Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

द्वारका परिसरात वाहनांचा ठिय्या

$
0
0
आधीच अरूंद असलेल्या रस्त्यावर तासनतास उभी राहणारी अवजड वाहने, संध्याकाळी रस्त्यालगत लागणाऱ्या चायनीजच्या गाड्या आणि त्यात रिक्षासह प्रवाशी वाहनांची रांग! ही अवस्था कुठल्या मार्केट परिसरातील किंवा मोकळ्या जागेतील नसून द्वारकाहून टाकळीरोडला जोडणाऱ्या सर्व्हिसरोडची आहे.

घरफोडीत १९ लाखांचे दागिने लंपास

$
0
0
घर बंद असल्याचा फायदा घेत संरक्षण विभागातून निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकारी महिलेच्या घरातून चोरट्याने हिरेजडीत दागिन्यांसह तब्बल १९ लाखांचा ऐवज चोरून नेला. जनरल वैद्यनगरमध्ये गुरूवारी दुपारी तीन ते साडेचार या दीडतासात हा प्रकार घडला.

नाशिकला ‘४ जी’चा स्पीड

$
0
0
झपाट्याने विकासाकडे झेपावत असलेले नाशिक हे लवकरच ४ जीच्या नकाशावर येणार आहे. रिलायन्स कंपनीच्या ४ जी सेवेमुळे शहरातील इंटरनेट, मोबाईलचा स्पीड वाढण्याबरोबरच येथील आयटी इंडस्ट्रीलाही बूस्ट मिळणार आहे.

मोरांचे अस्तित्व धोक्यात

$
0
0
तालुक्याचे कोकण म्हणून समजल्या जाणाऱ्या पश्चिम डोंगराळ भागातील निसर्गसंपन्न परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापी, जंगलातील शिकाऱ्यांकडून त्यांची सर्रासपर्ण शिकार होत असून, या राष्ट्रीय पक्ष्याचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.

स्मशानभूमीच्या टेंडरचा घोळ

$
0
0
महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेसंदर्भात टेंडर देताना महापालिका प्रशासनाने अप्रमाणित कागदपत्रांच्या आधारे ठेका देण्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशी आहे आम आदमी योजना

$
0
0
आम आदमी विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविली जाते. भूमिहीन, शेतमजूर, २.५ एकर बागायत किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

‘आम आदमी’ मुंबईतून हद्दपार?

$
0
0
केंद्रातील आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आम आदमी विमा योजनेला राज्यातील आघाडी सरकारनेच राजधानी मुंबईत हरताळ फासला आहे. या योजनेसाठी अवघ्या सात ‘आम आदमीं’चा शोध सरकारला लागला असून मुंबईतून आम आदमी हद्दपार झाला आहे की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

गोखले कॅम्पस करा ‘wi-Fi’फुल्ल

$
0
0
आधुनिकीकरण होत असलेल्या शिक्षण क्षेत्रात इंटरनेट विद्यार्थ्यांची गरज बनले आहे. त्याची दखल घेत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटची सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

जागोजागी खड्ड्यांचे स्पीड ब्रेकर!

$
0
0
नाशिकरोड परिसरात केबल टाकण्याच्या निमित्ताने खासगी कंपनीने खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने जागोजागी स्पीड ब्रेकर तयार झाले आहेत. या स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

जानेवारीत रंगणार 'नाशिक फेस्टिवल'

$
0
0
विविध कला, क्रीडा स्पर्धांसह मनोरंजक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या 'नाशिक फेस्टिवल'ची सोमवारी घोषणा करण्यात आली असून ४ ते १८ जानेवारीदरम्यान हा फेस्टिवल रंगणार आहे.

महिला सुरक्षेचे पुढचे पाऊल

$
0
0
महिला सुरक्षेसाठी जागरूक असलेल्या ना‌शिक पोलिसांनी पुढचे पाउल टाकत ‘निर्भया व्हॅन’ कार्या‌‌न्वित केली. ‘आम्ही तुमच्या संरक्षणासाठी कट‌िबध्द आहोत, निश्चिंत रहा’ असा दिलासा देणाऱ्या महिला पोलिस हीच या पथकाची ऊर्जा आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वेळीच रोखण्याचे आणि संकटात सापडलेल्या अबलांना मदतीचा हात देण्याचे काम पथक करीत आहे.

महासभा, स्थायी बैठक तहकूब

$
0
0
वर्षाअखेरीस आयोजित करण्यात आलेली महासभा आणि स्थायी समितीची बैठक मनसे नेते अतुल सरपोतदार यांच्यासह इतर मान्यवरांना श्रध्दांजली वाहून तहकूब करण्यात आली.

थर्टी फर्स्टसाठी बंदोबस्त ‘फर्स्ट’

$
0
0
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून ‘ड्युटी फर्स्ट’ चा राग आळवण्यात आला आहे.

कसमादे पट्ट्यात ढगाळ वातावरण

$
0
0
कसमादे पट्टयात दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने तोंड वर काढले आहे. या रोगट हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणाचा मानवी आरोग्यावरही प्रतिकुल परिणाम होत आहे.

बारावी परीक्षेवर बहिष्काराचे सावट

$
0
0
लेखी करारानंतरही ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्या राज्य सरकार पूर्ण करीत नसल्याने बारावीच्या परीक्षेवर पुन्हा बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेवर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही बहिष्काराचे सावट आहे.

‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली फसवणूक

$
0
0
शहरात अवघ्या तीस रुपयांच्या लकी ड्रॉ कूपनवर कार, मोटरसायकल व तत्सम आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन देऊनही बक्षिसे न देण्यात आल्याने रविवार कारंजा परिसरात सोमवारी सकाळी गोंधळ उडाला. फसवणूक झालेल्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे.

कॅप्रिहन्सच्या संपकरी कामगारांना पोलिसांचा फतवा!

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कॅप्रिहन्स कंपनीतील कामगार गेल्या १३ दिवसांपासून प्रवेशद्वारावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सोमवारी अचानक पोलिसांकडून ५०० मीटर अंतरावर बसून आंदोलन करण्याचा फतवाच कामगारांना देण्यात आला.

शहरात सफाई कामगारांचे व्यस्त प्रमाण

$
0
0
महापालिकेच्या सफाई कामगारांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत व्यस्त असल्याची बाब समोर आली आहे. एक हजार लोकसंख्या पाठीमागे दोन ते अडीच मनुष्यबळाची गरज असताना सध्या अवघे एक ते सव्वा कर्मचारी काम करीत असल्याचे ​चित्र महापालिकेच्या आरोग्य विभागात दिसून येत आहे.

महादेववाडीत दूषित पाण्याचा पुरवठा

$
0
0
सातपूर भागातील महादेव वाडीत महापालिका प्रशासनाने ड्रेनेज लाइनमध्येच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचे पाइप पूर्ण सडल्याने रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

लोहोणेरला वाळूचा साठा जप्त

$
0
0
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील वाळू माफीयाच्या शेतावर छापा टाकून सुमारे ४५ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. बागलाणचे प्रांत संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी ही कारवाई केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>