Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुख्याधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी संगीता नांदुरकर (शहाणे) आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अर्वाच्य भाषेत पालिका कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत, भारतीय मजदूर संघाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वच्छता, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.

कामबंद आंदोलनात शासकीय 'केडर'मध्ये समावेश असलेल्या पालिकेतील विविध टेबलांवरील अधिकाऱ्यांचा काहीसा अपवाद वगळता सर्वच कर्मचारी सहभागी झाले. मुख्याधिकाऱ्यांनी वापरलेल्या शब्दांच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने जमा झालेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत बराच वेळ ठिय्या दिला. पालिकेतील सर्वच विभागाची दालने बंद करून घेत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही टाळे ठोकले.

भारतीय मजदूर संघाचे पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी (दि. ११) झालेल्या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी नांदुरकर यांनी केलेले वक्तव्य वादास कारणीभूत ठरले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित अदा करावे यासाठी प्रथमतः संघटनेने उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे व डीपीओ खोडके यांची भेट घेतली होती. त्यांनी हे वेतन त्वरित अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना चर्चेस बुधवारी बोलावले. यावषली बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत मुख्य विषय बाजुला ठेवला आणि 'तुम्ही ब्लकमेलिंगचे धंदे बंद करा', या शब्दात अपमानित केल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लक्ष्य करत गुरुवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पालिकेतील स्वच्छता, पाणीपुरवठा विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीकडे आपला मोर्चा वळवत आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीडच्या गावाला नाशिकची मदत

$
0
0

हसनापूरवासीयांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गाव' प्रत्येक चाकरमान्याच्या मनातील हळवा कोपरा. धडपड करीत गावातून शहरात आलेल्या अन शहरी झालेल्या व्यक्तीला गावाची ओढ सहाजिकच असते. पण, दररोजच्या जगण्याच्या लढाईत, कामाच्या ताणात 'गाव' कुठेतरी मागे पडते. गावासाठी काहीतरी करावे, अशी मनातील अपेक्षा मनातच राहते. यास अपवाद म्हणून क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते सध्या काम करीत आहेत.

बीड जिल्ह्यातील हसनापूर गाव. २०० ते ३०० घरांच्या या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जेमतेम सोय. उन्हाचा कडाका वाढला की हंडाभर पाण्यासाठी पायपीट ठरलेली. या विपरीत परिस्थितीत नखाते यांनी शिक्षण घेऊन डीवायएसपीची परीक्षा उत्तीर्ण केली. गावात जाण-येणे असले तरी गावासाठी काय करणार, असा एक प्रश्न त्यांच्या मनात होताच. काही दिवसांपूर्वी गावातील तरुण मुलांनी एका स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती त्यांना कळवली. पाणी अडवणे हा स्पर्धेचा उद्देश असला तरी लोकसहभाग महत्त्वाचा होता. गावातील तरुण, युवक, वृद्धांनी काम करण्याची तयारी दर्शवली. मात्र, निधीची कमी होती. गावातील सहा-सात जण रोजगारानिमित्त बाहेरगावी आहेत. यातील नखाते वगळता कोठून फारशी मदत मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा नखाते यांच्याकडे लागल्या होत्या.

अशी केली निधीची जुळवाजुळव

लग्न वगळता कधीही एकजूट न दाखवणारा गाव एकत्र येत असल्याने काहीही झाले तरी निधी संकलित करायचा, अशी खुणगाठ नखाते यांनी बांधली. यासाठी त्यांनी आपल्या बॅचच्या इतर अधिकाऱ्यांना मदतीविषयी विचारणा केली. पोलिस अधिकाऱ्यांनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला. वरिष्ठांपाठोपाठ इतर अधिकारीही सरसावले. मात्र, बंधारे बांधणे तसेच जेसीपीच्या इंधनासाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज होती. शहरातील बांधकाम व्यावसायिक विलास बिरारी यांनी चार बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे गावासाठी निधीची जुळवाजुळव झाली. मालेगावच्या महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी साताऱ्या्ील त्यांच्या गावातील जलसंधारणासाठी धाव घेतल्यानंतर आता नखाते यांनीही त्याच पद्धतीने काम केले आहे.

गावाचा आणि माझा फार संबंध कधी आला नाही. पण जितका वेळ गावात घालावला तो आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. कर्तव्य संभाळून गावासाठी काहीतरी करण्याची संधी समोर आली. यानिमित्ताने ओढ लावणाऱ्या गावाच्या मातीसाठी काहीतरी केल्याचे समाधान आयुष्यभर पुरेल.

- अशोक नखाते,

सहायक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागड्यांचे दर्शन दुर्लभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून तो घंटागाडीत टाकण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे कचरा वेगळा न करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र, कचरा गोळा करण्यासाठी तब्बल चार-पाच दिवसांनी फिरणाऱ्या घंटागाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. एवढ्या विलंबाने घंटागाड्या येत असल्यामुळे मखमलाबादरोडवरील नागरिक त्रस्त झाले असून, काही जण अंधारात थेट रस्त्यावरच कचरा फेकू लागल्याने कचराच कचरा चोहीकडे अशी स्थिती या भागात दिसून येत आहे.

वाढत्या लोकवस्तींचा विचार करून घंटागाड्यांची संख्या आणि आहे त्या घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे असताना तशी उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. घरांमधील कचरा ठेवणे ही मोठी समस्या झाली आहे. ओल्या कचऱ्याची सुटणारी दुर्गंधी येथील रहिवाशांना त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे ही समस्या बिकट झाल्याने मखमलाबादरोडवरील घाडगे मळा येथील नागरिकांनी घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांना निदान दिवसाआड तरी घंटागाडी आणण्याची विनंती केली असता त्यांच्याकडे असलेल्या परिसराचा विचार करताना दिवसाआडदेखील घंटागाडी पोहोचणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

ओल्या कचऱ्याने दुर्गंधी

घरोघरी आता ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येत आहेत. सुका कचरा काही दिवस पडून राहिला, तरी त्याचा काही त्रास होत नाही. मात्र, ओला कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरायला लागते. असा कचरा जास्त दिवस घरात ठेवणे शक्य नसते. त्याची दुर्गंधी असह्य होत असल्यामुळे तो कचरा त्वरित उचलणे गरजेचे आहे. हा कचरा उचलण्यासाठी येणारी घंटागाडी चार-पाच दिवसांनंतर येत असल्यामुळे ही समस्या वाढत आहे. कित्येक रहिवासी घरात दुर्गंधी नको म्हणून कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी असा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कचरा साचल्याचा आणि त्याच्या दुर्गंधीचा त्रास अशा रस्त्याने जाणाऱ्यांना सहन करावा लागतो.

घंटागाडी चार-पाच दिवसांनी येत असल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या वाढली आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता ते ठेकेदाराशी बोला, असे सांगत आहेत. घंटागाड्यांची संख्या कमी, त्यांच्याकडे असलेला परिसर मोठा त्यामुळे घंटागाडी वेळेवर येऊ शकत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र, त्यात रहिवाशांना कचरा घरात साचवून ठेवावा लागत आहे.

-राम पवार, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींना अटक; पोलिस फिर्यादीच्या प्रतीक्षेत

$
0
0

आरोपींना अटक; पोलिस फिर्यादीच्या प्रतीक्षेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

--

विदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळणाऱ्या तिघा आरोपींना खार पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींनी नाशिकमधील काहींना गंडा घातला असून, त्यांच्या बँक खात्यात तशा नोंदी आहेत. मात्र, याबाबत फिर्यादीच समोर आलेला नसल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे. विवाह, विदेशात नोकरी, परदेशात व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांनी अनोळखी व्यक्तींना पैसे दिले असल्यास नागरिकांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शोहेब कुरेशी (२४, रा. ठी. नालासेपारा) पास्कल झूमबे (२१, रा.ठी. नालासोपारा) आणि सॅनडे मेझे (२२, रा.ठी. नालासोपारा) यांचा समावेश आहे. यातील दोघे नायझेरियन व्यक्ती असून, फसवणुकीच्या गुन्ह्यात यांचा सक्रिय सहभाग असतो. या तिघांनी मिळून आपोलोनिया अर्नान्डिस या महिलेस तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता. विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपोलोनिया यांच्याकडून संशयितांनी पैसे उकळले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच खार पोलिसांनी संशयितांना १० एप्रिल रोजी अटक केली.

पोलिसांनी संशयितांकडून ७ एटीएम कार्ड, ११ सीमकार्ड, एक लॅपटॉप आणि रौटर, चार मोबाइल, तसेच तीन हजारांची रोकड जप्त केली होती. या आधारे तपास करणाऱ्या खार पोलिसांनी संशयितांचे नाशिक कनेक्शन शोधून काढले. संशयितांनी नाशिकमधील काही व्यक्तींना फसवल्याचे समोर आले असून, नाशिकमधून त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे दिसते. याबाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले की, संशयित आरोपींच्या बँक खात्यावर नाशिकमधून पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, फसवणूक झाल्याप्रकरणी अद्याप तशी तक्रारच समोर आलेले नाही. फेसबुक अथवा इतर सोशल मीडियाच्या आधारे नोकरी, विवाह, व्यवसाय यासंदर्भात कोणी अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केलेला असल्यास त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीने अवकळा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहराच्या काही भागाला गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. याचवेळी वीजेचा पुरवठा खंडित झाला, तर अचानक आलेल्या या पावसाने नाशिककरांची चांगलीच धावपळ उडाली.

हवामानातील बदलांमुळे अवकाळी पाऊस येणार असा अंदाज हवामान विभागाकडून दिला जात होता. मात्र, उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने पावसाच्या सरी कोसळतील असे नाशिककरांना वाटत नव्हते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हवामानात बदल झाला. त्यामुळे कडक उन्हातच शहराच्या काही भागात गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरी आणि वादळी वारा यामुळे शहरवासियांची त्रेधा उडाली. जुने नाशिक, गंगापूर गाव, सिडको या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावरही त्यामुळे पाणी साचले. काही ठिकाणी होर्डिंग्ज फाटले तर पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. शहराच्या मुख्य भागात जोरदार वारा होता. फावडे लेनमधील भिकुसा वाडा कोसळला. यात जीवितहानी झाली नाही. जुने नाशिक आणि सातपूर व सिडको परिसरात मात्र नागरिकांची मोठीच धांदल उडाली. शहराच्या अनेक भागात वीजेचा पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, तासाभरानंतर वीजपुरवठा सुरळीत होतानाच वादळी वारा आणि पावसाचे वातावरणही दूर झाले.

फलकाने विद्युत तारांचे नुकसान

सातपूर : वेध शाळेच्या अंदाजानुसार सातपूरला गारपिटच्या पावसाने हजेरी लावत दाणादाण उडविली. या परिसरात लावलेल्या फलकांमुळे महावितरणच्या

विद्युत तारांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधा उडाली. गारांसह झालेल्या पावसाने उन्हापासून दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. पाऊस गेल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात सिंगल

$
0
0

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली असून, यासाठी ३ कोटी ९३ लाख ७६ हजार रूपये मंजूर केले असल्याची माहिती सटाणा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली. शहरातील चौगांव बर्डी येथील वीस ते पंचवीस हजार टन कचरा यात रिक्लीन होणार आहे. यानंतर भविष्यात जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून खत व वीज तयार करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या जागे बरोबरच सदर प्रकल्पाच्या जागेला संरक्षण भिंत, खत, वीज निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, शेड कामगारांसाठी घरे विद्युत, अंतर्गत रस्ते यांचा यात समावेश आहे.

00000

घोटीत बैठक

घोटी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीउत्सवाच्या पार्श्वभूमीवर घोटी येथे तहसीलदार अनिल पूरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली. जयंती उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दक्ष राहून कायदा सुव्यवस्था व नियमांचे पालन करा असे आवाहन घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले. सदस्य संतोष दगडे, मदन रूपवते, माजी सरपंच संजय जाधव, अण्णासाहेब डोंगरे, बाळासाहेब वालझाडे आदी उपस्थित होते.

000

पुण्यतिथी सप्ताह

निफाड : श्री स्वामी समर्थ महारांजांची शुक्रवारी पुण्यतिथी असल्याने त्यानिमित्ताने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे. सर्व सेवा केंद्रांवर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता स्वामींची महानैवेद्य आरती होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व केंद्रावर जयारी करण्यात आली आहे. निफाड येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रावर पुण्यतिथी सप्ताहानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात रंगणार ‘भीमसंध्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात शनिवारी, १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. जयंती उत्सव निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशनल सोशल व कल्चरल ऑर्ग. मालेगाव यांच्या वतीने भीमसंध्या या भीमगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राजेश गंगावणे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवार सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रवीण डोणे व शिरिष पवार यांच्यासह भीमस्पंदन इंटरनॅशनल ग्रुपचे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत अशी माहिती गंगावणे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश तरुण वर्ग व समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा भीमगीतांचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मिरवणूक मार्गाची पाहणी

शनिवारी साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध भागातून मिरवणूक निघणार असून, या मिरवणूक मार्गाची अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे आदींनी पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिस ठाण्यात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच , उपसरपंच, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणून घेऊया मटासंगे!

$
0
0

लोगो - जाणून घेऊया मटासंगे!

कचऱ्यापासून वीजनिर्मिती पाहण्याची संधी

महापालिकेने विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून विजेची निर्मिती सुरू केली आहे. हा प्रकल्प कसा चालतो, कशी तयार होते वीज, हे पाहण्याची संधी मटाच्या वाचकांना मिळणार आहे. त्यासाठी ८०८७९६८०५३ या क्रमांकावर मेसेज करुन आपल्या सहभागासाठी नोंदणी करा. आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर असा मेसेज करावा. निवडक वाचकांना येत्या रविवारी सकाळी १० वाजता विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या ठिकाणी हा प्रकल्प पाहता येईल. तेव्हा त्वरा करा. आताच नोंदणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादी महिला’चा भगूरला कँडल मार्च

$
0
0

'राष्ट्रवादी महिला'चा भगूरला कँडल मार्च (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील आठवर्षीय चिमुरडीच्या बलात्कारप्रकरणी भगूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढण्यात आला.

देशासह राज्यभरात या प्रकरणी संतापाची भावना उसळत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व भगूर येथील सर्व समाजाच्या महिला, मुलींनी एकत्र येत कँडल मार्च काढला. यावेळी वुई वाँट जस्टिस व बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविषयी संपूर्ण देशातून संतापाची भावना व्यक्त होत असताना आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयाने कडक कारवाई करीत मुख्य आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्षा बलकवडे यांनी केली. या मार्चमध्ये देवळाली कॅम्प शहराध्यक्षा सायरा शेख, बीना हांडा, भारती बलकवडे, पूनम बर्वे, सुलताना शेख, मंगल भालेराव, कमळा कदम, नूरजहाँ मन्सुरी, रझीया शेख, परवीन सय्यद आदी सहभागी झाल्या होत्या.

---

कॅम्पमधील\R रस्ते\R डांबरीकरणाची\R मागणी\R

म\R. टा\R. वृत्तसेवा\R, देवळाली\R कॅम्प\R

गेल्या\R दोन\R वर्षांपासून\R देवळाली कॅम्पमध्ये\R सुरू\R असलेल्या\R भूमिगत\R गटारींच्या\R कामामुळे\R शहरातील\R अंतर्गत\R रस्त्यांची\R दुरवस्था\R झाली\R आहे. पुढील\R महिन्यापासून\R सुरू\R होणारा\R रमजान\R महिना\R लक्षात\R घेता\R कॅन्टोन्मेंट\R प्रशासनाने\R त्वरित\R डांबरीकरण\R करण्याची\R मागणी\R छावा\R संघटनेचे\R जिल्हाध्यक्ष\R राशीद\R सय्यद\R यांनी\R केली\R आहे\R.

देवळालीच्या\R आठही\R वॉर्डांत\R सुरू\R असलेल्या\R भूमिगत\R गटारींच्या\R कामामुळे\R रस्ते\R गेल्या\R वर्षीपासून\R खोदून\R ठेवण्यात\R आले\R आहेत\R. त्यावर\R फक्त\R मुरूम\R टाकून\R रस्ते\R सुरळीत\R करण्याचे\R काम\R केले\R जात\R आहे\R. मात्र,\R पुढे\R सुरू\R होणारा\R पावसाळा\R व\R रमजान\R पर्व\R लक्षात\R घेत\R मशीद\R परिसरासह\R आठही\R वॉर्डांमधील\R रस्ते\R त्वरित\R डांबरीकरण\R न\R केल्यास\R निषेध\R मोर्चा\R काढण्यात\R येईल\R. या प्रकरणी\R छावा\R संघटना\R पदाधिकारी\R व\R नागरिक\R बोर्डाचे\R अध्यक्ष\R ब्रिगेडिअर\R प्रदीप\R कौल\R व\R मुख्य\R कार्यकारी\R अधिकारी\R यांना\R भेटून\R निवेदन\R सादर\R करणार\R आहेत\R.१५\R दिवसात\R डांबरीकरणाबाबत\R लेखी\R आश्वासन\R दिल्याशिवाय\R हे\R आपण\R मागे\R हटणार\R नसल्याचे\R रशीद\R सय्यद\R यांनी\R सांगितले\R.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

१७८ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके यांची निवड करण्यात आली. श्रीकांत बेणी यांची प्रमुख सचिवपदी फेरनिवड करण्यात आली.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी कार्यकारी मंडळाची विशेष बैठक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते.

सन २०१८-१९ या वर्षाकरिता कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके यांची निवड करावी, अशी सूचना मावळते कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे यांनी मांडली. त्यास श्रीकांत बेणी यांनी अनुमोदन दिले. गेल्या वर्षभरात केलेले सक्षम काम लक्षात घेऊन प्रमुख सचिवपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करावी, अशी सूचनादेखील अॅड. बगदे यांनी मांडली. त्यास संजय करंजकर यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांचा गजर केल्याने एकमताने निवड झाल्याचे सभाध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांनी जाहीर केले. मावळते अर्थ सचिव गिरीश नातू यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 'सावाना'ची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचे आणि आणखी नवनवीन उपक्रम सुरू करून 'सावाना'च्या कीर्तीमध्ये भर टाकण्याचा मनोदय प्राचार्य औरंगाबादकर यांनी व्यक्त केला.

निवड झालेले अन्य पदाधिकारी

सहाय्यक सचिव- अॅड. भानुदास शौचे, अर्थसचिव- शंकरराव बर्वे, ग्रंथ सचिव- बी. जी. वाघ, सांस्कृतिक कार्य सचिव- प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, नाट्यगृह सचिव- अॅड. अभिजित बगदे, वस्तुसंग्रहालय सचिव- देवदत्त जोशी, बालभवनप्रमुख- संजय करंजकर, उद्यान वाचनालयप्रमुख- कुमार मुंगी, अभ्यासिकाप्रमुख- प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, डिजिटलायझेशनप्रमुख- प्रा. संगीता बाफना, मुक्तद्वार विभागप्रमुख- वसंत खैरनार, लायब्ररी ऑन व्हील प्रकल्पप्रमुख- जयप्रकाश जातेगावकर.

----

पुस्तक मित्रमंडळातर्फे उगलमुगले यांचे व्याख्यान

नाशिक : 'चांदणभूल' (ललित लेख) या विजयकुमार मिठे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर लेखक विवेक उगलमुगले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सभासद, तसेच नाशिककर नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे पुस्तक मित्रमंडळप्रमुख प्रा. प्र. द. कुलकर्णी व अॅड. मिलिंद चिंधडे आणि 'सावाना'च्या कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.

कर्करोगावर मार्गदर्शन (फोटो)

देवळाली कॅम्प : येथील दर्शन अॅकॅडमी येथे डॉ. गुरदीप सिंग यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगावर मार्गदर्शन केले. कर्करोग हा आजार चुकीच्या आहाराविषयक सवयींमुळे जडू शकतो. प्रत्यक व्यक्तीने मुलांनी समतोल आहार कसा ठेवावा, आहारविषयी चांगल्या सवयी कशा लावाव्यात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, तसेच अमली पदार्थ सेवनापासून स्वतःला कसे दूर ठेवावे व या गोष्टी शरीराला किती अपायकारक आहेत, हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. कर्करोगावरील उपचारांबाबत मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांचे शंकानिरसनही केले.

--

प्रशिक्षण वर्गाचा समारोप

जेलरोड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शंकराचार्य न्यासातर्फे समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी गंगापूर येथील श्री बालाजी मंदिरात दर वर्षी पूजा प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गाचे यंदा सातवे वर्ष होते. या वर्गाचा समारोप आज, शनिवारी (दि. १४) सकाळी दहा वाजता गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात होणार आहे. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव शिंदे यांचे यावेळी व्याख्यान होईल. लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष राजेश कोठावदे, धर्म जागरण विभागाचे प्रमुख हेमंत हरहरे, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी प्रमुख पाहुणे राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पाहणी; अहवालानंतर पंचनामे!

$
0
0

अवकाळी पावसामुळे सटाणा, कळवण, देवळ्यात शेतपिकांचे नुकसान

विभागीय आयुक्तांचे पाहणीचे यंत्रणेला आदेश

दोन दिवसात प्राथमिक अहवाल होणार तयार

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी (दि. १२ एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता गृहित धरून सटाणा, देवळासह कळवण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करा, असे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंतची यंत्रणा कामाला लागली असून, दोन दिवसात याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे.

असह्य उकाड्याने शहर आणि जिल्हावासी त्रस्त असताना गुरुवारी सायंकाळी अनेक भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. यामुळे काही काळापुरता वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु, ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यासह पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या. शेतांमध्ये पाणी साचले. मिरची, कांदा, टोमॅटो, द्राक्ष आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील निकवेल, कंधाणे, जोरण, दहिंदुले, भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जायखेडा, सोमपूर, आसखेडा, तांदूळवाडी, ब्राह्मणपाडे या भागात उघड्यावर ठेवलेल्या कांदा भिजला. देवळा आणि कळवणमध्येही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप सरकारने दिले नसले तरी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित तालुक्यांमधील तहसीलदारांनी तलाठी आणि कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेमार्फत नुकसान झालेल्या शेतांमध्ये पाहणी करावी, त्याबाबतची माहिती तसेच छायाचित्रे घ्यावीत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. दोन दिवसात हा पाहणी अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैदीचा सिव्हिलमधून पोबारा

$
0
0

हत्येप्रकरणी पतीसह नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये भोगत होती शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिलेने शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून पलायन केले. ही घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास कैदी वार्डात घडली. गभर्वती असल्याने तसेच पोट दुखत असल्याने महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

शायदा शफीक पठाण, असे या महिलेचे नाव आहे. महिलेसह तिच्या पतीवर हत्येचा आरोप असून, नोव्हेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दोघांची रवानगी नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. अटक झाली त्यावेळी महिला गर्भवती होती. तसेच तिला अरबाज दोन वर्षांचा मुलगा असून, तोही तिच्यासोबत आहे. मालेगाव येथील एका खून प्रकरणात या दाम्पत्यास अटक करण्यात आली होती. सेंट्रल जेलमध्ये येण्यापूर्वीच गर्भवती असलेल्या शायदाचे १२ एप्रिल रोजी पोट दुखायला लागले. त्यामुळे जेल प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलशी संपर्क साधला. येथील डॉक्टरांनी जेलमध्ये येऊन शायदाची प्रत्यक्ष तपासणी केली. मात्र, काही अडचणी असल्याने शायदाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्याच दिवशी शायदला अॅडमिट करण्यात आले. काही तासांच्या कालावधीनंतर नैसर्गिक बाळंतपण झाले नाही तर सिझेरीयन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्या अनुषंगाने शायदावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास शायदा मुलगा अरबाजला घेऊन फरार झाली. शायदासोबत जेल प्रशासनाने दोन महिला कर्मचारी दिलेल्या होत्या. मात्र, इतक्या अवघडलेल्या स्थितीत शायदा कोठे जाणार, असा सहानभुतीपूर्वक विचार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात शायदाने धूळ फेकली. शायदा फरार झाल्याची घटना पाचच मिनिटांत स्पष्ट झाली. या दोन कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकांसोबत परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

पतीही अनिभज्ञ

जेलच्या अधिकाऱ्यांनी शायदाच्या पतीकडेही चौकशी केली. मात्र, या अवस्थेत ती कोठे जाणार असा प्रश्न तिच्या नवऱ्यालाही पडला आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बाळांतपणासाठी महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. पती आणि पत्नी दोघेही खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये कारगृहात दाखल झाले होते.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागसवर्गीयांनाही मंदिराचे गाभारे खुले

$
0
0

८० मागासवर्गीय युवक बनले पुजारी

…fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी काळाराम सत्याग्रहचा लढा दिला त्याच भूमीत मागासवर्गीय समाजातील व्यक्ती देवाची पूजा अर्चा करण्यासाठी सज्ज होत आहेत. देवाच्या गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा करणे ही ठराविक समाजाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नाशिकच्या शंकराचार्य न्यासाच्या वतीने २०१२ पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आजपर्यत नाशिक जिल्ह्यातील २४५ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत.

मागासवर्गीयांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. काळ बदलला त्याप्रमाणे समाजाची मानसिकता बदलली. आज अनेक हिंदू मंदिरांमध्ये मागासवर्गीय युवक पुजारी म्हणून काम करीत आहेत. हिंदू धर्मात असलेल्या पूजाअर्चा या ठराविक समाजानेच कराव्यात असा नियम होता. मात्र आता तो बदलला आहे. यासाठी नाशिकच्या शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी धर्मजागरण परिषदेच्यावतीने सन २०१२ पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. शंकराचार्य कुर्तकोटी हे आधुनिक विचारसरणीचे होते. त्याचीच दखल घेऊन न्यासाने अशा प्रकारच्या आधुनिक उपक्रम सुरू केला. या प्रशिक्षणाला हिंदू धर्मातील कुणीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. आजपर्यंत विविध जातीच्या लोकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून सन २०१२ मध्ये ३४, २०१३ मध्ये ३०, २०१४ मध्ये ३१, २०१५ मध्ये ५०, २०१६ मध्ये ३१, २०१७ मध्ये ४५, २०१८ मध्ये २४ अशा एकूण २४५ युवकांनी प्रवेश घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत. यातील बहुतांश युवक हे आपापल्या गावात पूजाअर्चा करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या प्रशिक्षण वर्गात सर्वदेव पूजा, ज्योतिष पंचांग, नामकरण विधी, संस्कृत संभाषण वर्ग, योगासने शिकविली जातात. यामध्ये सत्यनारायण पूजा, विवाह, अंत्येष्टी, नामकरण विधी हे मुख्य असतात. ग्रामीण भागात वेगवेगळ्या श्रद्धा परंपरा असतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीच्या-परंपरा माहीत असलेला पुरोहीत हवा असतो याकरिता येथे प्रशिक्षण घेतलेले युवक योग्य काम करित आहेत. या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन गेलेले तीन मागासवर्गीय युवक हे पंढरपूर देवस्थानच्या पुजारी निवड समितीचे सदस्य आहेत. नाशिक शहराप्रमाणेच गेल्या वर्षापासून पैठण, सज्जनगड, सोलापूर, कोल्हापूर कणेरी आश्रम या ठिकाणीही पूजा प्रशिक्षण सुरू आहे. त्याठिकाणीही पूजा प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये मागसवर्गीय युवकांची उपस्थिती लक्षणीय आहे.

…..

वंचीत समाजाने पूजा शिकावी हा या मागचा उद्देश आहे. आजपर्यंत अनेक लोक शिकून जात आहेत. अनेक जातींचे लोक येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.--अनिल चांदवडकर, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागाचा राखीव निधी ‘वर्ग’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात लघु पाटबंधारे विभागाने आदिवासी भागातील बिगर जलयुक्तच्या कामांसाठी राखीव असलेला अडीच कोटी रुपयांचा निधी जलयुक्तच्या कामांना वर्ग केला. त्यावर जलव्यवस्थापनाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

जिल्हा परिषदेला आदिवासी तालुक्यात काम करण्यासाठी नाशिक प्रकल्पांतर्गत ११ कोटी तर कळवण प्रकल्पांतर्गत १० कोटी असा २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील १० टक्के निधी बिगर जलयुक्तच्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. उर्वरित १८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांकडून त्यांच्या गटातील कामांचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यापैकी जलयुक्तच्या कामांसाठी ४ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले होते. मात्र ३१ मार्चचा हिशोब पूर्ण करण्यात प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगत बिगर जलयुक्तचा निधी जलयुक्तच्या कामांसाठी वळविला. त्यावर आता पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय निधी वर्ग करण्यात येत नसतानाही प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने जलयुक्त बैठकीत या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या ही गोष्ट ५ एप्रिलला निदर्शनास आले. यानंतर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. ही सभा एक तास तहकूब करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व अनिल लांडगे यांनी त्यानंतर चर्चा केली. त्यावेळेस लघु पाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालदोस्तांसाठी पाठवा साहित्य

$
0
0

\Bबालदोस्तांसाठी पाठवा साहित्य

\Bबालदोस्तांसाठी सुटी म्हणजे मजा, धमाल आणि फुल टू एन्जॉय. सुटीमध्ये बालगोपाळ खेळ आणि विविध शिबिरांमध्ये दंग असतात. मात्र, मैदानी खेळांबरोबरच बौद्धिक क्षमतावाढही तेवढीच महत्त्वाची असते. हेच लक्षात घेऊन चिमुकल्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'मटा'तर्फे 'सुपरसुट्टी' हे पान सुरू करण्यात येणार आहे. या पानासाठी छोट्या दोस्तांना रुचेल, आवडेल असे साहित्य मागविण्यात येत आहे. लहान मुलांच्या गोष्टी, कथा, कविता, कोडे, चित्र, चुटकुले तसेच त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल असे साहित्य पाठवावे. साहित्य पसंतीस उतरल्यास त्याला यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल.

\Bसाहित्य पाठविण्यासाठी

\B- पत्ता : महाराष्ट्र टाइम्स तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड

- ई मेल आयडी : nashikplus18@gmail.com

- साहित्य पाठविताना त्यावर 'सुपरसुट्टी' असा उल्लेख करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रेयवादाची लढाई हिंसक

$
0
0

इंदिरानगर : नाशिक महानगरपालिकेच्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रथमच चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. या रचनेमुळे किंवा चार सदस्यीय पद्धतीमुळे अनेक प्रभागांत विकास झाला नाही. अनेक प्रभागांत वेगवेगळ्या पक्षांचे किंवा एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. एकाच प्रभागातील या नगरसेवकांमध्ये कामांचे श्रेय लाटण्यावरून वाद-विवाद झाल्याचे वर्षभरात दिसून आले. इंदिरानगर भागात तर एकाच पक्षाच्या चारही नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने आता भाजप यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात मागील वर्षात अनेक प्रभागांमध्ये अशा श्रेयवादाच्या लढाया झाल्या आहेत. प्रभाग २५ मध्ये शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये स्मशानभूमीच्या विकासावरून वाद झाला होता. हा वादही पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झालेले हे वाद आजपर्यंत अनेकदा समोर आले आहेत. विशेष म्हणजे या वादात अद्याप कोणत्याही पक्षश्रेष्ठीने लक्ष दिले नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरामाची मर्यादा बालपणापासून

$
0
0

विजय कौशल यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राम आणि श्रीकृष्ण यांचे बालपण बघितले तर श्रीकृष्णाच्या तक्रारी खूप येत असल्याचे दिसते. मात्र, श्रीरामाची कुणी तक्रार केलेली नाही. श्रीरामाची मर्यादा बालपणापासून होती, असे विचार विजय कौशल यांनी व्यक्त केले.

स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे धनदाई लॉन्स येथे शुक्रवारी (दि. १३) झालेल्या श्रीरामकथाच्या दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते. माता, पिता, गुरू, यांचे बंधन स्वीकारले पाहिजे. मर्यादांचे बंधन हवेच. दान देण्याची वृत्ती असायला हवी. जशी क्षमता आहे, तशा प्रकारे दान केले पाहिजे. देवतांच्या आध्यात्मिक विकासाचे स्वरूप लक्षात घ्यावे. जसा भाव आहे, तशी मूर्ती बनविली जाते. ज्या प्रकारे माता- पित्याजवळ जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते त्याचप्रमाणे भगवताजवळ जाण्यासाठी पूर्व तयारी करण्याची गरज नसते, असे कौशल यांनी सांगितले.

भगवान आपले माता-पिता आहे. भगवंतांसाठी काही सोडू नका. जागे राहिल्यास भगवान मिळतो. ज्यांच्यासाठी भगवान प्रकट झाले ते सर्व गृहस्थी होते. विरक्त नव्हते. पद-पैसा मिळविण्यासाठी शरीराला कष्ट करावे लागतात, भगवंताला मिळविण्यासाठी शरीराला बसावे लागते. भगवन्त मिळण्यासाठी व्याकुळता असावी लागते. भजनासाठी स्वार्थी बनावे मात्र, व्यवहारात परमार्थ पाहिजे. एकदा भगवंतांचा आसरा मिळाला की दुसऱ्या आसऱ्याची गरज नाही. माता, पिता आणि गुरू यांचा आशीर्वाद घेतल्यास दुसऱ्या कुणाचाही आशीर्वाद मागण्याची गरज नाही. आचार, व्यवहार, समर्पण, वाणी यांनी माता, पिता, गुरू याना प्रसन्न केले तर दुनियेतील कोणत्याही आशीर्वादाची गरज नाही, असेही कौशल यांनी मत मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा दराच्या कामांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने मंजूर केलेल्या प्राकलन दराच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक जादा दराच्या कामांना ब्रेक लावत आयुक्त तुकाराम मुंढेंनी दोन कामांत एक कोटीची बचत केली आहे. म्हणजेच यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय स्थायी समितीने व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने निविदाप्रक्रियेत 'रिंग' करून महापालिकेची कोट्यवधीची लूट होत असल्याचा थेट आरोप स्थायीच्या सदस्यांनी बैठकीत केला. त्यामुळे वर्षभरातील जादा दराच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर गेल्या वर्षभरातील जादा दराने मंजूर झालेल्या कामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले.

आयुक्त मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर विकासकामांना त्रिसूत्री लावत, मंजूर कामांच्या प्राकलनाचीही तपासणी केली होती. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ४ मधील फुलेनगर भागात दलित वस्ती विकास योजनेंतर्गत आरसीसी गटार टाकण्याच्या ८.३३ कोटींच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतरही आयुक्तांनी मक्तेदाराशी वाटाघाटी करीत हे काम ७.४४ कोटींमध्ये करण्यास मक्तेदाराला राजी केले. सातपूर विभागातील प्रभाग ११ मधील प्रबुद्धनगरमधील आरसीसी गटार टाकण्याचे १.०६ कोटीचे कामही १.०२ कोटीपर्यंत आणल्याने महापालिकेची सुमारे ९४ लाखांची बचत झाली आहे. या संदर्भातील फेरप्रस्ताव स्थायी समितीने सादर केला. प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आयुक्त मुंढे यांच्या या कृतीचे समर्थन करताना यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असावा, असा संशय सदस्यांनी व्यक्त केला. आयुक्त मुंढे दोन कामांमध्ये एक कोटीची बचत करू शकतात, तर यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी तसे प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल उद्धव निमसे यांनी केला. महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार 'रिंग' करून कामे मंजूर करीत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. वर्षभरातील जादा दराच्या कामांची चौकशी करण्याची मागणी मुशीर सय्यद, दिनकर पाटील यांनी केली. सिंहस्थ काळात झालेले रस्ते, रिंग रोड व १९२ कोटींच्या कॉलनीअंतर्गत रस्ते विकासाच्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. चर्चेअंती गेल्या वर्षभरात जादा दराने मंजूर झालेल्या कामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश सभापती आहेर-आडके यांनी दिले. महापालिकेच्या औषध खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही सदस्यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन संशियत चोरटे अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वणी-पिंपळगाव भागातील दुकाने फोडणाऱ्या तिघांपैकी दोघा संशयितांना ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संशयितांनी कापड दुकान, हॉटेल आणि पानस्टॉल फोडल्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ७८ हजाराचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितांमध्ये दोघा सराईतांचा समावेश आहे.

रोहित केशव गायकवाड (रा. शिवाजीनगर, पिंपळगाव बसवंत) आणि मुकुंद गणपत देशमुख (रा. चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्याचा एक साथिदार प्रतिक उर्फ बापू पांडूरंग मातेरे (रा. चिंचखेड, ता. दिंडोरी) फरार आहे. वणी भागात दुकान फोडणारे संशयित पिंपळगाव बसंवत येथे राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी पुढील कारवाई केली. तिघांनी मिळून दिंडोरी रोडवरील लखमापूर फाटा येथील कापड दुकान, वणी चौफुलीवरील हॉटेल तसेच पानटपरी फोडल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून रेडिमेड कपडे, परफ्युम व पान दुकानातील साहित्य असा ७७ हजार ४५३ रुपयांच्या मुद्देमाला आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५ ईयू ३९८२) जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रेय साबळे, पुंडलिक राऊत, गणेश वराडे, पोलिस नाईक अमोल घुगे, शिपाई विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमजन्मोत्सवासाठी नाशिक सज्ज

$
0
0

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी भिमसैनिक सज्ज झाले असून शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून निळे झेंडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे यंदा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादाप्रमाणे यंदाही हर्षोल्हासात साजरी करण्यासाठी भिमसैनिक सरसावले आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्त जयंती उत्सव साजरा होते आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

जुन्या नाशकातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केला आहे. भद्रकाली परिसरातील मोठा राजवाडा येथून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शालिमार येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीची सांगता होणार आहे. शहरातील डॉ. आंबेडकरांचे पुतळे रोषणाईने उजळले आहेत. अनेकांनी घरांवर, वाहनांवर निळे झेंडे फडकावले आहेत. फाळके स्मारकाजवळील बौद्धविहार परिसरातही बांधव गर्दी करतात. त्यामुळे येथेही स्वागताची तयारी करण्यात आली आहे. शांततामय वातावरणात जयंती साजरी करावी तसेच सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे. शहरात ठिकठिकाणी लहान मोठ्या मंडळांकडून डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अन्नदान, विद्यार्थी गुणगौरव, यांसारख्या उपक्रमांचे आयोजन मंडळांनी केले आहे.

'ड्राय डे' पाळा

जयंती उत्सव उत्साहात परंतू निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी १३ आणि १४ डिसेंबरला 'ड्राय डे' पाळण्याबाबतचे आवाहन बुद्धविहार समन्वय समिती, बहुजन हिताय संघ, धम्म संस्कार प्रचार व प्रसार समिती, धम्म युवा विचारमंच, मिशन एम्पॉवरमेंट आणि मेत्ता मल्टीपर्पज ऑर्गनायजेशन आदींनी केले आहे. प्रशासकीय स्तरावरूनही याबाबत कार्यवाही व्हावी, याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. शनिवारी 'ड्राय डे' पाळण्यात येणार आहे.

विधायक उपक्रमांसाठी आवाहन

डॉ. आंबेडकर या विश्ववंदनीय महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ उत्सव नको तर परिवर्तनाचा जागर व्हावा, असे आवाहन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधवांना विधायक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन, पुस्तकांचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, ग्रेटभेट सारखे कार्यक्रम, सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार, विविध स्पर्धा, नेतृत्व व वकृत्व विकास शिबिर, पथनाट्यातून प्रबोधन, कलामहोत्सव, भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करा, असे आवाहन काही दिवसांपासून सजग आणि सुजाण बांधव करीत आहेत. अशा काही उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images