Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सेकंदात संपर्क; मिनिटात मदत

$
0
0
विधानसभा निवडणुकीत गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक बूथवरील हवालदाराचा मोबाइल क्रमांक पोलिस आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आला आहे. कोणताही अनूचित प्रकार घडला तरी संबंधित हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

मतदानावर पोलिसांची करडी नजर

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीन पोहोच झाले. निवडणूक शांततामय वातावणात पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून निवडणूक प्रक्रियेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

प्रतिष्ठेच्या लढतींवर ख‌िळल्या नजरा

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागासांठी आज मतदान होत असून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज, माणिकराव कोकाटे, वंसत ग‌िते, ए. टी. पवार या दिग्गजांसमोर आपला गड राखण्याचे आव्हान आहे. पाचवेळा आमदारकी भुषवणारे पंरतु घोटाळ्याच्या आरोपाखाली शिक्षा झालेले शिवसेनेचे बबनराव घोलप यांचे चिंरजीव योगेश यांच्यापुढे पित्याचा वारसा टिकवण्याचे आव्हान आहे.

सकस आहार मि‍ळेल काय?

$
0
0
ज्या व्यक्ती खेळाच्या माध्यमातून अधिकारी पदावर पोहचल्या आहेत अशा अधिकाऱ्यांनी एका खेळाडूच्या आहाराचा खर्च त्या त्या असोसिएशनकडे दर महिन्याला सुपूर्द केल्यास अथवा एक वर्षाचा खर्च एकरकमी दिल्यास चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

‘खाओ जी भरके’

$
0
0
‘सैन्य पोटावर चालतं’, या म्हणीप्रमाणे आपापल्या नेत्याचे बूथ चालव‌िणाऱ्या कार्यकर्त्यांची पोटं सांभाळण्यासाठी सर्वच उमेदवारांना वेळोवेळी लगबग करावी लागली. मतदार यादीतून नावे शोधून देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात भरणा असल्याने त्यांनी घरातील चिल्लीपिल्ली गोळा करून आणलेली होती.

मतमोजणीसाठी आठ नवे निरीक्षक

$
0
0
मतमोजणी रविवारी (दि.१९) होणार असल्याने नाशिक जिल्ह्यात ८ नवे निरीक्षक निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत..

PSI अन् कराटेपटूमध्ये फ्रीस्टाईल

$
0
0
मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत वाहन उभे करण्यावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान फ्री स्टाईल हाणामारीत झाले. कराट्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या एका महिलेने प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

नाशिकरोड कारागृहात दिवाळी मेळा

$
0
0
दिवाळी आली की अनेक नागरिक स्वस्त आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू खरेदीसाठी दिवाळी मेळ्याच्या प्रतीक्षेत असतात. यंदाही दिवाळीनिमित्त नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पैसे वाटप तक्रारींचा पाऊस

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानावेळीही मतदारांना आमिष दाखवितानाच पैसे वाटण्याच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. या तक्रारींची शहानिशा करण्यात आली पण, त्यात कुठलेही तथ्य आढळले नसल्याचे यंत्रणेने सांगितले.

सोशल म‌ीडियावरही इलेक्शन

$
0
0
मतदार यादीतून नावे वगळले गेल्याबद्दलचा संताप ते मतदानाचा हक्क बजाव‌िल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मतदारांनी सोशल म‌ीडियावरही रांगा लावल्या. यामुळे द‌िवसभर व्हॉट्स अॅप, फेसबुक अन् ट्विटरसारख्या सोशल साइट्सवरही मतदारांची गर्दी द‌िसून आली.

मतदार हेल्पलाइनला प्रतिसाद

$
0
0
नाशिक शहरातील चार मतदारसंघांमध्ये मतदान चिठ्ठी वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने मतदार हेल्पलाईनवर मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दिवसभरात तब्बल १५०० जणांनी फोन करून त्यांच्या नावांची विचारणा केली.

दिग्गजांचे भवितव्य सीलबंद

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागासांठी बुधवारी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज, माणिकराव कोकाटे, वंसत ग‌िते, ए. टी. पवार या दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.

जिल्ह्यात ६४ टक्के मतदान

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये किरकोळ प्रकार वगळता एकूण ६४ टक्के शांततेत मतदान झाले. सर्वाधिक मतदान निफाड मतदारसंघात ७४ टक्के तर सर्वात कमी मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात ५२ टक्के झाले. मतदानानंतर मतदारांचे लक्ष रविवारच्या मतमोजणीकडे लागले आहे.

नऊ आमदांराना घरचा रस्ता !

$
0
0
स्वबळ जोखण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांना कालच्या मतदानात मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असली तरी नाशिक जिल्ह्यात ही निवडणूक परिवर्तनासाठी समजली जावू शकते.

ड्युटीवरील पोलिसाचा मृत्यू

$
0
0
चेहेडी येथील मतदान केंद्रावरील पोलिसाचे प्रकृती अचानक खालावल्यामुळे निधन झाले. नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहितीनूसार, दशरथ दौलत जाधव (४८, रा. चित्रकुट सोसायटी,पंचवटी) हे चेहेडीतील शाळा क्रमांक ७९ मध्ये निवडणूक ड्युटीवर होते.

‘युनिपुणे’ आता ‘पॉकेट’मध्ये

$
0
0
मोबाइल अॅप्लिकेशन म्हणजे सर्वांसाठीच मोठा दिलासा असतात. कुठल्याही अॅपमुळे आपल्याला बसल्याजागी काम करणे शक्य होते. प्रत्येक कामासाठी आता अॅप असल्यामुळे आपल्या अनेक समस्या अपमुळे कमी होतात.

विद्यार्थी रंगले दिवाळीच्या स्वागतात

$
0
0
दिवाळीत घरासमोर लावलेला कंदील आणि पणती स्वतः तयार करण्याचा अनुभव आणि आनंद बहुविकलांग विद्यार्थ्यांनी लुटला. निमित्त होते दिवाळीच्या स्वागातासाठी वस्तु तयार करण्याचे.

रेडिमेड फराळ तेजीत

$
0
0
दिवाळी आली की चाहुल लागते फराळाच्या पदार्थांची. दिवाळी आणि फराळ यांचे नाते तसे अतूटच. दिवाळीच्या साधारण आठवडाभरापूर्वीच महिला वर्ग फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात. चिवडा, चकली, शेव, करंजी, शंकरपाळी, अनारसे, लाडू असे विविध चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी महिला वर्गाची धावपळ मग सुरू होते.

राज्य निवडणूक आयुक्त येवल्यात

$
0
0
ग्रामपंचायत निवडणूक व्यवस्थेची आणि निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया हे शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दत्तनगरची दुर्दशा

$
0
0
नाशिक शहरातील वाढत्या वस्तीत चुंचाळे गावातील दत्तनगर हा एक भाग आहे. परंतु, दत्तनगर परिसराकडे महापालिकेने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. यात रस्त्यांचे तर हाल झालेच असून, ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग साचलेले पहायला मिळतात.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images