Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फास्ट न्यूज-सीसीआर

$
0
0

मराठी संवर्धनासाठी

'भोंसला'त पंधरवडा

नाशिक : भोंसला सैनिकी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १ ते १५ जानेवारीदरम्यान होणार असून, या निमित्त महाविद्यालयांतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन, स्वरचित काव्यवाचन, मराठी गाणे, अंताक्षरी, कविता, भजन, निबंधलेखन, वक्तृत्व, वादविवाद, घोषवाक्य, भित्तिचित्र प्रदर्शन, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संवाद लेखकांशी आदी स्पर्धा व उपक्रम होणार आहेत. महाविद्यालयातील सॉफ्ट स्कील रूममध्ये हे कार्यक्रम होतील. स्पर्धांचे पारितोषिक वितरण १५ जानेवारी रोजी होईल. मराठी विभागप्रमुख हिरा वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सी. व्ही. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. भारत गुगाणे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्समधील पैशांची चोरी

$
0
0

पर्समधील पैशांची चोरी

नाशिकरोड : सिन्नरला जाण्यासाठी कोपरगाव बसमध्ये बसलेल्या महिला प्रवाशाकडील पर्समधून १४ हजार ५०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नाशिकरोड बसस्थानकावर उघडकीस आली. सीमा सुरेश गायकवाड (वय ४३, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, परळ-पूर्व, मुंबई) यांनी या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसात फिर्याद दाखल केली. सीमा या मुंबईहून गितांजली एक्स्प्रेसने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उतरल्या. सिन्नरला जाण्यासाठी त्या नाशिकरोड बसस्थानकावरून कोपरगाव बसमध्ये बसल्या. तिकीट काढण्यासाठी पर्स उघडताच आतमधील १४ हजार ५०० रुपये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हॉटेल मॅनेजरवर चाकूहल्ला

नाशिकरोड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मॅनेजरला निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करीत ६ हजार ८०० रुपयांची रोकड घेऊन हल्लेखोरांनी पोबारा केल्याची घटना नाशिकरोडमधील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटल परिसरात शनिवारी (दि. २९) सायंकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जयंत शश्याप्पा पूजारी (वय ५२, रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली. ते मद्रास कॅफे या हॉटेलात मॅनेजर म्हणून काम करतात. दीपक फाजगे आणि गुड्डु उर्फ अर्जुन पवार अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘बिटको’ला मिळणार सीटी स्कॅन मशीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयासाठी सीटी स्कॅन व एमआरआय यंत्र खरेदीसाठी मिळालेले २३ कोटी रुपये खर्च करण्याची मुदत सोमवारी (ता. ३१) संपत असल्याने सोमवारी घाईने स्थायी समितीची बैठक बोलवण्यात आली. बैठकीत दोन्ही मशिनच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.

या यंत्र खरेदीसाठी सरकारने ३१ डिसेंबर ही 'डेडलाइन' दिली असल्याने सोमवारी स्थायी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. महापालिकेचे नाशिकरोडस्थित प्रमुख रुग्णालय असलेल्या बिटको रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी २८ ऑगस्ट २०१२ रोजी महासभेने मंजुरी दिली होती. मात्र, निधीअभावी ही खरेदी रखडली होती. योगायोगाने २०१५-१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने दिलेल्या अनुदानांतर्गत सीटी स्कॅन व एमआरआय यंत्र खरेदीसाठी तब्बल २३ कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला. त्यामुळे सिंहस्थ निधीतून ही खरेदी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, या यंत्रांच्या खरेदीसाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या निविदाप्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने ही यंत्रखरेदी रखडली होती. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळाही आटोपल्याने या यंत्र खरेदीसाठीचा शिल्लक २३ कोटींचा सिंहस्थ निधी सरकारने परत मागविला होता. मात्र, यंत्र खरेदीसाठी महापालिकेची निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत महापालिकेने हा निधी खर्च करण्यात येत असल्याचे कारण दिले होते. सरकारने दिलेल्या मुदतीला दोन दिवस शिल्लक असतानाच वैद्यकीय विभागाला या निधीची आठवण झाली. त्यामुळे सोमवारी सभा घेण्यात आली.

वैद्यकीय विभागाने सीटी स्कॅन यंत्रासाठी ८ कोटी २३ लाख, तर एमआरआय यंत्र खरेदीसाठी १४ कोटी ६० लाखांच्या निविदा काढल्या होत्या. सहाव्यांदा राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत अखेर महापालिकेला या यंत्रणांच्या खरेदीसाठी निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे घाईने सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळ विवरणपत्र सादर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यवसाय, उद्योग, खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई-आर १ विवरणपत्र ३० जानेवारीपर्यंत www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती) कायदा १९५९ अंतर्गत नियम १९६० अन्वये तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडील सर्व नियुक्त्यांचा डाटा संकेतस्थळावर देण्यात आला असून, तिमाही विवरणपत्र सादर करण्याची सुविधा १ जुलै २०१७ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती व तांत्रिक सहाय्यासाठी 'रोजगार चॅट हेल्पलाइन' सुविधेचा वापर करावा अथवा कार्यालयाच्या ०२५३-२९७२१२१ या दूरध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्टचा मार्ग अखेर मोकळा

$
0
0

विक्रीकर विभागाचा अडथळा दूर

...

- अंदाजे ११० एकरवर होणार ड्रायपोर्ट

- निसाकाचीही चाके फिरणार

- नाशिकच्या विकासाला मिळणार गती

....

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नववर्ष निफाडसह नाशिकसाठी आंनददायी वार्ता घेऊन आले आहे. विक्रीकर विभागाच्या थकबाकीमुळे अडचणीत सापडलेल्या निफाड कारखाना कार्यस्थळावरील प्रस्तावित ड्रायपोर्टचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा निफाड कारखान्याच्या इतर मालमत्तेवर लावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे ड्रायपोर्टसह निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होण्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.

निफाड सहकारी साखर कारखान्यावरील नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज, विक्रीकर विभागाची थकबाकी, कामगार देणी व इतर आर्थिक देणी असल्याने कारखाना कार्यस्थळावरील हा प्रकल्प होतो की नाही, अशी शंका घेतली जात होती. त्यातच विक्रीकर विभागाने कर माफ करण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प धुळ्याला जाणार अशीही चर्चा होती. मात्र या प्रकल्पातील विक्रीकर विभागाचा अडथळा अखेर दूर झाला आहे. विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा हा निसाकाने ड्रायपोर्टला दिलेल्या जमीनसोडून इतर जमिनीवर राहील, या मध्यममार्गी पर्यायाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली. यामुळे ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ड्रायपोर्ट प्रकल्पाचे सूत्रधार सुरेशबाबा पाटील यांनी दिली. विक्रीकर विभागाची निसाकावर २१ कोटी ८७ लाख रुपये मूळ थकबाकी आहे. मात्र या विभागाने केलेल्या दाव्यानुसार ३५ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे.

- सविस्तर वृत्त...२

...

ड्रायपोर्टसाठी विक्री केलेल्या जमिनीव्यतिरिक्त उरलेल्या जागेवर विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा लावला जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून दिली. त्यामुळे आता ड्रायपोर्ट प्रकल्प मार्गी लागण्याबरोबरच निसाकाही सुरू होऊ शकेल.

- सुरेशबाबा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॅम्प पेपर चोरीच्या गुन्ह्याची नोंदच नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात गाजलेल्या स्टॅम्पपेपर चोरी प्रकरणात सोमवारी सातही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्याचे तसेच याबाबत पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड. घुमरे, अॅड. ढिकले व अॅड. काळे यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल) आणि अब्दुल करीम लाडसाब तेलगी अशी या प्रकरणात कोर्टाने निर्दोष सोडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यातील तेलगीचा २३ ऑक्टोबर २०१७ रोजी तुरुंगातच मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए. के. मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड. एस. बी. घुमरे, अॅड. ढिकले व एम. वाय. काळे यांनी काम पाहिले.

स्टॅम्प पेपर प्रकरण देशभरात खूप गाजले. यात अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली. राजकीय दृष्टिकोनातून हे प्रकरण संवेदनशील ठरले होते. यातील मास्टर माईंड असलेल्या तेलगीवर देशभरात गुन्हे दाखल झाले. त्यातील काही गुन्ह्यांमध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिकमधील प्रकरणात तेलगी समक्ष हजर होणे गरजेचे असून, तो हजर होत नाही तोपर्यंत खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी, यासाठी खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु, पारख यांनी हैदराबाद बेंगळुरु न्यायालयासह इतरत्र पाठपुरावा केला. अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी हा पोलिस बंदोबस्तात नाशिक कोर्टात हजर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय महाविद्यालयआवारात तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पत्नीची रविवारीच रुग्णालयातच प्रसूती होऊन नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाल्याच्या धक्का बसल्याने तरुणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात झाडाला रुमालाच्या साह्याने गळफास घेत आत्महत्त्या केली. सुमारे ३ तास त्याचा मृतदेह लटकलेल होता. देवला बारका बारेला (वय २७, रा.रामजीपाडा, अडावद, ता.चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

देवला याची पत्नी उदीयाबाई प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिट झाली होती. रविवारी दुपारी सीझेरीयनने तिची प्रसूती झाली. मात्र नवजात अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला होता. त्यामुळे देवळाला मोठा धक्का बसला. त्यात्यानतंर देवला रुग्णालयात झोपला. रात्री १ वाजता उठून तो प्रसूती कक्षाकडेही गेला होता. सकाळी ७ वाजता वॉर्ड क्रमांक ९ जवळ एका झाडावर रुमालाच्या साह्याने देवला याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षामध्ये वेतनवाढीची भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१८ पासून पदोन्नती आणि वेतनवाढ करण्याचा निर्णय सभापती शिवाजी चुंभळे व संचालकांनी सोमवारी (दि. ३१) घेतला. या निर्णयाने २००३ नंतर पहिल्यांदाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे.

नाशिक बाजार समितीत ११९ कर्मचारी असून त्यातील नियमित असलेल्या ६१ जणांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर ३२ कर्मचारी कालबद्ध म्हणजे १२ वर्षे सेवा पूर्ण केलेले आहेत. तसेच ९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. यात कमीत कमी १ हजार ८२२ ते जास्तीत जास्त १४ हजार ९६० रुपयांपर्यंतची वेतनवाढ झालेली आहे. या पदोन्नती आणि वेतनवाढीमुळे बाजार समितीवर दरमहा सुमारे ५ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. नवीन भरती झालेले तसेच शिपाई पदावर काम करणारे ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही अशा २६ कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा मिळणार नाही.

पदोन्नती आणि वेतनवाढ मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. बाजार समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणून बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व विकासासाठी भर टाकण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी उपसभापती युवराज कोठुळे, संचालक चंद्रकांत निकम, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, जगदीश अपसुंदे, विमल जुंद्रे, संपत सकाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटारीत पडून बालकाचा मृत्यू

$
0
0

मालेगाव : शहरातील देवीच्या मळा परिसरातील वस्तीत दीड वर्षीय मुलाचा गटारीच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. अफताब खान बैतुल्ला खान असे या मृत बालकाचे नाव आहे. पालिकेकडून या परिसरात पक्क्या गटारी करण्यात न आल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. सकाळच्या वेळेत हा दीड वर्षीय बालक अंगणात खेळत असताना अचानक या गटारीच्या खोल खड्ड्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणे आरोग्यमंत्री फोटो

तेलगीसह सात आरपीएफ कर्मचारी निर्दोष

$
0
0

स्टॅम्प चोरी प्रकरणात सीबीआय कोर्टाचा निकाल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात गाजलेल्या २००३ मधील रेल्वेतील २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणातील रेल्वे सुरक्षा बलातील सात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मयत अब्दुल करीम तेलगीची विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात स्टॅम्प छापले जातात. येथून रेल्वेच्या मदतीने हे स्टॅम्प देशभरात पाठविले जातात. सन २००३ मध्ये समोर आलेल्या या प्रकरणात देशभरात जाणाऱ्या स्टॅम्प पेपरची रेल्वे प्रवासातच चोरी होत असल्याची बाब दिल्लीच्या सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने समोर आणली होती. हे काम रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने आणि तेलगीसाठी होत असल्याने सात जणांविरुद्ध १६ डिसेंबर २००३ रोजी गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक झाली होती. हा खटला जिल्हा कोर्टात विशेष सीबीआय न्यायालयात सुरू झाला होता. संशयितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़

..

खटल्याचा इतिहास

सीबीआयने २००५ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली. सीबीआय व आरोपीच्या वकिलांनी ४९ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षीदारांनी कोणाचेही नाव घेतले नाही, तर अनेक साक्षीदारांनी सीबीआयने काहीही माहिती न देता जबाब घेतल्याचे स्पष्ट केले. सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्याचे तसेच याबाबत पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड. घुमरे, अॅड. ढिकले व अॅड. काळे यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाचीही फिरणार चाके!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ड्रायपोर्टसाठी निसाकाची ११० एकर पडीत जागा जिल्हा बँकेकडून जेएनपीटी विकत घेणार आहे. निसाकावर २८० कोटी कर्जाचा बोजा आहे. निसाकाची जागा विकत घेतल्यास त्यातून आलेल्या पैशातून जिल्हा बँकेची थकबाकी वसुलीपोटी जमा होईल. यामुळे निसाकाचे बरेचशे कर्ज कमी होईल. पर्यायाने निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकेल. तसे झाल्यास निसाकाला संजीवनी मिळून त्याचा शेतकरी, कामगार यांना फयदा होईल.

चार वर्षांपासून बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पडीत जमिनीवरील ड्रायपोर्टसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मंजुरी देतानाच ५०० कोटी रुपयांची तरतूदही जाहीर केली होती. याला अनुसरून गेल्या चार महिन्यांत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी यांनी येऊन नियोजित पोर्टसाठी असणाऱ्या जागेची पाहणी करून प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या विषयाला गती आली होती. निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट उभारतानाच बंद असलेला निफाड साखर कारखानाही सुरू होणार, अशी योजना असल्याचे सुरेशबाबा पाटील यांनी स्पष्ट केले.

निफाड सहकारी साखर कारखान्याची २६३ एकर जागा आहे. यामध्ये ३० एकरांत निसाका उभा आहे. या ठिकाणी वसाहत, शैक्षणिक संकुल, इतर उपक्रम असे सर्व मिळून ९० ते १०० एकर जागा अडकली असून, उर्वरित जागेपैकी १०८ ते ११० एकर जागेवर प्रस्तावित ड्रायपोर्ट नियोजित आहे. निसाकावर नाशिक जिल्हा बँकेचे १०५ कोटींचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजासहित होणारी रक्कम थकीत असल्याने जिल्हा बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. ड्रायपोर्ट उभारण्यासाठी निसाकाकडून जेएनपीटी जागा खरेदी करणार आहे. मात्र जिल्हा बँकेकडे कारखान्याची जप्ती असल्याने या जमीन खरेदी प्रक्रियेसाठी येणारी तांत्रिक अडचण लक्षात घेऊन भाजपचे सुरेशबाबा पाटील, डॉ. प्रशांत पाटील यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला आणि जिल्हा बँकेची व्याज वजा जाता मुद्दल कर्जाची रक्कम भरण्यासाठी परवानगी मिळवली आहे. यामुळे निसाकावरील कर्ज एका झटक्यात फिटून दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेलाही एकरकमी १०५ कोटी रुपये मिळून बँकेची मोठी वसुली होऊन शेतकऱ्यांच्या श्वास असलेला निफाड कारखाना सुरू व्हायलाही मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीचेही सेलिब्रेशन!

$
0
0

वाहतूक कोंडी कॅप्शन - पंकज चांडोले

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि वाहन तपासणीची कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे नाशिककरांना विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. द्वारका चौकात दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर सायंकाळी कॉलेजरोडवर मॉडेल कॉलनी चौकात वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सरत्या वर्षात जणू वाहतूक कोंडीनेही सेलिब्रेशन केले की काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या दारी, आरोग्य सुविधांची नांदी

$
0
0

दळवटला ग्रामीण रुग्णालय बांधकामास हिरवा कंदील

दीपक महाजन, कळवण

तालुक्यातील दळवट या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागात आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या कामाच्या निविदा निघाल्याने आदिवासी जनतेने स्वागत केले आहे.

दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळातच ग्रामीण रुग्णालयासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यास २०१६ मध्ये १२ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मंजुरीही मिळाली. सद्या दळवटला जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आदिवासी बांधवांमध्ये दुर्लक्षित भूमिका घेतली जाते. आरोग्य योजनांचा लाभ या भागाला व्हावा व अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडत असल्याने नव्याने होणारे ग्रामीण रुग्णालय आदिवासींचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. मंजुरी मिळालेल्या जागा ग्रामपंचायतमार्फत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे वर्ग होण्यासाठी दोन वर्षांच्या अधिक काळ गेला. शिवाय या रुग्णालयाचा मूळ टाईप प्लॅन एकमजली होता; मात्र तो जागेअभावी दुमजली करण्यात आला. त्यासाठी आवश्यक ना हरकती तसेच मुंबई मंत्रालयातील आर्किटेक्ट कक्ष मंजुरी मिळण्यासही विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पवार यांच्या मूळगावी होणाऱ्या या रुग्णालयाच्या पूर्तीसाठी पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्नुषा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी पाठपुरावा केला.

वैद्यकीय खात्याकडून स्वतंत्र निधी

१२ कोटी रुपये खर्चाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ९ कोटी ६९ लाख ७० हजार ३३९ इतक्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात याचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. येथे अन्य सेवा, सुविधा मिळवण्यासाठी खर्चाची तरतूद असून, जीएसटी १८ टक्के लागणार आहे. वैद्यकीय खात्याच्या स्वतंत्र निधीतून हे ग्रामीण रुग्णालय होत आहे.

ए. टी. पवार यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालय दळवटला व्हायला हवे होते. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब झाला आहे. देर आये दुरुस्त आये असं समजून या रुग्णालयाची निर्मितीसाठी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सतत पाठपुरावा केला होता. या रुग्णालयामुळे गोरगरीब आदिवासी बांधवांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल.

- जयश्री पवार, सदस्य, जिल्हा परिषद

दळवट हे आदिवासी पट्ट्यातील केंद्रस्थानी असलेल्या गावात ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत व्हावी म्हणून लालफितीत अडकलेल्या कामाच्या निविदा काढण्यासाठी स्थानिक आमदार जे. पी. गावित यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. कामाचा दर्जा उत्कृष्ट असण्यासाठी व रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी आमदारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

- हेमंत पाळेकर, माकप सरचिटणीस, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव सी एम चषक

$
0
0

सीएम चषकाचे पारितोषिक वितरण

मालेगाव : देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम चषक स्पर्धा मालेगाव बाह्य व मध्य मतदार संघात पार पडल्या. या चषकचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सटाणा नाका परिसरातील एकता जिमखाना येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांच्यासमवेत उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रदीप बच्छाव, मालेगाव महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

000

'उज्ज्वला'साठी आवाहन

निफाड : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी गॅस कनेक्शन नाही त्यांनी अर्ज करावेत असे आवाहन एलपीजी गॅसचे जिल्हा नोडल ऑफिसर प्रतीक श्रीवास्तव यांनी केले आहे. निफाड येथे राजेश्वरी भारत गॅसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजेश्वरी भारत गॅसचे संचालक शरद सांगळे, मनोहर सांगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंध युवकांनी केलीदुर्गम अंजनेरी सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरूडझेप प्रतिष्ठान गेली दोन दशके विविध सामाजिक उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख टिकवून आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त यंदा त्रंबकेश्वरजवळील अंजनेरी येथे नाशिकच्या अंध युवकांना घेऊन मोहीम आयोजित करण्यात आली होती. संकेत भानोसे या १६ वर्षीय युवा दुर्ग संवर्धकाने मोहिमेचे नेतृत्व केले. सागर बोडके, बाळू पोरजे, सुरज पाटील, राहुल धामणे, किरण धामणे, सुरेश भोईर, ज्ञानेश्वर साबळे हे सर्व अंध दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. डॉ. संदीप भानोसे, श्याम कुलथे आणि संकेत भानोसे यांनी दुर्गवरील प्लास्टिक गोळा केले, तसेच पाण्याच्या लाइनसाठी चर खोदला.

अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे. येथे अनेक जैन लेणी आहेत. अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर अंजनीमातेचे मंदिर लागते. मंदिर प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते, तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनीमातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरून वैतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. पठारावर तलाव आहे. वन खात्याने उत्तमरीत्या पायऱ्या व रेलिंग बनविल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिपाई’ पुस्तकाचे आज प्रकाशन

$
0
0

नाशिक : पुण्यातील वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या 'तिपाई' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने अध्यक्षस्थानी असतील. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, प्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार आदी प्रमुख पाहुणे असतील. यापूर्वी नानासाहेब बोरस्ते यांच्या 'अंतरीच्या नाना कळा' आणि 'गावशीव' या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाला फुटीची बाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी या संपामध्ये फूट पडल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ९६६ कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी होऊन कामबंद ठेवले, तर ३९४ कर्मचारी कामावर हजर झाले. अत्यावश्यक कामकाजावर या संपाचा परिणाम झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, संपकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने सायंकाळी उशिरा हा संप मागे घेण्यात आला.

नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील कर्मचारी सरकारी असले तरी त्यांना वेतन आयोग लागू होत नाही. आम्हालाही वेतन आयोग लागू व्हावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांकडून राज्य सरकारकडे केली जात आहे. सरकारचे मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी संप पुकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण १५ नगरपालिका व नगरपंचायती आहेत. त्यामध्ये मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव, सटाणा, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्‍वर, चांदवड या नऊ नगरपालिका तर निफाड, कळवण, देवळा, दिंडोरी, पेठ व सुरगाणा या सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये वर्ग तीन आणि चारचे १३६० कर्मचारी आहेत. वर्ग तीनचे २२३ आणि वर्ग चारचे ७४३ असे ९६६ कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. परंतु, वर्ग तीनचे ४७ आणि वर्ग चारचे ३४७ असे ३९४ कर्मचारी या संपामध्ये सहभागी न होता कामावर हजर झाल्याने संपाबाबत संघटनांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले.

कामकाज ठप्प

जिल्ह्यात १५ नगरपालिका आणि नगरपंचायती असून त्यापैकी सिन्नर, येवला, इगतपुरी, निफाड, सुरगाणा, दिंडोरी आणि देवळा या सात नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांनी १०० टक्के संप पाळला. त्यामुळे या नगरपालिकांमधील कामकाज ठप्प झाले.

लोकल सेवेसाठी

सत्यनारायण पूजा

जेलरोड : नाशिक-कल्याण, इगतपुरी-नाशिक तसेच इगतपुरी-मनमाड अशी लोकल सेवा रेल्वेने सुरू करावी या मागणीसाठी मंगळवारी नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात सत्यनारायण पूजा करण्यात आली. प्रवाशांना प्रसादाचेही वाटप करण्यात आले. पंचवटी मध्य प्रवाशी रेल्वे संघाने यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी संघाचे अध्यक्ष वसंत निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, कोषाध्यक्ष मनोहर पगारे, पोपट नागरे, राजू वाघमारे, अऩिल नागरे, साहेबराव खर्जुल, संतोष शेलार आदी उपस्थित होते. लोकल सुरु करावी या मागणीसाठी या प्रवाशी संघातर्फे बारा वर्षांपासून सत्यनारायण पूजा घातली जाते. या गांधीगिरी आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कुंदन महापात्रा, रेल्वे पोलिस बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांनाही देण्यात आले. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षात सव्वाशे कोटींचे रस्ते

$
0
0

नाशिक : सत्तारुढ भाजपने तुकाराम मुंढेंच्या त्रिसूत्रीत अडकलेल्या रस्त्यांचा मार्ग मोकळा करून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या वर्षात तब्बल सव्वाशे कोटींचे नवे रस्ते नाशिककरांना मिळणार असून, त्या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने मार्गी लावले आहेत. नागरी भागातील कॉलनीअंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरणाबरोबरच अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्ते डांबरकरीणाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना आता मुहूर्त लाभला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून युवतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडल्याने १४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

तामसवाडी शिवारात रामू बाजीराव धोत्रे हे कुटुंबासह ऊस तोडणीसाठी वास्तव्यास आले आहे. त्यांच्यासोबत त्यांची भाची वैशाली नवनाथ माने (रा. वाळूंज, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) राहत होती. पिण्याचे पाणी आणण्यासाठी प्रकाश देवकर यांच्या शेतातील विहिरीवर वैशाली मंगळवारी (दि. १) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गेली होती. पाणी भरत असतांना कठड्यावरून घसरून ती विहिरीत पडली. यात तिचा मृत्यू झाला. तामसवाडीचे पोलिस पाटील पांडुरंग शिंदे यांनी सायखेडा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी त्रिभुवन यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. वैशालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे पाठवण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातात तरुणाचा अंत

निफाड : निफाड-औरंगाबाद महामार्गावर मंगळवारी दुपारी तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. दिगंबर भानुदास जाधव (रा. गायत्रीनगर, निफाड) असे या तरुणाचे नाव आहे. कामानिमित्ताने निफाडहून नैताळे गावाच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरने दिगंबरला जोरात धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत निफाड पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images