Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'नाशिकचे चालक मुंबईसाठी पाठवा'

$
0
0
कर्मचारी भरतीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर एसटीच्या मुख्यालयाला वर्षभरानंतर सन २००४च्या निर्णयाची उपरती झाली आहे. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या प्रशिक्षित उमेदवारांना मुंबईत नियुक्ती देण्याचा घाट घातला जातो आहे.

रेल्वे प्रशासनाकडून अखेर साफसफाई

$
0
0
रेल्वे कामगार संघटनांच्या मान्यतेसाठी एप्रिल महिन्यात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पत्रके चिकटवून स्टेशन विद्रूप करण्यात आले होते.

'मँगोमॅनिया'ने वाढविली आंब्याची टेस्ट

$
0
0
मे महिना सुरू झाला की घराघरात पहायला मिळतो तो फळांचा राजा आंबा. आमरस, आम्रखंड, आंब्याची बर्फी, याबरोबरच कैरीचं पन्हं, मेथांबा असे एक ना अनेक पदार्थ चवीचवीने खाल्ले जातात. काही हौशी महिला मात्र आंब्यापासून हटके पदार्थ बनविण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.

मनसेकडून टँकर सेवा

$
0
0
जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होत आहे. सध्या जिल्ह्यात सरकारतर्फे १२३ टँकर सुरू आहेत.

चांगले-सोनावणे हत्याकांडाची माहिती हाती लागेना...

$
0
0
पुर्ववैमनस्यातून झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडात फरार असलेल्या तिघा आरोपींबाबत अद्याप ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

पालिकेची विकासकामांची कासवगती

$
0
0
महापालिका हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी महापालिका मोकळ्या भूखंडावर आरक्षण टाकते. त्यानंतर ती जमीन संपादित करून त्यावर विकासकामे केली जातात.

अण्णांची स्थिती 'आरपीआय'सारखी!

$
0
0
'अण्णा हजारेंचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन योग्य असले तरी त्यांच्यातील गटा-तटांमुळे त्यांची परिस्थितीही गट पडलेल्या 'आरपीआय'सारखी झाली', असा टोला हाणत 'गटातटांत विखुरलेले आरपीआयचे नेते एकत्र येत नसल्याने मी लोकांना एकत्र करतोय', असे उद्गार रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे काढले.

अक्षयतृतीयेला संपाला अल्पविराम

$
0
0
अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर एलबीटी विरोधात बंद सुरू ठेवावा का? या मुद्द्यावरून व्यापारी कृती समितीत फुट पडली आहे. समितीने संपाबाबत आग्रही भूमिका घेऊनही काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवण्याचा ​निर्णय घेतला आहे.

हातावर पोट भरणा-याचे हाल

$
0
0
एलबीटीच्या प्रश्नावर सरकार आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यात तडजोड न झाल्याने पाचव्या दिवशीही बंद कायम होता. या बंदमुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून यावर लवकर तोडगा काढावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.

धुळ्यात पालिका निवडणुकीचे पडघम

$
0
0
धुळे महापालिका निवडणुकीला अद्याप सहा महिने शिल्लक असताना प्रचाराला आणि आरोप-प्रत्यारोपाला शनिवारी मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली. आमदार अनिल गोटे यांनी जुने अमळनेर परिसरात सभा घेऊन निवडणुकीची लढाई आजपासूनच सुरू झाल्याचे स्पष्ट केले.

सावली येणार पावली !

$
0
0
असं म्हणतात की तुमची सावली तुम्हाला कधीच सोडून जात नाही, पण समजा ती खरंच गेली तर, अगदी मिनीटभरासाठी. '

चिखलीकर, वाघ आयसीयूतच

$
0
0
कोट्यवधींची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ अद्याप आयसीयूमध्येच आहेत. सोमवारी सकाळी डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करून त्यांना जनरल वार्डात हलवावे का, यासंबंधीचा अहवाल सादर करणार आहेत.

देशाचे किचन

$
0
0
पारंपरिक पिकांच्या जोडीला भाजीपाला, फळभाज्यांची लागवड करण्याची पद्धत जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. खासकरुन नाशिकमधील हवामान, पाण्याची उपलब्धता यांचा त्यावर विशेष परिणाम होतो.

आजपासून जळगावात पाणी परिषद

$
0
0
जळगाव महापालिकेतर्फे मंगळवारपासून दोन दिवसीय पाणी परिषद होत असून तिचे उद्घाटन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त तथा जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह करणार आहेत.

राजनाथसिंह यांच्याकडून खडसेंचे सांत्वन

$
0
0
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे जाऊन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे सांत्वन केले. राजनाथसिंह यांचे रविवारी दुपारी विमानाने येथे आगमन झाले. विमानतळावरून ते थेट कोथळी मुक्ताईनगर येथे रवाना झाले.

नाशकात पिकतोय परदेशी भाजीपाला

$
0
0
भेंडी, कोबी, गिलके यासारख्या पारंपरिक भाजीपाल्याबरोबर नाशिक जिल्ह्यात आता परदेशी भाजीपाल्याचीही लागवड होत आहे. गेल्या काही वर्षात या भाजीपाल्याचे क्षेत्र २०० हेक्टरहून अधिक झाले आहे. नाशकात पिकणारा हा भाजीपाला मुंबई, पुण्यासह देशभरातील मोठ्या हॉटेलांमधील खवय्यांचे चोचले पुरवित आहे.

रोड कनेक्टिव्हिटीला सिंहस्थाचा बूस्ट

$
0
0
नाशिकच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे जाळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अत्यंत सक्षम होण्याची चिन्हे आहेत.

दहा दिवसात तीन एन्ट्रन्स

$
0
0
राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (डीटीई) विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणा-या प्रवेश परीक्षा आता तोंडावर आल्या असून १६ मे ते २६ मे या दहा दिवसांत तीन प्रवेश परीक्षा होणार आहेत. राज्यभरातील विविध केंद्रावर या परीक्षा होतील.

१४९ जागांसाठी दहा हजार उमेदवार

$
0
0
पोलिस आयुक्तालयातील २७ आणि ग्रामीण दलातील १२२ जागांसाठीच्या भरतीप्रक्रियेसाठी सुमारे १० हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले असून, प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

दुष्काळग्रस्त भागात मदतीचा 'पाऊस'

$
0
0
दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी नाशिकमधील स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, मंदिर ट्रस्ट आणि कार्यकर्ते सरसावले आहेत. आर्थिक निधी, पाण्याच्या टाक्या आणि चारा असे मदतीचे स्वरूप आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images