Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिव्हिलमध्ये बनावट स्टॅम्प!

$
0
0

मनपा कर्मचाऱ्याचा उद्योग; जिल्हा शल्यचिकित्सकांकडून भांडाफोड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त सिव्हिल सर्जन यांच्यासाठी असलेले दोन बनावट रबरी स्टॅम्प महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याकडून जप्त करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्याने संशयिताचा भांडाफोड झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मंगेश साळवे असे या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. सिव्हिलमध्ये दाखल होणाऱ्या बेवारस मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने साळवे याच्याकडे सोपवले आहे. मात्र, या कामाबरोबर मंगेश काहीतरी अनधिकृत उद्योग करीत असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. जगदाळे यांना मिळाली होती. या प्रकरणाची सखोल माहिती घेतली असता त्यात मंगेश आपल्याकडील बनावट रबरी शिक्क्यांच्या आधारे विविध सर्टिफिकेट देण्याचे काम करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी (दि.१५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिव्हिल सर्जन डॉ. जगदाळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखील सैंदाणे, सिव्हील हॉस्पिटलचे प्रशासन विभागाचे व्ही. डी. पाटील, वैद्यकीय अधिकारी तसेच सुरक्षारक्षकांसमवेत सर्वांनी मृतदेह उत्तरीय तपासणी केंद्राकडे धाव घेतली. या ठिकाणी बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचाऱ्यास बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी या पथकाला एक बॅग आढळून आली. त्याबाबत चौकशी करण्यात आली असता ती मंगेशची असल्याचे समजले. या पथकाने बॅगची तपासणी केली असता त्यात सिव्हिल हॉस्पिटलचे दोन रबरी आणि बनावट सील स्टॅम्प सापडले. या पथकाने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्याने संबंधितावर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी दिलेत. हा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बनावट सर्टिफिकेटचा उद्योग

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजारपणाच्या रजा, अपंगत्वाचा दाखला यासह इतर काही महत्त्वाचे सर्टिफिकेट तयार केले जातात. अर्थात, यासाठी विविध तपासण्या पार पडतात. यानंतर सदर अर्ज सिव्हिल सर्जन अथवा अतिरिक्त सिव्हिल सर्जन यांच्याकडे पोहचतो. तिथे सही शिक्का झाल्यानंतर हे सर्टिफिकेट सरकारी कामांसाठी वापरले जाते. या शिक्क्यांनी सील स्टॅम्प म्हणतात. मंगेशकडे हेच शिक्के आढळल्याने बनावट सर्टिफिकेटचा उद्योग समोर आल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते आहे. हा उद्योग किती दिवसांपासून सुरू होता तसेच त्यात सिव्हिल हॉस्पिटलमधील कोणांचा संबंध आहे काय याचा शोध लागणे देखील महत्त्वाचे आहे.

बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार चौकशी केली असता मंगेश साळवेचा संबंध उघडकीस आला. त्याच्या बॅगेतून दोन रबरी स्टॅम्प हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात वाहनचोरटे सुसाट

$
0
0

पाच दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वाहनचोरीच्या घटनांनी वेग घेतला आहे. दररोज नवनवीन गुन्हे दाखल होत असून, वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते आहे. नुकत्याच वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या पाच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी सरकारवाडा, अंबड, मुंबई नाका आणि पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

पेठफाटा भागातील दीपाली पुंडलिक चौधरी (रा. म्हाडा बिल्डींग, एरंडवाडी) यांची प्लेझर (एमएच १५ सीयू १३१९) बुधवारी (दि. १३) रात्री त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास एएसआय वानखेडे करीत आहेत. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. तळेगाव (ता. इगतपुरी) येथील कुणाल चंद्रकांत साबळे हा तरुण मंगळवारी (दि.१२) कामानिमित्त शहरात आला होता. ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात त्याने आपली शाईन (एमएच१५ डीए २५७६) पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

अशोका मार्गावर वाहनचोरीची तिसरी घटना घडली. शिवरामनगर भागात राहणारे योगेश अंबादास शेलार याची ज्युपिटर (एमएच १५ जीक्यू ०४१६) सोमवारी (दि.११) रात्री अशोका मार्गावरील स्वरा डेंटल क्लिनिक येथे पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार ठाकूर करीत आहेत.

सिडकोमध्ये वाहनचोरीच्या दोन घटना घडल्या. सुनील तुकाराम कातकाडे (रा. दत्तमंदिराजवळ, मोरवाडी) यांची स्प्लेंडर (एमएच १५ एएल ४३३७) मंगळवारी (दि. १२) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. तसेच पाटीलनगर भागात राहणारे सूरज शिवदास शिरसाठ (रा. स्वामी समर्थ चौक) यांची होंडा शाईन (एमएच १५ इयू १९९१) रविवारी (दि. १७) दुर्गामाता मंदिरामागे पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार धरम व उघडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जाहिराती काढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि बस व इतर वाहनांवरील, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले शासकीय जाहिरातींचे फलक काढण्यात येऊन विकासकामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोनशिला व्यवस्थित झाकाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात निवडणूक कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंकज अशिया, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की आचारसंहिता काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियमानुसार कामकाज करावे. त्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्यासोबतच सोशल मीडियावरील उमेदवारांच्या जाहिरातींचे दर निश्चित करावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची पुरेशी व्यवस्था, निवडणूक कामकाजसंबंधीत प्रशिक्षण व्यवस्था, निवडणूक खर्चाचे नियोजन, जिल्हा निवडणूक संवाद आराखडा, निवडणूक काळातील वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रांवरील मतदानाची व्यवस्था, निवडणुकीसंबंधी संकेतस्थळ, तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देऊन नमूद विषयांचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

संशयितांवर गुन्हा; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा वाद ताजा असताना आता गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयितावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गुन्हा दाखल असून, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय लक्ष्मण खरात (रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला कॉलेजच्या मागे) असे पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. संजय खरातवर गंगापूर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी खरात गुरुवारी (दि.१४) सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिस स्टेशनला आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. जी. मोरे यांच्या दालनात त्याची चौकशी सुरू असताना हा प्रकार घडला. संशयित खरातला अटकेचे कारण समजावून सांगण्यात येत असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपात विनाकारक अटक करून तुम्ही मला त्रास देत असल्याचे सांगत त्याने पोलिस नाईक मनोहर नागरे यांना धक्का देऊन पाडले. यानंतर त्याने भिंतीवर जोर जोरात डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये धावपळ उडाली. पोलिस स्टेशनमध्ये इतर कर्मचाऱ्यांनी खरातला काबूत आणले आणि यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक मनोहर नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खरात विरूद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदर्शन रंगमंचावर‘परिवर्तन’चा कलाविष्कार

$
0
0

१७ मार्च रोजी पुण्यात सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

'परिवर्तन जळगाव' ही संस्था आपल्या प्रयोगशील प्रयोगांमुळे महाराष्ट्रभर सुपरिचित आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांनी 'परिवर्तन'ला कार्यक्रमाला सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे.

संपूर्ण मराठी भाषेला ज्यांच्या कवितांनी अंतर्मुख केले अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आणि गाण्यांचा कार्यक्रम 'अरे संसार संसार' याची परिवर्तन जळगाव संस्थेची निर्मिती केली आहे. आजवर या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात अनेक प्रयोग परिवर्तनतर्फे करण्यात आले आहेत. येत्या १७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी पुणे येथील सुदर्शन रंगमंच येथे याचे आयोजन केलेले आहे. 'अरे संसार संसार'या बहिणाबाईंच्या कवितेच्या कार्यक्रमात सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुलकर्णी, मंजुषा भिडे, अक्षय गजभिये, नारायण बावीस्कर आदींचा सहभाग असणार आहे. नारायण बाविस्कर दिग्दर्शित या संगीतमय कार्यक्रमाला रंगकर्मी शंभू पाटील यांचे निवेदन असणार आहे. निर्मिती प्रमुख होरिलसिंग राजपूत व वसंत गायकवाड हे आहेत.

या कार्यक्रमानंतर श्रीकांत देशमुख लिखित 'नली' या नाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. सध्या महाराष्ट्रभर आतापर्यंत २६ प्रयोग झाले आहेत. पुण्यातला हा पहिलाच प्रयोग असून, नली एकलनाट्याची मूळ संकल्पना व नाट्यरूपांतर शंभू पाटील यांची आहे. तर दिग्दर्शन योगेश पाटील यांचे आहे. सादरकर्ते हर्षल पाटील आहेत. खान्देशी बोली आणि संस्कृतीचे सादरीकरण परिवर्तनाच्या या दोन्ही कार्यक्रमातून सादर होणार आहे. या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या यांनी लिहिलेल्या 'पिढीजात' या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ लेखक संजय भास्कर जोशी, श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळशी वृंदावन पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुळशीसाठी अंगणात उभारलेले वृंदावन अंगावर पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगर भागात घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज भूषण बच्छाव (रा. पाण्याच्या टाकीजवळ, स्वामी विवेकानंदनगर) असे मृत बालकाचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी राज हा आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना ही घटना घडली. अंगणात खेळत असताना अचानक त्याच्या अंगावर सिमेंट काँक्रीटचे तुळशी वृंदावन कोसळले. या घटनेत राज वृंदावनाखाली दबला जाऊन गंभीर जखमी झाला. वडील भूषण बच्छाव यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. डोक्यास वर्मी मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे.

--

दुचाकी अपघातात

तरुणाचा मृत्यू

नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात तुपादेवी फाटा भागात झाला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुनील कासू केंग (वय ३०, रा. त्र्यंबकेश्वर) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र उमेश ढवळू वाघ (वय २२) हा गंभीर जखमी आहे. केंग आणि वाघ हे दोघे मित्र गुरुवारी (दि.१४) सायंकाळी दुचाकीवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला. उमेश वाघची प्रकृती चिंताजनक असून, त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे ५९ रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्च महिन्यात शहर परिसरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने कहर केला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ५९ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. अजूनही संशयितांचा आकडा वाढत असून, तो आताच पाचशेच्याही पार गेला आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालये स्वाइन फ्लू व डेंग्यूसह विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांनी फुल्ल असून, पेशंटच वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांकडून काळजी घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. मार्च महिना सुरू झाला असला तरी, दिवसा प्रचंड तापमान आणि रात्री थंड हवामानामुळे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ताप, सर्दी-पडसे, खोकला, डोकेदुखी आणि व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. डेंग्यू व स्वाइन फ्लूनेसुद्धा धुमाकूळ घातला आहे. महापालिकेकडून दरवर्षी आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून जनजागृती केली जात असली, तरी ती कागदावरच असल्याचे चित्र आहे.

जानेवारीपासून शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जानेवारीत शहरात डेंग्यूचे ७ रुग्ण आठळून आले होते. फेब्रुवारीत ४० रुग्ण आढळले. मार्च महिना संपण्यास काही दिवस बाकी असताना आतापर्यंत १२ रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारी महिन्यात शहरात स्वाइन फ्लूने तीन जणांचा बळी घेतला. त्यात तपोवनरोड, पवननगर, नाशिकरोड येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

..

घंटागाडीवरून जनजागृती

शहरात महापालिकेकडून याबाबत जनजागृती करण्यात येत असून, त्यासाठी घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती या माध्यामातून देण्यात येत आहे. सध्या नाशिक पश्चिम व नाशिकरोड येथील घंटागाड्यावर जनजागृती करणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवलावासीयांच्या आग्रहास मान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ कुटुंबातीलच एक उमेदवार असेल असे यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, येवल्यातील मतदारांनी तुम्ही येथूनच लढा, असा आग्रह धरल्याने आणि समीर भुजबळ यांना खासदारकीचा अनुभव असल्याने त्यांच्यासाठीच प्रयत्न केल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ यांना, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळ फार्म येथे आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, की समीर भुजबळ यांना खासदारकीचा अनुभव आहे. मतदारसंघातील गावागावांत त्यांचे संबंध जोडले गेले आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांचे नाव निश्चित केले आहे. दोन महिन्यांपासूनच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने निश्चितच या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवारच विजयी होतील. सन २००९ ते २०१४ या काळात नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास झाला. मात्र, त्यानंतर नाशिकची विकासकामे अन्यत्र पळविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिकचे प्रकल्प पळविल्यामुळे नागपूरचाच विकास होत असल्याचेही ते म्हणाले.

--

दिंडोरीतील बंडखोरीवर लक्ष

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांनी मागील पाच वर्षांत पक्षाचे खूप काम केले. मात्र, त्यांना घरातूनच विरोध असल्याने त्यांच्याऐवजी महालेंना उमेदवारी दिली आहे. दिंडोरीतून बंडखोरी होणार नाही याकडे आपले लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीची चर्चा झाली होती. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने ती आघाडी झाली नाही. मात्र सध्या सर्वांनी एकत्र येण्याचे मत त्यांनी मांडले. राज ठाकरे निश्चितच आमच्या बाजूने असल्याचेही भुजबळांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणगौरव वाङमयीन निर्मितीचा

$
0
0

\B'सावाना'च्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण

\B

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या १७९ व्या वार्षिक समारंभानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध वाङमयीन पुरस्कारांचे वितरण मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, किशोर पाठक यांची उपस्थिती होती. संस्थेच्या आवारातील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी ललितेतर ग्रंथासाठी देण्यात येणारा डॉ. वि. म. गोगटे स्मृती पुरस्कार मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाचे निर्माते रविराज गंधे यांना त्यांच्या 'माध्यमरंग' या पुस्तकासाठी देण्यात आला. पु. ना. पंडित पुरस्कार अंबरनाथ येथील डॉ. किरण येले यांनी लिहिलेल्या 'मोराची बायको' या लघुकथा संग्रहास, उमेदीने लेखन करणाऱ्यांना डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार दिनकर कुटे यांना, अशोक देवदत्त टिळक स्मृती पुरस्कार येवला येथील प्रा. गो. तु. पाटील यांनी लिहिलेल्या 'ओल अंतरीचे' या आत्मचरित्राला, मु. ब. यंदे स्मृती पुरस्कार नाशिक येथील संत साहित्याचे अभ्यास प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी लिहिलेल्या 'संस्कारांचा अमृतकलश' या सामाजिक ग्रंथाला, कै. धनंजय कुलकर्णी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या 'रेडटेप' कादंबरीला, ग. वि. अकोलकर स्मृती पुरस्कार अकोले येथील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांना 'माझी शिक्षण परिक्रमा' या पुस्तकासाठी देण्यात आला. पाच हजार रूपये, धनादेश स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

वाङमयीन पुरस्कार निवड समितीपैकी प्रा. अनंत येवलेकर, डॉ. सुनील कुटे, प्रकाश वैद्य, प्रा. डॉ. भास्कर ढोके, विवेक उगलमुगले यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक केले. वसंत खैरनार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अॅड. भानुदास शौचे यांनी अहवालवाचन केले तर प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश नातू यांनी आभार मानले.

माझी जडणघडण ज्या वाचनालयातून झाली त्यांच्यावतीने देण्यात येणारा पुरस्कार मला मिळतोय, त्यामुळे मी भारावून गेलो आहे.

- यशवंतराव पाटील, पुरस्कारार्थी

मला प. रा. चांदे व मो. ग. तपस्वी यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्यांच्या योगदानामुळे माझी जडणघडण झाली आहे.

- रविराज गंधे, पुरस्कारार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन पूल टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर नाशिकमधील ब्रिटिशकालीन पुलांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील तीन ब्रिटिशकालीन पुलांचे महापालिकेने गेल्या अनेक वर्षांत स्ट्रक्चरल ऑडिटच केले नसल्याची बाब समोर आली आहे.

कोणताही पूल तयार झाल्याच्या तीस वर्षांनंतर त्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे असते. तसा शासकीय नियमदेखील आहे. मात्र, या नियमाला खुद्द महापालिकेनेच पायदळी तुडवले आहे. शहरातील अहिल्यादेवी होळकर पूल, वालदेवी नदीवरील पूल आणि आडगावमध्ये प्रवेश करताना लागणारा पूल असे तीन पूल महापालिकेच्या हद्दीत येतात. त्यापैकी आडगाव येथील पूल पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने तयार केला आहे. मात्र, शहराच्या मुख्य भागात असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलाचे व देवळालीगावातील वालदेवी नदीवर बांधलेल्या पुलाचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या दोन्ही पुलांना समांतर पूल बांधून तयार आहेत. ब्रिटिश सरकरने महापालिकेला अहिल्यादेवी होळकर पुलाबाबत स्मरणपत्रही पाठविलेले आहे. सुनील खुने शहर अभियंता असताना या पुलांचे ऑडिट करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, अद्याप या फायलींना हात लागलेला नाही. गेल्या वर्षी हा विषय पुन्हा चर्चेला आला होता. मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही फाइल बाजूला सारल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कामाचे टेंडर निघाले असून, त्याची मुदत जानेवारी २०१९ होती. मात्र, ज्यांना काम दिले आहे त्यांनी अद्याप याबाबतचा अहवाल दिलेला नाही.

--

डागडुजीकडेही दुर्लक्ष

होळकर पुलाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असतानाच देवळालीगावातील पुलाबाबतही तशीच स्थिती आहे. या ठिकाणी सिंहस्थाच्या काळात नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, जुन्या पुलाची साधी डागडुजी करण्याचे कामही महापालिकेने केले नाही. या पुलाच्या खालच्या भागातदेखील मोठ्या प्रमाणात वनस्पती उगवल्या आहेत. खांबांमध्ये झाडे उगवली आहेत. मात्र, अद्याप या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटच झालेले नाही. महापालिकेने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे व पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरण उद्दिष्टे साध्य

$
0
0

नाशिक : केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्टे ठरवून दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने मोहीम राबवित उद्दिष्टापेक्षा जास्त बालकांना लसीकरण केले आहे. महापालिकेला १ लाख ८२ हजार ५९६ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्टे देण्यात आले होते. हे उद्दिष्टे महापालिकेने साध्य केले. शहरात एकूण १ लाख ८४ हजार ३९६ बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण झाले असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंनदमयी छंदाचे उलगडले कवडसे

$
0
0

'अक्षरमानव'तर्फे अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षरमानव नाशिक शाखेच्या वतीने 'मी, माझा छंद आणि आनंद' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विरंगुळा म्हणून कित्येकजण एखादा तरी छंद जोपासतात, छंद असलेली व्यक्ती या वेडापायी कसेही आणि कुठेही पोहोचतात, त्यासाठी काय उलटसुलट प्रयोग करतात हे जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्षर मानवच्या शहर उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी अक्षर मानव संस्थेची ओळख करून दिली व शहर अध्यक्षा मेघा मनोहर यांनी वर्षभरातील व महाराष्ट्र भर घेत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसाद देशपांडे यांनी ओळख करून देताना आजपर्यंतचे जीवन उलगडून सांगितले. छंदाची सुरुवात कशी झाली हे सांगताना ते म्हणाले, की लहानपणी कुसुमाग्रजांची पुस्तके वाचून झाल्यावर त्यांना अभिप्राय लिहायचे मग त्यांची उत्तरे यायची व खाली सही असायची आणि ती सही पाहून ऑटोग्राफ गोळा करायचा छंद जुळला. हळू हळू इतर लेखकांच्या सह्या गोळा करू लागले, कधी लोक सह्या देत, कधी देत नव्हते, खूप पाठपुरावा करून, रांगेत उभे राहून, सहनशक्ती प्रबळ करून ऑटोग्राफ घेण्याचा छंद सुटेनास झाला आणि त्यात आनंद मिळू लागला, असे ते म्हणाले. पुढे जाऊन कलाकारांच्या व इतर क्षेत्रातील व्यक्तीचे ऑटोग्राफ घेऊ लागले. असा निरंतर प्रवास सुरू असताना अनेकदा नकार मिळाले. पण न खचता मार्ग काढत हा छंद आजपर्यंत सुरूच ठेवला. सध्याचे दिग्गज व्यक्तिमत्व शरद पवार यांचीदेखील सही घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

कार्यक्रमाला वैशाली मुठे, स्नेहा आपटे, वासंती देशपांडे, उर्मिला ठाकूर, साहेबराव देशपांडे, सुलभा देशपांडे, सतीश जोशी, डॉ. मुरलीधर भावसार, विनोद बोधले, रवींद्र वामनाचार्य, नितीन केकाण, सुधीर कुलकर्णी, भाग्यश्री गुजर, प्रांजल आणि स्वरा सोनावणे, अनिता सोनवणे यांनी छंदावरील गप्पांमध्ये भाग घेतला. संस्थेचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडारत्न शिक्षक पुरस्कार वितरण आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कै. के.एन.डी.बहुउद्देशीय मंडळ आणि क्रीडा साधना यांच्या वतीने अंबड पोलिस स्टेशनजवळील महेश भवन येथे उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न शिक्षक पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. १६) सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे.

कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकमधील ७४ तालुक्यांमधील उत्कृष्ट कार्य करणारे १०४ क्रीडा शिक्षक आणि २६ क्रीडा प्रशिक्षक यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र इंजिनीरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) चे कार्यकारी अभियंता संतोष भोसले, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी मुख्याध्यापक तथा कुस्ती संघटक रवींद्र मोरे, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजी निरगुडे आदी मान्यवरांच्या हस्ते या गुणवत्ताधारक क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक याना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नाशिकच्या क्रीडाप्रेमीनी आणि हितचिंतकानी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजक अशोक दुधारे, दीपक निकम, आनंद खरे, नितीन हिंगमीरे आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेत तिघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गुरूवारी (दि.१४) वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्या. मृतांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर, नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दत्तनगर भागात राहणाऱ्या पोपट सुखदेव भोये (वय ३५) या तरुणाने गुरुवारी (दि. १४) विल्होळी शिवारातील एकनाथ भावनाथ यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. मृत्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

दुसरी घटना जेलरोड भागात उघडकीस आली. संतोष अशोक निकम (वय ४७, रा.ओम रेसि. पवारवाडी, मोरेमळा) यांनी गुरुवारी (दि. १४) आपल्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास एएसआय कदम करीत आहेत. तर पंकज राजू माने (वय २०, रा. शनि मंदिरामागे, रामगार्डन) या तरुणाने गुरुवारी (दि. १४) अज्ञात कारणातून आपल्या घरातील छताला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार ढुमसे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐनवेळी दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. १७) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा करण्याचा मुहूर्त शोधल्याची चर्चा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणाऱ्या डॉ. पवार यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीचे सर्व दरवाजे बंद झाल्याने त्यांना उमेदवारी करण्यासाठी भाजपचे दार ठोठवावे लागले आहे. त्या धर्तीवर संपूर्ण दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याशी त्यांनी चर्चा सुरू केली असून, गुरुवारी सायंकाळी कळवण येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, मार्गदर्शक, कार्यकर्ते व समर्थक यांची तातडीची बैठक घेत त्यांनी सर्वांची मते जाणून घेतली. या बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. पवार जो निर्णय घेतील तो मान्य राहील, कुठल्याही पक्षाची उमेदवारी केली, तरी डॉ. पवारांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असल्याने त्याच दिवशी डॉ. भारती पवार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे.

--

'माकप'चीही नाराजी

राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतर सर्वांत सुरक्षित समजला जाणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ डॉ. पवार यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाने पुन्हा धोक्यात आला आहे. डॉ. पवार या दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा असून, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या व राष्ट्रवादीच्या विद्यमान प्रदेश उपाध्यक्षा आहेत. पक्ष पातळीवर मोठे काम उभे करूनही उमेदवारी डावलली गेल्याने त्यांनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडणार आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होऊ शकतो. पक्ष पातळीवर खासदार चव्हाण यांच्याप्रति नाराजी असल्याने डॉ. पवार यांचा भाजपप्रवेश व दिंडोरी लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने महालेंचे नाव जाहीर करून माकपचीही नाराजी ओढावून घेतली आहे.

--

पक्षात ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्यांचा विचार उमेदवारीसाठी होत असल्याने आपण अस्वस्थ असून, लवकरच योग्य निर्णय घेऊ. त्यासाठी विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांची मत जाणून घेत आहे.

-डॉ. भारती पवार, प्रदेश उपाध्यक्षा, राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारावीच्या ‘आयटी’ परीक्षेत गोंधळ

$
0
0

पिंपळनेरला परीक्षेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १६) इयत्ता बारावीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)चा पेपर होता. सकाळी पेपर असताना अचानक इंटरनेट सेवा बंद झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. अखरे पर्यवेक्षकांनी तीन दिवसांनंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात येण्याचे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

साक्री तालुक्यातील पिंपळनेरला शनिवारी (दि. १६) बारावीच्या ‘आयटी’ या विषयाची परीक्षा होती. या परीक्षेत नेट अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पिंपळनेर-नवापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जेसीबी यंत्रचालकाकडून इंटरनेटसाठरीच्या भूमिगत वायर तुटल्याने ही नेट सेवा खंडित झाली होती. त्यामुळे अचानक नेट पुरवठा खंडित झाला होता. या वेळी संतप्त झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत आपला निषेध नोंदविला. शेवटी विद्यालयातील परीक्षा पर्यवेक्षक एस. एस. पवार यांनी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर पुन्हा तीन दिवसांनी घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेत परिसरातील गोंधळ थांबला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला कडाडला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक मंदावल्याने पालेभाज्यांसह फळभाज्या महागल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. काही फळभाज्यांचेही दर किलोमागे १० रुपयांनी वाढले आहेत. आगामी काळात भाजीपाल्याचे दर आणखी कडाडणार असून, गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत भाजीपाल्याची बंफर आवक होत होती. यामुळे सर्वसामान्यांना कमी पैशात मुबलक आणि ताजा भाजीपाला मिळत होता. मात्र आठच दिवसांत आवक मंदावल्याने भाजीपाला कडाडला आहे. यामुळे मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांचे दर दुप्प्टीवर गेले आहेत. गेल्या आठवड्यात कोथिंबीरची जुडी ५ ते ७ रुपयांपर्यंत मिळत होती. तिचे दर आता २० ते २५ रुपये जुडीपर्यंत पोहोचले आहेत. मेथीच्या जुडीचे दरही १० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. शेपू, पालक आणि कांदापातच्या जुडीचे दर १० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बटाटे, ढोबळी मिरची व शेवग्याचे दर मात्र कमी झाले आहेत. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी दिवसात भाजीपाला आणखी कडाडण्याची शक्यता आहे.

गवार, भेंडीला 'भाव'

गवार आणि भेंडी बाजारात 'भाव' खात आहेत. गवारचे दर गेल्या महिन्यापासून १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्यात आणखी २० रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरातही २० रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडी ८० किलोने विक्री होत आहे. आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे विक्रेत्याने सांगितले.

इतर फळभाज्याही तेजीत

कारले, गिलके व दोडक्याचा किलोचा दर ६० रुपये झाला आहे. भोपळ्याचेही दर २० रुपये प्रतिनग झाला आहे. काकडी व टोमॅटो दर स्थिर आहेत. मिरची, वाटाणा, कोबी, फ्लॉवरचे दरही वाढले आहेत. मिरची व वाटाण्याच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे जुडीचे दर (रुपयांत)

मेथी - १०

कोथिंबीर - २० ते २५

कांदापात - १०

शेपू - १०

पालक - १०

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

गवार - १२०

भेंडी - ८०

वाटाणा - ४०

टोमॅटो - २०

काकडी - ३०

कारले - ६०

गिलके - ६०

दोडके - ६०

मिरची - ६०

वॉल - २०

वांगे - ४०

ढोबळी मिरची - ४०

शेवगा - ६०

बटाटे - १५

कोबी - २० रु. गड्डा

फ्लॉवर - ३० रु. गड्डा

भोपळा - २० रु. नग

मुळा - २० रु.ला ८

फळभाज्या .........आवक (क्विटंलमध्ये)

टोमॅटो ..............५५०

वांगी................१८५

फ्लॉवर.............२२०

कोबी...............२२७

ढोबळी मिरची.....१०२

दुधीभोपळा.........४३१

कारली .............२७

दोडका..............२०

गिलके...............२३

काकडी.............२४२

पालेभाज्यांची आवक

पालेभाजी .................आवक (जुडी)

कोथिंबीर ..................५४ हजार ४००

मेथी.........................७ हजार

शेपू.........................१४ हजार

कांदापात..................१४ हजार ३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरमुक्तीसाठी अमेरिकेतून निधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतीसाठी पूरक उत्पादनांचा अमेरिकेत उद्योग उभारणारे वसंत राठी यांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकर मुक्ती अभियानासाठी पावणे चार लाख रुपयांचा निधी दिला आहे. यातून पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त कोळुष्टी गावाचा पाणीप्रश्न सोडविला जाणार आहे, अशी माहिती फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.

मूळचे येवला येथील राठी कुटुंबातील वसंत आणि किशोर राठी यांचा अॅडव्हान्स एंझाइम या नावाने उद्योग आहे. या उद्योगाचे जाळे युरोप-अमेरिकेत उभारण्यासाठी वसंत राठी हे अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत तर किशोर राठी स्थानिक कामकाज बघतात. यापूर्वी सक्रिय योगदान दिलेल्या अमेरिकेतील अनिवासी भारतीयांकडून त्यांना आपल्या जन्मस्थळी आदिवासी गावांना टँकरमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने उभारलेल्या कार्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी फोरमच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली आणि त्वरित एका गावासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याची तयारी दर्शवली.

सोशल फोरमच्या टीमने पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून कोळुष्टी गाव निश्चित केले. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना आखल्या. जबाबदाऱ्या निश्चित करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनाही त्यांचा सहभाग देण्यासाठी प्रोत्साहित केले. कामासाठी लागणाऱ्या उर्वरित निधीचा राठी यांना प्रस्ताव देण्यात आला. अॅडव्हान्स एंझाइम कंपनीने केवळ ३ आठवड्यात निधी मंजूर केला आणि ३ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश फोरमला प्राप्त झाला. या निधीतून पुढील एका महिन्यात कोळुष्टीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे फोरमचे सदस्य डॉ. पंकज भदाणे यांनी सांगितले. प्रकल्प पूर्णत्वाची जबाबदारी इंजिनीअर प्रशांत बच्छाव घेणार आहेत तर भविष्यात या योजनेच्या वापरात काहीही अडचण येणार नाही याची जबाबदारी संदीप बत्तासे आणि रामदास शिंदे यांनी घेतली आहे. या दातृत्वाबद्दल राठी कुटुंबीय आणि अॅडव्हान्स एंझाइम कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अमेरिकेत योगेश कासट यांच्याकडून फोरमच्या कार्याची माहिती मिळाली. मध्यंतरात भारतात आलो असताना प्रमोद गायकवाड यांना भेटलो. सोशल मीडियाचा योग्य वापर करून चालू असलेले हे काम बघून मी अतिशय प्रभावित झालो. एका गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी फोरमला आर्थिक सहकार्य केले.

- वसंत राठी, अध्यक्ष, अॅडव्हान्स एंझाइम

नाशिक जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी परदेशातील बांधव पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. नाशिकच्या स्थानिक कंपन्यांनीही आपल्या सीएसआर योजनांतून फोरमला सहकार्य केल्यास अनेक गावांना पिण्याचे पाणी देता येईल.

- प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फोरम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

१७ मार्च

जयदत्त होळकर

संचालक, लासलगाव कृउबा

सावळीराम तिदमे

लेखक

समीर बोंदार्डे

ज्येष्ठ छायाचित्रकार

अविनाश गायकवाड

उद्योजक

वैजयंती डांगे

लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांना ‘नो आयडिया’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\B'आयडिया'ची सेवा शनिवारी चांगलीच फसली. यामुळे मोबाइलच्या भरवशावर असलेल्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. केवळ तांत्रिक अडचणींमुळे सकाळी दहाच्या सुमारास फेल झालेले नेटवर्क तीन ते साडेतीन तासांनंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झाले. त्यानंतर आयडिया ग्राहकांचा एकमेकांसोबत संपर्क सुरू झाला.

रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या मोबाइलची विश्वासार्हता एवढी वाढलीय की, प्रत्येक गोष्ट अलीकडे मोबाइलच्या भरवश्यावर पुढे ढकलण्याची सवय अंगवळणी पडलीय. प्रत्येक क्षणाला सोबत असणारे नेटवर्क नेमक्या महत्त्वाच्या वेळेला डाऊन झाले की तारांबळ उडते. याचा अनुभव शनिवारी (१६ मार्च) सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत नाशिकच्या आयडिया ग्राहकांनी घेतला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. फोन कॉल्सची सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने 'नो आयडिया सर जी' म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली. लँडलाइन अथवा अन्य नेटवर्कवरून आयडियाच्या क्रमांकावर फोन केल्यावर 'तुम्ही डायल केलेल्या नेटवर्कमध्ये कंजेशन असल्यामुळे आपला कॉल जोडला जाऊ शकत नाही', असे सांगण्यात येत होते. तर, आयडिच्या क्रमांकावरून इतर कंपन्यांच्या क्रमांकावर संपर्क होत नव्हता. त्याचे पडसाद व्हॉट्सअॅप व फेसबुकवरही पहायला मिळाले. कॉल्सची सुविधा ठप्प झाल्याने ग्राहकांनी त्या संबंधित पोस्ट शेअर केल्या. दुपारी दीड वाजेच्या दरम्यान कॉल्स जोडले जाऊ लागले. त्यानंतर काही तरी चुकल्याच्या मानसिकतेत असलेले ग्राहकही 'रेंज'मध्ये आले.

...

\Bम्हणे, रिचार्ज संपला...

\B आयडिया कंपनीच्या ग्राहकांचे कॉल्स जोडले जात नसल्याने ग्राहकांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावेळी 'तुमचा रिचार्ज संपला असेल किंवा तुम्ही बिल उशिराने भरले असेल. नेमका काय तांत्रिक गोंधळ आहे तो बघून तुमची सेवा पूर्ववत करतो', असे उत्तर ग्राहकांना देण्यात आले. काही ग्राहकांनी संपूर्ण नाशिकमध्येच सेवा ठप्प असल्याचे सांगितल्यावर 'तांत्रिक अडचण आहे. काही तासांत सेवा सुरळीत होईल', असे आयडियातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images