Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

$
0
0
शहरात आज, शनिवारी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नाश‌िकमध्ये येणार आहेत. शहरात त्यांचे दुपारी २ वाजता आगमन होईल.

पाणीवापराची शिस्त लावा

$
0
0
‘आज आपण ज्याप्रमाणे आर्थिक शिस्त लावून घेतली आहे, त्याचप्रमाणे पाणी वापराचीही शिस्त लावून घ्या’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पंचवटीत प्रीपेड रिक्षा?

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून शहरात प्रीपेड रिक्षासेवा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच पंचवटी परिसरातील रामकुंड भागात प्रीपेड सेवा सुरू करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने गांभिर्याने विचार सुरू केला आहे.

कांदाप्रश्नी आयातीचा तोडगा

$
0
0
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याने चीन आणि पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नाशकात राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पाडते!

$
0
0
‘नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला पाडण्यात कुणाचीच हिंमत नाही, इथे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पाडते’, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना टोला हाणला.

धरणग्रस्तांना रोख मोबदला

$
0
0
शेतक-यांना जमिनीच्या मोबदल्यात रोख रक्कमेचे धनादेश देण्यात येत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनंदिन भत्ता

$
0
0
महसूल विभागातील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यात उगारल्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काम ठप्प होणे स्वाभाविक आहे.

समर्थ महाराज यांचे देहावसान

$
0
0
ओम गुरूदेव परिवारातील ज्येष्ठ संत समर्थ महाराज यांचे मंगळवारी दीर्घ आजारपणामुळे देहावसान झाले. २५ ऑगस्टरोजी औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्समध्ये त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सत्संगाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिक्षक ते पीएसआय

$
0
0
मोठेपणी काय बनायचं ? या प्रश्नाचं उत्तर शालेय वयात उत्साहाच्या भरात अन् स्वप्नाळू मानस‌िकतेतून प्रत्येक जण देतो. मात्र, आपण त्या वयात बघ‌ितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारे अन् परिस्थ‌ितीच्या माथ्यावर पावलं रोवून ते सत्यात उतरव‌िणारे लोक अपवादात्मक असतात. कविता ठोणगे हेही या अपवादात्मक लोकांमधलं नाव.

उपवासातही खा पोटभर !

$
0
0
श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रत वैकल्ये आणि उपवासाचा महिना. त्यामुळे या महिन्यात उपवासाच्या पदार्थांचीही मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. नाशिककरांची खवय्येगिरी लक्षात घेऊन साबूदाणा वड्यापासून बटाटा जिलेबीपर्यंत अनेक उपवासाचे पदार्थ नाशिककरांच्या श्रावणातील आनंदात भर घातली आहेत.

नाशिक पालिका हद्दवाढीला फाटा

$
0
0
नाशिक महापालिका क्षेत्राचा विस्तार करण्याऐवजी सध्याच्या क्षेत्रातच विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे महापालिका हद्दवाढीचा वाजविला जाणारा बिगुल निरर्थक असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

महसूलचे काम ठप्प

$
0
0
महसूल विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर संप सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या दोन्ही वर्गाची कामे करावी लागत आहेत.

बॉश चार दिवस बंद

$
0
0
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून महिंद्रानंतर बॉश कंपनीनेही उत्पादन बंदचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून रविवारपर्यंत (१५ ते १८ ऑगस्ट) म्हणजेच एकूण चार दिवस बॉश मधील उत्पादन प्रक्रिया बंद राहणार आहे.

वाडीव-हेत २ महिन्यांत अखंडित वीज

$
0
0
वाडीव-हे येथील विद्युत उपकेंद्रात काही उपकरणांमध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन कृषी, घरगुती आणि औद्योगिक वसाहतीतील पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन वीज वितरण कंपनीचे चीफ इंजिनीअर के. व्ही. अजनाळकर यांनी दिले आहे.

अभ्यासक्रम बदलामागे ग्लोबल उद्दिष्ट्ये

$
0
0
पुणे विद्यापीठाने व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे जागतिक दर्जाच्या संस्थाही अभ्यासक्रमात बदल करीत आहेत.

महासत्ता होण्याचा हव्यास कशाला?

$
0
0
अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन हा संरक्षण, विजयाचा दिन म्हणून साजरा केला जातो. अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांचा स्वातंत्र्यदिनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा नाही.

कॉलेजेसचीही पटपडताळणी करा

$
0
0
प्रवेशाअभावी राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील ४० हजार तर मॅनेजमेंट कॉलेजमध्येही हजारो जागा रिक्त आहेत. ही बाब धक्कादायक असल्याचे सांगत शाळेतील पटपडताळणीप्रमाणे कॉलेजेसचीही पटपडताळणी करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

भविष्यात काळजी घ्यावी लागेल

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग व मॅनेजमेंट शाखांमधील हजारो जागा रिक्त असल्याचे मान्य करत ही परिस्थिती सुधारण्यासाठी काळजी घ्यावी लागेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.

लवकरच सर्वमान्य तोडगा काढू

$
0
0
दोन सरकारी शैक्षणिक संस्थांच्या शिगेला पोहोचलेल्या वादावर लवकरच सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. शिक्षण बाजारीकरण विरोधी मं‌च आणि छात्रभारती या संघटनांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली.

पोषण आहार,मुख्याध्यापकांचा बहिष्कार

$
0
0
मुख्याध्यापकांवर लादली जाणारी शालेय पोषण आहाराची जबाबदारी ही अतिरिक्त असल्याच्या मतावर मुख्याध्यापक संघाचे एकमत झाले. शालेय पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेला मुख्याध्यापकांचा विरोध नाहीच.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images