Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विमानसेवेबाबत संघटनांची बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विमानसेवेसंदर्भात नाशिकमधील सर्व संस्था-संघटनांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यासाठी 'निमा'ने पुढाकार घेतला असून, या बैठकीत विमानसेवा यशस्वी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईसाठी सेवा सुरू झाली, तर पुणे सेवा बंद पडली. आता दुसऱ्या टप्प्यात नवी दिल्ली शहरासाठी सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात निमा हाउसमध्ये बैठक होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात सर्व संघटनांची बैठक होईल. विमानसेवा यशस्वी करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेतले जातील, अशी माहिती 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली. पावसाळी पर्यटनासाठी ही सेवा उत्तम असून ती यशस्वी होईल, असा विश्वास 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला. जेट एअरवेज या आघाडीच्या विमान कंपनीने बोइंग विमानाद्वारे थेट दिल्ली ते नाशिक ही सेवा आठवड्यातून तीन दिवस देण्याचे जाहीर केले आहे, हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वास आहे. तो सार्थ ठरणे आवश्यक आहे. या सेवेला प्रतिसाद लाभण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दिल्ली बरोबरच अन्य शहरांसाठीही येत्या काळात सेवा सुरू होणार आहेत. या सर्व सेवांना प्रतिसाद कसा लाभेल, विनानसेवेची माहिती सर्वांपर्यंत कशी जाईल, नाशिकहून ओझरला विमानतळावर जाण्यासाठीची सुविधा, विमानतळ टर्मिनल येथील विविध सुविधा याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. जेट एअरवेजने नाशिक ते दिल्ली ही सेवा येत्या १५ जूनपासून देण्याची घोषणा केली आणि त्याचे बुकिंग १४ मेपासून सुरू केले आहे. एका दिवसातच कंपनीला बुकिंगसाठी मोठा प्रतिसाद लाभल्याचे सूत्रांनी सांगितले.

(सिटिझनशेजारी डीप सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवा बैठक- वापरली

$
0
0

विमानसेवेसाठी संघटनांची बैठक

--

निमाचा पुढाकार

--

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

--

विमानसेवेसंदर्भात नाशकातील सर्व संस्था-संघटनांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. यासाठी उद्योग संघटना असलेल्या निमाने पुढाकार घेतला असून त्यात विमानसेवा यशस्वी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईसाठी सेवा सुरू झाली. तर, पुणे सेवा बंद पडली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नवी दिल्ली शहरासाठी सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक निमा हाऊसमध्ये होणार आहे. निमाने या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. जेट एअरवेज या आघाडीचे विमान कंपनीने बोींग विमानाद्वारे थेट दिल्ली ते नाशिक ही सेवा आठवड्यातून तीन दिवस देण्याचे जाहिर केले आहे. हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वास आहे. तो सार्थ ठरणे आवश्यक आहे. या सेवेला प्रतिसाद लाभण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दिल्ली बरोबरच अन्य शहरांसाठीही येत्या काळात सेवा सुरू होणार आहेत. या सर्व सेवांना प्रतिसाद कसा लाभेल, विनानसेवेची माहिती सर्वांपर्यंत कशी जाईल, नाशिकहून ओझरला विमानतळावर जाण्यासाठीची सुविधा, विमानतळ टर्मिनल येथील विविध सुविधा याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.

--

दिल्लीसाठी बुकींग जोरात

जेट एअरवेज कंपनीने नाशिक ते दिल्ली ही सेवा येत्या १५ जूनपासून देण्याची घोषणा केली आणि त्याचे बुकींग १४ मे पासून सुरू केले आहे. एका दिवसातच कंपनीला बुकींगसाठी मोठा प्रतिसाद लाभल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर, ट्रॅव्हल एजंटने त्यांच्याकडील ग्राहकांसाठी या सेवेचे बुकींग सुरू केले आहे. पावसाळी पर्यटनासाठी ही सेवा उत्तम असून ही सेवा यशस्वी होईल, असा विश्वास तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला आहे.

--

खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात सर्व संघटनांची बैठक होईल. विमानसेवा यशस्वी करण्यासाठी या बैठकीत विविधनिर्णय घेतले जातील.

- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी सापडली तब्बल सहा वर्षांनंतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहन क्रमाकांचा संशय आल्याने पोलिसांनी थांबवलेल्या तरुणाची दुचाकीच चोरीची असल्याची बाब समोर आली आहे. ही दुचाकी तब्बल सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेली होती. पोलिसांनी संशयित तरुणास ताब्यात घेतले.मात्र, त्यास चोरीची दुचाकी विकणारा चोरटा फरार आहे.

क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकातील पोलिस नाईक नितीन भालेराव आणि शिपाई जयंत शिंदे यांना पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोलिंग करताना मनीष भारत रणबावळे (२१, रा. मेट्रोझोन समोर, पाथर्डीगाव ते इंदिरानगररोड) याची दुचाकी त्यांच्या नजरेस पडली. दुचाकीची नंबर प्लेट संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास हटकले. आपण ही दुचाकी पेठ येथील मित्र मनोज घुमल याच्याकडून विकत घेतल्याचे मनीषने पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरटीओकडे चौकशी केली असता दुचाकीचा मूळ मालक सापडला. ती दुचाकी २०१२ मध्ये चोरीस गेली असून, त्याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती मालकाने दिली. पोलिसांनी मनीषसह दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकीची विक्री करणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांचा गुटखा भद्रकालीमध्ये जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील फुले मार्केट येथील नॅशनल सुपारी या दुकानात छापा मारून पोलिसांनी तीन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.

शेख सलीम शब्बीर असे संशयित व्यावसायिकाचे नाव आहे. भद्रकाली परिसरात गुटखा आणि बंदी असलेल्या सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांना मिळाली. त्यानुसार नखाते यांनी ही माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल तसेच उपायुक्त विजयकुमार मगर यांना कळवून सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. दुकानात तसेच खडकाळी सिग्नलजवळील गोडावूनमधून अवैध गुटखा आणि सिगारेटची विक्री व साठा असल्याचे आढळून आले. त्यानुसार, नखाते यांनी भद्रकाली स्टेशनचे एका पथकास आणि अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी, किशोर बावीस्कर यांना पाचारण केले. या अधिकाऱ्यांनी संपूर्ण मालाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी माल ताब्यात घेतला.

सदर कारवाई दरम्यान विमल, हिरा, रॉयल, वाह, राजनिवास, आरएमडी, सिमला, मिराज या विविध कंपन्यांचा तीन लाख १४,१९० रुपयांचा गुटखा पानमसाल, आणि १८ हजार रुपयांचे सिगारेट आढळून आले. मुद्देमाल जप्त करीत संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कोटपा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे संदीप पवार, अनिल भालेराव, बोडखे, वाल्मिक पाटील यांच्यासह भद्रकाली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली.

पोलिस आयुक्तांचे राज्यमंत्र्यांकडून अभिनंदन

तंबाखू मुक्त समाजासाठी 'जॉईन द चेंज- टोबॅको फ्री सोसायटी' हा उपक्रम हाती घेणाऱ्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी ट्विटरद्वारे अभिनंदन केले. समाजासाठी नेहमीच सत्कार्य करण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. सिंगल यांचे अभिनंदन, अशा शब्दात गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या भावना ट्विटद्वारे व्यक्त केल्यात. यापूर्वी पोलिस आयुक्तांनी राबवलेली 'नो हॉकिंग डे' ही योजना रणजीत पाटील यांनी राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लामकानी गावात सतरा वर्षांपूर्वीच पाणलोट व कुरण विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी तरुणांनी श्रमदानासाठी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला तर निश्चित दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आपण साकारू, असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.

पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेय जयते वॉटर कॅप स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील ७५ तालुक्यांनी सहभागी घेतला असून, त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्याचा समावेश आहे. त्यापैकी लामकानी गावात या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. या कामाच्या पाहणीसाठी आमिर खान, त्यांची पत्नी किरण राव यांनी लामकानी गावाला भेट दिली. गावाने विकसित केलेल्या गोवर्धन पर्वतावरील कुरण विकास, विविध उपक्रमाची त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्ह्यातर्फे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार अमोल मोरे, डॉ. धनंजय नेवाडकर, सरपंच धनंजय कुवर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आती क्या लामकानी…’
गावकऱ्यांच्या विविध प्रश्नांना आमिर खान यांनी उत्तरे दिली. त्यामध्ये गावाबद्दल सांगताना, लामकानीत यानंतरही येत राहणार. शुटिंगसाठी नाहीतर माझ्या आनंदासाठी मी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. …पाण्यात राजकारण आले नाही पाहिजे. पाण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तरच आपण गावाला पाणीदार करण्यात यशस्वी होऊ, असेही खान म्हणाले. याप्रसंगी अमीर खान यांनी ‘आती क्या खंडाळा’ या गीताच्या तालावर ‘आती क्या लामकानी’ हे गीत म्हटले. त्याला त्यांच्या पत्नी किरण राव यांनीही त्यांना प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापा-यावर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्स कंपनीचा व्यापारी शिवाजी नारायण सूर्यवंशी यांच्याविरुद्ध येथील तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सूर्यवंशी याने ७७७ शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना २ कोटी ८७ लाख ६६ हजार ५९८ रुपये न देता फसवणूक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमृत्यू रोखण्यासाठी मिशन

$
0
0

झेडपीत कार्यशाळा; सीईओ डॉ. नरेश गितेंकडून मार्गदर्शन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या बालमृत्यू अन्वेषण कार्यशाळेप्रसंगी मारदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू अन्वेषण कार्यशाळा गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच बालमृत्यू अन्वेषणाचा छापील नमुना भरण्यासाठी बुधवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. गिते म्हणाले, की प्रत्येक डॉक्टरांनी आपली मानसिकता बदलून रुग्णाविषयीचा कठोरपणा कमी केला तर नक्कीच बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल. तसेच सत्य हे कायम महत्त्वाचे असते याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांना त्यांच्या बालमृत्यू अहवालाबाबत विचारणा केली असता खरे बोलले तर कोणतीही कारवाई होणार नाही. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी(बाह्यसंपर्क), अति. जिल्हा आरोग्य अधिकारी इ. मार्गदर्शन करण्यास उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय), तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इ. उपस्थित होते.

सिटीसी करून घ्या

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सुरगाणा, कळवण, नाशिक यांनी त्यांच्या तालुक्याची माहिती दिली. याबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सिटीसी सुरू करावयाची आहे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे ग्रामबालविकास केंद्राबाबतचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

छापील नमुना त्वरित भरा

बालमृत्यू अन्वेषणाचा छापील नमुना बालमृत्यू झाल्यास त्वरित भरावा, तसेच बाल अन्वेषण नमुन्यात आपल्या जिल्ह्याबाबत काही अतिरिक्त माहिती समाविष्ट करावयाची असल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी समिती स्थापन करावी तसेच पूर्ण छापील नमुन्यात बदल करून ऑनलाइन करण्यात यावा, असे डॉ. गिते यांनी सांगितले. अन्वेषणाचा पूर्ण छापील नमुना ऑनलाइन करून घेऊन, त्यामध्ये रस्ते, औषधे वगैरे बाबत समस्या असल्यास त्या कशा दूर होतील याबाबतची अतिरिक्त माहिती अद्यावत करावी, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजानसाठी वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रमजानचा महिना आजपासून सुरू होत असून, मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कालावधीत भद्रकालीसह, दूधबाजार, चौकमंडई, फाळके रोड परिसरात उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बांधवांची गर्दी होते. त्यामुळे १७ मे ते १६ जून या कालावधीत पोलिसांनी या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.

या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसात या वेळेत या बदलाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. दूधबाजार चौक ते महात्मा फुले मार्केट, मौलाबाबा दर्गापर्यंतच्या रस्त्यावर आतमध्ये जाण्यासाठी दूधबाजार चौक येथून व महात्मा फुले मार्केट मौलाबाबा दर्गा येथून सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले पोलिस चौकी येथून चौक मंडई-फाळके रोड टी पॉइंट चौक या रस्त्यावरून ये-जा करण्यास वाहनांना बंदी असणार आहे. बादशाही कॉर्नर येथून दूधबाजाराकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने जुने भद्रकाली टॅक्सी स्टँड येथून पिंपळचौक मार्गे त्र्यंबक पोलिस चौकी व गाडगे महाराज पुतळ्यामार्गे जाऊ शकणार आहेत. तसेच फाळकेरोड टी पॉइंट येथून महात्मा फुले मार्केट, मौलाबाबा दर्गाकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कल-गंजमाळ-खडकाळी सिग्नल-त्र्यंबकनाका पोलिस चौकी-पिंपळचौक मार्गे इतरत्र जाऊ शकेल. महात्मा फुले चौक येथून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक ही द्वारका सर्कल व टाळकुटेश्वर पूलमार्गे इतरत्र जाऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सतरा पक्के गाळे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दोनच दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती दिल्यानंतर बुधवारी सिडकोच्या जागेवर असलेली सतरा दुकाने महापालिकेने अतिक्रमित म्हणून जमीनदोस्त केली.

शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात मोहीम सुरू केली आहे. पालिकेकडून आतापर्यंत रस्त्यात अडथळा ठरणारे किंवा तक्रारी आलेले अतिक्रमण काढले जात होते. मात्र, बुधवारी सिडकोच्या प्लॉटवर असलेले दुकानांचे अनधिकृत बांधकामही महापालिकेने पाडल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी चौकात सिडको प्रशासनाच्या जागेत सतरा दुकाने उभी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून ही दुकाने याठिकाणी सुरू असून, काहीजणांनी या प्लॉटसाठी सिडकोकडे पैसेही भरले होते. काहींचा न्यायालयात दावाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सिडकोकडे पैसे भरून ही जागा विकत घेण्यात येणार होती. मात्र, पालिकेने ही अनधिकृत बांधकामे असल्याचे सांगून ती जमीनदोस्त केली. सिडको प्रशासनाकडून जागा खरेदी केलेली असतानाही बांधकामे पाडण्यात आल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. सिडकोने जरी ही जागा विक्री केली असली तरी हे अनधिकृत असून, हे बांधकाम पाडले जाणारच असल्याचा पावित्रा महापालिकेने घेतला होता. यावेळी सुरुवातीला काही प्रमाणात नागरिकांनी विरोधही केला. परंतु, महानगर पालिकेने पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

पक्क्या बांधकामांकडे लक्ष

सिडको परिसरातील भामरे मिसळ ही अत्यंत प्रसिद्ध असून हे दुकानही जमीनदोस्त करण्यात आल्याने सिडको परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली हेाती. सिडकोतील अनधिकृत पक्‍की बांधकामेही रडारवर असल्याचे यावरून दिसून आले. पक्‍क्‍या घरांबाबत पालिका काय निर्णय घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरीच्या दर्शनासाठी तीन गावांची सामूहिक जत्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी सिन्नर तालुक्यातील तीन गावे दरवर्षी सोबतच बाहेर पडतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाळण्यात येणाऱ्या या प्रथचे पालन सिन्नर तालुक्यातील प्रतिजेजुरी मानाले जाणारे मऱ्हळ बु., मऱ्हळ खुर्द आणि सुरेगाव या तीन गावातील ग्रामस्थ करत आहेत. यंदाही या तीनही गावांचे ग्रामस्थ एकत्रितपणे जेजुरीच्या दर्शनाला गेले आहेत.

सन १९३६ सालापासून या आगळ्या वेगळ्या प्रथेचे पालन ग्रामस्थ नियमाने करत आले आहेत. सुमारे पाच ते सात वर्षांनंतर ही एकत्रित दर्शन यात्रा आयोजित केले जाते. यंदा या यात्रेसाठी पाच दिवसांचे पूर्वनियोजन करून या तीनही गावातील ग्रामस्थ यात्रेला निघाले आहेत. या गावांमधील तरुण देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात शिक्षण वा नोकरी निमित्ताने कार्यरत आहेत. ही मंडळीही या कालावधीत या यात्रेत आवर्जून सहभागी होते. यंदाही या सामूहिक जेजुरी दर्शन यात्रेस ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

अशी पडली प्रथा

सन १९३६ साली दामोदर नानासाहेब देशमुख या प्रतिष्ठित ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातील भाऊ पाटील, गोविंदराव ईलग, बाळकृष्ण म्हस्के, देवराम कुऱ्हे आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यावेळी बैलगाडीद्वारे दहा दिवसांची जेजुरी यात्रा केली. यानंतर पुन्हा सन १९७६ मध्ये ही यात्रा पार पडली. तेव्हापासून दर पाच ते सात वर्षाच्या कालावधीनंतर ग्रामस्थ ही प्रथा नियमाने पाळतात.

पावणेसहाशे वाहनांचा ताफा

तीनही गावातील ग्रामस्थ यात्रेला जातात त्यावेळी गावाच्या रक्षणासाठी तात्पुरती पोलिस चौकी कार्यरत करण्यात येते. यंदा ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत एक पोलिस चौकी आणि १२ पोलिस गावांच्या रक्षणासाठी तैनात आहेत. ५० तरुण मोटारसायकलने ही यात्रा पूर्ण करतात. यंदा या यात्रेच्या ताफ्यात ५८६ वाहने आहेत. या यात्रेच्या प्रवासत संगमनेर , नारायणगाव, आळंदी, पुणे, जेजुरी, देहू आदी ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. या यात्रामार्गात सुमारे दहा पोते भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यात्रामार्गावर खंडोबाची भजने , भक्तीगीत गाऊन आणि सामूहीकरित्या स्वयंपाक करून खंडोबाचा जागर झाल्याने यात्रेत चैतन्य आल्याचेही यात्रेकरू सांगतात.

... म्हणून मऱ्हळचे महत्व

श्री खंडोबाने बाणाईसोबत चंदनपुरी येथे विवाह केला. ते जेव्हा पुन्हा जेजूरी येते जाण्यासाठी निघाले तेव्हा परतीच्या मार्गावर त्यांनी मऱ्हळ येथे मुक्काम केला. यामुळे ग्रामस्थांनी येथे श्री खंडेरायाचे मंदिर उभारून चैत्री पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून यात्रोत्सवास सुरूवात केली. मऱ्हळचे श्री खंडेराव देवस्थान नवसाला पावते, अशीही भाविकांची श्रध्दा आहे.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकर महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील रेल्वे कॉलनी भागातील पाणीटंचाई दूर करावी, रेल्वेसाठी तातडीने पाण्याचे आवर्तन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे बुधवारी रेल्वे अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एनआरएमयू संघटनेचे पदाधिकारी, महिला आदी सहभागी झाले. संघटनेतर्फे रेल्वेचे सहाय्यक मंडळ अधिकारी राव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मनमाड शहरासह रेल्वे स्टेशनजवळी कॉलनी परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने पाणीटंचाई संदर्भात तातडीने पावले उचलावीत, अशी परिसरातील नागरिक आग्रही मागणी करत आहेत. मनमाड रेल्वे कॉलनी परिसरात काही दिवसांपासून पाणी प्रश्नाने नागरिक हैराण असून, पंधरा ते सोळा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातच रेल्वे कॉलनीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा साठवणूक तलावातील पाणी संपल्याने पाणी समस्या अधिक उग्र होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, यासह विविध मागण्यांसाठी रेल्वे अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रेल पथ कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. संघटनेचे पदाधिकारी बी. आर. हेगडमल, अंबादास निकम, ए. पी. भारस्कर आदींसह संघटना सदस्य, महिला मोर्चात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकारीच राहणार पालिकेचे दबंग अधिकारी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका व नगरपंचायतमध्ये वर्षभरात नगराध्यक्ष लिहित असलेला मुख्याधिकाऱ्यांचा गोपनीय अहवालाचा अधिकार राज्य सरकारने काढून घेतला आहे. आता असा अहवाल जिल्हाधिकारी लिहिणार आहेत. दीड महिनाभरापूर्वी राज्य ससरकारने जबाबदाऱ्यांमध्ये बदल करीत नगराध्यक्षांचे पंख छाटले होते. आता गोपनीय अहवालाचा अधिकारही काढून घेतल्याने मुख्याधिकारीच नगरपालिकेत आता दबंग अधिकारी म्हणून राहणार आहेत.

वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप सरकारने थेट नगराध्यक्षाची पद्धत लागू करून अध्यक्षांना अधिक अधिकार देण्याचे संकेत दिले. पण, असे अधिक अधिकार सरकारने नव्या नगराध्यक्षांना दिलेले नाहीत. पण, त्यांचे अधिकार कमी केल्याने राज्यभरातील नगराध्यक्षांमध्ये संताप आहे. नगर विकास विभागाने ३१ मार्च २०१८ रोजी नगराध्यक्षांच्या कार्यासंबधातील ५८ च्या पोटकलमात बदल केला. त्यात त्यांचे वित्तीय अधिकार, कार्यकारी प्रशासनावरील अधिकार व लेखे, अभिलेखे यावर नियंत्रण ठेवण्यात बदल केला. तसेच मुख्याधिकारीच्या अधिकार व कर्तव्यासंदर्भातील कलम ७७ पोटकलम १ मधील खंड 'अ'नुसार मुख्याधिकाऱ्याने अध्यक्षाच्या नियंत्रणास, निदेशानस व पर्यावेक्षणास अधिन राहून काम करण्याबबातची तरतूदही वगळण्यात आली. त्यामुळे यापुढे मुख्याधिकाऱ्यांवर नगराध्यक्षांचे कोणतेही नियंत्रण असणार नाही.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात नगरपालिकेतील मुख्याधिकारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. तसेच त्यांचे काम हे सरकारच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. सरकारच्या योजना अंमलबजावणीचे उत्तरदायित्व व शासन आदेश अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर ठेवली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे कामही करता येणार आहे. त्यातच आता गोपनीय अहवालाचा अधिकारही नगराध्यक्षांचा काढून घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरनार पर्वत हे चैतन्यमय स्थान

$
0
0

दत्तभक्त प्रमोद केणे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

 गुजरात येथील जुनागड येथे असलेले दत्तस्थान हे ९ हजार ९९९ पायऱ्या चढवून जाणारी व्यक्ती दिगंबर अवस्थेत जाते. याच अवस्थेत दत्त गुरूंचे दर्शन होते. गिरनार पर्वत हे चैतन्यमय स्थान आहे, असे प्रतिपादन अलिबाग येथील दत्तभक्त प्रमोद केणे यांनी केले.

९७ व्या वसंत व्याख्यानमालेत 'वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यानात ते गिरनार परिक्रमा' या विषयावर बोलत होते.  यशवंतराव महाराज देव मामलेदार पटांगणावर बुधवारी झालेल्या व्याख्यानास रोहिणी नेवासकर, संगीता बाफना आदी उपस्थित होते.  

प्रमोद केणे म्हणाले, की आध्यात्मिक बैठक चांगली असेल तर चमत्कार घडू शकतात, ते चमत्कार माणूस घडू शकत नाही. आपण फक्त कर्म करायची असतात. दत्त दर्शनासाठी अंतरंगात षडरुपी कचरा जाळला गेला पाहिजे. येथे अहंकाराला थारा नाही. गिरनार पर्वतावर जात असताना अनेक स्थान आहेत. पावसाळ्यात हा पर्वत चढून जाणे अवघड असते. गावात असलेल्या स्वयंभू दत्तात्रयाची लहानपणापासून भुरळ घातली होती. शालेय जीवनात दत्तात्रयांच्या चरणी पुष्प अर्पण करून शिष्य झालो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायात तोटा आला. कर्जबाजारी झालो, होतो. त्याच काळात गिरनार पर्वत चढवून दत्त दर्शनाला जात होतो. दर पौर्णिमेला हा पर्वत चढवून जाताना प्रत्येक वेळी वेगवेगळी अनुभूती मिळत गेली. यातील अनेक अनुभव चमत्कार दाखविणारे होते. पहिल्यादा पर्वत चढत असताना पायात प्रचंड वेदना होत असताना  एका वृद्ध व्यक्तीने आधार दिला आणि पर्वत चढून गेलो आणि दत्त दर्शन घेतले.  यावेळी पर्वत चढून जाताना आलेले अनेक अनुभवाचे केणे यांनी  कथन केले.  अरुण शेंदूर्निकर यांनी प्रास्तविक केले. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत येवलेकर यांनी वसंतराव नेवासकर यांच्या कार्याची माहिती दिली. 

लोगो : वसंत व्याख्यानमाला ........... फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन ऑनलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. अनेकदा त्यांच्याकडे इंटरनेट नसते. असले तर चालत नाही किंवा पॅक संपलेला असतो. हे लक्षात घेऊन मार्चपासून रेल्वेस्थानकात मोफत वाय-फाय इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होत आहे.

प्रवाशांना रेल्वेशी संबंधित माहितीसाठी आणि अन्य कामांसाठी ही इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली आहे. भुसावळ कार्यालयाने या सुविधेचा प्रारंभ विभागात केला आहे. विभागातील नाशिकरोडसह इगतपुरी, जळगाव, भुसावळ, मनमाड, अकोला, शेगाव, बऱ्हाणपूर या स्थानकांवरही वायफायची सेवा पुरविली जात आहे. सहा महिन्यांत नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा सर्व्हे करून वायफाय सेवा अधिक हाय-फाय प्रमाणात दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

रेल-टेल कंपनी

रेल्वेची 'रेल टेल' कंपनी आहे. ती गुगलच्या मदतीने देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांत वायफाय सेवा देत आहे. दिल्ली व मुंबईहून या सेवेचे नियंत्रण होते. नाशिकरोडच्या वाय-फायसाठी मनमाड ते कल्याण नेटवर्कमधून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नाशिकरोडचे अधिकारी-कर्मचारी या सेवेचे काम बघतात. इगतपुरी ते पाचोरादरम्यान वाय-फायला समस्या निर्माण झाली, तर हे कर्मचारी ती सोडवतात. कमी गर्दीच्या, लहान स्थानकांमध्ये ही सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांचा सर्वे त्यासाठी सुरू आहे. नाशिकरोड स्थानकातून दिवाळी व उन्हाळी सुटीत वीस हजार प्रवाशी दररोज प्रवास करतात. वायफाय सेवेचा लाभ हजारो प्रवाशांना होत आहे.

असे चालते वाय-फाय

वायफायसाठी तीस अॅक्सेस पॉइंट म्हणजेच हॉटस्पॉट नाशिकरोड स्थानकात बसविण्यात आले आहेत. दोन फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये एकूण चार हॉटस्पॉट आहेत. रिझर्व्हेशन, तिकीट बुकिंग, व्हीआयपी रूम, सेकंड क्लास वेटिंग रूम, चार प्लॅटफार्म आदी ठिकाणी हॉटस्पॉट लावलेले आहेत. ५० बाय ३० मीटर अशी एका हॉटस्पॉटची रेंज आहे. या रेंजमध्ये जेवढे मोबाइल, लॅपटॉप आदी डिव्हाइस असतील, त्यांना ती इंटरनेट सेवा देते. सर्व हॉटस्पॉट ऑप्टिकल फायबर केबलने हबला जोडले आहेत. हे हब मुंबईशी कनेक्ट आहे. रेल्वेस्थानकात मोबाइल टॉवर आहे, पण तो मोबाईल सेवेसाठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा, दुचाकींचे नाशिकरोडला नुकसान

$
0
0

जेलरोड : देवळालीगाव राजवाडा येथील इंदिरानगरमध्ये मंगळवारी रात्री समाजकंटकांनी आठ रिक्षांचे हुड फाडले, तसेच आठ ते दहा दुचाकींच्या सीटवर ब्लेडचे वार केले. जावेद खान, पप्पू साबळे, मुरली घोरपडे, अजिंक्य भालेराव, अंतू साबळे, संदीप साबळे, फिरोज यांच्या रिक्षांचा समावेश आहे. मालधक्का, फुलेनगर येथील भिका शिंदेंचा बोकड चोरला. दुसरा बोकडा पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. परिसरात सीसीटिव्हीमध्ये समाजकंटक टिपले गेले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समिती कर्मचाऱ्यांचा एल्गार

$
0
0

पदोन्नती देण्यास टाळाटाळ; उपनिबकांना निवेदन देत 'काम बंद'चा इशारा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मंजुरी देऊनही संचालक मंडळ पदोन्नती व कालबद्ध पदोन्नती देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ करीत आहे. तरी समितीस त्या बाबत तातडीने आदेश द्यावे, यासह अनेक मागण्याचे निवेदन कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे.

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मागण्यांचा विचार होऊन त्याबाबतची बाजार समितीवर त्वरित कारवाई करून कर्मचाऱ्यांचा अन्याय थांबवावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांना उपोषण करावे लागेल. तसेच बाजार समिती कार्यालयात काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी दिला आहे. संस्थेचे आर्थिक तसेच इतर नुकसान झाल्यास त्यास सभापती, सचिव व संचालक मंडळ यांना जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

बाजार समितीच्या वेळोवेळी झालेल्या लेखा परीक्षण अहवालात कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. तरीही बाजार समितीची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासिनता दिसून येते. वर्षानूवर्षे कर्मचाऱ्यांनी संस्थेकरिता कष्ट करून संस्थेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तरीही कर्मचारी सुविधांपासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ११० कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे.

या आहेत मागण्या...

भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, युनियन वर्गणी व इतर कपाती वेळच्यावेळी खात्यात भरण्यात याव्या, कर्मचाऱ्याचे सुधारित दराने जुलै २०१६ पासूनचा महागाई भत्ता लागू होऊन फरक रक्कम तत्काळ मिळावी. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात नियमित वेतन, वेतनवाढी, इतर अनुषंगिक भत्ते यामध्ये निर्णय सचिव स्तरावर व्हावा. शासकीय रद्द केलेल्या सुट्या तसेच दुसरा व चौथा शनिवार, हक्काच्या रजा, नामंजूर केलेल्या सुट्या रजा पूर्ववत करण्यात याव्या आदी मागण्या यामध्ये करण्यात आल्या आहेत. 

अन्यायाच्या उद्रेकाने कर्मचारी त्रस्त

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही गैरव्यवहार, अनियमितता, भ्रष्टाचार व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे चर्चेत आहे. या बाबतचे दावे सहकार मंत्री व उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यात कर्मचारी भरडला जात आहे. कारवाईच्या होणाच्या भीतीपोटी कर्मचारी एकत्र येण्यास धजावत नव्हता. याबाबत महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे या संघटनेमार्फत या कर्मचाऱ्यांनी मागण्या मांडल्या आहेत. मात्र, सरकारने व वरिष्ठ कार्यालयाने त्याची योग्य दखल घेतली नाही. तसेच सध्याची परिस्थिती पाहता अन्यायाचा उद्रेक झाल्या कारणाने हा कर्मचारी त्रस्त झाले आहेत, असे यावेळी कर्मचाऱ्यांची सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँडबाजा थांबला; पोलिसांचा सुस्कारा

$
0
0

अधिक मासात लग्नाची धूम थांबणार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अधिक मासामुळे लग्नसराईची धामधूम महिनाभरासाठी थांबणार आहे. लग्नसराईच्या काळात होणारी वाहनांची गर्दी, त्यातून होणारी वाहतुकीची कोंडी, चेनस्नॅचिंगचे वाढलेले प्रकार यांच्यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येत होता. मात्र, आता अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक बसल्याने बँडबाजा थांबल्याने पोलिसांनी सुस्कारा सोडला आहे.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत तब्बल ४२ लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईच्या काळात येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना गस्ती वाढवावी लागत होती. ती आता थांबणार आहे. ग्रामीण भागातील विरळ लोकवस्ती, नव्याने वाढत असलेली गृहसंकुले, शेतमळे असे क्षेत्र असलेल्या आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या, घरफोडी, चेनस्नॅचिंग अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. या पोलिस स्टेशनच्या हद्दीत लॉन्स आणि मंगल कार्यालयांची संख्याही मोठी आहे. लग्नाच्या दिवशी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चेनस्नॅचिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढते.

यंदाही औरंगाबाद रोडवर लॉन्सच्या समोरच्या भागात चेनस्नॅचिंगचे प्रकार घडले होते. या प्रकारानंतर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. महिलांनी दागिने कशा प्रकारे सांभाळावेत यासाठी मार्गदर्शन करणारे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप, ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणाऱ्या सुचना यांच्यामुळे महिलांनी दक्षता बाळगली. पोलिसांनी लॉन्सच्या भागामध्ये गस्ती वाढविली होती. चेनस्नॅचिंगच्या प्रकारांवर बऱ्यापैकी आळा बसल्याचे दिसले.

रस्ते घेणार मोकळा श्वास

लग्नसराईच्या दाट तिथीच्या काळात औरंगाबाद रोड, मुंबई-आग्रा महामार्ग यांच्याबरोबरच शहर परिसरातील रिंगरोडवर वाहनांची प्रचंड गर्दी होत होती. अनेकदा वाहतुकीची कोंडी झाल्याने तासनतास वाहने रस्त्यात अडकून पडत होती. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागता होता. महिनाभर अशा प्रकारच्या कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे. त्यामुळे हे रस्तेही आता मोकळा श्वास घेतील.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत तब्बल ४२ लॉन्स असून, लग्नसराईच्या काळात या लॉन्सवर प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने खेचण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पोलिसांची गस्त वाढवावी लागत होती.

-सुनीलकुमार पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकर पोळले उन्हाळे

$
0
0

तापमान पोहोचले ४० अंशावर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

थंडीच्या ऋतूमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात तापमानानेही कहर केला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. महाबळेश्वरनंतर निफाड तालुका राज्यातील थंड तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात ४ डिग्री तापमान आणि उन्हाळ्यात थेट ४० अंश सेल्सिअसच्यावर तापमान असे टोकाचे वातावरण निफाडकरांना अनुभवायला येत आहे. तालुक्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली.या केंद्रावर या उन्हाळ्यातील सर्वाधिक नोंदवलेले तापमान आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेने जनजीवनावर परिणाम होत आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर तुरळक गर्दी असते. कांद्याच्या चाळीवर काम करणाऱ्या मजुरांना प्लास्टिक कापडाचे शेड तयार करून घ्यावे लागत आहे. एवढ्या उन्हात काम करणे मजुरांना अशक्य असते. शेतकरीही मशागतीची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी पाचनंतर करीत आहेत. शहरातील शीतपेयाच्या दुकानात गर्दी वाढत आहे. मंगळवारी तालुक्यात ४०.६ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे. या तालुक्यातील हे यावर्षीचे सर्वात उच्च तापमान असल्याचे हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली होती.

दोन वर्षात असे वाढले निफाडचे तापमान...

दिनांक तपमान

२०१८ २०१७

३० मार्च ३९ ३७

१ एप्रिल ३८ ३७

२ एप्रिल ३८.८ ३७.६

३ एप्रिल ३९ ३८.५

४ एप्रिल ३८.६ ३९.४

१५ मे ४०.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोकर धास्तावले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी महापालिकेने मुदत दिली असली तरी सिडकोतील घरांवरही यामुळे हातोडा पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडकोतील सुमारे पंचवीस हजार घरांवर यामुळे हातोडा पडण्याची भीती असून, पालिकेने जाहीर केलेल्या या निर्णयावर आता काय उपाय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच सिडको प्रशासनाने प्लॅनिंग ऑथोरिटी महापालिकेला दिल्याचे सांगितल्याने या अतिक्रमणांवर खरंच कारवाई होणार का, याबाबत चर्चा झडत आहेत.

राज्य शासनाने प्रशमित संरचना धोरण लागू केले असून, त्याची मुदत ३१ मेपर्यंत देण्यात आली आहे. १ जूननंतर सर्व अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केले आहे. शहरात सिडकोने सहा योजना उभारल्या असून, यात सुमारे पंचवीस हजार घरे आहेत. या घरांना मागे व पुढे अशी जागा देऊन नागरिकांना त्याठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी सिडको कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चिरीमिरी घेवून नागरिकांना वाढीव बांधकामासाठी परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे सिडकोत आजतरी सुमारे ९५ टक्‍के बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या बांधकामांवरही महापालिका हातोडा मारणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.या बांधकामांवर पालिकेने योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

सिडकोने परवानगी देवूनच हे बांधकाम करण्यात आले असून, अनेकांनी रीतसर परवानगीसुद्धा घेतलेली आहे. आता महापालिका हे बांधकाम पाडणार असेल तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सिडकोने सहा योजना उभारल्या असून, याठिकाणी सुमारे पंचवीस हजार घरे उभारण्यात आली आहेत. आता या सर्व योजना महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या असून प्लॅनिंग ऑथोरिटीसुद्धा महापालिकाच आहे. त्यामुळे यात सिडको काहीही करू शकत नाही.

- अनिल झोपे, सिडको प्रशासक

सिडको घरांबाबतच हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. यापूर्वी सिडकोच्या परवानग्या घेऊन नागरिकांनी घरे वाढविली आहेत. यावर शासनदरबारी आवाज उठविणार असून याबाबत थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. सिडकोतील अनेकांनी परवानगी घेवूनच बांधकामे केली आहेत. त्यामुळे हे होऊ दिले जाणार नाही.

- आमदार सीमा हिरे, पश्चिम विधानसभा मतदार संघ

सिडकोने उभारलेल्या लहान घरांनंतर नागरिकांनी घरे वाढविली असली तरी ती तोडण्यापेक्षा याठिकाणी राज्यात इतरत्र राबविण्यात आलेल्या क्लस्टर पद्धतीने घरांची उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

- आ. अपूर्व हिरे.

सिडकोने सुरुवातीला दिलेली घरे लहान होती. परिवार वाढल्यामुळे नागरिकांनी सिडकोकडूनच परवानगी घेऊन हे बांधकामे केली आहेत. तीस ते पसतीस वर्ष जुनी बांधकामे असून पालिकेकडे आत्ताच या योजना हस्तांतरण झाल्या आहेत. त्यामुळे सिडकोने नागरिकांची स्वप्ने तोडू नये.

- हर्षा बडगुजर, प्रभाग सभापती, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ममता सेवेने केरळ महिला सेवा समितीचा मातृदिन साजरा 

$
0
0

केरळ समितीच्या वतीने मातृदिन उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

  नाशिकमधील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या केरळ महिला सेवा समितीच्या वतीने टाकळी रोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमात असलेल्या वृद्ध महिलांचे पाय धुवून व साडीचोळीचे वाटप करत खऱ्या अर्थाने मातृदिन हा  सेवादिन  म्हणून साजरा करण्यात आला.    केरळ महिला सेवा समितीच्या अध्यक्षा जया कुरूप, सचिव अग्नेस फ्रान्सिस, जलजा सुगुनन, सुजाता मोहन, मिनी नायर, माया नायर, अनु रवींद्रन, सुनीता धामणे, एस. के. नायर आदींनी या आश्रमात मातृदिन साजरा करताना  वृद्धाश्रमात असलेल्या या महिलांशी आपलेपणाने मिसळत त्यांच्यासमवेत गाणी गायली. या मातृदिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यासाठी त्यांना जय बडगुजर यांचे सहकार्य केले.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images