Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जखमी उपसरपंचाचा मृत्यू

$
0
0
पंचवटीतील कपालेश्वर मंदिराजवळ असलेल्या गोएंका धर्मशाळेचा काही भाग कोसळल्यामुळे जखमी झालेल्या उपसरपंचाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भिंत कोसळण्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती.

मनमाडकरांची पाण्यासाठी वणवण

$
0
0
रेल्वेचे जंक्शन, आशिया खंडातील दुस-या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवून ठेवणारा डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प आणि शीख धर्मीयांच्या सुप्रसिध्द गुरुद्वारामुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख आहे.

मंगलवाद्याला घाट देणारी जीवनसाधना स्पृहणीयच

$
0
0
सनई म्हटलं की उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे सूर कानात घोळत राहतात. सनई हे मंगलवाद्य आहे, त्याच्या फुंकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीही सूर मात्र मंगल असेच असतात, ती सनई असते दुर्गादास ठाकूर यांनी बनवलेली.

आडगाव नाका परिसरात घरफोडी

$
0
0
आडगाव नाका येथील बंगल्याचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या दोघा संशयितांविरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोघे धुळे रेल्वे स्टेशन परिसरात राहतात.

सातपूर घटनेची इंदिरानगरला 'पुनरावृत्ती'

$
0
0
छेडछाडीबाबतच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची सातपूरमधील घटना ताजी असतानाच इंदिरानगरमध्येही असाच प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर नसल्याची सबब पुढे करत इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी एका महिलेची कौटुंबिक हिंसाचाराबाबतची तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली.

'डीपीसी'च्या रिंगणात २८ उमेदवार

$
0
0
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) ४०पैकी २६ जागा बिनविरोध झाल्याने, आता या निवडणुकीच्या १४ जागांसाठी २८ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. समितीची निवडणूक ११ फेब्रुवारीला होत असून, मतमोजणी दुस-या दिवशी होणार आहे.

...तर ठेकेदाराला डेपोबंदी

$
0
0
एसटी बस स्वच्छतेच्या खासगीकरणाला विरोध करत एसटी कामगार संघटनेने स्थानिक प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासगीकरण झाल्यास ठेकेदार व त्याच्या कर्मचा-यांना डेपोबंदी करू, अशी भूमिकाही संघटनेने नोटीसीद्वारे स्पष्ट केली.

चेन स्नॅचर्सचा शहरात धुमाकूळ

$
0
0
गेल्या काही महिन्यांत शहरापासून दूर राहिलेल्या स्नॅचर्सच्या एका टोळीने शनिवारी दिवसभरात धुमाकूळ घातला. नाशिकरोड, पंचवटी आणि आडगाव भागात चेन स्नॅचिंग करणारे हे चौघे भामटे संध्याकाळी भद्रकाली पोलिसांच्या तावडीत सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांपुढे धर्मसंकट

$
0
0
कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यान्वये सुरू झालेल्या प्रवेश प्र‌क्रियेमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांपुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे.

मेडिकल 'शुद्धी'ने खासगी कॉलेजांची चांदी

$
0
0
खासगी आणि अभिमत मेडिकल कॉलेजांवर 'कृपा' करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांमधून 'शुद्धिपत्रका'ची पळवाट काढून तब्बल २७० जागा घश्शात घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वाजव रे...

$
0
0
शहरात झालेल्या एका ओल्या सोहळ्यामुळे दोन दिवस त्या भागातलं वातावरण आल्हाददायक होतं. अनेकांनी तर परदेशी पाहुण्यांचा थाट पाहून तोंडात बोटं (स्वतःची) घातली.

तपोवनात नाशिक कला निकेतनची वास्तू उभारू

$
0
0
नाशिक कला निकेतन ही नाशिकची संस्था आहे, आमची संस्था आहे, नव्हे त्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर नाव कमावल्याने ती संपूर्ण महाराष्ट्राची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेला वाऱ्यावर सोडणार नाही.

रिक्षांचा आज 'विद्यार्थी बंद'

$
0
0
आरटीओ व पोलिसांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या रिक्षांवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करताना, काही प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक रिक्षा चालक-मालक सेनेतर्फे सोमवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

नोकराकडून तीन लाखांवर डल्ला

$
0
0
उन्हाळ्याच्या हंगामात सुरू होणा-या रसपानगृहाचे सामान खरेदीसाठी आणलेले तीन लाख रुपये चोरट्याने लंपास करण्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संत कबीरनगर परिसरातील बस स्टॉपजवळ घडली.

नाशिककरांसाठी द्राक्ष अधिक गोड

$
0
0
नाशिक जिल्ह्यात इलेक्ट्रोस्टॅटिक मशिनचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला असून या वर्षी बाजारात आलेली द्राक्ष अधिक गोड असणार आहेत. जिल्ह्यात दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड असून या मशिनचा वापर बहुतांश बागांमध्ये करण्यात आला आहे.

रसायने कमीत कमी वापरा

$
0
0
'कर्करोगाला तसे पर्यावरणाच्या -हासाला रसायनांचा अतिरेकी वापर हे एक कारण आहे. त्यामुळे प्रयोगशाळा कर्मचा-यांनी रसायनांचा कमीत कमी वापर कसा करता येईल हे पाहावे,' असा सल्ला प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांनी दिला.

आडमुठ्या शाळांची लवकरच बैठक

$
0
0
विद्यार्थी वाहतुकीसाठी रिक्षांना आवश्यक संमती देण्यात आडमुठेपणा करणाऱ्या मुख्याध्यापकांची लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आरटीओ चंद्रकांत खरटमल यांनी श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

पाणी कपातीत शिवसेनेची मनसेवर मात

$
0
0
गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे सांगत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी, अशी मागणी केली. परंतु सध्या कपातीची गरज नाही, असा दावा करीत महापौरांनी बडगुजरांची मागणी फेटाळली.

आज 'एमपुक्टो'सह मुख्यमंत्र्यांची बैठक

$
0
0
विविध मागण्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या प्राध्यापकांनी यंदा संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने राज्य सरकारला या मागण्यांची दखल घ्यावी लागली आहे.

नाशिक: इंटकची घुसखोरी

$
0
0
महापालिकेच्या मुख्यालयात इंटक संघटनेला स्वतंत्र कक्ष देण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>