Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठा महासंघाची जम्बो कार्यकारीणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठा महासंघाची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महासंघाच्या कार्याध्यक्षपदी दिलीप मोरे यांची, तर कायदेशीर सल्लागारपदी प्रशांत घुले पाटील व अॅड. आनंद बोंबले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महासंघाचे शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या मुख्य उपस्थितीत आणि अजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी विष्णू आहिरे, चेतन पाटील, संजय फडोळ आणि महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी गणेश सोमवंशी, भूषण भोसले, कारभारी म्हस्के, अनिल साळुंके, शहर संघटकपदी रवींद्र जाधव, ज्ञानेश्वर आढाव, विजय हिरे व दत्तू सोनवणे यांनी निवड करण्यात आली आहे. विभाग प्रमुखपदी सचिन हांडे (सिडको), संजय जगताप (सातपूर), राम भांगरे (इंदिरानगर) यांना नियुक्ती देण्यात आली आहे. प्रवक्ता म्हणून अविनाश वाळूंजे काम पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कहाँ तुम चले गये

$
0
0

कहाँ तुम चले गये...

गजलसंध्येत श्रोते भावविभोर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वातावरणातील वाढता गारवा आणि सोबतीला जगजित सिंह यांनी गायलेल्या निदा फाजली यांच्या अर्थपूर्ण गझलची मैफल असा माहोल जमून आला होता गजल कार्यक्रमात. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते. 'कहाँ तुम चले गये' सारख्या दर्दभऱ्या गझल ऐकताना नाशिककर श्रोते भावविभोर झाले होते.

पद्मभूषण स्व. जगजीत सिंह यांची ७८ वी जयंती आणि शायर पद्मश्री निदा फ़ाज़ली यांची तिसरी पुण्यतिथी असा योग साधून निदा फ़ाज़ली यांनी लिहिलेल्या आणि जगजित सिंह यांनी गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गजलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निदा फ़ाज़ली यांच्या रचना या मानवी जीवनातील समस्त पैलूंवर प्रकाश टाकतात आणि जगण्याला नवी उमेद, आशा आणि नवसंजीवनी देतात. फाजली साहेबांचं काव्य एकात्मता तसेच समानतेची शिकवण देणारे आहे.

हा कार्यक्रम सीएमसीएस कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये झाला.

कार्यक्रमात या दोघांच्या 'होशवालों को खबर क्या', 'सफर में धूप तो होगी', 'किसका चेहरा अब मैं देखू', 'जीवन क्या हैं', 'अपनी मर्जी से कहाँ', 'अब खुशी हैं ना', 'दुनिया जिसे कहते हैं', 'हर तरफ हर जगह बेशुमार आदमी', 'गरज बरस प्यासी धरती पर', 'कहीं कहीं से हर चेहरा' अशा लोकप्रिय रचना सादर करण्यात आल्या.

प्रसाद आणि वीणा गोखले यांच्या सोबत एक्स्प्रेशन्स म्युझिक अकादमी आणि सिम्बायोसिस शाळेच्या विद्यार्थ्यांनीदेखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी फाजली यांची गझल प्रार्थना आणि दोहे सादर केले.

कार्यक्रमात गायन प्रसाद गोखले आणि वीणा गोखले, गौरव तांबे (तबला), दीपक तरवडे (की-बोर्ड), आशिष ढेकणे (गिटार), सागर मोरस्कर (तालवाद्ये), शशांक कांबळे (निवेदन), किरण गायधनी (ध्वनी) यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ

$
0
0

पद्मावती मंदिर

प्राणप्रतिष्ठा उद्यापासून

नाशिक : गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिराशेजारी साकारलेल्या पद्मावती मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ११ ते १५ फेब्रुवारी या पाच दिवसांत होत आहे. या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात अनेक धार्मिक विधींबरोबरच लक्ष्मीयागही होईल. १२ फेब्रुवारीला पद्मावती मूर्तीला जलाधिवास, १३ फेब्रुवारीला ६१ महिलांचे सामूहिक सप्तशती पठण तसेच मूर्तीला धान्याधिवास आणि सायंकाळी 'स्वरतीर्थ भजनसंध्या'चे आयोजन करण्यात आले आहे.

महापूर्णाहूती १५ फेब्रुवारी रोजी संन्यास आश्रम हरिद्वार व मुंबईचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी आणि फुलगांव (पुणे) श्रुतीसागर आश्रमाच्या स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत होणार आहे. नाशिककरांनी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन न्यासाच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीपुरवठा’चे अधिकारी निवडणूक कामाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे वाटप सुरू झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पालिकेतील घरपट्टीपाठोपाठ अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणीपट्टी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामाला जुंपले आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती न करण्याचे संकेत असतानाही जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय पक्षांनी तयारीसाठी कंबर कसली असतानाच प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील लोकसभेचे पूर्ण दोन तर एक अर्धा मतदारसंघ आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह मतदान, मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध सरकारी कार्यालयांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची शोधाशोध जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. नाशिक महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही यासाठी नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामासाठी नियुक्तीची पत्रे प्राप्त होत आहेत. त्यात निवडणूक कामासाठी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अत्यावश्यक सेवेत येतो. निवडणुकांमध्ये अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करू नये असे संकेत आहेत. परंतु, हे संकेत पायदळी तुडवत निवडणूक विभागाने पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाणीपुरवठासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदशनशील विभागात कोणत्याही क्षणी अडचणीची स्थिती निर्माण होऊ शकते. परंतु, जिल्हा प्रशासनाने याकडे डोळेझाक करत मनमर्जी नियुक्त्यांचा सपाटा सुरू केल्याने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

तीन दिवसांची जबाबदारी

निवडणूक कामासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्यांना मतदान पूर्व, मतदानाच्या दिवशी तसेच मतदानानंतर करावयाच्या कामांची जबाबदारी नियुक्ती आदेशातच वाटून देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाने पाणीपुरवठा विभागाचे काम तीन दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या त्यागामुळे भारत देश एकसंघ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'काँग्रेस पक्षाला त्यागाची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबाहदूर शास्त्री अशा सर्वांनी देशाच्या उभारणीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या कर्तबगारीमुळे देशांमध्ये शिक्षणाची पाळेमुळे रोवली गेली. पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे आंतरराष्ट्रीय धोरण व विकासाची दृष्टीमुळे भारत देश प्रगती पथावर आहेच. पण काँग्रेसच्या परिवाराने केलेल्या त्यागामुळे आपला देश एक संघ राहीला आहे.' असे मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.

मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीची विशेष बैठक शनिवार काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीला नाशिक भेटीला असलेले ज्येष्ठ विचारवंत हेमंत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश सचिव आणि प्रवक्त्या डॉ. हेमालता पाटील, गटनेते शाहू खैरे, मध्य नाशिक ब्लॉकचे प्रभारी विजय राऊत, नगरसेविका वत्सलाताई खैरे, आशा तडवी, सेवादलचे लक्ष्मण धोत्रे, ओबीसी विभगाचे अध्यक्ष अनिल कोठुळे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल उपस्थित होते. ज्येष्ठ देसाई यांनी पुढे बोलताना पुढे पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी शहरी व ग्रामीण आर्थिकस्तर उंचावण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसने केलेली कामे व भविष्यात अवलंबले जाणारे धोरण सर्वसामान्यांना सांगण्याचे आवाहन करताना वाचाळविरांना देखील गप्प करण्याचा सल्ला दिला.

प्रास्ताविक मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस सुरेश मारू यांनी केले. यावेळी शोभा गोंदणेकर, रुबिना शेख, जावेद शेख, अण्णा मोरे, प्रमोद दीक्षित, श्रीकांत दरेकर, प्रवीण काटे, बस्तीराम कराड, जयसिंग मकवाना, संजय बाबरीया, अश्पाक मणियार, शबाना अन्सारी, रुबीना खान, शब्बीर पठाण, नंदकुमार येवलेकर, प्रवीण जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मध्य नाशिक ब्लॉक कमिटीच्या कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्र तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीने आयोजित केलेल्या संवाद या प्रशिक्षण शिबिराच्या प्रशिस्ती पत्रकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शककर्ते शिवराय

$
0
0

'शककर्ते शिवराय' हे केवळ ग्रंथलेखन नाही, केवळ इतिहास संशोधन नाही. ते एक पूजन आहे. ते व्रत आहे. 'माझ्या जिवीची आवडी, रायगडा नेईल गुढी' या ध्यासाने १९७४ मध्ये गुढीपाडव्याला ते पूर्णत्वाला गेले. शिवरायांबाबतचा विचार समन्वयाच्या एका वैचारिक उंचीवर नेऊन याबाबतचा वैचारिक वाद हा ग्रंथ दूर करतो.

मोहन बरबडे

काही घटना आपले आयुष्य घडवतात. मी 'छत्रपती सेवा प्रतिष्ठान' नागपूरशी जोडला गेलो आणि माझ्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. मला 'शककर्ते शिवराय' या चरित्राची महती कळली. साहजिकच त्याचे वाचन व्हावे अशी तीव्र उत्कंठा निर्माण झाली; पण ते तर दुर्मिळ! शेवटी यवतमाळचे इतिहासाचे प्राध्यापक मदतीला आले. त्यांच्याकडील दोन्ही खंड घेतले आणि पूर्ण करून त्यांना परत केले. बाइंडिंग करून पूर्ण वाचन केले.

मराठी साहित्यविश्वात वाचकांकडून केवळ शंभर रुपये ठेव म्हणून स्वीकारून व्याजापोटी आयुष्यभराची मुद्दल ठरणारा हा ग्रंथ विजयराव देशमुख यांच्याकडून १९७४ ते १९८२ या आठ वर्षांच्या काळात निर्माण झाला. या ग्रंथाचे सामर्थ्य हेच, की हा आपल्याला नकळत शिवकाळात घेऊन जातो. आपण जितके एकरूप होऊन याचे वाचन करू तितके सुस्पष्टपणे आपल्याला 'शककर्ते शिवराय' आकळायला लागतात. लेखक तर पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यापासून दूर राहणारे! पण भाग्ययोगाने शिवभक्तांचा सहवास लाभला व अनेक निरपेक्ष, नि:स्वार्थ, निरलस व विनम्र शिवव्रतींच्या कार्याची खोली हळूहळू उमजायला लागली.

'शककर्ते शिवराय' हे केवळ ग्रंथलेखन नाही, केवळ इतिहास संशोधन नाही. ते एक पूजन आहे. ते व्रत आहे. 'माझ्या जिवीची आवडी, रायगडा नेईल गुढी' या ध्यासाने १९७४ मध्ये गुढीपाडव्याला ते पूर्णत्वाला गेले. शिवरायांबाबतचा विचार समन्वयाच्या एका वैचारिक उंचीवर नेऊन याबाबतचा वैचारिक वाद हा ग्रंथ दूर करतो. सगळ्या पूर्वसुरींच्या मतांचा सुयोग्य आदर करीत माझे मत अथवा दुसरे मत असा वाद निर्माण न करता योग्य मत मांडणारी लेखकाची प्रतिभा मन थक्क करते. 'शककर्ते शिवराय' हे बावनकशी सुवर्ण आहे अशी आपसूक दाद दिली जाते.

शिवजन्मतिथीची निश्चिती, अफजलखानाशी झालेले मंत्रयुद्ध डिप्लोमॅटिक वॉर, युद्धशास्त्रातील चार फकार, फाइंड द एनिमी, फिक्स द एनिमी, फाइट द एनिमी आणि फिनिश द एनिमी हे आजही तेवढेच लागू आहेत. मुरारबाजी देशपांडे यांच्या आत्मबलिदानाचे महत्त्व, त्या तिथीचीही निश्चिती या चरित्राने झाली. कुठल्याही संकटात हताश न होता, विवेकपूर्वक योजना करून आपण त्यावर मात करू शकतो हा शिवचरित्राचा आजच्या पिढीला आवश्यक असा संदेश आग्रा पर्वातून मिळतो. राजस्थानी डिंगल भाषेतील मूळ पत्रव्यवहाराच्या संदर्भाने उलगडत जाणारे हे पर्व मुळातूनच वाचावे असे आहे.

शिवरायांची दूरदृष्टी, सूरतेच्या लुटीतून उभा राहिलेला सिंधुदुर्ग, स्वतंत्र सार्वभौम सिंहासनाची निर्मिती, या नात्याने कुतूबशहाशी घेतलेली मैत्रीपूर्ण भेट, 'दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांचे हाती' ही राजकीय मंत्रणा तर त्याचवेळेस औरंगजेबाच्या विकृत धर्मनिष्ठेला स्वआचरणातून निरपेक्ष धर्मनिष्ठेचे दिलेले आदर्श तत्त्वज्ञानाचे उत्तर जगातील सगळ्याच राज्यकर्त्यांनी आजही आचारणात आणावे असेच आहे. शिवरायांना श्रीमंत योगी का म्हणत हे विशद करणारा शिवाजी महाराजांनी लिहिलेला अभंग याच चरित्रातून ज्ञात झाला.

'शिवरायांस आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहपरलोकी रहावे, कीर्तिरूपे' असा आदर्श समोर ठेवून आजही जीवन जगता येते. नव्हे, तसे जीवन जगणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आजही आहेत. कुठेही, कुणी निराश होण्याचे कारण नाही. 'शककर्ते शिवराय' यांचा चिरंजीव आदर्श, आधार आपल्या पाठीशी आहे, असा सकारात्मक संदेश देणारे हे चरित्र म्हणजे अमूल्य ठेवाच! छत्रपती सेवा प्रतिष्ठान 'शककर्ते शिवराय'ची नवीन आवृत्ती घेऊन येत आहे. ही समस्त शिवभक्तांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी लेखकांचे, प्रतिष्ठानचे पुन्हा पुन्हा आभार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात १

$
0
0

'कविताच माझी कबर'

संग्रहाला दोन पुरस्कार

नाशिक : कवी संजय चौधरी यांच्या 'कविताच माझी कबर' कविता संग्रहाला नुकतेच दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. कवी रेंदाळकर वाचनालय, हातकणंगले (कोल्हापूर) तर्फे दिला जाणारा 'कवी रेंदाळकर साहित्य पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरू नगर शाखेतर्फे नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार जाहीर झाला आहे. जगण्यातील विलक्षण गुंतागुंत व समकालीन प्रश्‍नांचा वेध घेणारी 'कविताच माझी कबर'मधील कविता आजच्या वर्तमान परिस्थितीवर नेमके भाष्य करते. असे निवडसमितीने म्हटले आहे. पुरस्काराबद्दल संजय चौधरी यांचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजाराला रस्ते आंदण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटी परिसरात सायंकाळच्या वेळी भरणारे भाजीबाजार हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. सिंहस्थाच्या काळात बनविलेले भव्य रस्ते भाजीबाजाराला जणू आंदण दिल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

चार-पाच वर्षांपूर्वी पंचवटीत सकाळी भरणारा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि गोदाघाटावर असे दोनच भाजीबाजार होते. सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या पर्वण्यांनंतर गोदाघाटावर भाजीविक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली. त्यांच्यासाठी गणेशवाडी रोडलगत सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजी मार्केट यार्डमध्ये त्यांनी भाजीपाला विक्री करावी असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, विक्रेते या बाजारात भाजीविक्री करण्यास तयार नाहीत. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजी विक्री होत नाही. पंचवटी परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे जवळच भाजीपाला उपलब्ध व्हावा ही ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन रस्त्यावरच ठिकठिकाणी भाजीबाजार सुरू झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

नाशिकचा बुधवारी भरणारा आठवडे बाजाराचा पसारा प्रचंड वाढला आहे. पूर्वी म्हसोबा पटांगण आणि गौरी पटांगणापूरता मर्यादीत असलेला बाजार आता नदी ओलांडून मुक्तेश्वर पटांगण, रोकडोबा पटांगण, नाशिक अमरधाम रस्ता, गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, गणेशवाडी रस्त्यावरून थेट पंचवटी अमरधाम रस्त्यापर्यंत वाढत चालला आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भाजी मार्केट धूळखात पडून आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर भाजीविक्रेते बसत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी होत आहे. गणेशवाडी रस्त्याच्या कडेला नव्हे तर मध्यभागीही भाज्या विक्रीस ठेवण्याचे प्रकार होत असल्याने दर बुधवारी या ठिकाणाहून वाहने कशी घेऊन जायची हा प्रश्न पडतो.

कोणार्कनगरला आठवड्यातून दोनदा

कोणार्कनगरमध्ये भरणाऱ्या भाजीबाजारामुळे तेथील काही सोसायट्या, बंगले यांच्या प्रवेशव्दारासमोरच विक्रेते ठाण मांडून बसत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यामुळे येथील भाजीबाजाराचे अतिक्रमण काढण्याचा दोनदा प्रयत्न झाला. भाजीविक्रेत्यांनी स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही अशी ग्वाही दिल्यामुळे हा बाजार पुन्हा सुरू झाला. जत्रारोडपासून ते कोणार्क नगरच्या परिसरातील रस्त्यावर आठवड्यातून दोनदा हा बाजार भरतो.

जागा असूनही रस्त्यावर ठाण

पूर्वी हनुमाननगरजवळच्या परिसरात भरणारा भाजीबाजार राजकीय सत्तांतर झाल्यामुळे निलगिरी बाग येथे स्थलांतरीत करण्यात आला. महापालिकेची ही जागा सिंहस्थ कुंभमेळ्यात बस स्थानकासाठी उपयोगात आणण्यात आली होती. या मोकळ्या जागेत हजारोंच्या संख्येने विक्रेते बसू शकतील, अशी क्षमता आहे. तरीही विक्रेते थेट रस्त्यावरच भाज्या मांडून बसत असल्याचे चित्र दर बुधवारी आणि रविवारी नजरेस पडते. भाजी विक्रेते रस्त्यावर, त्या खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर आणि खरेदी करताना ग्राहकांची गर्दीही रस्त्यावरच अशी स्थिती होते. औरंगाबाद रोड ते मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडवर भरणाऱ्या या भाजीबाजाराच्या पूर्वेला परफेक्ट कृषी डाळिंब मार्केट आहे. येथे आता टोमॅटो, सफरचंद यांचीही खरेदी विक्री सुरू झालेले आहे. या मार्केटमध्ये येणारी वाहने, महामार्गाकडे जाणारी वाहने अशा अनेक वाहनांची या बाजारामुळे कोंडी होते. येणारे ग्राहक आपल्याकडेच यावेत या हेतूने बाजार रस्त्यावर लांबवर पसरत आहेत.

येथे भरतात बाजार

-दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी थिएटर ते दिंडोरी नाक्यापर्यंत

- पेठरोडला दुतर्फा फुलेनगरचा परिसर

- आडगावातील होळी चौक, कोणार्क नगर

- नांदूरला निलगिरी बाग

- बुधवारच्या आठवडे बाजारात गणेशवाडी रस्ता, म्हसरुळला पादचारी मार्ग

- मखमलाबाद-म्हसरुळ लिंकरोड

- दिंडोरी रोडला आरटीओ कॉर्नर

- हिरावाडी रस्ता

- मखमलाबाद बस स्थानकाजवळ, शांतीनगर, हनुमानवाडी मारुतीमंदिर परिसर

- मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगत बहिणाबाई चौधरी महाविद्यालयाजवळ

- रामसेतू पूलापासून कपूरथळा मैदानापर्यंत

शेतकरी आणि भरेकरी वाद

प्रत्येक भाजीबाजारात शेतातून भाजीपाला काढून तो थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची रस्त्यावरील भाजीबाजारातील संख्या वाढत आहे. बाजार समितीतून भाजीपाला भरून ते या बाजारात विक्रीस करण्यास येणाऱ्या भरेकऱ्यांचीही संख्या मोठी आहे. दर आठवड्याला ठराविक जागा आपली आहे, असा जणू भरेकऱ्यांनी ठरवूनच घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर इतरांना बसू दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक बाजारात शेतकरी आणि भरेकरी यांच्या जागेवरून वाद होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टर पालिकेचे, सेवा ‘आरटीओ’ला!

$
0
0

महापालिकेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टरांची कमतरता असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून नव्या डॉक्टरांची शोध मोहीम सुरू असतानाच पालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर मात्र चक्क 'आरटीओ'लाच सेवा देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बिटको रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. नंदा ठाकरे यांच्याकडून आरटीओ विभागात लायसन्स नूतनीकरणासाठी लागणारे फिटनेस सर्टिफिकेट दिले जात असल्याचे समोर आले असून, त्याबाबतची तक्रार आयुक्तांसह वैद्यकीय विभागाकडे करण्यात आली आहे. वैद्यकीय विभागाने मात्र या महिला डॉक्टरला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यांना केवळ पाच हजार रुपये दंड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमधील सेवा नेहमीच वादात राहिली असून, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे प्रलंबित आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक डॉक्टर हे खासगी प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारी महासभा, स्थायी समिती सभेत नगरसेवकांकडून होत असतात. काही नागरिकांकडूनही थेट तक्रारीही येतात. परंतु, वैद्यकीय विभागातील साटेलोटेच्या राजकारणामुळे या तक्रारींकडे फारसे लक्ष दिले जात नाही. काही दिवसांपूर्वीच डॉ. जाकीर हुसैन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत फुलकर यांच्यावर खासगी वैद्यकीय सेवा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास अडीच लाखांचा दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आणखी एक धक्कादायक प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल भारती यांच्यामुळे उघडकीस आला आहे. जेडी बिटको रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. नंदा ठाकरे या वैद्यकीय अधिकारी नाशिकच्या 'आरटीओ'मध्ये लायसन्स नूतनीकरणासाठी लागणारे फिटनेस सर्टिफिकेट देत असल्याचे समोर आले आहे. 'आरटीओ'कडून लायसन्स नूतनीकरणाठी संबंधित परवानाधारकाचे फिटनेस सर्टिफिकेट घेतले जाते. शहरातील चार डॉक्टर हे काम करीत असून, त्यात पालिकेच्या डॉ. नंदा ठाकरे यांचा समावेश आहे. या फिटनेस सर्टिफिकेटसाठी पाचशे रुपये मोजले जातात. त्यामुळे डॉ. ठाकरें यांची कृती वैद्यकीय विभागाच्या नियमांच्या विरोधात असल्याची तक्रार राहुल भारती यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती. भारती यांनी आरटीओकडून डॉ. ठाकरे यांच्या सह्या असलेले प्रमाणपत्रच माहिती अधिकारात मिळवले होते. वैद्यकीय विभागाकडे त्या संदर्भातील पुरावेही त्यांनी सादर केले होते. परंतु, वैद्यकीय विभागातील साखळीकडून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा पालिकेत माहिती अधिकाराचे अर्ज दाखल केले. त्यामुळे अखेरीस वैद्यकीय विभागाने त्याच्यावर थातूरमातूर कारवाई करीत त्यांना यापोटी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे ही कारवाई सौम्य असल्याचा आरोप भारती यांनी केला आहे.

...

नियमांचे उल्लंघन

जिल्हा रुग्णालय आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना विशेष खासगी व्यवसाय रोध भत्ता दिला जातो. पालिकेतील डॉक्टर हा भत्ता घेत असतानाही खासगी व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी खासगी व्यवसाय केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याकडून हा भत्ता वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे डॉ. ठाकरे यांच्याकडूनही हा भत्ता वसूल व्हावा, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

...

वैद्यकीय विभागाचीच डोळेझाक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून सेवेत रुजू होताना कुठेही खासगी सेवा करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. कुठेही खासगी सेवा करताना आढळल्यास फौजदारी गुन्ह्यासह आर्थिक दंडास पात्र राहिल असे हमीपत्र लिहून घेतले जाते. तरीही डॉक्टर या प्रतिज्ञापत्राकडे दुर्लक्ष करतात. वैद्यकीय विभागही पद्धतशीरपणे याकडे डोळेझाक करतो. वैद्यकीय विभागातील अनेक अधिकारीही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.

....

महापालिकेत सेवा करताना डॉक्टरांकडून कुठेही खासगी काम न करण्याचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाते. परंतु, त्याचे पालन केले जात नाही. डॉ. ठाकरे यांनी आतापर्यंत स:शुल्क दोन हजार प्रमाणपत्र दिले आहेत. परंतु, त्यांच्यावर सौम्य कारवाई करण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.

- राहुल भारती, माहिती अधिकार कार्यकर्ता, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन लेणी होणार संरक्षित

$
0
0

गोदाकाठावरील इतिहासाच्या साक्षीदाराला मिळणार झळाळी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनातील गोदा-कपिला संगमावर दहा अज्ञात लेणींचा समूह प्रकाशात आल्यानंतर शनिवारी अनेकांनी तपोवनात जाऊन त्या पाहिल्या. या लेणी संरक्षित करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभाग प्रयत्न करणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठविला जाणार असल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाचे प्रमुख तेजस गर्गे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

तपोवनातील गोदावरीच्या पलीकडील काठावर महापालिकने राम, सीता व लक्ष्मणाच्या प्रतिमेसमोरील नदीपात्रात या दहा लेणी आहेत. 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा अज्ञात ठेवा प्रकाशात आल्याने अनेकांनी या वृत्ताच्या आधारे शनिवारी लेणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. तपोवनातील हा भाग पाण्याने आणि झाडीने भरलेल्या असल्याने याकडे आतापर्यंत फारसे कोणाचे लक्ष गेले नव्हते. त्यामुळे आतापर्यंत या लेणी दुर्लक्षित राहिल्या होत्या. या लेणींचा अभ्यास करून त्या संरक्षित होण्याची गरज इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केली होती.

याबाबत राज्य पुरातत्त्व विभागाचे प्रमुख तेजस गर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'तपोवनातील या लेणी कोणत्या कालखंडातील आहेत, याचा अभ्यास करण्यात येईल. नाशिकला सातवाहनांपासून इतिहास आहे. सिंहस्थामुळे वेगवेगळ्या पंथांचा सहवासही लाभला आहे. त्यामुळे या लेणी अज्ञात इतिहासात भर घालू शकतात. त्यादृष्टीने या लेणी संरक्षित व्हाव्यात, यासाठी पुरातत्त्व विभाग मंत्रालयाला प्रस्ताव पाठविणार आहे.'

नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष गिरीश टकले यांनी या लेणींच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली असून, नाशिकच्या इतिहासात या लेणी भर घालू शकतात. म्हणून मंडळातर्फे या गुहा संरक्षित करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने प्रयत्न करावे, असे पत्र देणार आहे.

राज्यभरातील अभ्यासकांमध्ये उत्सुकता

तपोवनात दहा लेणींचा समूह मिळाल्याच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मधील वृत्तानंतर राज्यभरातील पुरातत्त्व व इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकला बौद्ध, जैन व हिंदू लेण्याची पार्श्वभूमी असल्याने नवीन लेण्यांमुळे नाशिकच्या इतिहासात भर पडणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्यभरातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजतेय ‘व्हॅलेंटाइन’ची बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही कॉलेजमध्ये सध्या डेजची धूम सुरू असली, तरी तरुणाई 'व्हॅलेंटाइन डे'च्या खरेदीत दंग आहे. अवघ्या चार दिवसांवर व्हॅलेंटाइन आल्याने गिफ्ट खरेदीसह सेलिब्रेशन प्लॅनिंगला तरुणांमध्ये वेग आला आहे. व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने आकर्षक गिफ्ट आणि चॉकलेट्सनी बाजारपेठ सजली आहे.

प्रेमाचे नाते दृढ करण्याचा दिवस अर्थात 'व्हॅलेंटाइन डे' गुरुवारी (१४ फेब्रुवारी) साजरा होणार आहे. यंदाही या दिवसाची तयारी तरुणांनी अगोदरच सुरू केली असून, प्रिय व्यक्तीला भेट म्हणून काय द्यावे, त्यासाठी कॉलेजरोड, गंगापूर रोड, मेनरोड परिसरातील गिफ्टच्या दुकानात गर्दी होत आहे. शनिवारी (९ फेब्रुवारी) एकमेकांना चॉकलेट देत, प्रेमभावना व्यक्त करण्यात आल्या. त्या निमित्ताने स्विट्स आणि गिफ्टच्या दुकानात चॉकलेट बॉक्स आणि विविध प्रकारच्या चॉकलेट खरेदीसाठी सकाळपासून तरुणाईची रीघ लागली होती. त्यावेळी रविवारी (१० फेब्रुवारी) होणाऱ्या 'टेडी डे'च्या खरेदीसही प्राधान्य देण्यात आले.

व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन थोड्या फार प्रमाणात तरुणाई करीत असली, तरी 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यासाठी मात्र, दणकेबाज प्लॅनिंगला सुरुवात झाली आहे. अनेक कॅफेंसह हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यासाठी तरुणाईकडून आताच बुकिंगला सुरुवात झाली असून, गुरुवारी 'व्हॅलेंटाइन डे'ची धुमशान शहरात बघायला मिळणार आहे.

या गिफ्ट्सचे आकर्षण

म्युझिकल ग्रिटिंग्ज, लव्ह चॉकलेट, फोटोफ्रेम, लव्ह कोटेशन बुक, चॉकलेट रोझेस, कॅन्डल्स, ज्वेलरी या गिफ्टसचे आकर्षण तरुणाईत आहेत. व्हॅलेंटाइन ग्रिटिंगलाही अधिक पसंती असून, इंग्रजीसह मराठी भाषेतील ग्रिटिंग्जही तेजीत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यामध्ये चॉकलेट ५० ते २ हजार रुपयांपर्यंत, तर टेडी २०० ते १० हजारापर्यंत उपलब्ध आहेत. विविध आकारातल्या फोटो फ्रेम १५० ते ३ हजारांपर्यंत विक्री होत आहेत. ग्रिटिंग्जदेखील २० रुपयांपासून हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीला उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारण सोपं नव्हेः माजी महापौर प्रकाश मते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मविप्रचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार हे व्यवसायापेक्षा वेगळं कर, असा सल्ला द्यायचे. एकदा केटीएचएम कॉलेजमध्ये त्यांना नेत असताना, महापालिकेची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न त्यांनी केला. काही लोकांशी चर्चा केल्यानंतर निवडणुकीला होकार कळवला. मात्र, जेव्हा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, तेव्हा राजकारण भासतं तितकं अजिबातच सोपं नसतं, याचा प्रत्यय आला', असे प्रतिपादन माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी केले.

'संवाद नाशिक' या संस्थेतर्फे माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. शनिवारी गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी घंटागाडी सुरू करण्यामागची भूमिका कोणती, यावर बोलताना ते म्हणाले,'एका कामासाठी सिंगापूरमध्ये गेलेलो असताना, तेथील स्वच्छता आणि सौंदर्य मनाला भावले. त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, 'मोबाइल गार्बेज व्हॅन' हे उत्तर सापडले. देशात कुठेही कचरा नसल्याने सौंदर्यात भर पडत असल्याचे जाणवल्यानंतर आपल्या देशातही ही सुविधा व्हावी, असे वाटू लागले. जेव्हा मी महापालिकेत नगरसेवकपदी रुजू झालो, तेव्हा माझ्या प्रभागात मी घंटागाडी सुरू केली. त्याचा फायदा नाशिकच्या सौंदर्य वाढविण्यासाठी झाला, असे ते म्हणाले. ही मुलाखत प्रा. डॉ. राजेंद्र सांगळे आणि सुरेखा बोराडे यांनी घेतली.

शिक्षणाची उंची केवढी असावी, या प्रश्नावर मत मांडताना ते म्हणाले, की निसर्गातून जगातली प्रत्येक गोष्ट शिकता येते. अशक्य असे काहीच नाही, हे निसर्गाच्या सानिध्यात फिरल्यावरच जाणवते. जेव्हा जनसंपर्क वाढतो किंवा आपण इतरांच्या भावना जाणून घेतो, तेव्हा आनंद आणि दु:ख यातील विरह स्पष्ट होतो. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या जोडीला निसर्गातील वास्तव्याचे शिक्षण अतिशय आवश्यक असते, असे ते म्हणाले. यासह व्यवसाय दृष्टीकोनावरही त्यांनी भाष्य केले.

पालक अन् पाल्य संवादाची गरज

आत्ताच्या काळात पालक आणि पाल्य हा संवाद दुरावतो आहे. त्यामुळे पाल्यांना अनेकदा जीवनाची पाऊलवाट निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. पालक हे पाल्याचे मित्र म्हणून वागले आहे. जेव्हा पालक आणि पाल्य मित्रांप्रमाणे संवाद साधतील, तेव्हा प्रत्येक पाल्य उंच स्वप्ने पाहत सत्यात उतरविण्यासाठी धडपड करेल, असे मते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मासिक शुल्कात पेड चॅनल्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मल्टी सिस्टम ऑपरेटर्सने देऊ केलेले चॅनेल्सचे पॅकेज निवडण्यासाठी ग्राहकांकडून उदासीनता दाखवली जाते आहे. त्यामुळे केबल व्यावसायिकांनी मध्यममार्ग अवलंबला असून, फ्री टू एअर चॅनल्ससह ग्राहकांना त्यांच्या हल्लीच्या मासिक शुल्कात शक्य तेवढे पेड चॅनल्स दाखविले जाऊ लागले आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) विविध वाहिन्यांच्या प्रक्षेपणासंदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. त्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे पे चॅनल्स निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. १५४ रुपयांत १०० चॅनल्स फ्री टू एअर दाखविले जाणार असून, अन्य आवडत्या चॅनल्सचे प्रक्षेपण पाहण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. ग्राहकांना आवडत्या चॅनल्सचे पॅकेज घेणे सोयीस्कर ठरावे याकरिता डेन, इन, हाथवे यासारख्या एमएसओंनी पेड चॅनल्सचे पॅकेज तयार केले आहेत. परंतु, पॅकेज निवडण्यासाठी ग्राहक फिरकत नसल्याचा अनुभव केबल ऑपरेटर्स घेत आहेत. त्यामुळे काही केबल व्यावसांयिकांनी पेड चॅनल्सचे प्रक्षेपण बंद करून ग्राहकांना केवळ फ्री टू एअर चॅनल्स दाखविण्यास सुरुवात केली आहे. काही केबल व्यावसायिकांनी थेट पेड चॅनल्स बंद न करता त्यावर मध्यममार्ग काढला आहे. साधारणत: केबल सेवेकरिता ऑपरेटर्सकडून २५० ते ३५० रुपये मासिक शुल्क आकारण्यात येते. फ्री टू एअर चॅनल्ससाठीचा १५४ रुपये खर्च वगळता उर्वरित पैशांमध्ये जेवढे पेड चॅनल्स देणे शक्य आहे तेवढे देण्याचे काम ऑपरेटर्सने सुरू केले आहे.

...

ऑपरेटर्स देताहेत पर्याय

मासिक शुल्क भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेड चॅनल्सचे पॅकेज दाखविले जातात. त्यावेळी काही चॅनल्स दिसत नसल्याची ओरड ग्राहकांकडून केली जाते. अशा परिस्थितीत ग्राहकाकडून संबंधित चॅनल्ससाठीचे पैसे आकारून त्याचे प्रक्षेपण दाखविण्याचे काम काही ऑपरेटर्सकडून केले जाऊ लागले आहे. काही घरांमध्ये एक-दोनच व्यक्ती असतात. अशा ग्राहकांसाठी २५० रुपयांच्या पॅकेजचा पर्यायही ऑपरेटर्स देऊ लागले आहेत. त्यामध्ये फ्री टू एअर चॅनल्स व्यतिरिक्त एका विशिष्ट ब्रॉडकास्टर कंपनीचे चॅनल्सचे पॅकेज दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत तडीपारास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असताना विनापरवानगी शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपारास पोलिसानी अटक केली. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सिडको परिसरात केली. दिलावर यासीन शेख (वय २७, रा. शनिमंदिराजवळ, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

युनिटचे हवालदार यवाजी महाले आणि शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दिलावर शेख याच्याविरोधात मुंबईनाका पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव पाठविल्याने त्यास दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. दिलावर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने जुलै २०१७ मध्ये त्यास तडीपार करण्यात आले. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी दुपारी तो सिडकोतील मोरवाडी बसथांबा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर युनिटच्या पथकाने सापळा लावून त्यास अटक केली. या प्रकरणी पोलिस शिपाई विशाल देवरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात शेखविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः शिवशाहीच्या स्लिपर भाड्यात कपात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथून सुरू केलेल्या शिवशाही वातानुकूलित स्लिपर कोच बसचे भाडे १३ फेब्रुवारीपासून कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. खासगी बस वाहतूक सेवेपेक्षा या बसचे भाडे जास्त असल्याची प्रवाशांची तक्रार होती. त्याची दखल घेऊन एसटीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकहून सुटणाऱ्या नागपूर, इंदूर, अहमदाबाद व कोल्हापूर येथील भाडे आता कमी होणार आहे.

नाशिक येथे १५ महिन्यांपूर्वी शिवशाही सेवा सुरू करण्यात आली. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या सेवेला सुरुवातील चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या बसच्या संख्येत नंतर वाढ करण्यात आली. चेअर कारसारख्या या बसबरोबरच नंतर स्लिपर कोच बस सुरू करण्यात आल्या. पण, या बसचे भाडे खासगी वाहतुकीपेक्षा जास्त असल्यामुळे प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली. त्यामुळे एसटीने या बसच्या भाड्यात मोठी कपात केली आहे. तरीसुध्दा काही खासगी बसचे भाडे कमी केलेल्या भाड्यापेक्षाही कमी आहे.

स्लिपक कोचच्या भाड्यात झालेली कपात

ठिकाण ... पूर्वीचे भाडे... आताचे भाडे - झालेली कपात

नाशिक-नागपूर : १८९० ........१४१५......४७५

नाशिक-इंदूर : १००५..... ८३० ...... १७५

नाशिक-अहमदाबाद : ९३५..... ८८५ .......५०

नाशिक-कोल्हापूर : १३०५ ..... ९०० .....३०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड - कल्याण मार्ग होणार सुकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-इगतपुरी रेल्वेची तिसरी लाइन लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच, दौंड-मनमाड रेल्वेलाइनचे दुहेरीकरण करण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल मंडळ प्रबंधक आर. के. यादव यांनी शनिवारी मनमाड येथे सांगितले. तिसऱ्या रेल्वेलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर मनमाड-कल्याण लोकलचा मार्ग सुकर होणार आहे.

प्रबंधक यादव यांनी मनमाड येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची पहाणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वेलाइनचे काम सुरू झाले आहे. यामुळे मनमाड स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे. मनमाड येथील नव्या पादचारी पुलाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. मनमाड स्थानकात सरकते जिने बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, एका बाजूचे काम पूर्णत्वास गेले आहे. मनमाड स्थानकानजीक सध्याच्या टॅक्सी स्टँडजवळ नवे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले.

दरम्यान, येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मध्य रेल्वे माध्यमिक अर्थात इंडियन हायस्कूलवर आता गंडांतर येते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे विकासकामांसाठी मध्यवस्तीत असलेले रेल्वेच्या हद्दीतील इंडियन हायस्कूल लवकरच हटवले जाईल, असे रेल प्रबंधक आर. के. यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आणखी एका रुग्णाची आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालिमार येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आणखी एका रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ९) सकाळच्या सुमारास घडली. हॉस्पिटलमध्ये सातत्याने असे प्रकार घडत असून, ही बाब हॉस्पिटल प्रशासन गंभीरतेने केव्हा घेणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

जवाहरलाल रामकिसन गुप्ता (वय ४८, रा. घोटी, ता. इगतपुरी) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. जवाहरलाल गुप्ता यांना किडनीचा आजार असल्याने त्यांना ३१ जानेवारी रोजी संदर्भसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दाखल झाल्यापासून त्यांच्यावर चारवेळा डायलेसीस करण्यात आले. मात्र, रक्तात अशुद्धता अधिक असल्याने त्यांना अॅडमिट ठेवण्यात आले. शनिवारी (दि. ९) सकाळी त्यांनी नाश्ता केला. पत्नीसोबत फिरून आल्यानंतर ते वॉर्डातील खिडकीजवळ आले. यावेळी वॉर्डात ३० रुग्ण, दोन नर्स आणि दोन वॉर्डबॉय होते. वॉर्डात कोणाला काही समजण्याच्या आत गुप्ता यांनी खिडकीतून स्वत:ला झोकून दिले. खाली पडलेल्या गुप्ता यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात गुप्ता यांनी आजारपण आणि आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यापूर्वी १२ जानेवारीला रहीमखान नबीखान पठाण (वय ५२, रा. मालेगाव) यांनी सुद्धा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव सादर

हॉस्पिटलमध्ये १०० हून अधिक खिडक्या असून, त्यांना जाळ्या बसविण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर खिळे आणि तारा यांच्या मदतीने शक्य तितक्या खिडक्या बंद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दुसरीकडे रुग्णांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने होत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे संदर्भसेवा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. नामपल्ली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ला धुळे दौऱ्यावर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या दि. १६ फेब्रुवारी रोजी धुळ्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या वेळी त्यांच्या हस्ते मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग धुळेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या मार्गाचे काम सुरू व्हावे, यासाठी धुळेकर जनता अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा आता सुरू झाला आहे. यामुळे धुळे-मनमाड रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यात येणार आहेत, असशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
दि. १६ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. नरडाणा अथवा धुळे येथे या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचप्रमाणे डॉ. सुभाष भामरे यांचे पुत्र डॉ. राहूल भामरे यांच्या खान्देश कॅन्सर सेंटरचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य रेल्वेचा आज कल्याणला मेगा ब्लॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मध्य रेल्वेने विकासकामांसाठी कल्याण येथे दि. १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे कल्याण व मुंबईकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.

या मेगाब्लॉकमध्ये मध्ये रेल्वेच्या मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर या रेल्वे दि. १० फेब्रुवारी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहितीही मनमाड रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रिझर्वेशनला फटका
या रेल्वे रद्द असल्याने आता रविवारी सुटीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. अनेकांनी कल्याण, पुणे, मुंबई,
येथे जाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस आधी रिझर्वेशन करून ठेवले होते. त्यांना आता या ब्लॉकचा फटका बसणार आहे. तसेच मनमाड, लासलगाव, निफाड येथून नाशिक, कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांनादेखील रेल्वे रद्दमुळे ऐनवेळी नियोजित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही रेल्वे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी छोट्या-छोट्या गावांना पोहचण्यासाठी महत्वाची व उपयुक्त असताना रविवारी ही गाडी धावणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे. रविवारी महत्त्वाच्या रेल्वे बंद असल्याने याचा राज्य परिवहन मंडळाला नक्की लाभ होईल, असे चित्र आहे.


रेल्वेचा मेगा ब्लॉक हा विकासकामांसाठी असून, ब्लॉक घेतल्याशिवाय कामे करणे शक्य नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे.
- विवेक भालेराव, वाणिज्य निरीक्षक, मनमाड

मेगा ब्लॉक हे सारखे घेतले जात असून, प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आता पॅसेंजर रद्द झाल्याने जिथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही, अशा ठिकाणच्या ग्रामीण भागातील प्रवाशांनी काय करावे. किमान ब्लॉक घेताना पॅसेंजरला वगळले तर ग्रामीण प्रवाशांना दिलासा मिळेल.
- एकनाथ मोरे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या पाण्यासाठी आता पाणी परिषद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कसमादेसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वांजुळपाणी प्रकल्पासाठी कसमादे भागातील वांजुळ पाणी समितीद्वारे काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा, आंदोलन सुरू आहेत. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वांजुळ पाणीप्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. कसमादेसह उत्तर महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वांजुळपाणी संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दाभाडी येथे १७ फेब्रुवारी रोजी पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उगम पावणाच्या नारपार, अंबिका-औरंगा, ताण-माण या नद्या पश्चिम वाहिनी असून यांवे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या राज्य शासनाने स्वीकारलेल्या अहवालानुसार ५० टीएमसी पेक्षा जास्त पाणी गुजरातमार्गे समुद्राला वाहून जाते. हे पाणी प्रवाही वळण पद्धतीने पूर्ववहिनी करून तापी खोऱ्यातील गिरणा नदीत टाकल्यास कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह जळगाव जिल्ह्याचा शेतीसिंचनासह पिण्याचा उद्योगाचा पाणी कायमस्वरूपी मिटू शकतो.

महाराष्ट्र शासनाने पश्चिम वाहिनी नद्यांच्या पाण्याचा गुजरात सरकार व केंद्र सरकार यांच्याशी पाणी वाटप करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पार-तापी-नर्मदा व नार-पार-गिरणा लिंकिंग योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. नार-पार-गिरणा लिंक योजनेत वांजुळ पाणीप्रवाही वळण योजना समाविष्ट करून रबविल्यास नैसर्गिक उतराणे पाणी गिरणा नदीत टाकता येईल त्यामुळे पाणी लिफ्ट करण्याचा खर्च वाचणार आहे. तसेच वन जमीन हद्दीतून हे पाणी वळविण्याचे असल्याने स्थानिक आदिवासी बांधवाणाच्या जमिनी भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही. यामुळे हा प्रकल्प राबविल्यास कमी खर्चात कमीत कमी जमीन भूसंपादन करून कोणत्याही विरोधाला सामोरे जाता प्रकल्प पूर्ण करता येईल.

या प्रकल्पाबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी वांजुळपाणी संघर्ष समितीच्या वतीने दाभाडी ता मालेगाव येथे १७ फेब्रुवारी रोजी पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात कळवण-सुरगण्याचे आमदार जे. पी. गावित, शेतकरी कामगार नेते आमदार जयंत पाटील, याचिकाकर्ते नितीन भोसले यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images