Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनसे नगरसेविका डेरे यांना अटक

$
0
0
सिल्व्हर ओक शाळेमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या अमोल पांडे या कला शिक्षकाला पाठिशी घातल्याचा आरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी गोंधळ घातल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी मनसेच्या नगरसेविका सुजाता डेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबु नागरे यांच्यासह इतरांना सोमवारी अटक केली.

अजिंठा लेणीत वैद्यकीय सुविधा नाही

$
0
0
अख्ख्या जगाला भूर‍ळ पाडणाऱ्या अजिंठा लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांपैकी एखाद्याला अचानक वैद्यकीय मदतीची गरज पडली तर येथे कोणतीही आरोग्य सुविधा उपलब्ध नाही.

४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा

$
0
0
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते १२ सेमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कलेक्टर, आयुक्त हाजीर हो...

$
0
0
शहरातील वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून त्याकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप करीत मानव उत्थान मंचने याविरोधात वरिष्ठ दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे.

सारडा सर्कलवर मोकाट जनावरांचा 'स्पीडब्रेकर'

$
0
0
शहरातील अत्यंत रहदारीच्या सारडा सर्कल परिसरात मुक्त संचार करत असलेली मोकाट जनावरे स्पीडब्रेकर्स ठरत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून अपघतांची संख्या वाढली आहे. मात्र वाहतूक पोलिस व महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.

जड झाले अतिक्रमणाचे ओझे

$
0
0
शहरातील अतिक्रमण काढणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रकार. ज्या सत्ताधाऱ्यांनी ही हिंम्मत दाखवली त्यांना संबंधीत ​अतिक्रमणधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सध्याचे आणि यापूर्वीच्या सर्वच महापालिकेतील सत्ताधिशांनी या जड झालेल्या ओझ्याला फक्त पुढे रेटण्याचेच काम केले आहे.

मध्यरेल्वेच्या वेळापत्रकात बदल

$
0
0
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. यातील काही गाड्या या नेहमीच्या वेळेत धावणार आहेत तर काही गाड्या ५ ते १० मिनिटाच्या उशीराने धावणार आहे. या बदलाबरोबरच दोन नवीन गाड्यांचा समावेश आहे.

'ITI'च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीचे आश्वासन

$
0
0
सुरूवातीपासूनच ठप्प झालेल्या 'आयटीआय' ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आशावादी रहावे, असे आश्वासन सातपूर 'आयटीआय'चे प्राचार्य एन. यु. गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

शाळांच्या सक्तीची पालकांना झळ

$
0
0
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने पालकांची खरेदी-विक्रीची गडबड सुरू झाली आहे. खासगी शाळांमधून तर त्यांनी ठरवून दिलेल्या दुकानांमधूनच साहित्य घेण्याची सक्ती होत असल्याने पालकांच्या खिशाला चंदन लागत आहे.

रेल्वेस्थानकाबाहेरील मोठाले रस्ते खड्ड्यात

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून अनेक दिवसांपासून या खड्डयांमुळे अपघात होत आहेत. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सुरक्षित वाहतूकीसाठी प्रयत्न करणार

$
0
0
नाशिकची दिवसेंदिवस वाढती वाहतूक आणि तिचे नियोजन करण्यास तोकडे पडणारे प्रशासन असे चित्र नेहमीचेच आहे. दररोज होणारे अपघात, रिक्षाचालकांच्या समस्या, स्कूल बस, ट्रान्सपोर्ट अशा सर्वच बाबींमध्ये नियमितता आणण्याचे आव्हान प्रादेशिक परिवहन विभागापुढे आहे.

आरोग्य विद्यापीठाचा 'इंडियन पेटंट लॉ' अभ्यासक्रम

$
0
0
विविध आरोग्य शाखांचे शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता पेटंट विषयाचा अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

'बिटको'मध्ये पालकांचा गोंधळ

$
0
0
जुन्या सीबीएस जवळील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डी. डी. बिटको ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी खिडकीच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे मंगळवारी सकाळी कॉलेज बाहेरील वाहतूक अर्धातास ठप्प होती.

प्रीतम ‘मिस्टर इंटरनेट पॉप्युलर’

$
0
0
मॉडेलिंग क्षेत्रात मिस इंडिया स्पर्धेप्रमाणेच मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मिस्टर इंडिया ग्लोबल२०१२’ या मॉडेलिंगच्या स्पर्धेत नाशिकच्या प्रीतम जुंदरे याने टॉप टेन स्पर्धकांमध्ये मजल मारली होती. मात्र, एका प्रश्नाच्या बाबतीत गोंधळ उडाल्याने तो या स्पर्धेत बाद झाला. याच स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या मिस्टर इंटरनेट पॉप्युलर या स्पर्धेत तो विजेता ठरला.

सटाण्यात तहसील कार्यालयावर मोर्चा

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे सोमवारी सकाळी नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

डाळिंबाच्या झाडांचे केले नुकसान

$
0
0
सरस्वतीवाडी ता. देवळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील शंभर डाळिंबाची झाडे अज्ञात व्यक्तीने उपटून फेकून दिल्याने डाळिंब बागायतदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

$
0
0
बागलाण तालुक्यातील आराई येथील शेतकऱ्याचा बैलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीराम नथू सोनवणे (वय ५९, रा. न्यू प्लॉट आराई ) असे त्यांचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. श्रीराम सोनवणे यांनी आपल्या घराजवळ बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी सोडले.

खंडणीप्रकरणी एकाला अटक

$
0
0
अॅण्टीकरप्शन ब्युरोमध्ये तुमच्याविरुद्ध तक्रार असून हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या संशयिताला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मनमाड येथे व्यापार व शेती करणारे रामदास आहेर यांना सुदर्शन चंदनशिव याचा १९ जूनपासून फोन येत होता.

ग्रामीण भागातील वीजप्रश्न त्वरित सोडवा

$
0
0
ग्रामीण भागातील काही गावांमध्ये नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांना सांगूनही दखल घेतली जात नाही.

हुज्जत महागात पडली !

$
0
0
हुज्जत घालणे काही व्यक्तींचा स्वभाव बनतो. नको तिथे आणि नको त्यांच्याशी हुज्जत घालणे हे कधी चांगलेच महाग पडू शकते. कोणत्याही बसस्थानकावर खिडकीतून एसटीत रूमाल टाकण्याचा प्रकार नवा नाही. एका महाशयांनी अशीच रूमाल टाकून जागा पकडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images