Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खासदार गोडसेंकडून आयुक्तांचा सत्कार

$
0
0

खासदार गोडसेंकडून

आयुक्तांचा सत्कार

नाशिक : फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन-२०१८ स्पर्धेत नाशिक शहर पोलिस आय़ुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी विजेतपद पटकाविल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पोलिस आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. आयपीएस अधिकाऱ्यांमधून आयर्नमॅन विजेते पदाचा किताब डॉ. सिंगल यांनी पटकाविला. त्यासाठी शिवसेनेतर्फे पोलिस आयुक्तांचा सत्कार केला. यावेळी राजेंद्र क्षिरसागर, प्रकाश पवार, गोरख वाघ, विष्णू गोडसे, नाना काळे, सचिन बांडे, सुनील जाधव, हेमंत उन्हाळे यांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागदापासून बाप्पांसाठी गुहा

$
0
0

कागदापासून बाप्पांसाठी गुहा

इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळाचा देखावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

..

भुसा आणि कागदाचा वापर करत आठ फूट उंचीची गुहा चेतनानगर परिसरातील बाप्पांसाठी तयार करण्यात आली आहे. थर्माकोल आणि प्लास्टिक बंदी असल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कागदापासून इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळाने हा देखावा साकारला आहे. कागद आणि भुसा यांपासून साकारलेली गुहा बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.

गेल्या एकोणीस वर्षांपासून चेतनानगर येथील इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण आकर्षक देखावे मंडळातर्फे साकारण्यात येतात. गेल्या काही वर्षांपर्यंत प्लास्टिक किंवा थर्माकोलपासून मंडळ देखावे साकारत होते. मात्र, यंदा थर्माकोल आणि प्लास्टिक बंदी असल्याने कागद आणि भुसा वापरून मंडळातर्फे गुहा तयार करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढचे पाऊल टाकल्याचा अभिमान वाटत असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. कागदापासून गुहा तयार करण्यासाठी मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या घरी असलेल्या टाकाऊ कागदांचा वापर करण्यात आला. कागदाच्या पिशव्या तयार करून त्यात भुसा भरण्यात आला. या पिशव्या चिटकविण्यासाठी कागदी टेपचाच वापर केला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत खरोटे यांनी दिली. गणेशोत्सवानंतर या देखाव्यातील कागद कंपोस्ट खतासाठी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त चित्रकला, फॅन्सी ड्रेस, निबंध आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा, इच्छापूर्ती गणेश मंडळाने 'इच्छापूर्ती राजा'साठी कागदापासून संपूर्ण गुहा तयार केल्याने परिसरातील गणेश भक्तांची देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन

$
0
0

नाशिकवर शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इतिहास संशोधन मंडळातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शोधनिबंधांचे वाचन करण्यात येते. यामध्ये नाशिकचा इतिहास आणि पुरातत्त्वीय संशोधनाच्या अनुषंगाने येणारे शोधनिबंध सादर करण्यात येतात. या उपक्रमाला (दि.९ सप्टेंबर) पासून सुरूवात झाली आहे. उपक्रमाअंतर्गत नाशिकच्या इतिहासातील नव्या विषयावर प्राध्यापक, संशोधक व हौसी अभ्यासकांच्या शोधनिबंध वाचनाचा कार्यक्रम १४ ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे. शोधनिबंध सादर करण्यासाठी वीस मिनिटांचा अवधी देण्यात येणार असून, इच्छुकांनी मराठी, हिंदी अथवा इंग्रजीमध्ये शोधनिबंध ७ ऑक्टोबरपर्यंत nhrc.nashik@gmail.com या र्इ-मेलवर पाठवायचे आहेत. शोधनिबंधांची तज्ज्ञ अभ्यासकांकडून तपासल्यानंतरच शोधनिबंध सादर करण्याची परवानगी मिळेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गिरीष टकले यांनी दिली. अधिक माहितीसाठी आनंद बोरा यांना या ९८२२२८६७५० क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आज महाआरोग्य शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात आज (दि. १६) अटल महाआरोग्य शिबिराचे आयेाजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आगामी धुळे महापालिका निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय वक्तव्य करतात याकडेही धुळेकरांचे लक्ष लागून आहे.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर याअगोदर जळगाव, नंदुरबारला पार पडले आहे. आज सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर हे शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरात असंख्य आजराची मोफत तपासणी व शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तपासणीपूर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी रुग्णालये, शहरातील काही खासगी व मनपा रुग्णालयात रुग्णांची तपासणी होत आहे. या शिबिरासाठी आरोग्य विभागासह शासकीय अधिकारी कर्मचारी, भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

मुख्यमंत्री काय बोलतील?

नुकत्याच धुळे महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. तर मनपाच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांनी याबाबत अद्याप शहरात येऊन कोणतीही चर्चा अथवा माहिती घेतलेली नाही. दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी मंत्री महाजन यांना मनपाची प्रभारीपदी नियुक्तीचा विरोध केला होता. या सर्व घडामोडीने या शिबिराच्या उद्घाटनासाठी येत असलेले मुख्यमंत्री फडणवीस याबाबत माहिती आढावा घेतील का, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी केलेले नगरसेवक व पदाधिकारी या शिबिरानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील का, की आमदार गोटेंवर मनपाची जबाबदारी सोपविली जाईल असे अनेक तर्कवितर्क शहरातील नागरिकांकडून लावले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती - व्यसनाधीन तरुणाईसाठी प्रेरणादायी लढा

$
0
0

फोटो - सतीश काळे

- -

व्यसनाधीन तरुणाईसाठी प्रेरणादायी लढा

- -

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यसनाधिनतेमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणाईला पुन्हा सन्मार्गावर आणण्यासाठीचा नrलेश राजहंस यांचा लढा खऱ्या अर्थाने प्रेरणादायक आहे. दशकभरापासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात अखंड कार्यरत आहेत. आडगाव येथील हिंदुस्ताननगर परिसरात रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि व्यसनाधीन तरुणांचे पुनर्वसन असे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे हाती घेतले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत 'मटा' कार्यालयातील गणेशोत्सवातील आरतीचा मान राजहंस यांना देण्यात आला.

व्यसनाच्या आहारी जितक्या सोप्या पद्धतीने एखादा व्यक्ती जातो, तितक्या सोप्या पद्धतीने तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. मात्र, नीलेश राजहंस हे त्यातून बाहेर पडले आणि व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनाही या दलदलीतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी सुरू केले. व्यसनांमुळे कित्येकांचे कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, व्यसनाच्या आहारी जाण्यात तरुण पिढीचे प्रमाण वाढत आहे, ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन नीलेश राजहंस यांचे दहा वर्षांहून अधिक काळापासून व्यसनमुक्तीसाठी काम सुरू आहे. नाशिकमध्ये आडगाव येथील हिंदुस्ताननगर परिसरात २००८ साली लाइफ, ड्रग्ज अॅण्ड अल्कहोल रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना केली. ड्रग्ज, अल्कहोल, मेडिकल डिपेन्डन्सीच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना त्यांतून बाहेर काढण्याचे मोठे काम या सेंटर अंतर्गत केले जात आहे. एक ते तीन महिन्याच्या कालावधीत येथे ही व्यसनमुक्तीची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर येथील व्यक्तींना रोजगार मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. या कामामुळे आज अनेक व्यक्ती, कुटूंबे आनंदाने जीवन जगत आहेत.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारुण्याचे दर्शन घडविणारे ‘अत्त दीप भव:’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युवराज सिध्दार्थाचे गौतम बुध्द होणे, गौतम बुध्दांना सत्याचा साक्षात्कार होणे, लक्ष्मीनारायण वैश्यांचे कलेवर पाहून सत्याची जाणीव होणे अशा घटनांमधून तथागत गौतम बुध्द सादर करण्यात आले. निमित्त होते, अत्त दीप भव: नाटिकेचे.

अनागरिक धम्मपाल जयंती उत्सव आणि जागतिक पाली भाषा गौरव दिनानिमित्ताने संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पाली मराठी भाषेतील नाटिका 'अत्त दीप भव'चे सादरीकरण करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा प्रयोग झाला. युवराज सिध्दार्थाच्या गृहत्यागाची वास्तविक कारणमिमांसा, सुजाताचे सिध्दार्थला खीरदान, सिध्दार्थाचा मार प्रवृत्तीवर विजय, सम्यकसंबोधी प्राप्ती, प्रथम धम्मचक्र प्रवर्तन, प्रकृतीची चांडालिका, धम्मदीक्षा, दरोडेखोर, अंगुलीमालची धम्मदीक्षा आणि अर्हता पआप्ती असे विविध प्रसंग नाटिकेत सादर करण्यात आले. आजच्या सामाजिक परिस्थितीत युध्द नको बुध्द हवे तसेच समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व हा संदेश देण्याचा प्रयत्न नाटिकेतून करण्यात आला.

अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. अनिर्वाण दश यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप पवार, करुणासागर पगारे यांची उपस्थिती होती. या नाटिकेचे लेखन माधव सोनवणे यांनी केले असून, दिग्दर्शन प्रशांत हिरे यांनी केले. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. वेशभूषा मिलिंद साळवे यांची, तर प्रकाशयोजना रवी रहाणे यांची होती. संगीत शुभम लांडगे, नेपथ्य धनंजय करके, अंकिता पाटील, मिलिंद अंभोरे, अभिनव लोखंडे यांचे होते. यात तथागत गौतम बुध्दांच्या भूमिकेत सचिन चव्हाण होते. दिलीप काळे, भूषण गायकवाड, शकुंतला दाणी, मृणाल निळे, भावना शिंदे, अश्विनी सूर्यवंशी, सुनील जगताप, डॉ. सोनाली गायकवाड सम्राट सौंदाणकर यांनी या नाटकात भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्यात२० ला बुद्धिबळ स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखान्यातर्फे गुरुवारी, २० सप्टेंबर रोजी शिवाजी रोडवरील नाशिक जिमखान्यात बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ९ व १५ वर्षांखालील वयोगटांसाठी आहे. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. इच्छुकांनी १८ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिमखान्यात सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत आपल्या प्रवेशिका प्रवेश शुल्कासह संस्थेच्या कार्यालयात द्याव्यात. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, मानद सचिव राधेश्याम मुंदडा, सहसचिव शेखर भंडारी व गेम सेक्रेटरी झुलकरनैन जागीरदार यांनी ही माहिती दिली. स्पर्धेचे प्रमुख पंच मंगेश गंभिरे आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात ०२५३-२५८१०८९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयांतर्फे आज बाप्पांना दिला जाणार निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी समितीतर्फे पाचदिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेले पाच दिवस अनेक महाविद्यालयांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. बाप्पांचा पाच दिवसांचा मुक्काम झाल्यानंतर आज, सोमवारी (दि. १७) रोजी महाविद्यालयांतील बाप्पांचे विसर्जन होणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा सर्वांनीच पुढाकार घेतल्याचे दिसते. अनेक महाविद्यालयांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी महाविद्यालय आवारात विद्यार्थ्यांनी बाप्पांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. बाप्पांचा पाच दिवस विधिवत पाहुणचार करण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी कृती समितीतर्फे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश या सोहळ्याद्वारे देण्यात आला. नारळ आणि नारळाच्या पानांपासून सुबक आरास साकारण्यात आली होती. येथील बाप्पांच्या विसर्जनासाठी आजा सिनेअभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा कॅम्पसमध्ये रंगणार आहे. बीवायके महाविद्यालयात दुपारी १ वाजता बाप्पांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन होणार आहे. एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या विनायकाचे विसर्जन दुपारी ३ नंतर कॅम्पसमध्ये केले जाणार आहे. शहरातील इतर महाविद्यालयांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक दुपारी १२.३० नंतर महाविद्यालय आवारात काढली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधारसक्तीची अट शिथिल

$
0
0

'एनटी'च्या वतीने नेट अन् जेईईसाठी सूचना

..

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

राष्ट्रीय स्तरावरील अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाऱ्या नेट (नॅशनल इलिजीबिलिटी टेस्ट) परीक्षेसाठी आधारकार्ड सक्तीची अट शिथिल करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना आधारऐवजी इतर कुठलाही शासकीय अधिकृत ओळखपत्राचा क्रमांक द्यावा लागणार आहे. याबाबतची सूचना एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने जाहीर केली आहे. जेईई मेन परीक्षेसाठीही हा निर्णय लागू असणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट परीक्षा यंदा एनटीएमार्फत घेतली जात आहे. नेट परीक्षेसाठी आधारसक्ती असल्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. अनेकांनी याबाबत एनटीएकडे विचारणा केल्यानंतर एनटीएने 'नेट' आणि 'जेईई मेन' या परीक्षांसाठी ही सक्ती नसल्याचे सांगितले. यंदापासून नेट परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पध्दतीने घेतली जाणार आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर एकूण चार सत्रात पार पडणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील.

...

पासपोर्ट, बँक खाते क्रमांकही ग्राह्य

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल असे विद्यार्थी अर्ज भरतेवेळी पासपोर्ट, बँक खाते क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक किंवा इतर कुठल्याही शासकीय ओळखपत्रावरील क्रमांक अर्जात भरू शकणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या जेईई मेन या परीक्षेसाठीही हे निकष लागू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्यांचा दणका सुरूच

$
0
0

घरफोड्यांचा दणका सुरूच

दोन दिवसात आठ घटनांची नोंद; अवैध धंद्यांमध्ये वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एैन सणासुदीच्या काळात घरफोडींच्या गुन्ह्यांनी गती घेतली असून, दोन दिवसात आठ घटनांची नोंद झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये सरासरी प्रमाण कमी करण्यात यश मिळालेल्या पोलिसांसमोर चोरट्यांनी अवघ्या दोन दिवसांत आवाहन निर्माण केले असून, शहरात काही ठिकाणी सुरू होत असलेल्या अवैध धंद्यांचा हा परिणाम असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शहराच्या विविध भागात चोरट्यांनी तब्बल सहा ठिकाणी घरफोडी करून १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी गंगापूर, मुंबईनाका, उपनगर, सातपूर आणि अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा झालेला नसताना आणखी दोन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटना गंगापूर आणि पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत झाल्या आहेत. पंचवटी पोलिसांकडे किशोर बसंतीलाल ललवाणी (४३, रा. दिंडोरीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे शरदचंद्र मार्केटमध्ये नवकार ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागील भिंतीस असलेल्या खिडकीचे ग्रिल वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील चार चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम असा सात हजार रुपयांचा मुद्देमाल उचलला. मात्र, दुकानात सीसीटीव्ही सुरू असल्याचे समजताच त्यांनी आपला मोर्चा सीसीटीव्हीच्या डिव्हीआरकडे वळवला. चोरट्यांनी हा २५ हजार रूपयांचा डिव्हीआर देखील काढून पोबारा केला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. व्ही. गिरमे करीत आहेत. दरम्यान, गंगापूररोडवरील धृवनगर येथील स्वामी पुष्प अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विजय युवराज जाधव यांचे घर चोरट्यांनी फोडले. ही घटना १३ सप्टेंबर रोजी भर दुपारी २ वाजता झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत, १७ हजार २०० रूपयांची रोकड, असा ९७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी जाधव यांच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास हवालदार पाटील करीत आहेत.

अवैध धंद्यांची चर्चा

शहरातील अवैध धंद्यावरील अंकुश काही दिवसांपासून सैल पडला असून, बऱ्याच ठिकाणी उघड धंदे सुरू झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी भरणारे जुगाराचे फड विनासायास पडल्याचा दावा करण्यात येत असून, त्याचा परिणाम वाढत्या गुन्ह्यांमधून समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरवरच तृष्णातृप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सूनचा हंगाम सरत आला असतानाही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रहिवाशी तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने २०३ गावे आणि वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांना टँकरपुढे ओंजळ धरावी लागते आहे. विशेष म्हणजे जुलैमध्येच टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद होणे अपेक्षित असताना सप्टेंबरमध्येही टँकरवाऱ्या सुरू ठेवण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे.

जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा मान्सूनचा कालावधी असून, या कालावधीत समाधानकारक पाऊस झाला तर पाणीटंचाईच्या झळा कमी होत जातात. ३१ जूननंतर खरेतर जिल्ह्यातील कोणत्याही गावाला टँकरद्वारे पाणी पुरवावे लागू नये, असा राज्य सरकारचा आणि जिल्हा प्रशासनाचाही मानस असतो. परंतु, यंदा पावसाने जिल्हावासीयांचा हिरमोड केला आहे. सप्टेंबरचा अखेरचा पंधरवडा उजाडूनही जिल्ह्यात केवळ ८० टक्केच पाऊस पडला आहे. या पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढण्यास मोठी मदत झाली. परंतु, जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर पट्ट्यातील काही तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस होऊ शकलेला नाही. काही मंडळांकडे तर पावसाने पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. त्यामुळे येवला, मालेगाव, नांदगाव यासारख्या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली तरी फारसे पाणी जमिनीत मुरू शकलेले नाही. येथील जलाशयांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी पाण्यासाठी टँकरची मागणी कायम ठेवली आहे. आजमितीस जिल्ह्यातील ५७ गावे आणि १४६ वाड्या अशा २०३ ठिकाणी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवला आहे. हे टँकर दररोज १३६ फेऱ्या पूर्ण करून संबंधित ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. सिन्नर, येवला, मालेगाव, देवळा, नांदगाव या तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी टँकरच्या प्रस्तावांना जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्येही मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाने पाठ फिरविल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

..

२७ विहिरी अधिग्रहीत

टँकर बरोबरच विहीर अधिग्रहणाचा पर्यायदेखील जिल्हा प्रशासनाने अवलंबला आहे. जिल्ह्यात २८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, त्यापैकी २१ विहिरी गावांसाठी, तर सात विहिरी टँकरसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.

-

तालुका गावे टँकर संख्या

येवला ५० १८

सिन्नर ४८ ९

मालेगाव ३५ ८

नांदगाव ६६ ६

देवळा ४ १

एकूण २०३ ४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफी मागण्याचा प्रश्नच नाही

$
0
0

दिनकर पाटील यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत येणारा एकही लोकप्रतिनिधी आयुक्त तुकाराम मुंढे यांचीच काय तर कोणत्याही अधिकाऱ्याची माफी मागणारे नाहीत याची मी १०० टक्के ग्वाही देतो, असा दावा दिनकर पाटील यांनी केला आहे.

मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर बारगळल्यानंतरही या प्रकाराची धगधग महापालिकेत कायम आहे. या अविश्वास प्रस्तावावर सह्या करणाऱ्या सदस्यांचे माफिनाम्याचे नाट्य महापालिकेत उभे करण्यात आले होते. परंतु, ते फसल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थायी समितीवर विषय हवे असतील तर मुंढे यांच्याशी जुळवून घ्या, असे निरोप भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून स्थायीच्या सदस्यांना निरोप दिले जात आहेत. त्यामुळे आयुक्तांची भेट घेण्यासाठी शनिवारी (दि. १५) सकाळी साडेअकराचा मुहूर्त ठरविण्यात आला. तसे मेसेज मोबाइलवर पाठविण्यात आले. परंतु, त्याबाबत आक्षेप घेत काही सदस्यांनी आयुक्तांची भेट घेण्यास नकार दिला. आयुक्तांची माफी का मागायची, असा सवालही उपस्थित केला. महिला सदस्यांनी मात्र आयुक्त मुंढेंची भेट घेतल्याची चर्चा होती. नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीबाबत आयुक्तांशी चर्चा झाल्याचा दावाही काही महिला लोकप्रतिनिधींनी केला. विशेष म्हणजे पुरुष सदस्यही तेथे उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विषयाबाबत पाटील यांनी रविवारी भूमिका स्पष्ट केली. लोकांमधून निवडून जाणारा महापालिकेतील कोणताही सदस्य मुंढे यांची माफी मागणार नाही, असा दावा दिनकर पाटील यांनी रविवारी केला आहे.

भाजपमध्ये अंतर्गत वाद नाहीत

महापालिकेतील सभापती तसेच स्थायी समितीचे व अन्य सदस्य देखील कामानिमित्त आयुक्तांकडे जाऊ शकतात. परंतु, ते तेथे गेले तरी मुंढे यांची माफी मागणार नाहीत. महापालिकेतील प्रत्येक सदस्य स्वाभिमानी असून तो स्वत:च्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही. लोकप्रतिनिधींमध्ये प्रभागात अधिकाधिक विकासकामे करण्याची स्पर्धा असू शकते. विकासकामांबाबतच्या स्पर्धेमुळे वाद-विवादही होऊ शकतात. मात्र, भाजपमधील कोणत्याही सदस्यासह आमदारांमध्ये वाद-विवाद नाहीत असा दावा पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ करून महिलेस विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील भांडणाची कुरापत काढून एकाने महिलेस जातीवाचक शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली.

विजय दिनकर पाटील (४३, रा. सिटू भवनमागे, खुटवडनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती संशयित आरोपीकडे भाडेकरू म्हणून राहते. संशयित आरोपीने शनिवारी (दि. १५) रात्री आठ वाजेच्या सुमारास महिलेच्या खोलीत प्रवेश केला. विना परवानगी घरात प्रवेश केल्याबाबत महिलेने संशयितास जाब विचारला असता संशयिताने तिला शिवीगाळ सुरू केली. यावेळी संशयिताने महिलेच्या आई व मुलाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. यानंतर त्याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी आणि विनयभंग, शिवीगाळ आदी कलमानुसार गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली. घटनेचा पुढील तपास विभाग तीनचे सहायक पोलिस अरविंद आडके करीत आहेत.

जिममधून महिलेचा मोबाइल लंपास

जिमसाठी आलेल्या महिलेने बँगेत ठेवलेला ५० हजार रुपयांचा मोबाइल आणि एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चोरट्यांनी काढून घेतले. हा प्रकार इंदिरनगर परिसरातील बापू बंगल्याजवळील एच फिटनेस या जिममध्ये घडला असून, या प्रकरणी आलिशा विजय पानसरे (२८, रा. बी ४, वेदास स्पेसस, गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पानसरे शनिवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास जिममध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपला मोबाइल व क्रेडिट कार्ड एका बँगेत काढून ठेवले. व्यायाम आटोपून परत आल्यानंतर बँगेत मोबाइल आणि कार्ड नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी इंदिरनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार आर. के. शेख करीत आहेत.

..

कट मारल्याच्या वादातून हल्ला

कट मारल्याच्या वादातून चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास देवळालीगावातील दक्षिण हनुमान मंदिराजवळ घडली. या प्रकरणी हरिओम चंद्रकांत पवार (१७, रा. तेलीगल्ली, देवळालीगाव) याने फिर्याद दिली आहे. पवारच्या फिर्यादीनुसार, रात्रीच्या सुमारास तो हनुमान मंदिर येथे आरती करीत असताना संशयित आरोपी कार्तिक भडांगे, सागर मोरे, सुशांत भालेराव आणि कार्तिकचा मोठा भाऊ असे चौघे तिथे आले. त्यांनी दुपारच्या सुमारास दुचाकीस कट मारल्याचा राग मनात धरून थेट लाकडी दांड्याने तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात जखमी झालेल्या पवारला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक काकड करीत आहेत.

....

जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक

भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी कारवाई करीत जुगार खेळणाऱ्या १५ जणांची धरपकड केली. या सर्वांवर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भद्रकाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास काजीपुरातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या शिवक्रांती सांस्कृतिक गणेश मंडळांच्या मागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी आठ संशयित जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड हस्तगत केली. संशयितांमध्ये हिरामण काश्मिरे (५८, रा. मानेकशानगर, द्वारका), कांतीलाल बिरार (५२, रा. गडकरी चौक), पंकज काळे (४२, रा. बनकर मळा), संजय अवसरकर (४८, रा. जुने नाशिक), जहिर शेख (३९, रा. चौकमंडई), विनायक करंजकर (३४, रा. मधली होळी, जुने नाशिक), गणेश तोरे (३१, भाभानगर) आणि ऋषिकेश काळे (२१, काजीपुरा) यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास हवालदार सातपुते करीत आहेत.

दरम्यान, अशाच प्रकारची कारवाई मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या पथकाने केली. पोलिस पथकाने शुक्रवारी (दि.१४) रात्री १० वाजेच्या सुमारास गोविंदनगर परिसरातील नासर्डी नदीजवळील भावसागर भवनच्या पाठीमागे असलेल्या चौक क्रमांक सात येथे छापा मारला. यावेळी लक्ष्मण दावाड (३६), शरद पागे (२३), उमेश गायकवाड (१९), सागर भांगरे (२०), योगेश कडाळे (२२), दिपील भांगरे (२२), सिद्धार्थ हे संशयित युवक जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून रोकड आणि पत्ते हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस शिपाई राजेंद्र उगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास हवालदार एस. पी. क्षिरसागर करीत आहेत.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू

$
0
0

नाशिक : स्वाइन फ्लूवर उपचार घेत असलेल्या इंदिरानगरमधील ४८ वर्षांच्या व्यक्तीचा आज, रविवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रशांत सुभाष कुलकर्णी असे या व्यक्तीचे नाव आहे. कुलकर्णी यांना गुरुवारी (दि. १३) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील महिनाभराचा विचार करता या कालावधीत १९ जणांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल ७/१२ वर ‘ओटीपी’चा उतारा

$
0
0

गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाने 'ओटीपी'चा उतारा काढला आहे. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी सात-बारा कॅफे किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना लगाम बसणार आहे. सात-बारा मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओटीपी क्रमांक येणार असून त्यानंतरच सात-बारा मिळणार आहे.

डिजिटल इंडिया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत ई-महाभूमी प्रकल्पात मास्टर ट्रेनरसाठी महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांच्यासाठी नाशिक येथे स्वामीनारायण मंदिराच्या हॉलमध्ये कार्यशाळा झाली. यावेळी ई-महाभूमीचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी या अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिली. यावेळी जगताप म्हणाले, की सुरुवातीला किती सात-बारा काढावे यावर नियंत्रण नसले तरी सातबारा काढणारे नंबरवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कोण सातबारा जास्त काढतो याची खातरजमा करून त्यावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा केली जाणार आहे. ही सुविधा जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथे तातडीने मिळणार असली तरी नाशिक जिल्ह्याला मात्र त्यासाठी दोन दिवस वाट बघावी लागणार आहे. नाशिकचा पोर्ट ओपनिंग इश्यू असल्याने ही दिरंगाई होणार आहे. या कार्यशाळेत उपनिंबधक कार्यालयातील अधिकारी, मुद्रांक विभागातील अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

ऑक्टोबरमध्ये दुरुस्तीसाठी डेडलाइन

सात-बारामध्ये असलेली दुरुस्ती ऑनलाइन कशी करावी, यासाठी महसूल विभागातील प्रत्येक तालुक्यातील दोन तलाठी, तहसीलदार व नायब तहसीलदारांना ट्रेनिंग देण्यात आली आहे. ते त्यानंतर आपल्या तालुक्यात ही ट्रेनिंग इतरांना देणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही सर्व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन सात-बारामध्ये चुका दुरुस्ती कमी राहणार आहे.

असे आहे डेटा सेंटर

राज्यात ऑनलाइन सातबारासाठी डेटा कुठे आहे. याबद्दल जगताप यांनी माहिती दिली. त्यात मुंबईतील स्टेट डेटा सेंटमध्ये १९ जिल्ह्यांचा डेटा आहे. तर बंगलोर येथे बीएसएनलच्या क्लाऊड आठ जिल्ह्याचा डेटा आहे. पुणे येथे नॅशनल डेटा सेंटरमध्ये ६ जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच दोन जिल्ह्यात स्वंतत्र सर्व्हर जिल्हाधिकारी कार्यालयात आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशदर्शन...

$
0
0

गणेशदर्शन...

विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाल्याने सर्वच मंडळांचे खुले झालेले देखावे अन् रविवारच्या सुटीची पर्वणी साधत नाशिककरांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह पंचवटी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर आदी उपनगरांतही सार्वजनिक मंडळांनी वैविध्यपूर्ण देखावे साकारण्यासह सुबक मूर्तीलादेखील प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्याची ही झलक...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्षांना स्मरणपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटची तपासणी सुरू झाली असून, अजूनही या तपासणीला हजर राहण्याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वारस्य दाखविलेले नाही. त्यामुळे निवडणूक शाखेने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना याबाबत स्मरणपत्र पाठविले आहे. या स्मरणपत्राची देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दखल घेतली न गेल्यास संबंधित पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना याबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम मशिन नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अंबड येथील वेअर हाऊसमध्ये ते ठेवण्यात आले आहेत. या मशिन्सची तपासणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे २० इंजिनीअर्स नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी या मशिन्सच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या तपासणीला उपस्थित राहून शंकांचे निरसन करवून घ्यावे, असे आवाहन निवडणूक शाखेने सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व सचिवांना केले होते. परंतु, शिवसेना आणि काँग्रेस वगळता अन्य कोणत्याच पक्षाने त्यांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे याबाबतचे स्मरणपत्र निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बडे आणि तहसीलदार गणेश राठोड यांनी संबंधित जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेखाटले कल्पनेतील बाप्पा

$
0
0

रेखाटले कल्पनेतील बाप्पा (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लहान मुले व गणेशाचे नाते अतूट आहे. आपल्या कल्पनेतील रंगसंगतीमध्ये बाप्पाला रंगवायला मुलांना नक्कीच आवडते. हाच निखळ आनंद त्यांना मिळावा या उद्देशाने उपनगर परिसरातील बालगोपालांसाठी जल्लोष फाउंडेशनतर्फे रविवारी 'आय लव्ह गणेशा' चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेत बच्चेकंपनीने कल्पनेतील बाप्पा रेखाटण्याची अनुभूती घेतली. स्पर्धेच्या तिन्ही गटांमध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या अध्यक्षा नीलम हासे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ओम बोरसे याने प्रथम, हिमांशू अकोले याने द्वितीय व श्रेया बढे हिने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून मानसी सागर आणि पूजा तुंगार यांनी काम पाहिले. प्रवीण अग्रवाल, शैलेश पाटील, विकास हासे यांनी संयोजन केले. तुषार पगारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांचा २५ पासून एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या पुण्यामध्ये रविवारी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत महासंघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती 'सपुक्टो'चे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी दिली.

संघटनेतर्फे महिनाभरात आतापर्यंत सहा आंदोलने करण्यात आली. यामध्ये काळ्या फिती लावून निषेध आंदोलन, निदर्शने, धरणे, जेलभरो आंदोलनांचा समावेश आहे. या आंदोलनांची तीव्रता या पुढील टप्प्यात वाढविण्यात येणार असल्याचेही डॉ. नंदू पवार यांनी सांगितले. या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून मंगळवारी (दि. १८) महाराष्ट्रातील सर्व नियमित, कंत्राटी, सीएचबी प्राध्यापक एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पार पाडणार आहेत. 'एमफुक्टो'ने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होतील. यानंतरही सरकारने संघटनेशी बोलणीची तयारी न दर्शविल्यास २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

अशा आहेत मागण्या

'एमफुक्टो'च्या नेतृत्वाखाली राज्यभरात महिनाभरापासून आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनातील मागण्यांमध्ये प्रामुख्याने शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेतनव्यवस्था नियमित करावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, बेकायदेशीर कपात केलेले ७१ दिवसांचे वेतन अदा करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, नामनिर्देशनाचा धुमाकूळ बंद करावा या मागण्यांचा समावेश आहे.

प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्यात आहेत. यासाठी प्राध्यापकांनी एकजूट दाखवित वेळोवेळी केलेल्या आंदोलनानंतरही सरकारची भूमिका समन्वयाची नाही. मागील आंदोलनांचा अनुभव लक्षात घेता येत्या २५ सप्टेंबरपासून आंदोलनाची तीव्रता वाढवत कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यात सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

- प्रा. डॉ. नंदू पवार, उपाध्यक्ष, सपुक्टो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय हजारे चषक;सत्यजित राज्य संघात

$
0
0

विजय हजारे चषक;

सत्यजित राज्य संघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयतर्फे होणाऱ्या विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याची निवड झाली आहे. बेंगलुरू येथे १९ सप्टेंबरपासून होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघ एकूण आठ सामने खेळणार आहे. महाराष्ट्राच्या संघासोबत नाशिकचेच शेखर गवळी ट्रेनर म्हणून काम पाहणार आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र संघाकडून खेळताना सत्यजितने रणजी स्पर्धेत, तसेच टी-२० व विजय हजारे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सत्यजितने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळेच सत्यजितची विजय हजारे चषकासाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images