Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘मटा’ वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांची मेजवानी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या मनात अल्पावधीतच स्थान बळकट करणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीचा सहावा वर्धापन दिन येत्या गुरुवारी (दि. ८ जून) साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक व अन्य भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी घेऊन ‘मटा’ वाचकांच्या भेटीला येत आहे.

‘निष्पक्ष वृत्तपत्र’ अशी वाचकांच्या पसंतीची पावती मिळविणारा ‘मटा’ नाशिकमध्ये ८ जून रोजी सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. अल्पावधीतच ‘मटा’ने नाशिककरांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जोपासणाऱ्या अन् विकासाकडे झेपावणाऱ्या नाशिकनगरीची स्पंदने अलवार टिपली आहेत. आक्रमकपणा तसूभरही कमी होऊ न देता गैरप्रकारांवर कोरडे ओढले. चांगल्याचे कौतुक केले अन् यशाला गवसणी घालणाऱ्यांच्या पाठीवर अभिमानाने कौतुकाची थापही दिली.

--

६ ते १३ जूनदरम्यान रेलचेल

वर्धापन दिनानिमित्त ६ जून ते १३ जून या कालावधीत विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. ‘मटा’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये होणार आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हा या मटा आर्ट फेस्टचा उद्देश आहे. खरं तर ‘मटा’ वर्धापन दिनाला २८ मेपासूनच हॉटेल एक्स्प्रेस इन येथे प्रख्यात गायक जावेद अलींच्या लाइव्ह कॉन्सर्टने रंगारंग सुरुवात झाली आहे. १३ जूनपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. यात वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी हेरिटेज वॉक, वर्धापन दिन सोहळा, नाटक, आर्ट फेस्ट, वर्कशॉप अशी विविधरंगी मेजवानी मिळणार आहे.

---

६ व ७ रोजी हेरिटेज वॉक

आता ६ व ७ जूनला मटा हेरिटेज वॉक होणार आहे. नाशिकमधील विविध ऐतिहासिक स्थळे यात नाशिककरांना पाहायला मिळणार असून, त्याबाबत सखोल मार्गदर्शनही मिळणार आहे.

--

९ तारखेला नाट्यप्रयोग

९ जानेवारी रोजी ‘दोन स्पेशल’ हे बहारदार नाटक महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. ह. मो. मराठे यांच्या न्यूज स्टोरी कथेवर आधारित अथर्व थिएटर्सचे हे नाटक असून, लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, निर्माता संतोष भरत काणेकर, जितेंद्र जोशी आहेत. या नाटकात गिरिजा ओक-गोडबोले, रोहित हळदीकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रात्री ९ वाजता हे नाटक असून, कल्चर क्लब मेंबरसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे. जे कल्चर क्लबचे नवीन मेंबर होतील त्यांच्यासाठी एक कपल पास मोफत देण्यात येईल. ज्यांना नाटक बघावयाचे आहे, परंतु मेंबर नाही अशा वाचकांसाठी तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था राहील.

---

१० व ११ रोजी मटा आर्ट फेस्ट

आर्किटेक्ट कॉलेजमध्ये दि. १० व ११ रोजी दिवसभर मटा आर्ट फेस्ट होणार आहे. त्यात विविध कलांचे डेमो, नृत्य, गायन, वादन, मुलाखती, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध कलांचा समावेश आहे.

--

१२ तारखेला चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी १२ जून रोजी मते लॉन्स, सावरकरनगर (नंदनवन लॉन्स) येथे चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘स्मार्ट सिटी’ हा विषय देण्यात आला आहे.

--

१३ रोजी झुम्बा वर्कशॉप

१३ जून रोजी अखिल भारतीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या हॉलमध्ये झुम्बा वर्कशॉप होणार आहे. या वर्कशॉपमध्ये प्रतीक हिंगमिरे मार्गदर्शन करणार असून, वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कमलेश घरटे (मोबाइल- ७०४०७६२२५४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरुणराजा बरसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळण्यासह विविध दुर्घटना घडल्या. पहिल्याच पावसात विजेचा लपंडावही पाहायला मिळाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली.

शहरात गेले काही दिवस उष्णतेची लाट असताना गुरुवारी दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी नाशिक शहर, गंगापूररोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प व परिसरातील भागात कोसळल्या. पावसाच्या शिडकाव्यानंतरही पारा मात्र खाली आला नाही. हलक्या सरी असल्याने पिकांचेही नुकसान झाले नसले, तरी वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

--

गंगापूररोडला झाड कोसळले

सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे गंगापूररोडवरच्या जेहान सर्कल परिसरातील झाड उन्मळून दोन जण जखमी झाले. त्यात एका लहान मुलीचा समावेश होता. हनुमान प्रल्हाद सिरामे आणि पूजा प्रल्हाद सिरामे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

--

विजेचा लपंडाव

पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव अनुभवायला मिळाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली. अनेक भागातही वादळीवारा आणि वीज कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. वीज नसल्याने नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला.

--

बांबूंचा मनोरा कोसळला

नाशिकरोड ः नाशिकरोड परिसरात सायंकाळी पाच ते सातदरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. बिटको हॉस्पिटलसमोर एका नवीन इमारतीचे काम सुरू होते. त्यासाठी बांधलेला बांबूंचा मनोरा वादळी वाऱ्यामुळे कोसळला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. परंतु, तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

--


-पंचवटीत रिमझिम, वीजपुरवठा खंडित

-सिडको व इंदिरानगर भागात तारांबळ

-नाशिकरोडला कोसळला बांबूंचा मनोरा

-सातपूर परिसरात दमदार हजेरी

-देवळालीत हलक्या सरींमुळे दिलासा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात शेतकरी संप चिघळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुमारे २३ कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो, डाळिंब, आंबे, तसेच दूध रस्त्यावर फेकले. येवला तालुक्यात कोपरगाव टोलनाक्याजवळ एका गाडीची जाळपोळ व काही गाड्यांची तोडफोड करण्यात आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण होते. येवला- कोपरगाव मार्गावरील तांदूळवाडी परिसरात टोलनाक्याजवळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या या संपामुळे काही तालुक्यांत व्यवहार ठप्प होते, तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत होते. प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेतली असून, ज्यांना शेतमाल विक्रीसाठी न्यायचा आहे त्यांना पोलिस बंदोबस्त दिला जात आहे. दिंडोरी येथे राजहंसच्या सुरतकडे जाणाऱ्या १३ गाड्या आंदोलनामुळे अडकल्या होत्या. त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला. निफाड येथील निर्यात करण्यात येणाऱ्या कांद्याचे दोन ट्रक अडकल्याची तक्रार दिवसभरात आली. त्यासाठी पोलिसांना मदतीचे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

संप काळात ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी न्यायचा असेल त्यांना पोलिस बंदोबस्त दिला जाणार असून, त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी ०२५३ -२३१५०८०,२३१७१५१ व टोल फ्री क्रमांक १०७७, १०८, १०२, १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा व कळवण येथे सर्व व्यवहार सुरळीत होते, तर अन्य तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन झाले. बहुतांश बाजार समित्यांचेही व्यवहार ठप्प झाले.

टोलनाक्याला फटका

चांदवड टोल नाक्यावरून रोज ३५०० मालवाहतूक गाड्या जातात. आजच्या संपामुळे २१७५ गाड्याच गेल्या, तर इगतपुरी टोलनाक्यावर रोज आठ हजारांच्या आसपास गाड्या जातात. येथेही ३० टक्के वाहतूक कमी झाली.

दूध संकलन केंद्रेही ओस

जिल्ह्यात १७ दूध संकलन केंद्रे असून, संपामुळे अवघे ३० हजार लिटर दूधसंकलन झाले. यापूर्वी दिवसाला या केंद्रांवर २ लाख ९० हजार ते ३ लाख १० हजार लिटर दूध संकलन होत होते; पण या संपामुळे ही केंद्रेही ओस पडली.

येवल्यात संचारबंदी

येवला ः मनमाड-नगर मार्गावर पिंपळगाव शिवार येथील टोलनाक्याजवळ परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी चारच्या सुमारास प्लास्टिक गोळ्यांचे पाच राऊंड फायर करण्यात आले. त्यामुळे सामानाची लुटालूट करणारे पसार झाले. चित्रीकरणातून कोपरगाव तालुक्यातील नातेगाव, येसगाव, ब्राह्मणगाव आदी ठिकाणचे नागरिक लुटालूट करण्यात पुढे असल्याचे दिसले. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी वासंती माळी यांनी १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश दिला. जमावबंदी आदेश लागू झाल्याने पोलिसांचा गोळीबार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, ‘मटा’च्या हेरिटेज वॉकला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रथा, परंपरा, कथा, दंतकथा, पुराण, धार्मिक पैलू, तसेच सातवाहन ते स्वातंत्र्यकाळातील विविध घडामोडींनी गजबजलेला नाशिकचा वैभवशाली ऐतिहासिक प्रवास थक्क करतो. याची चुणूक ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वर्षभर ‘मटा’ हेरिटेज वॉकच्या निमित्ताने उलगडलेल्या पाऊलखुणांतून आपण अनुभवलीच आहे. लेणी, वाडे, पोथ्या, गोदाघाट, मंदिरे, नाणी, इतिहासाच्या पाऊलखुणा पुढे घेऊन जाणारी गावे वर्षभरात आपण अनुभवली. यंदाही हे विविध पैलू अनुभवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दि. ६ व ७ जूनदरम्यान सहा ठिकाणच्या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वणीत सहभागी होण्याची संधी नाशिककरांना लाभणार असून, हा हेरिटेज वॉक सर्वांसाठी खुला असून, वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.

गेल्या वर्षभरात ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा’ हेरिटेज वॉकमधून पांडवलेणी, सावाना वस्तुसंग्रहालय, गर्गे वाडा, टाकळी मंदिर, रामकुंड ते काळाराम मंदिर, अहिल्याराम मंदिर, गोवर्धन गाव, गंगापूर पक्षी निरीक्षण केंद्र, वडनेर दुमाला, बालाजी मंदिर, गाडगेबाबा आश्रम, भगूर अशा अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. याला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्र नाणे प्रदर्शनाला दिवसभरात दोन हजारांहून अधिक नाशिककरांनी भेट देऊन महाराष्ट्रातील नाण्यांची वाटचाल अनुभवली. हेरिटेज वॉकबरोबरच आपल्या घरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या अस्वच्छ पाण्याचे काय होते हे जाणून घेण्यासाठी तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्रालाही भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाही ‘मटा’ विविध वारसास्थळे घेऊन आपल्यासमोर येत आहे.

--

मंगळवारची सफर अशी...

मेनरोडवरील जयंत गायधनी वाडा, त्यानंतर सुंदरनारायण मंदिर व तेथून गोदाघाटावरील कुंड अशी सफर मंगळवारी (दि. ६) सकाळी ८.३० वाजेपासून अनुभवता येईल. गायधनी वाडा अनुभवताना जयंत गायधनी यांनी जपलेल्या दुर्मिळ पोथ्या पाहण्याची संधी लाभेल. तेथून सुंदरनारायण मंदिराचे शिल्पसौंदर्य व स्थापत्य कला अनुभवणार आहोत. तेथून रामकुंड परिसरातील कुंड व त्याचे धार्मिक, ऐतिहासिक महतत्त्व त्याबरोबर सध्याचे वास्तव व गोदाप्रदूषण या विषयाने आढावा घेणार आहोत. हा हेरिटेज वॉक सकाळी ८.३० ला सुरू होऊन ११.३० वाजता संपेल.

--

बुधवारी मिळणार शिल्पसौंदर्याची अनुभूती

कपालेश्वर मंदिरशेजारील गोरेराम मंदिर, नंतर मुरलीधर मंदिर व त्यानंतर नारोशंकर मंदिराचा शिल्पसौंदर्य बुधवारी (दि. ७) सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकमधून अनुभवणार आहोत. हा वॉकही सकाळी ८.३० ला सुरू होऊन ११.३० वाजता संपेल. सहाही हेरिटेज वॉकमध्ये ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक शंकर साठे, जयंत गायधनी, चैतन्य गायधनी, अनिता जोशी, देवांग जानी, देवेंद्र पंड्या, राजेश पंडित, स्म‌िता व योगेश कासारपाटील व प्रा. रामनाथ रावळ मार्गदर्शन करणार आहेत.

--

नावनोंदणी आवश्यक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दि. ६ व ७ जून रोजी आयोजित केलेल्या ‘मटा’ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या नमूद करून एसएमएस करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगारांचे वेतन रोखले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरणचे वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण न झाल्याचे खापर कामगारांवर फोडून कामगारांचे वेतन रोखल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेने केला आहे. मात्र वरिष्ठांना दिलेली वसुलीची ‘कमिटमेंट’ पूर्ण न झाल्याने महावितरणच्या सर्व आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून वेतन न स्वीकारल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘मटा’ला दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी विभागीय संचालकांसोबत झालेल्या बैठकीत वसुलीचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याची कमिटमेंट मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली होती. परंतु, गेल्या मार्च महिन्यापर्यंत ती पूर्ण करण्यात महावितरण प्रशासनाला अपयश आले होते. त्यामुळे मे महिन्याचे वेतन सन्मानाने घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कुमठेकर यांचे म्हणणे आहे. आपण स्वतःही मे महिन्याचा अद्याप पगार घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याने वीज कामगारांचे वेतन मुख्य अभियंत्यांनी रोखल्याचा आरोप मनसे वीज कामगार सेनेने केला. बुधवारी सायंकाळी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना या प्रश्नी जाब विचारला व त्यांच्या या निर्णयाचा फलकावर जाहीर निषेधही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडक्या इमारतींना मनपाच्या नोटिसा

$
0
0

नाशिकरोड विभागात ६३ धोकादायक इमारती

म.टा.वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड विभागातील सहा प्रभागात एकूण ६३ धोकादायक इमारती असून, या इमारतींच्या मालकांना पालिकेच्या नगररचना विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाचे उपअभियंता प्रशांत पगार यांनी दिली आहे.

नाशिकरोड विभागात देवळाली, सुभाष रोड, डॉ. आंबेडकर रोड, दसक, पंचक, जेलरोड आदी भागातील काही जुन्या इमारतींसह काही कौलारू माड्या, घरे मोडकळीस आलेले आहेत. यापैकी काही घरांत आजमितीस नागरिक वास्तव्यास आहेत. तर काही घरे ओस पडलेली आहेत. यातील काही घरांचे छप्पर, भिंती, जिने ढासळलेले आहेत. तर काही घरांचे छप्पर, बाल्कनी ढासळण्याच्या स्थितीत आहेत. परिणामी अशा घरांत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीवितास धोका आहे.

याशिवाय मोडकळीस आलेल्या अशा धोकादायक घरे व इमारतींमुळे त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा धोकादायक इमारती व घरे, पडके वाडे पावसाळ्यापूर्वी उतरवून घ्यावेत, अशा नोटिसा संबंधित घरमालकांना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यात देवळाली गावात दोन जुन्या कौलारू माड्या अचानक कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या.

नागरिकांचे दुर्लक्ष

पडक्या व धोकादायक स्थितीतील घरांच्या मालकांना व रहिवाशांना पालिका प्रशासनाने दरवर्षी नोटिसा दिलेल्या आहेत. परंतु, या नोटिसांकडे संबंधित घरमालक व रहिवाशी साफ दुर्लक्ष करित आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या नोटिसांनुसार एकाही घरमालकाने आपल्या धोकादायक व मोडकळीस आलेल्या मिळकती स्वतःहून काढल्याची नोंद नाही. उलट अशा घरमालकांना वर्षानुवर्षे अशा नोटिसा पालिकेच्या नगररचना विभागाकडून दिल्या गेल्या आहेत. यातील ज्या घरांत आजही नागरिक वास्तव्यास आहेत अशा नागरिकांना अगदी नाममात्र भाड्यावर अशी जुनी घरे राहण्यासाठी मिळालेली असल्याने या ठिकाणचे नागरिक या इमारतींत वास्तव्यास असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची नासाडी रोखणार कोण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. परंतु, यात आजही नाशिक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत असतो. यामुळे अनेक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी रोखणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गेल्याच वर्षी गंगापूर धरणातील पाणी औरंगाबादला सोडण्यावर राजकारण पेटले होते. असे असतांना देखील शासनाने नाशिककरांची पाणीकपात करत पिण्याचे पाणी मराठवाड्यासाठी दिले होते. परंतु, यंदाच्या वर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने शहरातील रहिवाशांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. असे असतांना मात्र अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नासाडी होतांना दिसते. यामुळे भर उन्हाळ्यात

होणारी पाण्याची नासाडी रोखणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कोपला

$
0
0

टीम मटा

कर्जमाफी, हमी भावासह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून शेतकरी संपावर गेले. संपूर्ण जिल्ह्यातून बाहेर पुरविला जाणारा भाजीपाला, फळे, दुधाचा पुरवठा रोखण्यात आला. येवला, निफाड, दिंडोरी तालुक्यात शेतकरी संपाला हिंसक वळण लागले. येवल्यात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दिवसभर कोट्यवधी रुपयांच्या शेतमालाची रस्त्यावर नासधूस करण्यात आली. शुक्रवारी या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

येवला तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर

शेतकरी संपाला येवल्यात पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अनेक ठिकाणी शेकडोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी आक्रमक वळण लागले. अनेक गावात संपाला पाठिंबा देण्यासाठी बंद पाळण्यात आला. कुठलाही शेतमाल बाजाराकडे जाऊ द्यायचा नाही या इराद्याने रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी अगदी सकाळपासूनच ठिकठिकाणच्या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची तपासणी करत चांगलीच नाकेबंदी केली.

येवला शहर व परिसरात रस्त्यावर उतलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी शहरातील बाजारपेठेकडे निघालेला बऱ्याच वाहनातील शेतमाल, किराणा माल, दुधाच्या पिशव्या असं सर्वच काही रस्त्यावर फेकून दिले.

मालेगाव-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर अन्नधान्य, भाजीपाला व फळांची वाहने अडवून शेतकऱ्यांनी यातील सर्व माल रस्त्यावर ओतला. सरकारचा निषेध केला. राज्यव्यापी दुधासह सर्वच शेतमालाची तपासणी करण्यात आली. विंचूर चौफुलीसह मनमाड-नगर राज्य महामार्गावरील तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावर जमावाने अक्षरशः राडा केला. वाहनांमधील अनेक प्रकारचा माल रत्यावर फेकण्यात आला. ट्रकमधील आंबे, लिंबू, टोमॅटो, लसूण, गहू, तांदुळ, डाळी, साखर, साबण, बिस्किटपुडे, तेलडबे, गोडतेल आदी माल पायंदळी तुडविण्यात आला.

शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या दोन टेम्पोमधील गहू रस्त्यावर फेकण्यात आला. दोन-तीन ट्रकमधील लसूण, पाच-दहा ट्रक आंबे रस्त्यावर ओतण्यात आले. हा सर्व माल रस्त्यावर पडल्याने अर्धा ते पाऊण किलोमिटरपर्यंत अन्नधान्य पसरले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. मात्र, हजारोंच्या जमावापुढे पोलिसांची संख्या अत्यंत कमी असल्याने पोलिस देखील हतबल झाले. पोलिसांनी संपकऱ्यांना अडवले असता तुरळक दगडफेकही झाली. जवळच रेल्वे मार्ग असल्याने आंदोलकांनी दगड व खडी देखील हाती घेतली. संख्याबळ कमी असल्याने पोलिसांना नमते घेत अधिक बंदोबस्ताची वाट पहावी लागली. पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी वरिष्ठांना परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर अतिरिक्त पोलिस बळ पोहचले होता. मनमाड-नगर राज्य मार्गावरील सावरगाव येथे चक्का जाम करण्यात आले. येवला शहरातील फत्तेबुरुज नाक्यावर सकाळी शहरात दुधाच्या पिशव्या वितरित करणाऱ्या एका विक्रेत्याच्या गाडीतील दूध पिशव्या संतप्त शेतकऱ्यांनी बाहेर काढत रस्त्यावर फेकल्या. शहरातील विंचूर चौफुलीवर अगदी सकाळपासून शेकडोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले होते. डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक शेतकऱ्यांची एक छोटेखानी सभा झाली. शेतकरी संघटना नेते संतु पा. झांबरे, डॉ. सुभाष पाटील यांनी विचार मांडले.

टेम्पो जाळला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी जनावराचे मांस घेवून जाणारा एक टेम्पो आढळला. संतप्त जमावाने हा या टेम्पो पेटवून दिल्या.

संपाला हिंसक वळण
येवला ः तालुक्यातील पिंपळगाव शिवारातील टोल नाक्याजवळ सुरू असलेल्या शेतकरी संपाला गुरुवारी दुपारनंतर हिंसक वळण लागले. हजारोंच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोल‌िस बळ जमावाच्या संख्येच्या समोर अपुरे पडले. सूचना करुनही जमाव मागे न हटल्याने पोलिसांनी पाण्याचा फवारा वापरुन आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांना पांगव‌िण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. या संपाचा गैरफायदा घेत असंख्य समाजकंटकांनी वाहनांमधील सामानांची लूट केली. पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्यासह जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दंगा नियंत्रण पथकही तैनात आहे. दगडफेकीत काही पोल‌िस कर्मचारी जखमी झाले आहेत. डॉ. राहुल खाडे यांच्या मानेलाही इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एक युवकही जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रोफेशनल टीचर्सचे धरणे अांदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अनुदानित शाळा आणि कॉलेजमध्ये नोकरी करत असूनही खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १) धरणे आंदोलन करण्यात आले. उपसंचालक रामचंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन जाधव यांनी शिष्टमंडळाला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, लोकेश पारख, ज्ञानेश्वर म्हस्के, कैलास देसले, फैजल पटेल, अतुल वाचळे, यशवंत बोरसे, शिवाजी कांडेकर, किशोर सपकाळे, नीलेश दुसे, अरुण कुशारे, प्रदीप पाटील, आशिष कोयंडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, अनुदानित शाळा व कॉलेजमधील काही शिक्षक बंदी असतानाही खासगी क्लास घेतात, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षेचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवतात, विद्यार्थी क्लासमध्ये यावेत म्हणून विविध क्लृप्त्या करून विद्यार्थ्यांची लूट करतात, खासगी क्लास व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. नोकरी नाही व क्लासही चालत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात देवभानेला रास्ता रोको

$
0
0

धुळे : शेतकऱ्यांच्या कृषी मालाला रास्त भाव मिळावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत धुळ्याजवळील देवभाने गावाजवळ गुरुवारी (दि. १) कृषी मालाची आवक-जावक रोखली. यावेळी नाशवंत दुध परत पाठविणे शक्य नसल्याने ते रस्त्यावर ओतून देण्यात आले. तर वाहने भाजीपाला व इतर भुसार माल वाहून नेणारे अडवून ते तपासण्यात आले. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ वाहतूक काही ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे धुळे जिल्ह्यातून मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे जाणारी व तेथून मध्यप्रदेश व गुजरात राज्यात शेतीमाल घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यांनी थांबविली होते. आंदोलनात आत्माराम पाटील, शांतीलाल पटेल, भावेश पाटील, छगन पाटील, भगवान पाटील, अरुण पाटील, दीपक काटे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. मुंबई, नाशिक कडे जाणाऱ्या कांदा, बटाटा आणि दुधाचा ट्रक या शेतकऱ्यांनी अडवला तसेच देवभाने व कापडणे येथील शेतकऱ्यांनी बाजार समितीत जाणारे कांद्याचे ट्रॅक्टर अडवून रास्ता रोकोला सुरुवात केली. धुळे तालुक्याप्रमाणेच साक्री तालुका, सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या शेतकऱ्यांनीदेखील संपाला पाठिंबा दिला होता.

बाजार समितीत व्यवहार संथ

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ४८० क्विंटल भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. तर गुरुवारी ३८० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. तर धान्य व भुसार मालाची आवक ७११ क्विंटलचा व्यवहार झाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातून वसूधरा डेअरी मध्ये दररोज एक लाख लीटर दूध संकलित केले जाते मात्र शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी फक्त १२ हजार दूध संकलित झाले असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार बाजार समितीत शुकशुकाट

शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवू लागला आहे. गुरुवारी, सकाळपासून बाजार समितीत धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपला माल आणला नव्हता. सकाळी ९ पर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आले नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट होता. या संपाचा परिणाम शेजारील गुजरात राज्यामध्येही जाणवू शकतो. गुजरातची परसबाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जर दुपारी शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजारात आणला नाही. तर गुजरात राज्यातील सुरत, बडोदा या बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त सुभेदाराचा हवेत गोळीबार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीतील रेस्ट कॅम्प रोडवर असलेल्या पंचरत्न रेणुकामाता सोसायटी येथे विलास बारगळ या निवृत्त सुभेदाराने पत्नी आणि मुलाचा राग आल्याने आपल्याजवळ असलेल्या लायसन्स गनमधून एक राउंड हवेत फायर केला. या प्रकरणी बारगळ यांचा ३० वर्षीय मुलगा ऋषिकेश याने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विलास बारगळ यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचे ऋषिकेशने फिर्यादीत म्हटले आहे. आपल्याजवळ असलेल्या गनने आपल्यासह आईला जीवे मारण्याची धमकी बारगळ यांनी दिली. विवाहबाह्य प्रेमसंबंधांचे मोबाइलवरील बोलणे रेकॉर्ड केलेले सिमकार्ड आणि मेमरीकार्ड मागणी केल्यावर ते परत न दिल्याचा राग बारगळ संतापले. त्यांनी मंगळवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घराच्या गॅलरीत येऊन आपल्याजवळील रिव्हॉल्वरमधून हवेत आकाशाच्या दिशेने एक राउंड फायर केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये याबाबत २८६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएसआय रघुनाथ नरोटे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये वातावरण तापले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यात शेतकरी संप व आंदोलनाने शेतमाल विक्री व दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील निफाड, पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, चांदोरी, सुकेणे येथे शेतकऱ्यांनी एकजुटीने शेतकरी संपात सहभाग नोंदवला. देवगाव, भरवस फाटा, नैताळे या ठिकाणी शेतीमाल व दूध रस्त्यावर ओतल्याने पोल‌िस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली.

नैताळे येथे सकाळी शेतकरी एकत्र आले. त्यांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील ट्रकची तपासणी केली. ज्या ट्रकमध्ये आंबे, डाळिंब, बटाटे आढळले त्यातील शेतमाल शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकला. या प्रकाराला विरोध करणारे पोल‌िस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. राज्य राखीव दलाचे जवानांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे नवनाथ बोरगुडे, संपत कोटकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतरही दुपारी नैताळे येथे शेतकरी व कार्यकर्ते नाशिक व औरंगाबादकडे जाणारे ट्रक तपासत होते. नैताळे येथे ट्रक, टेम्पोमधील शेतमालाचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची राज्य राखीव दल व पोलिसांकडून धरपकड सुरू होती.

निफाड तालुक्यातून रोज किमान दीड लाख लिटर दूध संकलित केले जाते. गोदाकाठ भागातील डेरी पावर लि. ही कंपनी रोज ४० ते ५० हजार लीटर दूध खरेदी करते. शेतकरी संपामुळे एक ल‌िटर दूधही आम्ही घेतले नाही. त्यामुळे एका दिवसात १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

- भगवान सानप, संचालक डेरी पॉवर ल‌ि. कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विजय डेकाटेंकडील आरोग्य पदभार काढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी योजनेमुळे वादग्रस्त ठरलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडील आरोग्य विभागाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. डॉ. डेकाटे यांच्याकडे प्रभारीपद असलेल्या वैद्यकीय विभागाचा पूर्णवेळ प्रभार त्यांना देण्यात आला असून, आरोग्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार डॉ. सुनील बुकाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या कामात अपयशी ठरल्याचा ठपका डॉ. डेकाटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

घंटागाडीच्या वादग्रस्त अंमलबजावणीमुळे आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांचा महापालिकेतील कारभार चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. डॉ. डेकाटे हे प्रतिनियुक्तीवर पालिकेच्या सेवेत आले असून, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळही संपला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे आरोग्यविभागासह वैद्यकीय विभागाचाही पदभार आहे. शहराच्या स्वच्छतेऐवजी ठेकेदारांची भलामण करत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.

घंटागाडी ठेक्यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे बंधनकारक असतानाही डॉ. डेकाटे यांनी ठेकेदारांना अभय दिले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याबाबत त्यांनी आयुक्तांना सादर केलेल्या खुलाशात समाधानकारक उत्तर नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

डॉ. डेकाटे यांनी यापूर्वीही तीन ते चार वेळा कारभारात सुधारणा करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु त्यांचीही डॉ. डेकाटे यांनी समाधानकारक उत्तरे दिलेली

नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला ते न्याय देत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

गुरूवारी सुटीवरून परतल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी डॉ. डेकाटे यांच्याकडील आरोग्याचा पदभार काढून घेणार आहेत. त्यांच्याकडे केवळ वैद्यकीय विभागाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससीत मालेगावची भाग्यश्री राज्यात चौथी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले. त्यात येथील भाग्यश्री दिलीप विसपुते हिने राज्यात चौथा तर देशात १०३ क्रमांक मिळवीला. मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्रीने जिद्द व चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाने शहराच्या नावालौकीत पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला गेला आहे.

भाग्यश्री सध्या दिल्ली येथे परीक्षेच्या अभ्यासाठी गेली असून, येथील सराफ व्यावसायिक दिलीप विसपुते यांची ती ज्येष्ठ कन्या आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण मालेगावीच झाले असून बी. फार्मसी करीत असतानाच स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याचे तिने धेय्य निश्चित केले होते. यासाठी तिची दिल्ली येथे जाण्याची तयारी होती.

सुरुवातीला तिच्या या निर्णयाला घरातून फार पाठिंबा मिळाला नव्हता. मात्र भाग्यश्रीची जिद्द पाहून कुटुंबीयांनी देखील तिला नंतर यासाठी प्रोत्साहित केले. तिसऱ्या प्रयत्नात तिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या यशानंतर विसपुते कुटुंब‌ीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडीयावरही तिचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात गाळाचा विक्रमी उपसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबविण्यात येत असून योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकल्पातून सहा लाख ७८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिनापासून योजनेचा प्रारंभ झाला. योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी लोकसहभाग घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गाळ वाहण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. गाळ काढण्याची २०७ कामे सुरू करण्यात आली. यातील ६५ कामे शासकीय यंत्रणेमार्फत तर १४२ कामे लोकसहभागातून करण्यात येत आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत एक लाख ५३ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यासाठी सरकारने यंत्रासाठी केवळ इंधनाचा खर्च केला. तर ५ लाख २५ हजार घनमीटर गाळ संपर्णूपणे लोकसहभागातून काढण्यात आला. शेतकऱ्यांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग दिला. गाळ काढण्यासाठी १९६ जेसीबी यंत्रांचा वापर केला जात असून त्यासाठी औद्योगिक आणि सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.

येथे सर्वाधिक काम

सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात सर्वाधिक काम झाले. गाळ काढून ९ हजार ७६९ मीटर क्षेत्रात रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले. गाळ काढलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्र ४८२ हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक १०८ हेक्टर क्षेत्र चांदवड तालुक्यातील आहे. गाळ काढण्याच्या कामाची एकूण किंमत २ कोटी ३९ लक्ष असून त्यातील १ कोटी ९५ लक्ष किमतीची कामे लोकसहभागातून करण्यात आली. धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध दिला जात आहे. आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. एकूण ५९ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे धरणांमधील पाणीसाठा वाढून शेताची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. काही भागातील पाणीटंचाईवरही यामुळे मात करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगरला महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर नाक्यावरील अपघातप्रवण वळणावर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसच्या धडकेने कष्टकरी महिला जागीच ठार झाली. त्यामुळे वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. पोलिसांनी पाठलाग करून बसचालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिस व घटना पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास आंध्र प्रदेश, सोलापूर व अकलूजच्या भाविकांना देवदर्शनाला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने (एमएच १५ एएक्स ०९०३) उपनगर नाक्यावरील चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ही महिला जागीच ठार झाली. तिचा मृतदेह तासभर पडून असल्याने गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या महिलेचे नाव कमलबाई सुपडू कुमावत (४६, सुंदरनगर, देवळालीगाव) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या पश्चात तीन मुले आहेत. ही महिला विवाह समारंभात केटरर्सकडे काम करत असे. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने तीच मुलांना सांभाळत होती. तिला घेण्यासाठी आलेल्या मुलाच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला. त्यामुळे त्यालाही भोवळ आली. थोड्यावेळाने त्याचे कुटुंबीय तसेच देवळालीगावातील रहिवाशी घटनास्थळी आले. बसचालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाइकांनी घेतली. उपनिरीक्षक ए. ए. येवले, उपनिरीक्षक काळे, सहाय्यक निरीक्षक कडभाने, हवालदार गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. तासभराने अॅम्ब्युलन्स आली व कमलाबाई यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.

मृत्यूचा सापळा

उपनगर नाका व परिसरात अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तीन वर्षापूर्वी बसखाली महिला तर ट्रकखाली जवान ठार झाला होता. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर सिग्नल बसविण्यात आला. मात्र, अडथळा ठरणारा बसथांबा अजूनही हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे अपघात होत असतात. हा परिसर अपघातप्रवण असूनही वाहतूक पोलिस नसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. बसथांबा त्वरित हलविण्याची मागणी होत आहे.

मटा भूमिका

उपनगर नाक्यावरील बेधुंद वाहतुकीने आणखी एक बळी घेतला. गेल्या वर्षभरात येथे काही बळींसह अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. अत्यंत वर्दळीच्या नाशिक-पुणे रस्त्यावर आडनीड जागेवर सिग्नल, रस्त्यातच आडवी झाडे, मधोमध बस थांबा अन् उलट्या दिशेने जाणारे वाहनधारक असा विचित्र गुंता झाला आहे. या समस्येची तीव्रता सामान्य नागरिकांनी वारंवार दाखवून दिली होती. आंदोलनादी उपायही करून झाले; पण गेंड्याच्या कातडीच्या मंडळींवर काहीच परिणाम झाला नाही. किमान आता तरी आणखी बळी जाण्याची वाट न पाहाता संबंधित शासकीय विभागांनी संयुक्तपणे या प्रश्नी उपाय शोधायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजूंना मिळाले ‘घरकुल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत ६४ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. नाशिक-पेठ मार्गावरील करंजाळीपासून ३ किलोमीटरवर असलेल्या या आदिवासी गावात एकूण ३३० कुटुंब राहतात. गावात ६५ टक्के कुटुंब भूमीहीन असल्याने तुटपुंज्या कमाईतून घराचे स्वप्न साकार करणे त्यांना शक्य नव्हते.

खरीपाचा हंगाम संपल्यावर मजुरीसाठी भटकंती ठरलेली आणि त्यामुळे स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक दीपक कोतवाल यांनी गटविकास अधिकारी बी. बी. बहिरम यांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या मनात घराविषयी आशा निर्माण केली. अनेकांचे घराचे स्वप्न इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून पूर्णही केले.

गावातील गरीब नागरिकांची घरे मातीची, प्लास्टिकचे आच्छादन असलेली आणि काही ठिकाणी जुन्या कौलांची होती. पावसाळा आला की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे. तात्पुरती डागडुजी करून दिवस पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. शासकीय योजना तर होती मात्र अंमलबजावणीत अडचणी होत्या. कोतवाल यांनी पुढाकार घेत अडचणींवर चर्चा केली.

वीटांची समस्या दूर करण्यासाठी काही लाभार्थ्यांनी शेतात वीटभट्टी तयार केली. सरपंच उषा गवळी यांनी दुकानदारांना विनंती करून उधारीवर सिमेंट मिळवून दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने मजुरी केल्यास त्याला १८ हजारापर्यंत मजुरी देण्यात आली. त्यामुळे मजुरी आणि घर असा दुहेरी लाभ त्याला झाला. गावातील अकुशल मजुरांना रोजगार मिळण्याबरोबर रोहयो अंतर्गत पाच हजार ६६० मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. गावात शबरी आवास योजनेअंतर्गत तीन घरांचे बांधकाम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक घराचे बांधकाम सुरू आहे. गावात पक्की घरे आणि समोर सिमेंटचे रस्ते यामुळे गावातील राहणीमानही बदललेले चटकन जाणवते ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान या योजनेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

असे मिळाले अनुदान

इंदिरा आवास योजनेअंतर्गत काम सुरू करताना ३५ हजार, पायाचे बांधकाम झाल्यावर ३५ हजार आणि काम पूर्ण झाल्यावर २५ हजार असे तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्यात आली. लाभार्थ्याचा हिस्सा केवळ ५ हजार होता. त्याला साधारण मिळालेली मजुरी लक्षात घेता एक लाख १८ हजारात पक्के घर तयार झाले.

जुने घर गळायचे, त्यामुळे पावसाळ्यात खूप त्रास होत असे. आता शौचालय असलेले नवे घर मिळाल्याने समाधान आहे. जागाही मोठी आहे.
- हनुमंत गाढवे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रास प्रणालीमध्ये सुरगाणा पिछाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य वितरणात पारदर्शकतेसाठी सुरगाणा तालुक्यात ग्रास प्रणाली अवलंबिण्यात आली तरी तिची अवस्था बिकट बनली आहे. परिणामी दुकानदारांना चलन फाडण्यासाठी थेट वणी अथवा दिंडोरीलाच पोहोचावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होऊ लागली आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अनेक पाऊले राज्य सरकारने उचलली आहेत. सप्लाय मॅनेजमेंट चेन, एसएमएस सुविधा, धान्य गोदामापासून ते दुकानदारापर्यंत पोहचताना प्रत्येक स्तरावर होणारी तपासणी अशा नवनवीन उपाययोजनांद्वारे गैरप्रकार रोखण्याचे प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून सुरू आहेत. रेशनपात्र लाभार्थींची आधार सिडिंग केल्याने दुबार नावे आणि खोट्या लाभार्थींना पायबंद बसणे शक्य होऊ लागले आहे. आता कुठल्या गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला किती धान्याचा पुरवठा करायला हवा याची नेमकी माहिती समोर येऊ लागली आहे. दुकानदारांना वितरणासाठी किती धान्याची गरज आहे, त्यांच्याकडे गत महिन्याचे किती धान्य शिल्लक आहे. नव्याने किती धान्याची उचल करावी लागणार आहे अशी संपूर्ण माहिती देणारी ऑनलाइन प्रणाली पुरवठा विभागाने विकसित केली आहे. त्यानुसार दुकानदारांची चलनेदेखील ऑनलाइनच कार्यप्रवण केली जात आहे. त्याचे पैसेही ऑनलाइन भरणे शक्य होत असून चलन भरल्यानंतर परमीट ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. तर गोदामातून माल उचलण्यासाठीही गोदामपालाला ऑनलाइनच माहिती उपलब्ध होत आहे. संपूर्ण यंत्रणाच ऑनलाइन झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी जलाशये आसुसली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सूनपूर्व पावसाने नाशिकमध्ये हजेरी लावली असली तरी नाशिककरांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत. रिती होऊ पाहणारी जलाशये पाण्यासाठी आसुसली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून टँकरवाऱ्या थांबविण्यासाठीही पाऊस आवश्यक आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाने मांडव धरला असून त्यामुळे उन्हाच्या त्रासापासून नाशिककर काहीसे मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील गावे आणि वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून रहिवाशांची तहान भागविण्यासाठी टँकरचा पारंपरिक उपाय अवलंबिण्यात येत आहे. जिल्ह्यात २४ धरणे असून ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, आजमितीस या सर्व धरणांमध्ये आठ हजार ३८५ दशलक्ष घनफुट एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये तीन हजार ५६ दलघफू म्हणजेच एकूण क्षमतेच्या पाच टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. हाच साठा २०१५ मध्ये १२ टक्के म्हणजेच सात हजार ७३१ दलघफू एवढा होता. यंदा धरणांमध्ये पुरेसे पाणी असून ७ जूनच्या दरम्यान मान्सूनला सुरुवात झाली तर तळ गाठलेली धरणेही पुन्हा भरण्यास मदत होऊ शकेल.

गंगापूर धरणात २४ टक्के पाणी

शहर आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थ‌तिीत २४ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी याचकाळात जिल्ह्यातील धरणांमध्ये २२ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. तेवढाच पाणीसाठा आताही उपलब्ध असून मान्सून सुरू झाल्यास टँकरचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

१६ धरणांनी गाठला तळ

एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २४ पैकी १६ धरणांनी तळ गाठला आहे. चणकापूर धरण वगळता एकाही धरणात २५ टक्क्यांवर पाणीसाठा नाही. तर १६ धरणे अशी आहेत की ज्यामध्ये १० टक्क्यांहूनही कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. आळंदी, वाघाड, पुणेगाव, भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर,नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे पूर्णत: कोरडी पडली आहेत. तर गौतमी गोदावरी, करंजवण, तिसगाव, दारणा, कडवा, हरणबारी, केळझर या धरणांमध्ये एक ते पाच टक्केच पाणी शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास पाणीची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या दारी प्रमाणपत्रांचे वाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांच्या पुढाकाराने मालेगाव शहरातील आदिवासी वस्तीवर जाऊन ४८० नागरिकांना आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत विविध शाळांमधून तसेच सेतू केंद्राच्या माध्यमातून जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. १ ऑगस्ट २०१६ पासून एप्रिलअखरेपर्यंत १ लाख ६४ हजार ४८९ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यात २४ हजार ४०१ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत शाळांमधून प्रमाणपत्र वाटप करत असताना शालेय प्रवेश असणाऱ्यालाच याचा लाभ मिळत असे. आदिवासी जमातींच्या वस्तीत याबाबत फारशी जागरुकता नसल्याने ते जात प्रमाणपत्रापासून आणि परिणामत: सरकारच्या विविध योजनांच्या लाभापासनू वंचित राहतात. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीत ही बाब अडचणीची ठरत होती. हे लक्षात घेऊन स्वामी यांनी मालेगावमधील गोंड आदिवासी समाजाच्या वस्तीत जाऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला.

मालेगावमध्ये गोंड आदिवासी समाजाची सुमारे ४०० कुटुंबे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देण्यात अनेक अडचणी होत्या. उपविभागीय अधिकारी मोरे यांनी आदिवासी कार्यालयात जाऊन मूळ गोंड आदिवासींच्या स्थानांतरणाबाबत गॅझेटमधून माहिती एकत्र केली. हे नागरिक १९१५ नंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथून मनमाड व मालेगाव येथे स्थलांतरित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जातप्रमाणपत्र नसल्याने त्यांना कोणतेच लाभ मिळत नव्हते. या समाजाच्या वस्तीत कोणीच पदवीधर नसल्याचे मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एका प्राध्यापकांच्या मदतीने अधिक माहिती घेऊन या समाजाच्या राहणीमानात बदल घडवून आणण्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांना जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.

प्रतिज्ञापत्रांसाठी स्वखर्च

प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राचा खर्चदेखील अधिकाऱ्यांनी स्वत: केला. त्यासाठी ‘सेतू’चे सहकार्यदेखील घेण्यात आले. आदिवासी समाजात प्रमाणपत्राचे महत्त्व पोहोचविण्यासाठी त्यांच्याच वस्तीत कार्यक्रम घेण्यात आला. एकूण ४८० व्यक्तींना लॅमिनेटेड आदिवासी जमातीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्राचा उपयोग करून मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींची माहिती देण्यात आली आणि मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images