Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नांदगावात आठ ‌दिवसांत १२० मि.मी. पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात यंदा १ ते ९ जून या काळात तब्बल १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीतील हा गेल्या चार वर्षांतला सर्वात जास्त पाऊस आहे. १२० मि.मी. एवढा पाऊस या आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात कधीही झाला नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगावमध्ये यंदा पावसाने मेहेरनजर केली असून, जूनमध्येच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी ९ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावलेली नव्हती. निरंक नोंद दिसून येते. त्या तुलनेत यंदा जोरदार पाऊस झाला असून, पेरणीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात आज शिवसंपर्क अभियान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाला उत्तर महाराष्ट्रात शनिवार (दि. १०जून) पासून नाशिकमधून सुरुवात होत आहे. शनिवारी जिल्ह्यात घोटी येथून या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. खासदार संजय राऊत आणि संपर्क प्रमुख अजय चौधरी या नेत्यांच्या उपस्थितीत या संपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पीकपद्धती, त्यावरील समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. सोबतच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिवसंपर्क अभियानाची सुरुवात शनिवारी नाशिकमधून होत आहे. ग्रामविकास मंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय कंरजकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता घोटी येथून या अभियानाची सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

$
0
0

जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने वाढत असून, चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यंदा नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असून, नऊ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

राज्यात दररोज कोठे ना कोठे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण असले तरी निसर्गाचे दृष्टचक्र, नापिकी आणि कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा ही देखील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमागील महत्त्वाची कारणे ठरत आहेत.

जानेवारी २०१७ ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या निफाडमध्ये झाल्या होत्या. यंदा मात्र कोरडवाहू शेती अधिक असलेल्या नांदगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात गेल्या सव्वापाच महिन्यांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात सात शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. निफाड तालुक्यात अजूनही आत्महत्यांचे लोन कमी होऊ शकलले नाही. तालुक्यात सहा आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जिल्ह्यात चालू वर्षातील महिला शेतकरी आत्महत्येची ही पहिली घटना ठरली आहे. सुरगाण्यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यातही यंदा कित्येक वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची घटना घडली आहे. गेल्या सव्वापाच महिन्यांत सर्वाधिक १६ आत्महत्यांच्या घटना मे महिन्यात घडल्या. म्हणजेच दिवसाआड आत्महत्येची एक घटना घडली आहे. ११ घटना एप्र‌लि महिन्यात घडल्याची माहिती ज‌ल्हिा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

२६ कुटुंब मदतीस पात्र

जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त ४६ शेतकरी कुटुंबांपैकी २६ कुटुंब मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना सरकारच्या धोरणांनुसार एक लाखांची मदत दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनांपैकी ११ घटनांचे प्रस्ताव मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. व्यक्तिगत कारणांमधून या आत्महत्या झाल्याचे निष्कर्ष प्रशासनाने नोंदविले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या नऊ प्रकरणांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवड; चुरस वाढली

$
0
0

चार अर्ज दाखल; १४ जूनला निवडणूक

म. टा. वृतसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक येत्या १४ जून रोजी होत आहे. अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी-जनता दल आघाडीचे बुलंद इकबाल व काँग्रेसच्या ताहेरा शेख यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी भाजपचे सुनील गायकवाड, राष्ट्रवादी-जनता दलचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल केला आहे.

गुरुवारी महापौरपदासाठी काँग्रेसचे रशीद शेख, राष्ट्रवादीचे नबी अहमदुल्ला यांनी तर सेनेचे सखाराम घोडके यांनी अर्ज दाखल केले होते. महापालिकेची त्रिशंकू स्थिती झाली असल्याने काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेत सत्तास्थापनेची तयारी सुरू केली आहे. मात्र अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी व भाजपने अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसला २८, राष्ट्रवादी-जनता दल आघाडीला २७ जागा मिळाल्या. यामुळे एमआयएम व शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, शिवसेनेला सोबत घेतल्याने काँग्रेसची सत्ता स्थापन होणे निश्चित मानले जात आहे.

शिवसेनेला पदाची संधी

मालेगाव महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे. अर्थात महापालिकेच्या राजकारणाचा अस्थिर इतिहास पाहता अखेरच्या क्षणी राजकीय घडामोडी कशा घडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ‌शिवसेनेने १३ जागा मिळाल्या आहेत.

महापौरपदाचे उमेदवार

काँग्रेस - रशीद शेख, ताहेरा रशीद शेख, राष्ट्रवादी-जद आघाडी - नबी अहमदुल्ला, बुलंद इक्बाल

उपमहापौरपदाचे उमेदवार

शिवसेना - सखाराम घोडके, भाजप - सुनील गायकवाड, राष्ट्रवादी - अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’पूर्वीच वाहन विक्रेत्यांकडून सवलती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू होणार अाहे. परिणामी सध्याच्या करप्रणालीअंतर्गत एक्साइज, व्हॅट, सेल्स टॅक्स, रस्ते कर, मोटर वाहन कर, नोंदणी शुल्क अशा प्रकारचे सर्व कर एकत्रितपणे जीएसटीद्वारे आकारले जाणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ किंवा घटदेखील होणार असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर असंख्य विक्रेत्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच उत्पादित वाहनांवर सवलत देऊन जास्तीत जास्त माल विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

विक्रेत्यांकडे याबाबत विचारणा केली असता, जीएसटीमुळे किमतीमध्ये निश्चित कितपत घट अथवा वाढ होईल याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. काही विक्रेत्यांनी मात्र आज आम्ही सवलतीच्या दरात वाहनांची विक्री करीत आहोत. पण, आज ग्राहकांनी बुकिंग केले आणि वस्तूंच्या किमती वाढल्या, तरी आम्ही त्यांच्याकडून बुकिंगच्या वेळी निश्चित केलेल्या किमतीतच वस्तू देऊ अथवा वस्तूची किंमत कमी झाली, तर त्याला त्यावेळी निर्धारित केलेल्या किमतीत वस्तू देऊ. त्यामुळे या कालावधीत वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा तोटा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर १५ लाख रुपयांच्या आतील वाहनांच्या किमतीत २ ते ४ टक्के फरक पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या कारच्या किमतीत वाढ होईल, अशी शक्यता असल्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी होण्याआधी बुकिंग करण्याच्या उद्देशाने अनेकांकडून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर लक्झरी कारच्या किमतीत घट होणार आहे. त्यामुळे या महिन्यात लक्झरी कारच्या विक्रीतदेखील थोड्याफार प्रमाणात घट होईल, अशा प्रकारची चर्चा संबंधित वर्तुळात सुरू आहे.

---

पंधरा लाखांच्या आतील वाहनांच्या किमती वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक डिस्काउंट ऑफर्सदेखील सुरू आहेत. परिणामी रोज नवीन ग्राहक येत आहेत. त्यामुळे या महिन्यात निश्चित विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

-आनंद करंजकर, विक्रेता

---

‘जीएसटी’बाबत अजून संपूर्ण माहिती समजलेली नाही. मात्र, सध्या वाहन विक्रीवर सवलती मिळत असल्याने आम्ही वाहनांची चौकशी करण्यासाठी आलो आहोत. जीएसटीप्रमाणेच सरकारने संपूर्ण देशात इंधनदर एकच राहील याचे नियोजन करावे.

-समीर वेलदे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगचे ‘पझल’ सुटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ठेवलेल्या रोटरी पार्किंगच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासनाने आता रोटरीऐवजी पझल पार्किंगचा प्रस्ताव ठेवला आहे. शहरातील मोक्याच्या सात जागांवर ही पार्किंग होणार असून, त्यात जवळपास तीनशे गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयांमध्ये पझल पार्किंगला प्राधान्य दिले जाणार आहे. पझल पार्किंगसाठी राज्य सरकार पाच कोटी रुपये देणार आहे.

शहराचा सर्वाधिक गंभीर प्रश्न हा वाहतूक व पार्किंगचा आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, अशोक स्तंभ, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पार्किंगसाठी ठिकाणच नसल्याने येथे रस्त्यावरच वाहने लावली जातात. सर्वसामान्यांना येथून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी शहरात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या एका पार्किंगमध्ये १४ कार बसू शकणार होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालय, अशोक स्तंभ, शालिमार, रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी ही पार्किंग स्टेशन्स उभारली जाणार होती. या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. तीनदा राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकाही कंपनीने रस दाखवला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिका कार्यालय, जिल्हा न्यायालय आवारात पझल पार्किंग करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर, नवीन नाशिक, नाशिक रोड, गंगापूर रोड आदी सात ठिकाणीही पझल पार्किंग होणार आहे. यासाठी महापा‌लिका आणि राज्य सरकार प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार आहे. त्यानुसार शहरात प्रत्येक ठिकाणी ३० ते ४५ गाड्या पार्क होऊ शकतील. यामुळे एकूण तीनशे वाहनांच्या पार्किंगची सोय लागून, वाहतुकीचा अडथळा काही प्रमाणात कमी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात अन्य ठिकाणीदेखील पझल पार्किंग करण्याचा महापालिका विचार करीत आहे. या पार्किंग सिस्टिममुळे आपोआपच शहाराच्या सुशोभिकरणातही भर पडणार आहे.

-

असे असेल पार्किंग

रोटरी पार्किंगमध्ये एका मजल्यावर तीनच वाहने बसतात. परंतु, पझल पार्किंगमध्ये एका मजल्यावर १५ वाहने बसू शकतात. रोटरी पार्किंग ही सात मजली असते, तर पझल पार्किंग ही तीन मजलीच असते. एका लोखंडी सांगाड्यावर १५ वाहने बसू शकतात. यात विशिष्ट पध्दतीने वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वाहनेही पार्क होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० गुंठे शेतीत १२ लाखांचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तीस गुंठे शेतीला गोपालनाची जोड देऊन नामदेव मोळे या शेतकऱ्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रिय गूळ, दूध, दुग्धजन्य पदार्थ, गांडूळ खत, गोमूत्र यांच्या विक्रीतून शेतीला जोडधंदा साकारण्याचा मोळे यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. आज (दि. १०) मोळे नाशिकला येणार असून, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

घरपण (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नामदेव मोळे हे केवळ ३० गुंठे जमीन असलेले शेतकरी. परंतु, उपलब्ध जमीन आणि गीर गाईच्या संगोपनातून त्यांनी ही प्रगती साधली आहे. सेंद्रिय गूळ निर्मिती, दूध विक्री त्याबरोबरीने गांडूळ खत आणि गोमूत्र विक्रीतून त्यांनी गावातच उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शेती ही लहान लहान तुकड्यांत विभागलेली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा ही तशी कमी आहे. गेल्या काही वर्षांत परिसरातील ऊस कारखान्यांमुळे बरेचसे शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी ऊस शेतीकडे वळले असताना प्रतिकूल परिस्थितीत हा यशस्वी प्रयोग त्यांनी राबवून महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. पुण्यातून त्यांनी एक भाकड गीर गाय आणून तिच्यावर उपचार म्हणून गाईचेच पंचगव्य देऊन तिला गाभण ठेवल्याचा प्रवास उपस्थितांना या कार्यक्रमात ऐकता येईल.

मोळे आज नाशकात

शेतकरी नामदेव मोळे यांचे नाशिककर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरानगर येथे बापू बंगल्याजवळ विवेकानंद सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात 'प्रबोधन आणि प्रकट मुलाखतीचे' आयोजन करण्यात आले आहे. 'अल्प खर्चात फायद्याच्या शेतीचा मूलमंत्र' घ्यावा, असे आवाहन जनकल्याण समितीचे कार्यवाह मदन भंदुरे, भीमराव गारे, योगिनी चंद्रात्रे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक, नामदेव मोळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे विविध अंग उपस्थितांसमोर उलगडून दाखविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'घटिका भरत आली; जुलैमध्ये भूकंप'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक

'आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच आहे. ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात मोठी लढाई आहे. त्यासाठी सज्ज राहा,' असं आवाहन करतानाच, 'घटिका भरत आलीय. जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला मार्गदर्शन करताना ते नाशिकमध्ये बोलत होते. शेतकरी आंदोलन आणि समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या भूमी संपादनाच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी भाजपवर चौफेर टीका केली. 'समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून त्या उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचा घास घेणारा भूमी अधिग्रहण कायदा शिवसेनेच्या विरोधामुळं थांबला आहे. समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे', असं राऊत म्हणाले.

'गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यांच्या राज्यात आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचं,' असा सवाल त्यांनी केला. 'कर्जमुक्तीचे शिवसेनेचे अर्ज घराघरांत पोहोचवा, असं आवाहन शिवसैनिकांना करतानाच, 'आम्हाला सरसकट कर्जमाफी हवीय,' अशी ठाम मागणीही त्यांनी केली.

उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत दिवाकर रावते हे सहभागी होतील. ते मंत्री असल्यानं बैठकीत सहभागी होऊन पक्षाची ठाम भूमिका मांडतील,' असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुलैत राजकीय भूकंप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सत्ता बदलण्याची ताकद फक्त शिवसेनेतच आहे. त्यामुळे आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच असून, ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. या सरकारची घटिका भरत आली आहे. येत्या जुलैमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार ढ निघाल्याचा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

नाशिकमध्ये शिवसंपर्क अभियानासाठी खासदार राऊत, संपर्कमंत्री अजय चौधरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलतांना राऊत यांनी राज्यातील आगामी भूकंपाचे संकेतच दिलेत. राऊत यांनी मुख्यमंत्र्यासह भाजपवरच हल्ला चढवला. गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यांच्या राज्यात आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचं,' असा सवाल त्यांनी केला. कर्जमुक्तीचे शिवसेनेचे अर्ज घराघरात पोहोचवा. भाजपला शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यात, सोडविण्यात अजिबात रस नाही. त्यांना शेतकऱ्यांमध्येच फूट पाडायची आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्रात भूकंप होईल, असा इशारा देवून राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत सुचक इशाराच दिला आहे.

शिवसेना जनतेच्या प्रश्‍नावर कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही. शिवसैनीक त्यासाठी तयारच असतो. त्यामुळे राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, काय काय घडामोडी घडत आहेत, याकडे आमचे लक्ष आहेच. शासनाने जो मंत्रीगट जाहीर केला त्यात शिवसेनेचें मत्री दिवाकर रावते यांच्याही समावेश आहे. ते त्या गटात

सहभागी होतील. मात्र, अंतिम भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्राने शिवसेनेला साथ दिली तर राज्यात सत्तांतर होवू शकते असा दावाही त्यांनी केला.

सरकारवर ओढलेे ताशेरे

राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कारभाराचेही वाभाडे काढलेत. भाजपचे सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर ‘ढ’ निघाले असून, त्यांचा केवळ अभ्यास सुरू असतो. परिक्षा उलटून गेली तरी यांचा अभ्यासच सुरू आहे. शिवसेना अजून रस्त्यावर उतरली नाही. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरतील तेव्हा भाजपचे मंत्री कार्यालयाबाहेर पडू शकणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-औरंगाबाद हायवे ‘पाण्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

परिसरात सोनेवाडी, कोळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी पाऊस झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आल्याने तब्बल साडेतीन तास हा मार्ग बंद होता. शेकडो वाहने यामुळे अडकून पडली होती. निफाड पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने दुभाजक तोडल्यानंतर रात्री ११ वाजता महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

या महामार्गावर आचोळा नाला आहे. निफाड शहराच्या वरच्या भागात पाऊस झाल्यानंतर ते पाणी या नाल्यात वाहत येते. या मार्गाचे चौपदरीकरणानंतर त्यावर पूलही बांधण्यात आला आहे. तरीही पहिल्याच पावसात थेट महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांनी जुने ओढे, नाले बुजवून त्याच ठिकाणी बंगले बांधले. त्यामुळे पुर्वापार चालत आलेले ओहोळ-नाले बंद झाले. त्यामुळे पाणी निघायला जागा नसल्याने ते थेट रस्त्यावर येते. काही ठिकाणी अक्षरशः कंबरेइतके पाणी साचल्याने नाशिक आणि औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

निफाडचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे आणि शहरातील तरुणांनी भर पावसात शिवरें फाट्याजवळ परिश्रम घेत रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली. जेसीबीच्या साहाय्याने शिवरे फाटा, सानप वस्तीजवळील दुभाजक तोडल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओरसले. हा महामार्ग बांधकाम विभागाच्या बीओटी विभागाकडे आहे. याची जबाबदारी असणारे संबंध‌ति अभियंता हे कधीही इकडे फिरकत नाही. या मार्गावर पिंपळस फाटा ते बोकडदरे दरम्यान अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचे टेंडर निघूनही काम सुरू नाही. पर्यायाने हा महामार्ग खड्ड्यांवा महामार्ग झाला आहे. पहिल्याच पावसात ३ ते ४ तास हा मार्ग बंद पडला होता.

प्रवाशांचे प्रचंड हाल

महामार्ग बंद झाल्याने महामार्गाच्या दुतर्फा तीन ते चार किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मूसळधार पाऊसही सुरू असल्याने वाहनांमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चेकंपनी ‘चितारणार’ स्मार्ट सिटी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चिमुरड्यांना स्वतःची चित्रकला चितारता यावी या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे चित्रकला स्पर्धा रंगणार आहे. सोमवारी (दि. १२) सकाळी ९ ते ११ या वेळेत ही स्पर्धा मते लॉन्स, सावरकरनगर येथे होईल.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शहरात सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या सोहळ्यात बच्चेकंपनीलाही खास स्थान देण्याचे उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकला कलाकृतींचा मोठा वारसा आहे. वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे अशा अनेक दिग्गज चित्रकारांची परंपरा नाशिकला आहे. त्यापाठोपाठ आता अनेक कलाकृतींत नाशिकचे कलाकार स्वतःला सिद्ध करत आहेत. शहरातल्या प्रत्येक कलाकारात स्तुत्य कलागुण दडले आहेत. विशेष म्हणजे, नाशिकच्या लहानग्यांमध्ये कलाकुसरीचे कमालीचे टॅलेंट बघायला मिळते. याचदृष्टीने शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहान कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी ‘मटा’ने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही थीम ठेवण्यात आली असून, शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी आपले कलागुण इथे रेखाटणार आहेत. आपल्या कल्पनेतून स्मार्ट सिटी कशी असावी याचे चित्र बच्चेकंपनी साकारणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत कुंचल्याच्या साहाय्याने रंगांची उधळण करीत चित्रे रेखाटता येणार आहेत. त्यासाठी कोणतीही नावनोंदणी किंवा प्रवेश शुल्क नाही.

कलाकरांनी साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइल क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.

बक्षिसांची होणार लयलूट

‘स्मार्ट सिटी’ हा विषय असलेली ही स्पर्धा पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत होणार आहे. विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे. या ठिकाणी चित्र काढण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था असल्याने बसण्यासाठी छोटी सतरंजी व कागद धरण्यासाठी प्रत्येकाने पॅड आणायचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

--

‘कलासंगम’मध्ये आज वादन, नृत्य

मविप्रच्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये आयोजित कलासंगम मटा आर्ट फेस्टमध्ये आज, रविवारी ( दि. ११) हौशी कलाकारांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आपली कला सादर करता येणार आहे. शिल्पकार यतिन पंडित सकाळी ११ वाजता स्क्रॅब कला सादर करतील. सायंकाळी ५ वाजता नृत्यांगना रेखा नाडगौडा, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर नृत्य सादर करतील. नितीन वारे व नितीन पवार यांचे शिष्य तबलावादन करतील. ६.१५ ते ६.४५ या कालावधीत मोहन उपासनी यांचे शिष्य बासरीवादन करतील. ७ ते ७.३० या कालावधीत अष्टुरकर आणि ग्रुपचे सतारवादन होईल. ७.४५ ते ८.४५ या कालावधीत तीनही नृत्यांगना व त्यांच्या शिष्या कला सादर करतील. रात्री ९ ते ९.३० या कालावधीत नरेंद्र पुली व त्यांचे शिष्य गिटारवादन करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत विदेशी सिगारेटचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी कंपन्यांच्या सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सिडकोतील एका व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चेतन गोविंद मुसळे (रा. ओमनगर, लक्ष्मी स्विटच्या बाजूला, सिडको) या व्यावसायिकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे दिवेश जितेंद्र गुप्ता (रा. अल्पाभुवन बोरीवली, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गुप्ता यांनी मुसळे विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सिडकोतील शिवशक्तीचौकातील एका गोडावूनमध्ये अवैधरित्या विदेशी सिगारेटचा साठा करण्यात आल्याची माहिती या पथकास मिळाली होती. पथकाने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गोडावूनवर छापा टाकला असता सुमारे दोन लाख २४ हजार २५० रुपये किमतीचा विविध विदेशी कंपनीच्या साठा हाती लागला. विदेशी कंपन्यांच्या सिगारेट पॉकीटवर आरोग्यास हानी होण्याबाबत कोणताही इशारा नसतो. केंद्र सरकारने या संबंधी कायदा केला असून, विदेशी कंपन्याकडून त्याचे पालन होत नसल्याने ही कारवाई केली जाते. घटनेचा अधिक तपास हवालदार मते करीत आहेत.

दागिने लांबविले

घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने लाखाचे दागिणे लंपास केल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली. या प्रकरणी उषा खांडेकर (रा. शिवाजीनगर) या महिलेविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्याकडून जावयास मारहाण

नाशिक ः कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयास मारहाण केली. ही घटना सावरकरनगर भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शक्ती मधूकर टर्ले (रा. पंचवटी कारंजा) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. टर्ले यांच्या तक्रारीनुसार, टर्ले पती पत्नीत रविवारी वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे टर्ले यांनी आपल्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, याचा राग आल्याने सासरे त्र्यंबक अंबुजी शेळके (रा. मेहरधाम, पंचवटी) यांनी आपल्या जावयास गंगापूर पोलिस स्टेशनजवळील स्प्रिंग फिल्ड टॉवर परिसरात गाठले. मुलीविरोधात पोलिसांकडे तक्रार का दिली याचा जाब विचारत शेळके यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचे टर्ले यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तरुणाची आत्महत्या

सिडकोतील पाटीलनगर भागात ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोकूळ सुदाम पाटील (रा. ओंकार चौक, पाटीलनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई दंड भरण्यास टाळाटाळ!

$
0
0

८० टक्के वाहनचालकांकडून इतर पर्यायांची निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ई चलन सुरू झाल्यापासून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४५९ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, यातील फक्त ८६ वाहनचालकांनी लागलीच कार्डद्वारे पेमेंट केले. उर्वरित तब्बल ३७३ वाहनचालकांनी इतर पर्यायांनी दंडाची रक्कम भरण्यास प्राधान्य दर्शवले. या वाहनचालकांनी वेळेत पैसे जमा केले नाही, तर सदर प्रकरण कोर्टात पाठविण्यात येणार आहे. मात्र, यामुळे तांत्रिक कामाचा ताण वाढण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसांकडून पूर्वी दंडात्मक कारवाई करताना पावती फाडली जाई. मात्र, यामुळे भ्रष्टाचार करण्यास वाव मिळत होता. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ई चलन पध्दती सुरू करण्यात आली. २ जून रोजी ई चलन प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ झाला. या पध्दतीमुळे पावती पुस्तक इतिहास जमा करण्यात आले. त्याऐवजी पोलिसांकडे स्वाइप मशिन्स देण्यात आले. बेशिस्त वाहनचालकाकडून दंड वसूल करताना ई पध्दतीचा वापर सुरू झाला. या बाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की जागेवर दंड भरण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे विपूल प्रमाणात स्वाइप मशिन्स उपलब्ध आहेत. मात्र, वाहनचालक जागेवर कार्ड वापरून दंड देण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. ई चलन पध्दतीनुसार वाहतूक विभागाने पहिल्याच दिवशी ८१ वाहनचालकांवर कारवाई केली होती. आता हा आकडा ४५९ पर्यंत पोहचला आहे. मात्र, कारवाई झालेल्या वाहनचालकांपैकी फक्त ७७ जणांनी जागेवर दंड भरला.

उर्वरित ३७३ वाहनचालकांच्या वाहनांचे फोटोग्राफ्स पुरावे म्हणून घेण्यात आले आहेत. शिवाय, वाहनचालकाचे लायसन्स किंवा आधारकार्ड जमा करण्यात येते. मात्र, या वाहनचालकांकडून आठ दिवसांच्या आत दंडाची रक्कम वसूल करणे, ही तारेवरची कसरत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. जागेवर कार्डद्वारे दंड भरू न शकणारे वाहनचालक व्होडोफोन कंपनीच्या आउटलेटमध्येही दंडाची रक्कम जमा करू शकतात. दंड झालेल्या वाहनचालकाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात येते. ही लिंक ओपन करून वाहनचालक ऑनलाइन पध्दतीने दंडाची रक्कम भरू शकतो. याशिवाय वाहनचालक प्रत्यक्ष वाहतूक शाखेत दंडाची रक्कम जमा करू शकतो. ई चलन पध्दतीमुळे मुंबईत हजारो वाहनचालकांचे फावल्याचे दिसते.

शेवटी कोर्टाचा पर्याय

वाहनचालकास कोर्टात पाठवण्याची तरतूद पोलिस वापरू शकतात. मात्र, त्यामुळे कामांचा ताण वाढू शकतो, असा दावा केला जात आहे. या घडामोडींचा आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे वाहतूक शाखेचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वादाचे दंगलीत रूपांतर

$
0
0

नंदुरबारला बिर्याणी देण्यावरून हाणामारी; वादात जखमीच्या निधनानंतर शहरात दगडफेक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या आठवड्यात रविवारी (दि. ४) नंदुरबार शहरात बिर्याणी विक्रीच्या हातगाडीवर दोन गटांत वाद झाला होता. यात तीनजण जखमी होऊन एका जखमीचा शनिवारी (दि. १०) सकाळी मृत्यू झाल्याने दोन दंगलखोरांनी काही दुकानांची तोडफोड करून नुकसान केले. हाच प्रकार जमावाकडून शहरभर सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त तैनात केला मात्र पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केला. पोलिसांची कुमक कमी पडत असल्याने बाहेरील जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

यामुळे नंदुरबार शहरात शनिवारी (दि. १०) सकाळी अचानक दोन गटात दंगल उसळली. याप्रसंगी मंगळ बाजारात तरुणांनी एकत्र येत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सर्वत्र धावपळ सुरू झाली आणि दुसरीकडे दुकानांचे नुकसान करण्यास सुरुवात होऊन अवघ्या काही मिनिटांतच दोन गटात दगडफेक सुरू झाली. शहरात तणाव निर्माण होऊन दोन गटात सुरू असलेला हा वाद वाऱ्यासारखा शहरभर पसरला.

पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या

शहरात ठिकठिकाणी पोलिस दाखल होताच पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली. अखेर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करीत पोलिसांनी शहरात शांतता निर्माण केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण झाले. पोलिस व जिल्हा प्रशासनाला दुपारी उशिरापर्यंत दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, शनिवारी दुपारपासून शहरात संचारबंदी लावून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे शहरात दाखल झाले असून, धुळे, जळगाव, नाशिक येथून अतिरिक्त पोलिसांची कुमक नंदुरबार शहरात मागविण्यात आली आहे. सर्वत्र शांतता असून, या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

सचिन मराठे नामक तरुणाने शब्बीर पिंजारी (रा. नंदुरबार) यांना बिर्याणी फुकट मागितली असता, त्यांनी दिली नाही. या कारणावरून दोघांमध्ये रविवारी रोजी वाद झाला होता. यावेळी सचिनने शब्बीर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात शब्बीर पिंजारी गंभीर भाजले होते. त्यांना उपचारासाठी

रुग्णालयात दाखल करून उपचार

करण्यात आले. याप्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन मराठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शनिवारी (दि. १०) सकाळी शब्बीर पिंजारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून ही माहिती समजताच सकाळी शेकडोच्या जमावाने एकत्र येऊन मंगळ बाजारातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत दगडफेकीला सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासंगम पाहा ऑनलाइन अलाइव्ह अॅपच्या सहाय्याने

$
0
0

कलासंगम पाहा ऑनलाइन अलाइव्ह अॅपच्या सहाय्याने

---

‘मटा’चा आर्ट फेस्ट (कलासंगम) पाहा ‘अलाइव्ह’ त्यासाठी तुमच्या मोबाइलवर अलाइव्ह अॅप डाउनलोड करून या फोटोवर टॅप करा. त्यानंतर कलासंगममधील शिल्पकलेचा व्हिडीओ तुमच्या मोबाइलवर प्रत्यक्ष दिसेल. अधिक माहिती खालील चौकटीत दिली आहे.

अलाइव्ह अॅप सुरू कसं कराल?

१. अलाइव्ह अॅप तुमच्या मोबाइलवर इन्स्टॉल करण्यासाठी १८००१०२३३२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा तुमच्या मोबाइलवरून www.alivear.com या साइटवर जा.

२. अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुमच्या फोनवर सुरू करा आणि तुमच्या फोनचा कॅमेरा या फोटोवर धरून फोटो स्कॅन करा. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज फोनधारकांनी फोन फोटोवर धरल्यानंतर फोटो कॅप्चर करण्यासाठी स्क्रीनवर टॅप करावे आणि कॅप्चर होईपर्यंत धरून ठेवावा. ब्लॅकबेरी आणि सिंबियनधारकांनी ऑप्शनला जाऊन कॅप्चर करावे.

३. आता लाइव्ह व्हिडीओ शेअर होईल. पाहा आणि इतरांशी शेअर करा.

---

सूचना : निवडक अँड्रॉइड (२.२ आणि पुढील व्हर्जन), आयओएस (४.३ आणि पुढील व्हर्जन) ब्लॅकबेरी (५.० व्हर्जन आणि पुढील) सिंबियन (एस ६० व्हर्जन आणि पुढील) आणि विंडोज (७.५ व्हर्जन आणि पुढील) यावरच ही सुविधा उपलब्ध आहे.--

मटा कलासंगम आर्ट फेस्टमध्ये शनिवारी शिल्प साकारताना ज्येष्ठ शिल्पकार नीलेश ढेरे. मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेज येथे आयोजित या फेस्टमध्ये आज, रविवारीदेखील विविध कलावंतांकडून कलाप्रकार सादर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांची दुकानदारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटीनंतर शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार आहेत. या नव्या शैक्षणिक वर्षात गेल्या काही वर्षांमध्ये पालकांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शालेय साहित्य शाळेकडूनच विकत घेण्याची सक्ती पुन्हा काही शाळा पालकांवर करीत आहेत. अशा स्वरूपाची विक्री केली जाऊ नये, अशा सूचना असतानाही शहरातील शाळांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सेंट फ्रान्सिस स्कूलने या स्वरूपाच्या शालेय साहित्याची विक्री शनिवारीही केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

इंग्रजी शाळांची नियमबाह्य फीवाढ, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांनी वेठीस धरण्याचे प्रकार शहरात घडत असतानाच शाळा शालेय साहित्याच्या खरेदीची सक्ती करीत असल्याच्या तक्रारी पालक पुढे आणत आहेत. रंगपेटी, कंपास बॉक्स, पुस्तक-वह्यांचे कव्हर, हस्तकलेचे साहित्य, डिक्शनरी, नकाशे, युनिफॉर्मचा कापडी बेल्ट अशा स्वरूपाचे साहित्य शाळेतूनच घ्यावे, असा दबाव पालकांवर आणला जात आहे. शाळेने कोणत्याही स्वरूपाचे साहित्य विकणे हे नियमबाह्य आहे, हे शहरातील शाळांना प्रशासनाने नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, तरीदेखील सेंट फ्रान्सिस शाळेत शालेय साहित्याची विक्री केली गेल्याने शाळा प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

शाळांची नफेखोरी

शाळांकडून विकली जात असलेली पुस्तके खासगी प्रकाशकांची असून, शाळेने त्यावर आपल्या सोयीने वाढीव किमतीचे स्टीकर्स चिकटविले आहेत. यातील बरेचशी पुस्तके अनावश्यक असून, ती खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे. साहित्य विकण्याची परवानगी नसतानाही शहरातील शाळांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली आहे. वारंवार याविषयी तक्रारी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने शाळांचे चांगलेच फावत असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही स्वरूपाच्या शालेय साहित्याची विक्री करू नये, अशी तंबी आम्ही शाळेला दिली आहे. मात्र, तरीदेखील शाळा नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर याबाबत पडताळणी करून कडक कारवाई केली जाईल. ज्या पालकांवर अशा साहित्य खरेदीची सक्ती झाली आहे त्यांनी पुढे यावे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

--

एप्रिल महिन्यात आम्ही हे साहित्य पालकांना दिले होते. परंतु, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर आम्ही कोणत्याही स्वरूपाचे साहित्य विकलेले नाही.

-कुसुमा शेट्टी, मुख्याध्यापिका, सेंट फ्रान्सिस स्कूल, तिडके कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू अधिवेशनासाठी २१ संघटना एकत्र

$
0
0

१४ जूनपासून गोव्यामध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या १४ जूनपासून गोव्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांना एकाच छताखाली आणून अखिल भारतीय हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने विचारमंथनासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आल्याचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे संमेलन १७ जूनपर्यंत चालणार आहे. यासाठी भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १५० हून अधिक हिंदू संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहातील. या सर्व संघटनांचे पदाधिकारी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्‍चित करणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदू संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदू राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील पाच राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार अरुणाचल प्रदेशात गेले १० वर्षांत धर्मांतरामुळे हिंदूंची लोकसंख्या घटली आहे.

केंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात कारवाई करावी, दूरदर्शनवरील चर्चासत्रात भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या मौलाना देहलवीच्या विरोधात कठोर कारवाई, मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आंदोलने करण्यात आली. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या सहाव्या अधिवेशनाद्वारे होईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’द्वारे नाशिककरांना व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संस्कारांमुळेच एक पिढी घडली. आज कलाकार म्हणून वावरताना जो मला मान मिळत आहे, त्यात ‘मटा’च्या संस्कारांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी केले. ‘मटा’ने आयोजित केलेल्या कलासंगम या आर्ट फेस्टच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ‘मटा’ने ‘कलासंगम’ भरवून नाशिकमधील अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले, याबद्दल त्यांनी ‘मटा’चे आभार मानले.

मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय आर्ट फेस्टच्या प्रारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, की आमची पिढी महाराष्ट्र टाइम्समुळे घडली. त्यातील विविध लेख विविध सदरे, गोविंद तळवलकरांचे संपादकीय यांच्या वाचनातून विचारांची घडी तयार झाली. त्याचा उपयोग आम्हाला कार्टून काढताना झाला. यावेळी त्यांच्या हस्ते गणेशाचे चित्र काढून फेस्टला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे कॅरिकेचरही त्यांनी रेखाटले.

यावेळी पंचवटी कॉलेजच्या ललित कला महाविद्यालयाच्या प्राचार्य संपदा हिरे, आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, डिझाइन हेड सुवर्णा पाटील, आनंद ढाकीफळे, भि. रा. सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वानंद बेदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. नाशिकच्या रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

--

सकारात्मकतेकडे नेणारा उपक्रम

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार म्हणाल्या, की नकारात्मक विचारातून सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा हा उपक्रम आहे. ‘मटा’ने हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांतूनदेखील नाशिककरांना वेगवेगळी ठिकाणे दाखवली आहेत. आम्ही कायम ‘मटा’च्या बरोबर आहोत, यापुढे दर वर्षी हा उपक्रम ‘मटा’ने आमच्याच संस्थेत घ्यावा. जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करण्यास तयार आहोत.

--

समाजात ऊर्जानिर्मितीस चालना

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की समाजात आज नकारात्मक गोष्टींचा सर्वाधिक भरणा आहे. ‘मटा’ने हा उपक्रम सुरू करून समाजात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम केले आहे. मागील महिन्यात हॅप्पी स्ट्रीट्स उपक्रमाला हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. त्यावेळीदेखील नागरिकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. कला आयुष्य समृद्ध करणारी आहे. दिवसातील २४ तासांचा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावण्याचे काम मी करीत असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या समृद्धीसाठी माऊलींना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची भरभराट आणि उज्ज्वलता यासाठी उपमहापौर प्रथमेश गिते व सभागृह नेते दिनकर पाटील यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना साकडे घातले. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत सावरकर तरण तलाव येथे उपमहापौर व सभागृह नेत्यांनी

केले. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी दिंडीप्रमुख व वारकरी यांच्या आश्वासनांची पूर्ती केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सभागृह नेते पाटील पुढे म्हणाले, की पालखीच्या स्वागताचा दिवस हा वैभवशाली दिवस असून, माऊलीला समृद्धीसाठी वारकऱ्यांकडून साकडे घालतात म्हणून शहराच्या भरभराटीसाठी परमेश्वराला साकडे घालू. पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या दृष्टीने असणारी मागणी दरवर्षी प्रमाणे मनपातर्फे पूर्ण केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिली.

पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी निवृत्तिनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष त्रंबकराव गायकवाड, बेलापुरकर महाराज, लहवितकर महाराज, पुंडलिकराव थेटे यांचा मनपातर्फे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. पालखीत सहभागी झालेल्या ३५ दिंडी प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते चार्जर बॅटरी व भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. वारकऱ्यांना नाश्ता व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते गजानन शेलार, दीक्षा लोंढे, प्रभाग सभापती हेमलता पाटील, नगरसेवक गुरमित बग्गा, नगरसेविका प्रियंका घाटे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, संजय महाराज धोंडगे, पंडित महाराज कोल्हे, मोहन महाराज बेलापुरकर, रामकृष्णक महाराज लहवीतकर, डॉ. धनश्री हरदास, अण्णा साहेब महाराज आहेर, आरपीआय. नेता किशोर घाटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोधच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द झाला पाहिजे यावर शिवसेनेची भूमिका ठाम आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध कायम असून, जुलैमध्ये महाराष्ट्राला कलाटणी देणारे शिवसेनेचे जन आंदोलन असेल, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

शेतकरी संपाला पाठींबा देणारे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी घोटी येथे शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात घोटी येथून झाली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शेतकरी, धरणग्रस्त व कष्टकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या भूमिका जाणून घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांची व कामगारांची हालअपेष्टा करून देशाचा व राज्याचा काय विकास साधणार. विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा? असा सवालही राउत यांनी उपस्थित केला. सरकारमध्ये आहोत किवा नाहीत याचा विचार न करता, शेतकऱ्यांचे हित हीच शिवसेनेची भूमिका असल्याने समृद्धी महामार्ग तर हाणून पाडूच, शिवाय शेतकऱ्यांची इंचभरही जमीन संपादित होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेच्या रणनितीबाबत बोलताना खासदार यांनी सांगितले की, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, रमेश धांडे, विठ्ठल लंगडे, कुंडलिक जमधडे व्यासपीठावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images