Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अडीच वर्षाच्या 'पद्मा'वर दीड कोटीची बोली

$
0
0

सारंगखेडा, नंदुरबार

सारंगखेड्यातील चेतक फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. येथील घोडे बाजारात विक्रीसाठी तीन हजारांहून अधिक घोडे दाखल झाले आहेत. घोड्यांच्या खरेदीसाठी अश्वप्रेमींनीही मोठी गर्दी केली आहे. एका एका घोड्याची विक्री लाखो रूपयांना होतेय. या बाजारात 'पद्मा' घोडी ही सर्वांचं आकर्षण ठरली आहे. या घोडीवर आतापर्यंत दीड कोटींची बोली लागली आहे.

महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्यांची वंशज असलेल्या पद्माच्या सुरक्षिततेसाठी चार जण खडा पहारा देत आहेत. तिला थंडी वाजू नये यासाठी हिवाळ्यात हिटर तर उन्हाळ्यात एसी लावला जातो. ती रोज दहा लिटर दूध पिते आणि चना खातेय. ती दुसऱ्यांता या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. तीने आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाबमधील स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. 'पद्मा'वर दीड कोटींची बोली लागली आहे. पण १० कोटी दिले तरी तिची विक्री करणार नाही, असं इंदूर येथील 'पद्मा'चे मालक लाडकाभाई यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवक काँग्रेसची आज उत्तर महाराष्ट्र बैठक

$
0
0

युवक काँग्रेसची आज

उत्तर महाराष्ट्र बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि युवक काँग्रेसद्वारा आयोजित उपक्रमांच्या नियोजनार्थ प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील काँग्रेस-भवन येथे युवक काँग्रेसची गुरुवारी (२७) बैठक होणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत ओगले व जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिली.

बैठकीला नाशिक, जळगाव, धुळे येथील युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष तांबे यांच्यासह महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी स्वतः उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वाढती बेरोजगारी, युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, रोजगार निर्मितीचे खोटे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकार विरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने कन्याकुमारी ते काश्मीर अशी युवा क्रांती यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा ८ ते ११ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातून जाणार आहे. यात्रेच्या नियोजनाचा आढावा सदर बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सुमारे २५ हजार गावांमध्ये चलो पंचायत अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरातील पाच कोटी नागरिकांना भेटण्याचे उद्दिष्ट युवक काँग्रेसने ठेवले आहे.

अभियान अधिकाधिक नियोजन पूर्वक पार पाडले जावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आग्रही आहेत. त्यासाठी विभागीय बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत युवकांची भूमिका महत्त्वाची असेल. मोदी सरकारने निराश केलेल्या युवाशक्तीला धीर देऊन भक्कम बनविण्याची भूमिका युवक काँग्रेस निभावत आहे. विभागीय बैठकांच्या निमित्ताने युवक काँग्रेस २०१९ च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या बैठकीला महत्त्व असल्याचे प्रशांत ओगले व स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडू फोटो

पोरांना नाचवत ठेवा, आम्ही पोहचतोच!

$
0
0

उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांनी वऱ्हाडी मंडळींची कोंडी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भुसावळहून नाशिककडे जाणाऱ्या गाड्या बुधवारी उशिरा धावत असल्याने दाट तिथी असलेल्या वऱ्हाडी मंडळींची बुधवारी पंचाईत झाली. सायंकाळच्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी लवकर तयारी करूनही वेळेत पोचणे शक्य नसल्याने 'पोरांना नाचवत ठेवा, अजून लग्न लावू नका, आम्ही पोहचतोच' असे सांगण्याची वेळ रेल्वे प्रवासात असलेल्या वऱ्हाडी मंडळींवर आली.

भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथून बुधवारी नाशिक शहरात सायंकाळच्या लग्नासाठी अनेकांना यायचे होते. काशी एक्स्प्रेस, साकेत एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस व कामयानी एक्स्प्रेस या नाशिकला सायंकाळपर्यंत पोहचण्यासाठी सोयीच्या गाड्या होत्या. सायंकाळच्या लग्नाला वेळेत पोहचू असा विवाहास उत्साहाने जाणाऱ्या मंडळींचा कयास होता; मात्र बुधवारी सर्वच रेल्वे एक्स्प्रेस तब्बल तीन ते पाच तास उशिरा धावत होत्या. रेल्वेने लग्नाचे गाव गाठण्याची धावपळ करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मनमाडला दुपारी एक वाजता येणारी गोरखपूर मुंबई काशी एक्स्प्रेस मनमाड स्टेशनवर सायंकाळी पाचनंतर आली. दुपारी अडीच वाजेची पुष्पक पावणे पाच वाजता अवतरली. तर साकेत, कामयानी या सायंकाळपर्यंत नाशिक गाठणाऱ्या रेल्वे नाशिकला पोहचेपर्यंत रात्रीचे नऊ ते दहा उजाडणार, अशी बुधवारची स्थिती होती.

खासगी वाहन किंवा बसने जळगाव, भुसावळकडून नाशिकला येण्यास जास्त वेळ लागत असल्याने रेल्वे उशिराने धावत असली तरी प्रवाशांना दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे सोयीच्या असलेल्या काशी एक्स्प्रेसने लग्नासाठी निघालेल्या प्रवाशांनी लग्न मंडपी असलेल्या पाहुण्याला व निमंत्रकाला फोन करून आम्ही पोहचतो तोवर पोरांना नाचवत ठेवा, असा निरोप धाडून आपण लग्नाला पोहचत असल्याची वर्दी दिली. तर काहींनी आम्हाला घ्यायला नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ या, अशी प्रेमळ गळ घातली. लग्नाचे मुहूर्त ठरवताना रेल्वेचे कोलंमडणारे वेळापत्रकही लक्षात घेऊन उशिराचे मुहूर्त ठेवायला हवे, अशी चर्चा काशी एक्स्प्रेसमध्ये रंगली.

गोरज मुहूर्ताचे लग्न, आग्रहाचे आमंत्रण म्हणून आम्ही रेल्वेने निघालो. काशी एक्स्प्रेस दुपारी दोन वाजेपर्यंत पोहचते. म्हणून तिकीट काढले तर जळगावला ही गाडी चार तास उशिराने आली. गोरज मुहूर्त झाला तरी आम्ही रेल्वेतच होतो, मग 'पोरांना नाचवा' असा लाडिक दम निमंत्रकाना दिला.

- मच्छिंद्र सहस्त्रबुद्धे, प्रवासी वऱ्हाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

$
0
0

वाळू ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात मूळडोंगरी येथे नदी किनाऱ्यावरील वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी जाणारा ट्रॅक्टर उलटून एक मजूर ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

मूळडोंगरी नदी किनाऱ्यावरील वाळू अवैधरित्या उपसा करण्याचे प्रकार सुरू आहे. वाळूउपसा करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुधवारी ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरमधील चारपैकी तीन मजुरांसह चालकाने उडी मारली. त्यामुळे ते वाचले. मात्र, विष्णू दिवाण सोनवणे (वय १८) या मजुराचा ट्रॉलीखाली सापडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकसाठी कांदा

$
0
0

आणखी दोनशे रुपयांचे

कांद्याला मिळणार अनुदान?

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

कांद्याच्या ढासळत्या किमतीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच प्रति क्विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केलेले आहे. आता केंद्र सरकारनेही कांदा उत्पादकांना दोनशे रुपये अनुदान देण्याची तयारी चालवली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबतचे आश्वासन

प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना दिले आहे. या आश्वासनानंतर कडू यांनी 'मुक्काम' आंदोलन मागे घेतले.

सरकारने कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे तसेच पुणेगाव कालव्या संदर्भातील प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी येथील प्रशासकीय इमारतीच्या पटांगणावर प्रहार संघटनेतर्फे मुक्काम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या १४ पैकी १० मागण्या शासनाने मान्य केल्या असून, कांद्याला राज्य सरकार २०० व केंद्र सरकार २०० रुपये अनुदान देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री महाजन तसेच सहकार मंत्री देशमुख यांनी दूरध्वनीवरून दिल्याचा दावा कडू यांनी केला आहे. तसेच, पुणेगाव डावा कालव्यासंदर्भात प्रलंबित प्रापण सूचि १० जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता अलका आहेरराव यांनी दिले आहे, तर सन २०१६ साली शासनाने जाहीर केलेले प्रतिक्किंटल १०० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन सहकार पणन विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी दिल्याची माहितीही कडू यांनी दिली.

मुक्काम मागे... ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर अभियंता घुगे संकटात

$
0
0

उद्धव निमसेंकडून चौकशीची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांना स्थायी समितीतील सदस्यांनी रडारवर घेतले असून स्वागत हाईट्स प्रकरणात घुगे यांच्यासह दोन अभियंत्यांना सहआरोपी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. दुसरीकडे, स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य उद्धव निमसे यांनी घुगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली. घुगेंवरील आरोप सिद्ध झाले नाही तर स्थायी समितीत येणार नाही, असे आव्हान त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले.

शहरात तीन महिन्यांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कामगारनगरमधील वादग्रस्त स्वागत हाईट्स इमारत प्रकरणात सातपूर पोलिसात फिर्याद दाखल झाली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या इमारतीत संबंधित बिल्डरने मंजूर नकाशा व्यतिरिक्त बांधकाम केले असताना त्याकडे डोळेझाक करणे तसेच वाढीव बांधकाम काढण्यासाठी चालढकल केल्याप्रकरणी शहर अभियंता तथा तत्कालीन नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्यासह आर. व्ही. आहेर आणि एस. आर. खाडे या तिघांना सहआरोपी करण्याची परवानगी सहायक पोलिस आयुक्त शांताराम पाटील यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. पोलिसांच्या चौकशीत मोठे घबाड हाती लागले असून या तिघांविरोधात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी स्वागत हाईट्स प्रकरणाला वाचा फोडली होती तर, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, संतोष गायकवाड यांनी महासभेत यापूर्वी हा विषय उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

विजय जाधव यांच्या फिर्यादीनुसार बिल्डर विनो पटेल, प्रेमजी पटेल व संजय पटेल यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून या प्रकरणात सहआरोपी म्हणून घुगे यांच्यासह आर. व्ही. आहेर व एस. आर खाडे यांनाही सहभागी करण्यात आले आहे. चौकशीनंतर न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी पोलिसांनी आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आयुक्त या पत्राला काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेले आहे. शहर अभियंत्यासारख्या पदावरील अधिकारी चौकशीत अडकल्याने आयुक्तांची कसोटी लागणार आहे.

घुगेंनी नाले गिळले

संजय घुगे यांनी शहरातील सर्व नाले गिळल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत उद्धव निमसे यांनी केला. नगररचना विभागात कार्यरत असतांना घुगे यांनी मंजुरी दिलेल्या सर्व फाईल्सची चौकशी करावी. ज्या ठिकाणी भूमिगत गटार योजना राबवली त्या ठिकाणचे सर्व नाले बिल्डरांसाठी बुजविल्याचा आरोप करत त्यात घुगेंसह, माजी अधिकारी सुनील खुने यांचाही सहभागी असल्याचा आरोप सभागृहात केला. आपल्याला निवडणुकीत पाडण्यासाठी घुगे यांनी प्रयत्न केला. घुगेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर स्थायी समितीच्या बैठकांना येणार नाही, असे आव्हान निमसे यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅबचे पैसे परत करणार

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी एका उमेदवाराने स्वतःच्या सेवाभावी संस्थेमार्फेत शिक्षक मतदारांसाठी ठरावीक रक्कम घेऊन टॅब बुकिंग योजना राबविली होती. मात्र, यात सहभागी काही शिक्षकांना अद्याप टॅब मिळाले नव्हते. याविषयी पीडित शिक्षकांच्या तक्रारींवरून 'मटा'त वृत्त प्रसिद्ध होताच ज्या शिक्षकांना टॅब मिळाले नसतील, त्यांचे पैसे परत करण्यास या उमेदवाराने सहमती दर्शवली आहे.

जून महिन्यात विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. यात महादेव साहेबराव चव्हाण हेदेखील उमेदवार होते. त्यांनी मुक्ताई बहुउद्देशिय संस्था या नाशिकमधील म्हसरुळस्थित त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत विभागातील जिल्ह्यांत शिक्षकांसाठी अल्प किमतीची टॅब बुकिंग योजना राबविली होती. या योजनेला विभागातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु, या योजनेत पैसे भरलेल्या बहुतांश शिक्षकांना टॅब मिळाले नव्हते. या शिक्षकांनी उमेदवाराशी संपर्क साधला असता टॅब देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव काही शिक्षकांना आला होता. याविषयीचे वृत्त 'मटा'तून बुधवारी प्रसिद्ध होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.

अध्यापनासाठी वापर नाहीच

टॅब बुकिंग योजनेत ज्या शिक्षकांनी सहभाग घेतला, त्यातील बहुतांश शिक्षकांना टॅबचे वितरण करण्यात आल्याचा दावा महादेव चव्हाण यांनी केला आहे. विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळवून त्यातून ही योजना राबविली होती. मात्र, ज्या शिक्षकांना टॅब देण्यात आले होते, त्यापैकी कोणीही या टॅबचा वापर अध्यापनासाठी केला नसल्याचे या कंपन्यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित टॅबसाठी या कंपन्यांकडून फंड मिळविण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा दावाही महादेव चव्हाण यांनी केला आहे. मुक्ताई बहुउद्देशिय संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी अल्प किमतीत स्वेटर्स, बॅग, बूट, सॉक्स अशा प्रकारचे साहित्यही पुरविले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुक्ताई बहुउद्देशिय संस्थेतर्फे विविध सामाजिक कामे केली जातात. शिक्षकांसाठी टॅब देण्याचीही योजना राबविली होती. परंतु, शिक्षकांनी टॅबचा वापर अध्यापनासाठी केलाच नसल्याचे निधी दिलेल्या कंपन्यांना आढळून आले होते. या योजनेत कोणत्याही शिक्षकाची फसवणूक करण्याचा उद्देश नव्हता. ज्यांना टॅब मिळाले नसतील त्यांना पैसे परत केले जातील.

- महादेव चव्हाण, पराभूत उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाशा पटेल रविवारी नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याला भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल रविवारी (दि. ३०) नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिक बाजार समितीमध्ये ते कांदा उत्पादकांशी चर्चा करणार आहेत.

मातीमोल भावाने कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे प्रकारही घडले आहेत. उत्पादन खर्चाएवढेही पैसे मिळत नसल्याने निफाडमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयास मनी ऑर्डर पाठवून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. तर अलीकडेच एका शेतकऱ्याने कांदा बाजारपेठेत घेऊन जाण्याऐवजी जनावरांना खाऊ घातला. चांदवड येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२७) प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

गत आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्र्यांना कांदे फेकून मारण्याचा सल्ला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाशिकचा कांदा चर्चेत असल्याने पाशा पटेल हे देखील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. ते नाशिकमध्ये २९ डिसेंबर रोजी सायंकाळी मुक्कामी येतील. रविवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता ते नाशिक बाजार समितीला भेट देणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पटेल यांनी कांद्याच्या दराबाबत यापूर्वीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतानाच कांद्याला भाव मिळावा, अनुदान वाढवून मिळावे यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून पटेल यांचा अभिप्राय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पटेल यांच्या दौऱ्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव मनपा आयुक्तपदी बोर्डे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे ४ डिसेंबर रोजी बदली झाल्यानंतर तब्बल २१ दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर पालिका नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या किशोर बोर्डे यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी येथील प्रशासनास प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नवनियुक्त आयुक्त बोर्डे यांच्याकडून देखील कर्तव्यकठोर कामाची अपेक्षा मालेगावकरांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे.

पान ४

काही दिवसांपासून आयुक्तपद रिक्त असल्याने मालेगावच्या आयुक्तपदी कोण? याबाबत दोन ते तीन नावे चर्चेत होती. तत्कालीन आयुक्त धायगुडे यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे अनेकवेळा लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने नव्याने नियुक्त होणारे आयुक्त मर्जीतील असावेत यासाठी देखील लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी शासनाने किशोर बोर्डे यांच्या नियुक्तीचे आदेश दिलेत. २६ नोव्हेंबर रोजी त्यांना नाशिक महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून, मालेगाव येथे तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डे हे याआधी सप्टेबर २०१५ ते एप्रिल २०१६ कालावधीत येथील महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. आयुक्तपदी असताना संगीता धायगुडे यांनी पालिका प्रशासनाला लावलेली आर्थिक शिस्त, स्वच्छता, हागणदारीमुक्त शहर आदी विषयांवर घेतलेली आग्रही भूमिका यामुळे शहराचे नावलौकिक वाढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको निवडणुकीत ‘प्रगती’ची घोडदौड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत दोन फेऱ्यांमध्ये प्रगती पॅनलने आघाडी घेतली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. त्यात दोन फेऱ्यांत बहुतांश जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. दोन फेऱ्यांनंतर रात्री आठ वाजता मतमोजणी थांबविण्यात आली. आज, गुरुवारी सकाळी पुन्हा आठ वाजता तिसरी फेरी होणार आहे. दोन फेऱ्यांमध्ये ३६ हजार ५०० मतांची मोजणी झाली असून, तिसऱ्या फेरीत २६ हजार ५०० मतांजी मोजणी करण्यात येणार आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या मतमोजणीत कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर प्लस...१

त्यामुळे सकाळपासून अतिशय शांततेने व संथ गतीने सुरू झालेल्या या मतमोजणीत दुपारपर्यंत अंदाज बांधणे अवघड झाले. त्यानंतर हळूहळू आकडे येऊ लागल्यानंतर आघाडीचा कलही पुढे आला. या निवडणुकीत प्रगतीच्या महिला राखीव व अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव गटात प्रगतीच्या तिन्ही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीची पद्धत अतिशय क्लिष्ट असल्यामुळे मतमोजणी संथ गतीने सुरू होती. पण, सहकारातील अधिकाऱ्यांनी अतिशय चोख नियोजन केल्यामुळे कोणताही गोंधळ येथे दिसत नव्हता.

साडेचार वर्षाच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर २३ डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी ६३ हजार ८३९ सभासदांनी मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अवघी ३६.२१ राहिली आहे. त्यामुळे अनेकांचे अंदाज चुकवत निकाल पुढे आले आहेत. या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाने ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.

अशी सुरू आहे मतमोजणी

नामकोच्या निवडणुकीसाठी १०४ टेबलांवर मतदान केंद्रनिहाय मोजणी सुरू आहे. या टेबलावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर असलेल्या दोन मतपेट्यांतून मतमोजणी करण्यात येत आहे. पहिले सर्वसाधारण गटातील जम्बो मतपेटी फोडून त्याची जुळवाजुळव केल्यानंतर त्यातून पंचवीस मतपत्रिकांचे गठ्ठे बनवले जात आहेत. त्यानंतर राखीव गटाची मतमोजणी केली जात आहे.

मोजणीत क्लिष्टता

सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतपत्रिकेवर १८ पेक्षा जास्त मते दिली आहेत का, हे तपासून ती वैध ठरवली जात आहे. त्यानंतर कोणत्या उमेदवाराला मते दिली, हे एका चार्ट पेपरवर लिहून त्यानंतर त्याची एकूण मते काढली जात आहेत. राखीव गटालाही हीच पद्धत असली तरी यात महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी ७ उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी ५उमेदवार असल्यामुळे येथील मतमोजणी सोपी होत आहे.

नाशिकची मतमोजणी पूर्ण

मतमोजणीत नाशिक शहरातील पहिल्या फेरीत १५९ मतदान केंद्रांपैकी १०४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाली. त्यानंतर उर्वरीत ५५ मतकेंद्राची मोजणी दुसऱ्या फेरीत करण्यात आली. यामध्ये जवळपास २४ हजार मतांची मोजणी करण्यात आली. त्यात बहुतांश ठिकाणी प्रगती पॅनलनेच आघाडी घेतली.

मतमोजीत दिसला 'सहकार'

सहकार पॅनलला या निवडणुकीत आघाडी घेता आली नसली तरी मतमोजणीत मात्र दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये सहकार दिसत होता. एकमेकांशी गप्पा मारत निवडणुकीचे अनुभव व आकडेमोड हे पॅनलचे उमेदवार शेअर करीत होते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या उमेदवारांचा आपसातील सहकार येथे दिसत होता. निवडणुकीत सर्व पॅनलचे उमेदवार तर काहींच्या घरचे प्रतिनिधीही मतमोजणीसाठी उपस्थित होते. प्रगती पॅनलचे नेते सोहनलाल भंडारी, वसंत गिते, हेमंत धात्रक यांच्यासह सर्व उमेदवार सकाळपासून ठाण मांडून होते. सहकार पॅनलचे गजानान शेलार, भास्करराव कोठावदे, ललित मोदी, अजय ब्रह्मेचा यांनीसुद्धा हजेरी लावत आकडेमोड केली. नम्रता पॅनलचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लॅपटॉपवर आकडेमोड

निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद मते, राखीव मते व सर्वसाधारण मते याची आकडेमोड करण्यासाठी स्वतंत्र तीन कॉम्प्युटर ठेवले होते. टेबलावर मतमोजणी झाल्यानंतर येथे हे आकडे भरले जात होते. पॅनलच्या उमेदवारांनी स्वतंत्र यंत्रणा तयार केली होती, ज्यात लॅपटॉपवर मतमोजणीचे मतदान एकत्र केले जात होते. पण, या दोन्ही यंत्रणांचे पहिल्या फेरीचे आकडे सायंकाळी ७ पर्यंत समोर आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील कार्यालयात ग्राहकांना मार्गदर्शन

$
0
0

तहसील कार्यालयात

ग्राहकांना मार्गदर्शन

मालेगाव : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने येथील तहसील कार्यालयात कार्यक्रम झाला. मालेगाव शहर ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष हरीष मारू यांनी ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार डॉ. धर्मेद मुल्हेकर तसेच नायब तहसीलदार जगदिश निकम यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, कृषी, वजन मापे भूमी अभिलेख, एस. टी. महामंडळ, ग्राहक पंचायतीचे सदस्य, विविध विभागाचे खातेप्रमुख प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष उत्साहाचा ‘बंदोबस्त’

$
0
0

मद्यपी, रॅश ड्रायव्हर्स पोलिसांचे लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागतास गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. जवळपास दोन हजार पोलिस शनिवारपासून (दि. २९) रस्त्यावर उतरणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, छेडछाड किंवा हाणामारीसारखे प्रकार रोखण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, परिमंडळ एक आणि दोन यांच्या स्तरावर वेगळा बंदोबस्त असणार आहे.

पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकींग फोर्स आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. नववर्ष स्वागतासाठी तरुणाईची जोरदार तयारी असून, व्यावसायिकांनीही कंबर कसली आहे. शहर आणि शहराबाहेर पार्ट्यांचे आयोजन केले जातात. मात्र, उत्सहाच्या भरात अनेक वाहनचालक रॅश ड्रायव्हिंग अथवा ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह करतात. त्यामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वाढते. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की टवाळखोरी, रॅश ड्रायव्हिंग आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे खपवून घेतले जाणार नाही. घरातून बाहेर पडणाऱ्या युवा व तरुण मंडळींना याबाबत घरातून सुद्धा समजावून सांगणे आवश्यक आहे. शनिवार ते सोमवार या तीन दिवसात टप्प्याटप्प्याने बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, ठिकठिकाणी बॅरेकेडिंग लावण्यात येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथमच कोटपातंर्गंत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या अथवा हुक्का ओढणाऱ्यांना सुद्धा रडारवर घेतले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे चलन नाही. मात्र, याबाबत देखील वेगवेगळ्या पातळ्यांवर माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मद्यपींविरोधात विशेष मोहीम

गर्दीची ठिकाणे विशेषतः मार्केट, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी लक्ष पुरवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून मद्यपी वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे १५ ब्रेथ अॅनालायझर मशिन्स आहेत. या मशिन्स आधुनिक असून, त्याचा फायदा गत वर्षापासून होतो आहे. या वर्षी आतापर्यंत ४४१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली असून, मद्यपी चालकांकडून सात लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उत्साह हा समजून घेण्यासारखा असतो. मात्र, उत्साहाच्या भरात स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे, कायदा व सुव्यवस्थेला आवाहन देणे खपवून घेतले जाणार नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

वर्ष- मद्यपी चालकांवर कारवाई- दंड वसूल

२०१६-४६०-२,६७,०००

२०१७-६०५-७,८३,३१०

२०१८-४४१-७,७६,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीस कोटींवरून गदारोळ

$
0
0

राधाकृष्णन बी यांनी नियमाबाह्य पैसे अदा केल्याचे उघड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाचा २१ कोटींचा मोबदला संशयास्पद पद्धतीने अदा केल्याप्रकरणी तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या भूखंडाचा २१ कोटींचा विषय स्थायी समितीच्या सभापटलावर सादर करणे आवश्यक होते, अशी कबुली नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.

सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी २१ कोटींच्या मोबदला प्रकरणाची चौकशीचे आदेश देत सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपसह सर्वपक्षीय १४ सदस्यांनी सभागृहात फलक झळकवत ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केल्याने सभा वादळी ठरली. विशेष म्हणजे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतींवर गंभीर आरोप केले.

स्थायी समितीची सभा सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पहिल्याच सभेत अपेक्षेप्रमाणे २१ कोटींच्या भूसंपादन प्रकरणावरून गदारोळ झाला. मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक ३२/१०/१ अ (पै) मधील प्राथमिक शाळा व १५ मीटर डी. पी. रोड तसेच मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे क्र. २५, २६/२/१, २६/१, १००२, २८ पै मधील डी. पी. रोड भूसंपादन प्रकरणातील शिल्लक १३ कोटींच्या मोबदला अदा करण्याचा प्रस्ताव ठेवला प्रशासनाने ठेवला होता. त्यावरून सदस्यांनी प्रशासनाची कोंडी केली. या दोन विषयांच्या पार्ट पेमेंटचे प्रस्ताव जसे आले, तसाच गंगापूररोडवरील सर्व्हे क्र. ७०५मधील आरक्षणाच्या भूसंपादन प्रकरणात प्रशासनाने स्थायी समितीवर प्रस्ताव सादर न करता उर्वरित २१ कोटींचा मोबदला परस्पर अदा कसा केला, असा जाब सभागृह नेते पाटील यांनी प्रशासनाला विचारला.

भूसंपादन मोबदल्यासाठी तत्कालीन प्रभारी आयुक्त व विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कशा संशयास्पदरित्या मोबदला अदा केला, याची कहाणीच पाटील यांनी मांडली. स्थायीचा विरोध असताना मोबदला कसा दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चौकशी होईपर्यंत मोबदला देऊ नये असे सांगत, चौकशी समिती गठीत केली नाही तर, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. गतसभेत सभापतींनी जाहीर केल्यानुसार टीडीआर आणि घंटागाडी प्रकरणाच्या चौकशीसाठीही तात्काळ समिती गठीत करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

उद्धव निमसे, मुशीर सय्यद, प्रवीण तिदमे यांनीही मोबदल्याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडत चौकशी समिती तात्काळ गठीत करण्याची मागणी केली. दहा सदस्यांनी लेखी पत्र सादर करत मोबदला प्रकरण तसेच टीडीआर आणि घंटागाडी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचे तसेच तोपर्यंत सभेच्या पटलावरील विषय क्रमांक १७७ ते २०१ असे सर्व २५ प्रस्ताव तहकूब करण्याची सूचना मांडली. हे विषय मंजूर केल्यास सभापती जबाबदार असतील असा इशारा सदस्यांनी केला. सभापतींनी २१ कोटींच्या चौकशीचे आदेश अन्य विषय तहकूब करत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक झळकवले.

विरोधकांना हर्षवायू

स्थायी समिती सभापतींविरोधातील आंदोलनात विरोधकांसह सत्तारूढ भाजपचेही आठ सदस्य सामील झाल्याने भाजपची शोभा चव्हाट्यावर आली. भाजपमधील या अंतर्गत वादाने विरोधी पक्षांना चांगलाच आनंद झाला. स्थायी समितीला डावलून नियमबाह्य पद्धतीने २१ कोटींचा मोबदला अदा करण्यात आल्याचा आरोप करत भाजपचा हाच का पारदर्शक कारभार, असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. सभागृह नेते आणि स्थायी सभापती यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रर्त्यारोपाच्या फैरी पाहून विरोधकांनी दोघांवर टीका करणे अपेक्षित होते. परंतु, विरोधकही पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले. घंटागाडी आणि टीडीआर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत न झाल्यास पुढील सभेतही आंदोलन करण्याचा इशारा मुशीर सय्यद यांनी दिला.

स्थायी समितीला डावलून परस्पर अदा करण्यात आलेल्या २१ कोटींच्या मोबदलाप्रकरणात सभापतींचाच हात आहे. घंटागाडी आणि टीडीआरबाबतही चौकशीचे आदेश होऊनही कारवाई झालेली नाही. निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने नाशिककरांना पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली होती. सभापतींना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले.

- दिनकर पाटील, सभागृह नेता

सदस्यांच्या मागणीनुसार सभेत २१ कोटींच्या मोबदल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. या प्रकरणासह घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याची तटस्थपणे चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. नवीन आयुक्त आल्याने घाईत चौकशी समिती गठीत करणे आपल्याला योग्य वाटले नाही.

- हिमगौरी आहेर-आडके, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेले मुंढेंचे भेव, पालिकेत परतले देव!

$
0
0

लोगो- चर्चा तर होणारच!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांनी घेतलेले निर्णय एकापाठोपाठ एक फिरविण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. अधिकारीही यासाठी सरसावले असून, पालिकेच्या कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरी पुन्हा पालिकेत परतू लागल्या आहेत. शहर अभियंता कार्यालयातील हटविण्यात आलेला देव्हारा पुन्हा नव्याने तयार केला जात असून, येथे पुन्हा श्रीगणेशाची पुनर्स्थापना करण्याची लगबग सध्या सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांपाठोपाठ देवदेवतांनाही झटका दिला होता. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मुंढे यांचा पहिला फटका महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील देव-देवतांच्या प्रतिमांना बसला होता. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह विभागीय कार्यालयांतील देव-देवतांच्या प्रतिमा, मूर्ती आणि देव्हारे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. शासकीय आदेशाचा आधार घेत, कार्यालयाचे धार्मिकीकरण नको, अशी भूमिका यामागे होती. सर्वप्रथम आयुक्तांच्या दालनातील दत्ताची प्रतिमा आणि आयुक्तांच्या सचिवालयातील देवांच्या प्रतिमा त्यांनी हटविल्या होत्या. मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाशेजारीच असलेल्या शहर अभियंता कार्यालयात श्री गणेशाचा छोटेखानी देव्हारादेखील मुंढे यांनी हटविला होता. या निर्णयावरून मुंढेंवर टीकाही झाली होती. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत मुंढे यांनी आपल्या शासकीय वाहनातील मूर्तीही हटवली होती. परंतु, मुंढे यांच्या बदलीनंतर आता या देवदेवतांची देव्हाऱ्यात वापसी होत आहे. अनेक कार्यालयांमध्ये पुन्हा देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास सुरुवात झाली आहे. शहर अभियंता कार्यालयातील देव्हारा उभारण्याचे कामही सुरू झाले असून, या ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

विघ्नहर्ता धावेल काय

तुकाराम मुंढे यांच्या जवळकीमुळे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर सध्या अनेक संकटे घोंघावत आहेत. विशेष म्हणजे श्रीगणेशाचा देव्हारा काढल्यापासून शहर अभियंत्यांच्या खुर्चीमागे शुक्लकाष्ठ सुरू झाले आहे. यू. बी. पवार यांच्यापाठोपाठ घुगेंवरही आता चौकशीचे संकट ओढावले आहे. स्वागत हाइट्स प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू असून, अनेक सदस्यांच्या ते रडारवर आहेत. त्यामुळेच त्यांनी हे संकट टळावे यासाठी पुन्हा श्री गणेशाला साकडे घातले असून, काढलेला देव्हारा पुन्हा बसविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विघ्नहर्ता त्यांच्यावरील विघ्न टाळेल का, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केबल बंदबाबत आज होणार निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिल्याने गुरुवारी (दि.२७) सायंकाळी देशभर केबलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, बुधवारी सायंकाळपर्यंत याबाबतची सूचना प्राप्त न झाल्याने नाशिकमधील केबल सेवा पुरविणाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सेवा बंद ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी (दि. २७) दुपारपर्यंत घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने केबल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली लागू केली असून त्यामुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. 'ट्राय'च्या नियमानुसार १३० रुपये एवढ्या किमान मासिक खर्चामध्ये ग्राहकांना बेसिक फ्री चॅनल्सचे पॅकेज उपलब्ध होणार असले तरी अन्य चॅनल्सच्या सेवा घेण्यासाठी त्यांना दरमहा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी 'ट्राय'ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक चॅनलची एमआरपी निश्चित करण्यात आली आहे.

नव्या वर्षात केबल, डिश, आयपी टीव्ही आणि हिट्स या सेवा क्षेत्रात केंद्र सरकारने मोठा बदल केला असून सध्याचे पॅकेज २९ डिसेंबरला बंद होणार आहे. निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास केबल सेवा पुरविणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूदही 'ट्राय'ने केली आहे. 'ट्राय'च्या या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी केबल व्यावसायिकांनी गुरुवारी (दि.२७) सायंकाळी सात ते दहा यावेळेत केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ८०० हून अधिक केबल व्यावसायिक असून सुमारे पाच लाख ग्राहक आहेत. केबल सेवा बंद ठेवण्याबाबतच्या सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्याची माहिती शहरातील काही केबल व्यावसायिकांनी दिली आहे. याबाबत संघटनेची बैठक गुरुवारी दुपारी होणार असून त्यात निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीप्रकरणी दहा जणांची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याचे सांगून, निलंबित महापालिका कर्मचाऱ्याने तब्बल ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सचिन जीभाऊ सूर्यवंशी (रा. अमोल भवन, दत्तनगर, पेठरोड) याने नाशिक महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याचे सांगून, तिघा भावडांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली होती. निलंबित असलेल्या सूर्यवंशी याने पेठरोडवरील भक्तीधाम समोर राहणाऱ्या प्रमिला नामदेव बागूल यांच्यासह बहीण सारिका व चुलतभाऊ अमित यांनी वेळोवेळी संशयित सूर्यवंशी यास नोकरीच्या आशेने ८ लाख रुपये दिले. बागूल यांना शंका आल्याने त्यांनी महापालिकेत शहानिशा केली असता, सूर्यवंशी याने दिलेले नियुक्ती पत्र बनावट असल्याचे समजले. पैसे परत मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून सोमवारी (दि. २४) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार मार्तंडराव शेषराव म्हस्के (रा. डोंबिवली पूर्व, मुंबई), सोपान संजय वाणी (रा. मखमलाबाद रोड, नाशिक), दीपक मुरलीधर सूर्यवंशी (रा. मालेगाव, जि. नाशिक), गोरख बापू शिंदे (रा. मालेगाव, जि. नाशिक), विजय यशवंत कदम (रा. मालेगाव, जि. नाशिक), आदित्य भीकन चौधरी (रा. मालेगाव कॅम्प, जि.नाशिक), संतोष नाजू आहेर (रा. गोविंद नगर, मुंबई नाका, नाशिक), रवींद्र अशोक ठाकरे (रा. बेलापूर, मुंबई) आणि अन्य एकजण यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी फसवणूक झाल्याचा आकडा तब्बल ४२ लाखांवर गेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा लागवड सोमवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पशुधनाला दुष्काळी परिस्थितीमध्ये चाराटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी जलाशयांमधील जलविरहीत गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवडीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. यासाठी जिल्ह्यात १२७८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध झाले असून त्यावर १७६६ शेतकऱ्यांची चारा लागवडीची तयारी दर्शविली आहे. चारा लागवडीला सोमवारपासून (दि. ३१) सुरुवात होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी बुधवारी दिली.

धरणांमधील पाणी पातळी खालावल्याने उपलब्ध गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. चारा लागवडीसाठी व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. चारा लागवडीची तयारी दर्शविणाऱ्या १७६६ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. चारा लागवडीसाठी आजमितीस १२७८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध झाले असून दोन दिवसांत ३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये मका १७५ क्विंटल, ज्वारी १४० क्विंटल, बाजरी ४२ तर अन्य चाऱ्यासाठी १४ क्विंटल बियाण्यांचा समावेश असणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून सोमवारपासून चारा लागवडीला सुरुवात होईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली. संबंधितांना चारा आणि पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चाऱ्याचे दर जिल्हाधिकारी ठरविणार असून चारा विक्रीतून उपलब्ध होणारे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

इगतपुरीत सर्वाधिक क्षेत्र

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३४९.२४ हेक्टर क्षेत्र चारा लागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. तेथे ४२५ शेतकरी तसेच संस्थांनी चारा लागवडीची तयारी दर्शविली आहे. त्या खालोखाल दिंडोरीत २६२.६३ हेक्टर क्षेत्रचारा लागवडीसाठी उपलब्ध झाले असून ३७३ शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मालेगावात २१६.७७ हेक्टरवर १७१ शेतकऱ्यांनी चारा लागवडीची तयारी दाखविली असून नाशिक तालुक्यात १२१.३० हेक्टरवर १६१ शेतकरी चारा लागवड करणार आहेत. मृद व जलसंधारण विभागाकडील २१३.५९ हेक्टर क्षेत्रासाठी ३६४, जिल्हा परिषदेअंतर्गत २०३.९५ हेक्टरसाठी ४१८ तर जलसंपदा विभागाकडील ८६१.२२ हेक्टर क्षेत्रासाठी ९८४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशव्यापी संपात सहभागी व्हावे!’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून खाली खेचण्यासाठी तसेच कामगार भरती करताना वापरण्यात येत असलेली कंत्राटीकरण तसेच खासगीकरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील कोट्यवधी कामगारांनी ८ व ९ जानेवारी रोजी अखिल भारतीय संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सर्व संघटित, असंघटित कामगार संघटनांनी सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे.

'इंटक'चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कर्मचारी कृती समितीच्या वतीने या संपात आम्ही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे छाजेड यांनी सांगितले.

केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यासह संरक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे.

संपामध्ये इंटक, आयटक, सीटू, एचएमएस, टीयूसीसी, एआययूटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, यूटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राय सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राय सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (नर्सेस व इतर), अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पारी, फेरीवाले, बांधकाम, घर कामगार क्षेत्रातील संघटित, असंघटित सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीबाबत ‘आयमा’त उद्या बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज दरवाढ, पेनल्टीसह संपूर्णपणे रद्द व्हावी व ऑगस्ट २०१८ पर्यंतचे दर पुढेही नोव्हेंबर २०१६ च्या आयोगाच्या आदेशानुसार लागू व्हावेत व स्थिर रहावेत या मागण्या व कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व वीज ग्राहक संघटनांची बैठक शुक्रवारी (दि. २८) अंबड येथील आयमा हॉल येथे दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांवरील जाहीर केलेली दरवाढ ३ टक्के ते ६ टक्के आहे. प्रत्यक्षात मात्र पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह नाही व पेनल्टी लागू झाल्याने ८० टक्के औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिलात २० टक्के ते २५ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बैठकीत निमा, आयमा, लघु उद्योगभारती, वीज ग्राहक समिती, नाशिक जिल्हा वीज ग्राहक संघटनाचे पदाधिकारी व नाशिकमधील सर्व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांनी व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images