Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0
'प्रशासनातील अधिकारी एका माजी मंत्र्याच्या मुलाकडून लाच मागतो, ही बाब धक्कादायक आहे. पालकमंत्र्याचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचेच यातून स्पष्ट होते आहे.

प्राध्यापकास लुटले

$
0
0
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील प्राध्यापकास अडवून त्यांच्याकडील दागिने चोरट्यांनी लुटून नेण्याची घटना गुरुवारी रात्री ट्रॅक्टर हाऊस येथे घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.

फी वाढीसाठी उपसंचालकांना पत्र

$
0
0
एकीकडे शिक्षण उपसंचालकांनी मंजूर केलेल्या रकमेपेक्षाही फी कमी होत असल्याचा दावा पालक करीत असतानाच दुसरीकडे रासबिहारी शाळेने मा‌त्र उपसंचालकांना मंजूर केलेल्या फीमध्ये काही वगळलेला खर्च ग्राह्य धरण्याची विनंती केली आहे.

कागदपत्रे दाखवा नाही, तर वाहन जमा करा

$
0
0
शहरात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर तसेच चोरीला जाणा-या वाहनांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

चर्मकारांसाठी मुक्त विद्यापीठाचा शिक्षणक्रम

$
0
0
चर्मोद्योग व्यवसायात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ती कौशल्ये विकसित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे 'चर्मोद्योग कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम' नव्याने सुरू करण्यात आला आहे. या शिक्षणक्रमाची प्राथमिक ओळख करून देणारी तीन दिवसीय कार्यशाळा विद्यापीठात नुकतीच पार पडली.

सिस्टीममधील 'देवघेव'

$
0
0
तब्बल ६५ लाख रुपयांची लाच स्वीकारणा-या जळगावमधील पोलिस निरीक्षकास अटक करून काही दिवस उलटत नाहीत तोच अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिका-यांनी छापा टाकून विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांना ११ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

भरपाईसाठी दालनात फेकली द्राक्षे

$
0
0
कादवा सहकारी साखर कारखान्यामुळे उभ्या बागेतली द्राक्ष खराब झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात द्राक्ष फेकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

पुरस्कार वितरणाला विलंब नको

$
0
0
राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना दिले जाणारे पुरस्कार त्यांना एकप्रकारे ऊर्जाच देत असतात. त्यामुळे सरकारतर्फे जाहीर होणारे पुरस्कारदेखील वेळच्या वेळी देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केले.

आरोग्य अधिका‍-यांची फरफट

$
0
0
सार्वजनिक आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे बहुतांश अधिका‍‍-यांना दोन-तीन पदांचा भार सांभाळावा लागत असून काहीजणांकडे तर चक्क चार पदांचा भार आहे. परिणामी या अधिका‍-यांची फरफट होत आहे.

सार्वजनिक आरोग्य प्रभारींच्या हाती!

$
0
0
राष्ट्रीय आरोग्य धोरणाची अंमलबजावणी व राज्याच्या आरोग्याची धुरा खांद्यावर असलेल्या सार्वजनिक आरोग्य खात्यात रिक्त पदे न भरल्याने सुमारे ६० महत्त्वाच्या पदांचा कारभार अॅडिशनल चार्जवर सुरू आहे.

सेनेच्या कार्यकारिणीला ब्रेक ?

$
0
0
वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ पाहणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकारिणीला पुन्हा एकदा ब्रेक लागला असून त्यामागे शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या सुनील बागुल व अर्जुन टिळे यांनी आयोजित केलेला मेळावा असल्याची चर्चा आहे.

सिन्नरच्या औष्णिक प्रकल्पात चाचणी सुरू

$
0
0
गुळवंच येथील इंडिया बुल्स वीज प्रकल्पात वीज निर्मितीचा पहिला टप्पा असलेली स्टीम ब्लोइंग चाचणी बुधवारपासून सुरू झाली आहे. दोन ते तीन आठवडे ही चाचणी सुरू राहणार असून वीज निर्मितीसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सभेद्वारे जिल्हा बँकेचे व्हॅलेंटाइन

$
0
0
केंद्र सरकारने केलेल्या ९७व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा येत्या १४ फेब्रुवारीला होणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी होणा-या या सभेत संचालकांना कात्री लावण्याचा ठरावही होणार आहे.

दुर्लक्ष करू नका

$
0
0
महापालिका म्हणजे कामाचे ठिकाण कमी व विविध आंदोलनांची निवेदने स्वीकारणारे ठिकाण अधिक होऊन बसले आहे. असेच विविध मागण्यांसदर्भात निवेदन देण्यासाठी परवा पालिकेसमोर गर्दी झाली.

फंडाचं 'सिक्रेट'!

$
0
0
राज्यभरातील वनाच्छादित भागात खबऱ्यांचं जाळं पसरविण्यासाठी वनविभागानं सिक्रेट फंडाचं हत्यार उपसलं आहे. अशाप्रकारचा फंड यापूर्वीही होता. पण, काही काळ हा फंड सुप्तावस्थेत गेला होता. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाला या फंडाचा परिणामकारक करणे अत्यावश्यक आहे.

अंबड एमआयडीसीत चोरी

$
0
0
अंबड एमआयडीसीतील अरिहंत ऑटो इंडस्ट्रीज या कंपनीमधील सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीची पत्रे चोरट्यांनी चोरी केली. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षारक्षकावर संशय व्यक्त केला असून सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

उद्योगांसाठी नाशकात परिषद

$
0
0
नाशकातील उद्योजकांसाठी येत्या २३ फेब्रुवारीला बिल्डिंग सस्टेनेबल एंटरप्रायजेस-४ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक उद्योजक मंचच्या वतीने होणा-या या परिषदेत उद्योजकांना यशस्वी मार्गदर्शन मिळण्याबरोबरच मान्यवर आणि तज्ज्ञांचा सहवासही लाभणार आहे.

तीस लाखांची कामे मंजूर

$
0
0
सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत सुमारे तीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. प्रभागातील विविध समस्या नगरसेवकांनी सभेत मांडल्या.

दुष्काळासाठी एक दिवसीय वेतन

$
0
0
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने राज्य सरकारी कर्मचा-यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला.

बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास ही काळाची गरज

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करणे ही काळाची गरज असून भारताकडे त्यांच्या अमूल्य अशा विचारांचा ठेवा आहे. हाच ठेवा भविष्यकाळात मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>