Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुर्मिळ सुवर्णक्षण 'पडद्या'आड!

$
0
0
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची केवळ १०२ दुर्मिळ छायाचित्रे आणि फक्त चार ऐतिहासिक माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

‘ते’ गेले...‘साहेबां’चे नाव दिले!

$
0
0
‘ईस्टर्न फ्री वे’ला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केल्यानंतर शिवसैनिक खडबडून जागे झालेले दिसताहेत. म्हणूनच बहुधा, नाशकातल्या शिवसैनिकांनी आज कुणाच्याही आदेशाची, परवानगीची वाट न पाहता, तिथल्या इतिहास संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन टाकलंय.

बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली असून उर्वरित फरार झालेल्या दोघा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

बसशेडला लागली गळती

$
0
0
उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुंमध्ये प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनातर्फे शहरभर निवारा शेड उभारण्यात आले आहेत. बस येईपर्यंत प्रवाशाला उन-पाऊस लागू नये हा शेड उभारण्यामागचा मुख्य हेतू असतो; परंतु सद्यस्थितीत शहरातील अनेक निवारा शेडची प्रचंड दूरवस्था झाली आहे.

शिक्षण क्षेत्रात हवा दिशादर्शक बदल

$
0
0
सध्या भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक शिक्षण क्षेत्रात होत आहे. परंतु ही गुंतवणुक योग्य पद्धतीने व योग्य अभ्यासक्रमांसाठी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचा विचार करता ना‌शिकमध्ये शैक्षणिक क्षेत्रात बदल घडविण्यासारखे वातावरण तर आहेच परंतु क्षमताही आहे.

नाशिकची वाटचाल महानगराकडे

$
0
0
नाशिक जिल्ह्याची आताची लोकसंख्या साठ लाख इतकी आहे. २०५०पर्यंत ही लोकसंख्या सव्वा कोटीवर जाणार आहे. शहरीकरणाची टक्केवारी ५८ इतकी आहे. यात नाशिक शहराचा विकास वेग सर्वाधिक आहे.

उद्योग विश्वाला हवे पाठबळ

$
0
0
मंत्रभूमी असलेले नाशिक औद्योगिकदृष्ट्याही विकसित झाले आहे. नाशिकमधील या क्षेत्राची क्षमता लक्षात घेता विकासाला प्रचंड वाव आहे. पैठणी, वाइन, टेक्सटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कृषी प्रक्रिया यासारख्या उद्योगांची भरभराट होण्यास मोठा वाव आहे.

आरोग्य विद्यापीठाची P hD एण्ट्रन्स २५ ऑगस्टला

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत विविध शाखांच्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २५ ऑगस्टला होणार असून मेडिकलचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

खडसेंच्या सुरक्षा ताफ्यातील जीपला अपघात

$
0
0
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सुरक्षा पथकातील पोलिस जीपला राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यामध्ये जीपमधील चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

नियमाप्रमाणे भत्ते द्या

$
0
0
केंद्र सरकारच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स एलिमेंन्ट्री लेव्हल उपक्रमांतर्गत राज्यात २८ शासकीय व खाजगी संस्थांमार्फत ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये चालविले जाते.

जळगावात २५ लाखांची घरफोडी

$
0
0
आदर्शनगरात बंद बंगल्याचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील सोने, चांदीचे दागिने रोकड असा २५ लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी रात्री तीर्थयात्रेला गेलेले बंगल्याचे मालक परतल्यावर ही बाब उघडकीस आली.

डॉ. जैन हत्याप्रकरणी दिलीप जैनला अटक

$
0
0
अत्यंत गुंतागुतीचे प्रकरण ठरलेल्या डॉ. रमणलाल जैन हत्याप्रकरणी दिलीप फुलचंद जैनला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

वसाकाच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष डॉ. डी. एस. आहेर व शांताराम तात्या आहेर यांच्यात कामगार आंदोलनप्रश्नी जोरदार खडाजंगी झाली.

मनमाड रेल्वे स्टेशनवरील पूल लवकरच

$
0
0
चार वर्षापासून मनमाड रेल्वे स्टेशनवरील अर्धवट असलेल्या नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकरच पूर्ण होईल. परंतु या कामासाठी रेल्वेला एक मेगाब्लॉक हवा आहे. त्याला मुख्यालयातून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे.

मूल होत नसल्याने पत्नीचा खून

$
0
0
लग्नाला आठ वर्षे उलटूनही मूल होत नाही, म्हणून पत्नीला विहिरीत ढकलून खून केल्याची घटना मनमाडपासून जवळ खादगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह, दिर, नणंद, मेव्हणा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांत गोसावी यांची तक्रारींमुळे बदली

$
0
0
नाशिकचे प्रांत विनय गोसावी यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. पर्यावरणाची मंजुरी नसताना गौण खनिज उत्खननाचा परवाना देणे, दुसरी बाजू लक्षात न घेता निकाल देणे, अनोळखी व्यक्तीला पासपोर्ट व्हेरिफीकेशन देणे यासह विविध प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या.

फोर्ड एको स्पोर्ट कार 'मोहरीर'मध्ये दाखल

$
0
0
बहुप्रतिक्षित फोर्ड एको स्पोर्ट कार नाशिकमध्ये दाखल झाली असून, मोहरीर फोर्ड दालनात तिचे अनावरण करण्यात आले. मोहरीरचे संचालक प्रकाश मोहरीर यांच्या हस्ते ही कार सादर करण्यात आली.

मैत्रीचा चहा

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील एका पेट्रोल पंपावर बऱ्याच दिवसांनी दोन मित्र एकमेकाला भेटले. दोघे एकमेकाशी बोलत असताना एकाला मोबाईलवर फोन आला. बोलणे झाल्यानंतर पुन्हा दोघे बोलायला लागले. तेवढ्यात दुसऱ्याला आठवण आली की त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात एका कामासाठी जायचे आहे.

दिग्गजांची प्रभावळ अन् नाशिक रायझिंगला बळ

$
0
0
'महाराष्ट्र टाइम्स'चे अनोखे अभियान ठरलेल्या 'नाशिक रायझिंग'अंतर्गत आयोजित केलेल्या सोहळ्याला शहराच्या विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीचे कोंदण लाभले.

निवृत्त मोनाच्या जागी येणार सिम्बा

$
0
0
शहरासह जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचा मागोवा काढून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोना या लॅब्रोडर जातीच्या श्वानाची जागा पुढील सहा महिन्यांत लॅब्रोडर जातीचाच '​सिम्बा' घेणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>