Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इंधन दरकपातीने दिलासा

$
0
0

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीमुळे पोळलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत रविवारी सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल ९९ पैशांनी, तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे. पाच दिवसांत इंधनाच्या किमती कमी झाल्याने इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमतीत घट झाल्याने वाहनचालक सुखावले आहेत. सण- उत्सवांच्या काळात इंधनाच्या किमती कमीच राहाव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

देशभरात सर्वत्र गेल्या पाच दिवसांपासून इंधनाच्या किमतीत घट झाली आहे. नाशिकमध्ये रविवारी (२१ ऑक्टोबर) पेट्रोल ८७.४६ रुपये आणि डिझेल ७८.१६ रुपये होते. मंगळवारी (१६ ऑक्टोबर) पेट्रोलची ८८.४५, तर डिझेलची ७८.२७ रुपये किंमत होती. या पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतातील तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली असल्याचे समजते. इंधन दर कमी झाल्याबरोबर वाहनचालक सुखावले आहेत. इंधन दरवाढीमुळे दुप्पट रक्कम वाहनचालकांना मोजावी लागत होती. महिन्याचा आर्थिक ताळेबंद यामुळे कोलडत असल्याचे मत वाहनचालक व्यक्त करीत होते. मात्र, पाच दिवसांत इंधनाच्या किमती कमी झाल्याने दिवाळीच्या उंबरठ्यावर दिलासा मिळाल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती नव्वदीपर्यंत पोहोचल्याने इंधन दिवाळीअगोदर शंभरी गाठणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. ९९ आणि ११ पैशांनी का होईना, पण इंधनाची किंमत कमी झाल्याचा आनंद आता वाहनचालक व्यक्त करीत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर इंधन दरवाढीपेक्षा स्वस्ताईची भेट कायम राहावी, असे मत सर्वसामान्य मांडत आहेत.

\B

पाच दिवसांतील इंधनाचे दर\B

दिनांक - पेट्रोल - डिझेल

१६ ऑक्टोबर - ८८.४५ - ७८.२७

१७ ऑक्टोबर - ८८.१० - ७८.५०

१८ ऑक्टोबर - ८८.०४ - ७८.३९

१९ ऑक्टोबर - ८७.९८ - ७८.२९

२० ऑक्टोबर - ८७.४४ - ७८.१६

२१ ऑक्टोबर - ८७.४६ - ७८.१६

पेट्रोलचे दर कमी झाल्याने आनंद आहे. पाच दिवसांत पेट्रोल बऱ्यापैकी स्वस्त झाले आहे; पण शनिवारपेक्षा रविवारी दोन पैशांनी पेट्रोल महाग होते. सण-उत्सवाच्या काळात आता इंधन दरवाढ होऊ नये, ही अपेक्षा आहे.

- आशिष कुलकर्णी, नागरिक

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणारी घट कायम असावी. नव्वदीच्या जवळ इंधन गेल्यावर त्रास सहन करावा लागतो. सध्या डिझेल आणि पेट्रोलची किंमत कमी होत आहे. त्यामुळे दिलासा आहे; पण आता पुन्हा दरवाढ अपेक्षित नाही.

- राकेश पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मासिक पाळीविषयी आदिवासी आणि दुर्गम परिसरात आजही असणाऱ्या अनेक गैरसमजांचे निराकारण व्हावे अन् ग्रामीण भागातील लेकींचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी प्रयास आणि गूंज या सामाजिक संस्थांच्या वतीने वर्षभराच्या गणनेनुसार ९४३ विद्यार्थिनींना १ लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यासाठी पेठ तालुक्यातील पाच शाळांची निवड झाली. यावेळी या सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

शरीरधर्मास सामोरे जाताना अद्यापही अनेक चुकीच्या रुढी-परंपरा समाजात प्रचलित आहे. हे चित्र बदलून विद्यार्थिनींमध्ये सजगता यावी, या उद्देशाने पेठ तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा इनामबारी, आसरबारी, म्हसगण, आंबे आणि बोरवट या शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. या आरोग्य विषयक सत्रामध्ये प्रबोधनासाठी आवश्यक त्या संज्ञा समजावून सांगण्यात आल्या. यात शरीराची रचना, विविध आजार, शरीराची काळजी, आहार-पद्धती, समज-गैरसमज आदी विषय मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनीही शंका उपस्थित केल्या त्यांनाही उत्तरे देण्यात आली. आरोग्यनिगेसंदर्भातील विविध प्रबोधनात्मक चित्रफिती व अॅनिमेशन्सही दाखविण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन्सच्या विघटनाचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आले.

विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी प्रयास युवा मंचच्या स्वयंसेवक आणि के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा वासवानी, अश्विनी बिडवाईक, पूजा बिडवाईक, समृद्धी कोळी, नेहा पाटील आणि प्राजक्ता राजपूत यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास गूंज फाऊंडेशन संस्थापक अंशू गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे नियोजन प्रयास युवा मंचचे चेतन नारखडे, प्रफुल्ल पाटील, योगेश शेळके आणि गौरीश गोखले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवाड्याचा कोंडला श्वास!

$
0
0

सराफ असोसिएशनचे आयुक्त मुंढेंना साकडे; अतिक्रमणाने वाहतूक कोंडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सराफ बाजारासह या परिसरातील पेशवेकालीन 'सरकारवाडा' या वास्तूला पुन्हा एकदा फेरीवाले आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मनपाच्या फेरीवाला नियोजन समितीत झालेल्या ठरावानुसार हा सर्व परिसर 'नो-हॉकर्स झोन' झालेला असताना केवळ अंमलबजावणी अभावी हा परिसर समस्येच्या कोंडीत सापडला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याप्रश्नी त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दी नासिक सराफ बाजार असोसिएशनने दिला.

येथील सराफ बाजारास पेशवेकालीन संदर्भ आहेत. येथे वर्षाकाठी हजार कोटींची उलाढाल होते. याशिवाय या परिसरातील सरकारवाडा वास्तूभोवती फेरीवाल्यांना परवानगी नाही. मात्र, तरीही वर्षानुवर्षे येथे अतिक्रमण करणाऱ्यांनी ठिय्या दिला आहे. कारवाईची वेळ येते त्यावेळी फेरीवाल्यांना बेकायदेशीरपणे सावध केले जात असल्याचाही आरोप असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. २१) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

पार्किंगचीही डोकेदुखी

शहरात रविवार कारंजा, बोहरपट्टी आणि फुलबाजार हा परिसर मध्यवर्ती असल्याने तो नो-हॉकर्स झोन म्हणून महापालिकेने जाहीर केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी आजवर करण्यात आलेली नाही. परिणामी, हा परिसर बकाल झाला असून येथे वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे. नासिक सराफ बाजाराच्या व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याची व्यथा असोसिएशनने पत्रकार परिषदेत मांडली. या स्थितीमुळे या परिसरात सामान्य नागरिकांना फिरणेही कठीण झाले असून तेथे पार्किंगचीही समस्या डोकेदुखी बनली आहे.

अनेक वर्षांपासून रविवार कारंजा, बोहरपट्टी आणि फुलबाजार या भागात अतिक्रमणधारकांचा त्रास व्यावसायिकांना होतो आहे. येथे व्यवसाय थाटण्यास महापालिकेने मज्जाव केला असला तरीही प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. मग नियमाचा उपयोग काय, याप्रश्नी तातडीने अंमलबजावणी केली नाही तर व्यावसायिक आंदोलन छेडतील.

- प्रमोद कुलथे, अध्यक्ष, दी नासिक सराफ असोसिएशन

या परिसरातील वर्षानुवर्षांच्या समस्येवर काढण्यात आलेला तोडगा केवळ कागदोपत्री आहे. पुरातत्व विभाग व महापालिकेने याप्रश्नी डोळेझाकच केली आहे. अतिक्रमणधारकांचा फटका येथे स्थानिक व्यावसायिकांना बसत असून, पुरातत्व विभागाची सरकारवाडा ही वास्तू फेरीवाल्यांनी झाकोळूनसुद्धा हा विभाग बघ्याची भूमिका घेतो.

- चेतन राजापूरकर, सदस्य, दी नासिक सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर तरुणाचा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात टीव्ही पाहण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली असून, या प्रकरणी संशयित कैलास रामदास गायकवाड (वय २०, रा. पिंपळगाव खांब, नाशिकरोड) याच्याविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी शेजारीच राहणाऱ्या संशयित गायकवाडच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात असे. त्यातून संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या राहत्या घरात गेल्या दीड- दोन वर्षांपासून बलात्कार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितास अटक केली.

मजुराचा मृत्यू

आडगाव परिसरातील हनुमाननगरात नवीन इमारतीचे काम सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून २२ वर्षांच्या मजुराचा मृत्यू झाला. कृष्णा अदिवाशी (रा. सतना, उत्तर प्रदेश) असे मजुराचे नाव आहे. गेल्या शनिवारी (दि. २०) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कृष्णाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.

दोन जणांची आत्महत्या

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्या. मुंबई नाका परिसरातील अथर्वदर्शन सोसायटीत राहणारा भाऊसाहेब शांताराम तोरवणे (वय ३३) याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. भाऊसाहेबने शनिवारी (दि. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अन्य घटनेत तारवालानगरमधील तलाठी कॉलनीतील पारिजात रो-हाऊसमधील राहणारा हेमंत लालचंद तलरेजा (वय ३१) याने घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. हेमंतने शुक्रवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास राहत्या विषारी औषध सेवन केले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

बोधलेनगरमध्ये गावठी कट्ट्यासह एकाला अटक करण्यात आली. नोवीद सलीम सय्यद (वय २५, रा. सुजाली पार्क, हिरवेनगर, नाशिक-पुणे रोड) असे या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा व रिकामे मॅगेझिन हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या आठवड्यात याच परिसरात पोलिसांनी एका गँगला अटक करून कट्टे हस्तगत केले होते.

दिराकडून वहिनीचा विनयभंग

नाणेगाव येथे शेताच्या वादातून दिराने विवाहितेचा विनयभंग केला. पीडित महिला ट्रॅक्‍टरवरून त्यांच्या शेताकडे शनिवारी (दि. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास सामाईक रस्त्याने जात असताना हा प्रकार घडला. संशयित संदीप पोपट रोकडे ट्रॅक्‍टरला आडवा झाला. या रस्त्याने जाऊ देणार नाही, असे तो म्हणाला. हा रस्ता सामाईक असल्याचे महिलेने सांगितले. वाद वाढल्याने संशयिताने महिलेचा विनयभंग करून लज्जास्पद कृत्य केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

सातपूरच्या राज्य कर्मचारी वसाहतीतील टपाल कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून तिजोरी फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान टपाल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील तिजोरीचे लॉक व हँडल तोडून मुद्देमाल चोरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चोरट्यांना तिजोरी फोडण्यात यश आले नाही. ही घटना शनिवारी (दि. २०) सकाळी कार्यालय उघडल्यानंतर समोर आली. या प्रकरणी अरुणा प्रमोद बारुदवले (रा. गुंजाळबाबानगर, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल चोरी

घोटी येथील तरुणाचा ४० हजार रुपयांचा मोबाइल मध्यवर्ती बसस्थानकात चोरट्याने लंपास केला. सौरभ राजेंद्र भगत (रा. प्रेरणा सोसायटी, घोटी, ता. इगतपुरी) या तरुणाने याबाबत फिर्याद दिली. तो शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगफुटी, दुष्काळ हे दोनच नक्षत्र!

$
0
0

पाशा पटेल यांनी व्यक्त केली चिंता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यावर दुष्काळाचे ढग घोंघावत असून पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी २७ नक्षत्रांमध्ये पाऊस पडत होता. परंतु, हवामानातील बदलांमुळे हल्ली ढगफुटी आणि दुष्काळ असे दोनच नक्षत्र निर्माण झाल्याची चिंता महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी व्यक्त केली. गावात मुबलक पाण्याची उपलब्धता कशी राहील, या प्रश्‍नावर ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांनी प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघ-सरपंच संसदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, माजी आमदार आर. ओ. पाटील, पंचायती राज तज्ज्ञ शरद बुट्टेपाटील, पाटोदा या आदर्श गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पाशा पटेल यांनी ग्रामाविकास प्रक्रियेतील दैनंदिन समस्या व उपाययोजना याविषयी मनोगत व्यक्त केले. अनेक कंपन्या आपल्या एकूण उत्पन्नातील दोन टक्के निधी सीएसआर म्हणून ग्रामीण भागाच्या विकासासाठी देत असतात. दुष्काळासारख्या संकटाला सामोरे जाण्याची वेळच येऊ नये याकरीता ग्रामपंचायतींनी हा निधी तसेच केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी पाणी उपलब्धतेसाठीच्या उपाययोजनांवर खर्च करावा, असे आवाहन पटेल यांनी केले. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दिवाळीनंतर विका सोयाबीन

सोयाबीनची खरेदी करण्यासाठी डिसेंबर महिन्यात चीनचे शिष्टमंडळ भारतामध्ये येणार आहे. त्यामुळे सोयबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये. दिवाळीनंतरच सोयाबीन विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन पटेल यांनी केले. देश खाद्यतेलाबाबत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सरकारकडून आश्वासक पाऊले टाकली जात आहेत. यंदा दुष्काळाच्या सावटामुळे सोयबीन उत्पादनात घट झाल्याचेही निरीक्षण यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको फ्रेण्डली जीवनशैली अनुभवावी

$
0
0

रावसाहेब कसबे यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाचा ऱ्हास हा परवलीचा शब्द बनत चालला आहे. पृथ्वीवर सगळीकडे प्रदूषणच दिसत आहे, आवाजाचे, पाण्याचे, हवेचे प्रदूषण होत आहे. काही दिवसांनी ही पृथ्वी प्रदूषणामुळे नष्ट होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे माणसाने आता इको फ्रेण्डली जीवनशैली अनुभवावी हेच उत्तम आहे. त्यासाठी 'इको फ्रेण्डली लिव्हिंग' हे पुस्तक अवश्य वाचावे असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.

डॉ. रेश्मा प्रशांत घोडेराव लिखित 'इको फ्रेण्डली लिव्हिंग' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन रविवारी महाकवी कालिदास कलामंदिर येथे झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब कसबे यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, डॉ. प्रशांत घोडेराव, डॉ. रेश्मा घोडेराव, आवेश पलोड, डॉ. विनोद विजन, देवांग जानी, राहुल दिवे, प्रशांत दिवे, अनिता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कसबे म्हणाले, की निसर्गामध्ये मानवाला एका क्षणात नष्ट करण्याची शक्ती आहे, ती शक्ती त्याने राखून ठेवली आहे. पृथ्वी लाखो वर्षांपासून सुजलाम सुफलाम होती. तिला तसेच ठेवायचे असल्यास आपल्याला पर्यावरणीय जीवनशैलीची कास धरावी लागणार आहे. माणसाने तसे न केल्यास त्याला अनेक मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.

पुस्तकाच्या लेखिका डॉ. रेश्मा घोडेराव यांनी इको फ्रेण्डली जीवनशैली अनुभवण्याचे आवाहन केले. वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. पर्यावरणीय जीवनशैली कशी असावी याबाबत 'इको फ्रेण्डली लिव्हिंग' हे पुस्तक मार्गदर्शन करीत असल्याने हे पुस्तक अवश्य वाचावे असे आवाहन डॉ. प्रशांत घोडेराव यांनी केले. याप्रसंगी नाशिक एन्व्हायरन्मेंट समिट हा कार्यक्रमदेखील पार पडला.

विद्यार्थी-शिक्षकांचा गौरव

महापालिका तसेच काही खासगी शाळांमध्ये पोस्टर कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात यशस्वी झालेल्या १०० विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. तसेच नऊ महापालिका शाळा व रवींद्र विद्यालय या शाळेतील एक अशा १० शिक्षकांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच काही व्यक्तींना वृक्षमित्र, पर्यावरणमित्र पुरस्कार देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपाल पाकिटावर गोदेच्या उगमाची महती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गोदावरी नदीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वत' या स्पेशल कव्हरचे अनावरण रविवारी नापेक्स २०१८ प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात करण्यात आले. गोदावरी नदीच्या उगमस्थानाची माहिती सर्वांना व्हावी, तसेच या टपाल पाकिटाच्या माध्यमातून भारतभर ब्रह्मगिरी पर्वताची ओळख पसरावी, ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरीच्या उगमाची कथा या पाकिटाच्या माध्यमातून अनेकांच्या संग्रहात राहावी, या हेतूने या स्पेशल कव्हरचे अनावरण केल्याची माहिती टपाल विभागाच्या नवी मुंबई रिजनच्या प्रमुख शोभा मधाळे यांनी दिली. त्यांच्या हस्ते या स्पेशल कव्हरचे अनावरण करण्यात आले.

टपाल विभागाच्या वतीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या दुर्मिळ टपाल तिकिटांचे नापेक्स २०१८ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शालिमार येथील महात्मा फुले कलादालनात २० व २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शन मांडण्यात आले. प्रदर्शनाचा समारोप सोहळा रविवारी दुपारी १२ वाजता झाला. या वेळी नवी मुंबई रिजन हेड पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांच्या हस्ते प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ टपाल तिकिटांच्या संग्राहकांना गौरविण्यात आले. अतिशय दुर्मिळ आणि चांगल्या पद्धतीने टपाल तिकिटांचा संग्रह केलेल्या संग्राहकांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाने गौरविण्यात आले. या वेळी टपाल तिकिटांची वैशिष्ट्ये, परदेशातील तिकिटांचा संग्रह कसा करावा, दोषयुक्त तिकिटांचा संग्रह कसा करावा, याबाबत संग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. नापेक्स प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ टपाल तिकिटांचे परीक्षण प्रतिसाद नेऊरगावकर आणि उमेश काक्केरी यांनी केले. या सोहळ्यात नाशिक टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक प्रल्हाद काखंडकी, सहाय्यक अधीक्षक पंकज कुलकर्णी, अधीक्षक सीएसडी संजय फडके आणि वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव उपस्थित होते.\B

पारितोषिकप्राप्त संग्राहक

\Bआशा गायधनी (सुवर्ण), संजय लोणकर (सुवर्ण), मानसी महाजन (सुवर्ण), रचना विद्यालय पोस्ट तिकिट संग्रहक क्लब (रजत), सुभाष पगारे (रजत), किशोर कांकरिया (रजत), अच्युत गुजराथी (रजत), तनुश्री काकड (कांस्य), अंगदसिंग ग्रोवर (कांस्य), किशोर बाटविआ (कांस्य), नलिनी गुजराथी (कांस्य), निश्चय जोबानपुत्रा (कांस्य), इश्वर देवराज (कांस्य), प्रथमेश विसपुते (कांस्य), लक्ष्मी मालपाणी (कांस्य), पार्थ देशमुख (कांस्य) आणि संम्यक कोचर (कांस्य).

\Bप्रश्नमंजुषात राठोड प्रथम\B

प्रदर्शनानिमित्त टपाल विभागातर्फे टपाल खात्यावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत स्वातंत्र्यकुमार राठोड प्रथम, संजनादेवी मुंढे द्वितीय, अथर्व धांडे तृतीय, तर तीर्था भटमुळे, अमृता धांडे, मनस्वी महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचरा एटीएम’ला प्रथम पारितोषिक

$
0
0

अक्षय सराफ , कॉलेज क्लब रिपोर्टर

विज्ञान मंत्रालय, केंद्र सरकार आयोजित चौथ्या 'आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव'चे विजेतेपद संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या यश गुप्ता या विद्यार्थ्याने पटकावले. त्याच्या 'कचरा एटीएम' या प्रकल्पाचे कौतुक करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूगर्भ विज्ञान मंत्रालयाच्या वतीने लखनऊ येथे इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल-आयआयएसएफ २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यशने साकारलेल्या कचरा एटीएममध्ये कचरा टाकल्यानंतर आपल्याला बक्षीस स्वरुपात गुण दिले जातात. तसेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यास बक्षीसही मिळते. या माध्यमातून अधिकाधिक लोक कचरा उघड्यावर न फेकता तो या मशिनमध्येच टाकतील. नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होईल. हा प्रकल्प उपयोगात आणल्यास स्वच्छतेबाबतची समस्या मार्गी लागण्यास निश्चित मदत होऊ शकते, असे यश सांगतो.

महोत्सवात २३ विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये नॉर्थ-इस्ट स्टुडंट्स कॉन्क्लेव, युवा शास्त्रज्ञ कॉन्फरन्स, ग्रीन गुड्स डीड्स, क्लीन एअर कॅम्पेन, एग्रीकल्चर कॉन्क्लेव्ह, इंडस्ट्री-एकेडेमिया मीट यांचा सहभाग होता. या विविध स्पर्धांमध्ये २,२०० प्रकल्प सादर केले गेले. यापैकी विभागीय अंतिम फेरीसाठी १०० प्रकल्पांची निवड करण्यात आली. स्वच्छ भारत श्रेणीमध्ये यश गुप्ता याच्या 'कचरा एटीएम'ला प्रथम पारितोषिक मिळाले. पद्मभूषण व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शास्त्रज्ञ, उद्योजक उपस्थित होते. यशला प्रकल्पासाठी प्राचार्य डॉ. रवींद्र क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा यांच्या हस्ते यशचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हम नही सुधरेंगे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जास्तीत जास्त आर्थिक भुर्दंड बसल्याने बेशिस्त वाहतुकीला आळा बसेल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. मात्र, वाहनचालक कोट्यवधीचा दंड भरण्यास तयार असल्याचे दिसते. मागील २१ महिन्यांत वाहतूक शाखेने तब्बल आठ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नक्की काय उपाययोजना राबवाव्यात असा प्रश्न वाहतूक विभागाला सतावतो आहे.

बेशिस्त वाहनचालकांमध्ये दुचाकी चालकांचा प्रथम क्रमांक लागतो. एकूण दंडापैकी ६० टक्के दंड दुचाकी वाहनचालकांकडून वसूल केला जातो. यानंतर रिक्षाचालक, मोटार कार असा क्रम येतो. शहरातील बेशिस्त वाहतूक हा गंभीर विषय असून, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणारे चालक अपघातांना कारणीभूत ठरत आहे. यामुळे अनेकांचा हकनाक जीव जातो, तर हजारो नागरिक गंभीर दुखापतींना समोरे जातात. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून वर्षभरात लाखो वाहनचालकांवर कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. २०१७ मध्ये पोलिसांनी चार कोटी ५३ लाख ५३ हजार ६१० दंड वसूल केला होता. यंदा शहर पोलिसांनी चार युनिटसच्या माध्यमातून कारवाईला गती दिली असून, दिवसाला सरासरी ६०० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होते. या वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत एक लाख ५३ हजार १८८ वाहनचालकांवर कारवाई करीत पोलिसांनी तीन कोटी ४६ लाख ५०० रुपयांचा दंड वसूल केला. याबाबत पोलिसांनी स्पष्ट केले की, वाहतूक नियमांचे पालन झाले तर दंड वसूल करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मात्र, ८० टक्के नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक भुर्दंड सहन करीत चालक नियम मोडण्यास प्राधन्य देत असतील काय करणार, असा उद्विग्न सवाल पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

वर्ष- दंड वसुली

२०१५- एक कोटी ३१ लाख

२०१६- दोन कोटी ४२ लाख ३० हजार ८००

२०१७- चार कोटी ५३ लाख ५३ हजार ६१०

२०१८- तीन कोटी ४६ लाख ५००

(२०१८ चा आकडा सप्टेंबर महिन्यापर्यंतचा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आणखी चार सिग्नल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन चार सिग्नल्स बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून १३ ठिकाणांवर सिग्नल्स बसवण्यासाठी शिक्कामोर्तब केले असून, त्यातील या चार ठिकाणी प्राधन्याने काम हाती घेण्यात येणार आहे.

पपया नर्सरी, बीवायके कॉलेज येथील पी. टी. कुलकर्णी चौक, शरणपूररोडवरील जुन्या पोलिस आयुक्तालयासमोरील एचडीएफसी चौक तसेच नाशिकरोड परिसरातील विहीतगाव येथे हे सिग्नल्स बसवण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाढत्या वाहनसंख्येचा भार रस्त्यावर पडतो असून, चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवते आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या चार युनिट्स म्हणजे विभागीय कार्यालयांमार्फत नुकताच एक सर्व्हे हाती पूर्ण करण्यात आला. यातून १३ ठिकाणी सिग्नल्स बसवणे गरजेचे असल्याचे पुढे आले. मात्र, हे काम लागलीच होणे शक्य नसल्याने यातील प्रमुख चार ठिकाणांवर प्राधन्य तत्त्वावर सिग्नल्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले असून, महापालिकेकडून लवकरच कामास सुरूवात होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

सध्य स्थितीत सुरू असलेले सिग्नल्स-३९

ब्लिंकर मोडवरील महामार्गावरील सिग्नल्स-७

ब्लिंकरमोडवरील शहरातील सिग्नल्स-३

बंद सिग्नल्स-३

एकूण सिग्नल्स-४७

नवीन बसवण्यात येणारे सिग्नल्स-४

प्रस्तावित सिग्नल्सची संख्या-१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक नाका-अशोकस्तंभवाहतूक उद्यापासून एकेरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रोडचे काम सुरू असून, यामुळे वाहतुकीचा सातत्याने बोजवारा उडतो आहे. त्यातच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी त्र्यंबक नाक्याकडून अशोकस्तंभ हा मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेतला असून, वाहनांना प्रवेश बंद केला आहे. हा बदल २३ आणि २४ ऑक्टोबर असे दोन दिवस लागू राहील.

स्मार्ट सिटीतील महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणून या रस्त्याच्या कामाकडे पाहिले जाते. अतिशय वर्दळ असलेल्या या रस्त्यावर कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने पुढे येते आहे. रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकापर्यंतचा मार्ग (काम सुरू असलेली बाजू) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आला. मात्र, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना एकाच लेनमध्ये मार्ग खुला ठेवण्यात आला. या मार्गावर रिक्षा आणि बसेसची वर्दळ मोठी असून, पुरेसा टर्निंग रेडियस उपलब्ध नसल्याने दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नाका बाजूकडून अशोकस्तभांकडे जाणाऱ्या वाहनांना दोन दिवस प्रवेश बंद करण्यात येणार आहे. एकाच बाजूची वाहतूक सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. नवीन बदल २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री सांयकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील.

असे आहेत पर्यायी मार्ग

- पंचवटीकडून येणाऱ्या सर्व वाहनांना सीबीएस, त्र्यंबक नाका किंवा सातपूरकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार, शिवाजी रोड, सीबीएस या मार्गे जावे, तर त्र्यंबक नाक्याकडे जायचे असल्यास शालिमार, खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद मार्ग असे जाता येईल.

- गंगापूररोड, तसेच रामवाडी पुलाकडून येणाऱ्या वाहनांना मेहेर सिग्नल, सीबीएस, त्र्यंबक नाका असे जायचे असल्यास त्यांनी अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल किंवा शालिमार, शिवाजी रोड, सीबीएस असे जावे. या वाहनचालकांना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडीमार्गे, सीबीएसमार्गे जाता येईल.

- मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांनी मुंबई नाका, वडाळा नाका, द्वारका, आडगाव नाका, निमाणी या मार्गांचा वापर करावा.

- सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांना मायको सर्कल, शरणपूर रोडने कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, रामवाडीमार्गे जाता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्ल्यूच्या रुग्णांची काळजी घ्या

$
0
0

फ्ल्यूच्या रुग्णांची काळजी घ्या

डॉ. प्रदीप आवटे,

राज्य सर्वेक्षण अधिकारी

बहुतांश फ्ल्यू रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आजारी असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे अशा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे आपण शिकले पाहिजे.

घर मोठे असेल, तर रुग्णासाठी वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतील, तेथे येणे टाळावे. रुग्णाने स्वतः नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी. घरात कोणी जास्त जोखमीचे आजार असणारे असतील, तर फ्ल्यू झालेल्याने त्यांच्या निकट जाऊ नये. घरात ब्लीच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचे टेबल, खुर्ची; तसेच रुग्णाचा स्पर्श होतील, असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा. रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत. रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात/ब्लीच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरुण-पांघरुण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. रुग्णाने धूम्रपान करू नये. ताप आणि फ्ल्यूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासांपर्यंत घरी रहावे.

इन्फ्ल्युएंझाविरोधी लसीकरण : फ्ल्यू रुग्णांच्या घरगुती काळजीसोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे इन्फ्ल्युएंझाविरोधी लसीकरण. लसीकरण आणि आजारावरील उपचार यातील फरक आपण समजावून घेतला पाहिजे. उपचार हे आजार झाल्यानंतर घ्यावे लागतात, तर लसीकरण हे आजार होऊ नये; म्हणून घ्यायचे असते. आजारी व्यक्तीसाठी लसीचा काही फायदा नसतो. अनेकदा स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढू लागले, की लस हवी म्हणून लोक आग्रह धरू लागतात, हे फारसे योग्य नाही.

इन्फ्ल्युएंझा लसीची काही वैशिष्ट्ये

- ही लस नाक आणि इंजेक्शनवाटे अशा दोन प्रकारे देता येईल, अशा स्वरूपात उपलब्ध आहे.

- या लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही ८ ते १२ महिने टिकते. त्यामुळे ती दर वर्षी घ्यावी लागते.

- इन्फ्ल्युएंझा विषाणू सतत आपली जनुकीय रचना बदलत असतात. त्यानुसार लसीमध्येही बदल होतात. प्रत्येक वर्षासाठी कोणती लस असावी, हे जागतिक आरोग्य संघटना त्या मोसमातील विषाणूंचा अभ्यास करून ठरवते. विषाणू योग्य निवडले गेले, तर लस ७० ते ९० टक्के गुणकारी ठरते.

- महाराष्ट्र शासनाने सन २०१५पासून अति जोखमीच्या व्यक्तींना मोफत व ऐच्छिक लसीकरण सुरू केले आहे. गरोदर माता, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचारी या तीन गटांतील व्यक्तींना ही लस मोफत पुरवली जाते. गरोदर मातांना नाकाने द्यावयाची लस देता येत नाही. त्यामुळे इंजेक्शनने द्यावयाची लस वापरली जाते.

- आपल्याकडे स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वर्षभरात मुख्यत्वे दोन सिझनमध्ये आढळतात- हिवाळा आणि पावसाळ्यात. मार्च ते मे या कालावधीत फ्ल्यूचे प्रमाण तुलनेने कमी असते. लस घेतल्यानंतर फ्ल्यूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान ३ आठवड्यांचा काळ लागतो. पावसाळा हा आपल्याकडील फ्ल्यूचा प्रमुख सिझन आहे हे लक्षात घेतले, तर आपण इन्फ्ल्युएंझाविरोधी लस ही मार्च ते मे या कालावधीत घेणे अधिक चांगले. त्यामुळे दोन्ही फ्ल्यू सिझनसाठी आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते. खरे तर सर्वांनीच ही लस दर वर्षी घ्यायला हवी; पण ज्या अति जोखमीच्या व्यक्तींना फ्ल्यूचा धोका अधिक असतो, त्यांनी तर ती नक्कीच घ्यावी.

एकूण काय, फ्ल्यूसोबत शहाणपणाने वागून आपला बचाव करणे बरेचसे आपल्या हातात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी अनुभवले दिवाळी फराळाचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दिवाळी म्हंटलं, की घरोघर फराळाचा घमघमाट सुटतो. पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबरच काही नवीन पदार्थ बनविण्याकडेही अनेकांचा कल असतो. हाच कल ओळखून 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कल्चर क्लबतर्फे दिवाळी फराळ शिकविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नवनवीन पदार्थ शिकण्याचा आनंद लुटला. या वेळी पारंपरिक पद्धतीचे फराळ बनविण्याच्या काही सोप्या क्लृप्त्याही शिकविण्यात आल्या. इंदिरानगर येथील अजय मित्र मंडळाच्या हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली.

शेफ विवेक सोहनी आणि शिल्पा सोहनी यांनी महिलांना विविध खाद्यपदार्थ बनविण्याच्या कृती शिकविल्या. पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणारे पदार्थ घरोघर बनविले जातात. मात्र, याव्यतिरिक्त मुलांना नवीन नवीन पदार्थ कसे देता येतील हा महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. त्यावर उपाय म्हणून सोहनी यांनी साधी सिल्क शेव बनविण्याबरोबरच यात टोमॅटो शेव व पालक शेव कशी तयार करता येते याची प्रात्यक्षिके करून दाखविली. या दोन नवीन शेवच्या पद्धतीने महिलांनी चांगलेच स्वागत केले. त्याचबरोबर दिवाळीत गोड खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे लाडू किंवा करंज्या बनविण्याबरोबरच घरच्या घरी चॉकलेट बर्फी, चॉकलेट पेढा, सँडविच बाकरवडी व बकलावा हे पदार्थ बनविण्याच्या साध्या साध्या कृती सांगितल्या. त्याचप्रमाणे सोप्या पद्धतीने भाजणी बनवून त्याच्या खरपूस चकल्या कशा बनवता येतात, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. या वेळी शिल्पा सोहनी यांनी या पदार्थांबरोबरच पारंपरिक पद्धतीच्या करंज्या, अनारसे, शंकरपाळे हे पदार्थ कशा पद्धतीने तयार करावेत, याचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या वेळी केवळ कृतीच दाखविली नाही तर महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणींवर व प्रश्नांवर समाधानकारक उत्तरेही देण्यात आली.

सोहनी यांनी सांगितले, की दिवाळीत नवनवीन पदार्थ बनविण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, हे पदार्थ सोप्या व चांगल्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवावेत याचे मार्गदर्शन देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यांना या पदार्थांचा आस्वाद देता यावा, हाच यामागील उद्देश आहे. पारंपरिक फराळाच्या पदार्थांबरोबरच नावीन्यपूर्ण पदार्थ बनविण्याची पद्धत या कार्यक्रमातून दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इंदिरानगरच्या नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनीही यात सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या कावडी वणी गडाकडे रवाना

$
0
0

कोजागिराला होणार सप्तश्रृंगीला अभिषेक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दसऱ्याच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वरहून वणी गडाकडे निघालेले कावडधारक रविवारी शहरातून मार्गस्थ झाले. कोजागिरी पौर्णिमेला वणी येथील सप्तश्रृंग गडावर देवीला रात्री १२ वाजता त्र्यंबकच्या तीर्थराज कुशावर्तातील पाण्याने अभिषेक घालण्याची प्रथा आहे.

दसऱ्याचे सिमोल्लंघन झाले की त्र्यंबक येथून कावडीत पाणी घेऊन भाविक वणीच्या गडाकडे कूच करतात. यंदाही हजारो कावडधारकांनी गडाकडे निघाले आहेत. पूर्वी ही कावड तयार करून ती खांद्यावर घेतली जात असे. आता त्यात काहींनी बदल केला असून प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी घेऊन जाताना दिसत आहेत. पूर्वी ही परंपरा त्र्यंबक गावापुरती मर्यादित होती; मात्र तिचा प्रसार झाल्याने बाहेरगावचे भाविकही मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत. पायात घुंगरू घालून नाचत जाणाऱ्यांमध्ये तरुण मुलांचा भरणा अधिक आहे. काही कावडीधारक धुळे जिल्ह्यातून देखील येत आहेत. कावडीधारकांनी गोदाकाठी मुक्काम केला होता. सकाळी आंघोळी आटोपून गडाकडे रवाना झाले.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला साडी चोळीने ओटी भरली जाते. त्र्यंबकहून आणलेल्या तीर्थांने देवीला अभिषेक घालण्यात येतो. त्यानंतर प्रसाद घेऊन कावडीधारक घराकडे परतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद पोलिसांना आदरांजली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस सेवेत कर्तव्य बजावत असताना देशातील विविध ठिकाणी वीरगती प्राप्त झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) मानवंदना देण्यात आली. २१ ऑक्टोबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. हा कार्यक्रम शहर पोलिस मुख्यालयातील पोलिस परेड मैदानावर रविवारी सकाळी पार पडला. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले.

कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस अधिक्षक संजय दराडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना २०१७-१८ या वर्षात देशभरात ४१४ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. या शहिदांमध्ये महाराष्ट्रातील पोलिस कर्मचारी सुनील कदम, सुरेश गावडे व सतीश मडावी या तीन जवानांचा समावेश आहे. शहर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मानवंदना देताना सहायक पोलिस आयुक्त दीपक गिऱ्हे व डॉ. अजय देवरे यांनी शहीद पोलिसांच्या नावाचे वाचन केले. कार्यक्रमास महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकोटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. शहरातील मान्यवर, पोलिस कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवस

दोघा पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांची पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शनिवारी रात्री तडकाफडकी बदली केली. यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसऱ्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शनिवारी रात्री हे बदलीचे आदेश काढण्यात आले असून, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाढती गुन्हेगारी आणि वरिष्ठांशी मतभेद तसेच लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या तक्रारींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

म्हसरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. जी. रोहकले (गुन्हे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे़. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख व करंजे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात पोलिस स्टेशन हद्दीत वाढते गुन्हे, अवैध धंदे आणि लोकप्रतिनिधींसोबत असलेले वाद यासाठी कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील वाढत्या गुन्ह्यांमुळे भाजपा आमदार आणि पोलिस निरीक्षक करंजे यांच्यातील वाद वाढत गेले. यामुळे करंजे यांची गच्छंती करण्यात आली. दुसरीकडे म्हसरूळ पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी आणि पोलिस स्टेशनमार्फत होणारे प्रयत्न यात मोठी तफावत सुरुवातीपासून कायम राहिली. प्रमुख दोन पोलिस स्टेशनमधील खांदेपालट इतरांसाठी इशारा मानला जात असून, याचा काय आणि कितपत फायदा होतो याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नेहबंधन संस्थेतर्फे वधू-वर मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील मराठा मंगल कार्यालय संचलित स्नेहबंधन बहुउद्देशीय संस्थेतर्फे मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात झाला. पत्रकार विश्वास देवकर, समुपदेशक अमोल कुलकर्णी, माजी आमदार नितीन भोसले आदी प्रमुख पाहुणे होते.

देवकर म्हणाले, की एकमेकांना समजून घेतल्यास संसारात सुख निश्चित येऊ शकते. नितीन भोसले यांनी विवाह सोहळ्यात होणारा खर्च मर्यादित असावा, समाजात कर्ज काढून विवाह सोहळा मोठा साजरा करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. हेमंत चोपडे यांनी सांगितले, की समाजातील व्यक्तींनी वास्तवाचे भान ठेवून ध्येयपूर्तीसाठी झटले पाहिजे. समुपदेशक अमोल कुलकर्णी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. कमीत कमी अपेक्षा ठेवून एकमेकांचा सन्मान राखणे, ज्येष्ठांचा आदर करणे या त्रिसूत्रीचा वापर जीवनात केल्यास वैवाहिक जीवन सुख-समृद्धीच्या मार्गाने पार पाडू शकते, याचे वैवाहिक जीवनातील महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. याप्रसंगी सुमारे १३५ वधू- वरांनी नोंदणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकटे नको, तर पर्यावरण जपा

$
0
0

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन; मांगीतुंगी येथे विश्व अहिंसा संमेलनाचे उद्घाटन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निसर्गाची हिंसा होत असल्यानेच दुष्काळसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. ही संकटे नको असतील तर निसर्ग आणि पर्यावरणाला जपले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी मांगीतुंगी (ता. बागलाण) येथे केले.

भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या वतीने गणिनीप्रमुख आर्यिका श्री ज्ञानमती माताजी यांचा ६७ वा त्याग दिवस आणि ८५ व्या जन्मदिवसानिमित्त शरद पोर्णिमा महोत्सवांतर्गत आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर देशाच्या पहिल्या महिला नागरिक सविता कोविंद, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, गणिनीप्रमुख आर्यिका श्री ज्ञानमती माताजी, स्वस्तिश्री रवींद्रकीर्ति स्वामीजी, आमदार राजन पाटनी आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, शांतीद्वारेच अहिंसा आणि अहिंसेद्वारेच शांती प्रस्थापित होत असते. संसाराला विवादांपासून दूर ठेवण्याची शिकवण भगवान ऋषभदेव यांनी दिली. हे शिक्षण समाजाला आजही उपयोगी ठरते आहे. महाराष्ट्र ही सामाजिक समरसता, अध्यात्माचा संदेश देणाऱ्या संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. या भूमीने सामाजिक सौहार्द आणि समतेचा संदेश दिला आहे. मन, वाणी आणि शरीराने कुणालाही दुःख दिले जाऊ नये, ही अहिंसा आहे. प्राणीमात्राबद्दल प्रेम, दया, करुणा आणि सौहार्दतेचे भाव असणे ही देखील अहिंसा आहे. मैत्री, संतुलन आणि सहिष्णुतेनेच अहिंसा प्रस्थापित होत असते, असेही कोविंद म्हणाले. जैन धर्मातील तीर्थंकरांनी जगाला मानवतेचा आणि करुणेचा संदेश दिला आहे. भगवान ऋषभ देव यांची मांगीतुंगी येथील १०८ फूट ऊंच प्रतिमा ही मानवाने अहिंसेचे पालन करून आचरण उच्च प्रतीचे ठेवावे, असा संदेश देते. या संमेलनातून सर्वांनी हा संदेश घेऊन जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्याला देशभरातून हजारो जैन बांधव उपस्थित होते.

....

सरकारची प्रशंसा

बेघरांना घर देणे, घर तेथे शौचालय बांधणे, गरीब कुटुंबाना उज्ज्वला गॅससारख्या योजनांचा लाभ देणे, नमामी गंगे सारखा उपक्रम हे सरकारचे पर्यावरण पूरक आणि मानवतेचा परिचय देणारे कार्य आहे. या माध्यमातून सरकार पर्यावरण रक्षणाच्या ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार कोविंद यांनी यावेळी काढले.

..

ग्रंथाचे लोकार्पण

या उद्घाटन सोहळ्यानंतर सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भगवान ऋषभदेव प्रतिमेच्या प्रथम वर्षानिमित्त मूर्ती निर्माण समितीच्या वतीने मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्व विद्यालयास भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ११ लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विश्वविद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांनी फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येक सहा वर्षांनी अशा देखण्या सोहळ्यात हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकाराला नको राजकारणाचा स्पर्श

$
0
0

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहकारात राजकारणाने प्रवेश केला तर त्या संस्था डबघाईला येतात असा आजवरचा अनुभव आहे. संस्थाचालकांनी कायदेशीर मार्गानेच कर्ज द्यावे. आजवर महाराष्ट्रातील अनेक संस्था राजकारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याकरीता नाशिकमधील संस्थांनी सहकारात राजकारण आणू नये, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त कालिदास कलामंदिरात झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचा नूतन वास्तुत प्रवेश समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र दराडे होते. गुलाबराव पाटील म्हणाले, की काही संस्थाचालकांनी आपल्या नातेवाइकांना कोणतेही तारण न घेता कर्ज दिले. तर काही संस्थांनी ड्रायव्हरला तीन कोटी रुपये कर्ज दिले आहेत. अशा संस्था बुडणार नाहीत तर काय होईल, आज महाराष्ट्रात १ लाख ९२ हजार संस्था आहेत त्यापैकी बुडीत गेलेल्या संस्थांचे ४१७ कोटी रुपये नागरिकांना देणे बाकी आहे. याकरिता संस्थांनी सनदशीर मार्ग अवलंब करावा. सहकारी संस्था या पक्ष व राजकारणविरहीत असाव्यात, असे ते म्हणाले. यावेळी संस्थेच्या प्रगतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. नरेंद्र दराडे म्हणाले, की शेतकऱ्यांप्रमाणेच पतसंस्थांचे हाल आहेत. सहकार क्षेत्र वाईट अवस्थेतून जात आहे. सरकारने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवल्यास सहकार क्षेत्र तरू शकेल, असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार धनराज महाले म्हणाले, की गजानन महाराज पतसंस्थेचे काम चांगले आहे. त्यामुळेच संस्थेची इमारत होऊ शकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांनी केले. शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images