Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘यूपीएससी’त नाशिकचा झेंडा!

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यंदा नाशिकच्या पाच विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकवला आहे. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोनिका पांडे, हेमंत पाखले, नरसिंग पवार, महेंद्र पंडित, शरद दराडे या नाशिकच्या उमेदवारांचा समावेश आहे.

संतप्त गाव-यांकडून बिबट्या ठार

$
0
0
जळगावमधील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावात संतप्त गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात एक बिबटा ठार झाल्याचे वृत्त आहे. वनविभागाचे कर्मचारी सध्या घटनास्थळी दाखल झाले असून घडलेल्या घटनेची चौकशी करत आहेत.

पाझर तलावाचे आठ लाख रुपये हडप

$
0
0
शिरसमनी गावात जिल्हा परिषदेने बांधलेला पाझर तलाव नवा बांधल्याचे दाखवून पाटबंधारे खात्याच्या (स्थानिक स्तर) औरंगाबाद विभागीय मंडळाचे इंजिनीअर, ब्रांच इंजिनीअर व सत्ताधारी गटाच्या ठेकेदारांनी आठ लाख ८३ हजार रुपये संगनमताने हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे कळवण तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ यांनी केला आहे.

'नाशिक रायझिंग' हा विकासाचा रोडमॅपच

$
0
0
'नाशिक रायझिंग' या उपक्रमाद्वारे पहिल्यांदाच विविध क्षेत्रांचा धांडोळा घेण्याचे, त्या क्षेत्रातील सामर्थ्य सर्वसामान्यांसमोर आणण्याचे आणि या क्षेत्राचा विकास करण्यासाठी कुठले प्रयत्न होणे आवश्यक आहेत, हे मांडले जात आहे.

खासगी शाळेविरोधात पालकांचे बंड

$
0
0
खासगी शाळा अन् कामात दिरंगाई करणा-या सरकारी अधिका-यांविरोधात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथून या मोर्चाला सुरुवात झाली होती.

नाशिकच्या २ विद्यार्थ्यांची 'SPI' साठी निवड

$
0
0
औरंगाबाद येथील 'सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट' (एसपीआय) या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेच्या नव्या शैक्षणिक वर्गासाठी नाशिकच्या अर्जुन घुमरे, ओंकार गर्दे यांची निवड झाली आहे.

सिन्नर हायवेचे काम पावसाळ्यानंतरच

$
0
0
नाशिक-पुणे हायवेच्या रुंदीकरणाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये होणा-या नाशिक ते सिन्नर हायवेच्या कामाला पावसाळ्यानंतरच प्रारंभ होणार आहे. सद्यस्थितीत सिन्नर शहरातील चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी तेही पावसाळ्यानंतरच पूर्ण होणार आहे.

सुरेश वाडकर यांच्या जमिनीवर वृक्षतोड

$
0
0
नाशिकरोड येथील मुक्तिधाम शेजारी असलेल्या सुरेश वाडकर यांच्या वादग्रस्त जागेवर वृक्षतोड सुरू असून ती थांबवावी, अशी मागणी नितीन रुईकर व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

विरगावज‍वळील अपघातात तीन ठार

$
0
0
जोधपूरला जाणा-या टेम्पो ट्रॅक्सला समोरून येणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत तीन जण जागीच ठार तर १० जण जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास विंचुर-प्रकाशा राज्यमार्गावरील विरगावजवळ घडली.

नाशिकरोड अंधारात

$
0
0
नाशिकरोडला वीजपुरवठा करणा-या टाकळी येथील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नाशिकरोडकरांना शुक्रवारची संध्याकाळ अंधारात काढावी लागली. महावितरणने फिडरची दुरुस्ती केल्याचा दावा केला असला तरी शनिवारीसुध्दा वीज जात होती.

आता चौकशी चिखलीकरच्या संयुक्त मालमत्तांची

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश मधुकरराव चिखलीकर याने स्वतःसह नातेवाईकांच्या नावे घेतलेल्या संयुक्त मालमत्तांच्या चौकशीकडे 'अँटी करप्शन ब्युरो'ने लक्ष केंद्रीत केले आहे.

पहिल्या रांगेतली दाद हरवली...

$
0
0
डोक्यावरचा प्रत्येक केस पांढरा झालेला... खुरटलेली दाढी... डोळे निस्तेज... पण आवाज खमक्या, खर्जातला. भास्करबुवा क्षेमकल्याणी हा मोठा अवलिया माणूस. शहरामध्ये कोणतीही गाण्याची मैफल असो अथवा व्याख्यान, सावानाची निवडणूक असो की पिंपळपारावरची पाडवापहाट. भास्करबुवा म्हणजे पहिल्या रांगेतला हक्काचा श्रोता.

आता मोठे मासे पकडा

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनीअर सतीश चिखलीकर यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. लाचखोरीच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप व शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅक्सीचालकावर जीवघेणा हल्ला

$
0
0
टॅक्सीमध्ये प्रवासी चढत असतानाच टॅक्सीचालकाव तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी मुंबई नाका परिसरात घडली. प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेतून ही घटना घडल्याचे समजते.

'सीआयएसएफ'चे रोहित अश्वकुमार यांची बदली

$
0
0
आयएसपी, सीएनपी प्रेसमधील कमाण्डण्ट रोहित अश्वकुमार यांची अखेर बदली झाली आहे. 'सीआयएसएफ'चे जवान व कामगार यांच्यामध्ये झडतीवरून वाद झाला होता. त्यानंतर कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते.

पीडब्ल्यूडी इंजिनीअरने जमवली १४ कोटींची माया

$
0
0
रस्त्याच्या कामापोटी मंजूर झालेल्या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी लाच घेतल्याबद्दल सध्या अटकेत असलेला उंटवडी येथील 'पीडब्ल्यूडी'चा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर याच्याकडील एकत्रित मालमत्तेचा आकडा तब्बल १४ कोटींवर पोहोचला आहे.

महिंद्रा युनियनमधील दरी रुंदावणार

$
0
0
वेतनवाढ करारावरून महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियनमध्ये फूट पडल्यानंतर कामगार पदाधिका-यांमधील दरी आता अधिक रुंदावण्याची चिन्हे आहेत. उपोषण करणा-या पदाधिका-यांनी शनिवारी उपोषणस्थळी छोटी सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

उधारीच्या वादातून तरुणाची हत्या

$
0
0
उसनवार घेतलेले पैसे परत मागितले म्हणून तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना इगतपुरी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी शब्बीर नामद खान याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धूरळणीच्या डिझेलची परस्पर विक्री

$
0
0
धूरळणीच्या (फॉगिंग) डिझेलची परस्पर विक्री केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी द्वारका सर्कल भागात राहणारे इरफान गुलाम मुर्तजा शेख याच्यासह अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोडला ६० कबुतरांची चोरी

$
0
0
नाशिकरोड परिसरात अज्ञात चोरट्याने तब्बल साठ कबुतरांची चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. कॅनॉल रोड येथे राहणारे वैभव पगार यांच्याकडे सुमारे अडीचशे कबुतरे आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images