Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संकटे देतात जगण्याची ऊर्जा

$
0
0
‘आयुष्यात असंख्य संकटे येतात, संकटात खरी ऊर्जा सामावलेली असते तेच उद्याची जगण्याची प्रेरणा देतात त्यामुळे कोणत्याही संकटांना बळी न पडता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा.’ असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले.

कामटवाडे परिसरात घंटागाडीचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0
कामटवाडे परिसरात घंटागाडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तीन दिवसांनंतर एकदाच गाडी येत असल्याने कचरा साठून रहातो. सध्या पावसाचे दिवस असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘फ्रेंडशीप डे’ची तयारी फुल्ल

$
0
0
मैत्रिचे सेलिब्रेशन करण्याचा दिवस अर्थात फ्रेंडशीप डे चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात फ्रेंडशीप डे च्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. हा दिवस संस्मरणीय बनविण्यासाठी शहरातील गिफ्ट शॉप्समध्ये गर्दी फुलू लागली आहे.

सुगंधीत तंबाखूवर घातलेली बंदी योग्यच

$
0
0
सरकारने सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी विक्रीला बंदी केली आहे. या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रातील पान विक्रेत्यांचा विरोध होत असतानाच वकिलवाडीतल्या साईछत्र पान स्टॉलचे संचालक रवी लहामगे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अशीही सु‍टका...

$
0
0
शहराचा भौगोलिक विस्तार वाढला तशी रस्त्यांची कमतरता भासू लागली. महापालिकेच्या ढिसाळ कामामुळे अनेक वसाहतींचे रस्ते आजही प्रलंबीत आहेत. काही दांडग्या नगरसेवकांनी महापालिकेत आपले ‘बळ’ वापरून रस्ते मंजुर करुन घेतले तर काही आजही रखडलेले आहेत.

परीक्षेच्या तोंडावर आंदोलनाचे ‘प्रॅ‌िक्टकल’

$
0
0
परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्यानंतरही शासकीय अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थींनी तणावाच्या छायेत वावरत आहेत. विद्यालयाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून सुरू झालेली धुसफूस चिघळलेल्या आंदोलनात रूपांतरीत झाली.

‘मटा हेल्पलाइन’ हा स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्राजक्तच !

$
0
0
‘चैताली, मी परिस्थितीने गांजलेला आहेच पण शारीरिक व्याधींनीदेखील त्रस्त आहे. या सर्वांतून डोके वर काढून पाहताना मला मोकळा श्वास घेण्याची फार ऊर्मी दाटते. ‘मटा’ नेहमी वाचतो; त्यात हेल्पलाइनविषयी वाचले. इथे मोकळा श्वास घेता येईल असे वाटले.

भावी शिक्षिका वर्गात चिमुकल्या व्हरांड्यात

$
0
0
क्लासरूम उपलब्धतेच्या केंद्रीभूत मुद्द्याहून पेटलेल्या आंदोलनाच्या परिणामी शासकीय कन्या अध्यापिका विद्यालयाला त्यांचे वर्ग ताब्यात मिळाले. मात्र, परिणामी प्राथमिक शाळेतील चिमुरड्या विद्यार्थीनींना पावसाच्या सरी बघत व्हरांड्यातच धडे गिरवावे लागले.

पुररेषेतील अतिक्रमणे हटणार

$
0
0
शहरातील अनधिकृत होर्डींगबाजी कायम असताना गेल्या काही वर्षापासून अनधिकृत बांधकामांचाही मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष करुन २००८ मध्ये गोदावरीला आलेल्या महापुरानंतर अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उफाळून आला. त्यानंतर आखण्यात आलेल्या पुररेषेतील ब्ल्यू लाईन व रेडलाईनवरुनही गहजब झाला होता.

नववसाहतींमध्ये वीज समस्या सोडवण्याची मागणी

$
0
0
शहरातील नववसाहतींमध्ये वीज वितरणाच्या असंख्य अडचणी असून त्यातून सुटका होण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी थेट ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडले. ऊर्जामंत्र्यांनीही याबाबत धडक कार्यवाही करीत महावितरणच्या नाशिक चीफ इंजिनीअरला तातडीने कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जळगाव जिल्ह्यात तीन नवी प्रांत कार्यालये

$
0
0
जळगाव जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून जळगाव जिल्ह्यात तीन नवी प्रांत कार्यालये अस्तित्वात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रांत कार्यालयांची संख्या सातवर जाणार आहे.

महापालिका निवडणूक : आयोगाचा निर्णय

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीची १ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झालेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. यामुळे दुबार, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे मतदारयादीतून वगळता येणार नाहीत.

बनावट दारूचा कारखाना उद्‍ध्वस्त

$
0
0
धुळे-मालेगाव रस्त्यावर आर्वी पुरमेपाडादरम्यान सोनेवाडे गावातील बनावट दारूचा कारखाना बुधवारी पहाटे पोलिसांनी उद्ध्वस्त केला. मास्टर ब्लेंड व्हिस्की या नावाने लेबल तयार करुन ते बनावट दारु भरलेल्या बाटल्यांवर बसविण्यात येत होते.

दौलतखान पठाण आयुक्तपदी रुजू

$
0
0
धुळे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर दौलतखान पठाण यांनी स्वीकारला. सुमारे वीस दिवसांपूर्वी जीवन सोनवणे यांनी भिवंडी महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता, तेव्हापासून धुळे महापालिकेचे आयुक्तपद रिक्त होते.

घरकुल घोटाळा फास्ट ट्रॅक कोर्टात?

$
0
0
जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा तपास जलदगतीने करण्यात येईल. प्रसंगी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

डांगसौदाणेजवळ बिबट्यांचा धुमाकूळ

$
0
0
बागलाण तालुक्यातील डांगसौदाणे गावाजवळ सातवड शेत शिवारात आठ ते दहा दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला. बिबट्यांच्या हल्ल्यात एक वासरू जखमी झाले, तर दोन पारडू, एक बोकड व बकरी, चार पाळीव प्राणी ठार झाले. बिबट्यांचे रात्री वारंवार दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गोदावरीला पूर

$
0
0
त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण समूह ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.

D. Edचे प्रवेश रखडले

$
0
0
राज्यभरातील डीएड कॉलेजची तपासणी होऊन सहा महिने उलटले, तरी या तपासणीचा निर्णय अद्याप रखडलेलाच आहे. दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही सरकारमार्फत या कॉलेजबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे डीएडच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रियाच पूर्ण होऊ शकलेली नाही.

कृषीपंप ग्राहकांची वीज तोडली

$
0
0
नाशिक परिमंडळातील चार लाख पाच हजार कृषी पंपधारकांनी चालू ब‌िलाचे ३६१ कोटी रुपये थकविल्याने महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरु केली आहे. नाशिक परिमंडळात अठरा हजार ग्राहकांची वीज तोडली असून कृषीपंपधारकांना वीज बील भरण्याचे आवाहन केले आहे.

कावेरी कासार यांचा तीन मतांनी पराभव

$
0
0
देवळाली कॅम्प येथील कॅण्टोन्मेन्ट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेविका सुरेखा गोडसे यांनी राष्ट्रवादी समर्थक कावेरी कासार यांचा ५-२ असा पराभव करत उपाध्यक्ष पदाचा मान मिळवला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images