Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उद्योगमंत्री घोषणेला हरताळ

$
0
0
महिनाभरापूर्वी नाशिकला भेट दिली त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीबी कंपनीच्या जागेचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची ‘मेन इन महाराष्ट्र’ ही ‘एमआयडीसी’मधील बाबूंमुळे घोषणा हवेतच विरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

कर्करोग निदानावर आज शिबिर

$
0
0
टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स आणि सह्याद्री हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ फेब्रुवारी रोजी मोफत कर्करोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, कर्करोग तज्ज्ञांकडून कर्करोग रुग्णांना मोफत सल्ला मिळणार आहे.

‘मिशन सलोन’मध्ये करिअरची संधी

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘डीसी स्टाईल अॅण्ड न्यूफॉर्म हेअर अॅण्ड ब्यूटी अकॅडमीतर्फे ‘मिशन सलोन’ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हेअर अॅण्ड ब्यूटी या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची इच्छा असलेल्यांना यामध्ये संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्वच्छ भारत अभियान शक्य

$
0
0
संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. हाच विचार आपण आत्मसात केल्याशिवाय स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. यशवंत पाटील यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यश

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सहापैकी चार जागांवर विजय मिळवला. विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी 'अभाविप'च्या यवतमाळ येथील विद्यार्थी सदस्य स्नेहल धुमारे, तर सचिवपदी नागपूरच्या ज्ञानदीप नखाते यांची अविरोध निवड झाली.

जनरेट्यापुढे झुकले प्रशासन

$
0
0
त्र्यंबकरोडवरील पत्रकार कॉलनी जवळ गरुवारी झालेल्या अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले. हा अपघात आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पोलिसांनी मायको सर्कल ते दक्षिणमुखी हनुमान मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने खुला केला आहे.

भाजपविरोधात काँग्रेसचा सोमवारी रास्तारोको

$
0
0
केंद्र सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांविरोधात राबविण्यात येणाऱ्या धोरणांविरोधात काँग्रेसने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या फसवणुकीविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा निर्णय नाशिक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

वधू-वर मेळावा पुढे ढकलला

$
0
0
देशमुख मराठा समाजातर्फे रविवारी (दि. ८) रोजी जुना आग्रा रोड कालिका मंदिर हॉल येथे होणारा वधू-वर सूचक मेळावा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.

ज्येष्ठांसाठी उभारणार नाना नाणी पार्क

$
0
0
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून ठिकाण नसल्याच्या मुद्यावर ‘मटा’ने प्रकाश टाकला असता सातपूरमधील स्थानिक नगरसेवक सलिम शेख यांनी नाना-नानी पार्क उभारणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे नगरसेवक शेख यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर गँगरेप

$
0
0
इगतपुरीतील म्हाळुंगे येथे एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. वाडीवऱ्हे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तिघा संशयितांबरोबरच आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नाशिक मोस्ट प्रॉमिसिंग सिटी

$
0
0
जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जागतिक स्तरावरील फस्ट स्मार्ट स‌िटीज कांऊन्सिलतर्फे नाशिक शहराला इंड‌ियाज मोस्ट प्रॉमिसिंंग सिटीचा किताब बहाल केला आहे.

टीईटीची उत्तरसूची जाहीर

$
0
0
डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-२०१४ ची अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेच्या पेपर-१ व पेपर-२ ची संभाव्य उत्तरसूची १८ डिसेंबर रोजी वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली होती.

गटबाजी : फुलपॅन्टची बर्म्युडा!

$
0
0
विधानसभा निवडणुकीत चांगली कामग‌रिी करूनही केवळ अंतर्गत गटबाजीमुळे नाशकात भाजपाचे नुकसान होत असल्याची कबुली खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनाही त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच खडेबोल सुनावले.

जात पंचायतीच्या व‌िरोधात आज महाडला एल्गार

$
0
0
महाराष्ट्र अंधश्रध्दा न‌र्मिूलन सम‌तिीच्या वतीने चालव‌ण्यिात येणाऱ्या जात पंचायतीला मुठमाती या अभ‌यिानांतर्गत आज (द‌ि.८) महाड येथे जात पंचायतीच्या मनमानीव‌रिोधात कोकणस्तरीय एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकांना सक्षम केल्यास शिक्षणाचा दर्जा सुधारेल

$
0
0
शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालक सक्षम होणे आवश्यक आहेत. आज त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. ते केवळ सूचना करतात. त्यामुळे शैक्षणिक संस्था पालकांना भीकही घालत नाहीत, असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक आणि साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी केले.

पंकजा मुंडे घेणार आज जलयुक्त शिवारचा आढावा

$
0
0
राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे रविवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

...अन्यथा त्र्यंबक सोडून जावू !

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा नियोज‌ति कामांबाबत सरकारचे दिरंगाईचे धोरणामुळे त्रस्त झालेल्या साधू-महंतांनी महिन्याभरात विकासकामांची स्थिती न सुधारल्यास ञ्यंबकेश्वर येथे थांबणार नसल्याचा इशारा दिला आहे.

'नाहीतर काँग्रेसचे आमदार फोडेन'

$
0
0
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या काँग्रेसमध्ये येण्यासंदर्भातील आरोपांना दानवे यांनी नाशिकमध्ये सडेतोड उत्तर दिले.

लवकरच नवे शिक्षक धोरण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे कार्य महान आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत हे सरकार सकारात्मक विचार करीत असून, लवकरच त्याबाबत नवीन धोरण आखणार असल्याचे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कै भा. वी. शिंपी प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिक्षक समिती भूषण पुरस्काराच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. कालिदास कलामंदिर येथे रविवारी आयोजित शिक्षक चेतना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ना. मुंढे पुढे म्हणाल्या की, प्राथमिक शिक्षक हा समाजातील फार महत्वाचा घटक असून, आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. अशा शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडे असून, आयुष्य संस्कारीत करण्याचे काम शिक्षक करीत असतात. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या घसरत्या दर्जा बाबत भाष्य केले. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षक ज्ञानदानाचे कार्य ज्या शाळेतून करतो त्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खरोखरच योग्य आहे का, तो का खालवला हे देखील पडताळून पहाण्याची गरज आहे. दर्जा खालवण्यास कारणीभूत असलेल्या उणिवा दूर सारून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे. तसेच आज मुलांवरचा अभ्यासाचा व शिक्षकांवर कामाचा बोजा वाढला आहे. मुलांचे शिक्षण हसत खेळत होणे गरजेचे असून, त्यासाठी शिक्षकांवर असलेला ताण व कामाचा बोजा कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत एकादाच निर्णय घ्या, असे सुचवले असल्याचे सांगितले. त्यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रलंबित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विश्वनाथ मिरजकर यांनी प्रास्ताविक केले. राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बोरसे म्हणाले की, शिक्षकांच्या अनेक मागण्या असून, त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. आज सर्व शाळांमधील ९९ टक्के शिक्षकांनी एमएससीआयटीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, एक टक्का शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१५ पर्यंत सरकारने मुदतवाढ द्यावी. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, शिक्षकांच्या बदल्यांबाबत योग्य विचार व्हावा, पती-पत्नी एकीकरण नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी, शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करण्याची अट शिथिल करण्यात यावी, त्याचप्रमाणे खोट्या एनजीओंकडून शालेय तपासणी अहवाल न मागवता सरकारी यंत्रणेने तपासणी करावी. मुख्याध्यापकांच्या पेंडिंग जागा पदोन्नतीने भराव्यात, शिक्षकांची वैद्यकीय बिले पेडिंग आहेत ती अदा करण्यात यावी, तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवावे व शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी राज्यातील १३ शिक्षकांना गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी

वसंत घोगरे (परभणी), राजन सावंत (सोलापूर), राजेंद्र दिघे (मालेगाव), किशोर डोंगरवार (गोंदीया), विष्णू सागवेकर (रत्नागिरी), तुळशीदास धांडे (दर्यापूर)

विशेष महिला गौरव पुरस्कार

सुशीला कदम (कोकण)

नेतृत्व गौरव पुरस्कार

काळुजी बोरसे पाटील, उदय शिंदे

कर्तृत्व पुरस्कार

केदू देशमाने, गजानन शिंदे, सुरेखा मिरजकर, प्रवीण कुलकर्णी

देवळाली स्टेशनवाडीची वाट बिकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली परिसरातील स्टेशनवाडीमध्ये वाहन चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण व्हावे असे अतिशय खडबडीत आणि डांबरीकरण नसलेले रस्ते आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवून अपघातालाच सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिक रहिवाशी व्यक्त करीत आहेत. देवळाली रेल्वे स्टेशन लगतचा हा भाग विकासापासून वंचित आहे.

देवळाली रेल्वे स्टेशनमुळे विस्तारलेल्या या भागातील नागरिकांना अजुनही मूलभूत‌ सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. देवळालीच्या ५० टक्के लोकवस्तीतील मृतदेह या भागात अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, याच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गाचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही. तसेच या रस्त्याचे डांबरीकरण होऊ शकलेले नाही. प्रशासन होत असलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील लोखंडी पुलाचे कामही अुजनही होऊ शकलेले नाही. या पुलाला संरक्षक कठडेही अतिशय कमी उंचीचे आहे. त्यामुळे या पुलावरून कोणतेही वाहन खाली पडण्याचा धोका आहे.

जुन्या स्टेशनवाडी भागात जाण्यासाठी रस्ताच नाही. जो रस्ता आहे. तो रेल्वे विभागाच्या जागेतून जातो. त्यामुळे या रस्त्याचे रेल्वे विभागाने त्वरित डांबरीकरण करून द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडणार असल्याचे विद्यमान नगरसेवक दिनकर आढाव यांनी सांगितले आाहे. या परिसरासाठीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ३ इंच आहे. ती पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी ठरत आहे. तरी ८ इंचांची पाइपलाईन मंजूर झाली असून ती कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने त्वरित बदलून द्यावी तसेच याच भागातील चौधरी मळ्याकडे जाणाऱ्या रस्ताचेही डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

कर्मचाऱ्यांकडूनच अस्वच्छता

स्टेशनवाडीजवळील पुलाखाली कॅन्टोन्मेन्टचे कर्मचारीच मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकत असल्याचे स्थानिक रहिवाशांची तक्रार आहे. गेल्या ३० वर्षांपासून या पुलाकडेही कुणीही लक्ष देत नसल्याची खंत नागरिक मांडतात. यापूर्वी नव्या व जुन्या स्टेशनवाडी भागात २६ नवीन शौचालयाची बांधणी करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय टाळल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. वॉर्डात स्नेहनगर, नवीन स्टेशनवाडी, रेस्ट कॅम्प रोड तसेच बनात चाळ भागात आदी भागात भूमिगत गटार योजना राबविणे गरजेचे आहे.

वॉर्डात अनेक गरजू दलितांसाठी घरे बांधणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून विविध योजना राबविणार आहे.

दिनकर आढाव, नगरसेवक

वॉर्डातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तसेच वृद्ध व बालागोपाळासाठी नागरिकांसाठी उद्यानाची निर्मिती करण्याची गरज आहे.

- किलेश बोराडे, नागरिक

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images