Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

येवल्यात उर्दूचे शिक्षक रूजू झालेच नाहीत!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मालेगाव तालुक्यातील उर्दू शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना येवला तालुक्यातील उर्दू शाळेतील रिक्त जागांवर प्रतिनियुक्तीचे आदेश देऊन ते शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत. त्या सात शिक्षकांकडून आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मालेगाव तालुक्यात उर्दू शाळांची पटसंख्या बघता अतिरिक्त ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळांमधील सात शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्यांचे आदेश ४ फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, हे शिक्षक अद्याप रुजूच झालेले नाहीत. यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी येवला पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे याकडे लक्ष वेधून निवेदन दिले. येवला शहर अन् तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एकूण १० उर्दू प्राथमिक शाळा असून त्यात ५ उपशिक्षक, ३ पदवीधर शिक्षक व एका मुख्याध्यापकांची जागा रिक्त आहे.

जिल्हा परिषदेकडून ९ फेब्रुवारी रोजी आदेश प्राप्त होताच उर्दू माध्यमाच्या त्या सात शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना कार्यमुक्त देखील केले आहे.

- एस. बी. अजवेलकर, गटविकास अधिकारी, मालेगाव पंचायत समिती


सातपूरला टवाळखोरांचा उपद्रव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरच्या कामगारनगरीत टवाळखोर व भुरट्या चोरट्यांचा दिवसेंदिवस वावर वाढतच आहे. यासाठी पोलिसांनी लक्ष घालत गस्त वाढविण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. सातपूरच्या कामगार वस्तीचा भाग काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. यात राज्य, देश व परदेशातून कामगार वास्तव्यासाठी दाखल झाले आहेत. परंतु, सध्या कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे, तो टवाळखोर व भुरट्या चोरट्यांचा. सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असल्या ठिकाणीच टवाळखोर व भुरटे चोर सर्वसामान्यांना लुटण्यासाठी टपल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी अंधाराचा फायदा घेत कामगारांना धमकावत चोरीचे अनेक प्रकार घडत आहेत. परंतु, पोलिसांकडे तक्रार करण्यास सामान्य कामगार धजावत नाहीत. औद्योगिक वसाहतीतील एबीबी, स्नायडर, सीएट व कार्बन नाका या ठिकाणीच जास्त प्रमाणावर टवाळखोर व भुरट्या चोरांचे लक्ष कामगार बनतात.

सातपूर भागातील टवाळखोरांकडून दोन वाहनांचे नुकतेच नुकसान करण्यात आले. नुकसान झालेल्या वाहनचालकांचे कुणाशीही कोणतेही वाद नाहीत. तरीही त्यांच्या वाहनांचे नुकसाने का करण्यात आले, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. परंतु, टवाळखोरांकडून अशा प्रकारे वाहनांची तोडफोड होत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करतात. यासाठी नागरी वस्तीत पोलिसांनी अधिक गस्त वाढविण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

मोकळे भूखंड टवाळखोरांचे आश्रयस्थान

सातपूर भागातील बहुतांश मोकळे भूखंड टवाळखोरांचे आश्रयस्थान बनले आहे. दिवसभर तेथे जुगार खेळले जात असल्याचे रहिवाशी सांगतात. कुणी त्यांना हटकले तर टवाळखोरांकडून थेट हाणामारीची भाषा वापरली जाते. त्यामुळे स्थानिक रहिवाशी देखील दुर्लक्ष करतात. पोलिसांचा धाक न राहिल्यामुळे टवाळखोरांची हिमंत वाढत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

पोलिसांची संख्या कमी

सातपूरच्या विस्तारलेल्या लोकवस्तीसाठी पोलिसांची संख्या कमी आहे. यामुळे बहुतेक वेळा टवाळखोरांना पकडण्यासाठी वेळेवर पोलिस वेळेवर पोहचत नाहीत. यासाठी पोलिस आयुक्तांनी सातपूर व गंगापूर पोलिस ठाण्यात पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची गरज आहे.

‘ESI’मधील रिक्त पदे तत्काळ भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कामगार विमा रुग्णालयातील अनेक रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गाडसे यांनी डॉ. सावंत यांचीही भेट घेतली. आरोग्यमंत्र्यांनी भरती करण्याचे संकेत दिल्याचे गोडसे यांनी सांगितले.

सातपूर व सिडकोतील हजारो कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कामगार विमा रुग्णालयाची (ईएआयसी) उभारणी केली. परंतु, पाच लाखापेक्षा अधिक कामगार कुटुंबांचे आरोग्य सांभाळणाऱ्या 'ईएसआयसी'मध्ये डॉक्टरांसह अन्य पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यात वाढलेली कामगारांची संख्या पहाता 'ईएसआयसी'मध्ये असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे गोडसे यांनी आरोग्य मंत्र्यांना सांगितले. 'ईएसआयसी'ने डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने वेळेवर कामगारांना उपचार मिळत नसल्याचे सांगितले. यासाठी कामगारांच्या व कंपनीतून 'ईएसआयसी'ला कपात होऊन पैसा मिळून कामगाराला योग्य उपचारासाठी झटावे लागत असल्याने रिक्तपदे भरण्याची मागणी गोडसेंनी केली आहे.

‘ओझर विमानतळाला दादासाहेबांचे नाव द्यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

ओझर येथील विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. विभागीय महसूल उपायुक्त रावसाहेब भागडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. ओझरचा एच. ए. एल. हा विमानाचा कारखाना यशवंतराव चव्हाण ओझर जवळील कर्मभूमी असलेले दादासाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नातून साकारला आहे. या विमानतळाला दादासाहेबांचे नाव देणे उचित ठरेल. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर उपाध्यक्ष प्रियकीर्ती त्रिभुवन, जिल्हा युवा उपाध्यक्ष ललित पाटील, शहर उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, आदींच्या सह्या आहेत.

माथाडी कामगारांची नोंदणी करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या खेरवाडी मालधक्क्यावरील नोंदणी न केलेल्या कामगारांची नोंदणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय माथाडी, वाहतूक आणि जनरल श्रमिक उत्कर्ष सभेने निवेदनाद्वारे दिला आहे. कामगार आयुक्त कार्यालय आणि नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाला निवेदन कडे देण्यात आले आहे.

खेरवाडी मालधक्क्यावर दीडशे कामगार असून त्यातील फक्त ३५ नोंदणीकृत आहे. त्यांच्या नोंदणीसाठी संघटनेने अनेकदा आंदोलन केली, निवेदने दिली. नोंदणीसाठी अर्ज मिळावा म्हणून कामगार आयुक्त कार्यालयात अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. मालकांची लेव्ही वाचविण्यासठी येथील प्रशासन अनोंदणी कामगारांकडूनच काम करुन घेण्यावर भर देत असल्यामुळे सरकारचा महसूल बुडवला जात आहे. कामगारांची नोंदणी न केल्यास आंदोलन केले जाईल. निवेदनावर संघटनेचे प्रशांत संत, विशाल साळवे, राजेंद्र जगझाप, विजय जादव, सनी ढालिया आदींची नावे आहेत.

साथीच्या आजारांची कॅथे कॉलनीला धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीतील कॅथे कॉलनीतील रहिवासी अस्वच्छतेमुळे हैराण आहेत. या समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिकांना साथीच्या रोगांचा प्रार्दूभाव होण्याची धास्ती आता सतावू लागली आहे.

कॅथे कॉलनी परिसरात निधीअभावी येण्याजाण्यास डांबरीकरण किंवा खडीकरण केलेला साधा रस्ता देखील नाही. पावसाळ्यात तर फुटभर पाण्यातून ये-जा करावी लागते. तसेच गटारीमधील पाणी मोकळ्या भूखंडावर साचत असल्यामुळे परिसरात डासांची उत्पती वाढलीआहे. यातून डेंग्यू मलेरिया यासारख्या साथीचे रोग फोफावण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेजारी असलेल्या भगूर गावातून स्वाईन फ्ल्यू सारख्या आजाराची साथ देवळाली परिसरात पसरते की काय अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे. कॅथे कॉलनी परिसरातील उर्वरित भागातील उघड्या गटारी भूमिगत करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर कचराकुंड्यांची व उघड्या गटारांची स्वच्छता नियमित होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी

भगूर लहवित रस्त्यावर पथदीप नसल्याने अनेकदा दुर्घटना घडतात. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेला बंधारा असूनही त्याचा स्थानिकांना लाभ होऊ शकत नाही. बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. देवळालीच्या दगड चाळ भागात उर्वरित रस्त्यांचे अद्याप काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. भगूरकडे जाण्याच्या रस्त्यावरील पुलाखाली पावसाळ्यात प्रचंड पाणी तुंबते. या रस्त्याजवळून गटार तयार करण्याची गरज आहे. भगूर नगरपालिकेनेही अनेकदा यासंदर्भात कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाला माहिती दिली. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भगूर बस स्थानक परिसरातील सरकारी जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

बसस्टॉपवर नाही बाक

बनात चाळ परिसरात लोकवर्गणीतून काढण्यात आलेल्या बसथांब्यावर नागरिकांना उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागते. बसथांबा जाहीर तर केला मात्र, तेथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडासुद्धा नाही. उन्हा-पावसात उभे रहातच नागरिकांना बसची वाट पहावी लागते. खासदार निधीतून प्रत्येक भागात बस स्थानक उभारण्यात आले. परंतु, त्यात बसण्यासही बाके नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कॅथे कॉलनी परिसरात घर तेथे नळ तसेच उर्वरित ड्रेनेज लाईनची त्वरित मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच लहवित रस्त्यावर दरवर्षी १० स्ट्रीट लाईट मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- कावेरी कासार, नगरसेविका

यंत्रखरेदी अडकली लालफितीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ यशस्वीतेचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे असले तरी आपत्कालीन व्यवस्थापन सुसज्जतेचा प्रस्ताव पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रिया, साधन सामग्रीची खरेदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही साधने हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सिंहस्थ काळात कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहावे लागणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरू शकेल, अशी १२ कोटींची सामग्री खरेदी करावयाचे निश्चित झाले असून त्यावर त्वरित कार्यवाहीसाठी पावले उचलावी लागणार आहेत.

गत सिंहस्थाप्रमाणे यंदा चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वेतोपरी खबरदारी घेत आहे. त्यासाठी शाहीमार्गही बदलण्यात आला. सिंहस्थ काळात भाविकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात शंभर खाटांची स्वतंत्र इमारतच उभी राहात आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही हॉस्पिटलच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. असे असताना आपत्तीजनक परिस्थितीत बचावकार्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी साधनसामुग्रीची खरेदी अद्याप होऊ शकलेली नाही.

कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी राज्यात कोठे नसेल एवढा सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष नाशिकमध्ये असेल असा दावा ‌तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केला. भारतीय तसेच परदेशी बनावटीची सुमारे १२ कोटींची साधनसामुग्री त्यासाठी खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, जिल्हाधिकारी बदलाच्या हालचालींमध्ये हा विषय मागे पडला आहे. आपत्कालीनच्या यंत्रसामग्रीचे टेंडर काढणे, खरेदी करणे, त्यानंतर ते हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण देणे ही सर्व प्रक्रीया पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे आपत्कालीन कक्षाच्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळवून टेंडरची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे.

पोलिस प्रशासन, त्र्यंबक नगरपालिका, आरोग्य विभाग, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाने नोंदविलेल्या मागणीनुसार १२ कोटींहून अधिक किमतीची साधनसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. पूर, भूकंप, आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच चेंगराचेंगरी, दंगल, बॉम्बस्फोट, अपघातांसारख्या मानवनिर्मित आपत्तींमध्ये उपयुक्त ठरतील अशा साधनांचा त्यामध्ये समावेश आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळणे हे प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान असल्याने त्याच्या सुसज्जतेसाठी प्रशासनाने हालचाली गतिमान कराव्यात. अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. आपातकालीन परिस्थितीत शहर तयारीत रहावे, अशी नाशिककरांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप टेंडर सुद्धा निघाले नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. टेंडरनंतर अद्ययावत यंत्रांची खरेदी कधी होणार, प्रशिक्षण कधी दिले जाणार असा प्रश्न निर्माण झाले आहेत.

या अद्ययावत साधनांची होणार खरेदी

खरेदी करण्यात येणाऱ्या साधनसामुग्रीपैकी मेटल कटर, लाईट वेट चेन सॉ, काँक्रीट कटींग चेन सॉ, फायर इस्टिंग्यूशर आरसी, गॅस डिटेक्टर, तुर्कीचे व्हीक्टीम लोकेशन कॅमेरे, बोल्ट कटर, पोर्टेबल लाईट सिस्टम, पोर्टेबल फोम जनरेटर, इमरजन्सी इस्केप मास्क, स्मोक एक्झॉस्टर, लिफ्टींग बॅग सेट, जंपींग नेट, व्हीऐतनाम कुलींग जॅकेट, लाइटनिंग अरेस्टर यांसारखी ४० हून अधिक साधने जर्मनी, अमेरिका, व्हीएतनाम, कोरीया यांसारख्या देशांच्या उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. ही साधने हाताळणे, त्यांचा सराव होणे, मॉकड्रील घेणे यासाठी काही वेळ द्यावा लागणार आहे.

चर्चेबरोबरच मराठीचा व्यवहारात वापर व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषेवरील चर्चासत्र हे राज्यातील नऊ विद्यापीठात आयोजित करण्यात येत असून, याद्वारे मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांसह अनेकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. मराठीच्या विकासासाठी केवळ पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन होणे गरजेचे नाही तर, भाषा, शास्त्र, व्याकरण, मराठी बोली, शब्दसंग्रहक, विश्वकोश यावर चर्चा होणे आणि रोजच्या व्यवहारात मराठीचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विनय मावळणकर यांनी केले.

एसएमआरके कॉलेजमध्ये आयोजित 'मराठी भाषा धोरण' या विषयावरील एकदिवसीय जिल्हास्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. राज्याच्या पुढील २५ वर्षांसाठी 'मराठी भाषा विषयक धोरणावर' डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली 'भाषा सल्लागार समिती'ने मराठी भाषा विकासाचे धोरण अर्थात मसुदा राज्य शासनासमोर मांडला आहे. राज्य सरकारच्या भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषेच्या विकासाच्या धोरणावर शिफारशी, हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या सूचनेवरून हे चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राचे उदघाटन सकाळी ११ वाजता झाले. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांची ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते.

पहिल्या सत्रात एसएनडीटी विद्यापीठाचे डॉ. राजाराम जाधव, डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. जयश्री पाटणकर आणि कवी किशोर पाठक यांनी संवाद साधला. त्याचा समन्वय डॉ. मोहिनी पेटकर यांनी केला. दुसऱ्या चर्चासत्रात प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. एकनाथ पगार, पत्रकार दीप्ती राऊत, डॉ. वृंदा भार्गवे, डॉ. इंदिरा आठवले, प्रा. जयश्री कदम यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचा समारोप सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. के. आर. शिंपी यांच्या उपस्थितीत झाला. चर्चासत्रात शहरातील विविध कॉलेजमधील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा राणे, डॉ. राम कुलकर्णी, प्रा. छाया लोखंडे, प्रा. श्वेता साबे यांनी परिश्रम घेतले.

समितीची स्थापना

आखाड्यांना प्लॉटचे अॅलोटमेन्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी, मेळा अधिकारी आणि आखाड्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वांना जागा वाटप केली जाणार आहे. साधूंना चोवीस तास पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. पहिल्या पर्वणीच्या एक महिनाआधी साधूग्राम सुसज्ज होवून त्याचे हस्तांतरण केले जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.


मित्रांच्या दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

दुचाकी चोरणाऱ्या सात जणांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. मित्रांचीच वाहने ते चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. जयभवानी रोडवर उपनिरीक्षक चन्ना व हवालदार आरोटे हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना राहुल सोपान गायकवाड (अरिंगळे मळा, एकलहरा रोड) हा तरूण दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. आरोटे यांनी त्याला बोलावून चौकशी केली असता तो भांबावून गेल्याने संशय वाढला. त्याने अचानक धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. उपनगर पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याची कसून चौकशी करण्यात आली. मित्रांच्या गाड्या थोड्या वेळासाठी नेऊन राहुल त्यांची डुप्लिकेट चावी बनवायचा. गाडी मित्राला परत केल्यानंतर काही दिवसांनी डुप्लिकेट चावीने ती चोरायचा. या गाड्या चार हजार रुपयात सुभाष हिरे याला विकायचा. हिरे बनावट क्रमांक टाकून अठरा हजार रुपयांपर्यंत त्यांची पुनर्विक्री करायचा. शाहरुख युसूफ सय्यद ( रा. अनुसया नगर, टाकळीरोड), शंकर सुकदेव जमधडे (जेहान नगर) नरेश योगराज परदेशी (सातपूर), आकाश अशोक कांबळे (गोदरेजवाडी, सिन्नरफाटा), चेतन जगदीश सताळे (लोखंडे मळा, विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड) यांच्या मदतीने राहुल वाहनांची चोरी करीत होता. या टोळीकडून दोन अॅक्टिवा, एक प्लेजर, एक आपाची व अन्य दुचाकी अशा पाच गाड्या जप्त केल्या. त्यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईप्रकाश चन्ना, हवालदार प्रकाश आरोटे, सुनील कोकाटे, निवांत जाधव, लक्ष्मण भामरे, संजय गामणे, मांदळे आदींनी ही कारवाई केली.

बचत गटांच्या माध्यमातून विकास शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांच्या अंगभूत गुणांमुळे घरगुती पद्धतीने बनविलेली दर्जेदार उत्पादने बचत गटांच्या माध्यमातून बाजारात दाखल झाल्याने महिलांना विकासाची मोठी संधी प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

'गोदाई' प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जीवनोन्नती अभियानांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित होते. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादन या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथे हे प्रदर्शन सुरू आहे. घरगुती वापरातील वस्तू, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले आहे.

ना. भुसे म्हणाले की, महिलांना सक्षम करणे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तुंना बाजारपेठेत मागणी आहे. महिला बनवित असलेल्या उत्पादने, नवनवीन वस्तू व उपक्रमाला शासनातर्फे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. या उत्पादनांच्या विक्रीसाठी तालुका, जिल्हा पातळीवर जागा उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून बचत गटाच्या वस्तुंसाठी कायमस्वरुपी बाजारपेठ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी बँका, वित्तीय संस्था आणि डीआरडीए. यंत्रणेतून बटचतगटांना कर्जपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली. या सवलतींचा महिलांनी पुढे येऊन फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरात ४ SP स्वीकारणार पदभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहाय्यक पोलिस आयुक्तांचा (एसीपी) वानवा निर्माण झालेल्या शहर पोलिस दलात लवकरच चार नवीन एसीपी पदभार स्वीकारणार आहेत. झोन दोनमध्ये कार्यरत असलेल्या हेमराज राजपूत यांना शुक्रवारी उशिरा पदमुक्त करण्यात आले असून, नवीन अधिकारी किती दिवसात हजर होणार, याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

दोन महिन्यापूर्वी एसीपी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली झाली. यात शहर पोलिस दलातील दोन एसीपींचा समावेश होता. आधीच एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असलेल्या पोलिस दलावर यामुळे ताण वाढला. त्यातच बदली झालेल्या एसीपींना तातडीने पदमुक्त करण्यासाठी गृह विभागाकडून दबाव वाढला. याचाच भाग म्हणून शुक्रवारी उशिरा एसीपी हेमराजसिंग राजपूत यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले. राजपूत यांना लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून पदोन्नती मिळाली आहे. तर, गुन्हे शाखेचे एसीपी पंकज डहाणे यांनी देखील पोलिस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. बदली झालेल्या तसेच रिक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवीन चार एसीपी लवकरच पदभार स्वीकारतील, अशी माहिती पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली. यात, प्रशांत वाघुंडे (ठाणे ग्रामीण), अतुल झेंडे (रायगड), विवेक पाटील (शिर्डी) आणि मोहन ठाकूर (नागपूर सिटी) यांचा समावेश असून, यातील विवेक पाटील लगेचच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. नवीन येणाऱ्या एसीपी व्यतिरिक्त सध्या शहर पोलिस दलात रवींद्र वाडेकर (झोन एक) आणि स्पेशल ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या रश्मी नांदेडकर हे दोघेच एसीपी आहेत. तरीही मंजूर आठ पदांपैकी दोन पदे रिक्तच राहणार असून, कुंभमेळ्यापूर्वी मंजूर पदे तरी भरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

५४ जुगारी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी सार्वजनिक वाचनालयाजवळील इमारतीत भरदिवसा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५४ जुगाऱ्यांना अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी ६६ हजार रुपये जप्त केले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगाऱ्यांवर कारवाई झाल्याने उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

सिध्दी टॉवर्समध्ये खुलेआम जुगार अड्डा सुरू असून, पोलिसांकडून त्यास अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी इमारतीतील एका ब्युटीपार्लरवर छापा मारला. मात्र, यातून काहीही निष्पण झाले नाही. शनिवारी दुपारी पोलिसांनी पुन्हा याच इमारतीवर छापा मारून एका गाळ्यात सुरू असलेला जुगार अड्डा उध्द्वस्त केला. यावेळी पोलिस उपायुक्त ​अविनाश बारगळ, पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्यासह इतर पोलिस अ​धिकारी व कर्मचारी हजर होते.

जुगार अड्ड्यातून मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या तब्बल ५४ जणांना अटक करण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून ६६ हजार २८० रुपये जप्त केले. जुगार अड्ड्याची व्याप्ती इतकी मोठी असताना पोलिसांना इतके दिवस सुगावा कसा लागला नाही, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. काही वर्षापूर्वी इंदिरानगर पोलिस स्टेशनजवळील एका इमारतीतून पोलिसांनी ४० जुगाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

लाल दिव्याच्या गाडीची धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर शुक्रवारी धामनी शिवारात लाल दिव्याच्या गाडीने दिलेल्या धडकेत घोटी येथील युवक गंभीर जखमी झाला होता. शनिवारी उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी इनोव्हा चालकाला अटक केली आहे.

वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांना शिर्डी येथे घेण्यासाठी शासकीय इनोव्हा (एमएच-०१ एएन-८७३) कार घोटी-सिन्नर महामार्गावरून जात असताना धामनी शिवारात समोरून घोटीकडे येणारी मोटरसायकल (एमएच-०५ ए-१९६८) यांच्यात शु‌क्रवारी समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात मोटरसायकलचालक बबलू उर्फ उमर फारुख शेख (रा. घोटी क्रांतीनगर) हा युवक गंभीररित्या जखमी झाला होता. शासकीय इनोव्हा कारचालक बाळू गोविंद आमले (वय-४९) रा. मलबारहिल, मुंबई यांनीच त्या गंभीर जखमी युवकास घोटी येथे उपचारासाठी आणले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यास तत्काळ नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले होते.

घोटी पोलिसांनी याबाबत इनोव्हा चालकाने दिलेल्या माहितीवरून अपघाताचा गुन्हा दखल केला होता. याबाबत पोलिस निरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एकनाथ ठाकूर, कमलेश पवार संपतराव सोनवणे, कमलेश पवार आदी तपास करीत आहेत. शनिवारी सकाळी घोटी शहरातील या जखमी युवकाच्या मृत्यूचे वृत्त समजताच शहरात शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

३३ कोटींचा निधी बुडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारची काही धोरणे महसूल विभागाला मारक ठरत आहेत. त्यामुळे वाळू लिलावातून मिळणाऱ्या महसुलापैकी सुमारे ३३ कोटींच्या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. इ-ऑक्शन आणि इ- टेंडरिंग ठेकेदारांनी वाळू लिलावाकडे पाठ फिरवली असून, महसूल वाचविण्यासाठी तिसऱ्यांदा आवाहन करण्याची तयारी जिल्हाधिकारी प्रशासनाने चालवली आहे.

गेल्या वर्षी वाळू लिलावाची प्रक्रिया अनेकदा राबवूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली होती. या परिस्थितीत चालू वर्षीही यात बदल होऊ शकलेला नाही. त्यामुळे वाळू लिलावाची किमत न वाढवता गत वर्षीचीच किमत कायम ठेवण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. यंदा २६ घाटांपैकी २० घाटांवरील लिलावाला जीएसडीए आणि ग्रामसभेने मान्यता दिली आहे. त्यातील १७ लिलावांची प्रक्रिया इ-ऑक्शन आणि इ टेंडरिंगने सुरू करण्यात आली आहे. वाळू लिलावासाठी एकूण ८३ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ प्रस्ताव मान्य करण्यात आले. या ३२ प्रस्तावांपैकी २० प्रस्तावांना अंतिम मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने १७ घाटांवर वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये नाशकात तीन, मालेगावात सहा, इगतपुरी, कळवणमध्ये प्रत्येकी दोन, त्र्यंबकेश्वर, निफाड, देवळा, बागलाण येथे प्रत्येकी एका घाटाचा समावेश आहे. या सर्व वाळू ठिय्यांमधून एक लाख ३६ हजार ९८८ ब्रास वाळू निघणार आहे. त्यातून जिल्हा प्रशासनाला ३३ कोटी २७ लाख ७९ हजार १६० रुपये एवढा महसूल मिळणे अपेक्षित आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ६६ कोटी ९० लाख ८ हजार ८४२ रुपये इतकी अनामत रक्कम जमा केली जाणार आहे.

आवाहनांना मिळेना प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाने २३ जानेवारीला पहिल्यांदा लिलावासाठी आवाहन केले. त्यावेळी दोन लिलावातून १४ लाख रुपयांचा महसूल मिळाला. ९ फेब्रुवारीला पुन्हा आवाहन करण्यात आले मात्र, कुणीच ठेकेदार फिरकले नाही. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांना १८ फेब्रुवारीला याबाबत ठेकेदारांना आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. या लिलाव प्रक्रियेतही ठेकेदारांनी सहभाग घेतला नाही, तर विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना लिलावाची किमत कमी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

मदत म्हणजे उपकार नव्हे !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्य संमेलनामधील वादाचे रुपांतर संवादात व्हावे, असे सांगत राजकारण्यांना कोणत्याही क्षेत्रात आपण टाळू शकत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनामध्ये राजकारणी नसावेत असा अट्टाहास टाळायला हवा असे सांगत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाच्या व्यासपी‌ठावरील राजकारण्यांचे अस्तित्व खुपू नये असे सांगताना राजकारण्यांनी संमेलनाला मदत केली म्हणजे उपकार केले असाही समज करू नये, असा टोला लगावला. तर संमेलनात साहित्यिक आणि राजकारण्यांनी औचित्य ठेवून वावरले पाहिजे, असा सल्लाही दिला.

नाशिक महापालिकेत शनिवारी डॉ. मोरे यांची घुमान येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील साहित्यिकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मोरे बोलत होते. ते म्हणाले, 'राजकारणी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना आपण कुठेही टाळू शकत नाही. त्यांना टाळले पाहिजे असा अट्टाहासही नको. मात्र त्यांनीही साहित्याला मदत करतो म्हणून उपकार केल्यासारखी धारणा ठेऊ नये.'


नाशिकरोडला बालिकेवर अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भंगार व कचरा वेचणाऱ्या कुटुंबातील सात वर्षीय बालिकेवर नाशिकरोड बसस्थानकाशेजारील बंद कॅन्टीनमध्ये एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ही घटना पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडली.

वरणगाव (जि. जळगाव) येथील कुटुंबीय नाशिकरोड बसस्थानका शेजारील झोपडीवजापडीक कॅन्टीनमध्ये रहाते. या कॅन्टीनला दरवाजे व खिडक्या नाहीत. गर्दुले, भिकारी यांचा येथे रात्रंदिवस वावर असतो. शुक्रवारी भंगार वेचून हे कुटुंब या पडीक कॅन्टीनमध्ये आले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची सात वर्षाची बालिका खेळत असताना परिसरातील अनोळखी अल्पवयीन संशयिताने तिला कॅन्टीनच्या माळ्यावर नेले व अतिप्रसंग केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आईने धाव घेतली. तीने आरडाओरड करताच नागरिक व रिक्षाचालक मदतीला धाऊन आले. संशयित अल्पवयीन मुलगाही याच परिसरात वास्तव्यास असून तोही भंगार वेचण्याचे काम करतो. संशयिताला चोप देऊन नागरिकांनी त्याला चौकीतील पोलिसांच्या हवाली केले. पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

कॅन्टीन कधी पाडणार?

पडीक कॅन्टीनमध्ये गर्दुले, मद्यपी, भिकारी येतात. कॅन्टीनमध्ये कचरा टाकला जात असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. कॅन्टीनमुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे ती पाडण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

सट्टेबाजांवर करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेली भारत-पाकिस्तान लढत रविवारी सकाळी होणार आहे. लक्षवेधक ठरणाऱ्या या लढतीदरम्यान सट्टेबाजांनी डोके वर काढू नये म्हणून शहर पोलिसांनी शनिवारी दिवसभर संशयित तसेच रेकॉर्डवरील बुकींची शोधमोहीम हाती घेतली. दोघांना पकडून चौकशीही करण्यात आली. सामन्यादरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होण्याची माहिती सूत्रांनी दिली असून, सट्टेबाजांना रोखण्यात पोलिस यशस्वी ठरतील का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

यंदाच्या विश्वकप स्पर्धेदरम्यान भारताचा पहिलाच सामना पांरपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी आहे. गेल्या अनेक वर्षानंतर हा सामना रंगणार असून, या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. सामना ऑस्ट्रेलियात रंगणार असला तरी शहरातील बुकी 'संधीचे सोने' करण्याच्या तयारीत लागले आहे. भारत-पाक सामन्यातील उत्कंठा इतर सामन्यात नसल्याने सर्वांत जास्त उलाढाल रविवारी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

अत्याधुनिक संपर्क साधनांमुळे प्रत्येक चेंडूनुसार, ओव्हरनुसार भावात चढ-उतार होते. विकेट, चौकार, षटकार यावरही बुकींकडून पैसे स्वीकारले जातात. सामन्याच्या निकालासाठी वेगवेगळ्या बुकींकडे वेगवेगळे भाव ठरविले जात आहेत. या छुप्या बेकायदा गैरकृत्याकडे पोलिसही लक्ष ठेऊन आहेत. आजवर या गुन्ह्यात सापडलेल्या बुकींची शहर पोलिसांनी शनिवारी धरपकड केली. इतर बुकींनी कारवाईच्या भितीने शहराबाहेर पलायन केले असून, दोघा रेकॉर्डवरील बुकींची चौकशी करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांनी दिली. भारत-पाकिस्तान सामनाच नव्हे, तर संपूर्ण वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून बुकींच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्यात येते आहे.

यापूर्वी नाशिकरोडसह देवळाली परिसरातून बुकींचे अड्डे शोधून काढले होते. आताही क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवरून बुकींच्या हालचालीकडे लक्ष पुरवण्यात येत असल्याचे​ शेवटी दिवाण यांनी स्पष्ट केले.

दुभाजक बनतोय मृत्यूचा सापळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी सिंहस्थासाठी द्वारका ते दत्तमंदिर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून बिटको कॉलेजसमोर नव्याने दुभाजक टाकण्यात येत आहे. हे दुभाजक अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने त्याचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने नाशिक-पुणे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्या कामांतर्गत दत्तमंदिर ते शिखरेवाडी या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात येत आहे. हे दुभाजक अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने हा रस्ता खुला ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.

बिटको कॉलेज हे नाशिकरोड परिसरातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेले कॉलेज आहे. या परिसरात एस. पी. कोठारी कॉलेज. के. जे. मेहता कॉलेज, जयरामभाई हायस्कूल, जे. डी. सी. बिटको हायस्कूल अशा शाळा व कॉलेजेस आहेत. परिसरात अंदाजे २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असते. बिटको कॉलेजसमोर असलेल्या रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम सुरू असून हे पूर्ण झाल्यास विद्यार्थी व रहिवाशांना मोठा अडथळा निर्माण होणार आहे. येण्या-जाण्याच्या समस्या निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळेल. याच ठिकाणी गुरुद्वारा आहे तेथे नियमित धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. येथे येणाऱ्या भाविकांना या दुभाजकांमुळे रस्ता ओलांडण्यास त्रास होणार आहे. उपनगरहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बिटको कॉलेजच्या स्टाफला प्रवेश करायचा झाल्यास दत्तमंदिरहून फिरून यावे लागणार आहे. तसेच नाशिकरोडडून बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना शिखरेवाडीच्या चौकाला वळसा घालून प्रवेश करावा लागणार आहे. तसेच गुरुद्वाराच्या परिसरात रहाणाऱ्या नागरिकांना नाशिकरोडला जायचे झाल्यास शिखरेवाडीच्या चौकाला वळसा घालून जावे लागणार आहे.

वाहतूक समस्या वाढणार

बिटको सिग्नल ते शिखरेवाडी परिसरात वाहतुकीची कोंडी नेहमीच असते. अनेकदा पोलिस बंदोबस्ताची मागणी करुनही तो दिला जात नाही. अपघात घडल्यानंतर काही दिवस पोलिस येथे हजेरी लावतात, त्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच परिस्थिती निर्माण होते. दुभाजक झाल्यामुळे राँग साईडने वाहन चालणाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्याता वर्तविण्यात येत आहे.

वृध्दांनी रस्ता ओलांडायचा कसा

दुभाजकाची उंची दोन ते अडीच फुट असून वृध्दांनी व महिलांनी रस्ता कसा ओलांडायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृद्धांना रस्ता ओलांडायचा झाल्यास एक ते दीड किलोमिटरची पायपीट करावी लागणार आहे.

अंडरपास ऐवजी हवा फ्लाय ओव्हर बिटको कॉलेजसमोर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपास करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, अंडरपास झाल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयिस्कर रहाणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी फ्लायओव्हर करावा अशी विद्यार्थिनींनी मागणी केली आहे.

दुभाजकांमुळे अपघातात वाढ होणार असून आताच त्याचा प्रत्यय येतोय. दुभाजक तयार करताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये सुरक्षेच्या ऐवजी असुरक्षितता वाढणार आहे, याचा पुनर्विचार व्हावा.

- नंदकुमार गोखले, व्यावसायिक

राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनिअरकडे रस्ता खुला ठेवण्याची विनंती केली. परंतु इजिनिअर दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु असून त्यात भर पडेल.

- जतीन रावल, विद्यार्थी प्रतिनिधी

दुभाजकामुळे शिखरेवाडी परिसरातील रहिवाशांना सर्वाधिक त्रास होणार आहे. अनेकांना वळसा घालून जावे लागणार असल्याने वेळेबरोबरच पेट्रोलचा अपव्यय होणार आहे.

- जावेद सय्यद, रहिवासी

हॉस्पिटलमध्ये रुग्ण कसे येतील हा प्रश्न आहे. लोकांना रस्ता ओलांडता येणार नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळणार आहे. विकास व्हावा पण तो माणसाच्या जीवावर उठणारा नसावा.

- दीपक भिसे

काही दिवसांपूर्वी येथे अपघात होऊन जीव गमावल्याची घटना ताजी असताना दुभाजक तयार करण्याचा घाट घातला जात आहे. येथे दुभाजकाची गरज नसून रस्ता ओलाडण्यासाठी फ्लायओव्हरची आवश्यकता आहे.

- प्रवीण शेट्टी

पुणे रोडवरचे दुभाजक विद्यार्थ्यांसाठी अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार आहे. हे तयार करतांना कॉलेजशी विचारविनिमय करायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही पुनर्विचार व्हावा.

- प्रा. डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य, बिटको कॉलेज

रस्ता ओलाडण्यासाठी तातडीने फ्लायओव्हर तयार करण्याची गरज आहे. ती करावी व रस्त्यातील दुभाजकांचे काम थांबवावे.

- रोहन जाधव, माजी जीएस

डांबरीकरणामुळे त्र्यंबकरोड रात्री बंद रात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकरोड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्र्यंबक नाका ते महिंद्रा सर्कल अशा एका मार्गाचे काम रविवार, १५ फेब्रुवारीपासून रात्रीच्या वेळी केले जाणार आहे. कामामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी रात्री १० ते सकाळी सहा या कालावधीत त्र्यंबकरोडवरील काम सुरू असलेल्या मार्गाची वाहतूक बंद केली जाणार आहे.

त्र्यंबक नाका ते जलतरण तलाव पुढे एबीबी सर्कल आणि महिंद्रा चौक या रस्त्याच्या एका बाजूच्या कामासाठी ३५ दिवसांचा कालावधी खर्ची होण्याची शक्यता आहे. तसेच महिंद्रा चौकापासून एबीबी सर्कल ते त्र्यंबक नाका या रस्त्याचे काम ३५ दिवसात पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण रस्त्याच्या कामासाठी ७० दिवसांचा कालावधी लागणार असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काम सुरू असलेल्या रस्त्यावरील वाहतूक रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

त्र्यंबक नाका ते महिंद्रा चौक या मार्गाचे १५ फेब्रुवारीच्या रात्रीपासून काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे त्र्यंबकनाक्याकडून सातपूरकडे जाणारी वाहतूक गडकरी सिग्नलकडून चांडक सर्कलमार्गे उंटवाडीरोडने सातपूरकडे जाईल. तसेच एबीबी सर्कल ते महिंद्र चौक हे काम सुरू असताना काम सुरू नसलेल्या दुसऱ्या बाजुने वाहतूक सुरू राहील, असे महाालिकेकडून कळविण्यात आले आहे.

इंडिया जितेंगे हम। तुझमे है दम।

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रिकेट हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून, आपल्या संस्कृतीचा एक भाग झाला आहे. त्यात वर्ल्डकपचा फ‌िव्हर म्हटला की कोणाच्या आनंदाला पारावर उरत नाही. याचाच विचार करून नाशिकच्या काही युवकांनी एकत्र येऊन टीम इंडियाला स्फूर्ती देण्यासाठी हिंदी थीम सॉँग तयार केले आहे.

२०११ चा वर्ल्डकप विजेत्या ठरलेल्या टीम इंडियाने यंदा पुन्हा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करावा हा दबाव टीमवर असणार हे साहजिकच आहे. याचा विचार करून टीम इंडियाची एनर्जी वाढविण्याच्या उद्देशाने हे गाणे नाशिककर युवकांनी तयार केल्याचे भूषण मटकरी यांनी सांगितले. या गाण्याची संकल्पना, लिखाण, संगीत व गायन या सर्व जबाबदाऱ्या भूषण मटकरी याने वठवल्या असून हे गाणे त्यानेच गायले आणि संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे संगीत संयोजन अनिल धुमाळ याचे तर सॉँग मिक्सिंग आणि प्रोग्रामिंगचे स्वरांजयने केले आहे. या गाण्यात बासरी वादन मोहन उपासनी यांचे असून विनिश नायर यांनी ड्रम वाजवला आहेत. गाण्यांचे रेकॉ‌र्डिंग प्रशांत पंचभाई, आनंद ओक आणि केदार रत्नपारखी यांनी केले आहे.

थीम सॉँगसाठी www.worldcupsong2015.com ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वर हे गाणे फ्री डाऊनलोड करता येणार आहे. या गाण्याचा व्हिडिओ शूट झाला असून, तोही लवकरच 'यू टूब'वर पहायला मिळणार आहे. त्याचे दिग्दर्शक म्हणून पुष्कराज जोशी याने काम बघितले असून, रवी जन्नावर आणि ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. हर्षल भुजबळ हा ग्राफिक्सचे काम करणार आहेत. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी रोहन एन्टरप्राइझेसचे अविनाश शिरोडे आणि नाशिक डिस्ट्र‌िक्ट क्रिकेट असोसिएशनचे अतिशय महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. हे गाणे या सर्वांतर्फे भारतीय संघासाठी समर्पित केले आहे.

इंडिया तुझमे है दम,

इंडिया जितेंगे हम

मारदे तू तोड दे,

सेहेले तू हर सितम

इंडिया जितेंगे हम ।।

इंडिया जितेंगे हम ।।

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images