Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निर्यात थांबल्याने टोमॅटोचे दर कोसळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो खरेदीस वेग आला असून, दररोज सरासरी दोन लाख क्रेटची आवक होत आहे. मात्र पाकिस्तानामध्ये होणारी टोमॅटोची निर्यात थांबविल्याने बाजारभावात घसरण झाली आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीतून बांग्लादेश, दुबईसह भारतातील मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात, बिहार या राज्यात टोमॅटोची निर्यात होत आहे. येथील बाजार आवारात प्रती वीस किलो क्रेटसाठी किमान ६१ रुपये, कमाल ३९१ रु पये तर सरासरी १५१ रुपये प्रती क्रेट भाव मिळत आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आवारात विविध सोयी करून देण्यात आल्याने टोमॅटोची आवकही वाढली आहे. त्यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत, बाजार समिती, पोलिसांनी एकत्रित नियोजन करून वाहनधारकांना शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान नियमनमुक्तीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांकडून आडत कपात न करता ती खरेदीदारांकडून कपात सुरू झाल्याने भावात घसरण झाल्याचीही चर्चा आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचेही भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राचार्य लूक यांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

बार्न्स स्कूलचे कर्मचारी चिनप्पा मंद्री यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित असलेल्या प्राचार्य ज्युलियन लूक यांना नाशिकरोड कोर्टाने सोमवारी बेमुदत न्यायालयीन कोठडी सुनावली.

बार्न्स स्कूल येथे गेल्या बुधवारी (दि. २१) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्राचार्य लूक यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, संपकरी कामगारांना शाळा व्यवस्थापनाने अजूनही कामावर घेतलेले नाही. शाळा नियमितपणे सुरू झाली असून सहामाही परीक्षांना सुरुवात झाली आहे.

कामगारांचे वेट अॅण्ड वॉच
प्राचार्य लूक यांच्यावर करवाई करतांना कामावरून कमी करण्यात आलेल्या ९४ कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्याबाबत बॉम्बे एज्युकेशन ट्रस्टने तयारी दर्शविली. सोमवारी शाळा सुरु झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी शाळा व्यवस्थापनाने दिवसभरात गेटवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणीही चर्चा केली नाही. गेल्या सात महिन्यापासून प्रलंबित मागण्या मान्य झालेल्या नसतांनाही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. आता अजून दोन दिवस वाट पाहू, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसाका’च्या भ‌व‌िष्यासाठी ऊस उत्पादकांची हवी साथ

$
0
0

आमदार डॉ. राहुल आहेर यांचा आशावाद

म. टा. वृत्तसेवा, कळवण

आर्थिक संकटांमुळे सलग तीन वर्षे बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सुरू करणे हे ऐक अग्निदिव्य होते. आगामी गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू करण्यासाठी सर्व सभासद, कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोलाची साथ दिल्यास वसाकाचे अरिष्ट निश्चित संपेल, असा आशावाद वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आ. डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केला. वसाका कार्यस्थळावरील श्रीराम मंदिराच्या आवारात झालेल्या वसाकाच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

आमदार आहेर म्हणाले, राज्य सरकारचे थकहमी पत्र व आजारी साखर कारखान्यांबाबतचे धोरण, राज्य सहकारी बँकेसह जिल्हा बँकेने केलेल्या अर्थसाहाय्यामुळे मागील गळीत हंगामात कारखाना मोठ्या अग्निदिव्यातून बाहेर पडला असला, तरी सर्व अडचणींवर मार्ग काढून आगामी गळीत हंगामही चालू करण्यात येईल. मागचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाचे गाळप कमी झाले असले तरी आगामी गळीत हंगाम सुरळीत व वेळेवर सुरू होईल याची खबरदारी घेतली जात असून यासाठी सर्व ऊस उत्पादक, सभासद व कामगारांनी व्यवस्थापनाला सहकार्य करावे. चालू गळीत हंगामाचा बॉयरल अग्निप्रदीपन समारंभ विजया दशमीच्या मुहूर्तावर करण्यात येईल, असे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले. आगामी गळीत हंगामासाठी वसाकाच्या नवीन कर्जाचा प्रस्ताव नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्रस्तावित असून आतापर्यत सर्वच शेतकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असून, भविष्यात वसाकाला निश्चितच सुगीचे दिवस येतील. भविष्यात वसाकाला राज्यात नंबर एकला आणण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांनी केले. यावेळी कृष्णा आहेर, माणिक निकम , प्रभाकर पाटील, शांताराम जाधव, संतोष मोरे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. धनंजय पवार, अभिमन पवार, माजी संचालक नारायण पाटील, रामदास देवरे, प्रशांत देवरे, फुला जाधव, आनंदा देवरे, कार्यकारी संचालक बी. डी. देसले, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सभासद व कामगार उपस्थित होते. बी. डी. देसले यांनी अहवाल वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकी चालकाने व्यापाऱ्यास लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मॉर्निंग वाॅक करून घराजवळ पोहचलेल्या शहरातील एका गृहिणीच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना रविवारी (दि. २५) घडली. यानंतर २४ तासानंतर लगेच येवल्यातील एका कापड दुकानदार व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवत चारचाकी वाहन चालकानेच लुटल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. २६) पहाटे घडली.

येवला शहरातील गणेश मार्केटमध्ये रेडीमेड कापड दुकानाचा व्यवसाय असणारे किरण हिरालाल झोंड (वय-५३) यांना सोमवारी (दि. २६) पहाटे एका वाहनचालकानेच लुटण्याची घटना घडली. झोंड हे मनमाडकडे जाण्यासाठी सोमवारी सकाळी नगर-मनमाड राज्य मार्गावर येवला बस स्थानकानजीकच उभे होते. पहाटे पाचच्या सुमारास मनमाडच्या दिशेला जाणारी एक चॉकलेटी रंगाची चारचाकी त्यांच्याजवळ येवून थांबली. मनमाडला जाणार असल्याचे गाडीचालकाने त्यांना सांगितल्याने झोंड हे त्या गाडीत बसले. यावेळी चालकाने धारधार हत्यार किरण झोंड यांच्या मानेला लावत तुझ्याकडे काय काय आहे ते मुकाट्याने काढून दे, असा दम दिला. चोरट्याने त्यांच्या हातातील ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ७ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज लुटत झोंड यांना गाडीच्या खाली उतरून दिले.

झोंड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करत आहेत.

महिलेची पोत लांबविली

येवला शहरातील वल्लभ नगर भागात राहणाऱ्या मंगल प्रफुल्ल लोणारी (वय-५४) या गृहिणीच्या गळयातील ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात तरुणांनी चक्क ओरबाडून नेल्याचा प्रकार येवला शहरात घडला आहे. मंगल लोणारी यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास निंबाळकर तपास करत आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

गेल्या काही दिवसात अज्ञात चोरट्यांनी नागरिकांच्या ऐवजांवर डल्ला मारण्याच्या घटना लक्षात घेता अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. या घटनांमुळे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी उधारीचे भांडण पोहोचले पोलिस ठाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सिडकोतील नागरिकांचे १४० रुपयांचे भाजीपाला उधारीचे भांडण सोमवारी थेट अंबड पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी संबधितांना समज देत किरकोळ कारणावरून वाद करू नका, असे सांगत भांडण मिटविले. मात्र, क्षुल्लक कारणांवरून वाद करीत काही जण आपला वेळ वाया घालवत असल्याची संतप्त भावना पोलिसांसह नागरिकांनी व्यक्त केली.

भाजीपाला विक्री करणाऱ्यांकडून एक महिला उधारीने भाजी घेत होती. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून संबधित महिलेकडे १४० रुपयांची उधारी बाकी होती. भाजीविक्रेत्याने संबंधित महिलेकडे उधारीचे पैसै मागितले. उधारीचे पैसै मागितल्याचा राग आल्याने संबंधित महिलेने काही जणांना हाताशी घेऊन भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना धमकावले. यानंतर भाजीविक्रेत्याने थेट अंबड पोलिस ठाण्यातच तक्रार दिली. अंबड ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी संबंधितांना समजावून सांगितले. समुपदेशनानंतर त्यांनी वाद सामंजस्याने सोडविण्यास सहमती दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक आत्महत्या; नातेवाईकांना अटक ​

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
आर्थिक ‌विवंचनेतून निर्माण झालेल्या कौटुं‌बिक वादविवादाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या नातेवाईकांनी अंबड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पाच नातेवाईकांना सोमवारी अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सं‌शयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंबडमधील प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक शिवाजी लक्ष्मण पावले (३५) यांनी शनिवारी रात्री घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी संतोष पावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिवाजी पावले यांच्या पत्नी कुसुम पावले, सासरे विठोबा भिकाजी पोमनर, सासू चंद्रकला विठोबा पोमनर, मेव्हणा संजय विठोबा पोमनर, सोमनाथ विठोबा पोमनर यांना ताब्यात घेतले.

पत्नी कुसुम उर्फ ताईबाई शिवाजी पावले यांचा शिवाजी यांच्याशी वाद झाला. त्यानंतर त्या माहेरी निघून गेल्या. शिवाजी यांना सासरच्यांनी बोलावले होते. पावले त्यांच्या नातेवाईकांसह गेले. त्यावेळी वाद झाल्याने पावले कुटुंबीयांना मारहाण केली. आपल्यासह नातेवाईकांना पुन्हा मारहाण होईल, या भीतीमुळे पावले यांनी आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पत्नी कुसुम पावले हिने खोटी केस केल्यामुळे पावले कुटुंबीयांना त्रास झाला. माझ्या मृत्यूला पत्नी, सासू, सासरे, मेव्हणे जबादार आहेत, असेही पावले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोणी, गुरुजी देता का गुरुजी?’

$
0
0

हवालदार वस्ती शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, येवला

शाळेत वर्ग चार, मात्र सर्वांना गुरुजी एकच, हे चित्र आहे येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील हवालदार वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं. एकच गुरुजी असल्याने सर्वांचा शैक्षणिक भार उचलता उचलता ते तर बेजार झाले आहेत. यात विद्यार्थ्याचं मोठं शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच 'गुरुजी देता का हो गुरुजी' अशी हाक देत आता राजापूरच्या ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील राजापूर परिसरातील हवालदार वस्तीवरील शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे चार वर्ग आहेत. यामध्ये एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एका शिक्षिकेची बदली चार महिन्यांपूर्वी झाली. मात्र नवा शिक्षक न दिला गेल्याने सध्याला चारही वर्गांना एकच शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहे.

येवला शहरापासून तब्बल २० ते २२ किलोमिटर अंतरावर ही जिल्हा परिषदेची शाळा असल्याने परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना या शाळेतच शिकण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ शाळेत वर्गनिहाय शिक्षक संख्या उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिक्षकांची मागणी मान्य न झाल्यास शुक्रवारी (दि. ३० सप्टेंबर) रोजी शाळेला कुलूप लावण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बाळासाहेब धात्रक, दत्तू वाघ, संजय वाघ, पांडुरंग जाधव आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनस जाहीर करतांना ‘रेल्वे’कडून धूळ फेक

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

इतर विभागांना ३० दिवसांचा तर रेल्वे कर्मचाऱ्यांना मात्र ७८ दिवसांचा बोनस अशी ओरड होते. मात्र, रेल्वेचा बोनसचा आकडा फसवा असून प्रत्यक्षात दहा दिवसांचा बोनस मिळतो. पोस्टाचा बोनस आणि महापालिकेचे सानुग्रह अनुदान यापेक्षाही बोनसची रक्कम कमी असल्याचा दावा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला आहे.

रेल्वे अर्थसंकल्प यंदापासून बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार की नाही अशी शंका होती. मात्र, सरकारने गेल्या चार वर्षांप्रमाणेच यंदाही रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ टक्के बोनस जाहीर केला आहे. बारा लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. बोनसपोटी केंद्र सरकारला दोन हजार कोटी मोजावे लागणार आहेत. हे आकडे फार मोठे वाटत असले तरी रेल्वे कर्मचाऱ्यांना नऊ हजार पेक्षा अधिक बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वर्ग तीनमधील काही कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. वर्ग एक व दोनच्या कर्मचाऱ्यांना तर बोनस मिळतच नाही.

महागाईला चालना

रेल्वेच्या बोनसचे आकडे दरवर्षी फुगवून सांगितले जातात. खूप पब्लिसिटी होते. लोकांना हा बोनस प्रचंड वाढतो. रेल्वेचा बोनस जाहीर होताच बाजारात दाळी, तेल आदी महाग होतात. याचा सामान्य नागरिकांनाच फटका बसतो. त्यामुळे सरकारने फसवे आकडे जाहीर न करता वस्तुस्थितीला धरून आणि सिलिंग जाहीर करून बोनसची घोषणा करावी, अशी मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बेसिक पगार दुर्लक्षित

नव्याने नियुक्त कर्मचाऱ्याला २६ हजार रुपये पगार मिळतो. त्याला सरकारी घोषणेनुसार ७८ दिवसांचा बोनस दिल्यास तो ६५ हजार मिळायला हवा. मात्र, त्याला १८ हजारपेक्षा कमीच बोनस मिळतो. याला कारण सिलिंग होय. सिलिंग गेल्यावर्षीपर्यंत महिना ३५०० रुपये होती. त्यामुळे बोनस नऊ हजाराच्या आतच मिळत होता. आता ती ७००० रुपये झाली आहे. आर्थिक वर्षात रेल्वे कर्मचाऱ्यांना १० दिवस सुटी घेतली तर ७८ दिवसांतून ते सुट्यांचे दिवस वजा करून बोनस दिला जाणार आहे.

सिलिंग वाढविले
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, नाशिक विभागीय अध्यक्ष कुंदन महापात्रा 'मटा'ला सांगितले, की बोनस जाहीर करताना सरकारने सिलिंगही जाहीर केल्यास समाजात गैरसमाज निर्माण होणार नाही, परिणामी बाजारपेठेत महागाई वाढणार नाही. गेल्या वर्षी सिलिंगची मर्यादा आम्ही ७,००० रुपये करून घेतली. त्याची थकबाकी दुसरी दिवाळी आली तरी मिळालेली नाही. यंदा ही सि‌लिंग आणि ७८ दिवसांचा बोनस विचार घेता बोनसची अधिक रक्कम १८ हजार रुपयापर्यंत मिळणार आहे. यामुळे आमच्यावर अन्यायच झाला आहे.

असे होते बोनसचे गणित
रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले, की बोनस देताना १२ महिन्यांचा पगार काढला जातो. त्यास ३६५ दिवसांनी भागतात. त्यानुसार एक दिवसाचा पगार येतो. बोनस देण्यासाठी मागील वर्षीपर्यंत ३५०० रुपये महिना अशी सिलिंग होती. या सिलिंगनुसार दिवसाला ११६ रुपये पगार पडकला. गेल्या वेळी ७५ दिवसांचा बोनस मिळाला होता. त्यानुसार ७५ गुणिले ११६ रुपये केल्यास बोनस रक्कम ८,७०० रुपयेच हातात पडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूचा वाढला ‘ताप’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूप्रश्नी राज्य सरकारने कानउघाडणी केल्यानंतरही महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचे दिसून आले आहे. शहरात चालू महिन्यात तीन आठवड्यात तब्बल ५५५ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी १८५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, ९० जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये डेंग्यू रुग्णांचा आकडा दोनशेचा आकडा पार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाची अनास्था आणि ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे डेंग्यू शहरातील नागरिकांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. पाऊस सुरू होताच जूनपासून सुरू झालेला डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांसह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा उद्रेक कायम आहे. राज्यातील पाच संवेदनशील जिल्ह्यात नाशिकचा समावेश असून राज्य आरोग्य विभागानेच महापालिकेची कानउघाडणी केली. शहरातील डेंग्यूचा आढावा घेण्यासाठी आरोग्य उपसंचालकांची नियुक्ती केली असतांनाही, महापालिकेची आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेतील सत्ताधारी नगरसेविका मेघा साळवे यांच्या पुत्रालाच डेंग्यू झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. आरोग्य विभाग सुस्त आहे. सप्टेंबरमधील पहिल्या तीन आठवड्याची डेंग्यूची आकडेवारी समोर आली. त्यात आतापर्यंत डेंग्यूचे ५५५ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी १८५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या १८५ पैकी ४६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

कागदी घोड्यांचा नाच

जानेवारीपासून आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यात ७४८ रुग्णांना डेंग्यू झाला आहे. डेंग्यूच्या वाढत्या संख्येवरून उपाययोजनांबाबत कागदी घोडे नाचवले जात असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे, आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडून केवळ डेकाटे यांची झाडाझडती करण्यापलिकडे काहीच केले जात नसल्याचे चित्र आहे.

फवारणी कागदावरच
महापालिकेने पेस्ट कंट्रोलचा ठेका देवून महिना लोटला तरी, डेंग्यूची तीव्रता कमी होत नसल्याचे चित्र आहे. संबंधित ठेकेदाराला तीन वर्षांसाठी १९ कोटी रुपये दिले जाणार आहेत. मात्र, ठेकेदाराकडून धूर फवारणी कुठे होते, हे महापालिकेचे अधिकारीही सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य अधिकारी मात्र सगळीकडे धूरफवारणी केली जात असल्याचे सांगत आहे. परंतु, महिनाभरात डेंग्यूची संख्या कमी होण्याऐवजी वाढली का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तपासणी पथके गायब?
महापालिकेने उपायांच्या नावाखाली डेंग्यू प्रभावित सिडको, सातपूर, पूर्व भाग वडाळा भागात घरोघरी तपासणी सुरू केल्याचा दावा केला होता. तसेच यासाठी ७२ पथकांची स्थापना केली होती. दीड लाख घरांची तपासणी करण्याचा दावा केला होता. परंतु, हे पथके कुठे आहेत, असा सवाल याच भागातील नागरिक विचारत आहेत. त्यामुळे तपासणीही कागदावरच सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोही घसरला

$
0
0

शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ संपेना; ५० रुपये क्रेट दर

म. टा. वृत्तसेवा, येवला

ढासळत्या उन्हाळ 'कांदा' बाजारभावाने एकीकडे उत्पादक शेतकऱ्यांचा यंदा 'वांधा' केला असतानाच गेल्या काही महिन्यात टोमॅटोच्या बाजारभावाचा आलेखदेखील कमालीचा खाली आला आहे. गतवर्षी श्रमाचे चांगले दाम हाती टेकवणारा टोमॅटो तरी यंदा साथ देईल, असे वाटत असताना त्यानेही निराशा केल्याने बळीराजाचा चेहरा काळवंडला आहे.


येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार तसेच अंदरसूल उपबाजार आवारात नुकत्याच संपलेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. मात्र बाजारभावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र दिसले. उन्हाळ कांद्याला येथे सरासरी ३०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोच्या भावात देखील मोठी पडझड होत प्रती क्रेटमागे अवघे ५० रुपये हाती पडल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. सध्या मिळणारा बाजारभाव बघता उत्पादन खर्चाच्या मानाने हाती ५० टक्के रक्कम देखील पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. येवला मुख्य आवारात गेल्या सप्ताहात एकुण २३ हजार ७५२ क्विंटल इतकी कांदा आवक होताना उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १०० ते कमाल ५७० रुपये (सरासरी ३००) प्रतिक्विंटल असा होता. अंदरसूल उपबाजारात एकूण ८ हजार ८५७ क्विंटल कांदा आवक होताना याठिकाणी देखील किमान, कमाल व सरासरी बाजारभावाची स्थिती येवला मुख्य बाजार आवरासारखीच होती.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य मार्केट यार्डवर गेल्या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. मात्र बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात एकुण १ लाख ८ हजार क्रेट आवक झाली. तर बाजारभाव किमान ३० ते कमाल १४१ (सरासरी ५०) रुपये प्रती क्रेट प्रमाणे होते. सप्ताहात टोमॅटोला देशांतर्गत जोधपूर, इंदुर, जयपूर, भोपाळ आदी ठिकाणी सर्वसाधारण मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या सुटकेसाठी दबावतंत्र?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या ईडीच्या कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समर्थकांकडून राज्यभर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या तीन ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक व विराट करण्यासाठी नियोजन बैठकींचा सपाटा सुरू केला आहे. या मोर्चाचे केंद्रबिंदू नाशिक राहणार असल्याने संपूर्ण राज्यासह केंद्राचेही लक्ष वेधून घेण्यासाठी भुजबळ समर्थकांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

जिल्हापाठोपाठ आता राज्यातील ओबीसींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात असून, आता मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर 'खूप केले इतरांसाठी, एक दिवस ओबीसींच्या नेत्यासाठी' असा नारा भुजबळ समर्थकांकडून दिला जात आहे.

राज्यभर मराठा क्रांती मोर्चाचे रान पेटले असतानाच, आता ओबीसी समाजानेही राज्य सरकारवर दबाव टाकण्याचे तंत्र सुरू केले आहे. ओबीसीचे नेते असलेले छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा दाखला देत, भुजबळांच्या सुटकेसाठी आता मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रविवारी नाशिकमध्ये बैठक होऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चाला भुजबळ समर्थकांचा मोर्चा असे नाव दिले जात असून, तो मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आर्थिक नियोजनासह मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्यभर जागर सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील मोर्चा हा एकमेव मोर्चा असल्याने तो यशस्वी करण्यासाठी समर्थकांनी आपली सर्व ताकद लावली आहे. नाशिक जिल्ह्यात तालुकावर बैठकी लावण्यात आल्या असून, सोमवारी सिन्नर, नाशिक व घोटी येथे बैठकी घेऊन मोर्चाच्या सहभागावर चर्चा झाली. राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणीही बैठकी घेण्यात येत आहेत.

युतीतील ओबीसी संभ्रमात

मोर्चाला भुजबळ समर्थक असे रूप दिले जात असले, तरी सर्व पक्षांत असलेल्या ओबीसींना पुन्हा एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेना व भाजपमध्ये असलेले ओबीसी या मोर्चाला येण्यासंदर्भात संभ्रमात आहेत. भाजपमधून आता विरोधाचा सूर उमटत असून, शिवसैनिकही द्विधा मनःस्थितीत आहेत. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाच, त्यांच्या सुटकेसाठी मोर्चा कसा, असा सवाल आता या पक्षांमधूनच केला जात आहे. मोर्चात जाणे म्हणजे भुजबळांच्या भ्रष्टाचाराला समर्थन देण्यासारखेच असल्याने या नेत्यांच्या नजरा आता पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाकडे लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आज एल्गार

$
0
0

मराठा क्रांती मोर्चासाठी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

संपूर्ण राज्यभरात गेल्या महिनाभरापासून प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढून या कोपर्डी येथील घटनेचा निषेध केला जात आहे. त्यासोबतच यातील आरोपींना फाशीची मागणी, मराठा समाजाचे आरक्षण यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जात आहे. या मोर्चासाठी संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटला असून राजकीय नेतेही आपले वैर विसरून एकत्र आले आहेत. धुळ्यात आज बुधवार (दि. २८) रोजी मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात बैठकीचे आयोजन केले जात होते.

गेल्या आठवडाभरापासून धुळ्यात सर्वत्र भगवे चैतन्य संचारले असून धुळे जिल्हा, शहर जरी आकाराने लहान असले तरी हा मोर्चा नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते, पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन मोर्चाच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. आयोजकांनी संपूर्ण धुळे जिल्हा पिंजून काढला आहे. सर्वत्र मोर्चाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी मुलांपासून कॉलेजातील तरुण-तरुणी, शासकीय नोकरदार, व्यापारी तसेच किरकोळ भाजी विक्रेत्यांमध्ये मराठा केवळ मराठा मोर्चाबद्दलचीच चर्चा सुरू आहे.

बुधवारी मोर्चा असल्या कारणाने शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजांना सुटी जाहीर केली आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यातील मोर्चात कोणताही अनुचितप्रकार घडू नये, यासाठी मराठा बांधवांनी, आयोजकांनी कंबर कसली आहे.

या मोर्चात मराठा समाजाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील, बाजार समिती सभापती सुभाष देवरे, माजी आमदार शरद पाटील, संदीप बेडसे, शाम सनेर, अतुल सोनवणे आदींसह मराठा समाजातील महिला, तरुण,तरुणी, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणार आहे.


मराठा समाजाच्या मोर्चा असल्याचे बुधवारी (दि. २७) राज्य परिवहन महामंडळाकडील सीटी बस सेवा दिवसभर बंद असणार आहे. तर शहरातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या कालीपिली खासगी टॅक्सीसह शहरातील सुमारे सातशे रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी प्रसिद्धपत्रक काढले आहे की, मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होत असल्याने प्रवाशांना सुविधा देऊ शकत नाही. मराठा समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला पाच ते सात तरुणीकडून निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर शिवतीर्थ चौकात तरुणीसह विविध मान्यवरांची भाषणे होणार आहेत.

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी पोलिस प्रशासनाने खास नियोजन केले आहे. त्यासाठी १७०० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने किमान ५ ते ६ लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात एकूण १७०० पोलिस कर्मचारी मोर्चाच्या ठिकाणी तैनात असतील. याचबरोबर अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार येथून देखील ३५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे. याचबरोबर बॉम्बशोध पथक, श्वासपथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या आणि मोर्चात साध्या वेषातील पोलिसांचाही सहभाग असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवासाठी प्रशासनाने कसली कंबर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाव‌िक येणार असल्याने रस्ता बांधकाम आणि दुरुस्तीची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करावी. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करण्यात यावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

श्री सप्तशृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोल‌िस निरीक्षक संजय घाटगे, आगार व्यवस्थापक ए. आर. अहिरे, वनक्षेत्रपाल बशिर शेख, ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, वैद्यकीय अधिकारी आर. एम. सपकाळे, सा. बा. विभागाचे उपविभागीय अधिकारी के. आर. केदार आदी उपस्थित होते. येत्या १ ते १६ ऑक्टोबरदरम्यान यात्रा होणार असून, त्यादृष्टीने प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.

उत्सवासाठी सूचना

अतिक्रमणे दूर करून रस्ते मोकळे करण्यात यावे

दुकानावर जाळी, कापड लावण्यास बंदी करावी

रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांसाठी रस्ता मोकळा करावा

तलावाजवळ जीवरक्षक दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात यावे

तलाव परिसरात प्रकाश व्यवस्था करण्यात यावी

विद्युत पुरवठ्यासाठी जोडण्यांची तपासणी करण्यात यावी

अन्न व औषध विभागाकडून हॉटेल्सची तपासणी करण्यात यावी

असे आहे नियोजन

२० खाटांचा दवाखाना, आरोग्य केंद्र

१२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

३ रुग्णवाहिका आणि ३ जीपदेखील मदतीसाठी तयार

अतिरिक्त अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक

१० पोल‌िस निरीक्षक, १५ पोल‌िस उपनिरीक्षक

२५० पोल‌िस कर्मचारी, २५० हेड कॉन्स्टेबल,अग्निशमन दलाची दोन वाहने

मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

गड पायथ्यापाशी नांदुरीत वाहनतळ

वाहनतळाजवळ मार्गदर्शन कक्ष

खासगी वाहनाना प्रवेश बंदी

गडावर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यांना भगवतीच्या दर्शनासाठी सुलभता निर्माण व्हावी म्हणून देवस्थान ट्रष्ट कर्मचारी तत्पर आहेत. - राजेंद्र सूर्यवंशी, विश्वस्थ
 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 मोटरसायकलचोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह ग्रामीण भागातून वाहने चोरणाऱ्या संशयितांचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. एका संशयिताने शहरातून तब्बल २० मोटरसायकल्स चोरल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून, त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांच्या गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सचिन देवराम तळपाडे (२३, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा युनीट एकचे पोलिस शिपाई शांताराम महाले यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तळपाडे याला गजाआड करण्यात आले. शहरातून मोटरसायकल चोरणारा तळपाडे सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एन. एन. मोहिते, दीपक गिरमे यांच्या पथकाने सीबीएस परिसरात लक्ष ठेवले होते. हालचाली संशयास्पद वाटल्याने तळपाडे याला ताब्यात घेण्यात आले. इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोडसह शहापूर, कल्याण आणि ठाणे येथून तब्बल २० मोटरसायकली चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले. सुमारे साडेचार लाख रुपयांच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. मोटरसायकल चोरणाऱ्या अन्य एका टोळीला पकडण्यातही गुन्हे शाखेला यश आले आहे. पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर, वणी, दिंडोरी परिसरातून चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या.

अल्प किमतीत गाड्यांची विक्री
तळपाडे हा शक्यतो हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर मोटरसायकल चोरत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. या मोटरसायकल्स तो ग्रामीण भागात पाच ते सात हजारांना विकत असे. कुणी कागदपत्रांची मागणी केलीच तर १०-१५ दिवसांत देतो, असे सांगून वेळ मारत असे. या चोरीच्या व्यवसायात त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत का, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तळपाडे सधन शेतकरी!
सचिन तळपाडे हा सधन शेतकरी असून त्याच्या कुटुंबीयांची गावाकडे २० ते २५ एकर शेती आहे. सचिनला दारूचे व्यसन होते. पैसे संपले की तो कल्याण, ठाणे येथे जात असे. शक्यतो हॅन्डल लॉक न केलेल्या स्प्लेंडर, पल्सर यासारख्या गाड्या तो चोरत असे. चोरलेल्या गाडीवरून तो पाथर्डी फाटा, दातीरनगरमध्ये येत असे. तेथे नातेवाईकांकडे थांबून तो पुन्हा गाडी घेऊन गावाकडे जात असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 विष्णू सावरांची आज कसोटी

$
0
0

 म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी महामंडळाची बुधवारी होणारी सर्वसाधारण बैठक वादळी ठरणार आहे. गेल्या वर्षभरापासून आदिवासी मंत्र्यांनी महामंडळाची बैठक घेतली नसल्याने सदस्य आक्रमक होवून मंत्र्यानाच जाब विचारणार आहेत. तर बैठकीच्या नावाने अधिकचे बिले काढण्यात आल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. यासाठी काही संचालक नाशिकमध्ये मंगळवारी दाखल होवून त्यांनी एका हॉटेलात खलबते केली आहेत.

आदिवासी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सावरा हे या मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी वर्षभरापासून बैठकच घेतलेली नाही. त्यामुळे संचालक आक्रमक झाले आहेत. विभागातील झालेली खरेदी, वादग्रस्त नोकरभरती या विषयांवरून संचालक आक्रमक आहेत. सावरा संचालकांना विश्वासात न घेताच परस्पर कामकाज करत असल्याने सदस्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे सावरांच्या या एककल्ली कारभाराचा जाब संचालक मंडळाकडून विचारला जाणार असल्याने ही बैठकच आता वादळी ठरणार आहे. तसेच बैठका न घेताही बैठकांची बिले काढली जात असल्याचा आरोप काही संचालकांनी केला आहे. त्यामुळे मंत्र्यांसाठी ही बैठक कसोटीची ठरणार आहे. दरम्यान या बैठकीत गोंधळ होण्याच्या शक्यतेने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याची तयारी विभागाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभासद अपात्रतेच्या मागणीला बगल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा मर्चटस् को. ऑप बॅकेला वेठीस धरणाऱ्या संचालकांना अपात्र ठरविण्याच्या मागणीला ज्येष्ठ संचालक रमेश देवरे यांनी बगल दिली. सभासदांनी टोकाची भूमिका न घेता सहकारात विरोधकांची आवश्यकता असल्याचे स्पष्टीकरण देत त्यांनी विषय गुंडाळला. बँकेचे चेअरमन यशवंत अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारणा सभा झाली.

सप्तपदी मंगल कार्यालयात ही सभा झाली. ज्येष्ठ सभासद आण्णा सोनवणे यांनी बँकेची थकबाकी असलेल्या सभासदांकडून त्वरित वसुली करण्याची सूचना केली. संजय सोनवणे यांनी दरवर्षी अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची मागणी केली. बिंदुशेठ शर्मा यांनी जळगाव मध्यवर्ती बँकेत संस्थेने केलेली चाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक त्वरित काढून घेण्याची मागणी केली. थकबाकीदारांच्या नावांची यादी अहवालात दरवर्षी छापली जाते. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. ज्येष्ठ सभासदांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणीही सोनवणे यांनी केली. चेअरमन यशवंत अमृतकर यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांना सविस्तर व समाधानकारक उत्तरे दिली.

बँकेच्या सन २०१४-१५ व १५-१६ या दोन्ही वर्षांची नफा वाटणी व्याजासकट करावी, एकरक्कमी कर्जपरतपेड योजनेंतर्गत सूट दिलेल्या कर्जखात्यांना मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी सुरेश बागड, प्रा. शं. कं. कापडणीस, संजय सोनवणे, कांतीलाल पारख, जिभाऊ सोनवणे, बाळासाहेब मोरे, पंडित सोनवणे, शरद सोनवणे, अशोक सोनवणे आदींनी सहभाग घेतला. सभेसे उपाध्यक्ष प्रकाश सोनग्रा, रमेश देवरे, अशोक निकम, रुपाली कोठावदे, जगदीश मुंडावरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या पंखात दिग्गजांकडून बळ

$
0
0

 म. टा. वृत्तसेवा, येवला

गेली अनेक वर्षे विशेष मुलांसाठी अगदी काम करणाऱ्या मायबोली कर्ण-बध‌िर विद्यालयात बुधवारी जागतिक कर्ण-बधिर दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे थोरले बंधू तथा कवी नितीन तेंडूलकर, लोककवी अरुण म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या दिग्गज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दिग्गजांच्या अनुभवामुळे दिव्यांगांच्या पंखात बळ भरले जाणार आहे.

येथील समता प्रतिष्ठान संचालित मायबोली कर्ण-बधिर विद्यालय म्हटले की, आपसुकच समोर येते ते आजवर या संस्थेने दिव्यांग मुलांसाठी केलेलं कार्य. समता प्रतिष्ठान आणि अर्जुन कोकाटे व सहकाऱ्यांनी आजपर्यंत दिव्यांगांसाठी खूप काही केले आहे. मायबोली कर्ण-बधिर विद्यालयात बुधवारी ‘जागतिक कर्ण-बधिर दिन’ व त्यातील कार्यक्रम सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारे ठरणार आहेत. संस्थेच्या अंगणगाव येथील बोटिंग कल्बजवळ सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विशेष मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे.

दिव्यांग मुलांच्या प्रतीची आजवरची तळमळ अन् कार्य लक्षात घेवून ज्यांनी आपला तब्बल ४० लाखांचा खासदार निधी नुकताच दिला त्या जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांचे मोठे बंधू नितीन तेंडूलकर, कवी अरुण म्हात्रे, जयश्री प्रभु, आमदार रामनाथ मोते यांच्यासह मीना तेंडूलकर, अनुया म्हात्रे आदी दिग्गजांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात विशेष विद्यार्थी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम देखील आकर्षणाचा विषय असणार आहेत. तसेस सायंकाळी काव्य मैफल होणार आहे. यात नितीन तेंडूलकर, अरुण म्हात्रे यांच्या कवितांची मेजवाणी देखील येवलेकरांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 ‘त्या’ जमिनीवरून मजूर सभेत वाद

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहकारी संस्थेच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या जागेच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ही जागा तातडीने विकावी अशी मागणी सभासदांनी लावून धरल्याने नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी झाली.

तिडके कॉलनीतील संस्थेच्या आवारात मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रताप मुळाणे सभेचे अध्यक्ष होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हजर असलेल्या मजूर संघाच्या संचालकांनी विविध प्रकारच्या मागण्या मांडल्या.

जत्रा हॉटेल येथील जागेबाबत अगोदर असलेल्या संचालक मंडळाने तोडगा काढण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, त्यांचा कालावधी संपूनही ते तोडगा काढू शकत नसल्याने सभासदांच्या मनात राग होता. मंगळवारी झालेल्या सभेत हा राग पुन्हा उफाळून आला. मागील संचालकां पैकी एक असलेले राजेंद्र भोसले यावेळी म्हणाले की, ही जमीन विकून जो नफा होईल तो संस्थेस देण्यास आम्ही तयार आहोत. तसेच तोटा झाल्यास तफावताची रक्कम संचालक मंडळ संस्थेला भरुन देण्यास बांधील राहील असे त्यांनी सांगितले. यावर एक वर्षात काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक वर्तमानपत्रात केवळ एकदाच जाहिरात दिली असल्याचे सभासदांचे म्हणणे होते. त्यावर संचालक मंडळाने चूक कबूल करून यावर्षात पुन्हा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनिता भामरे, विष्णूपंत गीते, प्रकाश गीते, सुनील निरगुडे, ज्ञानेश्वर कदम, मोतीराम सांगळे, निवृत्ती वावधने आदिने आक्रमक शैलीत मागण्या माडल्या. पुढे सण असल्यामुळे संस्थेने प्रत्येक मजूर संस्थेस २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी लावून धरली. गेल्या काही वर्षात संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करताना गैरव्यवहार झाला असल्याचे विष्णूपंत गीते यांनी सांगितले. ४० हजार पगार असलेल्या व्यक्तीला ८० हजार रुपये बोनस दिला जातो, याबाबत त्यांनी हरकत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिक नगरमध्ये कारच्या काचा फोडल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर, श्रमिकनगर भागात टवाळखोरांनी पाच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत समाजकंटकांकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे कृत्य केले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टवाळखोरांकडून गेल्या महिन्यात सातपूर कॉलनी भागात अनेक वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. आता त्यानंतर पुन्हा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, सातपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मनोज करंजे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पहाणी केली.

कोणालाही अडथळा न ठरणाऱ्या आणि घराच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचे कारण काय? असा प्रश्न रहिवाशी उपस्थित करतात. संबंधित टवाळखोरांवर पोलिसांनी वचक बसवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काचा फोडलेली वाहने श्रमिकनगरच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. हातात मिळेल तो दगड वाहनांच्या काचांवर फेकत नुकसान करण्यात आले आहे. रहिवाशांनीदेखील संशयित अथवा गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दोषींवर कारवाईची मागणी
श्रमिकनगर भागात टवाळखोरांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केले. या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील व लता पाटील पोलिसांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिका यात्रोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका मातेच्या यात्रोत्सवाला शनिवारवारपासून सुरुवात होत असून, पोल‌िस व ट्रस्टने सुरक्षिततेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिका मातेला या वर्षी देखील आकर्षक सुवर्णलंकार करण्यात येणार आहेत.

मंदिर परिसरात कायमस्वरुपी २४ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, जवळपास २०० हून अधिक सुरक्षारक्षक व स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. रांगेत उभे राहू न शकणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टने मुखदर्शनाची स्वतंत्र रांग करत खास व्यवस्था केली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सकाळी पाच ते दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत दररोज बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रोत्सवात दररोज दीड लाख भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा राहणार आहेत. सुरक्षितता आणि भाविकांची काळजी म्हणून पोलिस आयुक्तांनी गडकरी चौक ते मंदिरापर्यंत कोणत्याची प्रकारची दुकाने थाटण्यास मनाई करण्याचे पत्र पालिकेला यंदाही पाठवावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images