Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अन्यथा, शिष्यवृत्ती अर्ज दडपणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
कॉलेजस्तरावर मागास वर्गातील श‌िष्यवृत्तीला पात्र असणाऱ्या व‌िद्यार्थ्यांचे अर्ज दडपून ठेवणाऱ्या संस्थाचालक अन् प्राचार्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा समाज कल्याण व‌िभागाने द‌िला आहे. चालू शैक्षण‌िक वर्षापर्यंत ज‌िल्ह्यातील सुमारे ४६ कॉलेजांनी सुमारे चार हजारावर अर्ज प्रलंब‌ित ठेवले आहेत.

यंदा गणेश विसर्जनासाठी शहरात दीडशे कृत्रिम तलाव

$
0
0
गोदापात्रातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिका प्रयत्नशील असून गणेश विर्सजनासाठी यंदाही शहराच्या सहाही विभागात दीडशे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी केले. नाशिक महापालिकेतर्फे गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

धरणग्रस्तांचे ‘गेट हटाव’ आंदोलन

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील घोटी-वैतरणा मार्गावरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्णत्वास आले असून धरणाला गेट बसविण्याच्या कामाला शुक्रवारी सुरुवात झाली. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले वाढीव पेमेंट, पुनर्वसनाची अपुरी कामे राहिल्याने धरणग्रस्तांनी या गेट बसविण्याच्या कामास प्रखर विरोध करून पाटबंधारे विभागाचा डाव हाणूण पाडला.

डीपीची जबाबदारी भुक्तेंकडेच

$
0
0
नाशिकचे नगररचनाचे विभागीय सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची त्याच पदावर पुणे येथे बदली झाली आहे. मात्र, नाशिक शहराच्या बहुचर्चित विकास आराखड्याला (डीपी) मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्याकडेच कायम ठेवल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

हातचलाखी करून दागिने लांबविले

$
0
0
फरशी स्वच्छ करण्याची पावडर विकतो तसेच जुनी भांडी आणि दागिने स्वच्छ करून देतो, असे सांगत चोरट्याने महिलेचा विश्वास संपादन करून दागिने लांबविले. गुरुवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास जेलरोड येथील सैलानी बाबा समोर हा प्रकार घडला.

त्र्यंबकच्या कचरा डेपोला विरोध

$
0
0
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या कचरा डेपोला नाशिक महापालिकेने विरोध केल्यानंतर नगरपालिकेने कचराडेपोसाठी पुन्हा कोजुलीच्या ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमीनीची निवड केली आहे. कोजुलीच्या ग्रामस्थांनी मात्र या कचरा डेपोला विरोध केला असून, प्रस्तावित डेपोविरूद्ध प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे शुक्रवारी तक्रार करण्यात आली.

द्वारका-दत्तमंदिर रस्ता रूंदीकरण

$
0
0
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक - पुणे रोडवरील द्वारका ते दत्तमंदिर या महत्वाच्या टप्प्यातील रस्ता रूंदीकरणाला सुरुवात झाली असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

निवडणुकीत सोशल मीडियाला चाप?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर झालेल्या अपप्रचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हावार स्वंतत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातही सोशल मीडियासाठी स्वंतत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

‘वाडा संस्कृती हे नाशिकचं वैभव’

$
0
0
वाडा संस्कृती हे नाशिकचं वैभव आहे. परंतु, आज जुने वाडे घ्या आणि पाडा हा प्रकार सध्या शहरात सुरू आहे. या जुन्या वास्तू तथा वाडे पाडून आज त्याजागी ज्या नवीन इमारती उभ्या राहत आहेत त्यात केवळ स्टील, सिंमेट व खडी यांचाच वापर होत आहे.

एकलहरेचा नवीन प्लान्ट कचाट्यात

$
0
0
एकलहरे येथाल ६६० मेगावाट क्षमतेचा नवीन प्लान्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि देवळालीतील लष्कराच्या परवानगीच्या कचाट्यात सापडला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह लष्करी अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. लष्करी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बबन घोलपांची आमदारकी रद्द

$
0
0
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे आमदार बबनराव घोलप यांची आमदारकी राज्यपालांनी रद्द केली असून, त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या शिफारशीनंतर राज्यपालांनी हा आदेश काढला आहे.

घोलपांच्या वारसदाराचा सेनेकडून शोध

$
0
0
शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करत निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न

$
0
0
जून २००९ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेशन्स व बोनस मिळवण्यासाठी २५० रुपये भरून अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे दाखवत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जेवढे बुजवले, त्यापेक्षा दुप्पट पडले खड्डे

$
0
0
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यात नवीन रस्त्यांचा देखील समावेश असून पावसाने रस्ते ‘साफच’ करून टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व कामे करताना महापालिकेने जवळपास चार हजार खड्डे बुजवल्याचा दावा केला होता.

‘सर्व्हे करून नियोजन आराखडा तयार करा’

$
0
0
सिंहस्थ कुंभेमेळा काळात कोणतीही आपत्ती उद्भवू शकते. त्यासाठीच प्रत्येक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील बारीकसारीक गोष्टींचा सर्व्हे करावा. त्याबाबतचा आराखडा तयार करून तो सादर करावा, असे आदेश पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शनिवारी दिले.

सेवकांच्या पाल्यांसाठी ‘मव‌िप्र’ वसत‌िगृह उभारणार

$
0
0
मराठा व‌िद्या प्रसारक संस्थेचे सभासद ज‌िल्हाभरात आहेत. मोठ्या प्रमाणावर या संस्थेचे जाळे पसरले आहे. शहरात श‌िक्षणासाठी या सभासदांचे पाल्य येतात, त्यावेळी त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांच्यासाठी वसत‌िगृह उभारण्यात येणार आहे. हा न‌िर्णय मव‌िप्रच्या कल्याण सम‌ितीच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
अबालवृध्दांमध्ये चैतन्य निर्माण करणारा गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेत कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी गणेश मंडळानी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
भरधाव ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकरोड परिसरातील मालधक्का रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ह‌ी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम बाबूराव भडांगे (४२ रा. गुलाबवाडी, देवळालीगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

शेरीन ऑटो : कामगारांना वेतनवाढ

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील शेरीन ऑटो प्रा. लि. कंपनीच्या ५३ कामगारांना ५९०० रुपये वेतन वाढ लागू करणारा करार सीटू संलग्न एस. एस. के. (शेरीन गृप) एम्प्लॉईज युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच झाला.

करमणूक कर वसुली : ३० % वाढ

$
0
0
जिल्ह्यात सेट टॉप बॉक्सच्या कडक अंमलबजावणी नंतर जिल्ह्यातील करमणूक शुल्क वसुलीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सुरुवातीच्या दोन महिन्यातच ३० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी जून आणि जुलै या दोन महिन्यात करमणूक शुल्कापोटी ४ कोटी ८७ लाखांची वसुली झाली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images