Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्हा न्यायालयात महिलाराज

$
0
0
जिल्हा न्यायालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रधान न्यायाधीश या महत्त्वपूर्ण पदावर महिला न्यायाधीश काम पहात आहेत. न्यायालयात नवनियुक्त न्यायाधिशांनी पदभार स्वीकारला असून ३० पैकी १५ न्यायाधिश महिला आहेत. त्यामुळे न्यायालयात सध्या महिलाराज अवतरले आहे.

सिंहस्थ निधीसाठी गडकरींना साकडे

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी द्यावा, या मागणीसाठी शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे शुक्रवारी भेट घेतली. यापूर्वी, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळाली होती.

निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी अंदाजपत्रकात तरतूद करू

$
0
0
पुणे आळंदीच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या माध्यमातून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करू, असे आश्वासन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दिले.

आश्रमशाळेतील व‌िद्यार्थ्यांनाही म‌िळणार स्पर्धा परीक्षांचे पूर्वश‌िक्षण

$
0
0
शासकीय व अनुदान‌ित आश्रमशाळांशी संलग्न कनि‌ष्ठ महाव‌िद्यालयात श‌िक्षण घेणाऱ्या व‌िद्यार्थ्यांना यापुढे स्पर्धा परीक्षांचेही पूर्व प्रश‌िक्षणही देण्यात येणार आहे. या प्रश‌िक्षणात प्रामुख्याने संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) आण‌ि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षांच्या पूर्वश‌िक्षणाचा समावेश असणार आहे.

पोटनिवडणुकांमध्ये तिरंगी लढत

$
0
0
नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक ६१ अ आणि प्रभाग क्रमांक १७ अ या दोन्हीही ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६१ अ मधून ११ जणांनी तर प्रभाग क्रमांक १७ ब मधून एका उमेदवाराने माघार घेतली.

विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त

$
0
0
नाशिक शहरातील काही भाग तसेच सातपूर, सिडको भागात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीकडून अनियमितपणे भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.

शहरी आरोग्य केंद्रांना ‘सलाईन’

$
0
0
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार शहरी आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे असून, त्यादृष्टीने तसा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने सादर केला आहे. या प्रस्तावावर येत्या २० तारखेच्या महासभेत निर्णय होणार आहे. महासभेने शिक्कामोर्तब केल्यास शहरी आरोग्य केंद्राच्या संख्येबरोबर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू शकते.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळातील तत्त्कालीन प्रशासनाधिकाऱ्याने पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नावाखाली जिल्ह्याबाहेरील १८ शिक्षकांच्या गैरमार्गाने बदल्या करून आपले उखळ पांढरे केल्याचा आरोप माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी केला आहे. बदल्यांचे सर्व नियम डावलत हे काम करण्यात आले असून संबंधीत अधिकाऱ्या​विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

न्याय देत फिरणार मोबाईल व्हॅन

$
0
0
दरवेळी न्याय मागण्यासाठी पक्षकारांनाच न्यायालयाच्या दारात यावे लागते. परंतु, न्याय देण्यासाठी न्यायालयच पक्षकाराच्या दारात गेला, असे फारसे होत नाही. मात्र, आता राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत यंदापासून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सिडकोतील ज्येष्ठ नागरिक हतबल

$
0
0
जुने सिडको परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होत आहे. मात्र, त्यांना स्वत:चा विरंगुळा व्हावा यासाठी हक्काचे स्थळ नाही किंवा नाना नानी पार्कही नाही. २००१ पासून हक्काचे एक विरंगुळा केंद्र व्हावे, नाना नानी पार्क व्हावे, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.

चंपानगरीमधील मोबाईल टॉवर हटवा

$
0
0
आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या धास्तीपोटी जेलरोडच्या चंपानगरी येथील रहिवाशांनी परिसरात असलेला मोबाईल टॉवर काढावा त्वरित हटविण्याची मागणी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे केली आहे. समर्थ निवास या इमारतीवर खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर उभा केला जात आहे.

दहा नवीन आरोग्य उपकेंद्र

$
0
0
राज्य सरकारने सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यातील आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखडयाचे फेर नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात दहा नवीन आरोग्य उपकेंद्र तर ग्रामीण रुग्‍णालय स्‍थापन करण्यात येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर व येवल्यातील ग्रामीण रुग्‍णालयाचे उपजिल्हा रुग्‍णालय श्रेणीवर्धन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

पोलिस करणार ‘गोदा ग्रीन ’

$
0
0
कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खाकी वर्दीआड पर्यावरण प्रेमीही दडलेला असतो. पर्यावरण संवर्धनाच्या पोटतिडकीतून पोलिसांनी ‘गोदा ग्रीन’ हा प‍्रकल्प हाती घेतला आहे. गोदेकाठाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे हिरवे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. येत्या रविवारी (दि. १५) वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून हे हिरवे स्वप्न पेरण्यात येणार आहे.

वीज बिलात ५० टक्के सवलत

$
0
0
शेतकऱ्यांना कृषीपंपाची थकबाकी भरण्यात सवलत देणारी कृषी संजीवनी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. ३१ मार्च २०१४ मध्ये थकबाकीच्या मूळ रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व पूर्ण थकबाकीच्या रक्कमेवरील १०० टक्के व्याज व दंड माफ करण्यात येईल.

डोंगरदऱ्यांतील यूपीएससीचा हिरा

$
0
0
एसटीची चाकेही पोहचू न शकणाऱ्या दुर्गम वळणवाटा, पावसाच्या सरींनी डोळ्यादेखत वाहून जाणारे रस्ते, श‌िक्षणाचा पंचक्रोशीला साधा गंधही नाही अन् ज‌िथं हातातोंडाची गाठ पडण्यासाठीचाही संघर्ष अटळ होता, अशा स्थ‌ितीत पेठ तालुक्यातील फणसगावातील व‌िद्यार्थ्याने देशाच्या प्रशासनात जाण्याचं स्वप्न पंधरा वर्षांपूर्वी पाह‌िलं. अन् प्रवाहाशी संघर्ष करत ते पूर्णही केल.

कानाने दिला दगा

$
0
0
अतिउत्साही वृध्द म्हणजे तरुणाईला लाजवणारं व्यक्तिमत्त्व असतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कोणत्याही मोफत कार्यक्रमाला जाऊन बसणं यांचा जन्मसिध्द अधिकार असतो. अशाच परवाच्या एका कार्यक्रमातला हा किस्सा.

राज्याचा कृषी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

$
0
0
राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सर्वंकष हिताचा असणारा राज्यस्तरीय कृषी अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शनिवारी सादर केला.

महापालिकेच्या सभागृहांची दुरवस्था

$
0
0
प्रभाग १७ मध्ये नागरिक व विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने सभागृहे उभारली आहेत. या सभागृहांची दुरवस्था झाल्याने महापालिकेकडून सभागृहांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रभाग १७ मध्ये येत्या २९ जूनला पोटनिवडणूक होत आहे.

एम सेक्टर ९२ मध्ये कचऱ्याचे ढिग

$
0
0
भारतीय स्टेट बँकेच्या पाठीमागील गणेश चौकातील एम सेक्टर येथे रस्त्यांवरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. उघड्यावर टाकत असलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्थायी सभापतीपदासाठी ढिकले रिंगणात

$
0
0
स्थायी समिती सभापतीपदाच्या रेसमध्ये महाराष्ट्र न​वनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले हे आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. सेनेकडून स​चिन मराठे तर भाजपकडून रंजना भानसी आणि कुणाल वाघ यांचे नाव समोर येत असल्याने सभापतीपदाची निवडणूक चुरशीची होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images