Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लेखी परीक्षेसाठी ८९४ उमेदवार पात्र

$
0
0
शहर व ग्रामीण पोलिस दलासाठीच्या भरतीप्रक्रियेतील पहिला टप्पा पार पडला आहे. मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या १२५५ उमेदवारांमधून ८९४ तर ग्रामीण दलाच्या १२७ जागांसाठी चार दिवसांत दीड हजारांहून अधिक उमेदवार पात्र ठरले. लेखी परीक्षा मंगळवारी, २१ मे रोजी होणार आहे.

सिन्नर ऑफिसचे बेकायदा स्थलांतर

$
0
0
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मूखंडांनी सिन्नरचे ऑफिस बेकायदा नाशिकमध्ये स्थलांतरित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे ऑफिस सातपूरच्या उद्योग भवनात स्थानापन्न झाले आहे.

कामगार संघटना, 'इंटक'चा सूर जुळला

$
0
0
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला सदैव पाण्यात पाहणाऱ्या 'इंटक' (महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस) व कामगार संघटना यांच्यात कामगार प्रतिनिधी नियुक्तीवरून सूर जुळला आहे. संघटनेतील बंडखोरीचे 'इंटक'कडून राजकीय भांडवल केले जात असले तरीही, त्यानिमित्ताने 'पाहुण्याकडून साप मारला जात असल्याने' कामगार संघटनेतील पदाधिकारीदेखील मनोमन खूष आहेत.

दुसऱ्याच केंद्रावर परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत हॉल तिकिटावरील गोंधळामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी या गोंधळामुळे ठरलेल्या केंद्राच्या व्यतिरिक्त अन्य केंद्रावर परीक्षा दिली. शनिवारी झालेल्या परीक्षेसाठी लहान वर्गातील पदे असतानाही यंदा व्यापक करण्यात आलेले प्रश्नपत्रिकेचे स्वरूप स्वागतार्ह असले तरीही आयोगाचा टायमिंग चुकल्याची चर्चा तज्ज्ञांच्या वर्तुळात आहे.

बनावट चेकद्वारे फसवणूक

$
0
0
बनावट चेक खरा असल्याचे भासवून एका व्यक्तीने दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'एसीबी' चौकशी 'मॅनेज'

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्याचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर प्रकरणात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची राज्यपालांनी हकालपट्टी करीत त्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

डबेवाल्याची घाई !

$
0
0
चार प्रवाशी घेतलेली रिक्षा शहराच्या दिशेने धावत असते. तेवढ्यात रिक्षाचालक डावा पाय बाहेर काढून रिक्षा बाजूला घेतो. पाय हेच त्याचं इंडिकेटर माहित झालेली पाठीमागील वाहनं वळून पुढे निघून जातात.

सन्मवयला हवा ग्रीन सिग्नल

$
0
0
नाशिक शहराचा विकास ज्या झपाट्याने होतो आहे, त्यादृष्टीने शहराच्या शाश्वत विकासाचाही विचार होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीकोनातून इन्स्ट‌िट्यूट फॉर ट्रान्सपोर्टटेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलीसी (आयटीडीपी) या संस्थेमार्फत आम्ही काही दिवसांपूर्वी नाशिक शहराचा सर्व्हे केला होता.

शेतक-यांना बियाणे, खते वेळेवर द्या

$
0
0
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे व खतांच्या उपलब्धतेचे नियोजन तसेच कृती आराखडा तयार करून शेतक-यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते वेळेवर उपलब्ध करा, अशी सूचना कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी शनिवारी खरीप आढावा बैठकीत अधिका-यांना दिली.

पंधराशे ग्रंथालयांना ११ कोटींचे बळ

$
0
0
ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून असले, तरी ग्रंथालय चळवळ मात्र आधुनिक काळातील आहे. ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने ही चळवळ जेवढी मजबूत होईल तेवढाच समाज मजबूत होईल असे म्हटले जाते.

स्त्रियांना अद्यापही बरोबरीचे स्थान नाही

$
0
0
सामाजिक स्थित्यंतराच्या टप्प्यावर पूर्ण जीवन सामाजिक क्रांतीसाठी खर्ची घालणारे महापुरुष इतिहासात होऊन गेले. त्यांच्या नावाची पारायणे वारंवार केली जातात. मात्र अद्यापही त्यांनी दिलेल्या संदेशाचे आचरण पूर्णत: होत नाही.

'कपालेश्वर'ची मालमत्ता विक्री करण्याचे आदेश

$
0
0
कपालेश्वर पतसंस्थेच्या शेकडो ठेवीदारांना त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळाल्या नसल्याने जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत.

मान्सूनपूर्व कामांच्या प्रतीक्षेत नाशिकरोड

$
0
0
पावसाळ्याची चाहूल लागली असली तरीही महापालिकेने नाशिकरोड परिसरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलेली नाही. त्यामुळे येथील गटारी आणि नाले लवकरात लवकर साफ करावे, अशी मागणी नाशिकरोडवासीयांनी केली आहे.

आयुर्वेदातील संशोधन आरोग्य विद्यापीठाच्या अजेंड्यावर

$
0
0
आयुर्वेदातील संशोधीत मूल्य जगासमोर ताकदीने मांडले जाण्याची गरज आहे. या संशोधनावर योग्य पद्धतीने भर दिला गेल्यास देशासाठी आयुर्वेदावर आधारित अर्थशास्त्राचाही उदय होईल.

सामुदायिक विवाह काळाची गरज

$
0
0
मुस्लिम समाजात सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम संयोजकांनी केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अल्प संख्यांक विभागाचे अध्यक्ष आ. एम. एम. शेख यांनी केले.

छेडछाडीविरोध एल्गार

$
0
0
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महिलांची होणारी छेडछाड थांबविण्यासाठी आता विविध क्षेत्रांना कार्यवाही करावी लागणार आहे. शैक्षणिक संस्थांनाही याबाबतची मार्गदर्शक तत्वे अवलंबावी लागणार असून त्याचा अहवालही सरकारला सादर करावा लागणार आहे.

नियमांबाबत आ.छाजेड अनभिज्ञ

$
0
0
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधीची नियुक्ती ही अधिकृत असून, आमदार छाजेडांना त्याबाबत माहिती नसावी, असा टोला महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी लगावला.

बारगळली‍ दप्तर तपासणी

$
0
0
एखादा उपक्रम केवळ नावाला हाती घेण्याचे प्रकार शिक्षण विभागात सर्रास पहायला मिळ‌त आहेत. बोर्डामार्फत बारगळलेल्या माध्यमिक शाळांच्या प्रयोगशाळा तपासणीनंतर आता महापालिका शिक्षण मंडळामार्फत गेल्या वर्षी सुरू केलेली दप्तर तपासणी मोह‌ीमही बारगळल्याचे निदर्शनास आले आहे.

...तरीही २ दिवसाआड पाणी

$
0
0
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणा-या वाघूर धरणावरील डाऊन स्कीम पूर्ण झाल्यानंतर जळगावकरांना तीन महिने तरी पाण्याची चिंता भेडसावणार नाही. मात्र पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी जळगावकरांना दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे.

एक्स्प्रेसच्या धडकेत पती-पत्नी ठार

$
0
0
रेल्वे ट्रॅकवर उभे राहून प्लॅटफॉर्मवर चढत असताना समोरून वेगाने आलेल्या हावडा मेलने जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी नांदगाव स्टेशनवर घडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images