Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्यापाऱ्याला लुटले

$
0
0

सातपूर : त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीच्या मागील बाजूस इंदिरा-लक्ष्मण अर्पांटमेंटमधील एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत एक लाख रुपयांना लुटण्यात आले. सातपूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनिलकुमार गुप्ता असे व्यापाऱ्याचे नाव आहे. रविवारी रात्री ते त्यांचे दुकान बंद करून घरी निघाले होते. यावेळी दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत ठेवली. रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या चास इसमांनी घरी गुप्ता यांनी घेरले. एकाने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील एक लाख रुपये ठेवलेली बॅग घेऊन पोबारा केला. गुप्ता यांनी यांनी तात्काळ सातपूर पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑटो डीसीआरबाबत चर्चा

$
0
0

ऑटो डीसीआरबाबत चर्चा

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या 'नरेडको'च्या पदाधिकाऱ्यांनी ऑटो डीसीआरबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक किशोर पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ऑटो डीसीआरमधील प्लॅन मंजूर झाल्यानंतर त्याची छायांकित प्रत मिळण्यास होणार विलंब, तपासणी फी वारंवार भरावी लागणे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना मंजूर होणारी प्रकरणे, त्याच प्रकरणासाठी पुन्हा फी भरणे, तसेच कलम २१० बाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली. ऑटो डीसीआर प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी व विलंब यामुळे नाशिक शहाराचा विकास कसा थांबला आहे, हे निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रसंगी नरेडको नाशिकचे पदाधिकारी अभय तातेड, सुनील गवादे, अमित रोहमारे, मयूर कपाटे, राजेंद्र बागड आदी पदाधिकारी उपस्थित होते. मनपा आयुक्तांशी लवकरच चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन सहाय्यक संचालकांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार ‘मंथ रन’

$
0
0

म. टा. प्रतिनीधी, नाशिक

नवीन धावपटूंचा उत्साह वाढवा आणि लोकांमध्ये धावण्याच्या व्यायामाचा प्रसार व्हावा, यासाठी अॅक्टिव्ह एनर्जीतर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'लास्ट संडे ऑफ मंथ रन' आयोजित करण्यात येते. या महिन्यातही रविवार ३० डिसेंबर २०१८ रोजी 'लास्ट संडे ऑफ मंथ रन'चे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील शहीद पुलाच्या पाठीमागे असलेल्या नवीन रस्त्यावर हे रन होणार असून, त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.

नव्या वर्षाची सुरुवात वेगवेगळ्या उपक्रमांनी करण्याचा प्रघात आपलेकडे रुजतो आहे. सकाळी लवकर उठून आपल्या तब्येतीसाठी व शरीरासाठी योग्य असा व्यायाम करणे आपले शरीर आणि मन निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आवश्यक झाले आहे. २०१८ ला निरोप देताना आणि सन २०१९ चे स्वागत करताना सकारात्मक पद्धतीने व्यायामाचा पायंडा पाडणे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. याच हेतूने प्रसिद्ध धावपटू अनिरुद्ध अथनी अॅक्टिव्ह एनर्जी यांचे संकल्पनेतून ही रन आयोजित करण्यात आली आहे. या रनमध्ये ३ कि.मी., ५ कि. मी., १० कि. मी. आणि त्याहूनही जास्त अंतर धावण्यासाठी धावपटूंना प्रोत्साहीत करण्यासाठी या रनचे आयोजन करण्यात येते.

अबाल, वृद्ध, तरुण, तरुणी असे सर्व वयोगटातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने यात भाग घेतात. ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या रनसाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक असून, बुधवार २६ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. जास्तीत जास्त धावपटूंनी आणि धावण्याचा व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या नाशिककरांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक अनिरुद्ध अथणी आणि अॅक्टिव्ह एनर्जीच्या सदस्यांतर्फे करण्यात आली आहे. नोंदणीसाठी https://www.townscript.com/e/lsom-run-december-2018 या संकेत स्थळावर नोंदणी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षछाटणीचाही ठेका

$
0
0

स्थायी समितीवर प्रस्ताव; पालिकेच्या रुग्णालयांना मिळणार २३ डॉक्टर

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेत आता विविध सेवांच्या खासगीकरणाचे वारे वाहू लागले असून, आता शहरातील धोकेदायक वृक्ष छाटणीसह आपत्ती काळात कोसळणाऱ्या वृक्षांची विल्हेवाटही खासगीकरणातून लावण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उद्यान तसेच अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे कारण देत, या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, २३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचाही प्रस्ताव स्थायीवर असल्याने पालिकेच्या रुग्णालयांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

बुधवारी (दि. २६) स्थायी समितीचा सभा होणार आहे. या सभेत विविध प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रातील वादळ-वाऱ्याने नैसर्गिक कारणांनी कोसळलेली झाडे उचलून नेणे, धोकेदायक वृक्षांची छाटणी करणे, कीडग्रस्त वृक्ष तोडण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात, आपत्ती काळात वृक्षांची पडझड झाल्यावर ती तातडीने उचलण्यासाठीची यंत्रणा पालिकेकडे नसल्याचे कारण देण्यात आले आहे. सध्या सहा विभागात गरजेवेळी ठेकेदारामार्फत हे काम केले जात असले तरी, एकत्रित ठेका देण्याचा पालिकेचा मानस आहे. धोकेदायक वृक्षांच्या फांद्या छाटने, कीडग्रस्त वृक्ष तोडण्याचेही काम उद्यान विभागामार्फतच केले जातात. परंतु, या कामासाठीची आवश्यक यंत्रणा मात्र पालिकेकडे नाही. उद्यान विभागातच कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे वृक्षछाटणीचे काम आउटसोर्सिंगला देण्यासाठी पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून, सर्वाधिक दर मे. कृष्णा एंटरप्रायजेस कंपनीने दिले आहे. पालिका हद्दीत कोसळणाऱ्या वृक्षाच्या लाकडाला प्रति किलो ५ रुपये ५५ पैसे दर देण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना काम देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला आहे. त्याबाबत स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

रुग्णसेवा होणार तत्पर

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची कमतरता आहे. विशेषत: बालरोगतज्ज्ञ, स्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेकडून २८ पदासांठी जाहिरात देण्यात आली होती. त्यापैकी २३ डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात ११ स्रीरोग आणि ६ बालरोगतज्ज्ञ आहेत. या डॉक्टरांना सहा महिने मानधनावर घेतले जाणार असून, त्यासाठी ७७ लाख १० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चाला मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या डॉक्टरांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार करणाऱ्यावर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे अंगणवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याबद्दल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. या घटनेचा तपास जलद गतीने करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिपिन कटारे, शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, जितू बागुल, रेश्मा बच्छाव, सुनील पगारे, विनोद जगताप, राहुल अंबुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळ्यांनी वेधले लक्ष

$
0
0

रांगोळ्यांनी वेधले लक्ष

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सीएम चषक अंतर्गत नाशिक पूर्व मतदारसंघातर्फे रामघाटावर आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बेटी बचाव, बेटी पढाव, जलसंपत्ती, वृक्षसंवर्धन, साक्षरता, देशप्रेम आदी विषयांवर काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पन्नासहून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. नाशिकच्या पर्यटन स्थळी आलेले पाहुणेही रांगोळ्या पाहून कौतुक करताना दिसत होते. आलेल्या पाहुण्यांनी प्रत्येक रांगोळीची पाहणी केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आ. बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन राज्यांतील पराभवामुळे मित्रपक्षांची वाढली ‘बार्गेनिंग पॉवर’

$
0
0

मित्रपक्षांचा वाढली 'बार्गेनिंग पॉवर'

नागपूर : तीन राज्यांत भाजपचा झालेला पराभव आणि काँग्रेसची सत्ता आल्यानंतर उभय पक्षांना महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी बळ देणाऱ्या मित्रपक्षांचे भाव वधारले आहेत. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बिहारमधील जागावाटपात भाजपने नमते घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या पंखांत आणखीच बळ आले आहे. साहजिकच येत्या लोकसभा निवडणुकीत जागा मिळवण्यासाठी लहान पक्षांचे 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याने येणाऱ्या काळात मोठ्या पक्षांची दमछाक होणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांच्या निकालाने लोकसभा निवडणुकीच्या पक्षपातळीवरील नियोजनातही हस्तक्षेप केला आहे. एककलमी कार्यक्रम राबवून चालणार नाही याची पुरती जाणीव एकीकडे भाजपला आली असताना, दुसरीकडे काँग्रेसपक्षही साधव झाला आहे. लोकसभा व नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यश मिळावे म्हणून भाजपकडून महायुतीसाठी आणि काँग्रेसकडून महाआघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून स्वबळाची भाषा वापरण्यात येत आहे. त्यात आता रिपब्लिकन पक्षही (आठवले गट) सक्रिय झाला. महाआघाडीसाठी काँग्रेसच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पावले मागे जात सकारात्मक सहकार्य दिल्याने थोडी आशा वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे ‘रामायणा’त

$
0
0

रामायणाचार्य रामराव महाजन ढोक यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्रीराम कथा हा जीवनाचा सर्वांत सुखकर मार्ग आहे. श्रीराम कथा पती-पत्नी यांनी एकत्रित श्रवण करावी. तसेच आपल्या जीवनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे रामायणामध्ये असून, श्रीराम कथा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या रामकथेचे सर्वांनी वाचन व श्रवण करून चालणार नाही तर कथेचे प्रबोधन आत्मसात करावे, असा संदेश रामायणाचार्य ह. भ. प. ढोक महाराज यांनी दिला.

स्व. सुशीलाबाई शिरोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने कळवण शहरातील शिवाजीनगरमध्ये रामलीला मैदानावर तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद सागर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील शिरोरे यांनी ढोक यांचे स्वागत केले. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी महादेवाच्या विवाहाच्या प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. यावेळी विनोदाची झालर व संगिताची साथ देवून त्यांनी भाविक भक्तांना जागेवर खिळवून ठेवले. यावेळी उपनगराध्यक्ष कौतिक पगार, भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, अॅड. परशुराम पगार, कारभारी पगार आदींसह कळवण शहर व तालुक्यातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोषण आहाराचे रेकॉर्ड ताब्यात

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

शहरानजीक असलेल्या द्याने जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेत संबंधित मुख्याध्यापिका मुलांच्या संख्येनुसार शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारास धान्यमाल पुरवीत नसल्याची तक्रार ठेकेदाराने केली होती. या तक्रारीवरून शालेय पोषण आहार अधीक्षक श्रीधर देवरे यांनी सोमवारी थेट शाळेस भेट देऊन पाहणी केली. पोषण आहाराचे दफ्तर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

संबधित शाळेत आहार पुरविण्याचा ठेका नावीद अली यांच्याकडे आहे. त्यांनी मुख्याध्यापिका मुलांच्या संख्येनुसार धान्यमाल देत नसल्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी यांच्याकडे त्याने केली होती. आहार शिवविल्याचे पैसेदेखील वेळेत अदा केले जात नाहीत, असाही आरोप ठेकेदाराने केला होता. दरम्यान या तक्रारीनंतर गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, विस्तारअधिकारी दिलीप पवार यांनी शाळेस भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शालेय पोषण आहारचे धान्यमाल असलेली वर्गखोली सील केली होती. तसेच घडला प्रकार शालेय पोषण आहार अधीक्षक श्रीधर देवरे यांना कळवला होता. सोमवारी देवरे यांनी शाळेस भेट देऊन पाहणी केली. तसेच सर्व रेकोर्ड व कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली. त्यात त्रुटी आढळल्यास वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला जाईल, असे देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेल प्रकरणी जेपीसी नेमावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राफेल खरेदीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारबाबत येथील शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार आसिफ शेख व महापौर शेख रशीद यांच्या नेतृत्वात सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राफेल खरेदी प्रकरणी संसदीय संयुक्त समितीची मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेख म्हणाले, हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर देखील असत्य माहिती सादर केली असून, हे संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणी संसदीय संयुक्त समितीची मागणी केली असून, केंद्र शासनाने ती मान्य करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला दोन चोरटे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड शहरामध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईतांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मनमाड रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली. संजय किशोर गायकवाड (वय २२, रा. आनंदवाडी, मनमाड) आणि राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (रा. निमज, ता. रतलाम, जि. इंदोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून इन्व्हर्टर, पॉवर बॅटरीज, गॅस शेगडी व सिलेंडर असा ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेश शर्मा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राजस्थानमधील जयपूरसह नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव पोलिस स्टेशन्समध्ये दरोडा तयारी, घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. जयपूर मध्यवर्ती कारागृह आणि नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घरफोडीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तो सुटला आहे. संजय गायकवाड याच्यावरही मनमाड शहरात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राम करपे, हवालदार रवींद्र वानखेडे, रावसाहेब कांबळे, भारत कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

$
0
0

\Bतेली समाजाचा

आज वधू-वर मेळावा

\Bनाशिक : नाशिक शहर तेली समाजाच्यावतीने वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (२५ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात हा मेळावा होणार आहे. सुमारे ३ हजार ५३२ नियोजित वधू-वर मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

--

\Bउद्योगसंधीवर व्याख्यान

\Bनाशिक : केंद्रीय तंत्रविज्ञान विभागांतर्गत महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगवर्धिनी तर्फे 'महिलांसाठी उद्योगसंधी' या विषयावर हे व्याख्यान होईल. मंगळवारी (२५ डिसेंबर) रोजी दुपारी ४ वाजता सीबीएस येथील कान्हेरेवाडीतील उद्योगवर्धिनी कार्यालयात हे व्याख्यान होणार आहे. यासाठी महिलांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राशिभविष्य

$
0
0

मेष : बौद्धिक क्षेत्रात चमकाल.

वृषभ : घराला प्राधान्य द्या.

मिथुन : कुटुंबाला प्राधान्य द्या.

कर्क : लेखकांसाठी चांगला काळ.

सिंह : बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कन्या : व्यवहारात सावध राहा.

तूळ : आर्थिक गोष्टीत दक्ष राहा.

वृश्चिक : व्यापाराला प्रतिसाद.

धनु : गाठीभेटीचे योग येतील.

मकर : बौद्धिक गोष्टींना वाव.

कुंभ : व्यवहारात चोख राहा.

मीन : अध्ययनात यश मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या कारभाराबाबत याचिका

$
0
0

मिळकत वापराविरोधात

रतन लथ यांची याचिका

महापालिका आस्थापनांचा व्यावसायिक उपयोग

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या वास्तूंचा वापर अनधिकृतपणे होत असल्याचे महापालिकेच्याच मिळकत सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील अशा असंख्य मिळकतींचा वापर खासगी व्यक्तींकडून पैसे कमावण्यासाठी केला आहे. याविरोधात फ्रवशी अकॅडमीचे अध्यक्ष रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी गरजेनुसार ठिकठिकाणी सामाजिक सभागृहांची उभारणी केली आहे. परंतु, या वास्तूंचा वापर योग्य कारणांसाठी होत नाही. काही नगरसेवक, त्यांचे सहकारी किंवा कार्यकर्त्यांनी या मिळकतींवर कब्जा मिळविला आहे. काही सभागृहांचा सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात आहे, तर काही धूळखात अशा इमारती, भूखंड धूळ खात पडून आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पालिकेच्या या मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यात शहरात महापालिकेच्या मालकीच्या ९०३ मिळकती आढळून आल्या होत्या. अनेक मिळकतींचे करार संपले होते, तर अनेक मिळकती अनधिकृतपणे वापरल्या जात असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मिळकती जप्त करण्याची मोहीमही सुरू केली होती. परंतु, त्यांची बदली झाल्यानंतर ही मोहीम थंडावली आहे. त्यामळे लथ यांनी उच्च न्यायालयात या मिळकतींच्या अवैध वापराविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकार, महापालिका आयुक्त, नगररचनाचे सहसंचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालय काय दखल घेते आणि निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडीरेकनरचा वाद

$
0
0

रेडीरेकनरचा वाद

रतन लथ यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी या मिळकतींबाबत यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. औरंगाबाद खंडपिठाने यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महासभेने या मिळकतींबाबत नियमावली तयार करीत शासनाकडे पाठवली होती. परंतु, त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे या मिळकती रेडीरेकनर दराने द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परंतु, रेडीरेकनरने या मिळकती घेण्यास कुणीही तयार नाहीत. त्यामुळे या मिळकतींचा वाद प्रलंबित आहे. महापालिकेच्या मिळकती या नफा कमविण्यासाठी नसल्याचा युक्तीवाद लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायालयात सॅनिटरी नॅपकीन मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालयामध्ये येणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा न्यायालयात तीन, तर मालेगाव आणि निफाड न्यायालयात प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आले आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशिन आवश्यक होते. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देताच त्यांनी त्यास मंजुरी देत निधी वर्ग केल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक आणि नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकारी अॅड. शामला दीक्षित, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. सोनल कदम, अॅड. वैष्णवी कोकणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सटाण्यात बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नरधामाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने शहरात खळबळ उडाली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने सटाणा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी ऋषीकेश शरद सूर्यवंशी (वय २१) या युवकाय अटक केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलगी सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किराणा घेण्यासाठी दुकानात गेली असता ऋषीकेशने अंधाराचा फायदा घेत तिला चाकूचा धाक दाखवला. चापटीने मारहाण करीत आरडाओरड केल्यास मारून टाकेल, असा दम देत मंदिराच्या मागे नेले. त्याच ठिकाणी तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून बलात्कार केला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायदासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, दुपारी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पाल, सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,चांदवड

चांदवड तालुक्यातील पाटे येथील शांताराम काशिनाथ ठोके या शेतकऱ्यांच्या गट नंबर ५२ मधील शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेश सुरेश लांजेवार (वय ३२, गोंदिया) या मजुराचा तोल गेल्याने तो विहिरीत दगडावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २५) रोजी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. मच्छिंद्र रामचंद्र कासव यांनी चांदवड पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटोळेत श्रमसंस्कार शिबिर

$
0
0

पाटोळेत श्रमसंस्कार शिबिर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पाटोळे येथे सिन्नर महाविद्यालयाने 'रासेयो' अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर मविप्रचे संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सरपंच मेघराज आव्हाड, ज्ञानेश्वर खताळे उपस्थित होते. अहवाल वाचन मुख्य कार्यक्रम अधिकारी सुनील कर्डक यांनी केले. ग्रामस्थांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रा. आर. व्ही. पवार, शिवाजी सदगीर, रामहरी खताळे, शिवाजी खताळे, सुनील सांगळे, राजेंद्र खताळे उपस्थित होते.

शिबिरात आरोग्य तपासणीही करण्यात आली. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकातर्फे १०५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव दाते कमी, घेणारे मात्र जास्त!

$
0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : अवयवदानाबाबत आजही मोठी उदासीनता असून, देण्यापेक्षा घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. या वर्षात नाशिकमधून दोन वेळा अवयदानाची प्रक्रिया पार पडली. गतवर्षी हे प्रमाण तीन आणि २०१६ मध्ये पाच इतके होते. याउलट या वर्षी १५ पेशंटना मात्र इतर ठिकाणांहून आलेल्या अवयवांचा वापर करण्यात आला. गतवर्षी हे प्रमाण सात, तर २०१६ मध्ये ते २२ इतके होते.

पुणे येथे असलेल्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीमध्ये (झेडटीसीसी) नाशिकचा समावेश होतो. या कमिटीच्या समन्वयक म्हणून आरती गोखले काम पाहतात. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार अवयवदानाबाबत नाशिक जिल्ह्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कमिटीअंतर्गत येणाऱ्या नाशिकचे प्रमाण कमी असताना पुणे झेडटीसीसी अवयवदानाबाबत राज्यात सर्वात पुढे आहे. अवयवदान ही संकल्पना सर्वसामान्यांत रुजावी यासाठी प्रयत्न केले जातात. हॉस्पिटल्समार्फतही जनजागृती केली जाते. मात्र, यात सर्वसामान्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे गोखले यांनी स्पष्ट केले.

एखाद्या व्यक्तीस ब्रेनडेड घोषीत केल्यानंतर त्या व्यक्तीचे अवयव मरणाच्या दारात पोहचलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या उपयोगी पडतात. अगदीच गरजेच्या वेळी पोलिसांची मदत घेऊन एका ठिकाणावरील अवयव दुसऱ्या ठिकाणी पोहच केले जातात. यासाठी बऱ्याचदा अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जाते, तर क्वचित हवाई मार्गाचा वापर केला जातो. २०१८ मध्ये शहर पोलिसांनी अशा प्रकारे आठवेळा ग्रीन कॉरिडॉर करून कमीत कमी वेळेत अवयव घेऊन जाण्यास मदत केली.

जागृती सुरू, कृती अद्याप कमी

याच वर्षी मार्च महिन्यात शहरामध्ये एक आगळावेगळा विवाह पार पडला होता. विवाहासाठी आलेल्या ७०० वऱ्हाडींनी अवयवदानासाठी नोंदणी केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठानेसुद्धा सप्टेंबर महिन्यात याबाबत जनजागृती मोहीम राबविली होती. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी गत महिन्यात सुनील देशपांडे यांनी तब्बल नाशिक ते आनंदवन असा अकराशे किलोमीटरचा पायी प्रवास केला. जनजागृतीबाबत वेगवेगळे घटक काम करीत असले तरी अवयवदानाबाबत पुढे येणाऱ्यांची संख्या तुलनेत खूप कमी असल्याची खंत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. याबाबत ऋषिकेश हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे म्हणाले की, अवयवदानासाठी नागरिक पुढे येत आहेत. काही काळानंतर नाशिकमध्ये अवयवदानाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असेल. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मृत्यूंजय ऑर्गन फाउंडेशन सुरू करण्यात आली असून, याद्वारे नागरिकांना जोडण्याचे काम केले जाते, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>