म. टा. वृत्तसेवा, मालेगाव शहरातील कॅम्प परिसरातील फलटण मशिदीत शनिवारी दुपारी एक तरुण चोरीच्या इराद्याने शिरला. मात्र, मशिदीत साफसफाई करणाऱ्या इक्बाल अहमद अब्दुल हमीद (वय ५०, रा. मालेगाव) यांनी प्रसंगावधान दाखवत त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अश्पाक अहमद निहाल अहमद अन्सारी (रा. कुसुंबा रोड, मालेगाव) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. इक्बाल यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर परदेशी यांनी दिली. इक्बाल हे दुपारी मशिदीची वरच्या मजल्याची साफसफाई करीत होते. मशिदीच्या गेटमध्ये आतल्या बाजूला भिंतीला लावलेली दान पेटी अज्ञात व्यक्ती तोडून पैसे काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच तेथे जाऊन संशयित चोरट्यास पकडून धरले आणि आरडाओरडा केला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्याची झडती घेण्यात आल. त्याने अश्पाक अहमद निहाल अहमद अन्सारी (रा. कुसुंबा रोड मालेगाव) असे स्वत:चे नाव सांगितले. त्याच्याकडून दानपेटीतील २९० रुपये जप्त करण्यात आले. कॅम्प पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट