Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्यात आर्थिक गुन्ह्यांचा ‘एडीजीं’शिवाय तपास

$
0
0

समन्वयाअभावी तपासावर परिणाम

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : राज्यात वाढणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यांच्या समन्वयासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे (एडीजी) पदच अस्तित्त्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये हे पद असले तरी महाराष्ट्रात या पदाअभावी विविध आर्थिक गुन्ह्यांचा तपास मंदावला आहे. याची दखल अद्यापही राज्य सरकारने न घेतल्याने मैत्रेय, पॅनकार्ड, केबीसीसह इतर गुन्ह्यांमधील मालमत्ता जप्त करण्यापासून त्यांच्या लिलावाची प्रक्रिया थंड बस्त्यात असल्याचे निदर्शनास येत आहे.

वेगवेगळ्या स्कीम राबवून तसेच आमिष दाखवून चिटफंड कंपन्या गुंतवणुकदारांना गंडावतात. नाशिकमध्ये मागील १५ ते १६ वर्षांत ६७ गुन्ह्यांमध्ये तब्बल १९ हजार ४०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाले आहेत. आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत असून, राज्यभरात या गुन्ह्यांचे पाळमुळे पसरलेले दिसतात. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या एखाद्या गुन्ह्यातील मालमत्ता पुणे येथे असते. तर आरोपींचे मूळ ठिकाण नागपूर येथे असते. अशा गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करणे, मालमत्ता जप्त करणे, कोर्टातून मालमत्ता जप्तीचा आदेश प्राप्त करणे यात मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होतो. अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे नियत्रंण प्रस्थापित झाल्यास तपास कामांमध्ये सुलभता येऊ शकते. आर्थिक गुन्हे शाखांकडे येणाऱ्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असते. राज्यभरात गाजलेल्या मैत्रेय प्रकरणात राज्यभरात तब्बल २७ गुन्हे दाखल असून, सुरुवातीस प्रत्येक ठिकाणावरून कारवाईसाठी जोर काढण्यात आला. नाशिक कोर्टापाठोपाठ मुंबईतील कोर्टाने एस्क्रो खाते सुरू करून पैसे जमा करण्याचे आदेश संशयितांना दिलेत. परिणामी या गुन्ह्याचा तपास भरकटण्याची चिन्हे निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस आप-आपल्यापरीने तपास काम करीत असल्याचा तो परिणाम होता. आर्थिक गुन्ह्यांमध्ये सन्मवयाचा अभाव निर्माण होऊ नये, यासाठी राज्य स्थरावर नियत्रंण अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालकपद आवश्यक आहे.

महाराष्ट्रात मुहूर्त कधी?

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखांमधील सन्मवयासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक पदाची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबत विचार केला. मात्र, अद्याप त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चर्चेतील बातमी फोटो

बाह्यचौकशी नकोच

$
0
0

ईटी वृत्त, मुंबई

पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना पुन्हा एकदा या बँकेच्या संचालक मंडळाने पाठीशी घातले आहे. व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या वादग्रस्त कर्जप्रकरणी बाह्ययंत्रणेकडून चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत संचालक मंडळाने कोचर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला २०१२ मध्ये तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यानंतर चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या न्यू पॉवर रिनीव्हेबल्स या कंपनीत ६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कालांतराने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चंदा कोचर यांच्याभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते. या प्रकरणाची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.

या बँकेच्या संचालक मंडळाच्या २८ मार्चच्या बैठकीत कोचर यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर या संचालक मंडळाने पुन्हा एकदा कोचर यांची पाठराखण केली आहे. कोचर प्रकरणी आमची बँक बाह्यचौकशी करण्याचा विचार करीत आहे, या आशयाच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. आमचा असा कोणताही विचार नाही, असे सांगत बँकेचा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्यावरील सर्व आरोप आम्ही फेटाळत आहोत, असे या बँकेने एका पत्रकात म्हटले आहे.

सीबीआयलाच आव्हान

सीबीआयने या प्रकरणी ठोस पुरावे द्यावेत. या वादग्रस्त प्रकरणात चंदा कोचर यांचा प्रत्यक्ष सहभाग होता असे दिसत नाही. याबाबतचे पुरावे सादर होईपर्यंत कोणतीही बाह्य चौकशी करण्याचा आमचा विचार नाही. व्हिडिओकॉन समूहाला अनेक बँकांनी एकत्रित कर्ज दिले आहे. केवळ आमच्या बँकेनेच कर्ज दिले नसून अन्य अनेक बँकाही त्यात सहभागी आहेत. असे असताना एखाद्या बँकेची व अधिकाऱ्याची प्रतिमा डागाळण्याचाच हा प्रयत्न आहे, असा आरोप या बँकेच्या एका अधिकाऱ्याने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमुख्यलेखापाल घोलप निलंबित

$
0
0

आयुक्त मुंढेंची आतापर्यंतची मोठी कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, शुक्रवारी वित्तीय अनियमितता, कामात हलगर्जीपणा आणि शासकीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याप्रकरणी उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा विकास घोलप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

घोलप यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ठेकेदारांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्याचीही चर्चा आहे. आयुक्त मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील आजवरची ही सर्वांत मोठी प्रशासकीय कारवाई मानली जात असून, या कारवाईने खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आयुक्त मुंढे यांनी आठवडाभरापूर्वीच लेखा व वित्त विभागाची आढावा बैठक घेत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे उत्तर देण्यात घोलप असमर्थ ठरल्याने आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी (दि.२०) जारी केले. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बुकानेंची वेतनवाढ रोखली

कचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी, तसेच वादग्रस्त डस्टबिन खरेदी आणि स्वच्छता प्रचार- प्रसार मोहिमेत गोंधळ घातल्याप्रकरणी आयुक्त मुंढेंनी तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि विद्यमान वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्या दोन वेतनवाढ रोखल्या आहेत. आयुक्तांनी त्यांची विभागीय चौकशी सुरू केली होती. मात्र, बुकाने यांनी आरोप मान्य करीत माफी मागितली. त्यामुळे आयुक्तांनी चौकशीऐवजी त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली.

सविस्तर वृत्त...२

आतापर्यंत दहा जणांवर

निलंबनाची कारवाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे सेवा अनिश्चिततेच्या गर्तेत

$
0
0

मुंबई सेवाही चार तास उशिराने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कनच्या वतीने दिली जाणारी विमानसेवा संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. हवाई दलाने परवानगी न दिल्याने पुणे सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाल्याचे कारण कंपनीने दिले आहे. तर, कंपनीने कुठल्याही प्रकारची सूचना दिली नसल्याचे पुणे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, कंपनीची मुंबई सेवाही तब्बल चार तास उशिरानेच मिळाली असून आगामी आठवडाभर ही सेवा उशीराच राहणार आहे. परिणामी, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

गेल्या मार्च महिन्यात खंडित झालेली एअर डेक्कनची मुंबई आणि पुणे सेवा २० एप्रिलपासून सुरू होणार होती. त्यासााठी कंपनीने बुकींगही घेतले. मात्र, पुणे सेवा अचानक रद्द झाल्याने बुकींग केलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. पुणे हवाई दलाने नाशिकसेवेसाठी परवानगी दिलेली नाही. गेले तीन महिने परवानगी होती. फेब्रुवारीमध्ये ही मुदत संपली. आता ही परवानगी पुन्हा देणे आवश्यक होते. पण, सायंकाळी ४ ते ५ या वेळेतच सेवेसाठी परवानगी देण्यात येईल, असे हवाई दलाने सांगितल्याने सेवेची अडचण झाली आहे. ही बाब विमान वाहतूक मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मंत्रालयाने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे, असे कंपनीने सांगितले आहे. तर, शुक्रवारच्या (दि. २०) सेवेबाबत कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती, असे पुणे विमानतळ प्रशासनाचे अधिकारी अजयकुमार यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पुणे सेवा नक्की कधी पर्यंत सुरू होणार ही बाब अनिश्चितच असल्याचे दिसून येत आहे.

पहाटेची सेवा नाहीच

२० एप्रिलपासून मुंबईसाठी पहाटे सहा वाजेची सेवा मिळेल, असे कंपनीने जाहिर केले. त्यानुसार बुकींगही घेतले. मात्र, शुक्रवारी पहाटे सहा वाजता सेवा मिळू शकलेली नाही. ही सेवा थेट सकाळी साडेदहा वाजता देण्यात आली. बुकींग केलेल्या प्रवाशांना याबाबत कळविण्यात आले होते. पायलटला काही तासांनंतर विश्रांती देणे आवश्यक असते. त्यामुळे हा उशीर झाला, असे कंपनीने सांगितले आहे.

आठवडाभर सेवा उशिरानेच

आगामी आठवडाभर मुंबई सेवा उशीरानेच मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. २१ एप्रिलला सकाळी साडेदहालाच विमान मुंबईकडे प्रस्थान करेल. २२ आणि २४ एप्रिलला सकाळी साडेआठ वाजता सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यानंतर पहाटे सहा वाजता सेवा दिली जाईल, याचे नियोजन सुरू असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

प्रवाशांची तीव्र नाराजी

पुणे सेवा रद्द होणे, मुंबई सेवा उशीराने मिळणे, गेले महिनाभर सेवाच न मिळणे, तिकीट रद्दचे पैसे वेळेवर न मिळणे यासह विविध प्रकारच्या असुविधांमुळे प्रवासी तीव्र नाराज आहेत. एअर डेक्कन कंपनीची सेवा ही योग्य पद्धतीने नसल्याने त्याचा मोठा परिणाम नाशिकवर होत आहे. त्यामुळे विमान वाहतूक मंत्रालयाने कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे. असुविधेविषयी पूर्वसूचना मिळत नसल्याने तिकीट बुकींग करावे की नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

जळगाव सेवाही विलंबाने

कंपनीकडून दिली जाणारी जळगाव-मुंबई-जळगाव ही सेवाही बाधित झाली आहे. शुक्रवारी एअर डेक्कनचे विमान तब्बल साडेतीन तास उशीराने जळगावला पोहचले. आगामी काही दिवस हे विमान उशीरानेच राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे नाशिकपाठोपाठ जळगाव सेवाही बाधित झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसकट करवाढीविरोधात ‘सीटू’चे सातपूरला आंदोलन

$
0
0

सरसकट करवाढीविरोधात 'सीटू'चे सातपूरला आंदोलन (फोटो)

सातपूर : महापालिका आयुक्तांनी सरसकट करवाढ केल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिक व नागरिक नाराज झाले आहेत. ही करण्यात आलेली करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, याकरिता 'सीटू' संघटनेतर्फे महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता झालेल्या या आंदोलनात करवाढ रद्द करण्याबाबत घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

---

बेशिस्तांकडे कानाडोळा

जेलरोड : बिटको चौकात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. येथे सिग्नल असतानाही वाहनचालक त्याचे उल्लंघन करून पोलिसांसमोरून जातात, तरीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. अशा चालकांचा जीव धोक्यात येतोच. परंतु, ते इतरांचाही जीव धोक्यात आणतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. बिटको चौकात बेशिस्त वाहनचालकांवर अभावानेच कारवाई होताना दिसते. कारवाईसाठी येथे पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनीही बेशिस्तीपुढे आणि वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे हात टेकले आहेत.

--

लग्नतिथीमुळे कोंडीत भर

नाशिकरोड : लग्नतिथीमुळे जेलरोड ते नांदूर नाकादरम्यान, तसेच जत्रा चौक ते आडगावदरम्यान वाहतुकीची कोंडी होत आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालये आहेत. शुक्रवारी लग्नतिथी असल्याने जेलरोड, ओढा, पंचवटी आदी ठिकाणांहून वऱ्हाडी मंडळी आली होती. नांदूर नाका येथे सिग्नल असतानाही वाहने पुढे दामटण्याच्या हट्टाने कोंडी झाली होती. जत्रा हॉटेल येथे गतिरोधक असतानाही अशाच कारणामुळे कोंडी झाली होती. जत्रा हॉटेल आणि नांदूर नाका येथे मंत्री येण्याच्या वेळीच वाहतूक पोलिस असतात. लग्नतिथी वेळी येथे वाहतूक पोलिस नेमण्याची गरज व्यक्त होत आहे.

--

मशिन बंदची तक्रार

जेलरोड : एटीएममध्ये नोटांची टंचाई असतानाच खातेधारकांना नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय बँकेच्या नाशिकरोड येथील अनेक शाखांमध्ये पासबुक प्रिंटिंग मशिन बंद आहेत. स्टेट बँकेच्या नाशिकरोड, शिवाजीनगर, सेंट फिलोमोना शाळा,पंचवटी, आडगाव या ठिकाणच्या पासबुक छपाई मशिन सध्या बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी पासबुक छपाईसाठी मनुष्यबळ नाही, तर काही ठिकाणी मशिन बंद असल्याच्या तक्रारी आहेत. काउंटरवर पासबुक प्रिंटिंगसाठी रांगा लावाव्या लागत आहेत.

0000000000000

(सिंगल)

उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन (फोटो)

म.टा.वृत्तसेवा,देवळाली कॅम्प

देशभरातील दारिद्ररेषेखालील महिलांचे आरोग्याच्या दृष्टीने सक्षमीकरण व्हावे, जळण इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक साधनांचा वापर बंद व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देवळालीसह ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

संसरीच्या मारुती मंदिराच्या प्रांगणात येथील बीपीसीएल कंपनीच्या एम्पायर स्टोअर व संसरी ग्रामपंचायतीतर्फे या योजनेच्या जनजागृतीसाठी येथील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सरपंच युवराज गोडसे, उपसरपंच अनिल गोडसे, नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे, एम्पायर स्टोअरचे संचालक शावीर इराणी, रमेश गिते, विष्णू ठाकरे, किरण गोसावी, एच. एस. गायकवाड, मुख्याध्यापिका नंदा भायभंग आदी मान्यवर उपस्थित होते. संसरीसह पंचक्रोशीत एम्पायर स्टोअरच्या माध्यमातून या योजनेंतर्गत सुमारे १०३ हून अधिक कनेक्शन केवळ १०० रुपये भरून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील लाभार्थी महिलांना यावेळी गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतापर्यंत दहा जणांवरनिलंबनाची कारवाई

$
0
0

पालिकेत आतापर्यंत

दहाजण निलंबित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढेंनी सर्वप्रथम प्रशासकीय पातळीवर सुधारणेची मोहीम राबवत कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासह नागरिकांना सुविधा देण्याला प्राधान्य दिले आहे. कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आयुक्तांनी आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

आतापर्यंत विभागीय अधिकारी बी. वाय शिंगाडे यांच्यावरची निलंबनाची कारवाई सर्वात मोठी होती. परंतु, शुक्रवारी आयुक्तांनी उपमुख्य लेखाधिकारी घोलप यांच्यावरच निलंबनाची कारवाई करीत जोरदार दणका दिला. घोलप यांच्या अखत्यारीत नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेचे महत्त्वपूर्ण काम होते. हे काम कर्मचाऱ्यांशी संबंधित असल्याने ते वेळीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, घोलप यांच्या अखत्यारीतील उपलेखापाल तुकाराम मोंढे यांनी ऑगस्ट २०११ ते ऑक्टोबर २०१५ पर्यंत अनेक अभिलेखे मुळात तयारच केले नव्हते, तसेच उर्वरित अभिलेखे अपूर्ण ठेवले, तेदेखील संपूर्णत: चुकीचे होते. याबाबत स्थानिक लेखा परीक्षण विभाग व महालेखाकार यांच्या लेखापरीक्षण अहवालात याबाबत अत्यंत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर या अनियमिततांविषयी मोंढे यांच्यावर शास्ती लादण्यात आली होती; परंतु या कारवाईनंतरही घोलप यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही. तसेच अधिकाऱ्यांकडे वाहने असतांनाही, त्यांना वाहन भत्ते देण्याचा पराक्रम घोलप यांनी केला होता. महापालिकेच्या बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेतही घोलप यांनी सक्रिय सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे त्या आयुक्त मुंढे यांच्या रडारवर अगोदरपासूनच होत्या. त्यातच त्यांनी कर्मचाऱ्यांचे गृहकर्जलेखेही पूर्ण केले नाहीत. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला, तरी घोलप यांनी ३१ मार्च अखेरचे लेखे पूर्ण केले नाहीत. काही विकासकामांच्या देयकांच्या अदायगीत झालेला विलंबही घोलप यांच्या निलंबनाचे कारण ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरके’वर दुचाकी जाळली

$
0
0

म. टा. प्रतिनधी, नाशिक

रविवार पेठेतील अभोणकर लेन येथे दुचाकीची जाळपोळ करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी सागर दिनकर चौघुले (रा. रमेश बिल्डींग, अभोणकर लेन, रविवार पेठ) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यानंतर चौघुले यांनी गुरूवारी घरासमोर त्यांची दुचाकी (एमएच १५ डी. बी. ७१३७) उभी केली. मध्यरात्रीच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने घराबाहेर आलेल्या चौघुलेंना दुचाकी जळताना दिसली. त्यांनी तत्काळ पाणी टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत दुचाकीचे बरेच मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा तत्काळ माग काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

बेकायदा विदेशी मद्यसाठा जप्त

म. टा. प्रतिनधी, नाशिक

परराज्यातून येणारा बेकायदा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडला. उंबरठाण-बर्डीपाडा मार्गावरील पांगारणे (ता. सुरगाणा) शिवारात ही कारवाई करण्यात आली.

संशयित वाहन सोडून पसार झाले असून, ही कारवाई विभागीय भरारी पथक आणि कळवण - २ पथकाने गुरूवारी (दि. १९) संयुक्तरित्या केली. बेकायदा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक चरणसिंग राजपूत, उपअधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कळवण -२ भरारी पथक आणि विभागीय भरारी पथकाने संयुक्तरित्या पांगारणे शिवारात सापळा लावला. उंबरठाणाकडून भरधाव येणाऱ्या कारच्या (जीजे १५ सीए ४०२१) चालकासह त्याच्या साथीदारास पथकाची चाहूल लागल्याने संशयितांनी काही अंतरावरच आपले वाहन सोडून पोबारा केला. पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता सुमारे ७ लाख ३५ हजार ६८० रुपयांचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. ही कारवाई निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक आर. आर. धनवटे, वाय. आर. सावखेडकर, व्ही. एम. माळी, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, गणेश शेवगे आदींच्या पथकाने केली. एम. बी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यान देखभालीचा विसर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील  वॉस्को चौकाजवळील नेहरू गार्डनच्या देखभालीचा महापालिकेच्या उद्यान विभागाला गेल्या काही वर्षांपासून जणू काही विसरच पडला आहे. गेल्या वर्षभरात उद्यान विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उद्यानाकडे ढुंकूनही न पाहिल्याने आजमितीस या उद्यानाचा अक्षरश: उकिरडा झाला आहे. उद्यानाच्या नावाखाली या जागेचा वापर अवैध धंद्यांसाठीच जास्त होताना दिसून येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे महत्त्वाचे उद्यान आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानाची देखभाल महापालिकेच्या उद्यान विभागाकडून होत नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे. सध्या या उद्यानात नागरिक आणि लहान मुलांऐवजी भिकारी, मद्यपी, जुगारी आणि भटकी जनावरे यांचाच वावर वाढला आहे.

या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच सिंहस्थाच्या काळात सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले आहे. परिणामी येथे कायमच दुर्गंधी असते. या सार्वजनिक शौचालयामुळेही या उद्यानाकडे नागरिक फिरकत नाहीत. परिणामी हे उद्यान ओस पडले आहे. या उद्यानात रेणुका देवीचे जुने मंदिर आहे. परंतु, या मंदिराचीही दुरवस्था झालेली आहे. नेहरू उद्यानाच्या एका बाजूचे अतिक्रमण महापालिकेने काही महिन्यांपूर्वी काढले. परंतु, उर्वरित अतिक्रमण जैसे थे आहे. ज्या बाजूचे अतिक्रमण काढले त्या बाजूकडील उद्यानाची संरक्षक भिंतही महापालिकेने या कारवाईदरम्यान पाडल्याने या उद्यानाचा वापर सार्वजनिक झाला आहे. काही व्यावसायिकांकडून तर या उद्यानाच्या जागेचा वापर व्यवसायासाठीही केला जाऊ लागला आहे.

 खेळण्यांची दुरवस्था

नेहरू उद्यानात असलेल्या खेळण्यांचीही दुरवस्था झाली आहे. या खेळण्यांची दुरुस्तीही आजवर कधी झालेली नाही. काही ठिकाणी काटेरी झाडे-झुडपे वाढलेली आहेत. या उद्यानात अस्वच्छता असल्याने लहान मुले या खेळण्यांकडे फिरकत नाहीत. याशिवाय या खेळण्यांच्या शेजारीच सार्वजनिक शौचालय असल्याने येथे कायम दुर्गंधी असते. उद्यानातील डीपीही उघडी पडलेली असल्याने ही डीपीही धोकादायक बनली आहे.

कचऱ्याचे ढीग

या उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. उद्यान विभागासह ठेकेदाराचे कर्मचारी काही वर्षांपासून या उद्यानाकडे फिरकलेले नसल्याने या उद्यानाचा अक्षरशः उकिरडा झाला आहे. ठिकठिकाणी आजूबाजूचे व्यावसायिक कचरा टाकत असल्याने येथे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. मंदिरापुढेच प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे.

मद्यांच्या बाटल्यांचा खच  

या संपूर्ण उद्यानात दिवसभर मद्यपींचा अड्डा जमतो. त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले असल्याने या मंदिराच्या आश्रयाने येथे मद्यपी व भिकाऱ्यांचाही मोठा वावर असतो. मद्यपि आणि भिकाऱ्यांमुळे या उद्यानाकडे एकही नागरिक फिरकत नाही.

नेहरू उद्यानाच्या देखभालीचा महापालिका प्रशासनाला विसरच पडला असल्यासारखी स्थिती आहे. स्थानिक नगरसेवकही या उद्यानाच्या दुर्दशेस जबाबदार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या उद्यानाच्या देखभालीची काळजी घेतली गेल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून बकालपण दूर होऊ शकेल.

-अमोल घोडे, नागरिक

 

लोगो- वर्षभरानंतर 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार ई सेवा केंद्र सील

$
0
0

मालेगावातील रॅकेट; अनेक शासकीय कागदपत्रे आढळली

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात संशयास्पदपणे सुरू असलेल्या चार महा ई-सेवा केंद्रांची शनिवारी तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक गैरप्रकार समोर आल्याने ही चारही केंद्र महसूल अधिकाऱ्यांनी सील केली. तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. गावात ई सेवा केंद्रांचा मूळ परवाना असलेल्या जागी कुलूप ठोकून शहरात बस्तान बसवलेल्या दोन केंद्रांसह चार संशयास्पद केंद्रावर ही कारवाई झाली. धक्कादायक बाब म्हणजे या सेवा केंद्रांवर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्य आदेशांच्या प्रती, तलाठ्यांकडे करण्यात येणारे अर्ज तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शिक्के व स्वाक्षरींचे महापालिकेकडून मिळणारे कोरे मृत्यूचे दाखले देखील हाती लागले आहेत. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील विराणे येथे महाऑलाईन ई-सेवा केंद्राचा मूळ परवाना असतांना येथील तहसील कार्यालयामागील 'वर्धमान रेसिडन्सी' या ठिकाणी केंद्र सुरू असल्याचे आढळून आहे. चाळीसगाव फाटा येथे निकम यांना परवना देण्यात आलेले ई-सेवा केंद्र तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या खासगी गाळ्यांमध्ये चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. तर साजिद शेख या केंद्र चालकाने न्यायालयासमोरील इमारतीत सुरू केलेले केंद्रच संशयास्पद आहे. केंद्र ज्या जागेत चालवले जाते, त्या ठिकाणी दाखले व कागदपत्रे देण्याचे फलक व दरपत्रक लावलेले नाही. फलक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आढळून आला. त्यामुळे केंद्र चालवतांना नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघड झाला आहे. साजिद शेख या केंद्र चालकाकडे जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख यांच्यासाठी मार्क केलेले अपर जिल्हाधिकारी यांचे सत्यप्रत आदेशपत्र सापडले. साजिदचे मुळ परवाना असलेले केंद्र नेमके कोणत्या ठिकाणी आहे, याचा कोणताही पुरावा त्याने पंचनामा दरम्यान सापडला नाही.

कोऱ्या दाखल्यांवर अधिकाऱ्यांच्याह सह्या

कॅम्प रोडवर अन्नपुर्णा लॉज शेजारी आजिद अहमद शेख हा ई-सेवा केंद्र चालवतो. त्याच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शिक्के असलेले डॉ. सिराज अहमद यांच्या स्वाक्षरीचे महापालिकेचे कोरे मृत्यू दाखले सापडले. वन अधिकाऱ्यांचे ना हरकत सत्य दाखले देखील या केंद्रात छापेमारीत हाती आले आहेत. ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेवून पंचनामा करण्यात आला आहे. हे चारही केंद्र सील करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्याचे वितरण फसले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात विक्रीस बंदी असलेल्या आणि केंद्रशासित दमन, दादरा, नगर-हवेली येथे निर्मित होणारा मद्यसाठा सीमावर्ती भागात दडवून दोन टप्प्यांत जिल्ह्यात वितरित होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागास चकवा देण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. त्याचाच हा एक भाग आहे. सुरगाणा तालुक्यातील केळीपाडा येथील कारवाईतून ही बाब समोर आली असून, येथील एका डोंगराच्या पायथ्याशी गवताच्या गंजी खाली लपवून ठेवलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा एक्साइज विभागाच्या हाती लागला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. कर चुकवून आर्थिक लाभ उचलण्यासाठी परवानाधारक आणि बेकायदा विक्रेते मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची विक्री करतात. यासाठी शेजारील केंद्रशासित प्रदेशांमधून तस्करी केली जाते. कारवाई टाळण्यासाठी तस्कर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मद्यसाठा आणून ठेवतात. आवश्यकतेनुसार नाशिकसह इतर ठिकाणी मद्यपुरवठा केला जातो. या माहितीच्या आधारे कळवण भरारी पथकाने केळीपाडा सुरगाणा तालुक्यातील पांगारणे शिवारात छापा मारला असता तब्बल एक लाख नऊ हजार ५६० रूपयांचा मद्यसाठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गवताच्या गंजीत लपविलेला आढळला. यात ३१२ बाटल्यांच्या ३६ बॉक्सचा समावेश आहे. हा मद्यसाठा जेस्सू किसन कणसे या शेतकऱ्याच्या शेतात आढळला असून, या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत पथक तपास करीत आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोहर गरूड, जवान संतोष कडलग, पांडुरंग वाईकर, अवधूत पाटील, वंदना मरकड आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनसाठी एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), शिक्षण संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पुरस्कृत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.

तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाने दि. ३१ ऑक्टोबर २००५ रोजीच्या बैठकीत निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९८२ची पेन्शन योजना रद्द केली व डीसीपीएस योजना लागू केली. या निर्णयाला महाराष्ट्र कायदे मंडळाची मान्यता मिळालेली नसताता किंवा कोणताही प्रस्ताव सभागृहात पारित झाला नसतानाही अंशदायी पेन्शन योजना जबरदस्तीने थोपण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या योजनेच्या कायदेबाह्य सक्तीमुळे १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षक, शिक्षकेतरांकडून व्यक्त केली जात आहे. या आंदोलनातून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी नीलेश ठाकूर, मंगेश सूर्यवंशी, संजय देसले, दिनेश अहिरे, अशोक सोमवंशी आदी उपस्थित होते.

१७ मेपासून लाँग मार्च

प्रशासनाने त्वरित आंदोलनाची दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा १७ मेपासून शहापूर ते आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब लाँग मार्च काढतील, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला. त्यानंतरही लेखी आश्वासन न मिळाल्यास या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी ६५१ मतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५१ मतदार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी केले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत, तर माघारीची मुदत ७ मेपर्यंत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधान परिषदेच्या राज्यातील सहा मतदारसंघांमध्ये शुक्रवारपासून (२० एप्रिल) आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघांसाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणूकप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. निवडणूक जाहीर होताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, तहसीलदार गणेश राठोड उपस्थित होते. विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक व मालेगाव महापालिकेचे २१६ मतदार असतील. मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड नगर परिषदेचे मिळून २१७ मतदार आहेत. पेठ, सुरगाणा, देवळा, कळवण, दिंडोरी आणि निफाड नगर पंचायत समितीचे एकूण ११४ मतदार आहेत. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे १६, जिल्हा परिषदेचे ७३ आणि पंचायत समितीचे सभापती (पदसिद्ध सदस्य) १५ असे एकूण ६५१ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात. यात मतदारांची संख्या कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्यासाठी मुदत : २६ एप्रिल ते ३ मे

छाननी : ४ मे

अर्जमाघारीची तारीख : ७ मे

निवडणूक : २१ मे (सकाळी ८ ते दुपारी ४)

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंख्या

नाशिक महापालिका १२७

मालेगाव महापालिका ८९

मनमाठ नगर परिषद ३५

येवला नगर परिषद २८

नांदगाव नगर परिषद २०

सटाणा नगर परिषद २२

सिन्नर नगर परिषद ३२

इगतपूरी नगर परिषद २१

भगुर नगरपरिषद २०

त्र्यंबक नगर परिषद २०

चांदवड नगरपरिषद १९

पेठ नगरपंचायत १९

सुरगाणा नगर पंचायत १९

देवळा नगर पंचायत १९

कळवण नगर पंचायत १९

दिंडोरी नगर पंचायत १९

निफाड नगर पंचायत १९

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड १६

जिल्हा परिषद ७३

पंचायत समिती सभापती १५

एकूण ६५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बलात्काराच्या घटनांनी देशाची बदनामी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशातील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने जगभरात देशाची बदनामी होत आहे. अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शने होत असून, संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी यांनी देखील याबाबत उचित पावले उचलून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मात्र देशातील भाजप सरकार व त्यांचे मंत्री बलात्कारातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी रॅली काढत आहेत. हे खेदजनक असल्याचे सांगत आमदार असिफ शेख यांनी कठोर शब्दात केंद्र शासनावर टीका केली.

येथील जमाते-ए-उल्मा संघटनेच्या वतीने देशभरातील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेख बोलत होते. कॅम्प रस्त्यावर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, नगरसेवक अस्लम अन्सारी, गिरीश बोरसे, मौलाना हमीद जमाली, शाकीर शेख, हाफीज अनिस अजहर, कारी अकलाख अहमद, सोहेल अहमद, इस्माईल जमाली आदीसह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शेख यांच्यासह विविध मौलानांनी केलेल्या भाषणातून बलात्कार घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बलात्कारात बळी पडलेल्या मुलीना न्याय मिळावा अशी मागणी करणारे फलक लक्षवेधी ठरले. यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगराध्यक्षपदीनूरजहाँ पठाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नुरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त पदावर पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भांमरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम बघितले. पठाण यांच्या अर्जावर सूचक म्हणून अलका पवार तर अनुमोदक म्हणून राजाभाऊ शेलार यांच्या सह्या होत्या. नगराध्यक्ष मुकुंद होळकर, मुख्याध्याधिकारी किशोर चव्हाण, अनिल कुंदे, किरण कापसे, जावेद शेख, आंनद बिवलकर, बसपाचे जिल्हाध्यक्ष आसीफ पठाण उपस्थित होते. नगरपंचायतीवर शिवसेना-भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्षाकडून ठरल्याप्रमाणे या वेळी नगराध्यक्ष सेनेचा तर उपनगराध्यक्ष भाजपचा होता. मात्र वाघ यांचे निधन झाल्याने उर्वरित काळासाठी पठाण यांना संधी चालून आली. पठाण यांनी सुरुवातीपासून सेना-भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ एक नगरसेवक असूनही या पक्षाला उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण यांच्या त्या आई आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसगत झालेल्याशेतकऱ्यांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून गंडा घालताना फसवणुकीचे आजवर अनेक प्रकार समोर आले आहेत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिलेले 'धनादेश' न वटल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येवला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवारी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले. येवला बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, सचिव डी. सी. खैरनार तसचे संचालक मंडळाने उपोषणस्थळी भेट दिली. येत्या ३० एप्रिलपर्यंत संबंधित व्यापाऱ्याकडून पैसे परत मिळवून देवू असे लेखी आश्वासन दिले.

अंदरसूल उपबाजार आवारातील राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाऱ्याने दिलेले धनादेश बँकांमार्फत शेतकऱ्यांना परत मिळाले. या सर्व प्रकारातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याचे 'पेमेंट' मिळावे यामागणीसाठी शुक्रवारी उपोषण सुरू केले होते. जवळपासू ६० शेतकऱ्यांची या प्रकरणी फसवणूक झाली आहे. धुमाळ यांनी दिलेले धनादेश हे 'बाऊन्स' झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी येवला सहाय्यक निबंधक यांना लेखी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. संपत आहेर, जगन्नाथ एंडाईत, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे आदी शेतकरी उपोषणासाठी बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे आग;तीन झोपड्या खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रुई (ता. निफाड) येथील मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या तीन झोपड्या शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाल्या. यात जीवित हानी टळली असली तरी मजुरांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

रुई येथे मराठवाडा जलद कालवा व नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्यामधील जागेत काही शेतमजूर झोपडी बांधून राहत होते. हे मजूर शेतात कामाला गेलेले असताना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झोपडीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक वायरच्या शॉर्टसर्किटमुळे झोपड्यांनी अचानक पेट घेतला. यात संजय जगन माळी, शंकर वामन सोनवणे, जगन रामा माळी या तिघांच्या झोपड्यांसह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. तलाठी किरडे यांनी पंचनामा केला असून, प्रत्येकी सहा हजारांचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. तिन्ही झोपड्यांतील कुटुंब उघड्यावर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी साखळी

$
0
0

सकल मराठा समाजातर्फे

मानवी साखळी

पंचवटी : मुली-महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंचवटी कारंजा येथे शनिवारी मानवी साखळी तयार करण्यात आली. सकल मराठा बहुजन मराठा समाजातर्फे ही मानवी साखळी करण्यात आली. यात योगेश कापसे, पद्माकर इंगळे, बापू पवार, मंगेश कापसे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी नांदत नसल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नी नांदत नाही. माहेरी गेल्यानंतर मुलांनाही परत पाठवत नाही. पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा होत नसल्याने नैराश्याने ग्रासलेल्या एकाने शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास शहर पोलिस आयुक्तालयात घडली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून, संबंधित व्यक्तीविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश देवानंद सोनवणे (रा. शिवाजीनगर, सातपूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे विवाहित असून, त्यांना मुलेही आहेत. मात्र, सात ते आठ महिन्यांपूर्वी काही कारणांमुळे त्यांची पत्नी पिंपळगाव येथे माहेरी निघून गेली. ती माहेरी मोलमजुरीचे काम करते, तर सोनवणे सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. माहेरी गेलेल्या पत्नीस अनेकदा विनंती करूनही ती नांदण्यास तयार झाली नाही. तिने मुलानांही पाठविले नाही. या कालावधीत सोनवणे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्जफाटे केले. मात्र, पती-पत्नीच्या वादात पोलिसच नव्हे, तर कोर्टही सहसा सहभागी होत नाही. सोनवणे यांच्याबाबतही तेच झाले.

सोनवणे यांची पत्नी शनिवारी सातपूर पोलिस ठाण्यात पोहोचली. या सर्व नैराश्यातून रॉकेलचा डबा घेऊन सोनवणे पोलिस आयुक्तालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचल्याबरोबर त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी सोनवणेंना अटक करून त्यांच्याविरोधात कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल केला. निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की पती-पत्नीच्या नैराश्यातून हा प्रकार घडला आहे. पत्नी नांदण्यास तयार नसल्याने, तसेच मुलेही पाठवीत नसल्याने संशयिताने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनवणे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पोलिस आयुक्तालयात सकाळच्या सुमारास चांगलाच गोंधळ उडाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्या बिनविरोध

$
0
0

पश्चिमचे सभापतिपद मनसेकडे; तर पूर्व, पंचवटीत भाजपकडे सभापतिपद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या तीनही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. नाशिक पश्चिममध्ये मनसेच्या अॅड. वैशाली भोसले यांची, तर नाशिक पूर्वमध्ये भाजपच्या सुमन भालेराव यांची बिनविरोध निवड झाली. पंचवटीतही भाजपच्या पूनम धनगर यांची बिनविरोध झाली. त्यामुळे सहा प्रभाग समित्यांपैकी भाजपकडे तीन, मनसेकडे दोन तर शिवसेनेकडे एक प्रभाग समिती गेली आहे.

शनिवारी नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम या तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक झाली. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपच्या सुमन भालेराव यांचा एकमेव अर्ज आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी यांनी भालेराव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नाशिक पश्चिममध्ये कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी, मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या बळावर मनसेने पश्चिमचे सभापतिपद मिळवले आहे. या ठिकाणी अॅड. वैशाली भोसलेंचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. पंचवटीतही भाजपच्या पूनम धनगर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तीन सभापतिपदांच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडीची औपचारिकता शनिवारी पूर्ण करण्यात आली.

सहा प्रभाग समित्यांपैकी तीन सभापतिपद भाजपने राखले असून दोन मनसे, तर एका ठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images