Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परीक्षेचा गोंधळ

$
0
0
कारागृह विभाग आणि महिला व बालविकास खात्यांकडून लि‌पिक व तत्सम पदांसाठी रविवारी, ६ जुलैला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांची निराशा झाली आहे. परीक्षेच्या माध्यमातून मिळणारी संधी हुकल्याचे शल्य उमेदवारांना अधिक बोचणारे ठरणार आहे.

एसटीचे प्रश्न सुटणार

$
0
0
‘एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची थकबाकी व कराराची थकबाकी लवकरात लवकर देऊ. तसेच त्यांचे अन्य प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील’ असे आश्वासन परिवहन मंत्री मधुकर चव्हाण यांनी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

व्यावसायिकांना दणका

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) बाबतचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापारी उद्योजकांना १० जुलैपासून महापालिका नोट‌िसा बजावणार असल्याची माहिती उपायुक्त हरीभाऊ फडोळ यांनी दिली. आजपर्यंत प्रत्यक्षात ६ हजार ५७५ तर ऑनलाइन पध्दतीने ५ हजार ४५४ विवरणपत्र एलबीटी विभागाकडे जमा झाले आहेत.

दोघांचा अपघाती मृत्यू

$
0
0
नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत एक महिलेसह दोघांचा बळी गेला.

हिरे बंधू भाजपमध्ये

$
0
0
लोकसभा निवडणुकीपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार डॉ. अपूर्व हिरे व अव्दय हिरे यांना गुरुवारी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे मालेगाव तालुक्यात तसेच नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. हिरे बंधूंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

डॉक्टरांचे आंदोलन चिघळणार

$
0
0
सरकार आणि मॅग्म यांच्यातील बोलणी फिस्कटली असून, त्यामुळे डॉक्टरांचे आंदोलन चिघळण्याच‌ी शक्यता निर्माण झाली आहे.

स्टॅण्डिंगमधील अंडरस्टॅण्डिंग

$
0
0
स्थायी समिती सभापती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेने सर्व ताकद पणाला लावत वर्चस्व कायम ठेवले. निवडणुकीनंतर मनसेतील दुफळी, भाजपा-मनसेचा वाद, सेना-भाजपाचे संबध आणि विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची ‘खेळी’ समोर आली. तसेच भविष्यातील बदलू शकणाऱ्या राजकारणाची एक झलक पाहण्यास मिळाली.

पावसासाठी देवाचा धावा

$
0
0
मान्सूनने तब्बल महिन्याभराचा उशीर केला असून आद्रा नक्षत्राने देखील हुलकावणी दिल्याने पावसासाठी आता देवचा धावा सुरू झाला आहे. बारा ज्योतिर्लींगापैकी एक महत्वाचे स्थान असलेल्या आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वरास अहोरात्र जलाभिषेक करण्यात येत आहे.

पर्जन्यराजास साकडे घालावे

$
0
0
‘पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रभर अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्जन्यराजाने कृपा करावी आणि पुन्हा सारी जीवसृष्टी आनंदाने बहरून जावी, नदी नाले दुथडी भरून वाहावीत आणि पिके जोमाने यावीत म्हणून अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील लाखो सेवेकऱ्यांनी पर्जन्यराजास विनंती करण्यासाठी विविध अध्यात्मिक उपाययोजनांचे आयोजन केले आहे.

पाणीटंचाईची जलतरण तलावाला झळ

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात साठा कमी असल्याने नाशिक महापालिकेने पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावातील एक तलाव पाण्याच्या उपलब्धते अभावी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रॉडबँडच्या खंडित सेवेने उद्योजक त्रस्त

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत तांत्रिक दोषामुळे बीएसएनएल ब्रॉडबँडची महिन्याभरापासून सेवा वारंवार खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. याबाबत आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेटही घेतली. तरीही, प्रश्न सुटू शकलेला नाही.

मुक्त विद्यापीठ प्रवेश सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या ३१ जुलै २०१४ पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अंबड लिंक रोडवर अतिक्रमणाचा विळखा

$
0
0
अंबड लिंक रोडवरील अतिक्रमणांचा पसारा हा दिवसेंदिवस वाढतच असून व्यावसायिकांनी दुकानांचे शेडस थेट रस्त्याला लागून असलेल्या फूटपाथपर्यंत आणून ठेवले आहेत. तसेच फळ-भाजी विक्रेते, चाटची दुकाने रस्त्यावाच थाटत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंबादासच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0
मुंबई येथे पोलिस भरती दरम्यान धावण्याच्या चाचणीत मृत्युमुखी पडलेला मालेगाव तालुक्यातील द्याने येथील अंबादास सोनवणे यांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार दीपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आला

फी निश्चितीसाठी समिती

$
0
0
खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आणत त्यांचे फी विषयक धोरण ठरविण्यासाठी सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागड्या मोबाईलचे फॅड

$
0
0
हल्ली आपल्याला महिन्याला जेवढा पगार नाही (किंवा ज्यांना पगाराच नाही जी मुलं pocket money वर मज्जा करत आहेत. त्यापेक्षा दुप्पट किमतीचा मोबाईल वापरण्याचं फॅड आलं आहे. आणि ती जणू आपली लाइफ style होऊन बसली आहे.

जनहितासाठी वापरा सोशल मीडिया

$
0
0
‘आज तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत आहे. सोशल मिडिया हा या तंत्रज्ञानाचाच आविष्कार आहे. पण याचा वापर जनहितासाठी व्हायला हवा’, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित उत्तर महाराष्ट्र सोशल मिडीया कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

जीपीएस निरीक्षणाला सर्रास फाटा

$
0
0
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे असतानाच सिन्नर तालुक्यात टँकर्सच्या जीपीएसवर कुठलेही नियंत्रण आणि निरीक्षण नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात जीपीएस यंत्रणेची कुठलीही पडताळणी किंवा पाहणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे वेशभूषा स्पर्धा

$
0
0
वारी म्हटली की प्रत्येकाला उत्साह येतो. हा वारस पुढच्या पिढीनेही तितक्याच तन्मयतेने जपावा यासाठी महाराष्ट्र टाइम्सतर्फे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल ही खास वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रेझेंटेबल राहण्याचा मिळाला मंत्र

$
0
0
‘आजचा जमाना आहे प्रेझेंटेबल राहण्याचा. याची जाणीव प्रत्येकाला हवी. त्यानुसार स्वत:मध्ये बदल करा आणि कॉन्फीडंट रहा’, असा सल्ला ‘मिरर सलून’च्या नेहा खरे यांनी दिला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images