Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्याख्यानमालेला योग्य दिशेची गरज

$
0
0
नाशिकच्या परंपरेत काही गोष्टी अत्यंत मौल्यवान आहेत. नाशिकचा गोदाघाट, नाशिकचा पिंपळपार, नाशिकचे सार्वजनिक वाचनालयापैकी एक म्हणजे नाशिकची वसंत व्याख्यानमाला. ९१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या व्याख्यानमालेची सुरूवात गोदाघाटावर झाली.

‘डिझायर मायलेज रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ‘डिझायर’ या मॉडेलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मायलेज रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत ३२ डिझायरधारकांनी सहभाग घेतला.

वागदर्डीतील गाळ काढण्याचा आज शुभारंभ

$
0
0
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ शुक्रवारी दुपारी चार वाजता नांदगाव मतदारसंघाचे आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा आज मेळावा

$
0
0
एसटी महामंडळातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, सन २०१२ ते २०१६ चा कामगार करार आणि अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज, ३ मे रोजी मेळावा होत आहे.

उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रद्द

$
0
0
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शनिवार, ४ मे रोजी जळगावात होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे.

केमिस्ट असोसिएशनची निवडणूक जाहीर

$
0
0
‘द नाशिक डिस्ट्रिक्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ची त्रैवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून एकूण १९ सदस्यांची याद्वारे निवड होणार आहे. येत्या ९ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून १८ जून रोजी सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

हॉल तिकीटाशिवायही देता येईल एमपीएससी पूर्वपरीक्षा

$
0
0
एमपीएससीच्या सर्व्हरमध्ये व्हायरस शिरल्याने उडालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे परीक्षार्थींचे भवितव्य टांगणीला लागले असले तरी, त्या विद्यार्थ्यांनी राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी फी भरली आहे पण हॉल तिकीट मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना १८ मे रोजी होणाऱ्या परीक्षेला बसता येईल, असे राज्य सरकारच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले.

निखिलच्या आत्महत्येने भाजपला धक्का

$
0
0
विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात केली होती. विधान परिषदेच्या जळगाव मतदारसंघामधून निखिल यांनी निवडणूक लढविली होती.

एपीआय धनंजय पाटील हल्लाप्रकरण

$
0
0
आझाद नगर पोलिस ठाण्याचे एपीआय धनंजय पाटील यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत सोनार अखेर गुरुवारी पोलिसांना शरण आले. २६ मार्च रोजी रात्री हल्ल्याची घटना घडल्यानंतर सोनार फरार झाले होते.

म्हाडाच्या घरांसाठी दोन दिवसांत १७०० अर्ज

$
0
0
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसात म्हाडाच्या http/lottery.mhada.gov.in या वेबसाइटवर दीड लाखावर हिट्स मिळाल्या. गुरुवार सायंकाळपर्यंत १७०० लोकांनी घरासाठी अर्ज केले.

सामान्यांच्या आवाक्यात हवीत म्हाडाची घरे

$
0
0
म्हाडातर्फे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, याकडे लक्ष वेधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हाडाच्या घरांच्या अफाट किंमतींना गृहनिर्माण खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अप्रत्यतक्षपणे जबाबदार धरले आहे.

... आणि लग्नसोहळा पुढे ढकलला

$
0
0
लग्नाचा आदला दिवस... हळदीची तयारी जोमाने सुरू होती... त्यात वर-वधूही एकाच गावातले असल्यामुळे गावात उत्साह संचारलेला... मात्र नियोजित वधू अल्पवयीन असल्याची खबर समाजसेवी संस्थेला कळली आणि हा लग्नसोहळा पुढे ढकलण्याची वेळ दोन्हीकडच्या मंडळींवर आली.

‘यशोत्सव २०१३’ स्नेहसंमेलनाचा जल्लोष

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या वतीने ‘शिका आणि कमवा’ योजनेअंतर्गत नुकतेच ‘यशोत्सव २०१३’ हे पहिले स्नेहसंमेलन झाले.

नाशिकमध्ये प्रथमच ‘अॅनामॉर्फिक’ कलाविष्कार

$
0
0
जमिनीवर काढली जाणारी आणि खरीखुरी वाटणारी चित्रे आता नाशिककरांनाही पाहता येणार आहेत. उन्हाळ्यानिमित्त सिटी सेंटर मॉलमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारची ‘अॅनामॉर्फिक’ चित्रे काढण्यात आली असून, त्याबरोबर फोटोही काढता येणार आहेत.

चुकीच्या धोरणांमुळे मविप्रला आर्थिक फटका

$
0
0
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या टीडीआरविक्रीविरोधात आम्ही केलेले अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले असले तरीही संस्थेला साडेचार कोटींची रक्कम ही वाढीव स्वरूपात मिळाली आहे. तरीही, वेळोवेळी संस्थाचालकांच्या चुकीच्या धोरणांमुळे बिल्डरच्या पदरात झुकते माप पडल्याचा दावा संस्थेचे बाळासाहेब कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आयएसपी सोसायटीला एक कोटी ८१ लाखांचा नफा

$
0
0
नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस कामगारांच्या आयएसपी एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीला २०१२-१३ या आर्थिक वर्षात एक कोटी ८१ लाख निव्वळ नफा झाला आहे.

महावितरणच्या ८९ तांत्रिक कामगारांचा गौरव

$
0
0
जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नाशिक परिमंडळात ८९ तांत्रिक कामगारांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

देण्याचे बळ जगण्याला दिशा देते

$
0
0
स्वार्थ परायणतेच्या युगात प्रत्येकाचा कल घेण्यामागे आहे. मात्र आपण दुसऱ्याला काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही, हा जीवनविद्या मिशनचा सिद्धांत आहे. देण्याचे बळ केवळ आपल्याच नाही तर अनेकांच्या जगण्याला दिशा देते, असे प्रतिपादन सद्‍गुरु प्रल्हाददादा पै यांनी केले.

कंपनी बंद पाडण्याचा व्यवस्थापनाचा डाव

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा प्लाण्ट बंद पाडण्याचा कुटील डाव महिंद्रा व्यवस्थापनाने रचला असल्याचा आरोप महिंद्रा युनियनचे उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांनी केला आहे. जोपर्यंत वेतनकरार होत नाही, तोवर उपोषण करण्याची घोषणा सरचिटणीस प्रवीण शिंदे यांनी केली आहे.

चिखलीकरच्या बँक लॉकरमध्ये पावणेसहा कोटींची मालमत्ता!

$
0
0
रस्त्याच्या कामापोटी मंजूर झालेल्या बिलाची रक्कम अदा करण्यापोटी लाच घेणाऱ्या ‘पीडब्ल्यूडी’च्या दोघा अधिकाऱ्यांपैकी सतीश चिखलीकर याच्या बँक लॉकरमधून गुरुवारी रोकड, सोने व ठेवी स्वरूपात पाच कोटी ७० लाखांची मालमत्ता सापडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images