Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेवटचे चारच दिवस शिल्लक

$
0
0

शेवटचे चारच दिवस शिल्लक

लवकरच रंगणार प्राथमिक फेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलागुणांसह, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या साथीने 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेतून तरुणींना चंदेरी दुनियेतल्या करिअरचा मार्ग निवडता येतो. या स्पर्धेची प्राथमिक फेरी लवकरच रंगणार आहे. त्यासाठीच्या रजिस्ट्रेशनसाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्यापही स्पर्धेचे रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी आजच रजिस्ट्रेशन करा आणि सज्ज व्हा झळाळता मुकूट परिधान करण्यासाठी.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरि पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी लवकरच होणार आहे. मॉडेलिंग, अभिनय तसेच इतरही ग्लॅमरस करिअरची संधी आजमावण्याची इच्छा असणाऱ्या शेकडो तरुणींनी श्रावणक्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक तरुणींनी सिनेमा, नाट्य, मालिका, मॉडेलिंग या क्षेत्रात पदार्पण केले आहे. सेलिब्रेटी दुनियेत पाऊल टाकण्यासाठी ही स्पर्धा तरुणींना हक्काचे व्यासपीठ देते. तुम्हालाही ग्लॅमरस करिअर आणि सेलिब्रेटी आयुष्य जगायचे असेल तर आजच श्रावणक्वीन स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करा. प्राथमिक फेरीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाणून घेण्यासाठी वाचत राहा, महाराष्ट्र टाइम्स.

..

असे करा रजिस्ट्रेशन

रजिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये नोंदणी करायची आहे. पोस्टकार्ड साइज दोन फोटो आणि आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स सोबत आणावी. एक फॉर्म भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशनची मुदत १६ ऑगस्टपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधू शकतात.

..

यंदा 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'

श्रावणक्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून सिटी फिनालेसाठी स्पर्धकांची निवड होईल. या स्पर्धकांना सिटी फिनालेच्या ग्रुमिंग सेशनमध्ये सहभागी व्हायचे आहे. यामधून अंतिम तीन श्रावणक्वीन निवडल्या जातील. या श्रावणक्वीनना मुंबईत होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी जावे लागेल. ग्रँड फिनालेसाठीचे ग्रुमिंग सेशन मुंबईत होईल. ही ग्रँड फिनाले नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे या विभागाच्या श्रावणक्वीन विजेत्यांमध्ये होईल. यातून 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' निवडण्यात येईल. या सोहळ्याचे प्रक्षेपण झी युवा वाहिनीवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संविधानाची प्रत जाळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा‘श्रीनिवास पांडे विरोधात गुन्हे दाखल करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे व त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मुक्तिभूमी व्याख्यानमालेचे पदाधिकाऱ्यातर्फे शहर पोलिसांकडे करण्यात आली. दिल्ली येथे जंतरमंतर मैदानात भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या. हे कृत्य असंविधानिक असून, याची माहिती असूनही समाजकंटकांनी वातावरण दूषित करण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचे व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. देशातील वातावरण दूषित करण्याचा व जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. यामुळे या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कडक शासन करावे. या समाजकंटकांवर कडक कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संतोष घोडेराव, शरद शेजवळ, सुनील खरे, गोरख घुसळे, सुभाष गांगुर्डे, रविराज गोतीस, बापूसाहेब वाघ, जितेश पगारे, कैलास बनसोडे, सिद्धार्थ आहेर व स्वाभिमानी रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकमधील मदरशांना फंडिंग अधिक!

$
0
0

दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तानात इस्लामची शिकवण देण्यासाठी मदरसे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. तेथील काही नागरिक आणि संस्थांकडून या मदरशांना फंडिंग केले जाते. यातूनच मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवारा, अन्न व वस्त्र उपलब्ध करून दिले जातात. पाक सरकारची जेवढी करवसुली होत नाही त्यापेक्षा अधिक फंडिंग तेथील मदरशांना मिळते. पाक सरकारच्या राजकीय प्रश्नांमध्ये मदरसे हा कायम चर्चेचा विषय ठरतो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांनी केले.

एस. एम. रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन, आयाम आणि कुर्तकोटी शंकराचार्य न्यास यांच्यातर्फे ऑस्कर आणि एमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध दिग्दर्शक हेमल त्रिवेदी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात झाला. यावेळी मंचावर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, शंकाराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ.आशिष कुलकर्णी, फाउंडेशनचे सचिव शशांक मणेरीकर होते.

फाउंडेशनच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी दिग्दर्शक त्रिवेदी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्रिवेदी म्हणाल्या की, चित्रपटाच्या शुटिंगवेळी मी स्वत:ची ओळख लपवली होती. दुबईतील हेना खान असल्याचे सांगत मी मदरसामध्ये जाऊन शुटिंग करत होती. तेव्हा, मला पाकमधील नागरिकांमध्ये भारतीयांबाबत कोणताही रोष असल्याचे जाणवले नाही. किंबहुना तेथील रेड मॉस्कच्या नावाखाली मरणोत्तर जन्नत लाभेल यासाठी विद्यार्थ्यांना कायम धार्मिक गोष्टींत अडकवून ठेवणे. हे मदरशांमध्ये सुरू आहे. हा प्रकार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासाठी तेथील काही नागरिक झगडत आहेत. हेच प्रश्न त्यांच्या समोर महत्त्वाचे आहेत. दरम्यान, उपस्थितांनी त्रिवेदी यांच्या धाडसाची स्तुती करत प्रश्न विचारत चित्रपटातील प्रवास जाणून घेतला.

असा होता चित्रपटाचा प्रवास

मुंबईतील '२६/११'च्या हल्ल्यात जवळची मैत्रिण गमावल्यानंतर पाकमधील दहशतवादी कारवायांबाबत त्रिवेदी यांनी माहिती संकलन सुरू केले. पाकच्या रेड मॉक्सच्या नावाखाली मदरशांमध्येच धार्मिकता आणि जिहादचे शिक्षण मिळत असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी तेथील मदरशांमध्ये गुप्तपणे जाऊन शुटिंगची करण्यास सुरुवात केली. हळूहळू तेथील ओळखी वाढायला लागल्या आणि त्यांना हवी ती मदत मिळत गेली, असा 'अमंग द बिलिव्हर्स' चित्रपट साकारला. यामध्ये, पाकमधील मदरसे आणि शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणातील तफावत दाखविण्यात आली आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफर्सचा ‘मुहूर्त’ तुडुंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे मागील काही वर्षांपासून ऑगस्ट महिन्याचा पूर्वाध ग्राहकांच्या उत्साहाने ओसंडून वाहतो. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ व्यावसायिकांमध्ये लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे. व्रतवैकल्यांचा श्रावण, त्यात रविवारची सुटी. यामुळे ग्राहकांच्या उत्साहाला भरते आले. विक्रेत्यांनीही गर्दी 'एनकॅश' करण्यासाठी विविध ऑफर्सची बरसात केलेली आहे. शहरातील मॉल्स, मोठी दुकाने यासह मेनरोडवर ग्राहकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, लक्ष्मीपूजन या साडेतीन मुहूर्तांवेळी मोठ्या व्यावसायिकांकडून आणि मॉल्सकडून आकर्षक ऑफर्स जाहीर होतात. गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरही या ऑफर्स दिल्या जाऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाला लागूनच श्रावणातील व्रतवैकल्ये, पारशी नववर्ष दिन आणि बकरी ईद साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या ऑफर्सचा नवा मुहूर्त ग्राहकांनी साधला. वीकेंडला या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शहरातील बाजारपेठ व मॉल्समध्ये ग्राहकांनी तुफान गर्दी केली. सण-उत्सवांच्या मुहुर्तावर विविध व्हरायटीजचे कपडे बाजारात उपलब्ध झाले आहेत. या कपड्यांवर २० ते ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. मॉल्समध्ये कॅशबॅक, डिस्काउंट, गेट वन बाय वन फ्री अशा अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी शनिवारी आणि रविवारी ग्राहकांचे पाय मॉल्सकडे वळत होते. मॉल्समध्ये कपड्यांवर १० ते ५० टक्के डिस्काउंटच्या ऑफर दिल्या जात होत्या. लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल, फ्रीज, ओव्हन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ४० ते ६० टक्के डिस्काउंट दिला जात. मॉल्समध्ये काही वस्तूंवर कॅशबॅक देण्यात येत आहे. फूड, कोल्ड्रिंक, शॅम्पू, साबण यांवर ४० टक्के कॅशबॅक व फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. मॉल्समध्येही कपड्यांवर कॉम्बो ऑफर्स मिळत आहे. या सर्व ऑफर्सचा फायदा घेत खरेदीची लयलूट करण्यासाठी ग्राहकांनी वीकेंडला मॉल्स व दुकानांत गर्दी केली होती.

मॉल्समध्ये रांगा

शहरातील विविध मॉल्समधल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी रविवारी गर्दी केली होती. काही मॉल्सनी १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सवलतीच्या ऑफर्स दिल्याने त्या साधण्यासाठी दुपारच्या सुमारास ग्राहकांची गर्दी वाढली होती. यावेळी ग्राहकांना रांगा लावून मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. खरेदीनंतर बिल करण्यासाठीदेखील ग्राहकांना तासभर रांग लावावी लागली.

सोने, चांदी अन् वाहन खरेदीला पसंती

ऑफर्सच्या नव्या मुहुर्तानिमित्त सोने, चांदी आणि वाहन यांच्यावरही ऑफर्स देण्यात येत आहेत. सोने, चांदीच्या घडणावळीवर २० ते ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच वाहन खरेदीवरही आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे सोने, चांदी आणि वाहन खरेदीकडेही रविवारी ग्राहकांची पसंती दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्र. के. अत्रे म्हणजे विद्यापीठच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आचार्य प्र. के. अत्रे म्हणजे केवळ हसवणारा माणूस नव्हता; तर त्यांच्या विद्वत्तेलाही तोड नव्हती. एक माणूस आपल्या एका आयुष्यात इतक्या विविध भूमिका पार पाडू शकतो. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. जेथे हात टाकणार तेथे यशच मिळवणार, असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्यापीठच होते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

मराठी साहित्य क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये सर्वोच्च योगदान देणारे जेष्ठ पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२० व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये अत्रे कट्ट्याचा शुभारंभ करण्यात आला. सावाना आवारातील स्व. मु. शं औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. 'कुटुंब रंगलाय काव्यात' हा विख्यात कार्यक्रम सादर करणारे विसुभाऊ बापट व सावाना सभासद अनिरुद्ध जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. मुंबई, ठाणे व पुणे परिसरात अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आता नाशिकमध्येही असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

भावे पुढे म्हणाले की, अत्रेंना आचार्य ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली. तर लतादिदींना गानकोकिळा, सावरकरांना स्वातंत्र्यवीर या पदव्या अत्रेंनी दिल्या. 'देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर' हा अभंग अत्रेंनी लिहिलेला आहे केवळ त्यांनी शेवटच्या ओळीत 'तुका सांगे मूढ जना' ही ओवी लिहिली, आपण सांगतोय म्हणून लोक का ऐकतील. तुकाराम महाराजांनी सांगितले तर मात्र लगेच ऐकतील या आशावादामुळे अत्रेंनी ते लिहिलेय. आयुष्यभर तुकारामांची गाथा उशाशी घेऊन हा माणूस झोपला. ठसठशीत टपोरे अक्षर ही अत्रेंची ओळख. आयुष्यात एकदाही या माणसाने अशुध्द लेखन केले नाही. दिनुचे बील ही कथा अत्रेंनी लिहिली, अत्रे कवी होते, विडंबनकार होते, प्रस्तावनाकार होते. कवी बी यांनी आयुष्यात केवळ ७४ कविता लिहिल्या या कवितेच्या पुस्तकाला ६४ पानांची प्रस्तावना अत्रेंनी लिहिली आहे. या प्रस्तावनेला त्याकाळी मुंबई विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. अशा प्रचंड उंचीचा हा माणूस होता, असेही भावे म्हणाले.

यावेळी संपादक अत्रे या विषयावर नरेंद्र कोठेकर यांनी विचार मांडले. अत्रे कट्ट्याच्या उद्घाटनानंतर विडंबन, संगीत एकच प्याला याबाबत उमेश घळसासी, माधुरी गोडबोले, शिबानी जोशी, उमा बापट आणि विसुभाऊ बापट या कलाकारांनी अभिवाचन केले. या उपक्रमासाठी सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेचे सहाय लाभले. याप्रसंगी सावानाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची उतरली झिंग!

$
0
0

चाळीस जणांवर पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आषाढ महिन्यातील शेवटचा दिस गोड व्हावा' म्हणून झटणाऱ्या तळीरामांच्या आनंदावर पोलिसांनी विरजण पाडत कारवाई हाती घेतली. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसात मद्य पिऊन भरधाव वेगात वाहन हाकणाऱ्या ४० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी काह टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

श्रावण महिन्यास धार्मिक महत्त्व असल्याने या काळात मांसाहार आणि मद्याची मागणी कमी होते. मात्र, श्रावण सुरू होणार म्हणून आषाढ मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गटार अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मद्य रिचवण्याची स्पर्धा तळीरामांमध्ये सुरू असते. हॉटेलमध्ये हाणामाऱ्यांपासून गंभीर अपघातापर्यंतच्या घटना सर्रास घडतात. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गटारी अमावस्येची ही बाजू लक्षात घेत शहर वाहतूक शाखेने शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस तळीरामांना रडारवर घेतले. मद्यप्राशन करून भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्या ४० जणांवर पोलिसांनी मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या दरम्यान, काही टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आली.

- अजय देवरे,

सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात -

$
0
0

मगदूम यांना पुरस्कार

नाशिक : वसंतराव मगदूम यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्योतिष क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे होणाऱ्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण होईल. बुधवारी (२२ ऑगस्ट) रोजी अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. एच. एस. रावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

मंगळवारी वृक्षारोपण

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा आणि इगतपुरी सिटीझन फोरम यांच्यातर्फे इगतपुरी जवळील भावली धरण परिसरात पाच लाख रोपांची लागवड होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी (१४ ऑगस्ट) रोजी पंधरा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी राज्य पर्यटन मंत्री राजकुमार रावल, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहे. या उपक्रमात नाशिककरांनीही सहभावी व्हावे, असे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी अन् अपेक्षांचा भडिमार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठाणातील रस्ते छोटे असल्याने तेथे अग्निशमनच्या छोट्या वाहनांची व्यवस्था करा, वाडा पडल्याने बळी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना शहरातील प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्याचे मानधन द्यावे, जुन्या नाशिकातील नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. भाजप सरकारने कमी केलेला एफएसआय पुन्हा वाढवून द्यावा, अशा एक ना अनेक तक्रारी आणि सूचनांचा पाऊसच रविवारी जुन्या तांबट लेनमधील कासार समाज कालिका माता मंदिर सभामंडपात पडला.

नागरिकांच्या रास्त अपेक्षांची दखल घेऊ, असे आश्वासन देतानाच क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे नाशिक गावठाणचे रुपडे पालटणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. शहराचा चहुबाजूने विकास होत असताना नाशिकची मुख्य ओळख असलेला गावठाण भाग मात्र विकासापासून वंचित आहे. कुठल्याही मूलभूत आणि पायाभूत सूविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनाही जगणे कठीण झाले आहे. शहराच्या उपनगरांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून येथील रहिवाशांना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी नाशिक गावठाणातील रहिवाशांची बैठक बोलावली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरविकासच्या अधिकारी प्रतिभा भदाणे, विजय साने, सुहास फरांदे, हरिभाऊ लोणारी आदी उपस्थित होते.

क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे जुन्या नाशकातील रहिवाशांच्या अशा पल्लवीत झाल्याची भावना प्रास्ताविकातून व्यक्त करण्यात आली. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना नागरिक धोकादायक अवस्थेतील वाड्यांमध्ये रहात आहेत. त्यांना स्वमालकीच्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरीत करणे आणि शाळा, उद्याने, मैदान, वाचनालये, प्रशस्त रस्ते यासारख्या सुविधा याच परिसरात उपलब्ध करून देऊन रहिवाशांचा रहाणीमानाचा दर्जा सुधारणे म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट असल्याचे आमदार फरांदे यांनी दिली. भदाणे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष सांगितले. त्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना ऐकण्यात आल्या.

इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट तीन महिन्यांत मिळावा

पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिकमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाणार असून चार ते साडेचार टक्के एफएसआय मिळविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. गावठाणाच्या धाटणीचा विचार करून आपण क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करीत असल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी एक एजन्सी नेमावी लागणार असून महापालिकेने तीन महिन्यांत हा रिपोर्ट सादर केला तर त्यावर त्यापुढील महिनाभरात नागरिकांना सूचना आणि हरकती मांडता येतील. त्यामुळे याबाबत महापौर आणि सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आठ फेब्रुवारी रोजीच दिल्याची माहितीही फरांदे यांनी यावेळी दिली.

आमच्या भावनांशी खेळू नका

आम्ही २० वर्षांपासून क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत ऐकत आहोत. नाशिक गावठाणातील नागरिक गरीब आणि भोळसर आहेत. त्यांना क्लस्टर डेव्हलपेंटची आश्वासने दिली जातात. परंतु, ते प्रत्यक्षात होणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे मत नंदन भास्कर या तरुणाने मांडले आणि बैठकीचा नूर पालटला. तुम्ही चार टक्के एफएसआय मिळेल, असे सांगत आहात. याच सरकारने नाशिक गावठाणचा एफएसआय दोनवरून दीडवर आणला असल्याकडेही त्यांनी लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांचे लक्ष वेधले. त्यानंतर सुरू झालेला सूचना आणि अपेक्षांचा सिलसिला सुरूच राहिला.

नाईलाजाने वाड्यात राहतो

वाडा कोसळल्याने ज्या दोन तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी शंकर बर्वे यांनी केली. पूररेषेमध्ये असल्याचे कारण सांगत वाड्यांच्या डागडुजीकरीता बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव धोकेदायक वाड्यांमध्ये रहावे लागते. बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी काही करा अशी अपेक्षा स्वाती कुलकर्णी यांनी व्यक्त केली. जुन्या नाशकातील रहिवाशांना टुकार समजून बँका कर्ज प्रकरणे फेटाळून लावतात, याकडे दिनेश चव्हाण यांनी लक्ष वेधले. सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून पुन्हा प्रशस्त ठिकाणी बैठक बोलवा, अशी मागणी काही नागरिकांनी केली. तर काहींनी गावठाणाचा कमी केलेला एफएसआय पूर्ववत करावा अशी मागणी केली.

क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष

किमान ३० वर्षे जुन्या इमारती, घरांचा यामध्ये समावेश

वाडेमालक, इमारतमालक क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतात

अनधिकृत परंतु इमारतींची मालकी असलेल्या रहिवाशांनाही सहभागाची संधी

परिसरातील २५ टक्के स्लम एरियाचाही यात समावेश

१२ वर्षांहून अधिक वास्तव्य असलेले भाडेकरूही लाभार्थी

भाडेकरूंना किमान ३० चौरस मीटरचे घर देणे बंधनकारक

घरमालकाला स्वत:ला इमारत बांधून एफएसआय विकणे शक्य

घरमालकांना घर आणि दुकानमालकांना दुकानच मिळणार

को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापून किंवा विकसकावर जबाबदारी सोपवून विकास शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनस्थळीच साजरी दीप अमावास्या

$
0
0

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. यात विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. त्यानुसार दि. ११ रोजी रात्री महिलांनी आंदोलस्थळीच दीप अमावास्या साजरी करून सरकारचा निषेध केला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाळीनाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यासह जिल्हाभरात वेगवेगळ्या स्वरुपाची आंदोलने केली जात आहेत. त्यात मराठा आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, दशक्रिया विधी, रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या, जागरण गोंधळ, घंटानाद आंदोलनांचा समावेश आहे. यात आता या दोघेही आंदोलनांचा समावेश झाला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनस्थळी महिलांनी दीप अमावास्या साजरी केली. या वेळी महिलांनी आपल्या हाताने दिवे पेटवून ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे’ अशी प्रार्थना केली. याप्रसंगी हेमा हेमाडे, किरण नवले, डॉ. सुलभा कुवर, डॉ. उषा साळुंखे, भारती मोरे, अनिता वाघ, मनीषा ठाकूर आदींसह आंदोलक उपस्थित होते. तर रविवारी (दि. १२) सकाळी आंदोलनास्थळी मराठा समाजबांधवांनी थाळीनाद आंदोलन करून सरकारचा निषेध केला. या वेळी राजाराम पाटील, राजू इंगळे, संजय वाल्हे, दीपक रवंदळे, समाधान शेलार, अशोक सुडके, राजू ढवळे, प्रफुल्ल माने, वसंत हराळ, गोविंद वाघ, चंद्रकांत मराठे, वीरेंद्र मोरे आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते.

जामीन होण्याची शक्यता
नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनांवर ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात २२ आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उद्या रोजी जिल्हा न्यायालयात जामीन होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतीक मनमाड, शिवशक्ती आडगाव अजिंक्य

$
0
0

किशोर- किशोरी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिसाव्या किशोर व किशोरी आमदार चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाने किशोर गटाचे अजिंक्यपद, तर रचना स्पोर्ट्स नाशिकने किशोरी गटाचे विजेतेपद पटकावले.

मनमाड नगरपालिकेच्या महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाच्या मैदानावर १० ते १२ ऑगस्ट रोजी या स्पर्धा भरविण्यात आल्या. किशोर गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात आयुष शिरसाटे याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर व दर्शन बारे, सोनू निकम यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर सांस्कृतिक क्रीडा मंडळ मनमाडने रुद्रा स्पोर्ट्स ब्राह्मणवाडेचा ३५ विरुद्ध २७ असा ८ गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावले. सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या विजयात हरीश केकाण, आकाश परदेशी, विक्रम पाटील यांनी मोलाचा वाटा उचलला. या संघाला प्रशिक्षक गणेश सोमासे व बंटी आहेर यांचे मार्गदशन लाभले.

किशोरी गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा लभडे, अंकिता जाधव, काजल शिंदे, हर्षदा झोमण, तृप्ती जाधव यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर शिवशक्ती आडगाव या संघाने रचना स्पोर्ट्स क्लब, नाशिक ४५ विरुद्ध १५ असा दणदणीत ३० गुणांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीनफिल्डवर कारवाई, अधिकाऱ्यांकडून भरपाई!

$
0
0

संरक्षक भिंतीचा १९ लाखांचा खर्च वसूल करणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रीनफिल्ड लॉन्सवरील अतिक्रमणाच्या कारवाई प्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी मागावी लागल्याची किमत आता तीन अभियंत्यांना चुकवावी लागणार आहे. उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही लॉन्सवर बुलडोझर चालवून महापालिकेची नाचक्की आणि आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागूल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण व सहायक अभियंता रवींद्र पाटील यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर दोषारोष निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, संरक्षक भिंत बांधण्याचा १९ लाखांचा खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोदावरी पूररेषेतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सावरकरनगर परिसरातील ग्रीनफिल्ड लॉन्सवर २१ मे रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संरक्षक भिंत पाडण्याची कारवाई केली होती. स्थगिती असतानाही कारवाई केल्याने ग्रिनफिल्डच्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केला म्हणून थेट मुंढे यांनाच न्यायालयात माफीनामा द्यावा लागला होता. तसेच, संरक्षक भिंत नव्याने बांधून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना कारवाई झालीच कशी, याची चौकशी मुंढे यांनी सुरू केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर पुढील कारवाईसाठी दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहेत. यानंतर संबंधितांना नोटीस देणे व त्यानंतर त्यांचे उत्तर ऐकून पुढील कारवाई होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रीनफिल्डची संरक्षक भिंत उभारण्याचा १९ लाखांचा खर्च या अधिकाऱ्यांकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..

बहिरम, बोर्डेंवरही ठपका

या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनाही जबाबदार धरण्यात आले असून, त्यांच्यावर प्रशासकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

..

बी. यू. मोरेंची चौकशी?

तत्कालीन विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे यांच्या कार्यकाळात अनेक खटल्यांमध्ये महापालिकेविरोधात निकाल लागला. परिस्थितीजन्य पुरावे महापालिकेच्या बाजूने असताना ते न्यायालयात सादर केले न गेल्याने अनेक खटल्यांमध्ये महापालिकेला कोट्यवधींची नुकसान भरपाई अदा करावी लागली. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत मोरेंच्या कार्यकाळातील विधी विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या सूचना आयुक्त मुंढे यांनी दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईनाथनगर चौफुली परिसरात नो पार्किंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साईनाथनगर चौफुलीलगत १०० मीटर अंतर वाहतूक शाखेने 'नो पार्किंग झोन' घोषित केले आहे. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये येणाऱ्या शेकडो वाहनचालकांना यापुढे जॉगिंग ट्रॅकसह रस्त्यावर वाहने उभे करता येणार नाही. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्रमांक एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, काही वर्षांपासून येथील रस्ता तसेच जाँगिंग ट्रॅक पार्किंगची ठिकाणे म्हणून वापरली जातात.

साईनाथनगर चौफुलीलगत अशोका बिल्डकॉन, डब्लूएनएस, टीसीएस, सुमासॉफ्ट, अशोका हॉस्पिटल इत्यादी अस्थापना एकाच ठिकाणी असून, येथे काम करण्यासाठी हजारो कर्मचारी येतात. वरील कंपन्यांच्या आवारात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने शेकडो कर्मचाऱ्यांना आपली वाहने रस्त्यावर, तसेच जॉगिंग ट्रॅकवर उभी करावी लागतात. साईनाथनगर चौफुली ते वडाळागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुचाकी तसेच चारचाकी वाहने अनधिकृत उभी केली जातात. सोबतच रिक्षा व्यावसायिकही गर्दी करतात. हा मार्ग अरूंद, उताराचा तसेच धोकादायक वळणाचा आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीदेखील होते. वडाळा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर जड वाहनेदेखील करतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची देखील शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने डब्लूएनएस व अशोका बिल्डकॉन कंपन्याच्या आवारासमोर, वडाळागाव व साईनाथ चौफुली असे दोन्ही बाजूने १०० मीटरपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्त्यावर व रस्त्यांच्या साइडपट्टीवर 'नो पार्किंग झोन' करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ११ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहने टोइंग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून येथील ही समस्या उग्र होत असताना पोलिसांनी हे निर्बंध लागू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टअखेर आरक्षण द्याच!

$
0
0

धनगर समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, समाजातील तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळावे, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळावी तसेच सोलापूर विद्यापीठास आहिल्याबाई होळकरांचे नाव द्या, या प्रमुख मागण्या ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण कराव्यात. यासाठी नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाच्या विविध संघटनांनी शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सोमवारी आंदोलने केली. 'तात्काळ आरक्षण द्या' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तात्काळ लागू करावे, महानोकर भरतीत धनगर समाजाचा अपूर्ण अनुशेष पूर्ण करावा, धनगर समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायासाठी सरकारने दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, महामेष योजना तात्काळ सुरू करावी, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, एनटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी, अशा मागण्या धनगर समाजाच्या विविध संघटनांनी केल्या. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी युवा मल्हार सेनेचे उपाध्यक्ष कैलास दाभाडे, प्रदेश सरचिटणीस मधुकर हिरे, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष धनंजय माने यांसह इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहण्यायोग्य शहरांमध्ये नाशिक उत्तम

$
0
0

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे नाशिक हे देशात राहण्यायोग्य शहरांच्या दर्जात (ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स) देशात २१ वे ठरले. देशव्यापी सर्वेक्षणात ही बाब समोर आली. देशभरातील १११ शहरांमध्ये नाशिकला ४४.७९ टक्के गुणांकन प्राप्त झाले आहे. या गुणांकनामुळे रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रांना त्याचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. 'स्मार्ट सिटी'मध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविणारे पुणे देशातील राहण्या-जगण्यायोग्य शहरांमध्ये 'एक नंबर' ठरले असून, नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन शहरांना लागून असलेल्या ठाण्याने यादीत सहावे स्थान मिळवले असून, यादीत महाराष्ट्राने आपली छाप पाडली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला पहिल्या ५० शहरांमध्येही स्थान मिळालेले नसून, कोलाकाताने तर सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिला होता.

विविध सरकारी-निमसरकारी संस्थांची कार्यपद्धती, शहरातील पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक यासारख्या वेगवेगळ्या निकषांवर देशातील राहण्यायोग्य शहरांची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रथमच अशा स्वरूपाचे सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणाचे निकाल सोमवारी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत जाहीर केले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांसह विविध राज्यांच्या राजधानीची शहरे आणि दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड त्यासाठी करण्यात आली होती. संस्थात्मक (इन्स्टिट्युशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगारनिर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळ्या जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी केरण्यात आली.

लिव्हिंग इंडेक्सची उद्दिष्टे

- दीर्घकालीन नियोजनासाठी माहितीचे संकलन

- शहरांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने कृती कार्यक्रमाची निश्चिती

- विविध नागरी योजना आणि धोरणांचे शहरांवरील परिणामांचा आढावा

- शहरातील नागरिक आणि धोरणकर्ते यांच्यातील सुसंवादात वाढ

नाशिकचे प्रमुख रँकिंग

संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल) - २२.२३ (४९ टक्के)

सामाजिक (सोशल) - १२.८३ (५१ टक्के)

आर्थिक (इकॉनॉमिक) - २.३२ (४६ टक्के)

भौतिक सुविधा (फिजिकल) - १७.४१ (३९ टक्के)

--

नाशिकचे इतर रँकिंग असे

प्रशासन १२.२३ टक्के

ओळख आणि सांस्कृतिक १.३८ टक्के

शैक्षणिक ४.३२ टक्के

आरोग्य ४.४५ टक्के

सुरक्षा आणि सुरक्षितता २.६९ टक्के

अर्थव्यवस्था आणि रोजगार २.३२ टक्के

गृहनिर्माण ०.५७ टक्के

सार्वजनिक मोकळ्या जागा ०.६ टक्के

मिश्र जमीन वापर १.९ टक्के

वीज पुरवठा १.९२ टक्के

वाहतूक व्यवस्था ०.७५ टक्के

खात्रीशीर पाणी पुरवठा २.६२ टक्के

सांडपाणी व्यवस्थापन ३.५१

घन कचरा व्यवस्थापन २.५९ टक्के

प्रदूषण घटविणे २.९५ टक्के

एकूण ४४.७९ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयी सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन

$
0
0

सोयी-सुविधांसाठी

आदिवासी रस्त्यावर!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी बांधवांच्या उमाजीनगर वसाहतीमध्ये सोयी-सुविधा पुरवाव्यात, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वस्त्या अधिकृत कराव्यात, यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी ईदगाह मैदानापर्यंत मोर्चा काढला. दोन दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर १५ दिवसांनी अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात अबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. ओझर मिग आणि सय्यद पिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर उमाजीनगर नावाने आदिवासी बांधवांची ५० वर्षांपासून वसाहत आहे. तेथे ५०० ते ६०० रहिवासी वास्तव्यास आहेत. मात्र, तेथे पाणी, वीज, शौचालये आणि रस्ता अशा मूलभूत सुविधा नाहीत. निफाड आणि दिंडोरीतील आदिवासी बांधवांच्या वसाहती अधिकृत करून तेथेही मुलभूत सुविधा पुरवाव्यात, जातीचा दाखला मिळण्यात येणारा अडसर दूर करावा, शेतमजूरांची नावे दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ठ करावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ओझर येथून वाहनाने हे मोर्चेकरी तपोवनात आले. तेथून आडगाव नाका, पंचवटी, रविवार कारंजा मार्गे हे मोर्चेकरी ईदगाह मैदानावर पोहोचले. अर्जुन गांगुर्डे, गणेश शेवरे, भारत कडाळे, संदीप गहिले, बन्सी कोकतारे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच स्वीकारताना पीएसआय अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी तब्बल पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अंबड पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) महिपाल धनसिंग परदेशी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. यासंदर्भात 'एसीबी'कडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार 'एसीबी'चे पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार परदेशी याने अंबड पोलिस स्टेशनमध्ये पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे परदेशी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत लुरू होती. दरम्यान, कुणी लाच मागत असल्यास ब्युरोच्या टोल फ्री नंबर १०६४वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावसाहेब दानवे आज नाशकात

$
0
0

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर भाजपनेही या निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकांचा जोर सुरू केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रभारी सरोज पांडे यांच्याकडून राज्यभर बैठका घेतल्या जात असून, आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूक रणनीतीचा तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तपेक्षा भाजप हटावचा अजेंडा

$
0
0

आगामी निवडणुकीत सत्तांतर अटळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रातील भाजप सरकारने सर्व कायदे मोडीत काढत हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी २०१९ च्या निवडणुकीत सत्तेवर येण्यापेक्षा भाजपला सत्तेवरून घालवण्याचा काँग्रेसचा अजेंडा असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. उत्तर भारतात भाजपच्या जागा निम्म्याने कमी होणार असल्याने लोकसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी केल्यास काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारच केंद्रात पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी मंगळवारी 'मटा'च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना चव्हाण यांनी देशासह राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला. भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याने पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू केले आहे. मतांचे राजकारण केले जात असून, धार्मिक व भावनिक मुद्द्यांना हात घालून निवडणुका जिंकण्याची रणनीती आखली जात आहे. मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात विरोधकांनी एकत्र येत देशपातळीवर महाआघाडी केली आहे. आश्वासनांची पूर्तता नसल्याने भाजपचा जाहीरनामा राहणार नसून, जातीय समीकरण, तोडा-फोडा व साम, दाम, दंड, भेद ही भाजपची रणनीती असणार आहे. त्यातून देशात सत्ता टिकवण्यासाठी काम केले जाणार आहे. यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष महाआघाडीच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. देशात हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांकडूनच निर्णय घेतले जात आहेत. अन्य मंत्र्यांनाही केंद्राच्या निर्णयाची माहिती नसते. त्यामुळे पक्षातच मोठी नाराजी आहे. भ्रष्टाचाराची रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

...

भाजपपेक्षा आमचे काम चांगले

भाजपकडून विकासाऐवजी केवळ योजनांचा दिंडोरा पिटला जात आहे. काँग्रेस आघाडीच्या गेल्या दहा वर्षांच्या कामाची तुलना भाजपच्या चार वर्षांच्या कामासोबत केल्यास भाजपने देशाची घोर निराशा केली आहे. केवळ योजनांचे नाव बदलून आणि त्यांचे ब्रँडिंग करून स्वत:ची पाठ थोपटवली जात आहे. त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेसची दहा वर्षांची कारकीर्द ही सरस असून, भाजपने केवळ थापा मारण्याचे उद्योग केल्याचा आरोप त्यांनी केला.

...

उत्तरेत भाजपला फटका बसणार

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा या राज्यांनी भाजपला तारले होते. आता स्थिती बदलली असून, मोदींचा करिश्माही घटला आहे. त्यातच या राज्यांमध्ये सर्व विरोधक एकत्र झाले आहेत. त्यामुळे सर्वांची बेरीज केली, तर भाजपचा या राज्यांमध्ये पराभव होणार हे निश्चित आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागांचा आकडा हा १६० ते १७० पर्यंतच राहणार असून, भाजपच्या तब्बल १२० जागा घटणार आहेत. दक्षिणेतही भाजपला फारसा जनाधार मिळणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ असल्याचा दावाही त्यांनी केला.

..

चव्हाण उवाच

- विरोधकांना एकत्रित करण्याचे काम करतोय

- मी चुकीच्या फाइल्सवर कधीच सह्या केल्या नाहीत

- राफेल विमान खरेदीत ३६ हजार कोटींचा घोटाळा

- नोटबंदीपूर्वी भाजपने आपला पैसा परदेशात पाठवला

- मोदींचे सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार

- काँग्रेसची काही जिल्ह्यात दयनीय अवस्था

- राज्यातील कृषी व उद्योग दर घसरला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोंजारून’ भरविली धडकी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बैठक म्हटली, की अधिकाऱ्यांची झाडाझडती, नोटिसा, चौकशी असे शब्द कानावर पडतात. परंतु, सोमवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त मुंढे यांचे बदललेले रूप आश्चर्याचा धक्का देऊन गेले. तुम्हाला जर कामाचा ताण असेल, तर माझ्याशी बोला, मला लेखी द्या, अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'गोंजारले.' मात्र, लेखी देण्यावरून काहींच्या मनात धडकी भरली आहे.

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे बैठक तासन् तास न चालविता कमी वेळेत आटोपल्याने आयुक्त मुंढे यांच्या या बदललेल्या रुपामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आयुक्त मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. शिस्तप्रिय कारभारामुळे बहुसंख्य लोकप्रतिनिधींसह कर्मचारीदेखील दुखावले गेले आहेत. त्यातच अभियंता रवींद्र पाटील यांच्या बेपत्ता प्रकरणापाठोपाठ महापालिकेच्या घरपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक धारणकर यांनय्दि. २ ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेते अधिकारी व कर्मचाऱ्यांतील ताणतणाव समोर आला आहे. कामाच्या ताणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मृत धारणकर यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली होती. या घटनेची तीव्र पडसाद महापालिकेत उमटले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन करीत गेल्या बुधवारी महापालिका मुख्यालयासमोर द्वारसभा घेतली. आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत संघटनेच्या नेत्यांनी या द्वारसभेत त्यांच्यावर आसूड ओढले. द्वारसभेत घोषित केल्यानुसार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने संपाची नोटीसदेखील प्रशासनाला पाठविण्यात आली. ही नोटीस प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. त्याचे पडसात खातेप्रमुखांच्या बैठकीत सोमवारी दिसून आले. बैठकीत आयुक्त मुंढे यांनी ताणतणावाचा मुद्दा उपस्थित करीत ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाचा ताण असेल त्यांनी आपल्याकडे लेखी पत्र सादर करावे, अशा सूचना दिल्या. माझ्यामुळे कामाचा ताण जाणवतोय का, असा सवाल करीत प्रत्येक खातेप्रमुखाला त्यांनी विचारणा केली. आयुक्तांच्या या थेट प्रश्नामुळे भांबावलेल्या काही खातेप्रमुखांनी कर्मचारी कमी असल्याकडे लक्ष वेधले, तर काहींनी ताण जाणवत नसल्याचा आव आणला. मुंढेंच्या या बदललेल्या रुपाने अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले.

---

संपप्रश्नी संघटनांमध्ये फूट

दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत संपाचा इशारा दिला आहे. परंतु, या संपाच्या इशाऱ्यावरून कर्मचारी संघटनांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. माकपप्रणीत संघटनेने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत संपातून माघार घेतली आहे. मनसेप्रणीत कामगार संघटनेनेही विश्वासात घेतले नसल्याचे सांगत संपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कामगार संघटनांमधील फूट टाळण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावतानगरला विनापरवानगी वृक्षांची कत्तल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेकडून मोठा खर्च करून वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश देत परिसरात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेतले जात असतानाच सावतानगर भागात परवानगी न घेताच वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

येथे वृक्षतोड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. या प्रकरणी आता संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. रायगड चौकातील हिरे विद्यालय परिसरात मागील दोन दिवसांपासून वृक्षतोड होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संदेश जगताप यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता शाळेच्या आवारातील व लगतच्या अनेक वृक्षांची तोड केल्याचे दिसून आले. यातील काही वृक्ष बुंध्यासकट कापल्याचे निदर्शनास आले, तर काही वृक्ष अधर्वट तोडल्याचे दिसून आले.

जगताप यांनी तातडीने हे काम थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबतचे निवेदन विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना देण्यात आले. संबंधित वृक्षतोड ही कोणतीही परवानगी न घेता करण्यात आली असल्याने संबंधितांवर वृक्षतोडीबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करीत असताना दुसरीकडे सर्रासरपणे झाडांची तोड करणाऱ्यांवर कारवाई केली, तर यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे मतही व्यक्‍त करण्यात आले आहे. ही वृक्षतोड कोणी व का केली, याचा तपास करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

(लीडच्या खाली वापरणे. फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images