Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पिस्तुलासह काडतुसे चोरीस

$
0
0
राजकीय कार्यकर्ते आणि भाजीपाल्याचे व्यापारी भरत खंडू मंडलिक यांच्या पिस्तुलासह ५ जिवंत काडतुसे चोरीस गेली आहेत. इंदिरानगरमध्ये शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मंडलिक यांनी भगवती गॅसच्या कार्यालयामागे मंडाले पार्कमध्ये घराजवळ अॅक्टिवा गाडी उभी केली होती.

वाळूचे २२ ट्रक ताब्यात

$
0
0
जिल्ह्यात वाळू लिलावांना प्रतिसाद मिळत नसताना नाशिक शहरात अवैध वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयाला बळकटी देणारी घटना शनिवारी घडली आहे. लेखानगर परिसरात तब्बल २२ ट्रक खुद्द अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले आहेत.

नाशिक महाबळेश्वरपेक्षा थंड

$
0
0
राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे नाशिक हे महाबळेश्वरपेक्षाही थंड बनले असून शनिवारी नाशकात ६.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तपमानाची नोंद झाली आहे.

नादब्रह्मात सूर सापडण्यासाठी तपश्चर्या हवी

$
0
0
भजन स्पर्धा ही नादब्रम्हची स्पर्धा आहे, यामध्ये भक्तिमार्ग आहे. हे संगीत भगवंताला साधू-संतांना प्रिय आहे. त्यामुळे नादब्रम्हात सूर सापडण्यासाठी तपश्चर्या असावी लागते, असे प्रतिपादन जेष्ठ संगीत तपस्वी पंडित प्रभाकरपंत दसककर यांनी भुजबळ फाऊंडेशन आयोजित भजन स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

कथामालेच्या बालनाट्यांना दिमाखात सुरुवात

$
0
0
बालनाट्यांमधूनच कलाकार घडण्याची प्रक्रीया सुरू असते. सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलाकार घडले असून. त्यात सातत्याने वाढ असल्याचे प्रतिपादन पद्माकर लोणकर यांनी केले.

सुलोचना राजेगावकर यांचे निधन

$
0
0
शहरातील प्रसिद्ध इंजिनीअर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष, सुयोजित बिल्डकॉन व अनंत टेक्नोक्रॅट्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत राजेगावकर यांच्या मातोश्री सुलोचना केशव राजेगावकर (वय ८२) यांचे निधन झाले.

‘आप’ सर्व जागा लढवणार

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीनिमित्त झालेल्या ‘आप’च्या राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे नेते विजय पांढरे यांनी शनिवारी सांगितले.

अखंड ख्याल कीर्तनाची अनोखी भेट

$
0
0
'पिया बिन मोहे', 'रसिया हो न जा', 'आ जा रे बलमा' अशा एका पेक्षा एक बंदिशींनी रसिकाना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या अखंड ख्याल संकीर्तन महोत्सवाचे. या महोत्सवात ख्याल गायकीच्या विविध पैलूंचा आस्वाद रसिकांना घेता आला.

विकासकामांवर भाजपची नाराजी

$
0
0
मनसे एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप करत महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या भुमिपुजनांवर भाजपने टाकलेला बहिष्कार कायम असताना आम्ही मात्र विकासकामांच्या सोबत असे म्हणत काँग्रेस नगरसेवकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत केल्याने भुमिपूजनाचे कार्यक्रम चर्चेचे ठरले.

गोदावरी परिक्रमा आजपासून

$
0
0
‘गंगा स्नान, गोदापान, हम रखेंगे गोदा सन्मान’, ‘संकल्प युवा पिढीचा, सदास्वच्छ, शुद्ध गोदामाईचा’ अशा ध्येयाने प्रेरीत झालेली गोदावरी नदीची परिक्रमा रविवारपासून सुरू होत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिक्रमा गोदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आणतानाच तिला पवित्र गंगेचे रुप देण्यासाठी जनजागृतीही करणार आहे.

महापालिकेत सत्तासंकट!

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसे व भाजपच्या नाशिकमधील दोस्तीत पडलेली दरी वाढते आहे. नाशिक महापालिकेचे महापौरपद ताब्यात असलेल्या मनसेला ही दरी परवडणारी नसल्याने त्यांच्याकडून पॅचअपसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मनसेसमोर सत्तासंकट उभे राहिले आहे.

'राज ठाकरेंना आजोबा आठवतील’

$
0
0
‘महाराष्ट्रात आपची गरज नाही, इथे आम्ही बाप आहोत’, असा टोला हाणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर 'आप'च्या राज्य समन्वय समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी पलटवार केला. आगामी निवडणुकीनंतर राजना त्यांचे आजोबा आठवतील, असा सणसणीत टोला पांढरेंनी हाणला.

हलव्याच्या दागिन्यांवरच संक्रांत

$
0
0
दरवर्षीप्रमाणे यंदाही हलव्याच्या दागिने खरेदीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. मात्र यंदा खरेदीचा वेग मंदावला आहे. मकर संक्रांतीपासून सप्तमीपर्यंत हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते.

कर्जाचा प्रस्ताव पुन्हा सरकारकडे

$
0
0
महापालिकेच्या २०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी बँकांकडून स्पर्धात्मक व्याजदर मागविण्यात आले असून मंजुरीसाठी नव्याने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

वादळापूर्वीची शांतता अन् उत्सुकता

$
0
0
चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक कारभावर नाराजी व्यक्त करीत मुंबईची वाट पकडली. ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढली असून राजकीय पटलावरील ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून मनसेची 'राज'कीय कोंडी

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर आजवर मधुर असणारे भाजप व मनसेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातून या दोघांची नाशिक महापालिकेत असलेली युती तुटण्याची चर्चा होते आहे.

पडद्याआड नायलॉन मांजाची विक्री

$
0
0
आपल्या पतंगाला निरभ्र आकाशातला अनभि‌षिक्त सम्राट ठरविण्यासाठी पतंगप्रेमी सज्ज झाले आहेत. इतरांच्या पतंगांना जमीन दाखवितानाच आपल्या पतंगाचे आकाशातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयारीला जोर आला आहे.

जोशी, वाघ निवडीच्या माहितीत तथ्य नाही

$
0
0
पुणे विद्यार्थी गृहाच्या नियामक मंडळाची सभा एवढ्यात घेण्यात आलेली नसल्याने त्यातील पदाध‌िकाऱ्यांच्या न‌िवडीबाबतच्या माह‌ितीत तथ्यच नसल्याचा खुलासा पुणे व‌िद्यार्थी गृह या संस्थेने केला आहे.

प‌‌रिश्रम अन् जिद्दीने साकारले देशसेवेचे स्वप्न

$
0
0
गरीबीचे चटके सोसत तो मोठा झाला. हातावरचं पोट आणि मजुरी जेमतेमच. यामुळे आई वडीलही हवालदिल. अपंग बहिणीच्या काळजीनं तर घरात अस्वस्थताच. अशाही परिस्थितीत शिक्षण व इंडियन आर्मीत जाऊन देशसेवा करायची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

सिन्नरमधील हुतात्मा स्तंभाची चोरी

$
0
0
सिन्नर तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाची चोरी झाल्याची तक्रार शिवसेनेचे दिगंबर देशमुख यांनी केली आहे. याबाबत सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ब्रिटिशकालीन तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हुतात्मा स्तंभ उभारण्यात आलेला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images