रमिक पुस्तके बाजारात एकदाची दाखल झाली. पण, या पुस्तकांच्या किमतीतही दोन ते तीन पटींनी वाढ झाली आहे. यामुळे बदललेली क्रमिक पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांना भुर्दंड सोसावा लागतो आहे.

सावधानऽऽऽऽ ‘गिधाडे’ परतताहेत

$
0
0
समाजातील घटनांचा वास्तववादी वेध घेणाऱ्या विजय तेंडुलकरांची सगळीच नाटके खळबळ उडवणारी आहेत. ‘गिधाडे’ हे त्यापैकीच एक नाटक. हिंसात्मक दृश्य आणि आक्रमक भाषा यामुळे हे नाटक वादग्रस्त ठरले.

भडक रिअॅलिटीला दणका

$
0
0
टीव्हीवर रिअॅलिटी शोच्या नावाखाली दाखवण्यात येणाऱ्या वाट्टेल त्या धुडगुसाला चाप लावण्यासाठी बीसीसीसी आक्रमक झाली आहे. तुमच्या कार्यक्रमांबद्दल योग्य ती काळजी घ्या, नाही तर दंड भरण्यास तयार रहा, असा इशाराच बीसीसीसीने अनेक चॅनल्सना दिलाय.

नमनालाच घडाभर तेल…

$
0
0
नाशिकरोड परिसरातील गोऱ्हेवाडी, शास्त्रीनगर येथील विद्यार्थी सागर रावसाहेब सोनवणे (वय १२) याच्यावर ब्रेन ट्युमरची खर्चिक शस्त्रक्रीया करण्यासाठी त्याच्या पालकांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images