Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धान्य दुकानातील मालाची विगतवारी

$
0
0
ग्राहक संघाच्या स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट व बुरशी लागलेला गहू पुरवठा विभागाने बदलून देण्याची तयारी दाखवली आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी पाहणी करून सगळ्या मालाची विगतवारी सुरू केली आहे.

रेल्वेत प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

$
0
0
नागपूरकडे डाऊन मार्गावर धावणाऱ्या १२८०९ हावडा मेलमधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाइल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला एका तासात जेरबंद करण्यात आले आहे.

विजय पांढरे यांना सुरक्षा नको

$
0
0
मेटाचे चीफ इंजिनियर विजय पांढरे यांच्या मागणीनुसार नाशिक पोलिसांनी त्यांना तातडीने सुरक्षा देऊ केली. परंतु तुर्तास सुरक्षा नको, असे सांगत पांढरे यांनी आठवडाभरासाठी सुरक्षा नाकारली आहे.

आमदार हिरेंच्या कार्यालयावर हल्ला

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यालयावर गुरुवारी हल्ला चढवला.

श्रमदानातून रस्ता झाला खुला

$
0
0
नकाशावर असणाऱ्या परंतु त्याचा वापर अजूनपर्यंत झाला नाही, असे रस्ते ग्रामस्थांच्या श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून खुले होऊ शकतात, अशी माहिती देताच निरगुडेतील ग्रामस्थांनी गायरान जमीन स्मशानभूमी व गावाशेजारील तळ्यावर जाण्यासाठीचा जुना रस्ता श्रमदानातून खुला करून अन्य गावकऱ्यांसमोर आदर्श घालून दिला.

बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक

$
0
0
हजार रुपयांच्या नोटांप्रकरणी मनमाडपाठोपाठ येवला शहरातून एका परप्रांतीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून दोघा संशयितांना कोर्टाने ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मार्कंड , माची धोडपच्या कामात गैरव्यवहार?

$
0
0
कळवण तालुक्यातील मार्कंड पर्वत व माची धोडप किल्ला येथे पर्यटननिधीतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या कामाची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ भाजप नेते रमेश रावले यांनी वनमंत्री पतंगराव कदम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

सक्तीचे लोडशेडिंग : मनमाडवासी हैराण

$
0
0
नांदगावसह मनमाड शहरातही सुरू असलेल्या सक्तीच्या लोडशेडिंगने नागरिक हवालदिल झाले असून त्यातही एकाच शहरातील दोन भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लोडशेडिंग करण्याचा नवा फंडा वीज वितरण कंपनीने अवलंबल्याने वीज ग्राहकात संतापाचे वातावरण आहे.

नांदूरमध्यमेश्वरची शंभरी

$
0
0
महाराष्ट्रातील भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य ज्या पाणथळावर वसलेले आहे, त्या नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याने यंदा शंभरी गाठली आहे. मात्र असे असूनही हा परिसर अद्यापही रामसरच्या यादीत समावेश होण्यासाठी प्रतीक्षेतच आहे.

घंटागाड्यांची अनियमिततेवर उपाय काय करणार ?

$
0
0
घंटागाडीतील अनियमितपणा, ठेके देताना होणारे गैरप्रकाराचे आरोप, डेंग्यूचा वाढता फैलाव अशा विविध कारणांमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग लोकप्रतिनिधी व नाशिककरांच्या निशाण्यावर राहिला आहे.

८० हजारांचे दागिने हिसकावले

$
0
0
पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे दागिने हिसकावून चोराने पोबारा केला. गंगापूर रोडवरील गुरूनक्षत्र लॉन्सजवळ गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सुप्रिया अभिजित जाधव (३१, रा. कालिका सोसायटी, कालिका मंदीरामागे) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

...अन् सिस्टीममधला अडथळा दूर झाला!

$
0
0
महाराष्ट्र बँकेच्या चेक क्लिअरिंग सिस्टीममध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे काही ग्राहकांचे चेक क्लीअर होऊनही खात्यात पैसे जमा होत नव्हते. यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र बँकेचे उपमहाप्रबंधक राजन लोंढे यांच्याशी याबाबत संपर्क साधल्यानंतर ही समस्या तात्काळ सोडविण्यात आली.

अद्वयसह तोडफोड करणाऱ्यांनाही कोठडी

$
0
0
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी अद्वय हिरे यास तर आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यालयासह मोटारीची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांना कोर्टाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हॉस्प‌िटलला ५८ लाखांचा दंड

$
0
0
कोट्यवधींचा ‘हॉस्पिटल गुड्स’ एलबीटी न भरता दडवून ठेवल्याप्रकरणी पंचवटीतील आडगाव नाका परिसरातील अपोलो हॉस्प‌िटलला पाल‌िकेने तब्बल ५७ लाखांचा दंड ठोठावला आहे. लाखोंचा एलबीटी चुकव‌िल्याची बाब महापाल‌िकेच्या तपासपथकासमोर उघडकीला आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भूसंपादनाचा वाद लवकर सुटावा

$
0
0
नाशिक-पुणे हायवेचे रूंदीकरण व्हावे ही जनतेची इच्छा आहे, परंतु नाशिक-सिन्नर दरम्यानच्या भूसंपादनातील अडचणींमुळे हे काम पुढे सरकत नसल्याची खंत व्यक्त करत या मार्गासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भूसंपादनाचा वाद लवकर सुटावा

विरोध अंधश्रद्धेला; कुंभमेळ्याला नाही

$
0
0
‘आमचा विरोध कुंभमेळ्याला नसून धार्मिकतेच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अधार्मिकतेला असल्याचे सांगत कुंभमेळ्याच्या निधीतून केवळ शहराचा नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा विकास करावा’, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी केली.

बिनधास्त मारा गोदावरीत डुबकी

$
0
0
गोदाप्रदूषणाबाबत नित्य नवीन दावे प्रतिदावे केले जातात. पर्यावरणवादी स्वच्छ गोदावरीसाठी आग्रही असतात, तर महापालिका प्रशासन आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचे सांगते. आता महापालिका प्रशासनाने चोपडा लॉन्सजवळील पाण्यात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड अर्थात बीओडीचे प्रमाण उत्तम असल्याचा दावा केला आहे.

कांदेंवर लवकरच मोठी जबाबदारी

$
0
0
दांडग्या समर्थकांची फौज असलेले कांदे गेल्या काही वर्षांपासून राजकीय व्यासपीठाच्या शोधात होते. त्यातून त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यांना प्रदेश कामगार सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. जून २००९मध्ये सिडकोत झालेल्या बाइक जळीत प्रकरणानंतर मनसेने त्यांची हकालपट्टी केली.

भंगार बाजारावर फुल्या

$
0
0
अंबड लिंकरोडवरील अनाधिकृत भंगार बाजार हटवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. मोठ्या पोलिस फौजफाट्यात शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत तब्बल १०० दुकानांवर रेड मार्किंग करण्यात आले.

अंदाजे वीजबिल आकारणीविरोधात आंदोलन

$
0
0
शेतकरी व वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे घरगुती वीजबिलांसाठी फोटो मीटर रीडिंग घेऊन योग्य बिले देण्यात येतात; परंतु गेल्या पाच वर्षांपासून शेतीपंपासाठी मीटर रीडिंग न घेता अंदाजे अवास्तव वीजबिल आकारणी केली जात असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत आंदोलन छेडणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images