Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवसेना हा रस्त्यावरचा पब्लिक फोन

$
0
0
शिवसेनेची अवस्था रस्त्यावरल्या पब्लिक टेलिफोनसारखी झाली आहे. या फोनमध्ये पैसे टाकल्याशिवाय ‘मातोश्री’वरचा संपर्कच होत नाही,’ असा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी शिवसेनेवर चढवला.

एमआयडीसीत लवकरच विकासकामे

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे २८ कोटी रुपये खर्चून विविध विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी आयमाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. ही कामे येत्या काही दिवसांतच सुरू होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयमा फेस्ट २२ फेब्रुवारीला

$
0
0
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने (आयमा) २२ फेब्रुवारीला आयमा फेस्ट २०१३चे आयोजन करण्यात आले आहे. आयमाच्या सर्व सभासदांसाठी दरवर्षी होणारा हा फेस्टिव्हल आहे.

पाणी चोरी; तरी कपातीची शिरजोरी

$
0
0
महापालिका दर महिन्याला ३८० दशलक्ष घनफूट पिण्याचे पाणी उचलत असली तरी पाणीपुरवठा विभागाच्या बिलिंगनुसार केवळ १३२ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी दरमहा नाशिककरांसाठी खर्च होतो.

शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आज मोर्चा

$
0
0
रासबिहारी शाळेने १३ हजार रुपयांनी वाढवलेली फी शिक्षण उपसंचालकांनी केवळ ५ हजारांनी कमी केल्याच्या निषेधार्थ शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचच्या माध्यमातून पालकांनी आज मोर्चाचे आयोजन केले आहे.

कानपिचक्या देत पक्षप्रवेशाची दीक्षा

$
0
0
'काम करताना एकमेकांचे पाय खेचू नका, पाय खेचणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करू' यासह 'तिथल्या कामापेक्षा इथल्या कामाची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे भांडू नका, एकोप्याने काम करा', एरवी पक्षांतर्गत बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या या कानपिचक्या गुरुवारी जाहीर व्यासपीठावरून देण्यात आल्या.

‘व्हीआयपी’साठी शांततेत मतदान

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी एम्प्लॉइज युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी शांततेत मतदान झाले. संध्याकाळपर्यंत मतदानांची प्रक्रिया चालल्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांना मिळणार परिपूर्ण समुपदेशन

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना यंदा परिपूर्ण समुपदेशन मिळणार आहे.

नाशिकच्या उद्योगांना कॅनडात संधी

$
0
0
भारतीय उद्योगांनी गुणवत्ता आणि उत्पादनाकडे जातीने लक्ष दिल्यास विविध उत्पादनांची दोन ते अडीच कोटी अमेरिकन डॉलरची निर्यात कॅनडामध्ये होऊ शकते. त्यामुळे कॅनडात निर्यातीस भरपूर वाव असल्याची माहिती आन्द्रे हॅव इन्टरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष अजय त्रिपाठी यांनी दिली.

मराठी सिनेमा मार्केटिंगमध्ये कमीच

$
0
0
‘‘हिंदी सिनेमा बनविण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च होत असतील तर त्याचे मार्केटिंग करण्यासाठी तेवढीच रक्कम बाजूला ठेवली जाते. मराठी सिनेमा मात्र कधीकाळी पाच कोटी रुपयांत तयार झाला तरीही मार्केटिंगसाठी केवळ पाच लाख रुपये दिले जातील. मराठी सिनेमा मार्केटिंगमध्ये कमी पडत असल्यानेच मागे राहिला आहे’’, या शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठी चित्रपट निर्मात्यांच्या वर्मावर बोट ठेवले.

मूल्यांच्या जपवणुकीतून सुधारणा

$
0
0
विज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड आहे. सध्या सुरू असणारे युग हे औद्योगिकरणाचे आहे. या युगातही मानवी नीतीमूल्यांची जपवणूक योग्य पद्धतीने केल्यास शाश्वत विकास साधला जाणे शक्य आहे, असे प्रतिपादन विख्यात व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केले.

घरात घुसून दोघांनी महिलेला लुटले

$
0
0
नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच स्वामी समर्थ चौक परिसरातील घरात शिरलेल्या दोघा भामट्यांनी महिलेचे हातपाय बांधून १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे दागिने लुटून नेण्याची घटना गंगापूररोड भागात घडली.

जुंदाल खटल्याची सुनावणी सुरू

$
0
0
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या संशयित दहशतवादी अबू जुंदालविरोधातील खटल्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही खटल्यातील पहिलीच सुनावणी होती.

साक्रीतले पाणी आले धुळ्यासाठी

$
0
0
सुमारे पाच लाख धुळेवासीयांची तहान भागविण्यासाठी आरक्षित केलेले साक्री तालुक्यातील तीन धरणांतील पाणी अक्कलपाडा धरणापर्यंत येऊन पोहचले आहे. साक्री तालुक्यातील लाटीपाडा, मालनगाव आणि जामखेली धरणातील सुमारे १०६० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते.

हा खेळ चोरट्यांचा

$
0
0
अगदी पारखून आणि चार वेळा विचार करून एखादी वस्तू घेणारे सर्वसामान्य गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच मनस्थितीत असल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. तुमच्या हातातील नोटा बनावट आहेत, असे सांगणाऱ्या अनोळखीच्या हातात पैशांचे बंडल सोपविणारे तसेच पाणी मागण्याचा बहाणा करणाऱ्या अनोळखी महिलेला घरात प्रवेश देवून तिच्यावर विश्वास दर्शविणाऱ्या घटना हे त्याचेच द्योतक आहे.

एमआयडीसीचे 'उद्योगी' भवन

$
0
0
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांशी निगडीत विविध प्रकारच्या सरकारी कार्यालयांचे एकत्रित संकुल म्हणून नाशकात उद्योग भवन उभे राहिले आहे. या भवनाची उभारणी करून त्याची खुशाली वाहणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा नाकर्तेपणा मात्र गेल्या दहा वर्षांपासून चव्हाट्यावर आला आहे. याबाबत उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी त्यातून या भवनाचा आणि त्यातील कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटलेला नाही.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

$
0
0
फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आडगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. पोलिसांनी पतीला अटक केली असून कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली.

संप शांततेत होऊ द्या!

$
0
0
अत्यावश्यक सेवा वगळता संप शांततेत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा, असे आवाहन कामगार उपायुक्त रविंद्र जाधव यांनी केले आहे. येत्या २१ आणि २२ फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशकातील कामगार संघटना आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कामगार उपायुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

१०-१२वीच्या उपद्रवी केंद्रांवर नजर

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांवर काटेकोर नजर ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना ‌दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेसाठीच्या ५६ उपद्रवी केंद्रांच्या नियोजनासांठी शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष नियोजन करावे लागणार आहे. यामध्ये दहावीची ३८ तर बारावीची १८ केंद्र उपद्रवी आहेत.

कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम

$
0
0
उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी अद्ययावत अभ्यासक्रम तयार होणार आहे. त्यासाठी उद्योगांचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयीन कुशल मनुष्यबळ विकास विभागाचे सल्लागार तन्मया नायक आणि हेमेंद्र कोठारी फाउंडेशनचे किरण इनामदार यांनी केले. अंबड इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images