Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भगूर : विद्यार्थिंनीसाठी बसची मागणी

$
0
0
नाशिकरोड, भगूर, दारणा परिसरातील विद्यार्थिंनीसाठी जादा बस सोडण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या देवळाली कॅम्प शाखेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहनच्या विभाग नियंत्रकांना देण्यात आले.

जाहिरात धोरणावर महासभेचे शिक्कामोर्तब

$
0
0
भरमसाठ दरवाढ असलेले महापालिकेचे जाहिरात तब्बल साडेचार तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर बुधवारच्या महासभेत मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने या प्रस्तावास हिरवा कंदील दर्शविल्यास १४ रूपये प्रति चौरस स्क्वेअर मीटर रूपयांचे दर थेट १२५ रूपये प्रति चौरस स्क्वेअर मीटर इतके आकारले जाणार आहेत.

लोणवाडे-दसाणे तील हाडांचे कारखाने हटवा

$
0
0
लोणवाडे - दसाणे (ता. मालेगाव) शिवारातील हाडांचे कारखाने बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले. लोणवाडे – दसाणे शिवारात समर्थ बोनमील, सुजाता बोनमील व डी. क्यू. इंडस्ट्रिज हे तीन हाडांचे कारखाने आहेत.

भाव घसरल्याने कांदा उत्पादक चिंतेत

$
0
0
गेल्या अडीच महिन्यांपूर्वी तेजीच्या लाटेवर स्वार होऊन सर्वसामन्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने बाजारात रांगड्या कांद्याची आवक वाढल्यामुळे जोरदार गटांगळी खाल्ली आहे. एकीकडे कांद्याच्या कमी झालेल्या किंमतीमुळे ग्राहक जरी सुखावला असला तरी दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

रस्ता अपूर्ण; टोल वसुली पूर्ण

$
0
0
राज्यात टोल नाक्यांवरून गदारोळ सुरू असला तरी राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली मात्र जोरात सुरू आहे. मुंबई-आग्रा महामार्ग क्र. ३ वर पिंपळगाव बसवंत ते नाशिक दरम्यान रस्त्याचे काम काही ठिकाणी अपूर्ण असतानाही टोल मात्र पूर्ण वसूल केला जात आहे.

वीज मीटरला आग

$
0
0
नाशिकरोड येथे नवले चाळीत शॉर्टसर्किटमुळे मंगळवारी रात्री आग लागून दोन दुचाकी खाक झाल्या. उड्डाणपुलाजवळील शिवाजी चौकासमोर नवले चाळ आहे. तेथे अप्सरा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभ्या होत्या. त्यातील दोन दुचाकी मीटरबॉक्स समोरच लावण्यात आल्या होत्या.

झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांना ‘चुना’ लावलाय का?

$
0
0
नाशिक महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. परंतु, ते महिनाभराच्या आतच पुसट झाल्याचे वृत्त `मटा`ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. सातपूर विभागातील नगरसेवक सलीम शेख यांनी याबाबत आज महासभेत आवाज उठवला.

जागेसाठी वकिलांचा पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

$
0
0
इतर पक्षकारांचे जागेसंबंधीचे वाद मिटविणाऱ्या वकील बांधवांनी जिल्हा न्यायालयासाठी हव्या असलेल्या जागेसाठी पोलिसांच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून दंड थोपटण्याचा इशारा दिला आहे.

पुन्हा अवतरला जुन्या शहराध्यक्षांचा बोर्ड

$
0
0
शहर काँग्रेसमधील गटबाजीमुळे प्रदेश काँग्रेसने आकाश छाजेड यांना शहराध्यक्षपदावरून हटवत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांची नियुक्ती केली. छाजेड यांना हटविल्याने आनंदी झालेल्या गटातील कार्यकर्त्यांनी बोरस्ते यांच्या पदग्रहणापूर्वीच काँग्रेस कमिटीतील छाजेड यांचा बोर्ड हटविला.

पोस्टमनची नोकरी नको रे बाबा!

$
0
0
टपालाचे सॉर्टिंग करून दिवसभर वाटणे अवघड, अनेक पोस्टमनला कामाच्या अतिताणामुळे आजार जडले आहेत. स्पीड पोस्टाची आकडेवारी दररोज इंटरनेटवर जात असल्याने ते त्याच दिवशी वाटावे लागते. इतक्या कमी वेळेत अतिशय मोठ्या भागात फिरून; तसेच शहरी भागात मोठ्या इमारती उभ्या राहात असल्याने त्यांचे जिने चढणे अवघड असते.

‘नॉन-क्रिमीलेअर’ची अट पाळा

$
0
0
केंद्र सरकारने नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रूपये केली असतानाही राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. शहरातील विविध कॉलेजमध्ये जुन्याच अटीप्रमाणे कार्यवाही केली जात आहे.

महाराष्ट्रातही हवा वाइन बोर्ड

$
0
0
राज्यातील वाइन उद्योगाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कर्नाटक सरकारने वाइन बोर्डाची निर्मिती केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही वाइन बोर्ड स्थापन करावे, अशी आग्रही मागणी नाशिक वाइन क्लबचे अध्यक्ष रमेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गंगापूर धरणाची सुरक्षा धोक्यात

$
0
0
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे व जिल्ह्याची शान असलेल्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धरणाच्या संरक्षक भिंतीला भगदाड पडले आहे. कोणी सुरक्षारक्षकच नसल्याने धरणाच्या भिंतीवर सतत तरुणांचा वावर असतो. धरणाच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

IFS मध्ये मराठीचा झेंडा

$
0
0
आयएएस आणि आयपीएसप्रमाणेच असलेल्या पण महाराष्ट्रात काहीशा दुर्लक्षित असलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये (आयएफएस) पहिल्यांदाच मराठीचा झेंडा फडकला आहे. महाराष्ट्रातील तब्बल १२ मराठी विद्यार्थ्यांची या परिक्षेत निवड झाली असून अहमदनगरची पियुषा जगताप देशात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

बारावीच्या रिसीटमध्ये चुकांचा भडीमार

$
0
0
ऐन परीक्षेच्या तोंडावर शेकडो रिसीटवरील चुकलेल्या संदर्भांमुळे व‌िद्यार्थी संतपाले आहेत. या चुकांमधील दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी काहींनी बोर्डाच्या ऑफ‌िसकडे धाव घेतली तर मनव‌िसेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यपद्धतीचा न‌िषेध नोंदव‌ित ठ‌िय्या आंदोलन केले.

सातपूरमध्ये पोस्टाला बांधता येईना स्वतःची इमारत

$
0
0
गेल्या वीस वर्षांत वीस पटीने वाढलेल्या सातपूर विभागातही पोस्टमनची संख्या अपुरी आहे. नवीन कर्मचारी भरती झालेली नसल्याने १५-२० वर्षांपासून जुनेच पोस्टमन भार वाहत आहेत. २० वर्षांपासून पोस्ट ऑफिसची सातपूर कॉलनी (म्हाडा) येथे स्वतःची जागा पडूनच आहे.

गाऱ्हाण्यांवर उपाय बारा आठवड्यांत

$
0
0
सरकारी कार्यालयांमध्ये गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या जनतेची निवेदने, समस्यांची पत्रे आणि तक्रार अर्जांची केवळ रद्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली असून, अशा अर्जांवर बारा आठवड्यांमध्ये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

१३२ वनाधिकाऱ्यांचा अंबर दिवा हटवला

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत राज्यातील इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस (आयएएस)च्या लॉबीने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आयएफएस)च्या अधिकाऱ्यांवर कुरघोडी केली आहे. त्यामुळेच राज्याच्या वन विभागातील तब्बल १३२ अधिकाऱ्यांच्या गाडीवरील अंबर दिवा हटविण्यात आला आहे.

केवळ ३६ अधिकाऱ्यांच्या गाडीवरच लाल दिवा

$
0
0
राज्याच्या वन विभागात एकूण १६८ क्लास वन अधिकारी आहेत. त्यातील १३२ अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवा निघाल्याने वनविभागातील प्रधान मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशा केवळ ३६ अधिकाऱ्यांच्या गाडीवरच आता अंबर दिवा राहिला आहे.

रेडीरेकनरबाबत सरकारवर दबाव टाका

$
0
0
रेडीरेकनरचे अन्यायकारक दर कमी करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव टाकण्यात यावा, अशी विनंती नाशिक क्रेडाईने नाशिकच्या लोकप्रतिनिधींकडे केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकार होऊ शकेल, असा क्रेडाईला विश्वास आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images