Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची घटणार संख्या

$
0
0

पुलवामा हल्ल्यानंतर टूर एजंट्समध्ये संताप

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर येथे पर्यटन सहल न काढण्याचा निर्णय काही ट्रॅव्हल एजन्सींनी घेतल्यामुळे यावर्षी तब्बल २० हजारांहून अधिक पर्यटकांची संख्या घटणार आहे. या हल्लात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली. त्यानंतर काश्मीरमध्ये सैन्यावर होणारी दगडफेक हे स्थानिक नागरिक करीत असल्यामुळे त्यांना रोजगार का द्यावा, असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले. त्यामुळे या सहलीवर बहिष्कार टाकावा व पर्यटन येथे करूच नये, असे मुद्देही चर्चेत आले. पण, टुर्स एजन्सींनी सरसकट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नसला तरी काही एजन्सींनी मात्र येथे पर्यटन सहल काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक व परिसरातून दरवर्षी २५ हजारांहून अधिक पर्यटक काश्मीर येथे जात असतात. या सहलीला सर्वसामान्य पर्यटकांची पसंती आहे. पण, काश्मीर येथे वातावरण सतत बिघडत असल्यामुळे येथे पर्यटन सहल काढणे धाडसाचे असते. काही दिवसांपासून काश्मीरचे वातावरण अस्वस्थ असल्यामुळे पर्यटकांना येथे नेणे जबाबदारीचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर तर यात अधिक वाढ झाली आहे. या हल्ल्यानंतर शिवसेनेने टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या संघटनेला निवेदन पाठवून काश्मीरच्या टूरवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सची बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाल्यानंतर बहिष्कार न टाकता प्रत्येकाने स्वत: निर्णय घेण्याचे ठरले. त्यामुळे काही एजन्सींनी या पर्यटन सहली रद्द केल्या आहेत.

....

पुलवामा हल्ल्यानंतर आमची बैठक झाली. त्यात बहुतांश एजन्सींनी कश्मीर येथे पर्यटन सहल न काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी काश्मीर येथे २५ हजार पर्यटक जातात. पण, यावेळेस संख्या २० हजारांहून अधिक घटणार आहे.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यान अतिक्रमणमुक्त

$
0
0

कस्तुरबा नगरमध्ये कारवाई करताना तणाव

...

- धार्मिक स्थळ हटविण्यावरून तणाव

- पाच झोपड्यांना दोन दिवसांची मुदत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या कस्तुरबा नगरमधील उद्यानाच्या जागेवरील दोन धार्मिक स्थळे आणि पाच झोपड्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी जमीनदोस्त केल्या. राका कॉलनी शेजारील पालिकेच्या रिकाम्या भूखंडावर उद्यानाचे आरक्षण होते. परंतु, या ठिकाणी दोन धार्मिक स्थळे उभे करून झोपड्यांचे अतिक्रमण सुरू झाले होते. त्यामुळे पालिकेने बुधवारी पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रण काढले. दरम्यान, या ठिकाणी दोन धार्मिक स्थळे हटविण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. पोलिस आणि पालिकेच्या पथकाने मात्र परिस्थिती शांतपणे हाताळत अतिक्रमण काढले.

कस्तुरबा नगरमध्ये असलेल्या पालिकेच्या उद्यानावर जवळपास दहा झोपड्या आणि दोन धार्मिक स्थळे उभी राहिली होती. पालिकेने या उद्यानाच्या निर्मितीसाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने हे अतिक्रमण काढून देण्याची मागणी अतिक्रमण विभागाकडे केली होती. त्यानुसार अतिक्रमण विभागाने या ठिकाणी रहिवास करणाऱ्यांना महिनाभरापूर्वीच अतिक्रमण काढून घेण्याची तोंडी सूचना केली होती. परंतु, स्थानिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम आणि नाशिक पश्चिम विभाग अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखालील पथक अतिक्रमण स्थळी दाखल झाले. या ठिकाणी दोन धार्मिक स्थळे असल्याने स्थानिकांनी अतिक्रमण काढण्यास तीव्र विरोध केला. या ठिकाणी असलेल्या पाच झोपड्या आणि शेड पथकाने यावेळी काढून टाकल्या. परंतु, धार्मिक स्थळे हटविण्यावरून तणाव निर्माण झाला. पोलिसांचे दंगा नियंत्रणक पथक या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी नमते घेतले. पालिकेच्या पथकाने पूजा अर्चना करीत धार्मिक स्थळ या ठिकाणाहून हटवले. या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या पाच झोपड्यांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित

$
0
0

नाशिकमधून समीर भुजबळ तर दिंडोरीत महालेंना संधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून त्यांना कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधून समीर भुजबळ तर दिंडोरीमधून धनराज महाले यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार बदलल्याने यशाची अपेक्षा बाळगली जात आहे.

जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी हे दोन्ही प्रमुख मतदारसंघ तर धुळे लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. धुळे मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आलेला आहे. 'राष्ट्रवादी'ला सोडण्यात आलेल्या मतदारसंघात नाशिकमध्ये शिवसेना तर दिंडोरीत भाजपशी प्रमुख सामना आहे. गेल्या वेळी या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळेस या दोन्ही जागावर राष्ट्रवादीने ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची वाट सोपी नाही.

नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ की समीर भुजबळ हे निश्चित होत नव्हते. पण, पवारांच्या दौऱ्यानंतर समीर भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. या दौऱ्यात समीर भुजबळ यांनी पवारांच्या गाडीचे स्वारथ्य केले. तसेच मंचावरही त्यांना शेजारी बसवण्यात आले. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले धनराज महाले यांचे नावही या दौऱ्यात निश्चित झाले आहे.

दिंडोरीत पितृपुण्याई

धनराज महाले हे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असल्याने या मतदारसंघात त्यांना मोठा फायदा होईल, असे गणित मांडले जात आहे. हरिभाऊ महाले यांनी या मतदार संघातून तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. पण, त्यावेळेस मालेगाव लोकसभा मतदार संघ होता व त्यात मालेगावची एकगठ्ठा मुस्लिम मते निर्णायक ठरत होती. दिंडोरी या मालेगाव विधानसभा नसल्याने त्याचा फायदा महाले यांना मिळणार नाही. पण, ओळखीचा चेहरा म्हणून त्यांना त्याचा फायदा होणार आहे.

डॉ. पवारांचा पत्ता कट

गेल्या वेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. पण, महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचा पत्ता कट झाला. यामागे घरातील अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. दरम्यान, डॉ. पवार या भाजपच्या संपर्कात असून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाल्यास त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उतावळ्या नवऱ्याविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लग्नाआधी शरीरसुखाला नकार दिल्यामुळे लग्न मोडल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. मुलगी सिगारेट पिते, ती आवडत नाही असे सांगत हुंड्यापोटी २ लाख रुपयांची मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रकरणी धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यात शहादा येथील वरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील देवपूर भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने देवपूर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ११) रात्री याबाबत फिर्याद दिली आहे. या पीडित तरुणीचे मयूर वसंत चव्हाण (रा. शहादा) याच्याशी लग्न ठरले होते. मयूर हा दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता मोटारसायकलीने तरुणीच्या घरी आला. त्यादिवशी तिच्या घरी मुक्काम करीत दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता तरुणीला मोटारसायकलवर बसवून धुळ्याहून शहादा येथे घेऊन जाताना दोंडाईचाजवळ एका हॉटेलवर थांबून त्यांनी चहा घेतला. यानंतर मयुरने तरुणीला लॉजवर थांबू असे सांगितले. परंतु, त्यास तरुणीने नकार दिला तसेच शहादा येथे त्याच्या घरी नेल्यानंतरही मयूरने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाले. या वेळी त्याने लग्न मोडण्याची धमकी दिली. याबाबत दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वर-वधू यांच्या नातेवाइकांची बैठक झाली. त्यावेळी मयूरने मला मुलगी आवडत नाही, ती सिगारेट पिते असे सांगून तिच्याशी लग्न करायचे नाही, असे सांगितले. तसेच त्याच्या आई-वडिलांनी २ लाख रुपये हुंड्यांची मागणी करून लग्न मोडले. तरुणीच्या वडिलांना घरी बोलावून धक्काबुक्कीही केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून मयूर वसंत चव्हाण, वसंत बाबुलाल चव्हाण, पुष्पाबाई वसंत गुरव (रा. शहादा जि. नंदुरबार), बन्सीलाल बाबुलाल गुरव (रा. पाटकरनगर, देवपूर) या चौघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणातून पाणी सोडण्यासाठी जलसमाधीचा प्रयत्न

$
0
0

महिला आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून प्रत्येकी ५०-५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा सोडण्यात यावा या मागणीसाठी महिलांनी बुधवारी (दि. १३) जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या गायत्रीदेवी जयस्वाल यांच्यासह महिला कार्यकर्त्या बुधवारी (दि. १३) अक्कलपाडा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यावर रोखत ताब्यात घेतले. या वेळी आंदोलनकर्त्या महिलांना धरणातील पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन सिंचन विभागाकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांनादेखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी जनावरे विक्री करण्याचे वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे तत्काळ अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या गायत्रीदेवी जयस्वाल यांनी सिंचन विभागाकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. १३) सकाळी अक्कलपाडा धरणात जलसमाधी आंदोलनाचा महिला पवित्रा हाती घेतला. मात्र, त्यांना रस्त्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी आंदोलनाच्या मागण्यांबाबत सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून धरणातील दोन्ही कालव्यातून लवकरच पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात वानुबाई शिरसाठ, ममता मोरे, सोमवंती मालचे, बेबाबाई पवार, अंजना सोनवणे, सीमा कोळी, शोभा जाधव, हवसाबाई ठाकरे, ताराबाई पवार, सखबाई पानपाटील यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नछत्र जागेवरून रामकुंडावर तणाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडावरील धार्मिक विधींना महत्त्व विशेष असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. येथील चतुःसंप्रदाय आखाड्याजवळील महापालिकेच्या जागेवर रामकुंडावरील अन्नछत्रासाठी ही जागा मोकळी करण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी गुरुवारी (दि. १४) रोजी आले. मात्र, तेथे काही काळ तणाव निर्माण झाल्याचे बघून कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.

रामकुंडावरील धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित संघ आहे. रामकुंड, लक्ष्मण कुंड, गांधी तलाव, अहिल्याराम पटांगण यासह आदी ठिकाणी हे विधी केले जातात. चतुःसंप्रदाय आखाड्या जवळील वाहन पार्किंग जागेत असलेल्या महापालिकेच्या धर्मशाळेत देखील धार्मिक विधी करण्यात येत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून याठिकाणी पुरोहित धार्मिक विधी करीत असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी येथील जागा खाली करण्यासाठी आले. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळाने अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वाहन निघून गेले. अन्नछत्रासाठी ही जागा खुली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

शहर भिकारी मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असताना रामकुंडावर मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र चालविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीत भिकाऱ्यांना हटविण्याऐवजी धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांना हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्त रत्नाकर कुलकर्णी यांनी गोदावरी नदीच्या काठावर चतुःसंप्रदाय आखाड्याजवळील महापालिकेच्या जागेवर धार्मिक विधींकरिता कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिली आहे. तर नदीच्या दुसऱ्या काठावरील धार्मिक विधींकरिता चक्री मंडपाचे बांधकाम करण्यात आले असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वाद पोलिसांच्या अंगाशी

$
0
0

पीडित परिवाराच्या तक्रारीची दखल; आयुक्तांकडून कानउघाडणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कौटुंबिक वादातून झालेल्या किरकोळ मारहाणीच्या प्रकरणाचा गुन्हा थेट ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. हे प्रकरण थेट पोलिस आयुक्तांपर्यंत गेले. त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अन्याय झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी देखील गुन्ह्यात नाव असलेल्या संशयितांची सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावेचच पोलिसांना आणून दिल्याने हे प्रकरण पंचवटी पोलिसांच्या अंगाशी आले आहे.

कौटुंबिक वादातून सोमवारी (दि. ११) रोजी मारहाण करण्यात आल्याची तक्रार पंचवटी स्टेशनमध्ये दाखल झाली. मारहाण किरकोळ स्वरूपाची असताना हाणामारीच्या गुन्ह्यात चार संशयितांवर थेट ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने अन्याय झालेल्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना समक्ष भेटून लेखी आणि ऑनलाइन तक्रार अर्ज देत आपली कैफियत मांडली. नेमका प्रकार काय, हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी बुधवारी (दि. १३) थेट पंचवटी पोलिस ठाण्याला भेट देत अटकेत असलेल्या संशयितांची चौकशी केली. संबंधित तक्रार किरकोळ स्वरूपाची असताना देखील ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने नांगरे पाटील यांनी वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील यांना धारेवर धरले. साधा कौटुंबिक वाद हा अदखलपात्र गुन्हा असताना ३०७ म्हणून दाखल केल्याने ते संतापले. पाटील यांची कानउघाडणी करीत गुन्ह्यात फेरफार करून अदखपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पंचनामा नेमका कुठला?

चुकीचा गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण पोलिस अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगाशी येणार असल्याचे काही पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मारहाणीची घटना दुपारी बारा वाजेची असताना गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे फॉरेन्सिक लॅबचे पथक रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीला सोबत न घेता फक्त तपासी अधिकाऱ्याने जाऊन पंचनामा केल्याने पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मुळात घटना कुठे झाली हे पोलिसांना माहित नसताना नेमका पंचनामा कुठल्या ठिकाणचा केला, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन चोरट्यांना अटक

$
0
0

पानेवाडीनजीक छापा; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-नांदगाव मार्गावर इंडियन ऑइल पानेवाडी प्रकल्पानजीक इंडियन ऑइलच्या टँकरमधून बनावट चावीचा वापर करून इंधन चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला विशेष पोलिस पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने मनमाड-नांदगाव रोडवर माऊलीनगर परिसरात ही कारवाई केली. पोलिसांनी तब्बल ३२ लाख ४३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली.

इंधन चोरीचे वाढते प्रकार सर्रास सुरू असून, माफियांच्या या कारनाम्यामुळे काही वर्षांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोल माफियांनी जाळून मारल्याच्या घटनेच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या आहेत. माफियांचे अड्डे पुन्हा सुरू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या बनावट चाव्यांसह दोन टँकर तसेच त्यातून काढण्यात आलेले पेट्रोल जप्त केले आहे. इंडियन ऑइल कंपनी नजीक, प्रशासकीय अधिकारी वसाहती मागे हा प्रकार सुरू असताना देखील त्यांना त्याची माहिती नसावी या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुरुवारी दुपारी इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून टँकर (एमएच १९ झेड ४७४१) पेट्रोल भरून निघाला. मात्र तो मूळ ठिकाणी न जाता नांदगाव रोडवर इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वसाहती मागे नेण्यात आला. येथे टँकरच्या व्होलला असलेले कुलूप बनावट चावीने उघडून पेट्रोल काढले जात होते. याबाबत अज्ञात व्यक्तीने मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना खबर दिली. निलोत्पल यांनी तातडीने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार देवीदास ठोके, शरद देवरे. महारु माळी, किरण दासरवार यांच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. या पथकाने छापा मारून टँकरमधून पेट्रोल काढताना चार जणांच्या टोळीला पकडले. आरोपींकडून बनावट चाव्यासह दोन टँकर तसेच त्यातील इंधन या सह तब्बल ३२ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकाश दराडे (मनमाड), विष्णू लटपटे (नागापूर),

सतीश पगारे (नागापूर), व प्रमोद देसले (झोडगे) या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. पंधरा दिवसातील तिसरा छापा असल्याचे त्यांनी सांगितले.

बनावट चाव्या

पानेवाडी परिसरात भारत पेट्रोलिअम, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलिअम आदी कंपन्याचे प्रकल्प आहेत. रोज शेकडो टँकरच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात इंधन पुरवठा केला जातो. इंधन चोरी होऊ नये यासाठी टँकरच्या टाकीच्या तिन्ही कप्प्यांना कुलूप लावले जाते. त्याच्या दोन चाव्या असतात. एक चावी प्रकल्पात असते, तर दुसरी डीलरकडे. सर्व टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडले आहेत. त्यामुळे टँकर कुठे चालला याची माहिती मिळते. असे असताना देखील इंधन चोर सर्रास बनावट चाव्या तयार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... अन् ते उभे राहिले स्वतःच्या पायावर

$
0
0

नाशिकरोड कारागृहातील दोघा कैद्यांना मिळाले जयपूर फूट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नशिबाच्या फेऱ्यामुळे नाशिकरोड कारागृहात यावे लागलेल्या अपंग कैद्यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे. कारागृह प्रशासन, मुंबईचे टाटा ट्रस्ट आणि नाशिकरोडचे जयराम हॉस्पिटल यांच्या मदतीने दोन कैद्यांना गुरुवारी जयपूर फूट (कृत्रिम पाय) बसविण्यात आले. तसेच यावेळी हाडांच्या आजारावर व्याख्यान झाले.

नाशिकरोड कारागृहाच्या ग्रंथालयात जयपूर फूट वितरणाचा कार्यक्रम झाला. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर, पल्लवी कदम, जयराम हॉस्पिटलचे डॉ. राकेशचंद्र कनोजिया, टाटा ट्रस्टचे लखन कुमावत, हॉस्पिटलच्या डॉ. मेरी पोटल, व्यवस्थापक राजू ढेरिंगे, शशिकांत दिवे, दर्शन शिंदे, ज्योती रणधीर, कविता बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मोईस भारमल आणि कृष्णा शिराळकर या कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आले. अन्य गरजू कैद्यांची तपासणी करून त्यांनाही असे पाय बसविण्यात येणार आहे. यावेळी डॉ. कनोजिया यांनी हाडांचे विकार आणि उपाययोजना यावर व्याख्यान दिले. पाठ, गुडघा, मानदुखी आदी टाळण्यासाठी कोणते सोपे व्यायाम आहेत याची त्यांनी माहिती दिली. नियमित व्यायामाने अशी दुखणी टाळता येतात. मात्र, व्यायाम घाईघाईत न करता हळू हळू करावा, असे त्यांनी सांगितले. बंद्यांना कारागृहातच व्यायामाचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर यांनी कृत्रिम पाय बसविल्याने बंद्याच्या जीवनाला नवी दिशा प्राप्त झाली आहे. त्यांनी टाटा ट्रस्ट आणि डॉ. कनोजिया यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरपैकी शंभर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत खासदारांनी आपला निधी १०० टक्के खर्ची केला असल्याचे समोर आले आहे. दोन्ही मतदारसंघांत ५४ कोटी ५३ लाखांची १२३३ विकासकामे झाली आहेत.

बऱ्याच वेळा हा हक्काचा निधी खर्च न केल्याने लोकप्रतिनिधींना टीकेचे धनी व्हावे लागते. पण, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपला संपूर्ण निधी खर्च केला असून, या निधीतून गोडसे यांनी ६३३, तर चव्हाण यांनी ६५० विकासकामे केली आहेत.

लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक खासदारांना ५ कोटी निधी दर वर्षी खर्च करता येतो. त्यानुसार पाच वर्षांत या दोन्ही खासदारांनी प्रत्येकी २५ कोटी रुपये विविध विकासकामांवर खर्च केले आहेत. विशेष म्हणजे याव्यतिरिक्त व्याज व बचतीमुळे दिंडोरी मतदारसंघासाठी २ कोटी १० लाख व नाशिक मतदारसंघासाठी २ कोटी ४३ लाख अतिरिक्त मिळाले आहेत. त्यामुळे या चव्हाण यांचा खासदार निधीचा आकडा २७ कोटी १० लाख, तर गोडसे यांचा खर्चाचा आकडा २७ कोटी ४३ लाख झाला आहे. एकूण दोन्ही मतदारसंघांत ५४ कोटी ५३ लाखांची १२३३ विकासकामे झाली आहेत.

केंद्र सरकारतर्फे विविध योजना व प्रकल्पांसाठी निधी दिला जातो. पण, त्याव्यतिरिक्त खासदारांचा हक्काचा निधी म्हणून खासदार निधीकडे बघितले जाते. या निधीतून खासदार आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी तातडीने पैसे देऊ शकतात. त्यासाठी त्यांनी नियोजन मंडळाला पत्र दिल्यानंतर संबंधित काम करणाऱ्या संस्थांकडून इस्टिमेट मागितले जाते. त्यानंतर त्याला मंजुरी देऊन या कामासाठी निधी दिला जातो.

खासदारांची तारेवरची कसरत

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे हा निधी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला थोडा थोडा मिळावा यासाठी खासदारांना तारेवरची कसरत करावी लागते. हा हक्काचा निधी असला, तरी तो कमी पडत असल्याच्या तक्रारी खासदारांकडून नेहमी केल्या जातात.

रिपोर्ट कार्ड येते समोर

खासदार गोडसे व चव्हाण यांनी खासदार निधीबरोबरच जिल्ह्यात वेगवेगळ्या विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे. पण, त्याची आकडेवारी मात्र अद्याप समोर आलेली नाही. एकूण निधी खर्चावरून खासदारांच्या कामाचे रिपोर्ट कार्डही समोर येते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना तिकीट मिळाल्यास खासदार निधी किती खर्च केला, अशा प्रश्नाला आता सामोरे जावे लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोहण्याचा सराव करताना मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर पोहण्याचा नियमित सराव करण्यासाठी गेलेल्या हेमंत वसंत तरटे (वय ५९, रा. पाटीदार भवन, नाशिक-पुणे रोड) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता घडली.

हेमंत तरटे हे सावरकर जलतरण तलावाचे आजीव सभासद होते. रोज सकाळी ते साडेसहा वाजता पोहण्यासाठी नियमित येत असत. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे पोहणे झाल्यानंतर ते शॉवर घेण्यासाठी गेले. तेथून आल्यानंतर कपडे घालत असतानाच त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपस्थित जलतरणपटूंनी व तलावावरील व्यवस्थापक हरी सोनकांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना नजिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेमंत तरटे हे पौर्णिमा बसस्टॉपजवळील पाटीदार भवन परिसरातील कन्हैय्या अपार्टमेंटमध्ये रहात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यापूर्वी, जलतरण तलावात अशा मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये देवव्रत गायकवाड या १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचेही हृद्याविकाराच्या धक्याने निधन झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट श्वानांची सिडकोत दहशत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील मोकाट जनावरांबरोबरच आता श्वानांचाही सुळसुळाट वाढला आहे. याप्रश्नी स्थानिक नगरसेवकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अंबड गावातील दातीर मळ्याजवळील घराबाहेर खेळत असलेल्या नैतिक पंकज इंगोले हा सात वर्षीय बालकावर श्वानाने हल्ला केला. यामुळे त्याच्या डोक्याला व हाताला इजा झाली आहे. नैतिकने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याची श्वानापासून सुटका केली. त्यानंतर या श्वानाने नेहा प्रकाश सोनवणे या चार वर्षीय बालिकेलाही हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात नेहा हिच्या चेहरा व कानावर जखमा झाल्या आहेत. या दोघा बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अस्वच्छतेमुळे प्रश्न बिकट

नगरसेवक राकेश दोंदे यांनी तर प्रभाग सभेत अंबड गाव व परिसरात असलेल्या मोकाट श्वानांबाबतचे विविध फोटो आणि चित्रफितही दाखविल्या होत्या. या भागात अस्वच्छतेचाही प्रश्न गंभीर झाल्याने मोकाट श्वान वाढल्याची तक्रार त्यांनी केली होती. मोकाट श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी भेटीसाठी भरावा लागणार फॉर्म

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अगोदर चिठ्ठी द्यावी लागत होती. पण, नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भेटण्यासाठी आता एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे.

दुसऱ्या विभागातून अधिकारी व कर्मचारी भेटण्यासाठी आले, तर त्यांनादेखील मुख्यालय सोडल्याचा परवानगीचा तपशील द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे या फॉर्मचे 'ट्रॅक रेकॉर्ड' केले जाणार असल्यामुळे पुन्हा भेटण्यासाठी आलेल्यांचे काम झाले की नाही, याची माहिती त्यातून मिळणार आहे.

या फॉर्मध्ये नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, प्रलंबित कामाचे स्वरूप, संबंधित विभाग याचा तपशील लिहावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या फॉर्मखाली कार्यालयीन तपशील म्हणून मोठी चौकट आहे. त्यात या कामाचे काय झाले, याची माहिती लिहिली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी सुरू केलेली ही पद्धत भेटणाऱ्यांसाठी पहिल्यांदा त्रासदायक वाटणार असली, तरी त्यांच्या कामाचे पुढे काय झाले याचा तपशील त्यातून नंतर मिळणार आहे. नवीन अधिकारी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्याकडून कामाच्या वेगवेगळ्या पद्धती अमलात आणल्या जातात. काही पद्धती त्रासदायक ठरतात, तर काही पद्धतींमुळे त्यांना भेटणाऱ्यांचा लाभ होतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा फॉर्म मात्र नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदतकारक ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊशे वाहनचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी गुरुवारी गंगापूररोडसह कॉलेजरोडवर दोन वेळेत सुमारे ९०० वाहनचालकांवर कारवाई केली. सकाळच्या सुमारास पायी गस्त आणि संध्याकाळी वाहन तपासणी करण्याकडे पोलिसांनी भर दिला. यापुढे शहराच्या विविध भागात सातत्याने वेगवेगळ्या वेळी पायी गस्त घालण्यात येणार आहे.

पोलिस रस्त्यावर हवे, असे स्पष्ट निर्देश नूतन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर पायी गस्तीची संकल्पना पुढे आली आहे. यापूर्वी ही संकल्पना शहरात राबविण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी जनजागृतीऐवजी थेट कारवाईची भूमिका घेतली आहे. गुरुवारी कॉलेजरोड परिसरात पायी गस्त आणि त्यानंतर वाहन तपासणी मोहिमेत सुमारे ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह वाहतूक विभाग आणि पोलिस ठाण्यांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

...

प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय पायी गस्त घालण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ११ किंवा ११ ते १ किंवा सांयकाळी सुद्धा दोन तासांच्या फरकाने पोलिस वेगवेगळ्या रस्त्यांवर उतरतील. यावेळी वाहन तपासणी आणि टवाळखोरांवर कारवाई असे दुहेरी काम होणार आहे.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंडीतील फक्त एकच श्वान पथकाच्या हाती

$
0
0

रामकुंडावर कारवाईने नाशिककर अवाक्

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला स्वच्छतेचे काम करीत असताना एका मोकाट कुत्र्याने त्यांना चावा घेतल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी (दि. १४) रामकुंडावर श्वान पकडणारे पथक दाखल झाले. या पथकासमोर आठ-दहा कुत्र्यांची झुंड असताना त्यातील फक्त एकच कुत्री या पथकाच्या हाती लागली. तेवढे एकच कुत्री घेऊन हे पथक निघून गेल्याने येथील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे, त्याला धार्मिक क्षेत्रही अपवाद नाहीत. या मोकाट कुत्र्यांचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, तीर्थक्षेत्राच्या भागात होणाऱ्या अन्नदानामुळे तेथे खरकटे पडत असते. त्यावर ही मोकाट कुत्री पोसली जात असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. पर्यटक आणि भाविकांची नेहमीच गर्दी असलेल्या रामकुंडावर ही समस्या वाढली आहे. या परिसराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचारी कमलाबाई सरदार (रा. उपनगर) या स्वच्छतेचे काम करीत असताना एका मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करीत त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला होता.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर कुत्र्याने हल्ला केल्यानंतरही त्वरित हे पथक आले नाही. गुरुवारी (दि.१४) सकाळी नऊच्या सुमारास आलेल्या या पथकाने जाळी टाकून केवळ एकच कुत्रे पकडले. ते वाहनात टाकले आणि ते निघून गेले. रामकुंडावर इतरही अनेक कुत्री असताना ती का पकडली नाही असा प्रश्न नागरिक करीत आहे.

जनतेलाही जुमानेत ना!

श्वान पथक निघून जात असल्याचे बघताच काही नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना हटकण्याचा प्रयत्न केला, तरीही ते नागरिकांना न जुमानता निघून गेले. एकच कुत्रा पकडल्याने येथील मोकाट कुत्र्यांची समस्या सुटेल कशी, असा प्रश्न येथील नागरिक एकमेकांना विचारीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवेतील पैश्यांवरही ‘नजर’

$
0
0

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विमान, हेलिकॉप्टरची होणार तपासणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत आता विमान व हेलिकॉप्टरची तपासणी केली जाणार आहे. राजकीय पक्षांचे नेते यातून पैसे आणतात असे प्रश्न वारंवार उपस्थित होत असल्याने निवडणूक आयोगाने याची दक्षता या निवडणुकीत घेतली आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयात विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही करण्यात आल्या आहे. तसेच ही तपासणी करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहे.

या निवडणुकीत काही बदलही निवडणूक आयोगाने केले आहे. त्यात हा नवा बदल आहे. याअगोदर विमान व हेलिकॉप्टरची तपासणी सुरक्षितता म्हणून केली जात होती. पण, आता त्याचा गैरवापर होणार नाही. याची काळजी घेण्यात येणार आहे. विमानाची तपासणी करण्याबरोबरच निवडणूक अधिकारी हेलिकॉप्टरची तपासणी करणार आहे. तसेच या निवडणुकीत उमेदवाराचा फोटो हा ईव्हीएम मशिनवर असणार आहे. पण, हा फोटो तीन महिने अगोदरचाच असावा, असे निर्देशही देण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरतांना तो नामनिर्देशन पत्राला जोडावा लागणार आहे. उमेदवारांना स्वत:चे स्वतंत्र बँक अकाउंटही उघडावे लागणार आहे.

प्रतिज्ञापत्र आता एकच

निवडणुकीत नामनिर्देशनपत्र भरतांना गुन्हेगारी व मालमत्तेसंबधी दोन प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागत होते. पण, आता एकच प्रतिज्ञापज्ञात दोन्ही गोष्टी नमूद कराव्या लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशपत्र भरणे सोपे जाणार आहे.

आता सात राष्ट्रीय पक्ष

गेल्या निवडणुकीत सहा राष्ट्रीय पक्ष होते. पण, आता तृणमूल काँग्रेस पक्षाचे नावही या यादीत दाखल झाले आहे. अगोदर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, माकप, भाकप, बसपा यांचा समावेश होता. आता त्यात तृणमूल काँग्रेसची भर पडली आहे. तसेच राज्यातील पक्ष म्हणून शिवसेना व मनसे असणार आहे.

७० लाख खर्च

लोकसभा निवडणुकासाठी प्रत्येक उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे त्यातून उमेदवारांना प्रचार करणे सोपे जाणार आहे. याअगोदर असलेल्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

अंध मतदारांसाठी व्यवस्था

अंध मतदारांसाठी या निवडणुकीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची स्वतंत्र यादी तयार केली असून त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे. ते तपासून येथे ही व्यवस्था केली जाणार आहे. त्यांच्या मतदानासठी ब्रेल लिपीची वोटिंग मशिनही असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटला बहाणा, पण कारवाई टळेना!

$
0
0

विनाहेल्मेट कारवाईतून तरुण सुटला; स्नुकर खेळताना अडकला

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांची वाहतूक कारवाई सुरू होताच वाहनचालकांची धांदल उडते. आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी वाहनचालकांकडून विविध कारणांची ढाल पुढे केली जाते. विशेषत: अर्जंट हॉस्पिटलला निघालो, हे कारण ८० टक्के वाहनचालक सांगतात. त्यामुळे काहींची सहीसलामत सुटकादेखील होते. मात्र, गुरुवारी असे कारण एका तरुणाला चांगलेच महागात पडले. सहानभुती म्हणून समजूत देऊन सोडलेला हा तरुण चक्क स्कूनर खेळताना पोलिसांच्या हाती लागला.

पोलिस रस्त्यावर दिसायला हवे. पोलिस रस्त्यावर असले की गुन्हेगार गुन्हे करताना विचार करतात. तर, नागरिकंनाही दिलासा मिळतो, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले. पोलिस आयुक्तांच्या या आदेशाचे पालन वेगवेगळ्या पद्धतीने होत असून, आता त्यात पायी गस्तीची भर पडली आहे. गुरुवारी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी आपल्या पथकांसह गंगापूररोड आणि कॉलेजरोड भागात पायी गस्त घातली. जेहान सर्कल, बीवायके कॉलेजजवळील सिग्नल पुढे कॅनडा कॉर्नर आदी ठिकाणी पोलिसांनी वाहन तपासणी करण्याबरोबर टवाळखोरांवर कारवाई केली. जेहान सर्कल येथे वाहनांची तपासणी सुरू असताना एक तरुण विनाहेल्मेट आढळला. आपल्याला अर्जंट हॉस्पिटलला जायचे असल्याचे कारण त्याने सांगितले. पोलिसांनी सुद्धा सहानभुतीपूर्वक विचार करीत त्यास समज देऊन सोडले. जेहान सर्कल येथील काम आटोपून पोलिस बीवायके कॉलेजजवळील सिग्नलजवळ पोहचले. सिग्नल ते श्रद्धा पेट्रोलपंप या परिसरातील अनेक युवक आणि तरुण टवाळखोरी करतात. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी वाहनतपासणी करण्याबरोबर टवाळखोरांवर आपले लक्ष केंद्रित केले. याच दरम्यान या परिसरात असलेल्या एका स्कूनर केंद्राची पोलिसांनी तपासणी सुरू केली. स्कूनर खेळास परवानगी असली तरी या ठिकाणी धूम्रपान होत असल्याने पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तपासणीत जेहान सर्कल येथून हॉस्पिटलला निघालेला तरुण पोलिसांच्या हाती लागला. त्याला समाधानकारक उत्तर पोलिसांना देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक नियमांबाबतचा दंड तर केलाच पण त्याच्यासह त्याच्या इतर साथिदारांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. या सर्वांना गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात येऊन जामिनावर सोडण्यात आले.

..

रिक्षातून फिल्डिंग

बीवायके कॉलेज सिग्नल ते श्रद्धा पेट्रोलपंप या रस्त्यावर पोलिस सातत्याने कारवाई करतात. मात्र, पोलिस येण्याची चाहूल लागली की युवक दुसऱ्या बाजूने पसार होतात. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह रिक्षाने पेट्रोलपंपापर्यंत गेले. तिथे त्यांनी नाकाबंदी केली. पाठीमागून सिग्नलच्या बाजूने उर्वरित फौजफाटा होता. या दोन तपासणी केंद्रात सापडलेल्या प्रत्येकाची पोलिसांनी कसून चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर, नगरसचिव अडचणीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत असलेले लघुलेखक रवींद्र सोनवणेंबाबत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केलेल्या तक्रारीमुळे चार महापौर आणि चार नगरसचिव अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सोनवणे कामावर नसतानाही महापौरांच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचे वेतन काढले गेल्याचा संशय प्रशासनाला असून, त्यांच्या हजेरीबाबतची कागदपत्रे आणि महापौरांची प्रमाणपत्रेही आता तपासली जाणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक जण गोत्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटील यांनी पुन्हा एक लेटरबॉम्ब टाकत महापौर रंजना भानसी यांनी सोनवणे यांना वाचवू नये, अशी मागणी केल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे सोनवणेंच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.

सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नगरसचिव विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली असता रवींद्र सोनवणे गेल्या दहा वर्षापासून महापौरांच्या 'रामायण' या निवास्थानी लघुलेखक म्हणून कार्यरत असल्याचे कागदोपत्री आढळले. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानी काम न करताच ते गेल्या दहा वर्षांपासून बनावट सह्यांच्या आधारे वेतन घेत असल्याची तक्रार पाटील यांनी पुराव्यानिशी आयुक्तांकडे केली आहे. सोनवणे यांची बायोमॅट्रिक हजेरी तपासण्यात यावी, त्यांनी हाताळलेल्या फायलींची माहिती द्यावी, अशी मागणी करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या तक्रारीनंतर सोनवणे हे महापौरांच्या बंगल्यावर अवतरले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यात आता अनेक कंगोरे समोर येत आहेत. सोनवणे नगरसचिवांकडे कार्यरत असल्याने त्यांच्या वेतनाशी संबंधित फायलींवर नगरसचिवांच्या सह्या असतात. वेतन काढण्यासाठी महापौर कार्यालयाचे प्रमाणपत्र लागते. त्यामुळे हे प्रमाणपत्र न सादर करताच देयके काढल्याचा आरोप आता होत आहे. नगरसचिवांनी प्रमाणपत्र न घेताच वेतन कसे काढले, याबाबतचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील चार महापौर आणि चार नगरसचिवांचा या प्रकरणातील सहभाग तपासला जाणार आहे. परिणामी सोनवणेंच्या अडचणी वाढल्या असतानाच त्यांना या प्रकारात मदत करणाऱ्या संबंधित तत्कालीन महापौरांसह विद्यमान महापौर रंजना भानसी आणि नगरसचिव गोरखनाथ आव्हाळेदेखील अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

--

पाटलांचा लेटरबॉम्ब

महापौर रंजना भानसींवर सोनवणे यांच्या वाचवण्यासंदर्भात दबाव येत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी महापौरांसह आयुक्ताना पुन्हा पत्र लिहून सोनवणेंना मदत करू नये, अशी मागणी केली आहे. सोनवणेंना मदत केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा इशाराही पाटील यांनी दिल्याने महापौरांची कोंडी झाली आहे. पाटील यांच्या या लेटरबॉम्बनंतर भानसी यांनी आता या प्रकरणापासून अंतर राखल्याची चर्चा आहे. सोनवणेंसाठी राष्ट्रवादींच्या बड्या नेत्यांकडून आता सत्ताधारी भाजपवरच दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवा दृष्टिपथात

$
0
0

'नाशिक महानगर परिवहन कंपनी'ची स्थापना; ऑनलाइन अर्ज दाखल

...

- आचारसंहितेतही बससेवेच काम जोरात सुरू

- ठेकेदारांची येत्या १९ तारखेला बैठक

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतही प्रशासकीय तयारी वेगाने सुरू ठेवल्याने महापालिकेची शहर बससेवा आता दृष्टीपथात आली आहे. शहर बससेवेसाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्यानंतर आता कंपनी कायद्यांतर्गत बससेवेच्या संचालनासाठी स्थापन करावयाच्या कंपनीचे 'नाशिक महानगर परिवहन कंपनी लिमिटेड' असे नामकरण करण्यात आले आहे. कंपनी स्थापनेचा प्रस्तावदेखील शासनाकडे ऑनलाइन दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बससेवेसाठी ठेकेदारांची प्री बिड बैठक ही येत्या १९ मार्चला बोलविण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळामार्फत शहरात चालविण्यात येत असलेली तोट्याची बससेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या माथी मारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडील शहर बससेवेचा पांढरा हत्ती महापालिकेच्या दारी बांधण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला आहे. 'ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट' तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या शहर बससेवेसाठी परिवहन समिती गठीत करण्याचा निर्णय महासभेत सर्वानुमते घेतला होता. परंतु, परिवहन समितीऐवजी कंपनीच्या माध्यमातून शहर बससेवा चालविणे योग्य ठरेल, हे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यामुळे सत्तारूढ भाजपने घूमजाव करीत परिवहन समितीऐवजी कंपनी स्थापन करण्याचा ठराव प्रशासनाकडे पाठविला होता. या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून जोरात सुरू ठेवण्यात आली असून, दिवाळीआधीच बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बससेवा चालविण्यासाठी कंपनी गठणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनी स्थापन करण्याकरिता शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यात आला आहे. अर्ज करताना कंपनीचे नाव त्यात नमूद करणे आवश्यक असल्याने 'नाशिक महानगर परिवहन कंपनी लिमिटेड', 'नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड', 'नाशिक म्युनिसिपल सिटी बस कंपनी लिमिटे' व 'नाशिक म्युनिसिपल सिटी बस कार्पोरेशन लिमिटेड' अशी चार नावे सुचविण्यात आली होती. त्यापैकी 'नाशिक महानगर परिवहन कंपनी लिमिटेड' या नावाला मंजुरी मिळाली आहे. महापालिका मुख्यालयाच्या पत्त्यावरच कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनी स्थापनाची प्रक्रिया पू्र्ण झाल्याने बससेवेचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.

...

बैठकीत होणार अर्टी शर्तींवर चर्चा

शहरात ४०० बसेस ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहे. त्यात आता डिझेल वर २००, तर सीएनजी व इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या २०० बसेस मक्तेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेसची प्रणाली नवी असल्यामुळे डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या बसेसकरिता एक, तर इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेसकरिता दुसरी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. येत्या १९ मार्च रोजी यासंदर्भात मक्तेदारांसमवेत प्री-बीड मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महापालिकेच्या अटी शर्ती व ठेकेदारांच्या त्रुटीवर चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’नंतर आता हैदराबाद-सुरत मार्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात प्रचंड विरोध केल्याचा विषय संपला असताना आता 'भारतमाला यात्रा'मधील हैदराबाद-सुरत महामार्गासाठी जमीन संपादनाचा विषय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. याप्रश्नी गुरुवारी लाखलगावच्या शेतकऱ्यांनी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे.

या निवेदनात सातबारा उताऱ्यावर जिराईत जमीन म्हणून उल्लेख केलेला असून, प्रत्यक्षात ही जमीन बागायती असल्याचे म्हटले आहे. जमीन संपादन करताना त्याचा मोबदला हा जिराईत म्हणून मिळेल, अशी भीती या शेतकऱ्यांना आहे. जमीन देण्यास आमचा विरोध नाही. पण, जमिनीचा मोबदला हा बागायती म्हणून मिळावा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील लाखलगाव, ओढा, विंचूर सावळी, आडगाव येथील जमीन संपादित केली जाणार असल्याचे सांगत आपल्या मागण्याही पुढे केल्या. त्यामुळे जमीन संपादनाच्या वेळी हा विरोध तीव्र होणार असल्याचे संकेतही या भेटीत दिसले.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेती संपादनाचा विषय राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला प्रचंड विरोध झाला. मोठ्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला देत सरकारने ही जमीन ताब्यात घेतली होती. हा विषय अनेक महिने चर्चेत होता. पण, आता हा विषय संपला असताना या नवीन मार्गाचा विषय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

पुरावे ठरणार महत्त्वाचे

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या शेतकऱ्यांना बागायती क्षेत्र असल्याचे पुरावे गोळा करावे लागणार आहेत. त्यानंतरच सातबारावर त्यांच्या उताऱ्यात बदल होणार आहे. या महामार्गाची आतापर्यंत केवळ चर्चाच होती. पण, आता शेतकऱ्यांनी शिष्टमंडळ घेऊन दिलेल्या माहितीनंतर हा मार्गही चर्चेत आला आहे. त्यामुळे समृद्धीनंतर या महामार्गाचे भूसंपादन यंत्रणेची डोकेदुखी वाढविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images