Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोकसहभागातून झाली जलक्रांती

$
0
0

लिंगटांगवाडीतील पाणी समस्या दूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडीतील पाणी समस्या 'जलयुक्त'च्या माध्यमातून दूर होतानाच लगतचे कुंदेवाडी गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसतानाही प्रशासन, समाजसेवी संस्था आणि स्थानिकांच्या प्रयत्नातून या गावात जलक्रांती झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

लिंगटांगवाडीत पाण्याची समस्या असल्याने गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला. मात्र लगतच्या कुंदेवाडी गावाचा समावेश योजनेत नव्हता. गावात गतवर्षी प्रथमच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. टंचाईची ही पाऊले गावातील ज्येष्ठ मंडळींनी ओळखली. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक नामकर्ड आवारे, ह. भ. प. एकनाथ महाराज गुळेश्वर, मधुकर नाठे, शिवाजी नाठे, राजाराम कुऱ्हाडे या मंडळींनी गावकऱ्यांना एकत्र करून जलसंधारणाचे महत्त्व समजावले.

आमदार राजाभाऊ वाजे आणि तहसीलदार मनोज खैरनार यांच्या प्रयत्नामुळे महामार्गाचे काम करीत असलेल्या चेतक एन्टरप्रायजेस संस्थेचे सहकार्य या दोन्ही गावातील कामासाठी मिळाले. प्रशासनाने 'चेतक'च्या माध्यमातून डिझेल आणि जेसीबीची व्यवस्था केली. गाळ वाहण्यासाठी डंपरची व्यवस्थादेखील करण्यात आली. लिंगटांगवाडीतील बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ काढून नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. लिंगटांगवाडी आणि कुंदेवाडी मिळून पंधरा दिवस २८०० फूट लांबीच्या नाला ३५ फूट रुंद आणि २८ फूट खोल करण्यात आला. १८.५ लाख क्युबिक मीटर गाळ त्यातून काढण्यात आला. चांगला गाळ शेतकऱ्यांनी शेतात वाहून नेला. काही भागातून निघालेला मुरूम चेतक संस्थेने कामासाठी वापरला. याद्वारे सरकारास सुमारे ४ कोटींचा महसूल प्राप्त झाला. झालेल्या कामाची किंमत १ कोटी १० लाख रुपये आहे. झालेल्या कामामुळे साडेपाच कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. लिंगटांगवाडीतील नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या शेतीला याचा फायदा होणार आहे. कुंदेवाडीतील ११० आणि मुसळगावातील २५ विहिरींना याचा फायदा झाल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. एकूण ७५० एकरावरील शेतीला याचा फायदा होणार आहे. शिवाय गावाला टँकरचीही गरज भासणार नाही. नाल्यावर ठराविक अंतरावर यशवंत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत तीन बंधारे बांधून पाणी शिवारात जिरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात लघुपाटबंधारे विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून याच नाल्यावर तीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. यावर्षीच्या टंचाईवरून धडा घेत भविष्यातही पाणी टंचाई जाणवू नये म्हणून ग्रामस्थांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत. जलयुक्त शिवार योजना ही केवळ सरकारपुरती मर्यादित राहिलेली नसून तिला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ शिवसैनिकांची घरवापसी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांचा त्रिमूर्ती चौकातील पुतळा जाळल्याप्रकरणी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आठपैकी पाच शिवसैनिकांची घरवापसी करण्यात आली आहे. संबंधितांचा माफीनामा ग्राह्य धरण्यात आला असून, त्यांची पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये त्यांना सेनेत पुन्हा प्रवेश देण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे. दरम्यान, पुतळा जाळल्यावरून सुरू झालेली शिवसेनेतील ही भाऊबंदकी संपण्याची चिन्हे असून, नगरसेवक सुधाकर बडगुजरांच्या कार्यक्रमाला अनिल देसाई आज हजेरी लावणार आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या कार्यक्रमावरील हल्ल्यानंतर शिवसेनेत वाद उफाळून आला होता. नगरसेवक सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांनी हा हल्ला केल्यानंतर शिवसेनेतच मतभेद निर्माण झाले होते. या प्रकरणात संपर्कप्रमुख चौधरी यांचा पुतळा त्रिमूर्ती चौकात जाळण्यात आला होता. या प्रकरणात सुधाकर बडगुजरांवरही आरोप झाल होते. पुतळा जाळल्याप्रकरणी राजेंद्र नानकर, विष्णू पवार, रमेश उघडे, शुभांगी नानगावकर, मंदाकिनी जाधवसह आठ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांनी आपल्याला पुतळा जाळल्याची कल्पनाच नव्हती, असे सांगत माफीनामा लिहून दिला होता. या प्रकरणावरून शिवसेनेतील भाऊबंदकीच समोर आली होती. सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात थेट मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ अतिक्रमण प्रकरणातही ते अडचणीत आले होते. परंतु, त्यांनी पक्षात शांतपणे राहणेच पसंत केले.

बडगुजरांच्या कार्यक्रमाला देसाई येणार

रहाटकर हल्ला व अतिक्रमण प्रकरणामुळे सुधाकर बडगुजर मधल्या काळात अडचणीत आले होते. शिवसेनेतीलच एका गटाकडून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्यांनी संकटावेळी शांततेची भूमिका घेतली. परंतु, आता त्यांनी पक्षात पुन्हा कमबॅक केल्याचे चित्र आहे. संपर्कप्रमुखांनीच त्यांच्यापासून अंतर राखले होते. परंतु, बडगुजर यांचे मातोश्रीवरील वजन कायम असल्याने त्यांच्या भूम‌िगत जलकुंभाच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते व सचिव अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत. बडगुजरांनी पक्षातील ताकद पुन्हा वाढवली असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजय बागूलला दहा दिवस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोक्का कलमांतर्गत कारवाई झालेल्या संशयित गुन्हेगारांना आर्थिक व इतर मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेल्या अजय बागुल यास मोक्का विशेष कोर्टाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुनावणीवेळी बागुल समर्थकांची कोर्टात गर्दी झाली होती.

पंचवटीत शस्त्रानिशी दहशत निर्माण करणाऱ्या तसेच हत्या, लुटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या कुंदन परदेशी व त्याच्या साथीदारांवर पंचवटी पोलिसांनी मोक्क्का कलमानुसार कारवाई केली आहे. पंचवटीतील भेळ विक्रेता सुनील वाघ याची हत्या करणे तसेच एका बांधकाम व्यावसायिकांच्या घराबाहेर गोळीबार करून धमकाविण्याचे गुन्हे संबंध‌ितांवर दाखल असून याच प्रकारानंतर पोलिसांनी त्यांच्यावर मोक्क्का कलमाचा वापर केला. कुंदन परदेशी तसेच त्यांचे काही साथीदार सुनील वाघच्या हत्येनंतर परराज्यात फरार झाले होते. या काळात परदेशीसह इतरांना मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत मिळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गुन्हेगारांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याची विशेष मोहीमच पोलिसांनी सुरू केली असून त्याअंतर्गत पोलिसांचा तपास भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल यांच्यापर्यंत पोहचला. कुख्यात गुन्हेगारांना आर्थिक मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने पंचवटी पोलिसांनी अजय बागुलला गुरूवारी, (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अटक केली. बागुलला शुक्रवारी, (दि. २९) मोक्का विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आले. संशयित आरोपींना मदत करण्यामागे बागुलचा हेतू काय आहे? हे तपासणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. संशयित अजय बागुलचे आणि इतर सराईत गुन्हेगारांचे लागेबांधे शोधणे, बँक खाते, यापूर्वी सराईत गुन्हेगारांकडून झालेल्या गुन्ह्यांचा बागुलशी काही संबंध आहे काय? याची तपासणी करणे आदी बाबी सरकारी पक्षाने मांडल्या. त्यानुसार, कोर्टाने बागुलला दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीबाबत आता सोमवारी फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक ३५ व ३६ ब ची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर अपात्र नगरसेवक जागे झाले आहेत. शोभना शिंदे व नीलेश शेलार यांनी अपात्रतेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे नगरविकास मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता ट्विस्ट आले आहे. दरम्यान या दोन प्रभागांत आचारसंहिता जाहीर झाल्याने विद्यमान नगरसेवक पवन पवार व ललिता भालेराव यांच्या कामावर मर्यादा आल्या आहेत. या दोन प्रभागांसाठी २८ ऑगस्टला मतदान जाहीर झाले आहे. तर अपात्र ठरलेले नगरसेवक शिंदे व शेलार यांनी गुरूवारीच हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे शिवसेनेने या दोन्ही अपात्र नगरसेवकांनी नगरविकास राज्यमंत्र्याकडे अपील दाखल केले आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या दोन प्रभागांत आचारसंहिता लागू झाल्याचा फटका अन्य दोन नगरसेवकांना बसला आहे. पवन पवार व ललिता भालेराव या दोन नगरसेवकांचीही विकासकामे यामुळे ठप्प झाली आहेत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यत या दोन नगरसेवकांच्या कामावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे 'करतेय कोण आणि भरतेय कोण' अशी परिस्थिती या नगरसेवकांवर ओढावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या जीवनरंगांची मुक्त उधळण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरात आज आदिवासींचा कुभमेळा भरला असून, जास्तीत जास्त नाशिककरांनी कलेचा अस्वाद घ्यावा. सध्या कलेमध्ये शुध्दता राहिलेली नाही. आदिवासींचीच एकमेव कला शुध्द आहे. हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. या आदिवासींना मूळ प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक वामन केंद्रे यांनी केले. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि नाशिक महापालिका यांच्यातर्फे आयोजित भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित 'आदिरंग'महोत्सवाला शुक्रवारी संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा महोत्सव सुरू झाला आहे. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर, गुरुमीत बग्गा, एनएसडीचे व्हाइस चेअरमन अर्जुनदेव चरण, ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी, जनसंपर्क अधिकारी ए. के. बरुआ उपस्थित होते. यावेळी केंद्रे पुढे म्हणाले की, नाशिकने मला खूप काही दिले आहे. याच मातीतून अनेक कलावंत जन्माला आले आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. कोणतेही राष्ट्र त्याच्याकडे असलेल्या शस्त्रसाठ्यानुसार ते बलाढ्य आहे असे समजले जात नाही, तर तेथील संस्कृती किती चांगली आहे यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. येथे आदिवासींच्या कलेची शुध्दता उधळायला आलो आहोत. २०१४ पासून आदिरंग महोत्सवाला सुरुवात झाली असून हा नववा कार्यक्रम आहे. महापौर अशोक मुर्तडक म्हणाले की, एनएसडीसारख्या संस्थेने आम्हाला कधीही हाक मारावी. आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत. यावेळी उपमहापौर गुरुम‌ित बग्गा, हिमानी शिवपुरी, अर्जूनदेव चरण यांनीही आपले विचार मांडले. महोत्सवात २२ राज्यांतील पाचशेपेक्षा अधिक आदिवासी कलाकार सहभागी झाले असून, यात नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकलांचा समावेश आहे. भारतीय आदिवासी सांस्कृतिक वारसा दर्शवणारे प्रदर्शनही या महोत्सवाचा भाग आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी कला, पारंपरिक आदिवासी वाद्ये दागिने, पोशाख, चित्रे आणि देशाच्या विभिन्न भागातील घरगुती वस्तू यांचा वारसा दाखविण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांमधील काही जमाती त्यांच्या परंपरा, संस्कृती, श्रध्दा त्यांच्या मान्यता त्यांचे विधी मुख्य प्रवाहापासून अजूनही दूर आहेत. आदिरंगच्या माध्यमातून हा अनमोल वारसा या महोत्सवात मांडण्यात आला आहे. सुत्रसंचलन लईक हुसेन तर ए. के. बरुआ यांनी आभार मानले.

कार्यशाळा घेणार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने एक महिन्याच्या कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याची घोषणा केंद्रे यांनी केली. सादर झालेली नृत्ये थापेत्ता गुल्लू नृत्य, काबली नृत्य, ढाल थुंगरी, पैका नृत्य, चदैय्या नृत्य, सोंगी मुखवटे, गुदूम बाजा, सिला कर्मा, सहारिया स्वांग, चक्री नृत्य, राठवा नृत्य, भारलादू नृत्य, गौड मारिया नृत्य, धनगरी गाजा नृत्य, छापेली-घासियारी, सैगरी नृत्य, संथाली नृत्य, बंजारा नृत्य, तमंग-लिंबू, स्वग्रई मोग, बेडा रास, पूंग चोलम ही नृत्ये सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीवरून पेटले रान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वादग्रस्त १७६ कोटींच्या घंटागाडी ठेक्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून मनसेपाठोपाठ आता शिवसेनेने या वादात उडी घेतली आहे. मनसेत या ठेक्यावरून सरळ दोन गट पडले असून, दुसऱ्या गटाने थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. अटीशर्ती बदलल्याने या प्रक्रियेतील अन्य ठेकेदारांनीही हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. तर वादामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी संपूर्ण प्रस्तावाचा अभ्यास नव्याने सुरू केला आहे. शिवसेनेने थेट मनसेवर टीकास्र सोडले असून, 'ठेकेदार हिताय, ठेकेदार सुखाय' मनसेची भूमिका असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे घंटागाडीचा वाद आता चांगलाच वाढला आहे. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून घंटागाडीच्या १७६ कोटींच्या ठेक्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, या वादग्रस्त ठेक्याला आता विरोध वाढत चालला आहे. या ठेक्यावरून मनसेतच थेट दोन गट पडले आहेत. सभागृहनेत्या सुरेखा भोसले व नगरसेवक मेघा साळवे यांनी या ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना ठेका देण्यासह फुगवलेल्या किंमतीवरून वेगळीच भूमिका घेतली आहे. ठेक्यातील अटी व शर्ती बदलण्यात आल्याचा आरोप करत, त्यांनी सध्याच्या ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना ठेका देण्यास विरोध केला आहे. तर दुसरीकडे स्थायी समितीने हा ठेका देण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी यासंदर्भात स्थायीची बैठक होणार होती. परंतु, आता वाद निर्माण झाल्याने सभापतींनी आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. आता पुढील आठवड्यात बैठक घेण्याची तयारी केली आहे. घंटागाडी ठेक्यासाठी मुंबईतल्या एच. व्ही. कन्स्ट्रक्शन व एम. ई. इन्फ्रा या दोन कंपन्या इच्छुक होत्या. परंतु, कडक अटी-शर्तींमुळे त्या सहभागी झाल्या नाहीत. परंतु निविदा प्रक्रिया झाल्यानंतर अटी-शर्ती बदलल्याने या कंपनीनेच आता कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे १७६ कोटींच्या फुगवलेल्या आकडेवारीची सध्या महापालिकेत चर्चा असून, त्याची आकडेमोड करण्यात राजकीय पक्ष व अधिकारी व्यस्त झाले आहेत.

लोण्याच्या गोळ्यासाठी भांडण

वादग्रस्त घंटागाडी ठेक्याच्या प्रकरणात शिवसेनेने उडी घेत, पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सत्ताधाऱ्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे थांबवावीत, असा सल्ला शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे. महासभेतच या प्रस्तावाला चुकीच्या पद्धतीने मान्यता देण्यात आली आहे. जवळपास ७० कोटींच्या आसपास हा ठेका जाणे अपेक्षित असताना तब्बल १७६ कोटींची आकडेवारीच धक्कादायक आहे. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच हा ठेका सुरत दौऱ्यावेळीच तयार करण्यात आला होता. मनसेतील भांडणे ही लोण्यासाठी आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रस्तावाची फेरतपासणी करावी व पुन्हा ठेका महासभेवर आणला पाहिजे. महापौर व मनसेने नाशिककरांचे हित जपले पाहिजे. परंतु, मनसेची भूमिका सध्या 'ठेकेदार हिताय, ठेकेदार सुखाय' असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचा या प्रस्तावाला विरोध असून मनसेची पोलखोल करणार असा इशाराच त्यांनी दिला आहे.

घंटागाडी ठेक्यासंदर्भात आता पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या ठेक्यात अटी व शर्ती बदलल्या नसून बैठकीत नाशिककरांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. ठेकेदारांनी ६० कोटीत काम होईल असा दावा केला आहे. त्याचीही चाचपणी करून चर्चा केली जाईल.

- सलीम शेख, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्व्हेक्षणाला मिळेना ठेकेदार

$
0
0

महापालिका तिसऱ्यांदा काढणार निविदा, उत्पन्नवाढीत खोडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्ताचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेक्षणासाठी ठेकेदारच मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने मिळकत सर्व्हेक्षणासाठी दोनदा निविदा काढल्या परंतु सर्व्हेक्षणासाठी योग्य ठेकेदारच मिळत नाही. त्यामुळे पालिकेने आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या निविदेत ठेकेदाराने तब्बल ४८ टक्के अधिक किमतीची निविदा आली होती. त्यामुळे ती फेटाळण्यात आल्याने आता ठेकेदार शोधण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

महासभेने घरपट्टी व पाणीपट्टीची दरवाढ फेटाळल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरात नवीन मिळकती शोधून त्यांच्याकडून करवसुलीचा पर्याय पुढे आला आहे. अनेक ठिकाणी करारनाम्यात फ्लॅटचे क्षेत्रफळच कमी दाखवले आहे. तर काही मिळकतींचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असतांनाही तेथे दर मात्र निवासी क्षेत्राचे लावले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा फटका बसला आहे. त्यामुळे व्यावसायिक मालमत्ता शोधण्यासह नवीन मालमत्तांच्या शोधासाठी महापालिकेने मालमत्तांचे सर्व्हेक्षण हाती घेतले आहे. त्यासाठी महासभेने पाच कोटींचा खर्चही मंजूर केला आहे.

महापालिकेसमोर मोठे संकट

सद्यस्थितीत शहरात चार लाख पंधरा हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यात ३० टक्के वाढ महापालिकेने पकडली आहे. त्यासाठी सर्व्हेक्षण आवश्यक असले तरी, त्याला ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र आहे. पालिकेने काढलेल्या पहिल्या निविदेला सात ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी तीन ठेकेदार पात्रही ठरले. परंतु ठेकेदाराची निविदा ही प्राकलनापेक्षा ४८ टक्के अधिक होती. त्यामुळे दुसऱ्यांना निविदा काढण्यात आल्यात. परंतु या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. तिसऱ्यांदा निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर पालिकेसमोर मोठे संकट उभे राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर हृदयविकार रोखणारे उपकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवघेणा ठरणाऱ्या हार्ट अॅटॅकपासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी लायन्स क्लब नाशिक पंचवटी व पुणे आकुर्डी सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंगी गडावर ह्रदयविकाराच्या झटक्यापासून जीवदान देणारे वैशिष्ठ्यपूर्ण उपकरण बसविण्यात येणार आहे. देवस्थान ठिकाणी आरोग्य राखण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न देशात प्रथमच होत असल्याचा दावा लायन्स क्लबने केला आहे. लायन्स क्लब पंचवटीचा २६ वा पदग्रहण समारंभ ३१ जुलै रोजी सकाळी अकराला हॉटेल ताज गेटवे येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उमेश गांधी (एलसीआयएफ को-ऑर्डिनेटर), फत्तेचंद रांका (माजी प्रांतपाल), वैद्य विक्रांत जाधव आदी तसेच वणी येथील सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त हजर राहणार आहेत. हार्ट अॅटॅक आल्यानंतर हृदय सुरू करण्यासाठीचे अत्याधुनिक उपकरण (Cardiac Defibrillator) त्यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती राजेश कोठावदे यांनी दिली आहे. भारतात पहिल्यांदाच देवस्थानावर असे उपकरण बसविण्यात येणार असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गडाचा संपूर्ण अभ्यास करून हे उपकरण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ते कसे हाताळावे याचे प्रशिक्षण गडावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. असे उपकरण असलेले सप्तशृंगी गड हे भारतातील प्रथम देवस्थान असेल. या उपकरणामुळे सप्तशृंगी गडाची यात्रा आरोग्यदायी होणार आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी देश व परदेशातून श्रध्दाळू येतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही मोठे असते. गड चढताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यांना धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येण्यासारखे प्रकार घडत असतात.

काय आहे हे उपकरण ?

हृदयावर ताण आल्यास या उपकरणाद्वारे विजेच्या लहरी हृदयापर्यंत पोहोचवून ते पुन्हा ठोके नियमित करण्यास मदत करते. हृदय सुरू होऊन पुढील चिकित्सेसाठी रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्यास वेळ मिळतो. गडावरील पायऱ्या चढताना अनेकांना दम लागतो. हृदयाची गती वाढते. परंतु त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. गड चढून गेल्यावर विश्रांती घेतात. परंतु हृदयावरील अधिक ताण लक्षात येत नाही. अशावेळी प्राथमिक निदान करण्यासाठी आधुनिक इसीजी उपकरण संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. विनय सातपुते, जयंत येवला, अरुण अमृतकर, नीलिमा जाधव, नवनाथ म्हात्रे, शोभा कदम आदींची मदत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिकारी, वेड्यांची मोफत दाढी-कटिंग

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

सुंदर मी होणार, असं प्रत्येक जण म्हणत असतं; पण सगळं जग सुंदर झालं पाहिजे, परिसरातील माणसे स्वच्छ व सहज सुंदर दिसायला हवीत, यासाठी मनमाड येथील मनोज बोरसे हा सलून चालक परिसरात येणाऱ्या वेड्यांना व भिकारी लोकांना सलूनमध्ये येण्यासाठी राजी करून त्यांची मोफत दाढी- कटिंग करण्याचे काम करतो आहे. ज्यांच्या केसांच्या झिपऱ्या अगदी जटा झालेल्या आहेत, अनेक महिन्यांपासून ज्यांची दाढी वाढलेली आहे, अशा अजागळ आणि अस्वच्छ लोकांना सुंदर स्वच्छ चेहरा देण्यासाठी सुरू असलेले मनोजचे हे अनोखे समाजसेवी केंद्र आजच्या स्वार्थी जगात अधिकच उठावदार दिसते आहे.

मनमाडच्या मनोज या सलूनवाल्याची ही गोष्ट जग सुंदर झाले पाहिजे, या मनातल्या प्रामाणिक इच्छेमुळेच अधिक सुंदर झाली आहे. मनमाड- येवला मार्गावर जयश्री सिनेमागृहासमोर मनोज बोरसेचे छोटेसे सलूनचे दुकान आहे; पण आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही व परिस्थितीमुळे स्वतःच्या पत्नीवर इतरांच्या घरी जाऊन पोळ्या करण्याची वेळ आलेली असतानादेखील मनोजने स्वार्थापलीकडे जाऊन वेडे, भिकारी लोकांना स्वच्छ, सुंदर करण्याचा ध्यास घेतला आहे. अठरा महिन्यांपासून हे आगळे व्रत त्याने जपले असून, जग सुंदर झाले तर आपणही सुंदर होऊ ही त्याची मानसिकता कौतुकास्पद आहे.

मनमाड जंक्शनमध्ये अनेक वेडे येतात. भिकाऱ्यांचीपण येथे कमी नाही. त्यामुळे मनोजने या लोकांची मोफत कटिंग दाढी करण्याचा वसा घेतला. सर्वत्र चांगले दिसावे या धडपडीपोटी तो वेडे व भिकारी शोधत फिरतो. त्यांच्यामागे जाऊन त्यांना कटिंगला येण्याचे आवतण देतो. अनेकदा वेडे चिडतात, ओरडतात, अंगावर धावून येतात; पण तरी निष्ठेने मनोज त्यांना आग्रह करतो. त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि त्यांची मने वळवून आपले समाजसेवेचे इप्सित साध्य करून घेतो. आतापर्यंत अनेक वेड्यांना वेगळे रूप बहाल केल्याचे व त्यामुळे आनंद झाल्याचे मनोज सांगतो. काही भिकारी किंवा वेडे सलूनमध्ये येतात. खुर्चीत बसतात आणि कटिंग सुरू झाली, की पळ काढतात, असाही त्याला अनुभव येतो, तर काही भिकारी कटिंग-दाढी नंतर आरशात स्वतःचा चेहरा पाहून बुचकळ्यात पडतात. स्वतःलाही ओळखत नाहीत, असाही अनुभव मनोजला येतो. काही भिकारी तर कटिंग- दाढीनंतर काही दिवसांनी उत्स्फूर्तपणे पाच- दहा रुपये आणून देतात, हे सांगताना मनोजला गहिवरून येते.

व्यवसायावर परिणाम

घरची परिस्थिती जेमतेम. त्यामुळे पत्नीला दुसऱ्याच्या घरी पोळ्या लाटाव्या लागतात आणि भिकारी, वेडे लोकांची दाढी, कटिंग करतो म्हणून दुकानात खरे ग्राहकपण कमी येतात; पण मनोजला याची फिकीर नाही. पोटापुरती अर्धी भाकर मिळवण्याची लढाई सुरू आहे; पण हे जग सुंदर करण्याचे काम सोडणार नाही, असे तो म्हणतो. या कामात समाधान लाभते, देव भेटतो, असे मनोजचे म्हणणे आहे.

सरकारकडून अपेक्षा व स्वप्न

सरकारने भिकारी, वेड्या लोकांना स्वच्छ, नीटनेटके करण्याचे काम माझ्याकडे सोपवावे. मी महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यांत जाईन आणि सर्वत्र नीटनेटके, स्वच्छ लोक रस्त्यावर कसे दिसतील, यासाठी जिवापाड प्रयत्न करीन. फक्त पोटापुरते मिळाले पाहिजे हे मनोजचे स्वप्न व सरकारकडे मागणे आहे. या स्वच्छतादूताचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा, त्याचे जग व त्याद्वारे स्वतःचेही जगणे सुंदर करण्याचे काम लक्षवेधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डा केल्यास ५० हजार दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक उत्सवाच्या नावाखाली भर रस्त्यांमध्ये मंडप बांधण्यासाठी रस्त्यात खड्डे करणाऱ्या मंडळांसह व्यक्तींना थेट ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

महासभेने पारीत केलेले मंडप धोरण अस्त‌ित्वात आले असून, त्याची गणेशोत्सवापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणात अनेक जाचक अटी मंडळाच्या विरुद्ध असल्या, तरी उत्सवाच्या नावाखाली वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीतून सुटका होणार आहे. रस्त्याच्या एक चर्तुथांश भागावरच मंडप उभारता येणार असून, सिमेंट व डांबरी रस्त्यावर खड्डा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अर्जाची प्रक्रिया एक महिना आधीच पूर्ण करावी लागणार असून, ध्वनीप्रदूषणाची अट पाळावी लागणार आहे.

सार्वजनिक उत्सवाच्या वेळी बहुतेक मंडळे ही पालिकेच्या रस्त्यावरच मंडप उभारतात. त्यामुळे नागरिकांनाच त्याची अडचण होते. त्यामुळे हायकोर्टाने याची नियमावली तयार करून धोरण निश्चितीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने गेल्या वर्षी धोरण पारीत केले होते. त्याचा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गणपती, नवरात्रोत्सव, रमजान महिना, बकरी ईद, मोहरम, नाताळ, विविध महापुरुषांच्या जयंती यासाठी आता मंडप टाकताना कडक अटीशर्ती तयार करण्यात आल्या आहे. मंडप टाकण्यासाठी एक महिना आधी अर्ज करावा लागणार आहे. मंडपासाठी रस्त्याचा वापर एक चर्तुथांश करणे, अग्निशमनची परवानगी आवश्यक, मंडप आठ फुटाचाच असेल, विद्युत कनेक्शन अधिकृत असावे, फुटपाथवर मंडप नसावा, पर्यावरण विभागाच्या कायद्याचे पालन अशा अटी टाकण्यात आल्या आहेत.

ध्वनीप्रदूषणसंदर्भातील नियमही कडक करण्यात आले आहेत. शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदूषणाची पातळी रात्री ४० व दिवसा ५० डेस‌िबलपेक्षा जास्त असता कामा नये. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालय, धार्मिक ठिकाणांपासून शंभर मीटरच्या अंतरावर मंडपासाठी परवानगी देता येणार नाही, असाही नियम करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेल्मेट सक्ती’ हा डोकं नसलेल्या सरकारचा निर्णय: चव्हाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

हेल्मेट सक्तीचा निर्णय हा डोकं नसलेल्या सरकारनं घेतलेला निर्णय आहे, अशा शब्दात काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी युती सरकारवर सणसणीत टीका केली. तसंच 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' ही नरेंद्र मोदींची घोषणा फक्त डाळीपुरती खरी ठरली, असा शाब्दिक चिमटाही चव्हाण यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी घेतला.

हेल्मेटची सक्ती, डाळींचे वाढते भाव किंवा अडतबंदीचा निर्णय अशा कोणत्याही प्रश्नावर काय निर्णय घ्यावा हेच राज्याच्या मंत्र्यांना कळत नाही, असा टोमणा अशोक चव्हाण यांनी लगावला. हेल्मट सक्ती ही कायद्यातच आहे मग त्याची अंमलबजावणी का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला. तसंच मंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री स्थगिती आणतात, हे म्हणजे त्यांचं सरकारवर नियंत्रण नसल्याचं उदाहरण आहे, असंही ते म्हणाले.

बाजार समित्यांसंदर्भात नियमनमुक्तीचा निर्णय पर्यायी व्यवस्था करुन घेणं गरजेचं होतं. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळं कांदा खराब होत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचं झालेलं नुक्सान शेतकऱ्यांना सरकारनं दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पिक विम्याची मुदत किमान आठ दिवस वाढवणं गरजेचं असून शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास वेळ दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात येणाऱ्या महापालिका आणि स्वराज संस्थाच्या निवडणुकांची तयारी काँग्रेसनं सुरू केल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीमुळं काँग्रेसचं नुकसान!

राष्ट्रवादी काँग्रेसमुळं नाशिकमध्ये आणि राज्यात अन्य काही ठिकाणी काँग्रेसचं नुकसान झालं, असं म्हणत चव्हाण यांनी आपल्या जून्या मित्रपक्षावर पराभवाचं खापरं फोडलं. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांची वाढणार मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण महिन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे उपवासांबरोबरच आता सण उत्सवांनाही उधाण येणार आहे. यामुळे आपसूकच फळांच्या मागणीत वाढ होण्याबरोबरच किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

श्रावण महिन्यात हवेत ओलसरपणा असल्याने जड पदार्थ पचण्यास अवघड होऊन जाते. अनेक जण मांसाहारी जेवणही बंद करतात. अनेक सणवार या महिन्यात प्रामुख्याने येत असल्याने श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार हे महिनाभरात नित्याने येणारे उपवास, तर नागपंचमी, गोकुळाष्टमी या सणांचे उपवास केले जातात. यामुळे फळ व उपवासाच्‍या पदार्थांची मागणी वाढते.

यंदाचे वर्ष सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरले आहे. भाजीपाल्याचे दर वर्षभर पन्नास ते साठ रुपये किलोदरम्यान राहिले, तर पपई व संत्री वगळता इतर फळांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहिल्या. आता बुधवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यामुळे उपवासाच्या पदार्थांबरोबरच फळांची मागणी वाढणार आहे. उपवासाचे पदार्थांमध्येही आता विविधता पहायला मिळू लागली आहे. शेंगदाणा चिक्कीबरोबरच आता काजू, बदाम मिश्रित चिक्कीला मागणी वाढत आहे.

आंब्याची आवक घटली असून दर वाढले आहेत. सफरचंदचे दर यंदा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या १६० ते २०० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. बाजारात पपईचे आगमन सुरू झाले असून, संत्रीचे दरही टिकून आहेत. डाळिंब ५० रुपये किलोपासून १०० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहेत. केळी, चिकू, किवी यांचे दर जैसे थे आहेत.

उपवासाच्या पदार्थांची रेलचेल

उपवासाचे नवनवीन पदार्थ बाजारात दाखल होऊ लागले आहेत. शेंगदाण चिक्कीबरोबरच आता काजू-बदामाची चिक्की दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. तसेच वेगवेगळ्या व्हरायटी असलेले पदार्थ दुकानांमध्ये दिसू लागले आहेत. ऑर्गेनिक केळीही दुकांनामध्ये उपलब्ध आहे.

फळांचे किलोचे दर सफरचंद - १६० ते २००, डाळिंब - ६० ते १००, पपई - ३० ते ५०, आंबे - ८० ते १००, संत्री - ८०, चिकू - ६०, किवी - ३० रु. ला एक, केळी - ३० रु. डझन, अननस - ५० रु. ला एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसमाडीचा होणार कायापालट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गावच्या उच्चशिक्षित आणि अभ्यासू वृत्तीच्या सरपंचाच्या संकल्पनेतून सादर झालेला लोकोपयोगी विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवत गावाचा कायापालट करण्याचा चंग येवला तालुक्यातील कुसमाडी गावातील ग्रामस्थांनी बांधला आहे. 'आमचा गाव आमचा विकास'या कार्यक्रमांतर्गत गावाचा कायापालट करण्याचा मनोदय करत गावकऱ्यांनी सरपंचाच्या नेतृत्वाखाली नुकतीच वृक्षदिंडी देखील काढली. ग्रामीण भागातील गावांचा विकासात्मक कायापालट करण्याच्या दृष्टीकोणातून राज्य शासनाने नवे धोरण आखत 'आमचा गाव आमचा विकास'हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेला ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी आता नियोजन करण्यात येत आहे. येवला तालुक्यातील कुसमाडी गावाने याअंतर्गत प्रभावी पाऊल टाकलं आहे. गावाचे उच्चशिक्षित सरपंच रामदास महाले यांच्या अध्यक्षतेखाली गावात नुकतीच 'महिला ग्रामसभा' झाली. त्यात गावविकासाच्या दृष्टीने विविध उपाययोजना असलेल्या विकासकामांचा आराखडा सादर केला गेला होता. ग्रामसेविका योगिता मत्सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महिला ग्रामसभेत प्रामुख्याने गावांतर्गत रस्त्याचे क्राँक्रिटीकरण, समाजमंदिर, भूमिगत गटार, बाजार गाळे, पाणीपुरवठा पाइपलाइन, वैयक्तिक शौचालय, शिक्षण, आरोग्य आदी कामांचा समावेश करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत हरिभाऊ महाले, संजय महाले, जनार्दन महाले, अरूण आहिरे, नामदेव भोयटे, ह. भ. प. सुदाम पवार, धनसिंग पवार, एकनाथ खैरनार, माजी सरपंच ज्ञानेश्वर वाढवणे, साहेबराव भोयटे, चांगदेव भोयटे, शिवाजी गायकवाड, मंगला खैरनार, शोभा आहिरे, लक्ष्मीबाई आहिरे, सुमनबाई सोनवणे, सुनिता पवार आदी सहभागी झाले होते. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा, लेझ‌िमच्या गजरात विविध वेशभूषा करुन व विविध फलकांद्वारे गावातून काढलेली 'वृक्ष दिंडी'सर्वांचेचं लक्ष वेधून गेली. 'आमचा गाव आमचा विकास'या योजनेवर यावेळी प्रबोधन करून गाव विकासात सहभागी होण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दौलतराव येवले, उपाध्यक्ष नवनाथ महाले, शालेय समिती अध्यक्ष नवनाथ महाले, अण्णा महाले, चांगदेव पवार, बाबुलाल शेजवळ, साईनाथ येवले, प्रत्यक्ष शेजवळ, सुभाष पवार, केंद्र प्रमुख मीना वैद्य, मुख्याध्यापक निकम आदी सहभागी झाले होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसंगी कामकाज बंद पाडण्याचा इशारा

$
0
0

सटाणा समिती आवारात संघर्षाची चिन्हे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवार, (दि. १) पासून सुरू करण्यात येणाऱ्या कांदा गोणी लिलावास तीव्र विरोध करण्यात येणार असून वेळप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी बाजार समितीचे कामकाज बंद पाडतील, असा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला. यामुळे बाजार समिती आवारात आता संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.

सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने गोणीपद्धतीत कांदा लिलाव करण्याची सूचना केली आहे. यामुळे बाजार समितीमधील प्रशासकीय संचालक मंडळ व व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बाजार समिती आवारात गोणीपद्धतीत लिलाव करण्याची तयारी दर्शविली होती.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक

या सर्व प्रकारानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी, (दि. ३१ जुलै) तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोणीपद्धतीला तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच बाजार समिती आवारात पूर्वीप्रमाणेच प्रचलित पद्धतीने कांदा लिलाव करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली. गोणीपद्धतीत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान असून कांदा मालाची प्रत खराब होण्याचा धोका असल्याची भीती कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. यामुळे गोणीपद्धतीला तीव्र विरोध असून कांदा उत्पादक शेतकरी वेळप्रसंगी बाजार समितीचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा यावेळी बैठकीत दिला. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय वाघ, मनोहर देवरे, भिकानाना सोनवणे, पांडूरंग सोनवणे, जनार्दन सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संयमाने करा पाणी नियोजन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

चणकापूर वाढीव उजव्या कालव्याद्वारे उमराणा येथील परसूल पाझर तलावापर्यंत पूरपाणी देण्यात येणार आहे. यात लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, नालाबांध तसेच नाल्यांना पूरपाणी देण्यात येणार असल्याने सर्वांनी संयम ठेऊन पूरपाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण पूर्ण भरल्याने आमदार डॉ. राहुल आहेर, कृषी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते रविवारी, (दि. ३१) रोजी रामेश्वर धरणात जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. चणकापूर वाढीव उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असलेल्या रामेश्वर, गुंजाळनगर, सुभाषनगर, कापशी, वाखारी, वाखारवाडी, खुंटेवाडी, पिंपळगाव, दहिवड, मेशी, उमराणा या गावातील सर्व लहान-मोठे पाझर तलाव, नालाबांध, बंधारे भरण्याबाबत पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद न करता सर्वांना पूरपाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन आमदार डॉ. आहेर यांनी यावेळी केले. यावेळी सभापती केदा आहेर, केदा शिरसाठ, चंद्रकांत आहेर, साहेबराव सूर्यवंशी, प्रदीप आहेर, विजय पगार, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नगरपरिषदांमधील रिक्त जागा भराव्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नगरविकास विभागामार्फत नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायतीमधील १,४६५ नवीन पदांना मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर वर्ग नगरपरिषदांमधील रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेत केली.

पावसाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेत सहभागी होताना आमदार वाजे यांनी याकडे लक्ष वेधले. या गोष्टींमुळे गावातील विकासकामेही खोळंबून राहतात. त्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी आमदार वाजे यांनी केली. पंचायत समिती विभागातील कनिष्ठ सहाय्यक, सहाय्यक लेखा अधिकारी, वाहनचालक, परिचर अशी चार पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचर यांची १९ पदे तर पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. याशिवाय पशुधन पर्यवेक्षक, परिचर यांची १० पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात तब्बल २१ शाळांवर मुख्याध्यापकांची पदे भरलेली नाहीत. याशिवाय पाच केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त आहेत. एकात्मिक बालविकास योजनेतील दोन्ही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. तसेच इमारत दळणवळण विभागातील चार कनिष्ठ अभियंत्यांची तर लघुपाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक स्थापत्य अभियंता, कनिष्ठ आरेखक यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. अशी विभागात एकूण १०० पदे रिक्त आहेत.



विमा योजनेत शेतकरी हित जोपासा

दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काही मुख्य बदल करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेत केली. कागदपत्रांची पूर्तता करूनही मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मंजूर रक्कम देण्यासही टाळाटाळ होत असल्याने कुटुंबाची अवस्था बिकट होते. त्यामुळे या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरणीची कामे पूर्ण

$
0
0

मालेगाव तालुक्यात कामांना वेग; येवल्यात कपाशीच्या क्षेत्रात घट

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या महिन्याभरात मालेगाव तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तालुक्यातील पेरणीची कामे पूर्ण असून जुलै अखेर खरीप हंगामाची पेरणी १०० टक्के झाली आहे. पावसानेही या महिन्याभरात कधी मुसळधार तर कधी रिमझिम अशी हजेरी लावली. जुलै महिन्यात पावसाने १०२ मिमी. ही सरासरी ओलांडली आहे. तर एकूण गेल्या महिन्यात १३७ मिमी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यग्र झाले आहेत.

यंदाच्या मोसमात जूनच्या प्रारंभी पावसाने वाट पाहायला लावली होती. त्यामुळे पाणी संकटाने शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पंधरवड्यात पावसाने तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने तो सुखावला. यानंतर शेतीत पेरणीच्या कामांनाही वेग आला. गेल्या पंधरा दिवसात पावसाने रिमझिम हजेरी सुरूच ठेवल्याने पिके जोमाने वाढत आहेत. जुलैच्या महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील निर्धारित पेरणी क्षेत्रावर शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यात मका पिकाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने निर्धारित केलेल्या ७९,८६६ हेक्टरपैकी ७४,६५६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जूनच्या प्रारंभी पेरणी झालेल्या शेतात पिके उतरली असून अंतर मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र यासाठी लागणाऱ्या मजुरांचा तुटवडा ग्रामीण भागात जाणवतो आहे. १५० ते २०० रुपये दिवसाला मजुरी देण्यास शेतकरी तयार असतानादेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. जूनच्या प्रारंभी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने जून, जुलै या दोन महिन्यात ५८.४ टक्के इतका पाऊस झाला. यात जून महिन्यात केवळ २५ टक्के तर जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून सरासरीच्या ८८ टक्के पाऊस झाला. या पावसाने प्रामुख्याने गिरणा नदीक्षेत्रात गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. मात्र मौसम नदीक्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर विकासासाठी १४ कोटींचा निधी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नगरपालिकेस विविध विकासकामांसाठी नुकताच १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सिन्नर शहरास लागून मुसळगाव आणि माळेगाव औद्योगिक वसाहती आहे. सोबतच शहराचा विस्तार वाढला आहे. मात्र, त्यासाठी निधीची कमतरता असल्याने पालिकेस कामे करणे अशक्य होत होते. यावर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे.

या मंजुरीमुळे शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावता येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अश्विनी देशमुख यांनी 'मटा' शी बोलताना दिली. नुकत्याच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या निधीला मंजुरी दिली आहे.



या विकासकामांना मिळणार चालना

या निधी अंतर्गत वाढीव हद्दीतील रस्ते गटारीच्या कामांसाठी विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत ७,६७,७७,३०१ रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यातून एकूण ४० कामे मार्गी लागणार आहेत. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २१ रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बंदिस्त पाइप गटार बांधकाम करण्यासाठी दोन कोटी ७४ लाख १२ हजारांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली. याच हेडखाली उज्ज्वलनगर भागात पथदीप उभारणे या कामांसाठी १,३६,११,९९४ रुपये निधी मंजूर झाला. तर आणखी आठ कामांसाठी दलित वस्ती सुधार योजनेतून १,५३,८१,५७१ रुपये मंजूर झाले आहे. त्यातून रस्ता डांबरीकरण, बंदिस्त गटार बांधकाम, काँक्रिटीकरण आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी तातडीने इ-निविदा काढून ही कामे लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचेही योवळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ममदापूर प्रकल्पास फेन्सिंग करा

$
0
0

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे निवेदन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ममदापूर काळवीट संवर्धन प्रकल्पात दोन हजारापेक्षा जास्त काळविटांची संख्या आहे. गुजरातच्या वेळावदर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर या क्षेत्राचा विकास केल्यास या काळवीटांचे संरक्षण होणार आहे. यासाठी प्रथम येथे फेन्सिंग करणे आवश्यक असल्याने निवेदन नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे वन्यजीव संरक्षक अरविंद पाटील यांना देण्यात आले.

नेचर क्लब ऑफ नाशिकने नुकताच या परिसरात अभ्यास दौरा आयोजित केला. काळवीट, वनस्पती, जलयुक्त शिवार आदींचा अभ्यास यावेळी करण्यात आला. या राखीव क्षेत्रात तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त मेंढ्यांचे कळप आतमध्ये चरताना दिसले. पण या ठिकाणी वन कर्मचारी आणि मेंढपाळ यांच्या वाद होण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पास तारेचे कंपाऊंड असणे आवश्यक आहे. तसेच या मेंढपाळांना एक क्षेत्र चराईसाठी देऊन त्यांचा या राखीव क्षेत्रात प्रवेश बंद केल्यास या काळविटांचे संवर्धन होणार आहे, असे निवदेनात म्हटले आहे.

या ठिकाणी पर्यटकांना कोणत्याही सुविधा नसून काळवीट बघण्यासाठी गाइड व वाहनाची शुल्क आकारून व्यवस्था होणे आवश्यक आहे. संस्थेने या परिसरात दगडांचा अनोखा खजिनादेखील शोधून काढला. या ठिकाणी तब्बल २५० पेक्षा जास्त जातीचे विविध दगड बघावयास मिळाले. गुजरातच्या वेळावदर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर या क्षेत्राचा विकास केल्यास या काळवीटांचे संरक्षण होणार, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, प्रमिला पाटील, रमेश वैद्य, भीमराव राजोळे, सागर बनकर, सलोनी वाघमारे, आशिष बनकर, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारींचा प्रस्ताव केंद्राकडे

$
0
0

मुख्यमंत्र्यांनी केली शिफारस; राज्यमंत्री दादा भुसेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र सरकारने अमृत अभियानांंतर्गत राज्यातील एकूण ४३ शहरांची निवड केली आहे. त्यामध्ये मालेगाव महापालिकेचादेखील समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत मालेगाव भुयारी गटारींचा समावेश करण्यात यावा त्या अनुषंगाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा अशी शिफारस केल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी 'मटा' शी बोलताना दिली.

या योजनेत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मालेगाव महापालिकेसाठी ७८.३२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच २०१६-१७ आर्थिक वर्षासाठी मालेगाव महापालिकेमार्फत मालेगाव शहरात भुयारी गटार योजनेसाठी ५ मे रोजी शहरांचे सेवास्तर सुधारणा आराखड्यांची पूर्तता करून २४५ कोटींचे प्रस्ताव महाराष्ट़ जीवन प्राधिकरण, नाशिक यांची तांत्रिक मंजुरी घेऊन सरकारकडे सादर केला आहे.

अमृत योजनेअंतर्गत दुसरा टप्पा स्वच्छतेच्या दृष्टीने मालेगाव भुयारी गटारींचा समावेश करण्यात यावा या संदर्भात मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख व महापौर इब्राहिम हाजी यांनी राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. राज्यमंत्री भुसे यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेट घेऊन हा प्रस्ताव मालेगाव महापालिकेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images