Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अखेर पोलिस निरीक्षक गायकवाड निलंबित

$
0
0
६५ लाखांच्या लाचप्रकरणी सहआरोपी असलेले चाळीसगावचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण गायकवाड यांना अखेर निलंबित केले आहे. लाचखोरीच्या प्रकरणात नाव गोवल्यानंतर गायकवाड हे बेपत्ता झाले असून त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मुद्दा वेतनाचा नव्हे; राजकीय पोटदुखीचा

$
0
0
एसटी कर्मचा-यांना भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय जाहीर होताच या मुद्द्यावरून 'इंटक'प्रणित महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस व एसटी कामगार संघटनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नामात रंगले... समस्यांनी गांजले

$
0
0
गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर क्षेत्रात निवृत्तीनामाचा गजर सुरू आहे. निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त तुळस व पताकांच्या या गर्दीत वारकरी रंगून गेला. नामाचा गजर अखंड सुरू ठेवत, गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून केलेल्या चरणसेवेच्या फळाचा हा दिवस भरून पावला.

बुद्धविहाराची जागा कायम ठेवा

$
0
0
शहरातील हुडको मैदानातील नियोजीत जागेवर यशोधरा बुद्धविहार कायम ठेवण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायींनी बुधवारी मोर्चा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दोन तास धरणे आंदोलन केले. यावेळी सर्कल अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

'वसाका'चे कामकाज बंद पाडले

$
0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि एम. डी. यांनी भेट न घेतल्याने मंगळवारपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन बुधवारी चिघळले. सुमारे साडेसहाशे कामगारांनी आपल्या अकरा महिन्यांच्या थकीत पगारासाठी बुधवारी, सायंकाळी ७ वाजता कारखान्याच्या गेटला टाळे ठोकून उसाचे गाळप बंद पाडले.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या गळी महागडी टूर

$
0
0
येथील मातोश्री इंजिनीअरिंग शाखेच्या अंतीम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या गळी शैक्षणिक सहलीच्या नावाखाली न परवडणारी महागडी टूर उतरविल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला होता.

अन् त्यांचा वाढला 'हौसला'

$
0
0
सगळे काही असूनही हार मानणारे अनेकजण दिसतात. परंतु शारीरिक व्याधींवर मात करून जिद्दीच्या जोरावर आयुष्याचा मार्ग निवडणारे आदर्श असेच. अशा शारीरिक दुर्बल विद्यार्थ्यांची हौसला संस्थेच्या माध्यमातून भेट घेऊन सामान्य विद्यार्थ्यांनी आपला हौसला वाढविला.

'व्हॅलेंटाइन डे'ची तयारी फुल्ल

$
0
0
कॉलेजमध्ये सध्या विविध डेज ची धूम सुरू असली तरी कॉलेजि‌यन्ससाठी मोस्ट स्पेशल असणारा 'व्हॅलेंटाइन डे' अवघा आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या स्पेशल दिवसाची तयारी करण्यासाठी नाशिककचे यंगस्टर्सही सज्ज झाले असून गिफ्ट आर्टिकल्सच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

पाणीपट्टीची दरवाढ अन्यायकारक

$
0
0
सटाणा येथील नगर परिषदेने केलेली नळ पाणीपट्टीची दरवाढ सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी आ. संजय चव्हाण यांनी केली आहे.

आयुर्वेदिक कॉलेजांनी अद्यावत व्हावे

$
0
0
आयुर्वेदाच्या क्षे‌त्रात दर्जेदार शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आयुर्वेदिक कॉलेजांनी अद्यावत व्हावे, असे प्रतिपादन नवी दिल्लीचे सीसीआयएम (भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद)चे अध्यक्ष वेद प्रकाश त्यागी यांनी केले.

सातपूर, सिडकोला पाणी नाही

$
0
0
सातपूरच्या पाणीपुरवठा विभागात तातडीची कामे करायची असल्याने सिडको विभागातील पाणीपुरवठा शुक्रवारी (८ फेब्रुवारी ) दिवसभर बंद राहणार आहे.

मी तुमचाच विद्यार्थी

$
0
0
विद्यार्थ्यांसाठी कॉलेज म्हणजे वर्ग कमी आणि कट्टा जास्त अशी परिस्थिती असते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा नेहमी संबंध येईलच याची आजकाल खात्री नाही. परवा असाच एक किस्सा घडला.

अहो आश्चर्यम्, महापौर सिडकोकरांच्याही दारी

$
0
0
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठीच 'महापौर तुमच्या दारी' हा उपक्रम महापालिकेतील सत्ताधा-यांनी हाती घेतल्याची टीका झाल्यानंतर आता महापौरांनी सिडकोकडे मोर्चा वळविला आहे.

'केबीन वॉर' थंडावला

$
0
0
महापालिकेत सदस्य नसतानाही इंटकला स्वतंत्र कक्ष (केबीन) देण्याचे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आकाश छाजेड यांनी मात्र 'वाद होणार असेल तर कक्ष परत घ्यावा' असे पत्र आयुक्तांना दिले आहे.

बंधा-यांच्या कामात गैरव्यवहार

$
0
0
त्र्यंबक व पेठ तालुक्यातील बंधा-याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केला आहे. या प्रकाराला लघु पाटबंधारे विभाग दोषी असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

डॉ हुसेन हॉस्पिटलमध्ये नागरिकांचे आंदोलन

$
0
0
द्वारका येथील महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये सोयी-सुविधांच्या अभाव असल्याने महिला पेशंटची गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी हॉस्पिटलला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

नेट सेट सवलतीचा प्रश्न मार्चमध्ये कॅबिनेटवर

$
0
0
नेट सेट सवलतीबाबात प्राध्यापकांची मागणी मार्चमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळात मांडण्यात येऊन तिला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एम. फुक्टोच्या शिष्टमंडळाला बुधवारी मुंबईत दिले.

बसमध्ये महिला कंडक्टरचा विनयभंग

$
0
0
बसमध्ये एखाद्या प्रवाशाने महिलेशी गैरवर्तणूक केल्यास ती बस थेट पोलिस स्टेशनला नेण्याची सूचना मंगळवारी राज्य परिवहन महामंडळामार्फत देण्यात आली होती. या सूचनेचा प्रत्यय मनमाडमध्ये महिला बस कंडक्टरचा विनयभंग करणा-या विद्यार्थ्याला बुधवारी आला. या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

उभाडे गावात ८ लाखांची घरफोडी

$
0
0
घोटी-सिन्नर मार्गावरील उभाडे गावातील अशोक भैरू सुरुडे यांच्या घरातून बुधवारी पहाटे चोरट्यांनी तब्बल ८ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे घरात सुरुडे कुटुंबियांसह त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आलेले पाहुणे झोपलेले होते.

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विकास देशमुख

$
0
0
पुढील वर्षी होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणा-या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विकास देशमुख यांची तर शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण सावजी यांची निवड करण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images