Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू

$
0
0
शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भाजलेल्या दोघांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. भद्रकाली येथे रशीद बाबूलाल शेख रात्री साडेबाराच्या सुमारास १०० टक्के भाजले होते.

बसच्या धडकेत पित्यासह मुलगा ठार

$
0
0
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरून श्री साईबाबाच्या दर्शनासाठी सिन्नर येथील पिता, पुत्र पायी जात असताना मागून येणाऱ्या खासगी आरामबसने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, हे अस्मानी संकट बळीराजाच्या जीवावर उठले आहे. दरेगावच्या तरुण शेतकऱ्याचा त्याने बळी घेतला. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे डाळिंब आणि हरबरा पिकाची डोळ्यादेखत वाट लागल्याचा धक्का सहन झाला नाही.

मनसे नेत्यांनी केले भुजबळांना लक्ष्य

$
0
0
मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना नाशिक मतदारसंघात निवडून देवून मुंबईचे पार्सल मुंबईलाच पाठवा असे सांगत आमदार वसंत गिते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले. हरसूल परिसरात मनसेच्या वतीने प्रथम रणशिंग फुकले. मनसेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कोनांबेत चिमुरडीची हत्या

$
0
0
सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी संशयित म्हणून तिच्या चुलत मामाला शनिवारी संध्याकाळी अटक केली. या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी बलात्कार करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्रिटीशकालीन क्वॉर्टरला इगतपुरीत आग

$
0
0
शहरातील बारा बंगला परिसरातील एका ब्रिटीशकालीन रेल्वे क्वॉर्टरला शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. क्वॉर्टरमध्ये कुणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. इगतपुरी शहरातील बारा बंगला परिसरात अनेक रेल्वे क्वॉटर्स सध्या बंद असून त्याची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने दुरवस्था झाली आहे.

विवाहितेचा छळ; ११ जणांवर गुन्हा

$
0
0
सिमेंट व स्टीलचे दुकान टाकण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात चाळीसगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव बसंवत परिसरात बेदाणा उत्पादनास वेग

$
0
0
पिंपळगाव बसवंत परिसरात बेदाणा उत्पादनास वगे आला असून पिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यात बेदाणा उत्पादनासाठी किमान एक हजार शेडची उभारणी करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात द्राक्ष हंगामात साधारण पन्नास ते साठ हजार टन बेदाणा उत्पादन होते.

‘एक्स्लो’साठी ‘सीटू’चे आंदोलन?

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही ‘सीटू’ने एक्सलो कंपनीच्या नाठाळ व्यवस्थापनाच्या कामकाजाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांचे पगार थकल्याने ‘सीटू’ने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणी त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

कारागृहात होणार वाहन वॉशिंग सेंटर

$
0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये वाहने धुता यावीत यासाठी वॉशिंग सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी इमारत बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार असून, त्यासाठी सुमारे १८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

अवैध मद्यविक्री : ६६ जणांविरोधात गुन्हा

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागाने कठोर कारवाई करत तब्बल ६६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कर्मचाऱ्यांची पगारवाढ रखडली

$
0
0
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीनही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्यासह झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पगारवाढ पुन्हा रखडली आहे.

अरुंद रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा

$
0
0
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा हायवेवरील महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक असलेला पाथर्टी फाटा सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरतो आहे. अंबड-सिडकोहून पाथर्डी, देवळाली कॅम्पसह मुंबईकडे जाण्यासाठी सोयीच्या मानल्या जाणाऱ्या या फाट्यावर वाहनांची सतत वर्दळ असते.

पेट्रोलपंपांवरील सुविधांचा बोजवारा

$
0
0
पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणानुसार प्रत्येक पेट्रोल पंपावर विविध आवश्यक बाबींसह गाडीतील टायरमध्ये मोफत हवा भरण्याची सुविधा देणे सक्तीचे असतानाही जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर ही सुविधा नसल्याचा आरोप नाशिकच्या एकनिष्ठ युवा फाउंडेशनतर्फे करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तालयातील अग्निशमन यंत्रणा कुचकामी

$
0
0
मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्वच विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांना आपापल्या विभागातील इमारतींचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या; परंतु नाशिकच्या विभागीय आयुक्तालयाने कार्यालयाचे फायर ऑडिट करणे तर दूरच; परंतु कालबाह्य झालेले अग्निशमन सिलिंडरदेखील बदललेले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

$
0
0
जमीन आपल्या मालकीची आहे, असे खोट्या कागदपत्रांद्वारे ‌भासवून फसवणूक केल्याचा प्रकार गंगापूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी १० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल अभयारण्य घेणार मोकळा श्वास

$
0
0
वन्यजीवांनी समृद्ध असलेले खान्देशातील यावल अभयारण्य अतिक्रमणमुक्त करण्याचा विडा वन्यजीव विभागाने उचलला आहे. गेल्या ४० दिवसांत या ठिकाणच्या ६८२ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले असून, येत्या महिन्याभरात अतिक्रमण पूर्णपणे काढण्याचा निर्धार आणि नियोजन विभागाने केले आहे.

आचारसंहितेचा होर्डिंग्जना फटका

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू असल्याने कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याची जाहिरातबाजी होऊ नये यासाठी होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे काढण्याचे काम मोठ्या गतीने सुरु आहे.

भुजबळांना पळवून लावा

$
0
0
‘आगामी निवडणुकीत पैशांपेक्षा निष्ठेला महत्त्व द्या. तुम्हाला अनेक प्रलोभने दाखवले जातील त्याला भुलू नका. पैशाचे आमिष दाखवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. माझगावमधून भुजबळांना लोकांनी पळवून लावले, त्याप्रमाणे नाशिकमधूनही पळून लावा,’ असा सल्ला रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.

‘नाशिक कॅम्पस’चा मार्ग मोकळा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या भूसंपादनाला अखेर मंजूरी मिळाल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सिनेट बैठकीत दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images