Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मेडिकल एज्युकेशनमध्ये गुणवत्तेची गरज

$
0
0
‘वेगाने विस्तारणाऱ्या ज्ञानशाखांशी स्पर्धा करताना मेडिकल एज्युकेशनचा दर्जा अधिक उंचावायला हवा. स्पर्धेच्या कालावधीत गुणवत्ता केंद्रस्थानी असायला हवी. यादृष्टीने आरोग्य विद्यापीठाने प्रयत्न करावेत,’ असे प्रतिपादन प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.

फी नियंत्रणाचा अधिकार सरकारलाच

$
0
0
खासगी शिक्षण संस्थांच्या प्रवेशाचे व फी चे नियंत्रण करण्याचा अधिकार सरकारलाच असून शाळा याबाबत पालकांची दिशाभूल करत असल्याची माहिती शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचमार्फत देण्यात आली आहे.

'एसआयएसी'चे केंद्र नाशिकमध्येही !

$
0
0
स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅकॅडमिक करिअर (एसआयएसी) म्हणजे ‘युपीएससी’मार्फत सनदी अधिकारी होण्यासाठीची पंढरी. एसआयएसीच्या लौकीकामुळे नाशिकसह राज्यातील हजारो विद्यार्थी यात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात.

राज्यात २१०० ऑटो वेदर स्टेशन्स

$
0
0
राज्यातील २१०० महसुली मंडळांमध्ये अॅटोमेटिक वेदर स्टेशन्स लवकरच कार्यन्वित होणार असल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. नाशिक येथे कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

संपामुळे शहरात शुकशुकाट

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने दुसऱ्या दिवशीही शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. तर, सरकारी धोरणाच्या विरोधात औषध विक्रेत्यांनीही एक दिवसीय संप पुकारल्याने शुक्रवारी दुकान बंदचे वातावरण शहरात पहायला मिळाले.

चिखलीकर, वाघच्या कोठडीत वाढ

$
0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्याचे आदेश नाशिक कोर्टाने दिले.

ठाकरेंच्या नाशिकभेटीचे 'राज' काय?

$
0
0
कुणी म्हणे, महापौर बदलाच्या चाचपणीसाठी आले… कुणी म्हणे जमीन पाहायला आले… तर कुणी कुजबुजले आमदारांनाही नाही कळले… शुक्रवारी सकाळी राज ठाकरे नाशिकला हेलिकॉप्टरने आले आणि कुणालाही काही कळण्याच्या आत मुंबईला परतल्यानंतर दिवसभर या आणि अशाच चर्चांचे वारे इकडून तिकडे वाहत होते.

नाशकात महापौरांच्या भावाला अटक

$
0
0
मोहन चांगले आणि दीपक सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी नाशिकमधील मनसेचे महापौर यतीन वाघ यांचा भाऊ राजेंद्र उर्फ दादा वाघ यांना शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी व्यंकटेश मोरे गजाआड असून, अन्य आरोपी फरार आहेत.

हवामानावर आधारित कृषी धोरण

$
0
0
महाराष्ट्राचे हवामानानुसार नऊ विभाग आहेत. पण आतापर्यंत कृषी धोरण ठरविताना सर्व विभागांना एकाच पट्टीत मोजले जात होते. मात्र यापुढे प्रत्येक विभागाच्या हवामानाचा अभ्यास करून त्यानुसार कृषी धोरण ठरविणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

घोडा-बैल शर्यतीप्रकरणी गुन्हा

$
0
0
जनावरांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटमगावात दोन वेगवेगळ्या प्राण्यांची शर्यत घडवून आणल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बैलांच्या

नगर, नाशिकचाही विचार करा

$
0
0
मराठवाड्याने आहे ते पाणी न वापरता आणखी पाणी सोडण्याची मागणी करणे चुकीचे असून केवळ स्वतःचा विचार न करता सर्वांचा विचार केला पाहिजे, असे मत आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये आले असता त्यांनी मराठवाडा पाणीप्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली.

रेल्वेस्टेशनवर नवीन वेटिंगरूम

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठी अद्ययावत वेटिंग रूम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या रूमचे काम सुरू करण्यात आले असून काही दिवसांतच ते प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

कामगारांनो, अन्याय सहन करू नका

$
0
0
कामगारांनी अन्याय सहन न करता काम करावे. कामगारांच्या न्याय हक्कावर कुणी गदा आणण्याचा प्रयत्न करीत असल्यास रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला.

जेलमध्ये सापडला मोबाइल

$
0
0
सेंट्रल जेलमधील दोघा गँगस्टरनी मुंबईतील नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी दिल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने मोबाइल फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जळगावकरांचे पाणीसंकट टळले

$
0
0
मे-जून महिना कसा जाईल, पाणी मिळेल की नाही, याची काळजी लागून राहिलेल्या जळगावकरांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला आहे. जळगाव महापालिका, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी रात्रंदिवस खपून वाघूर धरणावरील दोन कोटी रुपये खर्चाची 'डाऊन स्कीम' केवळ ६० दिवसांत पूर्ण केली आहे.

कळवणमधील विहिरींनी गाठला तळ

$
0
0
कळवण तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुनद नदीपात्रातील व गिरणा नदीपात्रातील कित्येक गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठल्याने योजना कोरड्या झाल्या असून पिण्याचा पाणी प्रश्न भेडसावत आहे.

पुनर्मूल्यांकनाचा लागला 'निकाल'

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरींग शाखेच्या परीक्षांना सुरूवात झाली असली तरीही मागील सत्राच्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप रखडलेलेच आहेत. निकालाच्या या दिरंगाईमुळे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्यावरील खड्ड्याने अपघातांना आमंत्रण

$
0
0
कळवण शहरातून जाणाऱ्या महत्त्वाच्या अशा कळवण-देवळा मार्गावरील उपजिल्हा हॉस्पिटल ते बसस्थानकापर्यंतचा रस्ता दुरुस्तीनंतर व्यवस्थित न बुजवल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने कळवणवासी संताप व्यक्त करीत आहेत.

डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत देवळाली गावातील रस्ता

$
0
0
देवळाली गावातील पाटील गॅरेजला लागून असलेल्या रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे. हे काम त्वरित मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

परिक्षेचा गोडवा!

$
0
0
लॉन्स-हॉल्सच्या फुल्ल झालेल्या बुकिंग्ज, खच्चून वाहणारे रस्ते, त्यात मिरवणूकांचा ताप, आतषबाजी आणि जेवणावळी... लग्नसराईचा मोसम असल्याने पहावं तिकडे असंच वातावरण दिसतंय.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images